Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्युट दिसतोय काऊबॉय माऊई
क्युट दिसतोय काऊबॉय माऊई
मस्त दिसतोय माऊई.
मस्त दिसतोय माऊई.
माव्याच्यापण "स्कर्ट
माव्याच्यापण "स्कर्ट घातलेल्या सुंदरींकडून" पाप्या घेऊन झाल्या>>>
डांबीस आहे माव्या
सगळीच भुभे किती गोंडस दिसतायत
सध्या इंस्टा वर पण हॅलोविन चे ड्रेस घालून भुभ्याचे व्हिडिओ बघतोय रोज
एकसे एक धमाल
अशक्य क्रिएटिव्ह असतात लोकं
सिम्बाला होलोवीनचे बॅटमॅन
सिम्बाला होलोवीनचे बॅटमॅन विंग्स लावलेले अजिबात आवडले नाहीत. पट्ठ्याने नुसता धुमाकूळ घातला आणि काढायला लावले त्यात एका विंगचे तुकडे तुकडे पण करून झाले .
ओरडा बसला तर लगेच त्याच्या क्रेट मध्ये जाऊन चक्क झोपला
गोंडस लोक्स!
गोंडस लोक्स!
गोड आहे माऊई
गोड आहे माऊई
माउई प्रचन्ड गोड दिसतोय, बाकी
माउई प्रचन्ड गोड दिसतोय, बाकी भुभु लोक्स पण भारी आहेत.
व्यांपायर सिंबा
व्यांपायर सिंबा
हहहहा मस्त
हहहहा मस्त
ओश्कु पण झालाय बॅटडॉग
कालच फोटो पाहिले त्याचे इंस्टा वर
सगळीच भुभे किती गोंडस दिसतायत
सगळीच भुभे किती गोंडस दिसतायत
सिम्बाने थोडा वेळ तरी ठेवलेले दिसतंय आहे ते विंग्स ....आमचा अजिबात असलं काही करवून घेत नाही ... घे कि फाड ... हे एकच धोरण
मस्त आलाय की सिंबाचा फोटो!
मस्त आलाय की सिंबाचा फोटो!
कधी कधी ते जे काय आहे ते देण्ययासारखे नसेलच तर त्याला उचलून आणावे लागते तिथून!कारण आपल्यालाच ते तसे तासंतास बघत बसलेले नाही बघवत 
माउईला पण ती टोपी फाडायला हवी आहे आणल्या दिवसापासूनच. ती ज्या रॅक मधे ठेवली आहे तिथे जाऊन तिच्याकडे बघत बसतो बराच वेळ. त्याची पॅसिव अॅग्रेसिव स्ट्रॅटेजी आहे ती . एखादी उंच ठेवलेली किंवा सोफ्याखाली वगैरे गेलेली वस्तू हवी असेल तर खूप वेळ तिथे बसून नुसते बघत बसायचे त्याकडे! मग कधी कधी सोफ्याखालच्या वस्तू कडे आडवा पडून बघत बसला असताना तिथेच झोप पण लागते त्याला. थोड्या वेळात कोणाला तरी पुळका येतोच आणि जे काय असेल ते काढून देतात त्याला हे पक्के माहित आहे
Cutie pie babies.
Cutie pie babies.
कस्ले भारी फोटोज आहेत एकेक!
कस्ले भारी फोटोज आहेत एकेक!
फोटोपुरते ठेवलेले दिसतायत पंख.
सिंबा एकदम देखणा बॅटमॅन आहे
माऊई तर कसला गोडुला दिसतोय. पाप्यावाला फोटो धमाल. मज्जा करून घेतलेली दिसतेय त्याने.
सगळे किस्से पण मजेशीर
<<त्याची पॅसिव अॅग्रेसिव
<<त्याची पॅसिव अॅग्रेसिव स्ट्रॅटेजी आहे ती >>
मला तरी तो त्याचा सत्याग्रह वाटतोय..
तिथे बसून नुसते बघत बसायचे
तिथे बसून नुसते बघत बसायचे त्याकडे!>>>>
हाहा सगळेच डॉगीज क्युट
हाहा सगळेच डॉगीज क्युट दिसताहेत...
दहा दिवस झाले आणि एक पण पोस्ट
दहा दिवस झाले आणि एक पण पोस्ट नाही इथे ???
T-20 संपले आपल्यासाठी...
कुठे गेले सगळे गोडू गोडू fur friends आणि त्यांचे उत्साही पालक ??
आहेत आहेत टाकतो किस्सा आज
आहेत आहेत
टाकतो किस्सा आज
मागे मी इथे मांजरीच्या ऑपरेशन
मागे मी इथे मांजरीच्या ऑपरेशन बद्दल विचारले होते. इथल्या उत्तरांमुळे मदत झाली. स्नोईचे सप्टेंबरमधे ऑपरेशन केले. ती एक दिवस पूर्ण झोपेत होती, ते पण माझ्या मुलाच्या मांडीवर डोके ठेवून... औषधे आणि जखमेवर स्प्रे 6 दिवस चालू होता. साधारण 10 रुपयांच्या नाण्याइतकी जखम होती. 10 दिवसांत पूर्ण भरली.
ऑपरेशननंतर तिला होणारा पोटदुखीचा आणि hormonal imbalance चा त्रास दूर झाला.. आधी ती खूप कळवळून ओरडायची आणि लोळायची, इतका त्रास व्हायचा तिला.
माबोकरीण कविन च्या animal communicator तंत्राची खूप मदत झाली त्या काळात, खास करुन स्नोईला औषध देण्याबाबतीत.
आज आमच्या कॅशयू चा नाही ,
आज आमच्या कॅशयू चा नाही , फुंतरु मूळे माझा झालेला किस्सा,
माझ्या ऑफिस ला जायच्या वाटेत एक आपल्या फुंतरु च्या ब्रीड च (?) भुभु आनी त्याचे मालक फिरायला निघालेले असतात, माझ्याच वेळेत. तो भुभ्या इतका गोड, स्किन पण एकदम मेंटेन. सारख वाटायचं की जावं त्याचे लाड करावे, पण त्याचे मालक काय म्हणतील म्हणून फक्त नेत्र सुख घेऊन त्याला बघत दिवस जात होते.
पण दिवाळी च्या सुट्टी नंतर, असंच एक दिवस मी हिम्मत करून थांबवली गाडी त्यांच्या सामोर, आणि माझ्या तोंडातून शब्द प्रकटले, " खूप गोड आहे हो तुमचा फुंतरु"
त्या दोघांच्या ही चेहऱ्यावर स्पष्ट लिहलं होत , कोण फुंतरु, आनी कोण तुम्ही
मला पण लक्षात आलं की, मी चुकीचे बोलली आहे. मग म्हंटलं नाही गोड आहे तुमच भुभु
आणि सटकले तिथून
स्थळ - लिबर्टी स्टेट पार्क
स्थळ - लिबर्टी स्टेट पार्क
प्रभातफेरी घेताना एक प्रचंड गोंडस व फ्रेन्डली भूभ्या दिसला म्हणुन मी लाडाने आवाज केला, व पाहून हसत पुढे गेले व त्या कुतूनेही शेपूट हववुन उड्या वगैरे मारल्या. परत येताना मला पाहून त्या मालकाने त्या कुत्र्याला काहीतरी बजावले. म्हणजे कानात काहीतरी सांगीतले. व त्या मालकाच्या कपाळावर देखील आठी दिसली.
मग काही मी त्या भूभूकडे पाहीले नाही.
तो मालक त्याला ट्रेन करत होता की असे इतरांकडे शेपूट हलवत जायचे नाही.
-----------------
२ भुभू समोरासमोर आले व शेजारशेजारहून शहाण्यासारखे गेले की त्यांच्या मालकिणी त्यांना ट्रीट देताना पाहीलेल्या आहेत.
त्या दोघांच्या ही चेहऱ्यावर
त्या दोघांच्या ही चेहऱ्यावर स्पष्ट लिहलं होत , कोण फुंतरु, आनी कोण तुम्ही>>>
कसला फनी किस्सा आहे हा
टोटली डोळ्यासमोर आलं सगळं चित्र
तो मालक त्याला ट्रेन करत होता की असे इतरांकडे शेपूट हलवत जायचे नाही.>>>
गार्ड डॉग असेल तर हे शिक्षण आवश्यकच असते
त्याने मालकाच्या परवानगी शिवाय कुणाशीच फ्रेंडली वागणे अपेक्षित नाही
तसेच शो डॉग असतील त्यानाही ट्रेनिंग असते की रस्त्यात वाटेत कोणीही ओळखीचे, दुसरे भुभु दिसले तरी डिस्ट्रॅक्ट व्हायचे नाही
शांतपणे नाकासमोर चालत राहायचे
हे ओडीचा फ्रेंड बुलेट ला ट्रेनिंग देताना मी पाहिले आहे
त्यांना मुद्दाम असे गर्दीत नेतात आणि ट्रेन करतात
हे तसे असल्यास ठिके पण काही जण उगाच शिष्ट असतात
मालकीण बाईंच्या उदाहरणावरून कळतंय ते
आमचा ओड्या पण आगाऊ आहे, सगळ्यांशी प्रेमाने वागेलच याची खात्री नाही
अंगावर नाही जाणार, भुंककणार पण नाही
पण तुम्ही आवडले नाहीयेत हे तो स्पष्टपणे दाखवून देतो
तोंड फिरवून बसतो, निघून जायला बघतो, माया करायला गेले तर अंग आखडून घेतो
मलाच आशा वेळी काय करावं सुचत नाही
हा हा हा.... दिपाली देश्मुख .
हा हा हा.... दिपाली देश्मुख ... तुमचे "आपल्या फुंतरुच्या" हे वाक्य खूप आवडले. फुंतरू ला सांगेल आज कि बघ तू किती पॉप्युलर झालाय.... सध्या महाराज आराम करत आहे ... तब्येत टकाटक आहे.... पशन नंतर जास्तच चपळ झालाय लहान पिल्लू असल्या सारखा २४ तास सतत चुळबुळ चुळबुळ...खाव-खाव .... धावाधावी... याच्यावर ओरड त्यालाच चाव... सतत त्याच्या डोक्यात काहींना काही सुरूच.... शेवटी रागावून झोपवावे लागते....

आशुचँप फुंतरू चा कोणा सोबत
आशुचँप फुंतरू चा कोणा सोबत प्रेमाने वागेल कि नाही असा प्रश्नच येत नाही आम्हाला कारण तर माहितीच आहे ना "बजरंग दल फॉलोवर" याबाबतीत तो खूपच एकनिष्ठ आहे
हो हो आपलाच तो फुंतरु
हो हो आपलाच तो फुंतरु दुसऱ्याच ते भू भू
आम्ही खुप दमलो कि अशी ताणून
आम्ही खुप दमलो कि अशी ताणून देतो

सिंबा एकदम घोडे बेच के... :
सिंबा
एकदम घोडे बेच के... 
बरेच दिवसात ओड्याचे किस्से
बरेच दिवसात ओड्याचे किस्से लिहीले नाहीत.
एकेक करून टाकतो....
पहिला गुड बॉय चा
ओड्याला गाडीवरून फिरायला प्रचंड आवडते हे तर माहीतीच आहे पण आता ती आवड उपद्रव लेव्हलच्या जवळ जाऊ लागली आहे. गाडी काढली की आलाच तो, आणि चढूनच बसतो थेट मोपेडच्या फुटरेस्टवर...
दार लावायचे म्हणलं तर आमचे मुख्य लोखंडी दार हे स्लाईडींगचे आहे. ते त्याला आता कळलं आहे, तो बरोबर गॅपमध्ये पंजा घालतो आणि दार सरकावून बाहेर पळतो.
त्यामुळे त्याला न घेता जायचं असेल तर त्याला आतल्या खोलीत पपी गेटच्या आतच डांबून ठेवावं लागतं. पण त्या दिवशी मी प्रयोग करून पाहिला. मला दळण आणायला जायचं होतं, आणि दळण डबा पुढे ठेऊन आणतो त्यामुळे ओड्याला नेता येणारच नव्हते. त्यात त्याची बाहेर फिरायला जायची वेळ जवळ आलेली आणि तो फुल्ल रेडी होऊन बसलेला.
मी त्याला शांतपणे सांगितले की मी आता दळण आणायला चाललो आहे, डबा आणि तु एकत्र मावत नाहीत गाडीवर. मी तुला आता नेणार नाहीये, जर तु गुड बॉय सारखा वागलास तर मी तुला आल्यावर ग्राऊंडवर नेईनच शिवाय पीनट बटर मध्ये बुडवून च्युस्टिक देईन....
मला १०० टक्के खात्री होती की त्याला काहीही कळलं नाहीये आणि तो नेहमीसारखा धावत बाहेर येऊन गाडीवर बसणार. आणि मी त्यासाठी दार पण लोटले नाही. पण आश्चर्य म्हणजे जणू खरेच काही कळल्यासारखा तो बसून राहीला जागीच. मी गाडी काढली, बाहेरचे गेट उघडून बाहेर गेलो, तरी मला खात्री नव्हती. मी परत मागे येऊन पाहिलं तर तो आहे तिथेच, घराबाहेर सुद्धा आला नव्हता.
दळण घेऊन आलो तरीही महाशय जागचे हलले नव्हते. आई मला म्हणे त्याला काय स्टॅच्यु करून गेला होतास का. म्हणलं त्याला जर खरेच इतकं कळत असेल ना तर हॅट्स ऑफ आहेत. मी आल्यावर मात्र उड्या मारत आला अंगावर, मी मग लगेच प्रॉमिस केल्याप्रमाणे पीनट बटर, च्युस्टिक आणि लगेच ग्राऊंडवर असा कार्यक्रम पार पाडला..
पोराला म्हणलं ओडीन आज रेकॉर्ड ब्रेक गुड बॉय फेज मध्ये होता.
गुड बॉय ओडिन! त्याला बोलणे
सच अ गुड बॉय ओडिन!
त्याला बोलणे नाही कळले तरी काहीतरी पॅटर्न ओळखला असेल
दळणाचा डबा वगैरे. हुषार आहे!
माउई ला रोज संध्याकाळी काम झाले लॉग आउट केले की माझा नवरा एक छोटी ट्रीट देतो आणि मग बाहेर नेतो. माउईला व्यवस्थित ते कळते. त्याला आता फोन वर कुणी बोलत आहेत तोवर आपल्याकडे लक्ष देणार नाहीत हेही कळते. नवर्याचा शेवटचा कॉल चालू असेल तेव्हा शांत आडवा पसरून डुलक्या घेत बसतो त्याच्या ऑफिस च्या बाहेर. पण त्याला रॅप अप कॉन्वर्सेशन बरोब्बर समजते. ओके, आय विल टॉक टु यू लेटर, सी यू देन, बाय वगैरे अशा टाइप चे शब्द असतात ना बहुतेक वेळा. तर ते ऐकले की माउई ताडकन उभा राहतो लगेच कुई कुई करत शेपूट हलायला सुरुवात! बाबाने कॉल बंद करून ऑफिस चे दार उघडले की मग मात्र अजिबात एक सेकंद ही दम निघत नाही! लग्गेच ट्रीट आणि बाहेर !! अशा वेळि आम्ही बाकीच्यांनी कुणी त्याच्याशी उगीच लाडाने बोलायचा वगैरे प्रयत्न केला तर " चल हट, धंदे के टाइम खोटी मत कर" अशा अर्थाचा तुच्छ कटाक्ष टाकून तोंड वळवून जातो !
ओडी, माउई हाहा भारी किस्से
ओडी, माउई हाहा
भारी किस्से
Pages