आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गायन शाळेत विद्यार्थ्यांचे सूर बरोबर लागतात की नाही ते मास्तरीण बाई बघत नाहीत?
परवा संजना म्हणाली माझी केबिन बनतेय तोवर घरूनच काम करतेय.
कालच्या भागात ऑफिसला जात होती ना?
मध्ये किती दिवसांची गॅप गेली?

नाही..हे बहुतेक एपिसोड्स पुढे मागे दाखवितात...तुकड्या तुकड्यांत शूट करुन.
उदा... अंघा चे आई बाबा येण्याचा एपिसोड हा एक स्वतंत्र भाग होता...त्याला मागून पुढून काही कनेक्ट नव्हते.... जस्ट अ फिलर..कुठेही घुसविता येईल असा...
त्यात मग कंटिन्युईटी च्या अशा चुका होतात!

प्रेक्षकाना उल्लु समजणे आणि बनवणे.कटिन्युटिचा घोळ असतोच शिवाय एखादे प्रचारकी वाक्य मोठेपणा दाखवायला घुसडवणे आणी त्या कॅरेक्टरने अगदी पुढच्या भागात घुमजाव करणे.

काल ललित प्रभाकरच्या सनी या चित्रपटातलं एक गाणं रिलीज झालं.
त्यात यश म्हणजे अभिषेक देशमुख आहे.
मालिकेतल्या त्याच्या भावाचं नाव वेगळं ठेवायचं होतं. सेटवर गोंधळ होत नसेल का?

अप्पांचा विस्मृतीविकार अचानक आणला आणि भरभर वाढवला.

म्हाताऱ्या माणसांची विस्मृती चलनी नाणं आहे , बरी पडते.

त्यामुळे कधी विनोद (?) होऊ शकतो , त्याना दोन वेळा तीच गोष्ट सांगण्यात टाईम पास होतो प्लस भावनिक हात ही घालता येतो दर्शकांच्या मनात.

हल्ली खूप सिरीयल मध्ये दाखवतात म्हाताऱ्या पात्राची विस्मृती.

हल्ली खूप सिरीयल मध्ये दाखवतात म्हाताऱ्या पात्राची विस्मृती. >>> हम्मम, वास्तव आहे ते मात्र. जवळून बघतेय काही केसेस पण भरभर वाढलेलं बघितलं नाही (एजेड मधे हळूहळू वाढताना बघितलं आणि एक पन्नास पंचावन्न भरभर वाढताना पण ती अपवादात्मक असेल). अर्थात सिरीयलवाले याचा फायदा अतिरेकी प्रमाणात घेणार म्हणा.

ज्येना विशे ष चालू आहे. कांचन सून आणा म्हणते. व लगेच आशूची पत्रिका मागते. पण तिला आशू अरु चा फोटो दिसतो मग कांचन लगेच बावरते. दोघाम्चा फोटो का लावला आहे वेगळेच वाटते. असे फोटो जोडप्याचे !! आशुच्या आईची काहीच हरकत नाही. तिला अरु सून हवी आहे.
आजी कांचनला समजावून सांगत आहे. तरी अप्पा चोवीस तास बरोबर असते. पण ही अरुने एकटे राहावे असेच बोलत आहे. तिला ह्या वयात कश्याला जोडीदार व प्रेम हवे आहे असे कांचन म्हणते. व अरु काय शादी करणार नाही असे शिक्का मोर्तब करत आहे.

इकडे इशा गौरीशी फोन वर बोलत आहे. भाई बहन का प्यार चालू आहे. गौरीचा कॉल होता मला का नाही दिला. तर ती दमली होती. ती लौकर परत येत आहे म्हणे यश हेड फोन लावुन गाणी ऐकत आहे. अनघा बघुन आनंद घेत आहे. ही यश चा फोन कट करत आहे. ती भयंकर बिझी किंवा झोपलेली असते. इशा प्रसंगाचे गांभीर्य समजत नाही आहे. अनघाने ते च मोठे कानातले घातले आहेत हिरवे खड्याचे. ते संजनाचे चोरलेले वाटत आहेत. यश ला कॉफी नको मुव्ही बघायची नाही. तो फारच अपसेट आहे गौरी नसल्याने.

मग एक रस्त्याचा शॉट. कांचन अप्पा चालत घरी जात आहेत. अरु च्या दुसर्‍यालग्ना मुळे कांचन अपसेट आहे. अप्पा तिला समजवत आहेत.
हिचे अनघाला माहेरी पाठवायचे प्लान चालू आहेत. आधी थाटात डोहाळे जेवण आहे. दोघे उर्सेकराच्या घरासमोर थांबून मनी उर्सेकरीण हिचे घर
आहे त्या समोर ते थांबले आहेत व आत जायचा प्लान करत आहेत.

अप्पाला कोपर्‍यावर भेळ वाला आहे तिथे भेळ पापू खायची आहे. हे अस्ले करायला जोडीदार हवा हे कांचनला कळत नाही. सेल्फ सेंटर्ड बाई
इकडे आशू जुना अल्बम बघत आहे एकदम भावनिक संगीत चालू आहे. मग आईला बघायला येतो ती झोपलेली आहे. तेच संगीत चालू आहे.
म्हातारी मेली का ते चेक करतो. आजी लगेच उठून चेक करत आहे. तर आशू भयानक पद्धतीने रड त आहे. आईचा वियोग सहन होत नाही आहे. बिचारे पोर ते. आता त्याला अरुच्या पदराची गरज आहे. बाबा पूर्वी गेले तेव्हा कळत नव्हते. ह्याला आईसाठी अमेरिकेतुन परत यायचे आहे. मला सोडून जाउ नकोस असे तो रडत रडत सांगत आहे. आई लगेच ज्ञान सोडत आहे. ह्यांनी केंसर पेशंट बघितले नाहीत का. ते रोज ह्या सत्याशी सामना करत असतात.

मजबूतच रडारड चालू आहे. ब्रेकडाउनच. ह्याला अरु च्या पदरास बांधलेच पाहिजे असे आईला उमगते. पुढील भागात अभी अनघा बेबनाव...
लगे रहो.

{म्हातारी मेली का ते चेक करतो}
देवा!
हा कधीतरी कौन्सेलिंग घेत होता ना? थांबवलं कशाला?

बाकी मालिकावाल्यांचं आणि ओंकार गोवर्धनचं असं कॅरॅक्टर रंगवायची हिंमत दाखवल्याबद्दल कौतुक करायला हवं. नायक असा क्वचितच दाखवतात. की अरुंधतीला त्यांच्याबद्दल प्रेम नाही, पण सुलेखा ताईंचं वात्सल्य तिच्या अकाउंटला ट्रान्सफर होतं असं दाखवायची सोय?

हिंदीतल्या आणि बांग्लामधला आशुतोष कसा आहे?

अनुपमा मधला अनुज फुल्टु हँडसम असा घेतला आहे त्यात नवृया पेक्षा तरूण व शिरीमंत. व सारखेच प्रेम व्यक्त करत असतो. व आडून आडून
त्यांचे त्यांना बघु दे असे समजावयाचा प्रयत्न करतो. मधूनच कैसे मॅनेज करती है ये सब और ते असे म्हणतो. शेफ ची टोपी घालून दोन पोळ्या लाटतो. किम्वा ठेपले असतील.

श्रीमोयी मधला जास्त बिलि वेबल आहे. बारकासा चस्मिस हुषार. विद्वानच. तिथे कल्चर ली जास्त इवॉल्व्न्ड आहे कपल. मी तर श्रीमोयी च्या प्रेमात आहे एक वसंतोत्सव असतो शांतिनिकेतन मध्ये तेव्हा ती साधेसेच पण सुरेख गाणे म्हणते. व तिचे बोलणे वगैरे.

आज अगदी रात्रीचीवेळ आहे. अरु अभ्यास करत आहे. ही घरात पण गाउन/ टीशर्ट शॉर्ट घालत नाही का!! इथे पण साडी. बेल वाजले मला वाटले रडका आशू आला कि काय पदरात डोके लपवयला पण यश आलेला आहे. अरु ला आता शिक्षण जमत नाही आहे. अब्यास खूप अवघ ड जात आहे. वही पेन घेउन बसलेली आहे. और आगे तो शादी होनी है. हिला नापास व्हायची भीती वाटत आहे. यश रिवर्स पेप टॉक देत आहे. बाकावर बसले तिथपरेन्त ठीक आहे म्हणे. आधी विचार केला नव्हता का? त्यात सर्व अभ्यास इंग्रजीत आहे म्हणे. यश लगेच इंग्रजीत पीळ चालू करत आहे. आता इंग्रजीची शिकवणी लावा. नाहीतर आशू डार्लिग्न आहेच की इंग्रजी शिवायला. ह्यातच दहा मिनिटे गेलेली आहेत. पोलिटिकल सायन्स अवघ ड जात आहेत म्हणे. अगदी एक एक शब्द भाषांतर करत अभ्यास चालू झाला आहे.
हिला अंधेरी पूर्व मध्ये उमेदवारी द्यायला हवी होती सहानुभुती खातर.

मग एक कोणत्यातरी टावरचा शॉट. रस्ता. व देशमुखांचे घर. आजी फराळाच्या मागे आहे. अप्पा शब्दकोडे सोडवाअयचा प्रयत्न करत आहे पण विस्मरण चालू झाले आहे. लगेच इशा आलेली आहे. व फेक चीअर्फूल. त्रासदायक. भाई बहेन का प्यार का भांडण. चालू आहे. निव्वळ वेळ खाउ प्रकरण आहे. अवी स्टुपिड रिअ‍ॅक्षन देत आहे.

अभी आला व अनघाला कॉफी मागत आहे. सर्व डॉक्ट्र ची काय रिपोर्ट विचारतात. अन घा ऑल ओके सांगत आहे तर अभी ५० खोके काढतो.
अनघा नॉर्मल नाही. नाजुक आहे. अन्या येउन परत त्याची पट्टी मारतो. अनघा इशू दाबत आहे. स्फोट व्हायच्या आधीच परत फ्लाय ओव्हरचा स्वच्छ शॉट. बोरिवली छानच आहे.

कट टू आजी आशूला चहा आणून देते व अरु चे कौतूक चालू आहे. चाचू चा भतिजा अशेच टेपा लावत आहे. ह्याने आजी साठी ब्रेफा व लंच बनवले आहे. आजी डबा भरायला उठत आहे. मग लटके कौतूक परत. बेल वाजते. व अरु आलेली आहे व नित्या पण. आशू तेलकट दिसत आहे. हा पण घरी सुती टीशर्ट व शॉर्ट का नाही घालत सर्व मुंबई करां सारखे. म्हातारी रिअ‍ॅक्षन शॉट देत आहे वळकटी चेहर्‍या वरी. अरु लगेच
मदतीला पदर खोचुन जाते.

इकडे अभी अनघा क्रायसि स पुढील पाउल. अभी जास्त वाढवून सांगत आहे म्हणतो. ही का लपवते!!! अनघाला काही तरे आजार आहे हिमो ग्लोबिन वाढत नाही. ती खात नाही पोषण होत नाही व बाळ पण अंडर वेट आहे. ही आराम करत नाही खाfunction at() { [native code] }अ पीत नाही. हे चुकीचे आहे. तिला घरात बसून कंटाळा येतो. घरातील वातवरणाचा त्रास होउन ती बाहेर जात असते म्हणे. वेगळे राहायचे तर ती ऐकत नाही. खरे तर हिला स्वतःची काळजी का घेत नाही? तिशीची तर असेलच.
आजी लगेच मला तीन मुले झाली. हिचे वजन वाढले नाही तर बेडरेस्ट घ्यावी लागेल. सर्व सोस ते म्हणे. अगदी अरु सारखी आहे.
आजी संजना पण भांडत आहेत. अभी वर आरोप करत आहे. अन्या तिच्या रूम मधे टीव्ही लावुन देनार आहे. संजना रिअली केअर्स फॉर अनघा म्हणे. ती अभीला स्वच्छ सांगते. बेजबाबदार पणा कमी कर. अ भी उखडला आहे. अनघा रडायला लागली आहे. आजही मोठी कानातली घातली आहेत. ह्यांचे काही ध्ड जमत नाही आहे. अभी उखडून जातो व अनघा मोठ्याने रडत आहे. इब क्या होगा? म्हणजे सर्व भरलेल्या घरातही सुनेची ही अवस्था.

प्रोमो मध्ये अरु बाहेर गावी कामानि मित्त जाणार् आहे ते सांगायला आलेली आहे. पण घरच्यांना वाट्ते ती फराळ व इत र तयारी करायला आलेली आहे. संजना टोमणा मारतेच. अन्या छद्मी हसतो पेपर वाचताना.
अरु छान हसरी व उत्साही दिसत आहे.

मी तर गर्भारपण मस्त एंजॉय केलेलं नोकरी सोडून दिली. साधे पण मस्त जेवणे झोपा काढणे व संध्याका ळी ऐरोली ब्रिज वर फिरायला जाणे. हा तेव्हा बांधला जात होता.!!!! झाली पंचवीस वर्शे!!!! आई बरोबर होती हे त्यातही बेस्ट.

अनघाला स्वत:लाच लष्कराच्या भाकर्या भाजायला आवडतात. स्वत:ची आणि बाळाची काळजी राहिली बाजूलाच. आप्पांना चहा, आजीला पोहे, अभिला कॉफी, ईशाला अजून काहीतरी हे चालूच असतं. अभिचा बाकी आक्रस्ताळेपणा आणि समटाइम्स मुर्खपणा सोडला तर अनघा च्या बाबतीत त्याचं बर्याचदा बरोबर असतं.
इथे सगळे फक्त म्हणतात की आम्ही तिची काळजी घेऊ, पण तसं करताना कोणी दिसत नाही.
अरू आशुची लव स्टोरी पार शून्यात गेलेली दिसतेय. चालूच होईना.
आजी लगेच मला तीन मुले झाली. >>> जुन्या बायकांचं हे एक असतंच. आम्हाला झाली ३-४ पोरं, पण आम्ही नाही असली कौतुकं केली. आम्हाला नाही ब्वा अशी कंबरदुखी वगैरे झाली. एवढा पण त्रास सहन नको करायला या आजकालच्या पोरींना वगैरे वगैरे. Uhoh

आशुतोष झुरळाला प्रचंड घाबरणारा, रक्त पाहिलं की घेरी येणारा, आई नसण्याच्या शक्यतेने ओक्साबोक्शी रडणारा दाखवलाय. काल त्याच्या तोंडी - पुरुषाला सुद्धा रडावंसं वाटू़ शकतं. मर्द को भी दर्द टाइप वाक्य होतं. हे स्तुत्य आहे. पण त्याच्या एकंदरित व्यक्तिमत्वाशी ते मेळ खातं की नाही कळत नाही. म्हणजे कोणी सुरा उगारून आला तर त्याचा सामना करतो . अंगावर आलं तर अरे ला कारे करतो. हे दोन्ही एकत्र असू शकतं. पण तरीही एकंदर पात्रचित्र गोंधळलेलं वाटतं. वडील लवकर गेले (माणूस जाण्याचा अर्थ कळत नव्हता म्हणे) तर बिजिनेस एंपायर कोणी कधी उभं केलं?
तो पन्नाशीला आलेला न वाटता तिशीला येणारा कुकूनमध्ये जगलेला वाटतो. आपण एकटे असू हे पन्नाशीला पोचलेला माणूस स्वीकारून चुकलेला असतो.

आई जाण्याच्या भीतीने झालेला आउट बर्स्ट तिच्याशीच न होता नितीन किंवा अरुंधतीसमोर झाला असता तर जरा बरं दिसलं असतं.
स्पेशली करोनात लोकांनी इतके मृत्यू बघितले आहेत , तेही एकेका घराने एकापेक्षा जास्त की जवळच्या माणसाच्या मरणाच्या कल्पनेने कोणी इतकं धाय मोकलून रडेल हे मला स्वीकारायला जड गेलं.

अर्चना पाटकरांची संवादफेक विचित्र आहे. मोठी वाक्य भलतीकडेच तोडतात. सगळ्या भावना एकाच प्रकारे बोलून दाखवतात.

गौरी लवकर येणार म्हणून ईशाने डान्स करणं हे विचित्र आहे. खिचडीमधल्या हंसा आणि जयश्री संधी मिळेल तेव्हा गरबा खेळायच्या हे कधी खटकलं नाही. पण ही विचित्रच आहे.

संगीत शाळेत कोणीही कोणाच्या वर्गात कधीही घुसतं.

भरत.. Lol
काय निरीक्षणं! अगदी परफेक्ट!
करेक्ट आहे अगदी.
इशा ला तर गौरी आधी आवडायची नाही... आणि आता ती येणार म्हणून नाच? हिला काही कामं, अभ्यास नाही का?
आणि ती यश चे फोन्स का नाही घेते म्हणे..? उग्गीच आपला काहीतरी सस्पेंस!
त्या संगीत शाळेचा सेट छान आहे मात्र.

फारच पाणी घालून मालिका वाढवणे सुरू च आहे. पाऊस काही जात नाहीये ना लवकर ते यांच्या पथ्यावर पडतं.

अन्याचा लोन घेऊन बिझनेसवाला भाग हास्यास्पद होता, पारच माकड करून ठेवलाय त्याला आणि अरु बाईंना भगवान. आई भयानक लार्जर दॅन लाइफ झालीये आता,, अति झालं टाईप‌.

आशुतोष झुरळाला प्रचंड घाबरणारा, रक्त पाहिलं की घेरी येणारा, आई नसण्याच्या शक्यतेने ओक्साबोक्शी रडणारा दाखवलाय. काल त्याच्या तोंडी - पुरुषाला सुद्धा रडावंसं वाटू़ शकतं. मर्द को भी दर्द टाइप वाक्य होतं. हे स्तुत्य आहे. पण त्याच्या एकंदरित व्यक्तिमत्वाशी ते मेळ खातं की नाही कळत नाही. म्हणजे कोणी सुरा उगारून आला तर त्याचा सामना करतो . अंगावर आलं तर अरे ला कारे करतो. हे दोन्ही एकत्र असू शकतं. पण तरीही एकंदर पात्रचित्र गोंधळलेलं वाटतं. वडील लवकर गेले (माणूस जाण्याचा अर्थ कळत नव्हता म्हणे) तर बिजिनेस एंपायर कोणी कधी उभं केलं?
तो पन्नाशीला आलेला न वाटता तिशीला येणारा कुकूनमध्ये जगलेला वाटतो. आपण एकटे असू हे पन्नाशीला पोचलेला माणूस स्वीकारून चुकलेला असतो. >>>>>> + १११. खुप कन्फ्युझिंग पात्र आहे ते. हींदीतला ची सर याला दूर दूर पर्यंत नाही. पूर्वीची जी अरू होती तीचं पुरुष वर्जन आहे असं वाटेल एवढा मेंगळट दाखवताय.

आणि आता अनघाची तब्येत अशी असताना यानी कधीचे विमलला का बरे बंद केलेय?? मी असती तर आधी बाई लावली असती आणि मग फॅमिली प्लॅनिंग Lol . यांचं सगळंच विचित्र आहे बाई. उगीच आपले बिनकामाचे नवे पात्र घुसडलेत आणि कामाची बाई बंद. अन्याय है यह!

अनघा घराबाहेर उभीराहुन कोणाला तरी फोन करत आहे पण फोन उचलत नाही. इशाने चहा बनवला आहे चक्क. व सर्वांना चहा प्यायला बोलवत आहे. इशा चौकशा करत आहे. अभी फोन उचलत नाही आहे. म्हणून ती टेन्स आहे. ती बोलुन गेली पण त्यामुळे त्याने दूर घराबाहेर राहायला नको.
त ही कन्फ्युज झाली आहे. इशा एकदम ज्ञान झाडत आहे. स्टे हॅपी वगिअरे. हिला माहेरी जावे वाटत आहे. इशाने कणकीची बिस्किटे पण आणलेली आहे. आता इशा फराळाचे कर णार आहे.

मग लगेच रस्त्याचा शॉट. अरु बाई चस्मा लाउन अभ्यास करत आहेत. नित्या व राजपुत्र आलेला आहे. हे दिवाळीचे आवतण घेउन आले आहेत. कारण अरुची पहिली एकटीची दिवाळी नको म्हणून. सुचा अल्बम मधील गाण्यांची टूर आहे. दिवाळी पहाट टाइप असावे. इर्शाद इर्शाद.
लाइव्ह गायचे आहे. राजपुत्र काही जाणा र नाही कारण कामे आहेत.

यश काहीतरी संगीत बसवायचे काम करत आहे. हे जिन्यावरुन डबे हळू हळू पडल्यासारखे संगीत आहे. व काहीतरी भावु क शब्द आहेत ह्यांच्या इतर गाण्यात असतात तसे. ड्रम फाटल्या सारखे वाजत आहे. पियानो वाल्याने युफोरिया लिहिलेला शर्ट घातला आहे. अनीश गात आहे.
हे पब्लिक डिनर ला चालले आहे पण यश अनीस जात नाहीत. अनीश पॉजिटिव्ह बोलत आहे. आपण्च गाणे चांगले झाले आहे म्हणत आहेत.
यश खुष आहे कारन गौरी येत आहे. वाकड तोंड बघुन खूप दिवस आहे. अनीशची पण गर्ल्फ्रेंड होती. डान्सर. ह्याला पण ट्रेडिशनल ड्रेस वाली मुलगी आव्डते. दोन वर्शे डेटिन्ग चालू होते

इकडे आशू अरु च्या तोंडा कडे बघत आहे. अरु दौर्याच्या कल्पनेने भंजाळलेली आहे. आशू समजावुन सांगत आहे. पुस्तक वाचल्या सारखे.
हिला अजुनही लोकांच्या समोर गायचे दडपण येते!!! लगेच आशू सम जावायच्या मोड मध्ये. पन ड्युएट अल्बम ही एकटीच कसे गाणार
अनीशच्या लव्ह लाइफचा आढावा घेत आहे यश. आशू मधूनच पहिलीतल्या मुलासा रखे हसून दाखवतो. इतकेच अ‍ॅक्टिन्ग.

मग रस्त्याचा शॉट व अन्या संजना भांडण चालू आहे. नेहमीचेच इशू. अन्या मी मी संजना मी मी

प्रोमो मध्ये अरु सासूला मी दौर्‍यावर जाणार हे सांगायला येते. खरे तर समजुतदार पणा भूमिका घेउन आशूव कंपनी आई सुद्धा तिला आपल्या इच्छे नुसारच वागायला लावत आहेत. खरेतर दिवाळी हा सुट्टी एंजो य करायचा, फॅमिली बरोबर वेळ घाल वायचा कुठे तरी फिरायला जायचा सीझन. मुंबईत तसे सुद्धा पर्सनल वेळ कमी मिळतो. पण इथे हे तिला आधी न विचारता म्हणजे तुझ्या डेट्स फ्री आहेत का हे. तिला पाठवत आहेत. म्हणजे हिला टी शर्ट शॉर्ट घालुन तो घरात सोफा आहे त्यावर लवंडून गेम पण खेळता येइल काय ते तळणी मळणी तुम्ही बघा. काय ते आईची काळजी तुम्ही बघा. भाउ भाउबिजेला येइल तेव्हा आई डबा पाठवेल च. तो परेन्त स्विगी व विकतचा फराळ झिंदा बाद. असे ही करता येइल् किंवा काय तिच्या मनात असेल ते. म्हणजे तिची फ्री विल हा कन्सेप्टच नाही आहे. सुटकेचा मार्ग पण जास्त्च बिकट आहे कारण अन्या मर्दानगी तरी दाखव्तो. इथे हे भिजकट पोर पदरात काही नाही तर हसून दाखवते. येडं.

सुटकेचा मार्ग पण जास्त्च बिकट आहे कारण अन्या मर्दानगी तरी दाखव्तो. इथे हे भिजकट पोर पदरात काही नाही तर हसून दाखवते. येडं. >>>>>> अगदी पटलं.

काही नाही मधुराणीला सुट्टी हवी असणार म्हणून गायब करतायत.

आशुतोषने काँट्रॅक्ट लिहून घेतले की काय आम्ही ठरवू तिथे, ठरवू तेव्हा तुला गायला जायला लागेल? की त्यालाच मॅनेजर नेमलेय?

अमांची शेवटची तीन वाक्य चपखल आहेत.

धन्यवाद भरत, त्या आधीची तीन वाक्ये म्हणजे माझा दिवाळीचा प्रोग्राम आहे. नो कुकिन्ग नो क्लीनिन्ग मुलीला काही शॉपिन्ग असेल तर ते करव णार नाही तर गेम इवेंट असतो तो खेळ णार. थोडक्यात सजावट व पूजा. नोवेंबर मध्ये घर सफाईला अर्बन कंपनी वरुन बोलवणार आहे. आत्ता त्यांच्या टीम्स खूप बिझी असती ल व नोव्हेम्,बर मध्ये कमी धंदा असेल त्यामुले उत्साहाने करतील असे वाट्ते.

अरुचे राहणे खरे खरे एकटे राहणी नाही. म्हणून मला सारखे टोचत राहते.

आशुतोष अरुंधती घ्या घरात शिरल्यावर म्हणतो, उशिरा आणि न सांगता आलो.
खरं तर तो ज्या दिवशी तिच्याकडे जाणार नसेल त्या दिवशी तिला कळवावं.

शुभ प्रभातः अनघा अरे नको नको मी चहा घेतला असता. तर इशा चहा देते. अप्पांना विस्मरण होते. आजी संजनाला घर साफ सफाई कर म्हणून
सुट्टी घे असे जबरदस्ती म्हणते. अन्या लगेच टोमणा मारतो. ही इतक्या मोठ्या पोस्ट वर काम करते तितक्यात अरु येते इथे हिला सर्व सांगायला यायचे काय गरज आहे!! रिपोर्टिन्ग!!! टु एक्स फॅमिलि. संजना खूप नगाला नग आहे म्हण्ते. अरु बाहेर गावी जायचे सांगायला आलेली आहे.

अन्या लगेच अजू न टोमणे मारत आहे. सुचा महारा श्ट्र दौरा आहे. की लगेच अपेक्षित प्रतिक्रिया येत आहेत. अर एकटीच जाईल. तरी ही आजच्या दिवसात काई मदत करणार आहे. अन्या म्हण तो आपल्याला उपकार नकोत. फराळ बाहेरुन आणू. तुमच्या अपेक्षाच चुकीच्या आहेत म्हणू अरु म्हणते बाणेदार पणे. मग आली कशाला. मेसेज केला असता तरी झाले असते. उगीच डायलॉग बाजी. आज रात्री पासून दौरा आहे.

गौरी आली की यश फोन करायचे ठरवतो. आता खळी सेटिन्ग बरोबर झाले आहे. स्वतंत्र स्त्रीची खळी. ह्या ऑपरेशन ला कोणी पैसे दिले बाई. नव्या बॉफ्रे ने का. तरी ही संस्कारी असल्याने आई अप्पाला नमस्कार करते. आजी ही गाय मदतीला नाही म्हणून रुसलेलीच आहे. इशा आता तिच्या कॉले जची काळजी करत आहे.

संजना चा ब्लाउज भलताच बॅकलेस आहे. पार केस संपतील तिथपरेन्त बॅक लेस.

इकडे रस्त्याचा शॉट संपल्यावर आशू नित्या टूर प्लानिन्ग करत आहे. आशूला भावना लपवणे जड जात आहे. ती अजून हो म्हटली नाही म्हणजे नाहीच ना. तिच्यासाठी गाडी हॉटेल फिक्स करत आहेत.

इकडे संजना इशाच्या खोलीत झोपलेली आहे. आजी अन्याला बाहेर झोपायला सांग णार म्हणे. संजनाच्या डोक्यात सेपरेशनचेच विचार आहेत.
तिला आता बेडरुम मधे बॅड व्हाइब्ज येतात म्हणे. आजीला अजुन अरु परत येइल असे वाटत आहे. पण अरू दूर गेलेली आहे. आजी आढा वा घेत आहे. आता सोडून जाउ नकोस अन्या निराधार होईल म्हणे. मग अरु ला हा चॉइस नव्हे काय. म्हातारे कुठे जातो समजुत दार पणा सुने चा विचार कर्ताना!! आं
लगे च सासु सून घट्ट मिठी व अश्रुपात. मेकप वाहो वाहो चालला..... मला हे घट्ट मिठी कल्चर कसेतरीच होते. आजी ह्या पाखराला पिंजर्‍यात च बांधून घालणार. तिच्या पीएफ वर नाव घालुन घेणार.

लगेच रस्त्याचा शॉट. व इशा व सर्व तयारी करत आहे. अभीला सुट्टी नाही म्हणे. अनघा चकली भाजणी भाजण्यापासून करनार आहे. विमलचे नाव काढल्यावर ती आलेली आहे. हिची आई बरोबर नाही म्हणे. अरु ने मदत केलेली आहे. संजना चित्कारते. अन्या फोन करुन ठेवतो त्याचे जागेचे काम झाले आहे म्हणे. अन्याने डिपॉझिट व भाडे भरले आहे. संजना लगेच हिशेब काढते. राजा भिकारी. पण हा डिवोर्स वर फिक्सेटेड आहेच.
परत हे भांडण चालू झाले. सर्व वैतागले आहेत. अन्या फॉल्स ओव्हर कॉन्फिंडंट आहे. इशा सपोर्ट करते.

पुढील भागाfunction at() { [native code] }अ संजना सर्वांना गिफ्ट देत थेंक्स गिविन्ग मोड मध्ये. अन्याला गिफ्ट देते ती तो घेउन फेकुन देतो. काय आडूक तोंडले आहे.

संजनाने डिव्होर्स पेपर्स साइन केले ते दाखवलं होतं का? मागे अप्पा कांचनला ती म्हणाली होती, की असलं वागणं कुठवर सहन करणार. तेव्हा डिव्होर्सचं सुतोवाच केलं होतं. काल अनिरुद्ध संजना संवादात तिने पेपर्स साइन केल्याचा स्पष्ट उल्लेख आला. उद्या यश गौरीचं लग्न झालं की गौरी इकडे आणि संजना तिकडे असं करतील की यशला अमीर खानकडून प्रेरणा घेत घरजावई करून घेतील.

अरुंधतीचं कॉलेज मस्तच आहे. आठवड्यातून तीन दिवस जायचं. त्याने ७५ % हजेरी लागते. आजकाल प्रॉक्सी लावत नाहीत का? आमच्या वर्गाला दोन दारं होती , एक पुढे - फळ्याच्या बाजूला. एक मागे. काही मुलं चालू तासालाही मागच्या मागे निघून जात. तसंच आमच्या कडे हजेरी फक्त पहिल्या तासाला. तेच शेजारच्या पार्ले (आता साठ्ये) कॉलेजला दर तासाला.

शुभ प्रभातः अनघा डू गुडर मोड व इशा कपडे पुस्तके डोनेट करत आहेत. आधी ठाण्याला जाउन तिथे डोने शन करून मग पनवेल आश्रमात जाउन तिथे आकाश कंदील घेणार म्हणे जांभळी नाका ऐकला नाही का ह्या लोक्स नी. इशाला साहिलचा फोटो दिसतो व ती रडू लाग ते की अनघा सांत्वन मोड मध्ये आहे. अवी संजना यश पण कपडे आणू न टाकत आहेत. इशा यश चे नाटक करत आहे गौरी गौरी ड्रामा करत आहेत. लग्नाची घाई पडली आहे.

विमल भाजणी भाजत आहे अनघा वा वा करत आहे. तेच केस सोडुन व ओढणी फलकारे. विमल लगेच आईंच्या हातचे भाजणी वडे ह्याची आठवण काढते. अप्पाला डिमेन्शिआ होतो आहे हे अनघा म्हणत आहे. ते मागून म्हातारी ऐकते. व रडायला लाग ते अप्पा प्रोग्रेसिन्ग क्वायट फास्ट इन टू डिमेन्शिआ. लगेच कोपर्‍यावरच्या मारुतीला नवस. इकडे भाजणी जळत आहे. आजीला किचन भाएर घालवतात.

रस्त्याचा शॉट.

मग संजना दिवाळी गिफ्ट वाटप. अन्या टोमणे मारत आहे. तिला फक्त आनंद शेअर करायचा आहे. पण अन्या तिला शो ऑफ करायचा आहे
म्हणतो. बाकीचे लोक्स गहिवरत आनंदत आहेत. यश पण तिला आधार देणार आहे. अविनाश भावा सारखा आहे. गौरीला नीट बघ म्हणते. पण ती तर पळून गेलीली आहे. अनघा बद्दल पण चार शब्द कौतुकाचे प्रेमाचे संजना आभार प्रदर्शन मोड मध्ये आहे जे फार दिखाउ वाटत आहे खरेच.
अनघा लगेच वाकून नमस्कार करायला बघत आहे. तिला थांबवते.

कांचन पण गिफ्ट मागत आहे. संजनाचे कानातले नक्की बघा बारकी पक्षांची पिल्ले व खाली झुमके . इतके मोठे आहे की कानातून ब्रेन ओघळून जात असेल. पण आई अप्पांना गिफ्ट देउन नमस्कार करत आहे. समेट झालाच की. अन्याला पण गिफ्ट देउ बघत आहे. तो ती फेकतो
बघि तले तर दारात केदार व त्याची बायको आले आहेत. केदार जरा भांबावलेला दिसत आहे. का बरे. ह्याचे पण लफडे उजेडात आले का. हा आजारी किम्वा जखमी वाटत आहे. काय प्रोब्लेम आहे. ही दिवाळीचा फराळ करणार नाही आहे. तो ही बिझी आहे. यश बाहेर निघाला आहे.
अरे परत रस्त्याचा शॉट. व परत ह्याच घरचे शॉट.

यश ला केदार बाहेर बोलतो व जरा डेस्परेट दिसत आहे. ह्याम्ना पैशाची गरज आहे. ह्याची दाढी वाढली आहे. अकाउंट सील झाले आहे कार्ड ब्लॉक झाले आहे. हा धड काही बोलत नाही आहे. काही कॅश हवी आहे. हे काय लफडे!!! यश बिचारा १८०० रु देतो. व अजून हवे तर
एटीएम मध्ये जाउ म्हण तो व कोणाला सांगू नको म्हणतो. हा अकाउंत डीटेल मागत आहे. हे जरा संशयास्पद आहे. यश चक्रावला आहे.

प्रोमो मध्ये संजना व विशाखा किचन मध्ये. संजना नेहमी पर्माणे संसाराचे ज्ञान देत आहे . अनुभव दांडगा आहे ना. तर विशाखा रडायला लागते. व यश ला आशूचा फोन येतो की केदार त्याच्या बरोबर गाडीत आहे१!!

अमा भारी लिहिलंय
ते कामोठे नाहीतर खारघर ला राहत असावेत म्हणून पनवेल ला जाऊन येणार असतील...

ते कामोठे नाहीतर खारघर ला राहत असावेत म्हणून पनवेल ला जाऊन येणार असतील...>> बोरि वलीत राहतात असे दाखवले आहे. तिथोन ठाण्यास जाणार ते ही हेवी कपड्यांची बोचकी घेउन. मग तिथले काम करुन पुढे पनवेल आश्रम. तिथून आकाश कंदील !! जो यश घरी बनवणार असे आधी एका भागात बोलुन झाले आहे. लेखिका मस्त गांजा मारुन असते.

Pages