आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला गौरीचा निर्णय पटला. यश भले आता भडक डोक्याचा आहे आणि देअर इज् अ चान्स की तो भविष्यात मेंटली मॅच्युअर झाल्यावर बरा वागू शकेल. पण यांच्या घरची मोठी मंडळी तरी कुठे धड आहेत? त्यांना फक्त त्यांच्यासाठी राबणारी सून/नातसून हवी. स्वत:चा शून्य विचार करून फक्त यांच्यासाठी सतत चहा, नाश्ता, जेवण करत राहणारी.
आता करिअर नाही करायचं मग कधी करायचं.

इशा पण तशीच आहे. गौरीच्या व्यक्ति स्वातंत्र्याचा आदर न करता तिला चॉइस सांगून मोकळी. साखरपुडा मोडणे पन आता फारच कॉमन आहे.
मुलींना अमेरिकेचे आकर्षण, मुलींना नोकरी पैसा आला की कुटुंबाची कमी किंमत वाट्ते. ह्याव अन त्या मुद्दे येउन गेले. त्यापेक्षा अनघा कशी बरी एकदम सामावून गेली. पण ती डिवोर्सी आहे. वयस्कर आहे गौरीपेक्षा तिच्या प्रायोरिटी वेगळ्या असू शकतात ना. मुलीने स्वतःचा विचार करायचाच नाही असे ह्यांचे मत आहे. व आपण सांगू तसे वागायचे. व्हेरी फ्युडल.

गौरीचा निर्णय योग्य आहे की नाही माहीत नाही पण तिने यशला काहीही कल्पना न देता परस्पर घेऊन टाकला हे चूक आहे माझ्यामते. बाई तुला अमेरिकेतच सेटल व्हायचं होतं तर इथे तीन वर्षे काय करत होतीस? तिथूनच आलेली दाखवलीये ना आधी? अशा वेळी इथल्या मुलाशी लग्नाचा निर्णय कसा काय घेतला? स्पष्ट न का र द्यायचा ना?

येनीवेज, तिने लग्न कुणाशी करावं, करावं की करू नये हा तिचा प्रश्न आहे शेवटी. होऊ शकतं असं काय आता. पण शेवटी तिच चुकीची ठरवली जाईल. कारण ती मुलगी आहे Sad

अशा वेळी इथल्या मुलाशी लग्नाचा निर्णय कसा काय घेतला? स्पष्ट न का र द्यायचा ना?>> तिने एकदा मध्ये बोलायचा प्रयत्न केला होता. हा कायम आई आईच करत अस्तो. रिलेशन शिप वर फोकस आजिबात नाही. कायम गौरी नेच समजून घ्यावे ही अपेक्षा. व त्याचा भयंकर रागीट स्वभाव
प्रसंगी मारहाण करणे हे रिलेशन शिप फिक्स करून साखरपुडा झाल्यावर पुढेच लक्षात आले. तो परेन्त तो बाहेरून डिसेंट्च वागत होता. पूर्वी
एकदा गौरीला कोणीतरी काही म्हटल्यावरही तिथेच मारहाण चालू केलेली होती.

दुसरे म्हणजे आईवडी लांची तब्येत खराब होणे. हे ही एकदम व अचानक होउ शकते. उरलेला वेळ आईवडिलांबरोबर घालवावा हे बरोबर आहे.
अँड डॉलर्स इन द बेंक नेव्हर हर्ट्स एनिवन. ह्याने अजून काहीच फारसे पैसे कमावलेले नाहीत.

हम्म बरोबर. Actually अरूनेच फशी पाडलंय ह्या दोघींना आपल्या मुलांसाठी. पैकी अनघा अडकली, गौरी सुटली Lol .

पण यश आधीपासून भारतातच राहणार हे अगदीच क्लिअर होते. गवरी ने त्याला मुळात लग्नाला होकारच द्यायला नको होता ; जर पुढेमागे अमेरिकेत जायचे असा विचार होता तर. दुसरे म्हणजे, त्याला न सांगता- विचारता..असा निर्णय घेतला हे तर अगदीच चूक.
असे काही नाही...हे जरी उलट असते...तरी मुली ही काही अचानक सांगितले तर (होणार्‍या) नवर्‍या सोबत अमेरिकेला जायला तयार होतीलच असे नाही!
अमा.. मुलीने स्वतःचा विचार करायचाच नाही असे ह्यांचे मत आहे. व आपण सांगू तसे वागायचे. व्हेरी फ्युडल Happy
पण ह्या केस मधे गौरीने लग्न करुन यश सोबत भारतात रहावे ही रास्त अपेक्षा नाही का? फक्त स्वतः पुरता विचार करुन कसे चालेल? लग्न म्हटले की दोघांचा संयुक्त विचार हवा.
त्यांनीही, नाराजीने का होईना, तिला मूल होणार नाही तरी स्वीकारलेच ना?
म्हणजे ..तिला यश आवडेनासा झाला आहे, लग्न नाही करायचे ..तर इट्स ओके!! पण त्या बद्दल दरवेळी प्रमाणे देशमुखांच्या पॅट्रिआर्किअल धोरणाला दोष देता येणार नाही. Happy

ती इतके दिवस यशशी फोनवर बोललीच नाही, इ. जे दाखवलेय ते पटण्याजोगे नाही. याचा अर्थ तिला ब्रेक अप करायचे आहे असा होतो.
तसंच लग्नावरून चिडवल्यानंतरची तिची थंड प्रतिक्रिया यावरूनही
त्यावरून यशने तिला कॉर्नर करणे आणि मग तिने सांगणे असं दाखवलंय.

पण हा निर्णय सांगायला तिला वेळ दिला नाही. काही काळ अमेरिकेत राहून पैसे कमवावेत मग भारतात पुन्हा यावं असं वाटणं गैर नाही. यशने आपल्यासोबत तिथे राहावे, असं वाटण्यातही. गौरीने त्याच्या आईची , आजीआजोबांची काळजी घेतली पाहिजे ही जशी अपेक्षा आहे; तशीच त्यानेही तिच्या आईवडिलांची काळजी घेण्याची अपेक्षा दाखवणे चूक नाही. पण हे सगळं अचानक दाखवलंय. आले लेखक दिग्दर्शकाच्या मना तिथे पात्रांचे चालेना.

अरुची फॅमिली आणि मुले बघता , कुठल्याही बापाने पोरगी देताना १० वेळा विचार केला असता. शेवटी अरुलाच सगळी सेटिंग करावी लागली.
आता अरू येईल तिची कामाची लिस्ट खालीलप्रमाणे;
1. केदराची दारू सोडवेल आणि आशुला सांगून कामाला लावेल.
2. गौरीची उलटं तपासणी आणि मेंदू धुवेल ( लग्न करते पण उपदेश नको )
3. अन्याच्या दुबानाऱ्या धंद्याला पाठबळ देणे
4. अनघाला उपदेश देणे
5. आशू बरोबर सेटिंग
6. वेळ मिळालाच तर कॉलेज, क्लास आहेतच

नवीन Submitted by मस्त_कलंदर on 31 October, 2022 - 03:55 >>>> यापैकी काही न करता गाडीला अपघात झाला आणि तिथेच इतिश्री झाली व म्हणून सिरीयल लीप घेऊन अरु एकदम मेकअप करून ऍरोनिका बनून यावी व देशमुखांना सुधारावे असा नवा ट्रॅक करावा

अनघा डिलिव्हरी होणार असल्यासारखा किम्वा पोट
बिघडल्यासारखा चेहरा करत आहे म्हणजे अ‍ॅक्टिन्ग.

Lol

यापैकी काही न करता गाडीला अपघात झाला आणि तिथेच इतिश्री झाली व म्हणून सिरीयल लीप घेऊन अरु एकदम मेकअप करून ऍरोनिका बनून यावी व देशमुखांना सुधारावे असा नवा ट्रॅक करावा>>>>> म्हणजे तुझी माझी वाली ट्रिक वापरायची. नये पॅकेट में पुराणी चीज.संजना को टशन.

शुभ प्रभात.

आजी यश गौरीला प्रश्न विचारायचे बघत आहे. पण अप्पा अनघा त्यांना गप्प बसायला सांगतात व आपण आनंदात राहू आज पाड्वा भाउबीज चल्ला चला ओवाळणी ची तयारी करायची आहे जेवायची तयारी करायला कांची अनघा संजना उठतात. अन्या बसुन आहे.
यश आठ्वणी मोड. दिल टूट गया तुकडे हजार हुए एक यहांगिरा एक वहां गिरा. अनीशचा फोन येतो पण यश फोन कट करतो. यश छान तयार झालेला आहे. कुर्ता छान आहे त्याचा अभी व त्याचा रुम मध्ये संवाद होतो. यश बीइन्ग व्हेरी समंजस. तिची इच्छा. तिच्याशी बोलणे करणार आहे. तिला यश जीवनात हवा असेल तर तिने तिच्या अ‍ॅमंबिशन मागे ठेवल्या पाहिजेत. अभी तिने इथेच राहावे अश्या मताचा आहे. गौरी परदेशातसे म्हणत आहे पन तिच्या साठी तीच मातृभुमी आहे. ती तिथेच जाईल ना शेवटी.

इकडे यश फोन उचलत नाही पन अनीश फोन करतच आहे. जरा गप्प बसावे की. आशू तो पिछे ही पडा है. नो कन्सेप्ट ऑफ पर्सनल स्पेस.
इकडे पन अ‍ॅनालिसिस चालू आहे. आशूला वाट्टॅ की अरु इथे असायला हवी होती. आजी येते व आज भाउ बीज आहे तयार व्हा. वर्शा कडे ओवाळून घ्याय्ला जायचे आहे. हा ओजी पुणेकर आहे वाट्टॅ. वर्शा काही दहा बारा पदार्थ बरोबर देइल ते घेउन यायला आईला रिकामी पिशवी मागून नेतो.

यश भाउबि जेच्या तयारीत आलेला आहे. परत तेच दळण संजना चालू करते अन्या भांडायला लागतो. पण यश दाबतो. बोलेन म्हणतो. तिचे जीवन त्याचे काय क्रायचे ते तिने ठरवावे. अन्या म्हणे नात्यातले निर्नय दोघांनी घ्यायचे असतात!!!!! संजना लगेच चावायला सुरु. अप्पा तिथेच थांबवतात. विशाखा पण आलेली आहे. भाउबिजेची काय तयारी!! केदार काउन्से लिन्ग ला गेलेला आहे. तो सुधारणा मोड मध्ये आहे. हे थोडक्यात आवरले आहे.

आता तोच नेहमीचा ओवाळणीच सीन व कांचीचा लाडीक पणा. ग्रॅबी फिमेल. पण कांचीचा भाउच आला आहे तात्या आजोबा. लगेच उत्साह व आनंदाची लकेर. कांची उसासत आहे. इशा चिरकत आहे. काम्ची सुसंस्कारीत असल्याने लगेच पाया पडते. ह्या बायकांना कायम कोणीतरी बाप्या पाया पडायच्या रेंज मध्ये नसला तर असुरक्षित वाटत असावे. तात्याने कानात भीक बाळी घातली आहे. कुटुन आणला हा नमुना. जेवण व प्रवास खर्च पर डे वर घेतला असावा. ह्याला कोणी बस पाणी पी पण केलेले नाही. बाकी सर्व गँग प्रतिक्रिया देत आहे. हेच पुरातन दळण चालू आहे वायफल गप्पा.

मग अनघा वाकून नमस्कार !!! त्या आधी पाणी व गुळाचा खडा आणून देणे. कार्यक्रम. मग अवीची चौकशी. गायब बायको ची चौकशी.

पुढील भागात गौरी यश तुळशी वृंदावन दिवा लाव्णे.

गौरी यश दोघांनीच एकमेकांशी बोलून सॉर्ट आउट केलं तर होऊ शकतं. दोघांचे विचार अजूनही एकमेकांना कळताहेत आणि एकमेकांना स्पेस देणं त्यांना कळतंय.
बाकीचे लोक मध्ये ढवळून प्रॉब्लेम वाढवताहेत. अभिषेक म्हणातो तसं देशमुखांकडे काहीच पर्सनल राहत नाही.

अमा..
कांची, ग्रॅबी फिमेल,
Lol
ते तात्या आजोबा येतात की अधून मधून..जयंत सावरकर ना ? पर डे वर नाहीत ते! Happy
वर्षा व्हर्चुअल आहे!

ते तात्या आजोबा येतात की अधून मधून..जयंत सावरकर ना ? पर डे वर नाहीत ते! Happy >> हेच लिहायला आले होते , खूप सिनिअर आणि प्रसिद्ध अभिनेता आहेत ते. पर डे वाले नाहीत. Happy

अप्पांना टपकवतात काय? >> वाटत नाही , असे धक्के द्यायची सवय आहे त्यांना. आजच्या प्रोमोवरन मध्ये यश गौरी च पॅच अप होतंय अस वाटतय.
मध्यंतरी संजनाच्या गरोदरपणाच्या नाटकात गेले दोन एपीसोड चांगले.

सन्जनाचे सुतळी केस फ्रेन्च वेणीत चान्गले दिसतायत, तिची कालची आणि आजची साडी आणी लुक दोन्ही छान होता

शुभ प्रभातः अरु आजारी पणाच्या रजेवर असल्याने असेच पाणी घालत चालू राहणार. नॉट सो पर डे आजोबा दादागिरी चालवत आहेत. नमस्काराची परेड चालू आहे व प्रत्येकाला उपदेश करत आहे पुरानी हड्डी. सर्व वॉट्सेप फॉ र वर्ड बोलत आहे. अंकल आन्टी क्राउड ला एकदम खुष करून सोडणार. प्रत्येकाची उल ट तपासणी चालू आहे. पीळ मारत आहे अजुनही. अरुच ग्रेट असे बोलुन संजनाला उपदेश करत आहे. बरं एकदा बोलुन परत दोनदा कळलं का कळ लं का विचारत आहे. संजना काही उलटे बोलायचा प्रयत्न करत आहे. लगेच घटस्फोटाचे सांगते. काही गरज होती का.
हार्ट अ‍ॅटेक यायचा बिचार्‍याला.

इकडे चाचू भतिजा संवाद. वरशा कौतूक. हे ह्याचे बॅक बोन आहे. फॅमिली मेंबराहेत ते लोक्स. हा नितीन वर खूप अवलंबून आहे. मेहनत नितीनची आहे.( हा झोपलेला आहे नितीन ने मस्त पैसे बनवले असतील. सु भ्र ष्टाचार करणे शक्य आहे. मुंबईत इतके निरागस बिझनेस ओनर फार कमी आढ ळ तात. डाय्वरचे पैसे कापणारे च जास्त. ) अनुष्का आगाशे नावाची नवी टीचर हिचे कौतूक चालत आहे. आशूचे गाणे हिट झाले आहे. जनरल अरु प्रेम संभाषण. अरुचे जालीय चाहते आहेत हे ऐकून आशू काळजीत पडतो. जनरल गफ्फा.

इकडे म्हातारा पेटला आहे घटस्फोटाचे ऐकून . परत व्हॉट्सॅप संवाद चालू आहेत. आमचे पन्नास पन्ना स वर्शाचे संसार त्याग व ह्याव त्याव शिवाय कसे टिकले - फेवरिट आर्गुमें ट. आज लेखिकेने ज्येना डब्बा उघडून पालथा केला आहे. वेतन देतात तितका आभिनय केलाच पाहिजे असे काकांनी ठरिवलेच आहे.

प्रोमो मध्ये परत यश गौरी मिलन मे बी.

त्या लेखात ती लवकरच मालिकेत दिसेल असं लिहिलं आहे. शीर्षक वाट्टेल ते असतं हल्ली बातम्यांचं.

शुभ प्रभातः तेच तेच चालू आहे नॉट सो पर डे आजोबा काय काय फंडू प्रश्न विचारायला लागल्याने सर्व अपसेट होत आहेत. त्याला दपटून वर नेतात तयार व्हायला व ओवाळायाची तयारी चालू आहे. गौरी व संजना संवाद त तिला व यश ला बोलायचे आहे.

गोड गिट् ट आजी वीणाची आठवण काढून रड त आहे. तिने आशू ला एक गिफ्ट पाठवली आहे.
अनीश रियाज म्हणून काय गाणे म्हणतो तर प्रथम तुला वंदितो ............ अरे आली माझ्या घरी ही दिवाळी तरी म्हणा यचे. ... हा ह्याचा रियाज.

इक डे मंडळी वर्शाकडून गिफ्ट घेउन येतात. आजोबा परत केदार बद्दल टोचु विचारत आहेत. अप्पा जरा डायवर्ट करतात. केदार येतो ह्याची बहीण इथेच दादर मध्ये आहे. लगेचच येइल म्हणतो. परत पाया पडत आहे. आजोबा त्यांच्या घर ची माहिती देतात. आज्जा विघ्न संतोषी वाटतो बहिणी सारखाच. केदार ने चार दिवस दारू घेतलेली नाही. व बरा दिसत आहे. लगेचच सुटले हे व्यसन. व लगेच आभार प्रदर्शन माफी कार्यक्रम आ आ कोरस. अश्रुपात विशाखाला सर्वांनी मिठीत घेतले. केदार विचार करायच्या मोड मध्ये आहे. अरु ची आठवण काढतो. अरु गावाला गेली का वारली? असे फील्स येत आहेत. सिरीअल पण वारु दे आता.

आता ओवाळणी असा सुरेख तोच प्रसं ग चालू आहे. तेच संगीत . एकमेकांना वाकून नमस्कार करायची स्पर्धा आहे. संजना पण अवीला ओवाळते. तिचे ब्लाउज इतके स्लीवलेस व बॅकलेस आहे की जरा खाली वाकले की सर्व दिसणार. हिला चवचाल पणा सोडून येत नाही का.
मग कांचन व भावाची ओवाळणी. व भावनिक संवाद भाउच रडा यला लागतो. व बहुतेक इतर सर्व पण पदर डोळ्ञा ला.

केदार ला अरु नाही म्हणून अनघा ओवाळते. आता विमलने अप्पांना, ओवाळायचे राहिले आहे. इकडे केदार दादाबडी होण्याचा प्लान जाहीर करतो. अप्पा विसरून अरु ला परत बोलवतात.

पुढील भागात. अन्या संजना घट स्फोट त्यामुळे पाड्वा ओवाळण्याला काही अर्थ नाही आहे. आजोबा दचकत आहेत.

ते यश -गौरीचे तुळशी वृंदावना जवळ चे ड्वायलॉक दाखविले नाही का?
असे कसे हे....? प्रोमो एक दाखवितात व प्रत्य्क्षात भलतेच!

आजी अप्पा संवाद व रोमान्स पण. आजीला बाहुली म्हणतो. पूर्ण जीवनाचा आढावा घेत आहेत. घराचा पाया भक्कम आहे म्हणे कारण कांचन उभी आहे. आजीचे आभार मानतो. सेंडॉफचे भाषण वाटत आहे. लवकर मृत्यु यावा म्हणतो. मग आजी रडारड. एकमेकांशिवाय जगायचे नाही. हा विस्मृतीचा पेशंट झाला आहे. जोहरा जबी गाणे पण चालू आहे. व आजीला मस्त पैकी तोडे घेतले आहेत. मग आजी त्याला मिठी मारते.

खाली टी पीकसली तरी तयारी चालू आहे बहुतेक पाड्वा ओवाळणी. हे सर्व साधारण एकाच कलर रेंज मधील कपडे घातले आहे. ते जोडी येते मग इशा चिरकत आहे. परडे नॉट आज्जा पण कौतूक करत आहे. जुन्या लग्नाच्या आठवणी. आज ज्येना डब्बा उघड ला आहे. विशाखा पण दृष्ट काढत आहे. दहा मिनिटे हेच दळण चालू आहे. काही घडत नाही. किंवा हेच अपेक्षित आहे

मध्येच चाचू भतिजू टीपी संवाद फोटो. मग परत देशमुख ओवा ळणी. लाडीक लाडीक लाडी क. तोडे व पाकीट जोरात आहे कांची.

प्रोमो मध्ये अन्या संजना ओवाळा किं वा नको चालू आहे.

आज खूपच बोर केले बुआ. आपा - कांची चा सीन तर अतीच बोर. खूपच पाणी घालायलेत दिवाळीच्या नावावर!!!!
एव्हढ्या अस्थिर घरच्या वातावरणात, मुलाचा दुसरा घटस्फोट होताना, नातवाचे ठरलेले लग्न मोडताना, आर्थिक चणचण असताना...म्हातार्‍याने कांची ला तोडे द्यावे?
तेही सदा कटकट करणार्‍या बाईला...? काय म्हणून?
ते पैसे fix मध्ये ठेवायला हवे होते..तब्येती साठी!!!!

Pages