भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना
त्या अंतरकर यांच्या लेखात म्हणल्यासारखं ओड्या निव्वळ लाड करून घेण्यासाठी आमच्या घरी आलाय Happy

तोंडभर पघळलेले हसू, निरागस चेहरा आणि भाव आणि लडिवाळ पणे जवळ येणे यामुळे कसे तुम्ही प्रेम करत नाही माझ्यावर तेच बघतो असा चॅलेंज देत असल्यासारखं वाटतं Happy

आज ऑस्करने महापराक्रम केला !
बाहेर खारी दिसतात आणि ते पाहून तो नेहमीच क्रेझी होतो पण आज हाइट झाली , वर्स्ट नाइटमेअर फॉर डॉग पॅरेन्ट!
सेक्युअर्ड फेन्स तोडून पळून चित्त्याच्या स्पीडने एस्केप झाला आणि पाळाला, त्याला कसं पकडून परत आणलं ते मला आणि मैत्रेयीलाच माहित, फॉर अ मोमेन्ट आय थॉट आय लॉस्ट हिम कारण खरच इमॉसिबल जॉब अचिव्ह केला आम्ही !
तो बाहेर पळालेला आईने पाहिलं म्हणून बरं झालं, मी आणि एम्टी लिट्रली बिन चपलेच्या बिन स्वेटरच्या -५ डिग्री मधे धावत सुटलो, मागे पूर्ण ओपन जंगल आहे , तलाव आहे म्हणून अजुनच घाबरगुंडी उडाली !
ऑस्कर ज्या स्पीडने पळत होता त्याला कॅच करणे सोडाच , दृष्टिआड होत होता अनेकदा.. जिथे खारी असतात तेच त्याचे टार्गेट पॉइंट्स होते पण त्यानी किती पळवलं हे मोजणच अशक्यं !
शेवटी एका कुंपणाच्या डेड एन्ड पाशी त्याला आम्ही दोन्ही साइडने कॉर्नर केलं म्हणून पकडता आलं , प्युअर लक !
हे जे काय घडलं , आम्ही कित्ती वेळ शॉक मधे होतो , घरी आल्यावर महाराजांना काहीही गिल्ट नाही.. फार म्हणजे फार शॉट दिला डोक्याला !
आता नो मोअर बॅकयार्ड प्ले , नो मोअर फ्री टाइम आउटसाइड, लिशला पर्याय नाही !

अरे देवा!! तो तुमच्यावर वैतागला असेल खार पकडता आली नाही म्हणून.

<<लिट्रली बिन चपलेच्या बिन स्वेटरच्या -५ डिग्री मधे धावत सुटलो >>>
वाचूनच हुडहुडी भरली..

BTW, ये गिल्ट क्या होता है ???? Wink

परवा सिम्बाने किस्साच केला

चुकून बॅकयार्डचे दार उघडे राहिले आणि एक पक्षी आता घुसला. आता कोणीतरी घरात घुसले म्हणजे आमचे तर पार डोके फिरले, सिम्बाने भुंकून घर डोक्यावर घेतले. मी टॉवेल घेऊन येईपर्यंत तो पक्षी वरच्या मजल्यावर गेला आणि मी वर पोचेपर्यंत सिम्बाने त्याला पंज्यामध्ये दाबून टाकले होते. त्याला कसा काय तो पक्षी पकडता आला माहित नाही परंतु त्याचा जीव मला वाचवता आला नाही याचे फार दुःख वाटते आहे Sad Sad

बाकी खारू ताई आणि ससे पकडायचा तो नेहमी प्रयत्न करतो पण कधीच जमले नाही त्याला, पण पक्षी घरात आल्यामुळे कदाचित त्याला पकडता आला असेल.

खतरनाक...मी टोटली समजू शकतो काय मनाची घालमेल झाली असेल त्यावेळी कारण ओड्याने पण अगदी सेम प्रकार केला गेल्या आठवड्यात. त्याबद्दल लिहायचे राहूनच गेले....

आम्ही एरवी आता ट्रॅकच्या बाजूला असलेल्या पायवाटेवर जातो फिरायला. पण मला त्या दिवशी उशीर झाला, अंधार पडला होता म्हणून आम्ही ट्रॅकवर गेलो. डावीकडचा ट्रॅक अर्धा किमी लांबीचा आहे आणि त्याच्या दोन वाहत्या रस्त्यांना तो काटकोनात छेदतो. आम्ही एका साईडच्या रस्त्यापाशी गाडी पार्क करून, ट्रॅकने पलिकडच्या रस्त्यापर्यंत आणि परत असा १ किमी चा लूप फिरतो वेळ कमी असेल तर.

ट्रॅकवर फिरताना मी कायमच त्याला लीश लावलेला असतो. लोकं उगाच बावरू नयेत म्हणून. आणि त्या साईडला बिलकूल अंधार आहे. तर असेच फिरताना एक भटके भूभू आलं, एरवी यांची लगेच भुंकाभुंक सुरु होते, पण ते लाडात आलं तसं मला कळलं की ती भूभी आहे. म्हणलं ठिके खेळत असतील तर खेळू देत आणि मी त्याला लीशमधून सोडला. हा महामुर्खपणा होता.

कारण मोकळा होताच ओड्या बागडत भुभीच्या अंगावर गेला आणि तिने पलिकडच्या दिशेने धूम ठोकली. ओड्याही तिच्या स्पीडने मागे धावत गेला आणि काही कळायच्या आत दोघेही दिसेनासे झाले. मी मागून जोरजोराने पळत सुटलो, ओड्या ओड्या थांब, पण त्यांचा स्पीड आणि माझा काय मॅच होण्याची शक्यताच नव्हती. तो अर्धा किमी पार करून पलिकडच्या रस्त्यापाशी आलो तरी हा कुठं दिसेना, ना ती भूभी.

मला अक्षरश धस्स झालं पोटात, म्हणलं हे रस्ता ओलांडून गेले का काय, पलिकडे लगेच एक मातीचा कच्चा रस्ता सुरु होतो पण तिकडे भटक्या भुभ्यांची गँग असते म्हणून आम्ही टाळतो. म्हणलं हा तिकडे गेला आणि त्यांनी अॅटॅक केला तर, किंवा घाबरून पळताना गाडीखाली आला तर. कारण गाड्या प्रचंड स्पीडने जात असतात. त्यात रात्रीची वेळ.

वरती लिहीलं तसंच माझ्या मनात आलं की गेला आता हा, परत नीट धडधाकट आपल्याला दिसत नाही बहुदा. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात तसे. माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, स्वतच्या मुर्खपणाबद्दलची चिड आणि हतबलता. आणि मी नुसताच ओड्या ओड्या, प्लिज परत ये म्हणत वेड्यासारखा हाका मारत राहीलो. कुठल्या बाजूला जावं हे पण मला कळत नव्हतं, सोबत मोबाईल नेला नव्हता त्यामुळे घरच्या कुणाला मदतीला बोलवावं ते शक्य नव्हतं.

आणि अशाच हाका मारत असताना मला त्याचं भुंकणे ऐकु आलं. बघतोय तर हा जिथून मी आलो त्याच ट्रॅकवर बाजुच्या झाडीतून बाहेर आला. माझ्याकडे बघून हळुवारपणे भुंकला, जणू म्हणत असावा, बाबा मी इथेच आहे, काळजी करू नकोस. आणि महाशय परत झाडीत उडी मारून गायब.

तो रस्त्यावर गेला नाहीये म्हणल्यावर माझं निम्मं टेन्शन कमी झालं. पण आता याला शोधायचे कसं आणि झाडीत याला काही चावलं वगैरे तर, ही काळजी सतवायला लागली. म्हणेपर्यंत ती भूभी पळत बाहेर आली आणि तिच्या मागे हा. मला तेव्हा डोक्यात प्रकाश पडला की ती हीट वर असणार. आणि ओड्या आता जुमानणार नाही. आणि तसंच झालं. ती पळत दुसऱ्या बाजूच्या झाडीतून खाली कॅनॉलपाशी गेला. पाठोपाठ हा हिरो. मी तरीही त्याला हाक मारण्याचा सपाटा लावला. पण तो काही ऐकेना. ते दोघेही अधून मधून दिसत होते अधूनमधून गायब.

त्यात एकदा ते माझ्या जवळूनच पळत गेले. मी त्याला चपळाई करून पकडायचा प्रयत्न केला तर महाशय चिंब ओले. म्हणजे तिच्या नादात असातनाही हा तेवढ्यात पाण्यात डुबकी मारून आला होता. ओला असल्याने सुळकन निसटला आणि परत तिच्या मागे झाडीत जाणार तोच मी माझ्या ठेवणीच्या आवाजात त्याला कमांड दिली.

हाय पीच मध्ये अगदी इमर्जन्सीमध्ये मी असा आवाज देता, त्यावर तो दचकून थांबतोच. आताही सुदैवाने तसेच झाले. मी त्याला स्टे ची कमांड दिली आणि पळत पळत जाऊन त्याला पकडले आणि चपळाईने त्याला लीश लावला. आता मला हुश्श झालं. पण कुठलं काय. ती डांबीस भूभी आली परत, त्याच्या जवळ येऊन लाडात आली आणि परत पळाली. हा परत तिच्या मागे आणि मी आता याला धरलंय या निवांतपणात मी बेसावध. अक्षरश हात खांद्यातुन निखळून बाहेर येईल असे वाटलं आणि हातातून लीश सुटला. आणि ओड्या लिश सकट परत झाडीत गायब.

आता माझा पेशन्स संपला. म्हणलं ओड्या आता फटके मिळणार तुला. पण काय फरक नाही. ते इकडे तिकडे पळताना झाडी हलत होती त्यावरून कळत होते. बाकी पूर्ण अंधार. मी घरी चाललो म्हणत पळत सुटलो तरी येईना मागे. मग परत मागे आलो. तोवर ते परत ट्रॅकवरून धावत आलेच. मी अगदी सज्ज राहीलो आणि जवळ येताच लीशवर पाय ठेवला. तेवढ्या एक सेकंदात मला चान्स गावला आणि पटकन परिस्थितीचा आणि ओड्याचा ताबा घेतला. मग लीश हाताला नीट गुंडाळून, त्याला अजिबात हलता, पळता येणार नाही इतका टाईट खेचून मी गाडीकडे चालवला. ती भूभी सारखी येऊन त्याला चिथावत होती. आणि हा मागे बघून बघून तिच्याकडे जायला बघत होता आणि मी सगळी ताकद लावून त्याला खेचत नेत होतो. ते हिंदी सिनेमात हिरॉईनचा बाप तिला हाताला धरून खेचत नेतो आणि ती हिरोकडे यायला बघते तसलाच प्रकार.

कसंतरी गाडीवर घालून मी त्याला घरी आणलं. डोक्यात राग धुमसत होताच. पण आई मध्ये पडली म्हणाली अजिबात त्याला शिक्षा करायची नाही, त्याची नैसर्गिक भावना आहे ती. त्यात त्याची काहीही चुकी नाहीये. तो त्याच्या प्राणीधर्माप्रमाणेच वागला आहे.

म्हणलं शिक्षा नव्हतो करणार पण गिल्ट तरी वाटू दे. तर म्हणे कशाला वाटू दे. गिल्ट येण्यासारखं त्यानं काही केलंच नाहीये.

आणि खरोखरच दिपांजलीने लिहीलं तसं नो रिग्रेट्स

त्यानंतर मी आता भूभी दिसली की पहिले त्याला पकडून ठेवतो. अजिबात म्हणजे अजिबात सोडत नाही.

बाप रे आशूचअँप तुमचाही अनुभव स्केअरी आहे.
आम्ही आज जाम हादरलो होतो. त्यात आमच्याकडे वेदर हा अजून एक फॅक्टर! बाहेर सध्या कायम शून्य किंवा शून्याखाली टेम्परेचर आहे.
ऑस्कर ज्या स्पीड ने सुस्साट धावत होता ते बघूनच हात पाय गळत होते. जंगलच्या दिशेने गेला म्हणेतोवर उलट वळून रस्त्याच्या दिशेला पण जात होता. त्याची वेगळीच भिती. सगळेच नाही नाही ते विचार येऊन जातात अशा वेळि डोक्यात. मधेच मी घरात पळत जाऊन जॅकेट्स आणली दोघींसाठी. एकीकडे फोन वर नवर्‍याला असशील तिथुन घरी यायल सांगितले, मग शेजार्‍या पाजार्‍यांच्या ग्रुप्स ना मेसेज टाकतेय, असे सुरु होते. हुश्श , केवळ लक म्हणुन प़कडला गेला १५-२० मिनिटात. नाहीतर आज कोणाचे काही खरं नव्हतं.
त्या वेड्या बाळाला कसले काय ! आत आणले तर खाली सोडल्या सोडल्या ताबडतोब मागच्या दाराशी जाऊन बाहेर जाण्याची घंटी वाजवायला सुरुवात! Uhoh :कपाळबडवती:
माउई मात्र काहीतरी चुकलंय हे समजून सॅड फेस ने गुपचूप होता पूर्ण वेळ. Happy

बेबिज हॅव फास्टेस्ट हॅन्ड अस म्हणतात त्याच्या जोडीला आता डॉगिज हॅव फास्टेस्ट पॉ म्हणाव लागेल..चान्गलच घाबरवल की ऑस्कु आणि ओड्याने.

चान्गलच घाबरवल की ऑस्कु आणि ओड्याने. >>> खरंच. वाचताना पण भयंकर वाटलं. मै, डीजे आणि चॅम्प, तुम्हा लोकांचं काय झालं असेल तेव्हा याची कल्पनाही करवत नाही.

बापरे आशुचॅम्प, ओड्याही महापराक्रमी !, दुसर्‍यांदा पुन्हा लिशसकटही पळाला म्हणजे फार झालं !
या वेड्यांना पळून जाताना काहीही अक्कल नसते, मम्मा डॅडी नाही आले तर पकडायला ? सापडलो नाही तर ? कोल्हा आला तर ? दुसर्‍या कोणी घरी नेले तर? व्हॉट वेअर यु थिंकिंग ?
काsssही चिन्ता नाही डोक्याला Uhoh

बाप रे! स्केअरी!
बेबीज सुखरूप आहेत हे वाचून बरं वाटलं.

>>> हिंदी सिनेमात हिरॉईनचा बाप तिला हाताला धरून खेचत नेतो आणि ती हिरोकडे यायला बघते तसलाच प्रकार.
वाचताना भीती वाटली, तरी हे व्हिजुअलाइज करून फिस्स हसू आलं. Lol

मम्मा डॅडी नाही आले तर पकडायला ? सापडलो नाही तर ? कोल्हा आला तर ? दुसर्‍या कोणी घरी नेले तर? व्हॉट वेअर यु थिंकिंग ? >>> Biggrin टिपिकल फर्स्ट टाइम पेट पेरेन्ट्सचे विचार. मम्मा अ‍ॅन्ड ऑल त्यांच्या गावीही नसतं. आपण कितीही लाड केले आणि पाळण्यात जोजावलं तरी ते त्यांच्या नैसर्गिक उर्मीनंच वागतात.

डिजे, मै,
आत्ताच कोकोनं हा पराक्रम केला. आमच्या घराच्या मागे घरं आहेत पण मधे १५०-२०० फिटस झाडी आहे. खारींचा यार्डमधे येऊन कोकोला उचकावणे नेहमीचं आहे. आत्ता ती जी सुटली ते घरामागे पळून मग शेजार्‍यांच्या यार्डमधे, तिथू अजून चार घरं पलीकडे मग त्या घराला वळसा घालून शेजारून पुन्हा बॅकयार्डात.
तिच्या मागे आम्ही, आमचे शेजारी, समोर रहाणारे दोन शेजारी.... एकानं रस्त्यावर येऊन गाड्या थांबवल्या. एकानं ट्रीटस आणल्या. या बाईसाहेब ट्रीट घेऊन पुन्हा सुसाट मागच्या झाडीत. सगळी धावपळ बघून शेजारचा भू भू - त्याचं नाव 'लड्डू' - जोरजोरात भुंकत होता. समोरून रस्त्यावरून वॉक करणारी कुत्री बावचाळली आणि ती ही जोरजोरात ओरडायला लागली. गोंधळ नुसता. नवर्‍यानं ठेवणीतला आवाज काढल्यावर गुपचूप आली पण आत येऊन पुन्हा शेपूट हलवत लाडात आली. नो रीग्रेटस.

अंजली Happy बरंय तुला मदत मिळाली लगेच.
खरंय, शेवटी कितीही शिकवले तरी नैसर्गिक ऊर्मीप्रमाणे वागणार ते. पण इथे आपली तयारी कुठे असते Happy असे निसटले की जीव अर्धा होतो पुन्हा पकडेपर्यन्त. त्यात मोठे डॉग्ज पुन्हा रस्ता शोधत घरी परण्याची जास्त शक्यता असते इव्हेन्चुअली. लहान डॉग्ज ची टेन्डन्सी सहसा लपून राहण्याची असते जर ते हरवले तर. ती त्यांना अजून अडचणीत आणू शकते.

बापरे परक्रमी भुभुज आहेत तुम्चे.
आमचा एकदा मी डिलीवरी पॅकेज दारासमोरुन घरात घेई पर्यंंत दार उंघडले तर बाहेर गेला. पण घाईत लक्शात आलं नाही. २ मिनटांनी दरवाजा वाजतोय म्हणुन उघडला तर बाहेर उभा राहुन पंज्याने दार वाजवत होता. .. Happy

अतिगोंडस दिसणारे हे जीव इतके बदमाषी करू शकतात हेच कल्पनेच्या बाहेर आहे.
All is well त्यामुळे बरं वाटलं.
ओडिन चा विडिओ छान.
2 वेगळे अकाउंट झालेत वाटतं champ.

आईग्गं काय ही पळापळ !
आशुचँपने लिहिलेला सीन श्वास रोखून एका दमात वाचला... हुश्श झालं शेवटी. पण जबरीच आहे चॉकलेट हिरो. हिरवीण दिसली की बापाला पण जुमानत नाही.

ऑस्कर ला एक ऑस्कर द्या प्लीज.
आई आणि मावशीने खार पकडू दिली नाही म्हणून खार खात नाहीये तुमच्यावर बरंय Wink

ओडीन आणि माऊई चे पराक्रमी किस्से आहेत.

मै, डीजे आणि चॅम्प, तुम्हा लोकांचं काय झालं असेल तेव्हा याची कल्पनाही करवत नाही. >>>>> +१०००००

हॅरी भाऊ पण त्यातल्याच कॅटेगरीचे आहेत.
परवा केबल वाला आलेला . तर त्याला पैसे देता देता हॅरीभाऊ सुळकन निसटले खाली जायला . साबांच्या लक्षात आल्याबरोबर त्या धावत खाली गेल्या , त्यांच्यपाठोपाठ सासरे,
मी केबलवाल्याला पैसे देऊ की खाली पळू या पेचात.
शेवटी वॉचमनला कॉल केला ,त्याने मग गेट बंद करून हॅरीला पकडलं. हुश्श! आणि त्याला घरी आणलं.
घरी आणेपर्यंत आम्ही सगळे टांगणीला!!
एवढं सगळ रामायण होऊन हरीला काहीही पडलेली नव्हती.
परतून येताना मस्त दुडक्या मारत येत होता.

हॅरीचा लेटेस्ट किस्सा..
आम्ही दोघं ऑफिसला जात असताना त्यालाही आमच्याबरोबर यायचं असत. मला का नेत नाहीत म्हणून पायात घुटमळत राहतो. पुढे पुढे करत कु कू असे आवाज काढतो.
पण त्याचा काहीही परिणाम होत नाही हे बघून खिडकीत येऊन तोंड पाडून बसतो असा

IMG-20221221-WA0004.jpg

आईगं! तुम्हाला अगदीच त्याला बरोबर न्यायची प्रचंड इच्छा होत असेल ना असला क्यूटनेस पाहून? Happy काय एक्स्प्रेशन्स आहेत!

आमच्याकडे ऑस्कर परत गेल्यामुळे पार सुतकी वातावरण होते २ दिवस. आता कुठे माउईबुवा नॉर्मल ला येऊ लागलेत. तो निघाला तेव्हा माउई ने कुई कुई करून धिंगाणा केला. पण तो जातोय ते कळावे म्हणुन मुद्दामच त्याला टाटा करायला बाहेर नेले होते. मग बराच वेळ खिडकीत सॅड चेहर्‍याने बसून होता. धड जेवण नाही की खेळणे नाही. फुल्लइमोशनल ड्रामा. सकाळी उठून पुन्हा त्यांच्या रूम च्या दाराशी वास घेत उभा राहिला, आलेत का परत म्हणून बघायला. मग हळु हळु लक्षात आले असावे की आता येत नाहीत. आता ठीक आहे.

माउवी खूप इमोशनल् बाळ आहे, खूप सॅड झाला जाताना.. माउवीला भेटायचा जितका आनंद होतो तितका त्याला परत जाताना सॅड बघणे फार हार्टब्रेकिंग असते.. खूप प्रेम देतो, समोरच्याला प्रेमात पाडतो !
ऑस्कर सॅड नाहीये पण त्यालाही माउवीची आठवण येतेय, तिथे २४ तास माव्या सोबत धुमाकुळ घालायचा, आता शान्तं वाटतय.. मग आम्हाला सतत प्लेटाइम डिमान्ड करतो किंवा डॅडी बरोबर कडल्स !
ट्रिप खूप एन्जॉय केली दोघांनी, एकदम इच अँड एव्हरी मोमेन्ट !
खूप शिकण्यासारखं आहे डॉग्ज कडून.. अनकन्डिशनल लव्ह, आपण किती वेळा बाहेरून आलो तरी दर वेळी तितकेच आनंदी, तितकेच एक्सायटेड Happy

तुम्हाला अगदीच त्याला बरोबर न्यायची प्रचंड इच्छा होत असेल ना असला क्यूटनेस पाहून? Happy काय एक्स्प्रेशन्स आहेत!

हो rmd, न्यावेसे वाटते expression बघून विरघळून जायला होते.

अनकन्डिशनल लव्ह, आपण किती वेळा बाहेरून आलो तरी दर वेळी तितकेच आनंदी, तितकेच एक्सायटेड

अगदीच. ऑफीसवरून दमून आल्यावर हॅरी शेपटी हलवत आनंदाने उड्या मारत असतो
कोणीतरी इतक्या आतुरतेने वाट पाहतेय हे फिलिंग मस्त असत

Pages