आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिशला पुन्हा देशमुखांकडे आणायचं म्हणून नितीनच्या मुलाला जिन्यावर पाडलं.
नितीनची फॅमिली प्रॉपसारखी वापरतात. आणि तो पडल्याची बातमी ऐकून अनिरुद्धला हसू येतं?
नाचताना सगळ्यात जास्त overacting अभिषेक आणि कांचन करत होते. आज अभिषेकला गर्दीचा त्रास नाही झाला?
पुढच्या भागात अनिशच्या डोळ्यांवर टिपरी बसणं सो टिपिकल.
खरं तर त्याच्या इशारा भेटण्याचे अनिरुद्ध तिला त्रास देतो म्हणून त्याने इथे यायला नको. कॉमन सेन्स .तर हा रोजच यायला लागला.

अनिश म्हणे की नितीन काही सारखा आशुतोषबरोबर नसतो , त्याला त्याची फॅमिली आहे, त्यामुळे आशुतोष एकटा पडतो. खरं तर नितीन बायकोच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करून त्याचा जिथे संबंध नाही त्या म्युझिक लॉंंंचमध्ये बिझी होता.
रतन टाटांनी लग्न न करता बिझिनेस एंपायर वाढवलं पण असली कौतुकं केली नसतील.

आशुतोषला अनिश कोण हे माहीतही नव्हतं, तो लाडका पुतण्या झाला. आता काकापुतण्या अनुक्रमे मायलेकीशी लग्न करतील आणि मायलेकी सासूसून होतील.

भोंडल्याचा एपिसोड मायबोली वाचून लिहिल्यासारखा वाटला.
अरुंधतीचा स्टॉकहोम सिंड्रोम पुन्हा अधोरेखित झाला.
घटस्थापनेची तयारी करायला माजी सुनेला बोलवायचं आणि निरोप देताना तोंडभरून अपमान करायचा. दुसऱ्या कोणी म्हातारीच्या डोक्यावर घट फोडले असते.

अरुच्या घरी कॉलेजला सोडायला म्हणून सकाळी येतात तेव्हा आशुबाळाचा हात एकदम बरा दाखवला
आई आली म्हणून बहूतेक Lol

संजना आता सगळ्याच कार्यक्रमात सहभागी होते नटून थटून..
काही.....
आणि अरुचं जास्तीच कौतुक सुरु आहे.... खरेच तिने इशाचे कॉलेज सोडून दुसरीकडे घ्यायला काय हरकत होती?

मग माझी आई माझ्याच महाविद्यालयात वरून इशा फुटेज कशी खाणार? इशाला त्रास देणाऱ्या मुलावर तिची नजर कशी पडणार? ती त्याला अद्दल कशी घडवणार?
आता अशूने सुद्धा कुठलीतरी अपूर्ण राहीलेली ईच्छा शोधून त्याच महाविद्यालयात दाखल व्हावे. अरू बरोबर कॅालेज-कॅालेज खेळावे.

अरुंधती कॉलेजमध्ये येतेय म्हणून पायघड्या अंथरायच्या आणि तोरणं लावायची राहिली.
वर्गातली मुलंमुली म्हणून बसवलेले एक्स्ट्राज अगदीच रस्त्यावरून धरून आणले होते.
शिक्षक वर्गात आल्यावर कॉलेजची पोरं उभं राहून गुडमॉर्निंग करतात?

Happy भरत..

ते एक्स्ट्राज अगदीच बेकार होते..लहान मोठे..एकाच वयाचेही नाहीत!
आणि आता ऑनलाईन च्या जमान्यात तरी अरुने..... डिस्टंस एज्युकेशन करायला काय हरकत आहे? कॉलेज मधे जाऊनच काय शिकायचे..... ?
रेग्युलर स्टुडंटस च तर लेक्चर्स अटेंड करत नाहीत! अविनाश हल्ली अगदीच रिडंडंट वाटतो..त्याला कुठे पाठवून द्या काही दिवस!

अविनाश हल्ली अगदीच रिडंडंट वाटतो..त्याला कुठे पाठवून द्या काही दिवस! >>>>>>हातात दुसरा प्रोजेक्ट नसेल बहुदा

कॉलेज मध्ये गेल्यावर पहिल्याच दिवशी पावलं दुखली. त्या बाकांवर बसून खरं तर कंबर दुखायला हवी. पण मुलाने आईचे पाय चेपण्याचा सीन कसा येणार?

गौरी गेली की काय सिरियल सोडून? एवढं आभारप्रदर्शन वगैरे केलं ते.
आता सुलेखाबाई हॉस्पिटलमधे. ह्यांना सतत कोणीतरी पेशंट लागतोच स्टोरी पुढे न ढकलता तिथेच फिरवायला. आता त्या अरूकडून वचन वगैरे घेतील माझ्या आशुबाळाला सांभाळ वगैरे वगैरे. स्वत:हून तर यांची लव स्टोरी पुढे सरकेना. दुसर् यांनाच कष्ट घ्यावे लागतात.
या सिरियल मुळे "वगैरे" शब्द जास्तच आवडायला लागलाय. Happy कारण सगळं वगैरे वगैरेच चालू आहे. महत्वाचं असं काहीच नाही.

संगीतशाळेत विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक आणि कर्मचारी जास्त आहेत.
दोन विद्यार्थ्यांची एक बॅच.
पहिली बॅच फुल झाल्याची बातमी यांनी एकमेकांना सांगितली होती त्याची ग़ंमत आता कळली.
आता हे लोक उठसूट गाणी म्हणू लागलेत.

संगीत शाळा बरीच expensive दिसते!!. फक्त दोन विद्यार्थी पर बॅच म्हणजे!
मला वाटलं..हे घाऊक मध्ये संगीत शिकवून " घरोघरच्या बेब्यांना लता मंगेशकर करून सोडणार..."

लता म़ंगेशकर नको, पण सूर ताल , राग कळले तरी पुरे.
फक्त दोघांना शिकवायचं म्हणजे केवढ्याला पडेल ते? आणि वादक सुद्धा जोडीला.

नील कामतला फक्त ईशाने अनिशशी नीट बोलायला लागावं म्हणून आणलं.

अमा हल्ली अपडेट लिहीत नाहीत. कंटाळल्या का?

आता त्या अरूकडून वचन वगैरे घेतील माझ्या आशुबाळाला सांभाळ वगैरे वगैरे.>> अगदी.
गौरी आता काही परत येणार नाही वाटते. मग यश निराशेत, प्रेमावरचा विश्वास उडाला, जगू वाटत नाही करत मालिकेचे बरेच भाग खाईल.

२च विक चालली आहे तर केवढा ड्रामा, गौरीच ड्रेसिन्ग सुधारलय जरा.
त्या सन्गित विद्द्यालयातल अरुच भाषण किती पिळ मारणार होत, 'ए बाई शिकव आता !लेक्चर पुरे 'म्हणावस वाटेल कुणालाही .
त्यातही तिच्या नेहमिच्या आवाजापेक्षा नाटकी असा हळुवार आवाज लावायचा प्रयत्न अजुनच इरीटेटिन्ग वाटत होता.
अन्याच नॉर्मल बोलण सुद्धा शिरा ताणुनच असत त्याला स्क्रिनवर बघावस सुद्धा वाटत नाही. त्यामानाने हिन्दीतला अन्या बरा आहे.
गाण चालू असताना आशु अरुकडे प्रेमाने बघण्याचा प्रयत्न करतोय आणी फ्रेममधे अरुच्या तोन्डावर सद्गगदित भाव आहेत. धन्य ते प्रेम

हिंदीतला अन्या फार हँडसम होता आधी. दूरदर्शनवर दिशा सिरियल लागायची ती मी फक्त याच्यासाठी बघायचे. आणि बँड ऑफ बॉइज ची गाणी पण. (तू ही मेरा प्यार गोरी)

हाय आहे ना. पण सध्या काही घडतच नाही. बोअर झाले. अरु चे कौतूक माझ्या क्षमतेच्या पलीकडे गेले आहे. तिकडे अनुपमा पण डोक्यातच जाते.
आता अभी बेल वाजवतो तर आशू दार उघडतो. व म्हणतो मी झोपलो होतो. की ह्याचा पापड मोडलाच. ह्यांनी खरेतर एकमेकांची लफडी रेगुलराइज करुन टाकावीत.

संजणा ने घटस्फोट दिला. इतकेच होते तर अरुचा व्यवस्थित संसार का मोडला हिने अशी कळकळ वाटली. असतात अश्या बायका समाजात.

आज सासु आजारी तर अरु च्या कॉलेजला सुट्टी लगेच. व आशू आईबरोबर महिना भर घरी राहणार आहे. नित्या ने ऑफिस चाटून पुसून साफ केले तरी ह्याला कळणार नाही. काय ते बाळ परवा तर बिचारे रडतच होते.

अभी बेल वाजवतो तर आशू दार उघडतो. व म्हणतो मी झोपलो होतो. की ह्याचा पापड मोडलाच. >>प्रोमोत तो लगेच अन्याला चुगली करताना दाखवलाय. अगदी पार्कमधे बाकड्यावर बसून ते दोघे चर्चा करत होते. अरू पुन्हा अभिच्या कानाखाली देणार वाटते.
नित्या ने ऑफिस चाटून पुसून साफ केले तरी ह्याला कळणार नाही.>>> हो. पण नित्यानेच कमावले ना सगळे. हा भारतात आल्यापासून अरूचीच कामे करतोय.

यांनी २४+ तास हॉस्पिटलात थांबलेला माणूस कधी पाहिला नाहीए.
आशुबाळ नुकताच अंघोळ करून , इस्त्रीचे कपडे घालून आलेला दिसतोय.

अरुंधतीचं घोडं अजूनही मैत्रीवरच थांबलंय. ते पुढे ढकलायला अप्पांना आजारी पडावं लागेल का?

अरु काय सर्व गुण संपन्न आहे का? काहीच दोष नाही तिच्यात?
राग, चिडचिड , विंधळेपणा , चुका..काहीच होत नाहीत तिच्या हातून?

आज नेमके आशू अरुच्या घरी झोपलेला व अभी पिशवी द्यायला गेला.!! संशय कल्लोळ. व दोन दुखी आत्मे बेंच वर बसून आपली भडास काढून घेतात. मग अरु खोलीत आजीला खिचडी सूप घेउन येते. लगेच आजी घरी पण आली. आरुने गीझर लावुन ठेवला आहे. व आल्याचा चहा
करणार आहे. आपला घटस्फोट करुन अन्या आता अभी समोर अरुची निंदा करत आहे. अभी फारच भडकला आहे. आई अगदी पापी कुलटा आहे अश्या आविर्भावात अभी बोलत आहे. हाउ जजमेंटल. ह्याला आईच्या पासून फार दूर जायचे आहे.

इकडे भावी सासूचे कौतूक चालू आहे. हार्ट पेशंट. नित्या पण कडमडला आहे. त्या पोर ग्याने नारळ पाणी आणले आहे. व एक वेलकम गिफ्ट आहे. नित्या अरु एक एक मिनिटा ने प्रतिसाद देत आहे. अनिशने छान पैकी केअर पॅकेजच आणले आहे. फुले पेन ड्राइव्ह. डायरी, जोक्स चे पुस्तक. अरु तिला लिहायला सांगत आहे. आत्म चरित्र!!! आजी आढे वेढे घेत आहे. अरु प्रेमाची वेटोळी सोडून आशू व आईला बांधून घालत आहे. अषीच सून हवी गं बाई माझ्या लेकराला असे आजीस वाटेल. आजी आली की अरुने औक्षण केले आशू व आजीचे.
गोड प्रकरण चालू आहे. अरु चे कॉलेज बुडले का असे आजी विचारत आहे. पण हिला तीन दिवस च कॉलेजात जायचे आहे.

पुढील भागात यश गौरीचे काही लफडे आहे. कोणीतरी घर सोडून गेले आहे.

अनु पमा मध्ये बायकांची होटेल ट्रिप आहे. तिथेच अनुप्पम्मा ची मुलगी बॉफ्रे बरोबर लफडी करत अस्ताना साप डते. हे स्टार प्लस चे बायका व पुरुषे एक विचित्र पद्धतीचे इंग्रजी हिंदी बोलत असतात. बायकांची कचकच चालू आहे. इन सफरेबल.

काय हे लोक टीपी करुन राहिलेत. अर्धा वेळ कांचनाज्जी अनघाला मोजे विणायला शिकवते. संजना घरुन काम करणार आहे. कारण तिची केबिन तयार होते आहे. मग इशा अनीश व अनीश तिच्याकडून सॉरी म्हणवून घेतो. मग यश व मित्र काही आदळ आपट करतात ते त्याला गौरीला ऐकवायचे असते पण ती फोन उचलत नाही. त्यामुळे तो टेन्शन मध्ये येत आहे.

मग यश कॉलेजात आई बरोबर येतो आईला प्रिन्सिपलने बोलवून घेतले आहे. फंक्षनचे प्लानिन्ग आहे म्हणे. अनीश एक गाणे म्हणतो. दोन तीन मिनिटे त्यात. मग मॅमचे कौतूक मॅम ने अनीशचे कौतूक वगैरे. मग इशा येते व परत भांडायला लागल्ते तिला परत पाठवतात. अनीश महा गणपतीम गाणे म्हणतो व त्याला बंदीश म्हणतो.

इकडे आईचा व्यायाम चालू आहे. आई वेगळ्या टेंजन्ट वर जात आहे. वीणा ला शोधू म्हणते. तिचा जीव वीणा साठी तुटत आहे. आता आशू बहिणीला शोधायच्या कामावर आहे. अनीश येउन कॉफीचे विचारत आहे. हा लगेच जीवनाची फिलॉ सॉफी झाडत आहे. दुसर्‍याच मॅम चे गाणे
चालू आहे.

काल इला भाटेंनी त्यांचा नेहमीचा सूर लावला होता. गोग्गोड. या मालिकेत अजूनपर्यंत लावला नव्हता.
अरुंधतीला एकेक करून सगळ्यांनी लग्नाबद्दल सा़गून झालं. तर हिचं मैं ससुराल नहीं जाउंगी किंवा हादग्यात असंच एक असतं ते गाणं चालू आहे.
फरक इतकाच की इथे होणाऱ्या नवऱ्यानेसुद््धा सांगून झाल़ंय.
सुलेखा समोर तर अगदीच वेड पांघरून मैत्रीच्या पेडगावला गेली.

मी हिंदीतल्या एकच भाग पाहिला होता, त्यात कांचन आशुतोषला अरुंधती घ्या मा़ंगमध्ये सिंदूर भर असं बहुतेक ऐन दिवाळीत चॅलेंज करते, तसंच इथे होईल का?

कॉलेज मस्त आहे. आठवड्यात तीनच दिवस हजेरी पुरेल. उरलेल्या तीन दिवसांत शिकविलेलं ही कधी करेल?
इतकं करूनही ती युनिव्हर्सिटीत गोल्ड मेडल घेईल.

यशसाठी जबरदस्ती इश्यूज निर्माण करताहेत. गौरीची परतणं लांबवतील.

पण गौरी अशी कशी गेली. गोड गोड बोलत आलेच म्हणून अमेरिकेला पळून गेली. संबंध तोडण्याची फारच चुकीची पद्धत आहे. मग तो रडारड, त्रागा, डिप्रेशन करत किती त्रास देईल सगळ्यांना!
कांचन आशुतोषला अरुंधती घ्या मा़ंगमध्ये सिंदूर भर असं >>> तसेच होईल वाटते. अन्या-अभ्या आता कांचनचे कान भरतील. मग ती दुसरे काय करणार!

आता एक म्हण जे अप्पाला डिमेन्शि आ होत आहे असे एस्टाब्लिश करत आहेत. काही आठवत नाही. अनघा चे आई बाबा आलेले आहेत. व गोड गो ड बोलणे चालू आहे. आजी त्यांच्या समोर पोहे करायला उठते मग अनघा त्यांना बसा म्हणते. गाडी तून भर्पूर सामान आले आहे.

इकडे अरु व त्या बाई संगीत शाळेत बोलत आहेत. त्या बाई त्यांची स्टोरी सांगत आहेत. जरा बागबान टाइप स्टोरी घेतली आहे. मग ही बाई पण आशूच्या लग्नाचा प्लग मारते.

गायन क्लासाचे फूटेज. एका बाईला घरात रियाज करायला जागा नाही व वेळ नाही. स्वयंपाक करताना गुणगु णले तरी चालते. तर ती मुलगी मला हसतील म्हणते. लगेच अरु सुविचार फेकते. काय होलिअर दॅन दाउ विचार व व्यक्तिरेखा.

प्रोमोत दोन सासवांचे द्वंद्व!! कांचन वर्सेस सुलेखा. अरु वरून.

इक डे श्रीमंत आई( जरीची साडी/ दोन मंगळ सुत्रे) व अनघा ह्यांचा पोहे करता करता संवाद चालू आहे. ताईचे कौतूक. अनघा समोर ओढणी लांबकेस अशी किचन मध्ये आहे. ते पोहे जळतील नक्की. ही अभीचा काय प्रोब्लेम आहे ते विचारते. पण संजना येउन लगेच तोंडपाटीलकी चालू करत आहे. अनघा आईला आवरते घे अशी खूण करते.

लगेच कट टू संगीत क्लास टाइम पास विद्यार्थ्यांचे आलाप गिरवणे तिकडेअनीश दारात येउन मॅमचे कौतूक करायला हातात आरती घेउन उभा आहे. त्याला आशूने अरु ला काही मदत हवी का ते बघायला सांगितले आहे म्हणे. फिर खुद आना था!! एका विद्यार्थ्याच्या मुलाला गिटार शिकायचे आहे म्हणे. त्याचे बोलणे होते.

संजना लगेच ऑफिसला जायला निघते. तर श्रिमंत बाई तिला साडी गिफ्ट देते. हे दर वेळी!!! ते ही कोकणातले सासरचे. कांचन सासर्‍याला साड्यांच्या दुकानाचे विचारते. हिला दुकानात बसायचे आहे व साड्या विकायच्या आहेत. सासरा लगेच तिच्यावर दुकानाची जबाबदारी टाकतो व बदल्यात हव्या तितक्या साड्या म्हणे. आप्पा लगेच मला सा ड्या ठेवायला खोली बांधायला लाअगेल असा पॅट्रारकी जोक मारतो. हे डोहाळजेवनाला भेटणार म्हणे. सासू जाव याला अंघाला बाळंत पणाला माहेरी पाठवा म्हण तो. सासरा अन्या कुठे आहे विचारतो. तो सकाळीच बाहेर गेला आहे म्हणे. आता हे पब्लिक अरु ला भेटून शुभेच्छा व साडी देणार आहे. चिकट गूळ नमस्कार नाटक झाले.

शुभ प्रभात व शुभ शनिवार
अर्धा वेळ आजोबा विस्मरण युक्त. मग संजना येते व अन्या पन येतो हा आता कर्ज काढून धंदा काढ् णार आहे. तिथे ही कोणीतरी माझे ऐकेल म्हणून. मित्राकडून कर्ज घेतले आहे. धिस इज गोइन्ग टू एंड बॅडली. हा घर तारण ठेवणार आहे. तर अवी ऐकत आहे. अवी त्याला आशूची मदत घे असा चुकीचा सल्ला घेतो. पण त्याने अन्या भडकत आहे.

इकडे अरु कॉलेजच्या आधी स्कूल मध्ये येउन आलापी करत आहे ते बघून चढत्या क्रमाने अनीश नित्या व आशू इंप्रेस झालेली आहे त. अरु आता पूर्ण स्वतंत्र झाल्याने तिला माझी गरज नाही. आधी मला धरुन धरुन सर्व नव्या चीजा शिकत होती( गाइड मध्ये रोझीचे होते तसा प्रवास)

परत अन्या व अवी संजना मध्ये वाद होतो. अन्या उखडून निघून जातो. इकडे घरी पहाट होते अभीला कॉफी देते अनघा व जेवायला येणार का विचारते. हा जरा बर्‍या मूड मध्ये आहे. आजी येते व अन्याला सांगत आहे की अनघाच्या वडिलांचे बोरिवलीला साड्यांचे दुकान निघत आहे तिथे का नाही जॉइन होत. अन्याचा लगेच पाप्ड मोडतो. खरंच बरे काम आहे. एसी शोरुम मध्ये साड्या विकायच्या डबा खायचा बिले प्रोसेस करायची.
आमच्या इथे एक लगन दीप शोरुम आहे तिथे खरच दर दिवशी लाखोंचा व्यवहार होत असावा. संजना बोलायचा प्रयत्न करत आहे.
अनघाने काउन्सेलर कडे जायचे आहे तेव्हा भली मोठी कानातली का बरे घातली आहेत!! कॅब घेउन जाणार आहे.

आजी अप्पा सुलेखाला भेटायला जात आहेत. गप्पा चालू आहेत. आजी चहाला नको म्हणते. आजी ने केअर पॅकेज आणले आहे. अ‍ॅपल्स,
आल्याच्या वड्या, नारळ पाणी आणले आहे. डब्यात पण काहीतरी आहे. बिचारी हार्ट पेशंट ला हार्ट अ‍ॅटेक यायचा.

आता पुढील भागात सुलेखा अरु चे प्रपोजल आधीच स्वीकारती झालेली आहे. व आजी नाही म्हणत आहे. लग्नी कपलचा काही सहभागच नाही. ये है इंडिया मेरा इंडिया.

Pages