आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभ प्रभातः अन्या उखड्ला आहे. अरु चे प्रेमाचे चाळे!!! ह्या प्रकारात दहा मिनि टे. अरु ने आशूचे हात धरल्याने अन्या पिसाळला आहे. खंग्री मॅन ओव्हर टाइम करत आहे. परत एकदा लग्नाचे वारे वाहात आहेत. परत इशाला वस्सकन ओरडून तो वर जातो.

इक डे अरु अनीश व इ तरांना कॉफी देते व त्याला कॉले ज सोडु नकोस असा सल्ला देत आहे. नित्या वर्शा कडून डबा आण णार असतो पण अरु बाई इथेच मुगडाळ खिचडी टाकते म्हणतात. अनीश व यश केमि स्त कडे जात आहेत तर नित्याने पण जावे ना. पण नाही तिथेच बसते कबाब में हड् डी.

अरु स्वयंपाक करत आहे व आशू तिच्याकडे अनिमि ष नेत्रांनी बघत आहे. हे हे मॅन हळूच पडद्या मागुन येउन हे हे करत आहे. हे आशूने स्वप्न बघितले म्हणे. नित्या ते स्वप्न खरे होईपरेन्त प्रयत्न सोडू नकोस म्हणतो.

आजी अनघाची विचारपूस करोन तिला वर झोपायला पाठिवते. कांचन आता अरु च्या आठवणी काढत रड त आहे. अप्पा पण भर घालत आहेत.
अरुचे सूख ही च ठरवत आहे. जहांबाज म्हातारी. ह्या वयात ह्या व यात करत आहे. पण स्वतःलात र २४ तास लाड लागतात.

इकडे खिचडी बनवून जेवणे चालू आहे. यश आशूला भरवत आहे. मग आशूच्या डोळ्या तून पाणी येते. व तो गहिवरत आहे. इथे बासरी मॅन आला आहे झोपेतुन उठुन व हळूवार आशू फेम संगीत वाजवत आहे बासरीवर. पन सतार मॅन नाही म्हणजे आशू की तरफसे घंटी है पर अरु की तरफसे सिर्फ खिच डी!!
बाई साहेब तिथे जेवत नाहीत सर्वांबरोबर. घरी जाउन जेवेन म्हणे.

इकडे अभि उशीरा येतो. व लगेच भांडण. ती जेवायची थांबली आहे. पण हा बाहेरून जेवुन आला आहे. ह्यांचे काही जमत नाही आहे. लगेच वादावादी करत आहे. हिला कडक मंगळ असणार. मूल झाल्यावर हिने सरळ ब्रम्ह कुमारी जॉइन करावे. सुखी राहील.

आता प्रमोत म्हातारा म्हातारी हिला भे टायला येतो म्हणतात तर ही आशुतोषच्या घरी आहे. मग कांचन एकदम व्हिलनिश चेहरा करते

आशू च्या आईला का पाठवून दिले बंगलोर ला..? तिने अरु ला एव्हढे करु दिले नसते... आधीच अरुचीही तब्येत ठिक नव्हती ना?
यांच्या कडे बरोबर हवे तेव्हा सासवा (ऑर होणार्‍या सासवा!) बाहेर गावी जातात!!

अन्या फारच शिरा ताणताणून बोलतो.
आणि संजना अगदी अरु होण्याच्य मार्गावर आहे..पटकन पाणी आणून देणे, चहा ठेवते म्हणणे...... अंघा ला जपणे.....!!!!

पण मी काय म्हणते आरु आशूला एकत्र यायला कोणी संधीच देत नाही. कायम चार तरी पात्रे मागे नाचत असतात मग हे हे कसे होईल?

पण मी काय म्हणते आरु आशूला एकत्र यायला कोणी संधीच देत नाही. कायम चार तरी पात्रे मागे नाचत असतात मग हे हे कसे होईल?>>>
चला.... आरु आशू एकत्र आले,....., त्यानि लग्न केले..... and they lived happily together..... झा SS ली संपली सिरीयल ?? असं कसं?

काल नेट नव्हते.

कालच्या भागात अरु सक्काळी काहीतरी डब्यात घेउन येते. अनीश व यश बाहेर जातात. व आशूला हवा हवासा एकांत मिळाला आहे. ती पोहे गरम करताना तिच्या कडे सुखात बघत आहे.
इक्डे घरी अरु च्या वागण्याची चर्चा चालू आहे. अरु ला मर्यादेतच राहायला हवे म्हणते कांचोन. संजना जरा बरे बोलत आहे इशा कॉलेजात निघाली आहे तर अन्या तिला सोडाय्ला जाईल म्हणतो. अमरीश पुरी व्हाइ ब्ज. खंग्री मॅन पार मटन खाउन आला आहे व उत्साहात एक पीस टाकत आहे.

इकडे हिरो आजारी व व्हल्नरेबल. हिरो आई नसली की जरा बॅचलर सारखा वागतो म्हणे. इथे दुसरा मॅन कामावर आला आहे. बासरी संतूर व आपली एचडी एफ सी सतार चालू आहे. ही काही खोलीतल्या वह्या बघत आहे व चहा घेउन आलेली आहे. हिरोला कपडे घालायचे काम चालू आहे. दोनो तरफ कुछ कुच्छ हो रहा है. ही त्याला खाली बोलवते.

संजना खोलीत तयार होत आहे व तिचे डोके दुखत आहे. अन्या तिला सोडतो म्हणतो. प्रेग न्युज ऑन द वे. हे एके काळी गाड्यांमधून किती भटकत असत. पण आfunction at() { [native code] }आ लग्न झाल्यावर दुरावा आला आहे. जिव्हाळ्याचा संवाद चालू आहे प्रेम असल्याने तिला त्याच्या मनात काय चालू आहे ते जाणवते. ती प्रेमाने विचार पूस करते. अन्या पण सुखावत आहे. न्यु बेबी ऑन द वे!!! शॉपिन्ग साठी पैसे हवेत वाटतं असे अन्या बोलतो. हे निघतात. जाताना वाटेत केमिस्ट कडे जाणार आहेत.

अप्पा कांचनला सामान दाख्वत आहेत. समया ताम्हण आणलेले दाखवत आहेत. पण आजी दुसृयाच विचारात आहे. तिला अरुला भेटायला जायचे आहे. चार लोक चारलोक करत आहे. तिला फिजिकल इंटिमसीबद्दल काही इशू आहे असे दिसते वागणे शोभत नाही म्हणे. का भोचक पणा करत आहे ही!! आशू शी लग्न करणे चुकीचे हे ती सांगणार आहे.

अरुला फोन लावुन देतात अप्पा. ही किचन मध्ये व तो बेड रुमात. खरेतर मिळालेल्या संधीचा फायदा घेउन म्हण्जे मी काय म्हणते स्विगी आहे ना ..... ही आशूचा अप डेट देत आहे. अपघात कसा झाला व्गैरे. खंग्री मॅन त्या मारामारीचा फ्लॅश बॅक परत दाखवताना सुटला आहे. आजी तिला भेटायला जायचे एकदम आजच व डबा पण घेउन येते म्हणे. अरु म्हणते मी घरी नाही आशूच्या घरी आहे. इथूनच काम करत आहेत आम्ही दोघे म्हणे. आता आजीची सटकली आहे. तिला लिव्ह इन चा संशय आला आहे बहुतेक. आजी ये शादी नही हो ने दुंगी मोड मध्ये गेलेली आहे.
लग्न करायचे आहे तर मुलांची मते घ्यायला हवीत. स्वतंत्र नाही बेजबाबदार पणॅ वागत आहे म्हणून आजी भडकले लीच आहे. कश्याला आता कटकट.

प्रोमोत अनघा डबा घेउन हास्पिटलात येते तर अभीसर गायब आहे. व अनीश आरू ला लग्नाचे विचारत आहे आशूबरोबर

आजचा भागः इशा अनीश वैताग स्टोरी पुढे चालू आहे. खंग्री मॅन कॉलेज क्यांटीन मध्ये बसून हळू हळू मागे टेबले बडवत आहे. इशा चा मोठ्ठा वैताग डायलॉग चालू आहे व ती वैतागून निघून जाते. अनीशच्या अ‍ॅडमिशनचा प्रश्न आता कोर्टा त जाईल बहुतेक.

अनघा किचन मध्ये विचारमग्न होउन दूध ओतत आहे . संजना विचारात भांडी पाडत आहे दोघी विमनस्क आहेत तर आजी विचारत आहे. आजकाल अभी डबा घेउन जात नाही. इमरजन्सीत विसरतो म्हणे. आजी. फुकटचे जस्टिफिकेशन. गरीब आहे मेहनती आहे. म्हणे. अनघाला वासाचा त्रास होत आहे. संजनाचे केस विचित्र दिसत आहेत. संजनाच्या दोन बोटांना नेलपेंट आहे दोन ला नाही!!!! काय हे. क्वालिटी स्लिप होते आहे. अनघा पण विचारते तुम्ही ठीक आहात ना दोघी एकमेकींची चौकशी करत आहेत.

आता ते खाली दुध सांडले त्यावरऊन अनघा पडेल कि कॉय.

मुख्य म्हणजे अ‍ॅडमिशन साठी अरु अनीशची गार्डियन म्हणून गेलेली होती. ते बघुन इशा उखडली आहे.

इकडे नित्याचा टाइम पास चालू आहे चह पिता पिता लग्नाच्या प्रपोजलचे काय झाले हे बघत आहेत. आशू च्या चेहयावर आयटी रिटर्न भरल्याचे समाधान आहे. मी सर्व बोललो आहे म्हने.

अरु व अनीश दिल खोलके बोलत आहेत. अरु छान बोलत आहे. अन्या इज अ‍ॅन अ‍ॅब्युझिव हसबंड. हे अधोरेखित होत आहे. हे सहन केले नाही पाहिजे. मग अनीश लगेच चाचुचा रिश्ता घेउन येतो.

इकडे डॉक्ट्रीण बाही छाट ब्लाउज घालोन अनघाचा क्लास घेत आहे. अनघा बिचारी काय होत आहे ते डॉक्टरैणीला सां गते आहे. लफडे अलर्ट.

प्रोमो मध्ये अन्याला प्रेमाचा रिझल्ट मिळालेला आहे.

प्रोमो मध्ये अन्याला प्रेमाचा रिझल्ट मिळालेला आहे.>>> Biggrin
आता अभिचं लफडं बाहेर आलं की पुन्हा आपल्या लव्ह बर्ड्स ची लव्हस्टोरी मागे पडणार. अनुपमा वॉज मच फास्टर.

प्रोमो मध्ये अन्याला प्रेमाचा रिझल्ट मिळालेला आहे>>> Lol . खरंच कायच्या काय फाटे फुटले आहे आता, सिरीयल चांगल्या प्रकारे संपणे दूरच पण माती करणे चाललेय‌. अभिचं लफडे अन्याचे बाळंतपण, अरे देवा, या स्पीड ने अनुपमा सोबत पोचायला अजून वर्ष जाईल.

पण खरंच हे असं दाखवायची गरज होती का? पोराचं अन् बापाचं लग्न सोबत ठिके एकवेळ पण आता जे काही चाललंय त्यावरून दर्जा पार घसरतोय हे कळत नसेल का खरंच मालिका वाल्यांना?

कांचनची प्रतिक्रिया पहायला मजा येईल .तिचा मुलगा आणि नातू दोघेही एकावेळी बाप होणार.
अनिरुद्ध हे मूल माझंच कशावरून असं विचारून शकेल.

शुभ संध्याकाळ आज सकाळी अर्धा प्रतिसाद लिहिला व टॅबच अचानक डिलीट झाला माझ्या हातून.

इथे अनघा ला शंका येत आहेत. बाही छाट त्याला सावरून घेत आहे. पण तिच्या शंकांना ट्रिवियल ठरवून तिच्या आतल्या भावनांना कमी लेखून खोटे बोलत आहे. गॅसलाइ ट करत आहे. गोड बोलुन केसाने गळा कापत आहे. पण ही काय बोलते ते अभीला माहीत नाही. चोरी पकडी जाएगी.
अनघा लगेच समजुत दार पणा दाखवून निघून जाते व स्वतःच सॉरी म्हणते ह्यात काय अर्थ आहे. थापाडी डॉक्ट रीण. अनघा ला हाकलूनच देत आहे. तिला जाताना अभी बघतो पण थांबवत नाही जे नॉर्मल नवर्‍याने केले असते.

इकडे चाचू चा भाच्चा त्याचे कौतूक करत आहे. अरु भूगोलाचे पेपर तपासत असलेल्या बाई सार खी दिसत आहे. पण चश्मा लावत नाही. भतीजा लगेच चाचूच्या चलग्नाची बात काढतो. नित्या गुर्‍हाळ चालू आहे. कॉले ज चे डीन मॅ मच्या गाण्यांचे फॅन निघाले. दोन गाणी गायली नाहीत तर ही कलाकार मानसिकता वगैरे बोलत आहे. सरांनी आटो ग्राफ घेतला. म्हणे. अरु घरचे काम करत असताना गात असे. घरच्यांच्या प्रतिक्रियांचे पण तिला दड पण यायचे.

आशू कवतीक करत आहे. अरुला कॉलेजात शिकायची पण डीन ने ऑफर दिली आहे. रुमात अ‍ॅडमिशन फॉर्म आणून दिला म्हणे डीन ने.
आता हिचे लग्न , दोन घरे, एक नोकरी एक संगीत स्कूल, एक सून व एकसवत प्रेग्नंट!! काय हे. किती सुपरवुमन आहे बाई.

अनघा संजनाला कॉफी देत आहे संजना चे डोके दुखत आहे . वीकनेस. आजी लगेच तिच्या पार्ट्यांवरौन टोकते. लगेच नोकरी सोडून दे म्हणते.
काही गरज नाही म्हणे. आता संजनाचा मोठा संवाद आहे. का नोकरी करायच ची ते. आजी म्हण्ते तुला हौस आहे म्हणून तू नोकरी करतेस.
अनिरुद्ध मोप रिच आहे म्हणे. संजना साले काढत आहे. एक एक हिशेब नाकावर फेकते कांचन च्या. ती काम करुन थकत आहे. पार्टी करुन नाही. मुले कमवतात पण सगळा घरात देत नाहीत. साठवतात. अविनाशला आधीची लोन्स आहेत. पैसा लागतोच. मी कमवते म्हणून अन्या घरी बसू शकत आहे. नखरे करत आहे. मी कमवत नसते तर त्याला समोर येइल ते काम करावे लागले असते. व तोअजून विचित्र वागला असता.
अरु ने पोटगी मागितली नाही. नशीब. हिने पोटगी मागितली तर अन्या रस्त्यावरच येइल.

अन्या सोडून सगळे काम करत आहेत. हा तर पैसाही कमवत नाही. मी त्याला सोडू शकते पण त्याला नोकरी मिळेल तो नीट वागा यला लागेल. म्हणून ती लग्न वाचवायची धड पड करत आहे. आजी तिला गप्प करायचा प्रयत्न करत आहे. संजना घरात काहीच करत नाही. आजी लगेच टोकते. अप्पा व सासुबाईंनी कांचन ला भिशी सुद्धा जॉइन होउ दिली नाही. घरुन कपडे शिवू दिले नाहीत. तुला हे झेपणार नाही म्हणे. अप्पा आता समजुतदार आहे पण बायकोला कधी समजून घेतले नाही. अप्पा अनघाला अभी भेटला का ते विचारतात.

इकडे आशू अरुला शिकायच्या भरीस घालत आहे. ते तिला तुझी इच्चा विचारतात. अरु इशाला पटेल की नाही म्हणून नाही म्हणत आहे.
आशू अरुला फारच मदत करत आहे. तिचे सर्व स्केजुल अ‍ॅडजस्ट करू म्हणे. इशाशी बोलेल म्हणते. इशा काही आता शेंडेफळ नाही. तिने चिरकणे बंद केले पाहिजे. नित्या हातोडाच मारू बघत आहे. आशू फारच समजावून सांगत आहे. दबावाला बळी पडू नकोस म्हणून. तो तर तिला एम ए पी एच डी कर म्हणतो. मग हाय बीपी चे काय!! आशू मोटिव्हेटिन्ग टॉक देइल तुला आत्मविश्वास येइल तो आमच्यासाठी सण असेल म्हणे. काय ही भक्ती. वा वा. केळकर हिच्या पदराशी बसला आहे अगदी.

इकडे डॉक्ट्रीण अभीला जाब विचारत आहे. अभी चे बोअरिन्ग माहीती देणे चालू आहे. त्याला एकटे पणा मिळत नाही म्हणे घरी खूप जत्रा झालेली आहे. अंघावर प्रेम आहे म्हणे. प्रायवसी नाही म्हणून हा बाहेर भटकत असतो. मित्राकडे बसून राहतो. असे ही असू शकते. घरी आई नाही त्यामुळे असे होत आहे. ह्याला मी व बाळ हेच जग हवे आहे. गोतावळा नको आहे. बाहीछाट सल्ला देत आहे आता. बाहेर फिरायला जा म्हण ते.
हे दिवस एंजॉ य केले नाहीत तर परत कधीच मिळ् णार नाही. अनघाकडे जा शी इज वेटिन्ग म्हणे. अजून काही नाही ना म्हणते गोरी. नर्स अभीला डबा आणून देते हा एक गोड क्षण. तो जरा सटपटला आहे.

खंग्री मॅन उद्यापासून दांडी या रात्रीत भरपूर कमाई म्हणून खुशीत डबे वाजवत आहे. तेच नेहमीचेच संगीत.संजनाला कसे तरी होत आहे ती उटुन दूध प्यायला किचन मध्ये येते. पण मग संतूर भारतीय संगीत चालू आहे. तर भांडे पडते. यश लगेच येतो बाहेरच डुलक्या घेत होता वाटते. अनघा पण येते ती ही दूध प्यायला आलेली आहे. ह्यांना जेवन देत नाहीत का. मग संजनाच्या तब्येतीबद्दल चर्चा कोनीच तिच्याशी नीट वागत नाही. तिला झोप लागत नाही आहे. खंग्री मॅनच सगळे दूध पिउन टाकतो. ती घाणेर डी लांब नखे विचित्र दिसत आहेत.
ती जाते मग यश अभीबद्दल विचारतो त त्याच्याशी बोलतो म्हणतो. जे अभीला नको तेच हा करत आहे. व तिला दूध गरम करून देतो.

नेक्स्ट डे सर्व पोहे खात आहेत. हे रात्रीचे किचन ची खिडकी बंद करत नाहीत!! उंदीर पाली येतील की. अरु ची शिकवण कमी पडत आहे.
इशाने चहा पोहे केले आहेत. अभी डबा घेउन जातो. अनघा संजना कुठे आहे विचारते. अन्या म्हणतो मला माहीत नाही. खंग्री मॅन पोह्यातले दाणे वेचून खात आहे. टुं टुं करत.

अन्या लगेच उखडतो. अपा म्हणतात तिला डॉक्ट्र कडे न्या. आजी कटकट करत आहे. अभी जातो तर आजी अनघालाच ओरड त आहे.
संजना ला घेउन ये म्हन तात अप्पा.

इकडे बॉस व होणारी बायको घरी केलेले बेसनाचे लाडु घेउन येतात. बॉसला फाइल्स बघून टेन्शन येते. ह्याला ऑफिसचे काहीही माहीत नाही हे दिसत आहे. ह्यांच्या शौर्याची गाथा पेपर मध्ये पण आलेली आहे. बहुतेक पुढारी सांज मुंबई टाइप असावीत. अरु ब्राम्हणी तत्वज्ञान सांगत आहे. आशू फाइल्स हटव म्ह णतो. व अरु त्याला हात धरु धरु खुर्चीत बसवते. ते बघुन नित्या सर्वांना समजे ल अश्या पद्धती ने हसत आहे.

अन्या संजना फाइट चालू आहे. तो उखडत आहे.पण संजना शांत हो हळू बोल म्हण त आहे. ती रडायला लागलेली आहे. पन दोनदा प्लीज प्लीज म्हणत नाही. व आढे वेढे घेउन मी प्रेग्नंट आहे म्हणते. डेट उलटुन गेलेली आहे. अन्याच्या डोक्यात अजुनही काही शिरत नाही आहे.
लैच मज्जा. प्रेमाचा रिझल्ट लागला!!

प्रोमोतः अन्या म्हन तो मला ही जबाबदारी नको आहे. पन आरु संजना हात धरुन येतात व ती संजनाला पाठिंबा देते. दसरा मेळावा होणार च. तो ही शिवतीर्थावरच. निर्णय सर्वस्वी त्या बाईचा आहे म्हणॅ. किती तो भोचक पणा!! आ .. आता सासु सुनेचे जॉइं ट डोहाळ जेव्ण होईल व अरु
गाणे म्हणेल. नक्की

मागे अरुंधती इशाच्याच कॉलेजात प्रवेश घ्यायला गेली होती. तेव्हा प्रिन्सिपॉल बाई होत्या. त्यांनापण अरुंधतीचं सुखाचे चांदणे आवडलं होतं.
असं अर्ध्यात प्रवेश घेता येतो का हे प्रिन्सिपॉल बाई चौकशी करून सांगणार होत्या. तेव्हाही कॉलेजातच ईशाशी वाद झाला होता.
लेखक हे सगळं विसरले.
आता पुरुष डीन. मधल्या काळात कॉलेजची डीम्ड युनिव्हर्सिटी झाली वाटतं.

आशुतोषने पूर्वी खूप काम करून बिझिनेस मोठ्ठा केला - इति नितीन.

मला वाटलं अभिचं बॉस बरोबरच लफडं आहे की काय!

एखाद वेळी संजना चा प्रेग्नसी रिपोर्ट निगेटिव्ह दाखवतील , तेवढेच चार एपिसोड गेले ह्यात.>>हो. तेच आज दाखविले.
कालच्या प्रोमोत संजना आणि अरूचे जे कपडे होते ते आजच्या भागात नव्हते, वेगळेच होते.

शुभ प्रभातः पूर्वी संजना कसे व्हः असे म्हणायची तसे अन्या म्हणत आहे व ही रडत आहे. तिला भीती वाटत होती आधी टेस्ट का नाही केली विचारतो. मला ट्रॅप करायला तो हा प्लान केलास असे म्हणते. नुसती शंका आहे तर इतका डरामा. व हे सर्व कांचन दारात उभे राहुन ऐकत आहे. मग खालच्या खोलीत घरातील दार खिडक्या उघडे टाकून आजीचा ओरडा चालू आहे. शी कांट कम टू टर्म्स विथ इट. ह्या वयात वगैरे चालू आहे. लोक काय म्हणतील. बधाई हो पिक्चर नाही बघितला का? हिचे केस अगदीच तेल न लावल्या सारखे उखीर वाखीर दिस त आहेत. आता आपल्यालाचमूल हो णार असे काहीतरी संकट आल्यासारखे आजी वागत आहे. अप्पा बहुतेक आपला चान्स गेला म्हणून दु:खी आहेत.

आजीला नवरात्राची काळजी. ! एवढी गौर येउ बघत आहे. अरु ला पण कांजीने बोलावले आहेत. नवरात्राचे समजावून सांगायला.
अरु एकदम दुर्गा मोड मध्ये आहे. संजना पण आजीला गप्प बसा म्हणते. अन्या उखडत आहे. अरुनेच तिला पट्टी पढवली असावी. कारण अन्याचे हसे व्हावे. हिला पण मूल झाले की हिला सांगता येइल संजनाला पण मूल झालेआहे म्हणून काय पण विनोदी कन्स्पिरसी थिए री असते
अन्याची. अरुचे ब्राम्हणी समजावणे चालू आहे. कांजी शिरा ताणून बोलत आहे. आपण समाजात राहतो. अरु पण फक्त एक स्त्री म्हणून विचार करत आहे. मूल वाढवायचा संजनाला अधिकार आहेच. ह्या दोघी अन्याला शिकवत आहेत. दोन बायका फजिती ऐका.

कांजी नको नको त्या शक्य ता काढत आहे. ही काय मूल वाढवेल!! संजना मी देइन वेळ म्हणते. लगेच निखिल ला आणू म्हणाते. अरु लगेच लोक कश्यावरही हसतील. संजना अरुवर कोर डे ओढून घेत आहे. तुला मुलगी मानतात. सं अरु सारखे वागत आहे. अन्याला स्वतं त्र बाणा नको आहे. सं काही अन्याला डिवोर्स देणार नाही सहजा सहजी. रिपोर्ट देते अन्याच्या हातात. निगेटीव आहेत. प्रेग्नंट नाही आहे ही. ( भरत तुमचे बरोबर ठरले.) मग हिला काय झाले आहे अ‍ॅसिडिटी!!! खंग्री मॅन जोगवा मागून डबे बडवत आहे. एक नवीच एनर्जी आली आहे त्याच्यात.

अरु पण अन्याला चार शब्द सुनवत आहे. तुम्ही एक टे पडाल. आजी सुटले म्हणते. संजनाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घ्यावी.

प्र्मो मध्ये कामत मुलगा इशाला हात लावत आहे तर अनीश बाइक वरुन येतो.व बहुतेक तिला वाचवत आहे. व घरी पूजा असल्याने सर्व नीट तयार होउन गुरुजीं समोर खानदानी असल्याचे नाटक करत आहेत.

दसरा मेळावा होणार च. तो ही शिवतीर्थावरच. निर्णय सर्वस्वी त्या बाईचा आहे म्हणॅ. किती तो भोचक पणा!! आ .. आता सासु सुनेचे जॉइं ट डोहाळ जेव्ण होईल व अरु
गाणे म्हणेल. नक्की

खंग्री मॅन जोगवा मागून डबे बडवत आहे

>>> फुटले. Rofl
अमा तुम्ही दररोजच्या घडामोडीवर तुमच्या पर्पेक्टीवने लेख लिहीत जा. जाम मजा येईल वाचायला.

शुभ दुपार. आज म्हणण्या सारखे काही घडलेचि नाही. गौरी व यश चालत येत आहेत. तो यश चालताना पहिलवाना सारखाच दिसतो. गौरीचे परत १५ दिवसांसाठी अमेरिकेस जाण्याचे चालले आहे. ड्रेस डिझायनिन्ग मध्ये असे काय ट्रेनिग्न असते? ह्यापेक्षा आमचा गावचा नाटू शिं पी बरा. स्वस्तात व वेळेवर देतो. मग एक गाडी यशला झटकून जाते की तो ल्ग्ग्ग्ग्ग्गेच भडकतो.... व मागे पळत जातो तर काय कामताचो झील.

इकडे इशा अनीश लटिके भांडण चालू आहे. पुढे इशाच्या मागे कामताचो झील जातो व तिचे हात पक्डायचा प्रयत्न करतो. लगेच बाइक वरुन अनीश हजर व तिला घेउन जातो.

आता एव्ढ्यात रात्र झालेली आहे व इशा गौरी यश बाहेर काही बोलत उभे आहेत तर अरु येते व इथे काय करत आहात विचारते. ते गुळमुळीत उत्तरे फेकतात.

नेक्स्ट डे अनघाच्या हस्ते पूजा. बराच वेळ चालते. अभी व अन्या पण आहेत. संजना छान दिसत आहे. पण तोंड उघडले की उकि र डा. नको तिथे नको ते बोलते.

इक्डे आशू अनीशला सांगतो की कामताचो झील परत येइल पन हे अरुला कळ ले नाही पाहिजे. तर अरु तेच ऐकते व पॅड पेन घेउन आलेली आहे. फार्बाईकाम मोड मध्ये

अमा Lol फार्बाईकाम मोड मध्ये..!!

हो ना..यांना असे होम वर्क असल्या सारखे कसले काम असते...फायलींचे गठ्ठे घेऊन ? काही.. कालही तसेच दाखविले...अरु पेपर तपासत असल्या प्रमाणे .....!
आणि खरेच आशुला बदला बुआ.... !!
तो असा तेल्कट दिसतो म्हणूनच बहुतेक अरुंधती अजून हो म्हणत नाहीये....!!
यश नित्या ला काहीच काम नाही...!!
तसे तर कुणालाच काही काम नाही.....कमाईचे / नोकरी धंद्याचे/व्यवसायाचे!

कामताचो झील ...मस्त!! Happy

आजच्या एपिसोड मध्ये...जेव्हा ईशा आणि अनीश घरी येतात..ते compound च्या आतून आतून च आले..तुळशी वृंदावनना च्या साईड ने....गेट एका बाजूलाच राहिले..

नील परत आलाय यापेक्षा इशारा आई तिच्या कॉलेजात येणार ही गोष्ट जास्त सिरियस वाटते.
आणि तो आलाय हे अरुंधती पासून लपवायचे? तिलाही सावध राहायची गरजच आहे. ती सुपरवुमन असल्याने तो आणि त्याच्या चार मित्रांना एकटीने लोळवू शकेल म्हणा.

मलापण केळकरांच्या हापिसात वर्क स्टेशन दिलंय म्हणे. अरुंधतीचं वर्क स्टेशन पाहिलं. याचंही दाखवा कधीतरी. ती काल डिक्टेशन, ॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉ ऑर्डर घ्यायला पॅड घेऊन आली होती. चष्मा बनवलाय तेही विसरले.
अरुंधती रोजरोज आशुतोष आणि नितीनसाठी खाणं आणते पण याला देत नाही. किती फेकाल!
तिचं कारणं वागणं आउट ऑफ कॅरॅक्टर होतं. एकदम क्रांती झाल्यासारखं मुलांना ताडताड बोलली.

अरे आई तिसर्‍या पानावर काय करते आहे?! आज मी सर्व आवरून बसले तर अजून भाग लोड झालेला नाही. आता एक झोप काढते व अनुपमा बघते.

Pages