भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोठी खबर म्हणजे ऑश्कु चे आगमन झाले आहे आमच्याकडे!! Happy
मौई आणि ऑश्कु ची भेट म्हणजे धमाल सीन होता. ६ तासाची फ्लाइट , मग कार चा प्रवास करून आल्यामुळे ऑश्कु दमला होता. माउई ला बाहेर इतर डॉग्ज ना भेटायची सवय आहे तशी पण घरी रहायला दुसरा कुत्रा येणे हे माहितच नाही कधी. ऑश्कु ला पहिल्यांदा पाह्लिया पाहिल्या आधी दोघांनी गुर्र केले एक मिनिट मग गोल गोल फिरुन वास घेणे झाले मग मात्र गट्टी जमली! लगेच दोघे घर आणि बॅकयारड हिंडून आले, ऑश्कु ने अगदी आज्ञाधारकपणे माउई सांगेल तिथे (!) अंगणातल्या कोपर्‍या कोपर्‍यात टांग वर करून अंगण आपलेसे केले Lol
मग दोघांनी मिळून अंगणातल्या खारी आणि उडत्या गीज वर भुंकणे, कुस्त्या खेळणे असे आता सगळे म्हणजे सगळे एकसाथ सुरु आहे! आम्हाला फार मज्जा येते आहे बघाताना.
IMG_4869.jpg

अरे कसलं भारी
उन्हाळ्यात चुलत भावंडे येतात तसा सिन वाटला

दोघे खरोखरच भावंड वाटत आहेत Happy

माऊई आणि ऑश्कु >>> कसले गोड दिसतायत दोघे. बचपनके दोस्त टाइप घट्ट मैत्री वाटतेय फोटोत Happy

ओड्या आणि माऊईचे किस्से धम्माल एकदम Lol

ऑडू... Lol खरंच गुड बॉय..
रेडी होऊन बसलेला.>>>... Lol पँट, शर्ट, बुट, केस विंचरून भांग पाडलेला असं दृश्य आलं डोळ्यासमोर Wink

त्याने गुड बॉय, पिनट बटर, स्टीक, ग्राऊंड अशा शब्दखुणांचा वापर केला असेल. Wink

मैत्रेयी ... "चल हट धंदे का टाईम खोटी मत कर" :हहपुवा:
उन्हाळ्याच्या सुट्टीतली भावंडं>.. अगदी अगदी हेच विचार आले होते ती पोस्ट वाचताना Happy धमाल
चल मी तुला माझी खेळणी दाखवतो झालं नाही का? Wink

Wow!

चल हट, धंदे के टाइम खोटी मत कर" अशा अर्थाचा तुच्छ कटाक्ष टाकून तोंड वळवून जातो Biggrin

माऊई आणि ऑश्कु >>> कसले गोड दिसतायत दोघे. बचपनके दोस्त टाइप घट्ट मैत्री वाटतेय फोटोत

ओड्या आणि माऊईचे किस्से धम्माल एकदम

>>> +1000

वा.. सगळी बाळे क्युट आणि किस्से भारीच!

कसले गोड दिसतायत दोघे. बचपनके दोस्त टाइप घट्ट मैत्री वाटतेय फोटोत

ओड्या आणि माऊईचे किस्से धम्माल एकदम >> +१११११

बापरे काय गोड दिसताहेत दोघं. फ्लाईट मधे घेउन जाता येतं हे माहीत नव्हतं.

दोघांमधे जास्त वयाच अंतर नाही म्हणुन दोघांची मैत्री झाली. आमच्या कडे एक सिनीयर सिटीझन आणि एक १.५ वर्ष्यांची. अज्जिबात एनर्जी मॅच होत नाही...

अदिती, फ्लाइट मधे केबिन लगेज मधे लहान पेट्स नेता येतात, ऑश्कु लहान डॉग आहे त्यामुळे आणता आले. पण त्यांना फुल टाइम पेट कॅरियर म्हणजे आपल्या डफल बॅग साइज च्या जाळीच्या बॅग मधे ठेवावे लागते. सीट च्या खाली बसेल अशी बॅग असते ती. डीजे च्या अनुभावाप्रमाणे सेफली आणता येते पण तरी ते मॅनेज करणे चॅलेंजिंग असते.
माउई आणि ऑश्कु ची गट्टी तर जमली आहे पण जुळ्याचे दुखणे आहे! एक भुंकला कि दुसरा पण भुंकणार, वॉक करताना एक थांबला किंवा कडेला गेला तर दुसराही जाणार. पाणी दिले, खायला दिले तर एकाच वेळी, त्यात माउईला मोठा दादा ( म्ह़णजे बहुधा पॅक लीडर ) मानून ऑश्कु त्याने खाल्ल्याशिवाय ट्रीट्स , फूड खात नाही. माउईच्यातली उरलेली ट्रीट दिली तर खातो त्याला वेगळी सेपरेट दिली तर नाही खात असेही चाललेय. आम्हालाही नविनच आहे सगळे. खूप खेळतात सतत , थकले, झोप आली तरी खेळत रहातात. शेवटी लहान मुलांसारखे वेगवेगळ्या खोल्यात नेऊन झोपा म्हणून दामटावे लागते.
माउइ ला जरा जेलसी दिसते आम्ही ऑश्कुला उचलून घेतले की, पण ऑश्कु चे तसे नाही फारसे. गोड आहे अगदी ऑश्कु.
हा एक फोटो - मॅचिंग हॉलिडे पजामाज मधे!!
pajamas.jpg

Rmd +1111
हे फारच गोड आहे. इतकं गोंडस असणं बेकायदेशीर असायला हवं. Happy माऊई स्थितप्रज्ञ दिसतोय, ऑस्कर संत... तेच भाव आहेत.

हो ना, सारखेच फोटो, व्हिडिओ काढावे वाटतात दोघांना खेळताना पाहून. आता फ्रेमच करून घ्यायला हवेत काही.
अस्मिता हाहाहा Happy

क्युट फोटो! २ डोळे आणि नाक म्हणजे अगदी बटणे वाटताहेत. गो ड आणि निरागस दिसतायत.
चला आता जोडगोळीचे नवीन अपडेटस येणार!

किस्से भारीच सगळे.
आजारी भुभु आता एकदम छान बरा झाला असेल तर त्याच्याही खोड्या येउदेत.
माऊई आणि ऑस्कर लैच गोंडस.
हे खरे आहेत की सॉफ्ट टॉय इतके गोंडस

सध्या फुंतरू महाराज अगदी टणटणीत आहेत... मागे सांगितल्या प्रमाणे जास्तच चपळ/चत्रा झाला आहे.. काल महाराजांना समोसा हवा होता तो कोणीच दिला नाही तर असे जाऊन झोपला शेवटी पनीर पराठा दिल्यावर माफी मिळाली आम्हा दुष्ट लोकांना... परवा त बाहेरून येतांना  खिळाच आणला..कधी उचलला देव जाणे मग घरी आल्यावर बाबांना नेऊन दिला... बाबांनी आम्हालाच झापलं कि तुम्ही असे कसे कुठेही खिळा ठेवता वगैरे ... आम्ही म्हटलं आम्ही आत्ताच तर बहुरून येतोय तेंव्हा समाजाला या साहेबांनी बाहेरून उचलून आणलाय खिळा... फुंतरूला साधे सरळ काही जमतच नाही... खिळाच आण , कुंड्याच पाड, वायरच  चाव... कपाटालाच धडक दे , एक ना अनेक बालोरे कामं करतो दिवसभर ...टिपिकल वागतो कधी कधी... राक्षस गण असावा याचा असे वाटते.. 
त.टी .- तब्येत मस्त आहे देवाच्या कृपेने सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आहे... एकूण आम्ही मूळ पदावर रुजू झालो आहे...
funti_0.jpeg 

Pages