भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादूला हे सगळे किस्से सांगितले तर म्हणे बरंय आपण देतो लक्ष
म्हणलं तू काय देतोस तर म्हणे आम्ही अभ्यास एकत्र करतो

त्यांचा एकत्र अभ्यास म्हणजे एक थोर प्रकार आहे
पोरगा खिशात बिस्किटं ठेऊन ओडिन समोर धडे नैतर फॉर्म्युले वाचत बसतो आणि नंतर पुस्तक बंद करून त्याला म्हणून दाखवतो किंवा समजवून सांगतो
ओड्याने टंगळमंगळ न करता सगळं ऐकलं तर त्याला बिस्कीट
ते येडा पण बिस्किटाच्या आशेने सगळा अभ्यास ऐकत बसतो तिथं
Happy

हो पण बिस्किटं मिळणार असतील तरच
नैतर ढिम्म लक्ष देत नाही
तू वाचत रहा मी एक झोप काढतो तोवर म्हणत बिनधास्त झोपतो आणि घोरतो पण Happy

बापरे! असं स्वतःला जखम करून घेणं म्हणजे डेंजर आहे एकदम. काय काय विचार करतात ही मंडळी!

एकत्र अभ्यास >>> Lol भारीये

त्यांचा एकत्र अभ्यास म्हणजे एक थोर प्रकार आहे
पोरगा खिशात बिस्किटं ठेऊन ओडिन समोर धडे नैतर फॉर्म्युले वाचत बसतो आणि नंतर पुस्तक बंद करून त्याला म्हणून दाखवतो किंवा समजवून सांगतो
ओड्याने टंगळमंगळ न करता सगळं ऐकलं तर त्याला बिस्कीट
ते येडा पण बिस्किटाच्या आशेने सगळा अभ्यास ऐकत बसतो तिथं >> हे खरच थोर आहे..... तुम्ही घरात छुपे कॅमेरे का बरं लावुन ठेवत नाही. आजी, दादु , ओडीन आणि एकंदरच ज्या काही गमतीजमती चाललेल्या असतात ते वाचताना इतकी मजा येते तर पहाताना काय भारी वाटेल...

<<<ते येडा पण बिस्किटाच्या आशेने सगळा अभ्यास ऐकत बसतो तिथं >>
It happens only in dog's home.. ( हे गाण्याच्या चालीत वाचावे) ( मीटर तुमचे तुम्हीच जुळवून घ्या)
मांजरावर असा प्रयोग केला तर- ठेव ते बिस्किट तुलाच - म्हणून शेपूट वर करून निघून जाईल.

ओड्या पण ग्रॅजुएट होउन जाईल लवकरच>>>
त्याला शाळा क्लास कॉलेज नाहीये ही किती बेस्ट गोष्ट आहे
त्याला शिकवायचं असतं तर मला धडकीच भरली असती
कधी कधी स्मार्ट वागतो पण कधी कधी इतका ढिम्म असतो की विचारू नका

घरात दादूच्या शाळेची वह्या पुस्तके यांचा पसारा असतोच वर या धम्ब्याची खेळणी, मग दोघेही ओरडा खातात
दादू निदान मनाविरुद्ध का होईना थोडं तर आवरतो, ओड्या निवांत लोळत मला त्याचं विनिंग स्माईल देतो Happy
त्याच्या खेळण्याचे एक बॉक्स केलं आहे तर ती खेळणी त्याने उचलून त्या बॉक्स मध्ये टाकावी यासाठी मी इतका आटापिटा केला.
बॉल घेऊन मी स्वतः रांगत जाऊन खोक्यात टाकला आणि बक्षीस म्हणून स्वतः एक बिस्कीट (आपलं वालं Happy ) खाल्लं
म्हणलं तुही असं करून दाखवलं तर तुलाही एक बिस्किट
त्याने बरोबर त्याला सोयीचा अर्थ लावला, आणि तत्परतेने बॉल खोक्यातून काढून माझ्या पुढ्यात टाकला
म्हणलं नाही रे, इथून उचलून खोक्यात टाकायचा आहे
म्हणत मी परत खोक्यात टाकला तर त्याने परत तो काढून मला आणून दिला
अरे म्हणलं ट्रेनिंग माझं सुरू आहे का तुझं?
पण आपल्याला काहीतरी कळलं आहे या विचारानेच चिरंजीव इतके स्वतःवर तुडुंब खुश झालेले की परत टाक खोक्यात मी आणून देतो म्हणून मागे लागला आणि आता मी खेळणी उचलून ठेवली की दहा मिनिटात ती सगळी बाहेर काढून परत परत करू हे म्हणून भुंकतो
शेवटी तो पसारा आवरणे प्रोजेक्ट चा गाशा गुंडाळून ठेवावा लागला
घरचे अजूनही हसतात मला त्यावरून Happy

तुम्ही घरात छुपे कॅमेरे का बरं लावुन ठेवत नाही.>>>>
अभ्यासाचा टाकतो व्हिडीओ लवकरच

त्याचे आता इतके फोटो आणि व्हिडिओ झालेत की त्यासाठी लवकरच वेगळी हार्डडिस्क करावी लागेल Happy

त्याचा आरती करतानाचा व्हिडिओ पण बराच पॉप्युलर झालाय Happy

मांजरावर असा प्रयोग केला तर- ठेव ते बिस्किट तुलाच - म्हणून शेपूट वर करून निघून जाईल. >>>> अगदी अगदी
मांजर जाम डॅम्बिस असतात Happy

सगळे किस्से भारी
आशु तू उलटं करून बघ बरं. खोक्यातून खेळ काढून पसर अन ऑर्डर दे की आवर आता Biggrin

हाहाहा,दादुबरोबर अभ्यास, पसारा आवरण्याचं ट्रेनिंग फियास्को इमॅजिन करून जाम हसले. Odya कसला गोड आहे!
फुंतरु,किती जीव लावलाय त्याने आपल्या कुटुंबियांना!
हरितात्यांच्या भुभुचा फोटो पण भारी गोड.

खोक्यातून खेळ काढून पसर अन ऑर्डर दे की आवर आता>>> तेही करून पाहिलाय
तो मग त्याच्या आवडीचे खेळणे घेऊन सोफ्याखाली जातो
बाकीचे तुमचे तुम्ही निस्तरा म्हणत

अजिबात तो अंगाला काही लावून घेत नाही Happy

>> बॉल घेऊन मी स्वतः रांगत जाऊन खोक्यात टाकला आणि बक्षीस म्हणून स्वतः एक बिस्कीट (आपलं वालं Happy ) खाल्लं
म्हणलं तुही असं करून दाखवलं तर तुलाही एक बिस्किट
त्याने बरोबर त्याला सोयीचा अर्थ लावला, आणि तत्परतेने बॉल खोक्यातून काढून माझ्या पुढ्यात टाकला>> Lol
वरचा इन्स्टा व्हिडीओ पण क्युट आहे.

तुमचे पेंट्स त्यांचे नेहमीचे खाणे म्हणजे किबल्स, किंवा मग इतर डॉग फूड सोडून काय काय खाता ?

सिम्बा दही भात, ice-cream तर आवडीने खातोच पण बाकरवडी त्याची एकदम फेवरीट आहे, बाकरवाडीचा नुसता खोका दिसला कि हा समोर उभा ठाकलाच म्हणून समजा आणि मग एक तुकडा तरी द्यावाच लागतो. तसेच घरातील कोणीही फ्रीझ उघडला कि नक्की चालले आहे हे पाहणे आद्य कर्त्यव्य असल्यासारखे हा कुठूनही फ्रीझ समोर उभा राहणार म्हणजे राहणारच Lol Lol Lol

माउई पण कोणीही किचन मधे विशिष्ट डबे उघडले किंवा बिस्किट चा पुडा वगैरे उघडल्याचा आवाज आला की ताबडतोब जिथे असेल तिथून धावत येतो Happy
ह्यूमन फूड मधे माउई ला गरम पोळी, दही भात किंवा वरण भात खूप आवडतो. एका वेळी( एका दिवसात) अर्धी पोळी किंवा दोन घास भात इतपतच देतो. पार्ले जी किंवा तत्सम बिस्किटे पण फार आवडतात पण देऊन चालत नाही फार. बारीकसा तुकडा देतो. आइस क्रीम तर आवडतेच पण देत नाही त्याला शक्यतोवर.अ‍ॅपल चे लहान स्लाइसेस देतो ट्रीट सारखे. कधी भाजलेले शेंगदाणे. आम्ही बार्बेक्यू केला तर त्याच्या साठी एक चिकन चा तुकडा वेगळा मॅरिनेट करते, मसाला मीठ न लावता थोडे दही आणि हळद लावून. मग आमच्या मीट सोबत त्याचा पण तुकडा ग्रिल करायचा.
मग आमच्याबरोबरच त्याला पण दिला की जाम खुष होतो.

हॅरीला दहीभात , दर दिवसाआड चिकन अस जेवण देतो.
मात्र चिकन दिले तर दुसऱ्या दिवशी तो दही भात खायला मागत नाही. तेव्हा नखरे करू लागतो. मग त्याला लाईनीवर आणावे लागते. किबल वगैरे अधुन मधुन खातो.
वेलची केळी त्याला खूप आवडतात. मात्र त्याला कुस्करून दिलं पाहिजे.

ओडिन पण सगळं काही खातो
पण दहीभात अगदी आवडीचा
आई तर त्याला वसुली अधिकारी म्हणते - ती दुपारी जेवताना दही भात खायला घेतला की हा समोर जाऊन उभा राहतोच, आणि अगदी डोळ्यात प्राण वगैरे आणून
मग त्याला दोन घास घातल्याशिवाय तिला खाताच येत नाही
त्यानंतर आईस्क्रीम पण प्रचंड आवडतं त्यामुळे त्याला लपवुन खावं लागतं कारण त्याला थोडंस देऊन मग आपण खात बसलेलं त्याला चालत नाही, लाळ टपकवत समोर बसून राहतो

अजून एक अजब आवड म्हणजे खोबरं, आई किंवा बायको खोबरं खवत बसल्या की हा आलाच
मग थोडं शिल्लक ठेऊन त्याला ती करवंटी द्यायची मग पुढचा अर्धा तास खरवडून सगळं खोबरं खातो
आणि नंतर त्या करवंटीशी कडकडा भांडतो सुद्धा, उचलून फेकतो, परत उचलून आणतो आणि भुंकतो

गवारीच्या शेंगा खूप आवडीने खातो
अगदी दिल्या तर अर्धा किलो सुद्धा खाईल कुडुंम कुडुंम करत

बाकी कुठल्याही प्रकारचे लाडू अत्यंत आवडते
पोळीचा लाडू आमच्यासोबत त्याच्या साठीही एक करून घ्यावा लागतो छोटा

सगळे गोड पदार्थ कधीही खाऊ शकतो, एकदा माझ्याकडून शिरा उरला होता, तो रात्री शिल्लक राहिलेला, गाढ झोपलेला ओड्या, म्हणलं बाळा शिरा खतोस का रे
लगेच उठून आला आणि चट्टामत्ता केलाही

सगळी बाळं लैच गोड आहेत.

ओड्याच्या अभ्यासाची लिंक भारीये. त्याला समजतंय की इथे काहीतरी वेगळं चाललंय. पण तरी दादूच्या हातावर हात ठेवणं वगैरे पहायला मज्जा आली. थँक्स चँप! दादू पण तुझ्यासारखाच गमतीशीर दिसतोय. मस्त गप्पा मारतोय ओड्याशी.
खेळणी ट्रेनिंग वाचून जाम हसू आलं. अजूनही इमॅजिन करून हसतेय Lol

:हहपुवा: ओडीन रे ओडीन
हे बाळ कधी मोठं होऊच नये.

फुंतरू कसाय आता पाय ? यांची अटॅचमेंटच वेगळी Sad

अरे आशू, मागे तुच सांगितलं होतस ना की पाळीव कुत्र्यांना माणसांचं अन्न अजिबात देऊ नये.. विशेषतः साखर असलेलं ??

Pages