Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेबी फुंतरु क्युट क्युट.
बेबी फुंतरु क्युट क्युट. गॉड ब्लेस.
खरं तर येथील सर्व कुत्रा मांजरांचे एक फॅण्सीड्रेस स्पर्धा घ्यावी. व सर्वांनाच विजयी घोषित करावे. मी बाफ काढू का? माझी पहिली फर बेबी वीनी हिच्या स्मृती प्रीत्यर्थ चतुष्पाद फॅन्सी ड्रेस स्पर्धा ? जम्मत म्हणून.
फुंतरूचे किस्से धमाल आहेत.
फुंतरूचे किस्से धमाल आहेत. छान वाटलं तो नॉर्मल झाला हे पाहून. सामोसा किस्सा
ओड्याच्या इंस्टा वरच्या एका
ओड्याच्या इंस्टा वरच्या एका व्हिडीओ ला आज दिवसभरात एकदम 1500 लाईक्स आलेत आणि 10.6के व्ह्यूज
मला काय कळतच नाहीये काय झालं अचानक
इंस्टा ला गेलो की एकदम 100 लाईक्स वाढलेले दिसतात
कसला scam असेल का?
कोणी फॉरवर्ड केला असेल
कोणी फॉरवर्ड केला असेल व्हॉट्सअप वर, म्हणून अचानक वाढले असतील.कोणता आहे व्हिडीओ
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/ClY49elL2dD/?igshid=YmMyMTA2M2Y=
हा व्हिडिओ
आता तर 2000 क्रॉस केलेत
This seems to be old video.
This seems to be old video.
नाही आता या आठवड्यातला आहे
नाही आता या आठवड्यातला आहे
इन्स्टा चे आल्गोर्दम कसे
इन्स्टा चे आल्गोर्दम कसे चालते माहित नाही. कदाचित वापरलेले हॅश टॅग्स किंवा गाणी जी वापरली आहेत त्यामुळे आले का अचानक व्यूज?
क्यूट व्हिडिओ आहेत पण ओडिन चे!!
माउई आणि ऑस्कर प्रचंड मज्जा
माउई आणि ऑस्कर प्रचंड मज्जा करत आहेत. सतत खेळ आणि कुस्ती चालू असते. पॅक बिहेवियर पण दिसते आहे. खायला देताना एकदमच खाणे द्यावे लागते. चालताना माउई ला ऑस्कर च्या १ पाउल पुढे जायचे असते. एकाने टांग वर केली तर दुसरा लगेच तिथेच त्या जागी करतो
दोघे सोबतच घंटी वाजवून बॅकयारडात जातात अन सोबतच घरात येतात! फार मजा येते बघायला.
परवाच आमचे आई बाबाही आलेत पुण्याहून. त्यांना एअरपोर्ट वर आणायला जायला मी साडेचार ला उठले पहाटे. तर मी दूध गरम करायला ठेवून मागे बघते तो ही जोडगोळी शेपुट हलवत माझ्या मागोमाग तय्यार!
आजी - आबांना कुत्र्यांची भिती वाटते, कधीच सवय नाही पण हिंमत करून आलेत. मनाची तयारी असली तरी सतत पायात येणारे दोन प्राणी त्यांनाही नविनच आहेत. पण माउई ऑस्कर दोघांना हे नविन २ पाहुणे कोण आलेत त्याचे भयंकर कुतुहल. ते जिथे जातील तिथे मागे पुढे हे दोघे एस्कॉर्टस!! सोफ्यावर बसले की सोफ्याच्या पाठीवर चढुन कानाचा डोक्याचा वास घेणार. एक डोक्याशी दुसरा पायाशी बसणार, ते चहा बिस्किट खायला बसले की दोघे लगेच समोर शेपूट हलवत बसणार. त्यांनी घाबरत घाबरत हात लावला की खेटायला , चाटायला येणार मग आजी आबा गांगरणार अशी धमाल सुरु आहे.हे बघा भोचक जीव. मागे सोफ्यावर आजी आबा बसलेत.
दुसऱ्या फोटोत काय मस्त पोझ
दुसऱ्या फोटोत काय मस्त पोझ दिलीये दोघांनी ! प्रोफेशनल एकदम.
ऑस्कर तर महा नॉटी आहे
ऑस्कर तर महा नॉटी आहे त्याला बाहेर पळायला आवडते! एकदा तर आबा बाहेर वॉक ला जायला निघाले तर ते दार उघडून मग सावकाश चप्पल घालेपर्यन्त ऑस्कर दरवाज्यातून थेट बाहेर निसटला आणि मागच्या ट्रेल वर मस्त निघाला एकटाच. लगेच दिसले म्हणुन बरं. मुलीला हाक मारली तशी तिने धावत जाऊन त्याला पकडले. असंच अजून एकदा केलं. रोज कोण रेस लावणार त्याच्याशी?!
मग तेव्हापासून कोणीही दार उघडणार अस्सेल तर त्यांना तिथेच थांबवून आधी ऑस्कर ला कुणीतरी उचलून घेतो. तो ही असला डांबरट, कुणी दरवाज्याच्या दिशेने निघाले की किंवा बेल वाजली की असेल तिथून धावत येतो
<<<हे बघा भोचक जीव>>>
<<<हे बघा भोचक जीव>>>
फुल्ल टू धमाल... lots of hugs and kisses to Mauee and Oshku
lots of hugs and kisses to
lots of hugs and kisses to Mauee and Oshku......
+१.
दोघांनी काय मस्त पोझ दिली आहे !
अगदीच पहार्यावर बसले आहेत
अगदीच पहार्यावर बसले आहेत दोघे. कशी जात नाही यांची भिती ते बघतोच असा निश्चयच केलेला दिसतो आहे.
अरे काय भारी धमाल चालू आहे
अरे काय भारी धमाल चालू आहे
फुल्ल टू हॉलिडे फन चालू आहे
फुल्ल टू हॉलिडे फन चालू आहे की
मस्त मस्त गोंडस बाळं
गोंडस भोचकपणा
खूप धमाल करतायेत माव्या आणि
खूप धमाल करतायेत माव्या आणि ऑश्कु , त्यांच्या गमती जमती बघssssत रहायच्या , थेरपी आहे आम्हाला !
त्या आधी ऑश्कुला फ्लाइट मधून आणणे हा पहिलाच एक्सपिरियन्स, आधी व्हेट कडून ट्रॅव्हल साठी मेडिकल सर्टिफिकिट , व्हॅक्सिनेशन प्रुफ्स आणले( अलास्का एअरलाइन ने ते पाहिलेही नाहीत )
कॅबिन मधे डॉग घेऊन जाण्यासाठी डॉग २० पाउंड पेक्षा कमी आणि पेट कॅरियर बॅगनधे कंफर्टेबली बसायला हवा ही कंडिशन असते, शिवाय वन वे फी $100
साधारण महिना भर आधी पासून त्याच्या ट्रॅव्हल बॅगची थोडी सवय केली , अजिबात आवडत नाही डॉग्जना त्या बॅगमधे रहायला , पण इलाज नाही.. एअर लाइनने दिलेल्या साइझची डॉज कॅरीयर बॅग घ्यावी लागते, आपले रेग्युलर कॅबिन लगेज कॅरी करु शकत नाही डॉग बरोबर असल्यामुळे.
लेग स्पेस कमी होते कारण ही बॅग समोरच्या सिट खाली बसेल अशी ठेवावी लागते , व्हेट्ने मेडिकेशनही दिले ट्रॅव्हल आधी घ्यायला, त्यामुळे थोडे ऑस्करला काम डाउन रहायला, झोपायला मदत झाली, नाहीतर मोठच अॅडव्हेन्चर झालं असतं, भुंकला असता बॅगमधे ठेवल्यामुळे !
असो, ही सगळी चॅलेन्जेस डेफिनट्वली वर्थ इट, खूप धमाल करतायेत दोन्ही डॉग्ज
भोचक जीव >>> भारी फोटोज् आणि
भोचक जीव >>> भारी फोटोज् आणि गमतीजमती. मज्जा येते आहे वाचायला.
भोचक जीव
भोचक जीव
मस्त पोज आहे दोघांची..
मस्त पोज आहे दोघांची..
लैच गोड. किड्स डॉगज अॅन्ड
लैच गोड. किड्स डॉगज अॅन्ड फॅमिली गो व्हेरी वेल टुगेदर. सोनेरी क्ष्ण निव्वळ.
भोचक जीव >>> आणि चेहरे पहा
भोचक जीव >>> आणि चेहरे पहा कसे साळसूद..
दुसरा फोटो पण मस्त आहे. खुपच गोड दिसतायत
हाहाहा कसले क्युट बसलेत दोघे
हाहाहा कसले क्युट बसलेत दोघे
चेहरा इतका सभ्य सोज्वळ करून
आजी आजोबांच्या गंमती एकदम धमाल
भोचक जीव
सिंबाची पहीली समुद्रवारी झाली
सिंबाची पहीली समुद्रवारी झाली !!!
पहिल्यांदा लाटा पाहून स्वारी घाबरली, लाटांवर भूंकाभूंकी झाली. प्रथमच एव्हडे पाणी पहिले होते तेव्हा साहजिकच होते. इतका प्रोटेक्टिव्ह झाला कि माझ्या मुलीला पण पाण्याजवळ जाऊ देईना. ती समुद्रात जायला निघाली कि हा तिचा हात तोंडात धरून तिला मागे ओढत होता, तो प्रसंग पाहण्यासारख्या होत,, आजूबाजूचे लोक त्याचे ते प्रेम पाहून हसत होते.
दुसऱ्यादिवशी मग हळू हळू भीती कमी झाली मग आम्ही पाण्यात थोडे पाय ओले करण्याइतपत धीट झालो आणि एकदाचे कळले कि नक्की काय आहे ते मग जो धुमाकूळ घातला बीचवर काही विचारू नका त्या नंतर उभे २ तास इतके खेळलोय कि हॉटेलवर जाऊन सरळ ३ तास झोप काढली
हा तिचा हात तोंडात धरून तिला
हा तिचा हात तोंडात धरून तिला मागे ओढत होता,>>> किती क्युट निरागस प्रेम करतात हे भू भू लोक्स!
सो स्वीट सिंबा!
सो स्वीट सिंबा!
सिंबाने मस्त पोझ दिलीये.
सिंबाने मस्त पोझ दिलीये.
ती समुद्रात जायला निघाली कि हा तिचा हात तोंडात धरून तिला मागे ओढत होता >>> हे फार क्यूट आहे
अय्यो फोटो एक से एक
अय्यो फोटो एक से एक
ती समुद्रात जायला निघाली कि हा तिचा हात तोंडात धरून तिला मागे ओढत होता <<हे भारी. ह्याचा फोटो /व्हीडिओ आहे का?
हरीतात्या, दृष्ट काढा सिंबाची
हरीतात्या, दृष्ट काढा सिंबाची... फार रुबाबदार आहे..
मैत्रेयी आणि दीपांजली, माऊई आणि ऑस्करची पण दृष्ट काढा. .. फारच गोडू गोडू आहेत.
सॉरी नेमका विडिओ नाही शूट
सॉरी नेमका विडिओ नाही शूट करता आला कारण सिम्बा जरा जास्तच गोंधळ घालत होता
आणि माबो वर विडिओ अपलोड करता येतो का?
Pages