भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

आम्ही सोफ्यामागे लपून पलीकडे बघतोय, पण तोंड बाहेर आलयं याचा पत्ताच नाही >>>> त्याला आपण जर्मन शेफर्ड आहोत आणि क्यूट नव्हे तर स्केअरी दिसणे अपेक्षित आहे याचाही पत्ता दिसत नाही Lol

maitreyee Biggrin Biggrin Biggrin

फारच गोडो फोटो. काल कामाच्या गर्दीत अनेकदा बघितला.

आज आमच्या स्वीटीचा १४ वा वाढदिवस. काल वॉकला सुट्टी, भर्पूर ट्रीट्सा दिल्या, आज पहाटेच फिरवून आणले. व तिच्या मैत्रीणीला एक चिक न लेग पीस दिला. झाला आमचा बर्थडे.

काल रात्री बाराला उठून फोन चार्जिंगला लावत होते तर समोर ठेवलेली काचेची परफ्युम बाटली खाली पडून फुटली. एक क्षण मन चुकचुकले पण मग जाउदे पोरांची दृष्ट निघाली म्हणून सर्व साफ करुन टाकले. पोर घोरत निवांत पडले होते. आईची घालमेल काही कळेना.

अरे वाह स्वीटी ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आमच्या बाळाचा पण आलाय आता महिन्यावर

तीन वर्षांचा होईल

स्विटीला belated Happy Birthday!
सोफ्यावर pahudlelya पिल्लाचे नाव काय? मस्त गुंड दिसतोय.

सोफ्यावर pahudlelya पिल्लाचे नाव काय?

मला वाटतं फुंतरू

यांची आता नाव सुद्धा लक्षात रहातात

Thanks a lot.

आज एक अजब किस्सा कळला
ओड्याला फिरवताना एक दुसरे लॅब भेटले, सहा वर्षाचा होता
सेम ओड्या सारखाच दिसायला
दोघेजण थोडेसे खेळले आणि मला त्या भुभुच्या पायावर जखम दिसली
मी विचारलं त्या मालकिणीला की कुठं लावून घेतलं याने तर म्हणे अहो खरे वाटणार नाही पण हे त्याने स्वतःला चावून घेतलाय
म्हणलं काय?? का पण??
म्हणे मला आता बेबी झालं तर प्रेग्नसी आणि डिलिव्हरी च्या काळात त्याच्याकडे जरा दुर्लक्ष झाले तर त्याने चिडून स्वतःला जखम करून घेतली
म्हणलं हे अजबच आहे, पहिल्यांदाच ऐकतोय हे असं काही
हो म्हणे आम्हालाही हे नवीन होतं पण आता आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देतोय
ते गेल्यावर ओड्याला म्हणलं आम्ही सगळे तुझ्याकडे लक्ष देतोय काय
Don't get any such ideas
फटके मिळतील Happy

अरे सेम अशीच स्टोरी माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच्या लॅब ची. तिचा मुलगा कॉलेज साठी दुसर्‍या स्टेट मधे गेला तर काही दिवसात या लॅब ने स्वतःला असेच चावून जखम करून घेतली होती. कारण मुलाची खूप अटॅचमेन्ट आहे त्याची. किती दिवस बरी पण होत नव्हती जखम करण औषध लावले तरी पुन्हा चावणे किंवा चाटणे.

आशुचँप .... सेम फुंतरू शिकला आहे. घरी इंटिरियर चे काम सुरु होते म्हणून याला खोलीत, गॅलरीत नाही हं खोलीत बंद केले तर या महाराजांनी असे धंदे करून ठेवलेले. जखम केली पायाला आणि  नखं दारावर एवढे मारले की ते injure झाले, फोटो मध्ये समोरचा पाय बघा एकदा .... तरी मध्ये मध्ये आम्ही जातच होतो पण यांच्या डोक्यात काय नक्की असतं तेच कळत नाही.  त्याच्या डॉक्टर काकांना विचारले तेंव्हा ते म्हणाले कि तो स्वतःला गार्ड डॉग समजतोय आणि त्या मुळेच घरी नवीन कोणी आले असतांना आम्हाला धोका होईल हे सगळे वाटल्या मुळे आणि आम्हाला  वाचविण्या  करिता केलेले हे प्रताप... असा लाड आला होता ते ऐकल्या वर आणि राग पण आला ..  वाटले ... काय हे असे प्रेम.. स्वतःला त्रास देऊन आपल्या करीता एवढा  विचार... मग बाहेर काढून हळदीचे दूध आणि मग लाड सगळे करावे लागले. सध्या साहेबांचे लाड सुरु आहे... funtiii.jpgfunti paaaaaaay.jpg

आईगग बिचारा फुंतरु

खरंय काय यांच्या डोक्यात सुरू असतं अजिबात कळत नाही
आणि आपल्यासाठी अक्षरशः ते जीव टाकतील हे माहिती असल्याने आपलीच जबाबदारी वाढल्यासारखं वाटतं

Pages