आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या अनिष ला एव्हढे यांच्या घरातले काय माहिती? अगदी अहो अप्पा, यश...म्हणायला?
इतके तर आपणही at home नसू देशमुखां कडे गेलो तर!. इतक्या दिवसां पासून त्यांना ओळखत असूनही!!

गाणं काय म्हटलं - उचलुनि घेतले,
स्पर्श होता तुझा, ...

अरुंधती इंदूरला घरच्यांच्या नावाचा जप करायची म्हणून त्याला सगळे माहीत.
एकदम फिल्मी करून टाकलं. ईशाचं भाव खाणं पण.

Happy आणि तो अनीश इन्दोरचा म्हणून बळंच हिंदी शब्द टाकतात त्याच्या बोलण्यात!
अजिबात नॅचरल वाटत नाही ते ! कारण तसा अ‍ॅक्सेंट नाहीये त्याचा...!!

आता कोण वीणा का कोण ती अवतारणारे बहुधा! अनुपमा मधे तर ती सायको होती ..इथे काय माहित!!
(ईथे सगळेच सायको!)

भूमिका करणारी बिग बॉसमध्ये होती. मांजरेकर तिलाच बिग बॉस म्हणत.

ही वीणापण घर सोडून गेली आणि फोन करून मी जिवंत आहे सांगते, म्हणजे सायकोच आहे.

अनुपमा मधे तर ती सायको होती . >>>>> हो आणि ती नवर्याच्या फिजीकल हॅरेसमॅण्टमुळे डिप्रेशनमध्ये पण गेलेली असते ना?

अरु काकू चक्कर येऊन पडल्या आहेत.आशु काका त्यांना हॉस्पिटलात घेऊन गेले आहेत.
इकडे देशमुखांच्या घरी हाहाकार.अन्याच्या एक्सप्रेशन्स वरून त्याला काही भलतीच शंका आल्यासारख वाटून गेल..
आता पुढचा क र म्हणजे नवीन प्रोमोप्रमाणे
सुलेखा आई काकूंच्या घरी ती बरी होईपर्यंत आल्या आहेत आणि कांचन आई पण बँग घेऊन येतात आणि सुलेखा आईची बँग पाडून तिथेच राहणार असल्याच सांगतात.
कसल फनी वाटत ते बघायला.
अशा दळभद्री कल्पना यांच्या डोक्यात येतात कुठून.
बर यामध्ये,काकूंच्या खर्या आईचा पत्ताच नाही.

तो अन्या एकटा पडल्याचा प्रोमो आला होता. दोन्ही बायका त्याला सोडून जातात. पुढे त्या प्रोमोच काय झाल ते दाखवलच नाही.

ही स्टार प्रवाह ची आहे ना? तसा काहि फर्क पडत नाही म्हणा सगळे चॅनेल एकजात तेवढेच इलॉजिकल असतात

फुसका बार निघाला. ब्लड प्रेशर कमी होत होतं. बाई गोळ्या घ्यायला विसरल्या. पण ताप कशाने आला?

कांचनला इथे सगळं आयतं हाताशी लागतं. ती तिथे जाऊन काय करणार?

अरुंधतीला धरून केळकर वि देशमुख टग ऑफ वॉर. त्यात अनिरुद्ध आणि अप्पा तिला तिकडेच पाठवायला बघताहेत

कालचा अप्पांचा 'मी कसा दिसतो' सीन काहीही होता.

अगदी भरत. !! काय म्हातार्‍याला चळ लागलाय !!
प्राजक्ता... Happy हो हो स्टार प्रवाह ची आहे. मी चुकून झी लिहीले .
मी ओटीटी वर पाहते ना...त्यामुळे चॅनेल लक्षात येत नाही.

कालपर्यंत हायपोटेन्शन म्हणजे लो बीपी होतं. आज हायपर टेन्शन म्हणजे हाय बीपी.

काल हॉस्पिटलमध्ये संजनाने अरुंधतीला देशमुखांकडे न्यायला नको असं म्हणताच अमांचा खंग्री मॅन एकदम जागा झाला. पण मग संजना चांगल्या हेतूने सांगतेय म्हटल्यावर बिचार्‍याने छड्या म्यान केल्या.

आजारपणातही भावाकडून अरुंधतीची आरती ओवाळून घेतली. लोएस्ट सेल्फ एस्टीम असलेला मनुष्य आहे तिचा भाऊ.

We didn't take the risk of spending the night at home>>अगदी योग्य केले. आजारपणातून बऱ्या झालात वाचून बरे वाटले.
a mature lady should manage her own health issues>>+१ पण बऱ्याच बायका अरुंधतीसारख्याही वागतात. कसंतरी होतंय पण जरा पडलं कि बरं वाटेल म्हणत वेळ काढतात. मग सवड मिळाल्यावर डॅाक्टरकडे जातात.

पण बऱ्याच बायका अरुंधतीसारख्याही वागतात.>>>> संपूर्ण कुटूंबाला गोळा करतात. They need excessive pampering.

पँपरिंग अरुंधतीपेक्षा कांचनच्या बाबत लागू पडेल. अरुंधती टाइअप मला कुठे काय होतंय , दगदग झाली, अशी कारणं देऊन दुर्लक्ष करतात.

अप्पा म्हणाले की या वयात हे सगळं कसं काय? - चाळिशीनंतर हे सगळं सुरूच होतं. ही आता ४७ तरी झाली असेल. अनेक महिने झालेत, यश शिवाय कोणाचा वाढदिवस आलेला नाही. यश पण पोलिस कोठडीत होता म्हणून त्याचा वाढदिवस. एकेक फिलर एपिसोड झाले असते.

शुभ प्रभात. दिनक्रमात एक चेंज केल्याने आता एक तास फीरी फिरी फ्री.
इथपरेन्त अरुंधती ( भावा साठी आकाशात चम कणारा तारा इत्यादि) आजारी पडून घरी आलेली आहे व तिच्या सोबतीस साखराअज्जी आलेली आहे. रात्रीची वस्तीला पण. ह्या क्या गुळ मट लोके आहेत. सुलेखाताई का येणार म्हणून देशमुखांकडे चर्चा सत्र. पण कांचनला प्रोप्रायटरी गुलामवर दुस री कशी हक्क प्रस्थापित करु शकते अ‍ॅट सासू लेव्हल म्हणून कच कच होते आहे. अनघा वाद संपवू व जेवायला बसू म्हणते कारण तिला भूक लागली आहे.

इकडे अरु ला वाइट स्वप्न पडून ती जागी होते सुलेखा शेजारी वाचत बसली आहे. मग सुलेखा ताप चेक करते. व अरुला तिची स्टोरी सांगते.
एकदम ती नववधू होती तेव्हा, वकीलीण प्राक्टिस करायला सुरुवात केली ते सांगते. अरुचा मोठा सायकॉलोजी क्लास चालू आहे मागे
एटीएम मशीन संगीत चालू आहे. खंग्री मॅन पण शांत झोपी गेला आहे. व बासरी असे हळूवार संगीत चालू आहे. सोबत गोड गिट्ट संवाद.

अरु झोपेत पन साडी पदर पिन अप करुन झोपते. ते गालावर खळी का कायते जास्तच वाढले आहे. मग आता अरुचे मनोगत चालू आहे.
ती शांत आहे पण स्वतःच्या विचारांना वाट करुन देत आहे. तेच मागील पुढे. लुक्स लाइक शी हॅज कम टु टर्म्स विथ हर स्टेटस. ऑफिस काम
म्युझिक स्कूल पण तिला आवडते आहे पण मी नेमकी कोण आहे हा प्रश्न तिला पडत आहे. पण तिला मुलांची काळजी पडत आहे. आजी परत
ट्रस्ट द प्रोसेस. तब्येत सांभाळ इतर बाबींतू न मन काढ जरा असे हळू वळसे देत आहे( पोरग्याची गाडी केव्हा पासून मसजिद ला सिग्नल ला लटकली आहे ती पुढे ढकलली पाहिजे ना)

नित्या यश नव्या तारखेचे डिस्कशन चालू आहे. अनीश पण आला आहे. त्याचा व्हिडीओ घ्यायचा आहे. अनीश आढे वेढे घेत आहे. यश त्याला व्ह्लॉग करायची कन्सेप्ट समजावत आहे. नित्या त्याची खेचत आहे. अनीश इशा गौरी यश मुंबई फिरायचा प्लान आहे. व त्यात व्हिडीओ घ्यायचे आहेत.

इकडे कांचन ला स्वतःसाठी मोबाईल टावर हवा आहे तो ही पासवर्ड प्रोटेक्टेड. तिला अरु शी बोलायचेच आहे. तिला पटलेच नाही आहे सुलेखा तिथे राहणे . ती आत्ता बरी आजारी पडत आहे. आपल्या घरी काही कधी तिला त्रास झाला नाही ते.

अरु व म्हातारी वॉक करुन डॉक्ट्र कडे जाउन आले तर आशू वाट बघत उभा आहे. आईचा चेहरा सकाळी बघावा लागतो म्हणे. त्याशिवाय...
आशू ने ते डार्क निळे व्हाइट पट्टीचे जाकीट घातले आहे. अरु तिचे पथ्यपाणी सांगत आहे. अरु इनॉगरेशन चे टुमणे लाव त आहे. लगेच करु म्हणते.

प्रोमोमध्ये:

आजी आशू ला चिडवत आहे. आजी पोहे करत आहे. प्र्मो मध्ये कांचन येते व पोहे करायला लगेच पुढे पुढे करत आहे. प्रोप्रायटरी वुमन.

अरु झोपेत पन साडी पदर पिन अप करुन झोपते.>> हो नेहमीच. मागे एकदा तिने ड्रेस घातला तेव्हा घरात मोठे भांडण झाले होते. आता वेगळे राहूनही तिला साडी शिवाय दुसरे काही घालायची हिम्मत होत नसावी.

Happy अमा
सकाळीच उठून आशू अरुच्या दारात का बरे येतो?

ते ही कसे. परत नित्या घरी पोहोचला आहे. इथे बोलुन मग नित्या जो ह्यांच्या घरी पोहोचला आहे त्याला पिक अप करणार म्हणे व मग ऑफिसला म्हणे. नित्याकडे कार डाय्वर असेलच की. पण नाही. त्या निळ्या जाकिटाला अजोन निळी बुरशी आली असेल ठेवुन ठेवुन. मध्येच काढले पावसाळा झाल्यावर. मग अरु म्हणेल अय्या मी तर सर्व ना उन्हे पडली की एकदा दिवसभर उन्हा त ठेवते व मग मुलांना ह्यांना कपडे घालायला देते. बुरशीचा त्रास नको ना.

Lol
आणि एखाद्या (अजून चालूही न झालेल्या) संस्थेचे उद्घाटन रहित झाले...तर लोक काय वाट्टेल ते बोलताहेत?
कोण हे लोक म्हणे?
आपल्याला गंधवार्ता तरी असते का कुठल्या गायन शाळेचं उद्घाटन पुढे गेल्याची?

अरुंधती म्हणजे जागतिक सेलिब्रिटी ना, जिच्या आजारपणाबद्दल सगळे लोकं चर्चा करतायत!

आणि एखाद्या (अजून चालूही न झालेल्या) संस्थेचे उद्घाटन रहित झाले...तर लोक काय वाट्टेल ते बोलताहेत?>>> नाहि तर काय,काहिही पिळ पाडतात.
आइकान्चनच अरुवर हक्क दाखवण अजबच आहे.
आता अगदी एक दिवस आधी दहिहन्डीला म्हणे तु देशमुख नाहिस तु प्रसाद करु नकोस मी करत जाइन (करत जाइन म्हणजे अनघाला नाहितर गोडबोल्याना ऑर्डर सोडत जाइन) त्यावरही अरुच्या डोळ्यात पाणिच.
आता म्हणे ती माझी सुन आहे मी करेल तिच.

शुभ प्रभात,

आई आशुतोषला चिडवत आहे. यश गौरी अनीश इशा मुंबई दर्शनाला जात आहेत. चँग्ला मुलगा आहे अनिस इति वकिलीण. इशाला बघून वकीलिणीला वीणाची आठवण होते म्हणे. अरु लगेच वीणा कोण? आता वीणाचे तुणतुणे वाजत आहे. वकिलि णीची भाची म्हणे. खूप प्रेम लाड केले तिचे. पर मेरी तपस्या मे ही कुच्च कमी रह गयी . भांडून निघून गेली. वकीलीण घळाघ ळा वीणा पुराण ऐकवत आहे जिवाला घोर व्गैरे. अरु लगेच मला पण भेटायला आव्डेल म्हणे. आता हिला चिकट प्रेमाचा गूळ फासणार व लायनीवर आण्णार वा टते.

धडाक्यात कांचन ची एंट्री. हिने साजूक तुपाचा शिरा आणला आहे. सुनेला मस्का पॉलिशी. ही लगेच टोमणा बोम्बा फेकत आहे. सुलेखाला
टोचून बोल्त आहे. कांचन लगेच प्रोप्रायटरी अ‍ॅक्षन्स घेत आहेत. वकीलीण लगेच काढता पाय घेत आहे. अरु सासूचे वागणे पुसत आहे.
अशूला लगेच उद्घाटनाच्या मागे लागायला सांगते. कांचन अरु ला आराम करायला सांगत आहे. अरु ला ह्या नाईतर त्या घरात बांधून ठेवायचे असे आहे.

अरु उगीच हिरॉइन गिरी करत आहे लगेच उद्या उद्घाटन करायचा प्लान करतो. कांचन चे कोणी ऐकत नाही. म्हणून मी हिला बोलु देत नाही म्हणे.

आता टीपी फिलर टाइम. अनीश यश वडापाव खात आहेत व गप्पा मारत आहेत. इशा गौरी पन जॉइन होत आहेत. इशा शायनिन्ग करत आहे.
भावाच्या आडून आडून अनीशला काही बाही सुनवत आहेत. पण ही फारच प्रेमाळलेली लग्नाळलेली आहे. ज्युनिअर चिक्क्ट गूळ.
इशा सारखी त्याला टोमणे मारत आहे. नितिनचा फोन यशला आला आहे. ही फारच काटेदार राहात आहे. नितिनने सर्वाम्ना ऑफिसला बोलवले आहे. वडापावचे ऐशी रुपये झाले.

कांचन इज पिडोफाइन्ग अरु व म्हातारा. उगीच लोकांच्या लफड्यात पाय का घालते ही म्हातारी!! ही घरात थापा मारून आलेली आहे व अप्पा इथेच सुरू होउन जात आहेत. हीच पुढे पुढे करत आहे. सच पेनफुल म्हातारी. यश पण आला आहे. तिला चक्कर येइल म्हणे. अप्पा सरळच विचारतात. तिला बेडरेस्ट सांगितलेली नाही. अप्पा तिला लहान मुलासारखे मनवत आहेत व घरी घेउन जात आहेत.
अरु आज्जी ला बिच्चारी म्हणते. व कांचन माझ्यावर प्रेम करते, खूप माया आहे म्हणते ( गुलामगिरी मानसिकता) का कसला तो सिंड्रोम आहे नक्की. व्यक्तिमत्व खुंटवणारे प्रेम.

आजीला हाकलून यश व अरु सुस्कारा सोडतात.

प्रोमो मध्ये फायनली उद्घा टन .. सर्व घरचेच लोक आहेत. ते चौकशी करणार पत्रकार व गर्दी कुठे आहे? बोर्ड अगदीच साधा आहे.
अरु जास्त नटली की विचित्रच दिसते आहे. केसांचा भलामोठा अंबाडा घातला आहे. व तो गालावरचा फोड उठून दिसत आहे.
गणेश चतुर्थी स उद्घा ट्न साधायचे म्हणून हिला चक्क र आणली वाट्ते.

Pages