Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केदारला बहुतेक दारू चा
केदारला बहुतेक दारू चा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे कांचनची तीन मुले एकदम नापास झाली आहेत संसारात. एकाचे लफडे डिवोर्स दुसरे लग्न ते ही फाटके. दुसरा कमी कुवतीचा व बायको सोडून गेली. मुले नाहीत. जावाई दारुडा. म्हणजे लफडी आलीच. त्यात खोटे बोलणे लोकांकडून पैसे घेणे हे ही. सर्व दुर्गुन दाखवून झालेत. आता अरु त्याला रिहॅब करुन दाखवेल. म्हणजे अजून एक स्टार!!
कॉलेज म्हणजे ऑफिस आहे का
कॉलेज म्हणजे ऑफिस आहे का सुटीसाठी अर्ज द्यायला?
त्यापेक्षा अरुंधतीच्या अॅडमिशन फॉर्मवरच खाली लिहून टाकायचे की बाई त्यांना जेव्हा जमेल, वाटेल तेव्हा कॉलेजला येतील. त्या आल्या की त्यांचं स्वागत करायचं, कौतुक करायचं. जाताना आता पुन्हा कधी याल विचारायचं. व्हिजिटिंग फॅकल्टी असतात तशी व्हिजिटिंग स्टुडंट.
फारच अवांतर -आम्हांला ज्युनियर कॉलेजला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स शिकवायला एक सर यायचे ते आठवड्यातून एकच लेक्चर घ्यायचे.
फायलींचे (म्हणजे ज्यात आपण कागद जमा करतो) वेगवेगळे प्रकार त्यांनी शिकवलेलं आठवतं. स्प्रिंग फाइल्स वापरताना त्यांची आठवण येते.
अरुंध तीसोबत वादक , कदाचित इतर गायकही आहेत असं सांगितलं होतं. आशुबाळ तिच्या एकटीसाठी प्रत्येक शहरात कार अॅरेंज कर असा हुकूम सोडतो. तिला एक ट्रॅकरही लावेल.
केदारच्या कंपनीत डाउनसायझिंग
केदारच्या कंपनीत डाउनसायझिंग चाललं असेल. आता तो केळकरांकडे नोकरी करेल.
देशमुखांकडचं कोण केळकरांकडे काम करत नाही, असा प्रश्न आता विचारायचा.
बोरिवली ला राहतात का??? अरेरे
बोरिवली ला राहतात का??? अरेरे मग तर खरंच लेखिका आणि बाकी सगळे सिरीयल मधले गांजा मारून बसलेत.......
आता अरु त्याला रिहॅब करुन
आता अरु त्याला रिहॅब करुन दाखवेल. म्हणजे अजून एक स्टार!! >>> हाहाहा, सहीच. तिला सुपरवुमन दाखवण्यासाठी बाकीच्याना कमीपणा देतात.
कॉलेज म्हणजे ऑफिस आहे का सुटीसाठी अर्ज द्यायला? >>> हाहाहा, तिथेही गुणी विद्यार्थीनीचा किताब मिळणार.
शुभ प्रभात. दिवाळी शुभेच्छा:
शुभ प्रभात. दिवाळी शुभेच्छा: तयारी जोरात चालू आहे. अड गळीतले सामान विकायचा प्रस्ताव कांजी हाणून पाडते. विशाखावर सर्व काय काय प्रेशर टाकत आहेत. पण ती विमनस्क आहे. अनघाने जेवायला वडे केले आहेत. कसले कोंबडी वडे/ बटाटा वडे/ साबुदाणा वडे!!! हिला काय आरोग्य दायक जेवायची पडलेली नाही आहे. अप्पा अरु कशी नाही आली विचारतात. अवी फक्त जाणीवपुर्वक रिअॅक्ष्न्स देत आहे. व विस्मरणाचे भूत मोठे मोठे होत आहे.
मग रस्त्याचा शॉट किंग्ज सर्कल वाटा ते. लागू ची जाहिरात दिसत नाहीये.
कट टू आशू नित्या एका बार मध्ये पार्टीला भेटायला आले आहेत. आशू फारच साजुक तुपातला असल्याने त्याला तिथे आव्डत नाही. एक बीअर घेतली तर काय झाले!! पन तो विषय नको. हे वाट बघे परेन्त केदार तिथे येउन पीत व नशेत आहे.
संजना विशाखाला काय प्रॉब्लेम विचारते. विशाखा तिची कान उघाडणी करत आहे. संजना डिवोर्स ची बातमी देत आहे. ही सरळ बोलत
नवरा बायको कुटुंबच खूप महत्वाचे यश पैसा हे काही ध्येय नसते. तुम्ही तिच्यावर अन्याय केलात. तिचे सूख हिरावून घेतले आहे.
शेट्टी मालक पण नव्या हॉटेल प्रोजेक्ट साठी आशू अरु ने होमली फेसेस मॉडेलिन्ग करावे व जाहिरात करावी असे सुचवतात. व गायब होतात.
तिथे केदार बाहेर जायचा प्रयत्न करत आहे. पन फारा च नशेत आहे. उठवत बसवत नाही आहे. नित्या प्रसंग संभाळून केदारला सावरा यला जातात शेट्टीला फुटवतात.
संजना आपली ब बाजू समजावत आहे. माझे अन्यावर खरंच प्रेम आहे. विशाखा पण समजुतीने बोलत आहे पण रडायला लागते. बिचारी - बायकांचे अश्रु स्वयंपाक घरात व्यक्त होतात. अजुनही. मागे खूप सार्या वाट्या कप्स नीट धुवुन लायनीने पत्त्याच्या बंगल्या सारखे लावले आहेत.
कांजी चहा झाला का करवादते.
अय्या परत रस्त्याचा शॉट पण जाहिरातीचा बिलबोर्ड आहे पण ब्लँक केला आहे. भावोजींची कमेंट वाचली कि काय . तसेच असेल.
परोपकारी गंपू केदारची अवस्था बघून त्याला सोडायची व्यवस्था करत आहे. हा खरेच ड्रंक आहे व त्याला घरी जायचे नाही. लाज वाटत आहे पण प्यायची सवय फार पुढे गेलेली दिसते. व्यसन मुक्तीच्या गोळीची गरज आहे. आशू नित्या त्याच्याशी गोड बोलुन त्याला कार मध्ये घेतात.
यश व अनीश बोलत आहेत. अनीश ला यश घरी बोलवतो दिवाळीत. अरु ची आठवण काढतात. व घरी जाउन डेकोरेशन करायचा प्लान आहे.
यश पण मुंबई कशी मेहनती माणसाला मदत करते असे बोलुन दाखवतो. आशूचा फोन येतो. त्याला घरी बोलवतात. हे केदारला घरी घेउन जात आहेत व अविला पण बोलावुन घेतात.
प्रोमो मध्ये
घरी सर्व केदारची चौकशी करत आहेत. विशाखाला त्याच्या प्रॉब्लेमची माहिती आहे. त्याला एकटे सोड ता येणार नाही असे म्हणते. आता पुढील भागात सर्व आशूच्या घरी दारुकाम.
अमांनी बरोबर ओळखलं, केदारला
अमांनी बरोबर ओळखलं, केदारला मद्यपानाचे व्यसन लागले आहे. मला काल एपिसोड पाहतानाही तसेच वाटले. आशिष कुलकर्णी चांगला अभिनय करतो. याला कधी लीड रोल्स मिळत नाहीत.
टीव्हीवर तरी स्टार प्रवाहच्या इतर मालिकांतही असे रस्त्यावरचे बिलबोर्ड्स दाखवतात. तुमचं पेड सब्स्क्रिप्शन असल्याने तुम्हांला दाखवत नसतील.
आता केदारला अरुचा PA म्हणून
आता केदारला अरुचा PA म्हणून नेमतील. म्हणजे तो सतत उपदेशंच्या वर्षावात राहणार. पैसा आशू देणार, म्हणजे अरूने अजून एका देशमुख family cha उद्धार केला.
आता फक्त आशुने कांचाप्पाला जॉब देणे बाकी आहे. तेवढा झाला की मालिका बघायचा बंद करणार.
शुभ दीपावली:
शुभ दीपावली:
केदार व आशू कार मध्ये आहेत. आशू यश लाव अवि ला बोल वत आहे. केदार ला विशाखा फोन करत आहे पण तो उचलत नाही. तो नशेत आहे.
अप्पाला सांगितले तर ते मीनू व विशाखाला घरी घेउन जातील. आशू केदार ला तिला मेसेज कार म्हणतो. नित्या कार चालवत आहे.
इकडे घरी जेवणे झालेली आहेत पण अप्पा अन्या केदार कुठे आहे विचारत आहेत. ह्यांना प्रसंगाची कल्पना नाही. विशाखा एकदम केदारला एकटे सोडून चाल णार नाही असे बोलुन जाते व मग सारवा सारव करत आहे. अप्पाला संशय येतो. आता सर्व उठून विचारायला लागत आहेत. फॅमि ली सपोर्ट. विशाखा सांगत नाही.
अवि यश आशूच्या घरुन केदार ला घेउन येतात. विशाखा खालीच असते. केदारला भूक लागलेली आहे. विशाखा डाळ भात आणून देते. त्याचे बोकणे भरतो. व्यसनी माणसाचे अॅक्टिन्ग त्या अॅक्ट र ने मस्तच केले आहे. त्याला झोपवून अवि यश बाहेर बोलत बसले आहेत तेव्हा केदारचे
प्रॉब्लेम विशाखा सांगते. त्याची नोकरी गेली. लॉकडाउनचे परिणाम. चांगले व्हाइस प्रेसिडेंट प्रमोशन झालेले पन कामावरुन रिझाइन करायला सांगितले. त्यातून तो नशेच्या आहारी गेला आहे. चांगला भाग असे किती फॅमिलीत किती तरी प्रॉब्लेम चालू असतील नाही का.
पुढील भागात विमल ला दिवाळी दिले ली असते ते पाकीट केदार चोरतो व त्याला घेउन विशाखा ते परत करायला आत येते. व्हेरी सॅड. लॉक डौन मध्ये अनेक काय काय झाले त्याचे हे प्रातिनिधिक. आशू यश व अनीश पण चांगले व संयत मोड मध्ये होते.
आशिष कुलकर्णी चांगला अभिनय
आशिष कुलकर्णी चांगला अभिनय करतो. याला कधी लीड रोल्स मिळत नाहीत. >>> करेक्ट . बिग बॉसआधी काही दिवस तुमची मुलगी केवळ याच्यासाठी आणि मधुरा वेलणकरसाठी बघायचे, हरीश दुधाडेपेक्षा या दोघांचा अभिनय उत्तम होता पण वाहवा त्यांची व्हायची नाही. नो डाऊट हरीश चांगलं काम करतो पण हे दोघे त्याच्या कितीतरी पटीने उत्तम करायचे. अवॉर्ड नॉमिनेशन पण मिळालं नाही.
माझाही अंदाज बरोबर निघाला.
माझाही अंदाज बरोबर निघाला. केदारला कामावरून काढून टाकलंय.
शुभ प्रभात. किती फटाके उडवले
शुभ प्रभात. किती फटाके उडवले काल?
विशाखा परिस्थिती समजावुन सांगत आहे. हा प्रोब्लेम बरेच दिवस बिल्ड अप होत आहे. विशाखाचे संवाद चांगले लिहिले आहेत. स्वभावातील बदल समजावुन सांगत आहे केदारच्या. दे डू नीड हेल्प. प्रोफेशनल हेल्प. बिचारी रडु लागते धाय मोकलून. मधूनच अवीचे प्रतिसादाचे शॉट आहेत. विशाखाचे कानातले झुमके साधे व चांगले दिसत आहेत. मागे पाहिले तर अप्पा पण ऐकत आहेत. अप्पा पण मदत करायचे प्रॉमिस करतात. व मुलीस पोटाशी घेतात.
आता एक सुर्याचा शॉट आहे. आशू हपिसात टीपी करत आहे फोन वर. अनेस व नित्या येतात. त्याला चिडवायला अनिश गाणे म्हणत आहे.
आशू हपिसात फॉर्मल घालत नाही. टीशर्ट वरच ते वासाळे जाकीट घालुन येत असतो. नित्या शर्टे घालतो पण कोट कशाला. अरुची टूर चांगली चालली आहे. असा तिने मोठा व्हॉइस मेसेज टाकला आहे.
कट ते समृद्धी. इशाचे रांगोळीचे प्रयत्न चालू आहेत. संजना कॉफी घेउन काळा ड्रेस घालुन आलेली आहे. तिच्या लक्षात विशाखा विमनस्क आहे ते दिसत आहे. हिने केसांचे काय काय केले आहे त्यामुळे एक एक्स्ट्रा ब्रेन बाहेर आला आहे आसे दिसत आहे. अभी व यश इशाला चिडवत आहेत
भाई बहेन चेष्टा सेगमेंट. अन्या येतो व इशाला कोफी मागतो. स्वतः घे की एक दिवस. तर केदार येतो सासू लगेच चहा पोहे करायला निघते. कांचा त्यांना इथेच बोलवत आहे. सर्व त्याची चौकशी करत आहे.
केदार सारवा सारवी करत आहे. विमल किचन मध्ये आहे. तिला स्वयंपाक सांगत आहेत पोहे रेडी होत आहेत. आजी तिच्या हातात पैसे ठेवते पगार व दिवाळी. तिने ते पैसे फ्रिज वर ठेवले आहेत. ते केदार बघतो. घरच्यांच्या पोह्याच्या फर्माइशी चालू आहेत. यश व अनीश स्कूटर वरुन येत आहेत तर इशा सामान घेउन चालत येत आहे ते ही मेन रोड वर. रिक्षा नाही का करत ? तिच्या नाकाला पिठे लागली आहेत. अनीश मदत करु बघत आहे तर ती उखडलेली आहे फॉर नो रीझन. इशा मागे बसते व अनीशला मध्येच सोडून जातात. अनीश समजुत दार पणा दाखवत आहे.व चालत निघून जातो. इशाला हसून बाय करत आहे.
अप्पा व अवी केदार संबंधी बोलत आहेत. इशा यश जोडी पिठे घेउन येतात व तेच वादावादी चालू आहेत. अजून फराळाची तयारी चालू आहे.
इथे दिवाळी संपत पण आली. अप्पा विमल ला घरी पाठवत आहेत. आजी उद्या पण तिला बोलवते. विमल पैशाचे विचारते पैसे सापडत नाहीत
एक बारके भांडण जन्म घेत आहे विमल व आजी त. कारण पैसे हरवले. तर विमल विशाखा केदार परत येतात. अन्या पण वरुन खाली आला आहे. मागुन काली बिल्ली संजना पन आलेली.
विशाखा विमलचे पैसे आईकडे देते. व केदारपण मी घेतले होते हे कबूल करतो. लगेच. अन्या लगेच उखडला आहे.
पुढील भागात अन्या लगेच प्रॉब्लेम एस्कलेट करत आहे. मेजर दिवाळी फटाका ज. आता हे लोक परिस्थिती आउट ऑफ कंट्रो ल करतील मग सुखाचे चांदणे बाई येउन गोड बोलु बोलु सर्व प्रश्न सोडवून टाकेल. केदारला काउन्सेलिन्ग व व्यसन मुक्ती केंद्रात पाठवेल. जे ती स्वतःच चालवत असेल व अनघा तिथे येत असेल. विशाखा ला धीर देणे. लगे हात आठ पायली चकल्या बारा पायलीचे लाडू पण वळून टाकेल. हाका नाका.
दिवाळी पाड्वा व भाउ बिजेच्या हार्दिक शुभेच्छा.
ते कामोठे नाहीतर खारघर ला
ते कामोठे नाहीतर खारघर ला राहत असावेत म्हणून पनवेल ला जाऊन येणार असतील...>> बोरि वलीत राहतात असे दाखवले आहे. बोरिवली वझिऱ्याला राहतात असे दाखवले आहे। सिरीयल नवी होती आपल्या वझिऱ्याच्या फेमस वडापाव आणा असे उल्लेख आले होते . मी कधी बोरिवलीस्टेशनवरून घरी चालत जाते तेव्हा मंगेश वडापाव जो पूर्वीपासून फेमस आहे तिथे नेहमी पाहते कि कोणी दिसते का यांच्यापैकी.
बोरिवली नुसतं बोलण्यापुरतं.
बोरिवली नुसतं बोलण्यापुरतं. वझिरा भागात बंगलेवाली सोसायटी नाही.
आज यश आणि अनिश स्कुटरवरून जाताना मागे सेव्हन स्क्वेअर अकॅडमी असं रंगवलेलं दिसलं.
या नावाची एक शाळा मीरा रोड आणि एक ठाणे कासारवडवलीला आहे.
यश आणि अनिश स्कुटरवरून जाताना त्यांना ईशा येताना दिसली. म्हणजे ती विरुद्ध दिशेला जात होती. पण अनिशला खाली उतरवून यशबरोबर गेली. यश जात होता त्याच दिशेने. अनिश टाटा करून मागे वळेल असं वाटलं, पण ते दाखवलं नाही.
आज रस्त्यात बिलबोर्ड्स नव्हते. Contract संपलं.
शुभ प्रभात. पाडवा व
शुभ प्रभात. पाडवा व भाउबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
आज अन्या पहिल्यापासुनच फॉर्मात आहे. केदारवर पैसे चोरले हा आरोप करत आहे अवी संभाळून घ्याय्चा प्रयत्न करतो. हे सर्व विमल समोरच चालू आहे. तिला पाकीट देउन पाठ्वायचे ना. केदार माफी मागतो आई व अप्पांची. यश बेड रूम मध्ये जाउन बोलायचे म्हणतो. शाहाणा मुलगा. पन अन्या ला तमाशाच करायचा आहे. केदार दारू प्यायची होती हे सांगतो. विशाखाला आता सर्व सांगावे लागते कांची धपकन उभी राह्त आहे. केदार सर्व साम्गत आहे. विशाखा तो चांगला माणूस आहे हे सांगून टाकते. पण अन्याला समंजस पणा नको आहे. केदारचा जॉब गेला त्याला सॅक केले तो अपमान त्याने सहन करायला दारूचा मार्ग निवडला आहे. चार महिन्या पूर्वी. आत्महत्येचा पण विचार करत आहे. पण अरुंधती मुळे तो सावरत आहे. जीवन संपवायच्या पेक्षा अरुचा आदर्श ठेवोन रिबिल्ड करावे असे त्याला वाट्ते.
अन्या लगेच मला पण तेच झेलावे लागले आहे. पन मी दारू नाही प्यायली चोर्या केल्या नाहीत. संजना लगेच मानसिकता वगैरे बोलु लागते.
पण अन्या त्याला व्यसनी व मार्कुटा ठरवून मोकळा झालेला आहे. अप्पा म्हणतात तो आपल्यातला आहे त्याला मदत करायला हवी. पण पुढे केदार विशाखाला पण इथे राहायला ये मला सोडून दे कायमची विशाखा कुठेही जाणार नाही त्याला सोडून. तिला त्याला मदत करायची आहे.
हा काय दिवाळी ड्रामा!! अवि फुकट पासिन्ग फेज वगैरे पॉझिटिविटी फेक त आहे. अप्पा पण सपोर्ट करत आहेत. केदार अप्पाला मिठी मारतो व्हेरी स्वीट. इस बातपे एक लाडू तर बनता है. केदार यश ला पण सॉरी म्हणतो. यश सपोर्ट करत आहे. ह्या मागे खंग्री मॅनने फराळाच्या चकल्या खाउन एक जुनाच पीस माथी मारला आहे. व बासरी वाल्याने एक जेनेरिक पीस टाकला आहे. नुसते एखादा प्रश्न अॅड्रेस करतात व
नंतर तो लगेच सुटतो पण. खोलात कुठेच जात नाहीत.
केदार विमल ला पण सोरी म्हणतो. इशाला सॉरी म्हणून जोक मारतो. अन्या कडे बघतो. तर तो मान हलवून घरातली माणसे टावेल लावुन बाथरुमात जायच्या मोड मध्ये असतात तशे वर निघून जातो.
इकडे अनीश रांगोळी घालत आहे व आजी गोड चिकट बोलत आहे. आता इंदोरची दिवाळी हा एक प्लग. आजी बरी दिसत आहे. घरचा
पेड नोकर आलेला आहे. वर्शाने फराळ व इतर पाठ्वले आहे. ह्याने घोळदार सलवार व कुर्ता घातला आहे. आज ह्यांच्याकडे पुरुषांची नहाणी आहेत.
समृद्धीवर पण कारिंट फोडायचा उत्सव चालू आहे. आजी जातीने सर्व करुन घेत आहे. अनघा नथ घालून व यलो साडी. केस मोकळे. दिवाळी
पहाट. कांचाप्पाचा व अभी अनघाचा रोमान्स लाजत मुरकत चालू आहे. अप्पा अरुंधतीची आठ्वण काढतात. ती गावी गेलेली आहे ते विसरतात. तिला फोन करा म्हणतात. नव्या जागी अन्या इशाला घेउन जायचे म्हणतो. व तिथे नारळ फोडायचे म्हणतो. अप्पा विसरभोळे पणा करत आहेत.
अभी गोड बोलुन चेकप करायला नेणार् आहे अप्पाला.
प्रोमो मध्ये गौरी आलेली आहे व यश ला बाय करोन अमेरिकेस परत जानार आहे. लग्न करुन ह्याला पन नेउ शकते. पण तिला बहुतेक ब्रेक पच करायचा आहे. आता यश घरातून पळून जाईल. गौरी ने पण भले मोठे कानातले घातले आहेत. अन्या लगेच यश चे कान भरतो संजनसारखीच गौरी आहे. सो सेल्फिश असे बोलत आहे.
दिवाळी पहाट व फराळ चालू आहे.
दिवाळी पहाट व फराळ चालू आहे. अनघाने सर्व फराळ केलेला आहे. हिला आराम करायचा नाही का. अरु ने एक फोनही केलेला नाही. कांचनलाच फोन करायला सांगतात अप्पा.
इकडे केळकरांकडे उट्णे लावोन आंघोळी झालेल्या आहेत व फराळ करयचा आहे. नितिन ने फराळ आणलेला आहे. अरु पन जायच्या आधी करुन देउन गेली. बाळ सर्वां ना हॅपी दिवाली करत आहे. अनीश इंदुरच्या दिवाळीचे सांगत आहे. शंकरपाळी कडे बघुन अंतरमुख होत आहे. त्याला आईबाबांची आठवण येत आहे. फोन करायचा ना मग. ह्याचे आईबाप पण कधीच फोन करत नाहीत. देशमुखांकडे जायचे म्हटल्यावर अनीश प्लान पोस्ट पोन करतो. सर्व त्याला रॅगिन्ग करत आहे.
कांची अरुला फोन करत आहे. अरु मजेत आहे व शोज हाउस फुल होत आहेत. अन्या लगेच तिची व्ही आय पी व्यवस्था केलेली आहे म्हण तो.
विशाखा आलेली आहे तिची नणंद पण आलेली आहे. अनघाने काउन्शेलर दिलेला आहे. अनघाने नथ घातलेली आहे. व इतर सोन्याचे दागिने.
विशाखा धन्यवाद द्यायला आलेली आहे पण घरचे तिला सपोर्ट करत आहेत. विमलची पण माफी मागत आहे विशाखा.
विमल तिला पण फराळ आणून देत आहे. एकदम गौरी दारात बघून सर्व आस्चर्य चकित होत आहेत. हिचे केस अमेरिकेत छान स्टाइल झालेले आहेत. यश वा गौरी एकमेकांकडे बघतच राहत आहेत. फनी म्युझिक. अभी तिला फराळाला बोलवत आहे. यश रुसल्याने प्रेमाचे भांडण चालू आहे. ह्याचा कुर्ता छान आहे. यश ला रिलेशन शिप संपल्याची जाणीव झालेलीच आहे.
गौरी विचित्र वाग ली कारण आई फार आजारी आहे. चौकशी टेस्ट चालू आहे. ती खरे ते सांगत आहे. व सारवा सारव करत आहे. यश डिपेंडंट आहे तिच्यावर इमोशनली. सोडायचे असेल तर काय ते सांग. हिला पण हिची माणसे लागतात. म्हणे. काय पीळ टीपी चालू आहे. ही बाई तोंड वाकडॅ करून रडायला लागली की बघवत नाही. इशाचे काही काही चिरकणे चालू आहे. व यशला आजी कडे घेउन जाते. संजना गौरी शी बोलत आहे. चौकशी करत आहे. गौरीचे आईबाप काही ठीक नाहीत पण ती सांगत नाही. संजनाचे झुमके ताटभर मोठे आहेत. आज पण स्लीवलेस व ऑरेंज साडी जी छान आहे.
घरी पुजेची तयारी चालू आहे. व गौरी पण नटून मदत करत आहे. ये क्या. आजी परत नटून अप्पा बरोबर रोमान्स चालू आहे. बायको हीच लक्ष्मी!! अन्या पण नटून बसला आहे. संजनाला मॅचिन्ग कुर्ता. आपल्या घरातल्या मुली बायका हेच आपले धन दागिना म्हणे. ह्या आपल्या देवता आहेत म्हणे. नक्की स टकला आहे म्हातारा.
पुढील भागात गौरी अमेरिका पलायन टेलिन्ग यश भाग. आज अनेक दिवसांनी हपीस.
कालच्या भागात अविनाशने
कालच्या भागात अविनाशने केदारला समजवायचा भाग - शंतनू मोघेचा अभिनय फारच नाटकी ( हॉलमधल्या शेवटच्या माणसाला पण चेहर्यावरचे भाव दिसले पाहिजेत असा) . नाटक आणि टीव्ही -सिनेमा करणारे नेहमी सांगतात की कॅमेर्यासमोर असा अभिनय लाउड दिसतो ते याला कोणी सांगितलं नाही का?
< नुसते एखादा प्रश्न अॅड्रेस करतात व नंतर तो लगेच सुटतो पण. खोलात कुठेच जात नाहीत. > अगदी. एकामागून एक सगळे प्रश्न असेच सुटतात.
मधुराणी बाई मोठ्याच सुटीवर गेलेल्या दिसतात. नॉट रीचेबल.
केळकरांना मुंबईत दुसरं कोणी नातेवाईक, मित्रमैत्रिणी नाहीत का? हे उठसूट देशमुखांकडे आणि नितीन यांच्याकडे. गेलाबाजार त्या आश्रमात तरी जा दिवाळी करायला.
अनिरुद्धची नोकरी गेली तेव्हा त्याला कोणी सहानुभूती दाखवली नाही. तेच केदार नोकरी गेली, दारू पितो, चोरी करतो तरी सहानुभूतीचे घडे डोक्यावर उपडे होताहेत. राग येणार त्याला. अर्थात अनिरुद्धला सहानुभूतीही धड घेता आली नसती.
पण त्या शंतनू मोघे ला अगदीच
पण त्या शंतनू मोघे ला अगदीच एकदोन वाक्ये/शॉट्स असतात! त्यात तो प्रयत्नांची पराकाष्ठा करून, चेहर्यावर जमेल तितके भाव दाखवतो.
त्यातही त्याने अंडरप्ले केलं तर कुणाच्या लक्षात ही येणार नाही तो....
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan/television/aai-kuthe-kay-karte-fame-...
अनिरुद्ध आणि कांचनचे शाप बाधले वाटतं
शुभ प्रभात कालचे पूजा तयारी
शुभ प्रभात कालचे पूजा तयारी प्लस लेक्चर बाय अप्पा. मग निखिलची मजा. मग लक्ष्मी पूजनाचे चलले आहे. इकडे केळकरांकडे साधे लक्ष्मी पूजन चालू आहे. आज पण नित्याला घरी जायचे नाही का? मग देशमुखांकडे जायचे आहे. अनीश आजीला इंदोरला घेउन जाणार आहे. उगीच सर्वांची ट्रिप काढायचे फुकट प्लान चालू आहेत. आजी गोड गिट्ट वाक्यांची पट्टी सोडत आहे. इथे आशू पण दारु विरुद्ध
इकडे फटाके मुक्त दिवाळी चालू आहे. आजीला पण फुलबाज्या डब्बा उडवायच्या आहेत. संजना स्लीवलेस बॅकलेस व मोठी थोरली कानातली
आशू व आई ( तोच जुना डायमंड पेंडंट ने कलेस) येतात व शुभेच्छा देत आहेत. इशा ओढणी फलकारत फटाके फोडत आहे मला वाटले
ओढणीला आग लागते कि काय व अनीश तिला वाचवतो. पण तसे काही होत नाही. तिला अनीश व नित्या बघतात व एकदम घंटी बजी मोमेंट.
सर्व् त्र दिवाळी शुभेच्छा सांडल्या आहेत. मग अन्या काही खट्टे बोलायला जातो. आशू आरू वरुन पण अरु सांगलीत आहे असे लेटेस्ट अपडेट
तो देतो. आई व कांची च्या साड्या अरु ने घेतलेल्या आहेत.
अप्पा संजनाला फराळ द्यायला सांगतात. इशा सर्व्ह कर्ते. अनीश सॉलिड लाइन मारत आहे.
जनरल बोलणे चालू आहे. अन्या खडूस पणा करत आहे. आशू सडेतोड उत्तर देत आहे. मुले रांगोळी काढायला गेली आहेत. अन्या च्या बिझनेस ची नित्या चौकशी करतो. त्याचा पार्टनर डाउट्फुल आहे असे बोलल्यावर अन्या वैतागत आहे. नित्या तर त्या पार्ट नर ला फ्रॉडच म्हणत आहे. आता काय होईल. ?!
पुढे भागातः तेच गौरी अमेरिकेत जाणार ह्याव न त्याव. हे नक्की कधी होईल कारण ह्या भागात तरी ती सून झाल्यावाणीच वागत आहे.
शुभ प्रभातः आज मला हपीस आहे.
शुभ प्रभातः आज मला हपीस आहे.
आत व बाहेर साले निघत आहे. आत अन्या ची पार्ट नर शिप कशी चूक आहे ते नित्या व आशू सांगत आहेत. घरचे लगेच घाबरत आहेत.
अन्याचा स्वाभि मानावर हल्ला झालेला आहे.
तिकडे बाहेर गौरी यश चा ब्रेकप झालेला आहे. ती अमेरि केस शिफ्ट होणार. तिथेच जॉब घेणार. लग्नाचे बारगळले आहे कारण ती यश ला बरोबर यायचे म्हणत आहे. यश ला भार्ता बाहेर जायचे नाही. गौरी तिथेच राहू भवि ष्य बनवू असे सांगतो. तिने आधी बोलली नाही म्हणून
यश उखडला आहे. म्हणजे तिचे आधीच ठरले आहे. ती त्याला गृहित धरते आहे असे त्याला वाट्ते. ही मोठी स्वप्ने बघते. महत्वाकांक्षी आहे.
मेजर फाइट व ब्रेक अप हॅपनिन्ग. इशा पण मैदानात उतरली आहे. गौरी इज ऑलरेडी ओव्हर विथ यश. गौरीचे कानातले मोठ्या चकली एवढे आहेत.
घरातले बाहेर येतात. व यश आजीला सर्व बोलुन दाखवतो. त्यात इशा अनीश पण भांडू लागत आहेत. गौरी बोलायचा प्रयत्न करत आहे.
पण आजीला व घरच्यांना प्रश्न समजला आहे. अनीश यशच्या वतीने बोलतो. बट द डाय इज कास्ट. आप्पा समजुतीने बोलत आहेत.
ही यश ला अमेरिकेत न्यायच्या मोड मध्ये आहे. पण हा निर्णय त्याच्यावर थोपता येत नाही. वाकडतोंडीने वेळ घेतला उगीच. लवकर गेलेली बरी.
संजना ने पण हिरवी साडी स्लीवलेस व मोठे कानातले घातले आहेत. इतके मोठे कानातले का घालत आहेत बायका. आजी आपल्या टर्म क्लीअर करत आहे. गौरीला संधी महत्वाची आहे ती अमेरिकेस परत जात आहे. यश चा निर्णय त्याच्यावर म्हणे. इतने में तो यश की शादी होकर बच्चे भी हो जाते.
मंजे आई दौर्यावरुन
मंजे आई दौर्यावरुन येइस्परेन्त जावयाचा दारु प्रयोग, यश चा ब्रेक अप अन्याचा बिझनेस इस्कोट. क्या क्या हो गया
अनुपमाच्या विकीवरील प्लॉट
अनुपमाच्या विकीवरील प्लॉट समरीनुसार गौरी नाते तोडतेच. पण यशाची दुसरी गर्लफ्रेंड सुद्धा त्याला सोडून जाते.
यशाची दुसरी गर्लफ्रेंड सुद्धा
यशाची दुसरी गर्लफ्रेंड सुद्धा त्याला सोडून जाते.>> कारण तो मारकुटा आहे.
गौरीने तोडायचं ठरवलंच आहे तर
गौरीने तोडायचं ठरवलंच आहे तर मग परत आलीच कशाला बाई? तेपण अजून त्यांच्या घरात जाऊन दिवाळी मनवून घेणे आणि नंतर सगळ्यांच्या अपेक्षांना सुरूंग लावणे याला काय अर्थ आहे? आधीच सांगून टाकायचं काय ते.
केदारचं तर फक्त अरु नसताना एपिसोड फील करायला टाकलंय क्लिअरली दिसतं. दोन एपिसोड नंतर लगेच तो ठिक पण आहे म्हणतात. संपवत का नाही हे लोक कायच्या काय दाखवण्यापेक्षा.
यशाची दुसरी गर्लफ्रेंड सुद्धा
यशाची दुसरी गर्लफ्रेंड सुद्धा त्याला सोडून जाते.>> कारण तो मारकुटा आहे.
तसं बघितलं तर अरूच्या नसण्याने काही फार फरक पडत नाहीये. बाकी लोकांची पूर्ण कॅपॅसिटी आहे रोज नवीन झेंगाट सादर करायची.
शुभ प्रभात. काल काम करावे
शुभ प्रभात. काल काम करावे लागले व ये म्हणून सांगून बॉस दुबई प्रयाण!!! ऐसे ट्रीट करते हैं असली जीवन में.
आज अनुपमाचा अपडेट. मुलीने पळून जाउन अनु पमाच्या दिराच्या भावाशी लग्न केले. खरे तर अनुपमाची सासू असेच म्हणत होती. परवा एपिसोड मध्ये पंधरा मिनिटाचे शिकणे त्यात दहा मिनिटे अनुपमाची सोरीसोरी ठँक्यो करत स्वतःची ओळख करून देणे. तेच तेच दळन. मग तेव्हा राहिला होता म्हणून कोलेज स्टाइल रोमान्स कागदाचे बोळे, हार्ट शेप्ड पोळी डब्यात वगैरे. घरुन फोन येतो तर ही नवृयाला जाम झाडते मी शिकणार माझा हक्क आहे वगैरे पट्टी. इथे शिकणे कमी शिळा रोमान्सचच जास्त चालू आहे.
मग ही एक दिवस घरी जात नाही तर मुलगी लग्नच करते. मग ओरडा आर्डा. आज वडिलांनी तिला घराबाहेर काढले आहे. वडिलांना पन धक्का बस्तो. व ते तिच्या खोलीत जातात व तिचे सामान बॅगेत भरून आणून बाहेर फेकतात. रोज नया ड्रामा. हा सीन छान केला आहे. पण बॅगा घेउन येताना डिरेक्ट शिव तांडव स्त्रोत्र!!! सर्व बायका कायम भयानकच नटलेल्या असतात. एक एक फ्रेम मध्ये काय दागिने काय साड्या काय मेक अप. एकदम ओक्के. गुजरात्यांना असे नटायची आवड आहे. असे वाट्ते. मुलीने मनानुसार लगन केले तर तो बाप रागाने लाल भडक झाला आहे. आधी मला सांगितले नाही म्हणून!!! एकदम अमरीश पुरी मोड.
आपल्या अरु ताई मंगेशकर कधी यायच्या दौर्यावरुन.
त्या गणपतीपुळ्याला गेल्या
त्या गणपतीपुळ्याला गेल्या होत्या. पण वेबसाइटवरून रूम बुक केली ती फ्रॉड होती की हॅक झाली होती. त्यांचे पैसे बुडाले.
अनुपमामध्ये नात्यांचा बराच गुंता आहे. आणखी बरीच पात्रे आहेत आणि त्यांचे पाय आपापसांत गुंतलेले आहेत इति विकी वाचून मिळालेले ग्यान.
मराठीवाल्यांचे बजेट कमी. त्यात एवढ्या लोकांच्या तारखा मॅनेज करायला जमत नसावे. म्हणून केदार विशाखाची मुलगी, नितीनची बायको , अप्पाची ती हास्यक्लबातली गर्लफ्रेंड फक्त विंगेत असतात.
अवंतिकामध्ये कलाकारांची फौज उभी केली होती. तेव्हा हे सगळे नवीनही होते. आताच्या कोणत्या अभिनेता /अभिनेत्रीने अवंतिकामध्ये काम केले नाही, असे विचारावे लागेल.
हाय शनिवारी विनाकारण काम
हाय शनिवारी विनाकारण काम करावे लागले म्हणून मी आज रजा घेत आहे.
म्हणून उशीर.
अभी अनघा यश ला समजावत आहेत. पण् लग्न मोडलेच आहे. असे यश म्हणत आहे.
संजना गौरी बोलत आहेत. संजना साइड प्रोफाइल छान दिसत आहे. फारच भारी पैकी साडी आहे. गौरीला कशाची शाश्वतीनाही. संजना तिचे कान उघाड णी करत आहे. यश काही सर्व कुटुंब सोडून अमेरिकेत राहणार् नाही. अभी हे काय मुलींना अमेरिकेत जायचे खूळ असते असा काही बाही बोलत आहे. तिने यश ला काहीच न सांगता जॉब घ्यायला नाही हे यशला खटकले आहे. हिला यशबरोबर राहायचे आहे पण आपल्या टर्म्स वर.
यश मी आधी माहीत असते तर काहीतरी विचार केला असता पण आता फार काही ऑप्शन्स नाहीत. अन्या येउन आगीत तेल ओतत आहे.
गौरी बद्दल ती कशी सेल्फिश आहे ते सांगत आहे. इकडे गौरीला खूपच पैसे कमवायचे आहेत व त्यामुळे यश ला मनासारखे काम करता येइल
असे आमचे बोलणे झालेले आहे म्हणे. इकडे संजना पण ते किती जुनाट विचारांचेच आहेत त्याला जॉब मिळाला असता तर तू गेलीच अस्तीस. सर्वांनी हेच गृहित धरले असते. मग तुला ते का नाही?
अन्या इथे अरुला धरुन वीष पेरत आहे. घराबाहेर पडली व मित्राबरोबर फिरू लागली. बायकांना पैसा प्रसिद्धी मिळाल्यावर त्या फॅमिलीची कदर करत नाहीत. तूच लग्न करायचे नाही असे सांग.
इकडे संजना पण डेविल्स अॅडवोकेट प्ले करत आहे जॉब घे व जा. लव्ह स्टोरीची हवा होउन गेली. तर इशा येउन भडकत आहे. तिकडे अन्या चालू आहे. अनघा व अभी पण अस्वस्थ होउन ऐकत आहेत. काही जवाब देत नाहीत. अनघा डिलिव्हरी होणार असल्यासारखा किम्वा पोट
बिघडल्यासारखा चेहरा करत आहे म्हणजे अॅक्टिन्ग.
आता इशा गौरी बतावणी चालू आहे. इशा यश व करीअर असाच चॉइस देत आहे. नोकरी एंबिशन्स सर्व दूर ठेव व यश ला सॉरी म्हण व जॉब रिजेक्ट कर. हे ही का सांगणार अशी नणंद असेल तर रोज डोक्यावर मिरे वाटेल. यश बीइन्ग व्हेरी मॅचुअर. प्रेमाला प्राधान्य देतो व अन्याची वीष पेरणी कानामागे करतो. पण कितीही प्रेम असले तरी आईला सोडून मी काही परदेशी कायमचा जाणार नाही असे त्याने ठरवले आहे.
नेक्स्ट डे अनघा लाल ओढणी मोकळे केस. ही घरात असते तर केस बांधत का नाही. स्वैपाकात पडत नाहीत का? आजी करवादत आहे. नवी पिढी. गौरीचे विचार हे अन ते आजीला कळत नाही. समजुतदार पणा दाखवा असे इन्डिरेक्टली. संजना आलेली आहे तिचा कॉटन कुर्ता छान आहे.
अन्या पण आलेला आहे. व ही गोष्ट फार मह त्वाची नाही म्हणतो.
पुढील भागात सामंजस्याने बोलु ते साखरपुडा मोडु ह्या सर्व ऑप्शन्स टेबलवर आहेत. झिंदाबाद. आता अरु येइल
संवादाचा अभाव. महत्त्वाची
संवादाचा अभाव. महत्त्वाची गोष्ट चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळी सांगणे.
भ र पू र पैसा वाली नोकरी असेल तर गौरी म्हणते ते फीजिबल आहे. यश बाळ एकदा लंडनवारी करून आलंय. आता अमेरिका बघायला हरकत काय? आईच्या पदरात आशुबाळ येईलच.
संजनाचा मुद्दा पटला.
अरुंधती थर्ड अंपायर किंवा लवाद होईल.
Pages