मायबोलीकर यूट्युबर्स - पुस्तक दर्पण (प्राचीन)

Submitted by प्राचीन on 7 June, 2022 - 06:56

नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की Happy Happy मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw

रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.

एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीरा, नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण अभिप्राय.. धन्यवाद Bw
तुमचं 'अवांतर' मलाही वाचायला मिळालं असतं तर बरं झालं असतं पण..

>>>>>>>>>हिरा,तुमचे प्रतिसाद नेहमीच माहितीपूर्ण असतात,अवांतर असले तरीही कधी काढत नका जाऊ plz
अगदी अगदी.
मागे कोणीतरी वाक्ताडन केलेले मला आठवते.
मला आय डी चे हँडल आठवत नाही पण मला हे नक्की आठवतय की त्या आय डी च्या मनात माबोचा बेस्ट इन्टरेस्ट नव्हता. He/she was discouraging you to sabotage MaBo.
तेव्हा अशा लोकांना भिक घालू नका.

वावे लेख छानच आहे.
हीरा अशाच संदर्भात अवांतर होतं का तुमचं. मला विपु मिळाली नाही म्हणून विचारले..
बाकी दिव्यांची अमावस्या नुकतीच झाली त्या पार्श्वभूमीवर - ज्या कुटुंबाने प्रभाकर कंदिलाच्या निर्मितीने स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात स्वावलंबनाचा एक धडा गिरवला, त्यांच्या जगात डोकावण्याची लिंक
https://youtu.be/9ST7fWoIKcw

प्राची
खूप मस्त न सातत्यपूर्ण चालू आहे !
शुभेच्छा !

प्राचीन, उत्तम सादरीकरण. आवाज ही छान. काही पाहिलेत. काही पाहायचे राहिलेत. सवडीने पाहणे चालू आहे. प्रतिसाद द्यायचा राहून गेला. असेच छान छान भाग येत राहुदेत. खूप शुभेच्छा.

आज सकाळी अकरा वाजता प्रसारित होणाऱ्या व्हिडिओची लिंक
सुधा मूर्ती यांचं पुस्तक 'पुण्यभूमी भारत', उद्याच्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने..
https://youtu.be/NQf-vMQxVZc

बालकांड चांगले आहे.मात्र बरेचदा "भात केला, कढी केली '' हे वर्णन ऐकून कंटाळा आला होता.
एका गोष्ट मात्र खटकली होती.सो कॉल्ड उच्च वर्णीय देखील जबरी कष्टाने पुढे येतात.तरी त्यांच्यात आणि निम्नवर्गियात एक मोठा फरक असतो.पुस्तकातील पूजा सांगणारा लहान मुलगा सटकन सांगतो अरे दूर हो, शिवशील मला(की विटाळ होईल). सो कॉल्ड निम्न वर्गीय झिडकारून घेत असतो.

देवकी तै, Happy
आत्मविश्वास कमी असला/झाला की लोक झिडकारून घेतात, त्या त्या वेळी व्यवस्थित व्यक्त न होता आल्याने मत्सरीही होतात. अजब साखळी आहे ती. कुठेतरी आपल्यालाच तोडावी लागते.

आपल्याकडे असंही आर्थिक यश=आत्मविश्वास असं काही तरी विचित्र समिकरण आहे. जे बरोबर नाही पण सध्या बहुतांश समाजाने तेच स्विकारले आहे. नेमकं बरोबर काय आहे हेही मला माहीत नाही पण हे ते नाही एवढे माहिती.

फार छान उपक्रम आणि सुरेख सादरीकरण. इतक्या सुंदर पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल खूप आभार.
हा उपक्रम असाच सतत बहरत राहो. शुभेच्छा.

Pages