Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लगेच ऑपरेशन केले ते बरे झाले.
लगेच ऑपरेशन केले ते बरे झाले. फुंतरू ला लवकर बरे वाटू देत>>>+१
ओह फुंतरू! लवकर बरा होऊ देत.
ओह फुंतरू! लवकर बरा होऊ देत. काळजी घ्या.
रिपोर्ट नॉर्मल येईल
रिपोर्ट नॉर्मल येईल __/\__
बाप रे फुंतरु ला लवकर बरे
बाप रे फुंतरु ला लवकर बरे वाटेल,...
आले का फुंतरूचे रिपोर्ट? लवकर
आले का फुंतरूचे रिपोर्ट? लवकर बरं वाटेल त्याला. नॉर्मलच येतील रिपोर्ट.
रिपोर्ट यायला वेळ लागेल झालं
रिपोर्ट यायला वेळ लागेल झालं तर १५ दिवसात होईल नाही तं २ महिने सुद्धा लागू शकतात म्हणाले Dr. सध्या ऑपरेशन झाल्यामुळे लेकरू खूप सुस्त आहे. खूप साऱ्या गोळ्या आणि टॉनिक सुरु आहेत. २० वगैरे दिवस लागेलच त्याला रेग्युलर होण्या करीता. काल तर रात्र भर तो आणि त्याच्या सोबत मी होतीच जागी. बघा पण कस असतं यांचं मी ऑफिस मधून काल घरी गेली तेंव्हा उठून आला एवढ्या त्रास असतांना शेपूट हलवत. त्याच्या करीता गाणगापूर येथे अभिषेक पण झाला. बाबा तं त्या दिवशी रडायलाच लागले म्हणाले काही होणार नाही न फुंतरूला आपल्या. हे खरं प्रेम निस्वार्थ... एवढे वर्ष त्याला काहीही झाले न्हवते आणि आता एकदम असे काही झाले कि आम्हालाच accept होत नाही आहे. पण तो येईल आपल्या रंगात लौकरच .... आम्ही आहोत न... तो एक हटखोर आम्ही १०० हटखोर... २० दिवस कालच त्याला डेड लाईन दिली आहे मी...
रिपोर्ट यायला वेळ लागेल झालं
रिपोर्ट यायला वेळ लागेल झालं तर १५ दिवसात होईल नाही तं २ महिने सुद्धा लागू शकतात म्हणाले Dr. सध्या ऑपरेशन झाल्यामुळे लेकरू खूप सुस्त आहे. खूप साऱ्या गोळ्या आणि टॉनिक सुरु आहेत. २० वगैरे दिवस लागेलच त्याला रेग्युलर होण्या करीता. काल तर रात्र भर तो आणि त्याच्या सोबत मी होतीच जागी. बघा पण कस असतं यांचं मी ऑफिस मधून काल घरी गेली तेंव्हा उठून आला एवढ्या त्रास असतांना शेपूट हलवत. त्याच्या करीता गाणगापूर येथे अभिषेक पण झाला. बाबा तं त्या दिवशी रडायलाच लागले म्हणाले काही होणार नाही न फुंतरूला आपल्या. हे खरं प्रेम निस्वार्थ... एवढे वर्ष त्याला काहीही झाले न्हवते आणि आता एकदम असे काही झाले कि आम्हालाच accept होत नाही आहे. पण तो येईल आपल्या रंगात लौकरच .... आम्ही आहोत न... तो एक हटखोर आम्ही १०० हटखोर... २० दिवस कालच त्याला डेड लाईन दिली आहे मी...
बिचारा... अगदी मलूल झालाय.
बिचारा... अगदी मलूल झालाय. रिपोर्ट्स नक्की नॉर्मल येतील. काळजी करु नका.
अरे देवा! फुंतरुला लवकर बरे
अरे देवा! फुंतरुला लवकर बरे वाटू दे! आणि काळजी करु नका नॉर्मलच येतील रिपोर्टस !
आता कसा आहे फुंतरु??
आता कसा आहे फुंतरु??
थोडासा ठीक आहे पण बाकी तंत्र
थोडासा ठीक आहे पण बाकी तंत्र बिघडले आहेच त्याचे.
काहीही खाल्ला की उलटून पडतंय खूप हेवी डोस सुरू आहे नं त्याला औषधांचा म्हणून...कफ झालाय या करता काही उपाय असेल तर कळवा बरं कोणी...
ताक दही पचायला हलके असते आणि
ताक दही पचायला हलके असते आणि नॅचरल अँटिबायोटिक
ते पचत असेल तर द्या
पोळी चिकन डॉग फूड दूध अजिबात नको
बिस्किटं ट्रीट गोड देखील पूर्ण वर्ज्य
तरही व्हेट ला विचारून मगच द्या
कारण एकाला चालेल ते दुसऱ्या भुभूल चलेलंच अस नाही
हरितात्यांचा सिम्बा एकदम
हरितात्यांचा सिम्बा एकदम राजबिंडा दिसतोय. छान प्रचि.
इतरही गमती जमती मस्त !
आशुचँप यांच्या वरच्या पोस्टला +1
@ kalyanib,
फुंतरूचं वय काय आहे. Senior असेल तर थोडा अधिक वेळ लागू शकतो उपचारांना प्रतिसाद मिळायला. दही आवडत असेल तर मऊ - पेजेसारखा दहीभात देऊन बघा. साखर आणि मीठ असलेले पदार्थ देणं टाळा. भूभू आजारी पडलं की तगमग होणं, काळजी वाटणं साहजिक आहे पण धीरानं घ्या.
फंतरू चे वय ६ आहे. त्याला वेळ
फंतरू चे वय ६ आहे. त्याला वेळ लागेलच हे माहिती आहे पण तरीही बघवत नाही असा सुस्त...
@ आशुचँप महाराजांना आधी पासूनच दुधाचे प्रीमियम प्रॉडक्ट सोडले तर बाकी आवडतच नाही... ना दही दूध/साय... सध्या कॅन फूड आहे सुरू... कफ झालाय नं त्यामुळे अस्वस्थ असतो... डॉक्टरने म्हटले आहे की जेवढा झोपेल तेवढा झोपू द्या त्यांनीच ते रिकवर होतात लौकर... बघू आज टाके काढायला जायचे आहे ... एवढं शांत आज पर्यंत नाही बघितलं मी त्याला...
(No subject)
@ kalyanib,
@ kalyanib,
६ वर्षांचा म्हणजे काही फार नाही वय. फुंतरूला वाटेल लवकर बरं. त्याला खूप खूप शुभेच्छा !
कसा आहे आता फंतरू
कसा आहे आता फंतरू
अन्न पचायला लागले की नॉनव्हेज देता येईल ज्यामुळे तो खुप लवकर बरा होईल.
६ वर्षांचा म्हणजे काही फार
६ वर्षांचा म्हणजे काही फार नाही वय. फुंतरूला वाटेल लवकर बरं. त्याला खूप खूप शुभेच्छा ! ... हो अगदी बरोबर 6 म्हणजे फार वय नाही, नक्की लवकर बरे वाटेल फंतरू ला
नॉनव्हेज देता येत नसेल आणि
नॉनव्हेज देता येत नसेल आणि प्रोटीन द्यायचे असेल तर वरणाचे पाणी आणि भात देता येईल फक्त त्यात मीठ नको
हो त्यात किंचित हळद घालून
हो त्यात किंचित हळद घालून
हळद पण खूप कामाची।आहे
मी ओड्याचे चिकन शिजवताना कायम त्यात अर्धा चमचा हळद घालतो
नक्कीच हळद तर हवीच, फायदाच
नक्कीच हळद तर हवीच, फायदाच होतो ....
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/CkBMFhCtvwO/?igshid=YmMyMTA2M2Y=
ओड्याचे दिवाळीचे उद्योग
ओड्याचे दिवाळीचे उद्योग
बाबा आमचे घरीच बनवतात आकाशकंदील
गेली दोन वर्षे जुनाच चालला पण आत यावेळी नवीन घेतला
ते म्हणजे काड्या आणून कागद कापून वगैरे
आणि ओड्या उद्योग करेल म्हणून पहाटे उठून करायचे पण एकदा अंदाज चूकला आणि ओडिनला कळलं हे काहीतरी बनवतायत
मग काय, मी मी मदत करतो तुम्हाला
काय करू काय आणून देऊ असल्या उत्साहात गेला
प्रत्यक्ष शून्य मदत आणि शेपटीला फेविकोल चिकटला त्याला दोन कागद चिकटले आणि मग घरभर धावला हे काय लचांड मागे लागलं म्हणून
शेवटी दादूने त्याला पकडून दाबून धरला आणि बाबांनी शेपटी पुसून घेतली
नेमका मी नव्हतो नैतर भारी व्हिडिओ आला असता
आणि आता आजीने दम दिलाय

रांगोळी पुसली किंवा रांगोळीच्या वरून चालत गेला किंवा त्यावर जाऊन बसला तर फटके
त्यामुळे थोडं अंतर ठेवून फतकल मारतोय
पण दिवाळी संपेपर्यंत एकदा तरी धुम्बी रांगोळीने माखून घेणार तो याची खात्री आहे
त्याला दोन कागद चिकटले आणि मग
त्याला दोन कागद चिकटले आणि मग घरभर धावला हे काय लचांड मागे लागलं म्हणून.....
शेपटीला फेविकोल चिकटला त्याला
शेपटीला फेविकोल चिकटला त्याला दोन कागद चिकटले >>>> ओडिन
व्हिडीओ मस्त आला असता खरंच!!
माउईने काल बारीकसा उद्योग केलाच. शंकरपाळ्यांचा मस्त वास येत होता त्याला. अगदीच वाटले तर एखादा तुकडा वगैरे इतकाच दिला असता त्याला एरवी. पण मुलीने एका ब्राउन पेपर बॅग मधे भरले आणि टंगळ मंगळ करत खात होती. तर मधेच डोळा चुकवून माव्याने बॅगच पळवली तिची. मूठभर तरी शंकरपाळे लंपास केलेत. ताव मारला आनंदाने अगदी. पेपरबॅग चा खुडबुड आवाज काय येतोय बघायला गेले तर फाटकी बॅग कोपर्यात पडलेली आणि हा डांबरट कुत्रा साळसूदसारखा जिभेने मिश्या चाटत निघून गेला माझ्या शेजारून !
शेपटीला फेविकोल चिकटला त्याला
शेपटीला फेविकोल चिकटला त्याला दोन कागद चिकटले >>>> ओडिन
माऊइची दिवाळी झाली
माव्या ची दिवाळीच झाली की मग
बॅगभर शंकरपाळे
चंगळ नुसती
बॅगभर शंकरपाळे ... त्याला
बॅगभर शंकरपाळे ... त्याला का नको?त्याला का मन नाही?
सिम्बाला फराळा मध्ये चकली
सिम्बाला फराळा मध्ये चकली खूपच आवडली , जास्त देत नाही पण चकलीचा डब्बा उघडला कि हा समोर हाजीर, मग ते केविलवाणे भाव आणून एक दोन तुकडे तरी फस्त करतोच
परवा बाहेर गेलो, सिंम्बाला
परवा बाहेर गेलो, सिंम्बाला नेलं नाही. परत आलो तर बाहेर असा वाट पहात बसला होता. नेलं नाही म्हणून ऊदास बसला होता
Pages