मायबोलीकर यूट्युबर्स - पुस्तक दर्पण (प्राचीन)

Submitted by प्राचीन on 7 June, 2022 - 06:56

नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की Happy Happy मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw

रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.

एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स सामो. तुझ्यासारख्या या विषयावर अभ्यास असलेल्या व्यक्तीकडून दाद मिळाली हे महत्त्वाचे आहे.
लिंक - मृत्यूनंतरचे जीवन
https://youtu.be/ELwVRy1lch0

भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख

या दुव्यावर टिचकी मारली. पहिल्यांदाच तुमचा चॅनेल पाहिला. आता इतर व्हिडीओज सुद्धा वेळ मिळेल तसे पाहीन.
खूप छान करताय. आवडलेले पुस्तक वाचणे आणि त्याबद्दल लोकांना सांगणे, ते करत असताना वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करणे. ही उर्जा आवडली. वेळ सुद्धा सत्कारणी लागला. तुम्ही सांगता सुद्धा खूप छान. विचारपूर्वक पण ओघवतं. अवघड आहे असं न वाचता कॅमेर्‍यासमोर बोलायचं.

आवाज स्पष्ट आहे पण किंचित लाऊड हवा असे वाटते. पॉडकास्ट म्हणजे काय हे मला अजून समजलेले नाही. पण बहुधा अनेक युट्यूबर्स एकीकडे बोलत असतात आणि खाली तळाला किंवा कोपर्‍यात पीईपी म्हणजे स्क्रीनवर व्हिडीओची लिंक शेअर करतात. किंवा इमेज शेअर करतात. जर अशा पद्धतीने पुस्तकाचे कव्हर, प्रस्तावना यांचे फोटो शेअर करता आले तर व्हिडीओ आणखी इंटरेस्टींग होईल. सूचना आहे फक्त.

>>>या विषयावर अभ्यास असलेल्या
छे गं अभ्यास कसला.
पण फार आवडली ओळख. थोडसच कुतूहल वाढेल इतपतच पुस्तक उघड केलेल आहेस. आता भोआकफ आणि मिळवा ते पुस्तक Wink

र. आ., आपण अवश्य चॅनेल वरील इतरही व्हिडिओ पहावेत. आपल्या सूचनांबद्दल धन्यवाद. त्यातील काही इतरत्र प्रत्यक्षात आणलेल्या आहेत. प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार.
आणि सामो, पुस्तक व्हिडिओ केलेला तेव्हा हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध होतं गं. परंतु आता दिसत नाहीये. नाहीतर लिंक पाठवली असती.
आज काळाच्या पडद्याआड गेलेल्या ग्रंथांचा जीर्णोद्धार
https://youtu.be/C0jG0p4xHhI

>>>>>आणि सामो, पुस्तक व्हिडिओ केलेला तेव्हा हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध होतं गं. परंतु आता दिसत नाहीये. नाहीतर लिंक पाठवली असती.
अगं शोधते मी. धन्यवाद.

https://youtu.be/yz7lMrwkBQc
नवरात्र विशेष.. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रीशक्तीची ओळख..

धन्सं. डॉ. कुमार (तुमच्या प्रोत्साहनातही सातत्य आहे :स्मित :), सामो.
कर्त्या करवित्या ह्या पुस्तकाची ओळख https://youtu.be/yz7lMrwkBQc

नवरात्र विशेष २. - कहाणी लंडनच्या आजीबाईंची.
https://youtube.com/shorts/kJWeSV6FlQU?feature=share
https://youtu.be/C838hhumijc

म्हणीं आणि वाक्प्रचार यांच्या जन्माची कहाणी, कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचं चरित्र, आणि हिंदुस्थानचा सागरविक्रम हे तीन व्हिडिओ बघून रविवारची सुरुवात अतिशय छान झाली.
Pdf लिंक ही दिल्याबद्दल विशेष आभार!

धन्सं छन्दिफन्दि. :स्मित :
असाच तुमचा प्रत्येक रविवार पुस्तक दर्पण मुळे छान होण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करेन.
माई सावरकर (स्वा. सावरकरांच्या पत्नी) यांची ओळख =
https://youtube.com/shorts/H3wkCyz68R8?feature=share
https://youtu.be/rHy_KUoQLGY

'भरारी' - https://www.youtube.com/watch?v=JIvy4rQb4OE&t=2s
किती इन्स्पायरिंग आहे. व्यासंग, अभ्यास, कष्ट - बाप रे.

https://www.youtube.com/watch?v=rHy_KUoQLGY
तुझी भाषा फार समृद्ध आहे गं. ऐकताना तल्लिन होते मी.

मी पण आवर्जून ऐकते हं आणि बहुतेक प्रतिसाद ही देते. छळाकडून बळाकडे हे पुस्तक ऐकतेय पण सलग ऐकणं होतं नाहीये. इस्राईलची कहाणी आहे त्यावर बोलशील का ?

अरेच्चा.. आज बऱ्याच दिवसांनी या धाग्यावर आले तर बोनस मिळाला.. रुपाली, सामो, मंजूताई, छन्दिफन्दि सगळ्यांना धन्यवाद हो.
सामो तू दिवसेंदिवस माझ्या अंगावरील मूठभर मांस वाढविण्याचा उपक्रम चालवला आहेस Wink
मंजूताई, बघते हं हे पुस्तक मिळाले तर..
रुपाली आणि छन्दिफन्दि, चॅनेल ला सबस्क्राईब केलंत तर आणखी छान होईल. Bw
थोडी वेगळी पुस्तकं घेतल्याने काही वेळा साशंकता निर्माण होते की लोकांना रुचतंय कि नाही ते. पण तुमच्यासारखे प्रेक्षक प्रेरणादायी ठरतात.

सामो तू दिवसेंदिवस माझ्या अंगावरील मूठभर मांस वाढविण्याचा उपक्रम चालवला आहेस Wink>>>> ये मी पण हं ... कृहघे

हो हो मंजूताई.. तुम्ही सातत्याने प्रतिसाद देता त्यामुळे मला भासू लागलंय की खरंच माझी अशी कुणी 'मंजूताई' आहे. Bw
आभार छन्दिफन्दि.
आजच्या व्हिडिओ ची लिंक - दत्तजयंतीच्या पवित्र निमित्तानं
https://youtu.be/Ldtwz_EhSxk
https://youtube.com/shorts/ASFLE_py1fY?feature=share

कौतुक आणि सबस्क्रिप्शन दोन्ही पोहोचले रुपाली Happy
१९२९ साली एका पुणेकर शिक्षकाने पायी केलेला काश्मीरचा प्रवास.
https://youtube.com/shorts/KD6pQXUgep0?feature=share
https://youtu.be/qF5Wnkwihoc

प्राची तुला आणि तुझ्या चॅनलला नवनर्षाच्या खूप शुभेच्छा. मस्त बहरत राहू दे हा चॅनल. शुद्ध भाषा, विपुल शब्दभांडार, वाचनाची आवड आणि अत्यंत उत्तम सादरीकरण. हे तुझे जमेचे मुद्दे.

कायदेतज्ज्ञ विश्वनाथ मंडलिक
>>> यांची ' भरारी' छान सादर केली आहे. आवडली !

त्यांचे नाव मी लीळा पुस्तकांच्या ( https://www.maayboli.com/node/77708) या पुस्तकात तीनदा वाचलेले होते.
त्यांचा ग्रंथसंग्रह त्यांच्या वारसांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला दिल्याचा उल्लेख त्या पुस्तकात आहे.

उपक्रम छान चालू आहे !

Pages