मायबोलीकर यूट्युबर्स - पुस्तक दर्पण (प्राचीन)

Submitted by प्राचीन on 7 June, 2022 - 06:56

नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की Happy Happy मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw

रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.

एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नामसाधक अण्णा वर्टीकर यांच्या विचारलहरी पुढील भाग
https://youtu.be/eKb_hNl5RNk
https://youtu.be/JP_f6tymvtw
https://youtu.be/uFHCioi1fqM
https://youtu.be/tkuQ9yq-VHU
https://youtu.be/pL9lGACSG0M
https://youtu.be/gAt0MsTLyH8
https://youtu.be/NC0J71GdXg4

ऐकणारच.
------------
काय निवडक शब्दांत, रसाळ करुन प्रत्येक पुस्तक परिचय सांगतेस प्राचि.
वाह!!
यावेळेला व्हिडिओ पण आहे.

प्राचि मनःपूर्वक अभिनंदन. कमालीचा स्तुत्य उपक्रम राबवतेयस तू आणि तुला आवडणारा. Happy पुस्तक दर्पण असेच बहरत राहो. पुस्तक दर्पणच्या रौप्यमहोत्सवाला (२५ वर्षे) मी ७५ ची असेन आणि अशीच तुझी पोस्ट वाचून आनंदी होत असेन Wink किंवा माझी नात (तू) मला वाचून दाखवत असतील अशी इच्छा Happy

अभिनंदन प्राचीन!
अलीकडे तुमच्या २ गोष्टी ऐकल्या होत्या. ही उपक्रम आवडला.

कमालीचा स्तुत्य उपक्रम राबवतेयस तू आणि तुला आवडणारा. Happy पुस्तक दर्पण असेच बहरत राहो>>> +१

पुस्तक दर्पणच्या रौप्यमहोत्सवाला (२५ वर्षे) मी ७५ ची असेन आणि अशीच तुझी पोस्ट वाचून आनंदी होत असेन >>>

ह्याला मी मम म्हणत नाही . सामो कोड सोडवलं.. Happy

सामो, छन्दिफन्दि आणि मंजूताई, तुम्ही नेहमीच प्रोत्साहन देता. बरंच वाटतं. असाच पाठिंबा असू द्यावा.
आज वटपौर्णिमेनिमित्तं एका त्यागमय जीवनाची ओळख करून देत आहे.
येसूवहिनी - धैर्याची मूर्ति
https://youtu.be/HOjyBXoF0tI

Pages