आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो काल ऑफिसं सुटायच्या वेळीच पाऊस आला.

प्रोमोतल्या कॉफी हाउस सीनमध्ये आशुतोषच्या चेहर्‍यावर इतके अजीजीचे , वेदना होत असल्याचे भाव होते. प्रपोझ करत होता की आणखी काही?

आणि याने अरुंधती, तिच्या घरचे, स्वतःची आई यांना माझी तुझ्याकडून कसलीही , कसल्या नात्याची अपेक्षा नाही इ.इ. राणा भीमदेवी थाटात सांगितले होते त्याचे काय झाले ?

घरातली बाई आजारी आहे , तिला प्रवास झेपणार नाही, म्हणून यंदा तुमच्याकडचा गणपती आमच्याकडे बसवा हे लॉजिक कळले नाही. उलट आजारी असेल तर यंदा आमच्याकडे होता पण तुमच्याकडेच बसवा असं असायला हवं ना? गणपतीचं सगळं तो स्वतःच करून घेणार आहे का?

आणि अप्पाकडे सगळे रिकामेच तर आहेत. त्यांना जाता आलं असतं. एकटा अप्पा कशाला? (तर तो रोल करणार्‍या अभिनेत्याला रजा हवी आहे)

भरत...एक्झॅटली! काकांची बायको आजारी आहे म्हणून गणपती त्यांच्याकडे..हे कसं काय? लेखिकेचं लॉजीक गंडलेलं आहे!
Lol
आपाचा रोल करणार्‍या अभिनेत्याला ब्रेक हवा आहे!
आणि यांचे वराती मागून घोडे! आता गणपती गेले, तर यांच्याकडे आत्ता बसताहेत. सगळे वातावरण ओसरल्यावर....काहीतरी घोळ झालेला दिसतो सिक्वेंसिंग मधे.
अरुंधती क्लिअरली रंगविलेला गणपतीच पेंट करत होती......काही! नाही दाखवायचा ना तिने केला असं.... या वर्षी इको फ्रेंडली बाहेरुन च आणला...हे अधिक वास्तव वाटलं असतं...!!
आणि आशु आणि नित्या ...हिच्याकडे सदानकदा - अमा म्हणतात तसे - बेल घालायला येत असतात.

तो अनीशपण आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलीशी बोलल्यासारखा वागतोय.

तो आशुतोषच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा की नातू ना ? कधी भाचा, कधी पुतण्या. अनिरुद्धने त्याचे आडनाव केळकर हेही लावून टाकले.

बहुतेक आधी मित्राचा मुलगा होता.. पण आता काकांचा नातू आहे.....
कारण सुलेखा ताई पण म्हणे..की काकांकडे गणपती बसायचे इंदोर ला..पण गोकुळाष्टमी मात्र आपल्या कडेच!!
(दिलं एक वाक्य टाकून...रिलेशन्स डिफाईन करायला..!!)

आजच्या लोकसत्तेत रूपाली भोसलेचा गणेशोत्सवानिमित्त फोटो आलाय. त्यात तिचे केस व्यवस्थित दिसताहेत. इथे मालिकेत तिच्या डोक्यावर रंगा ची डबी पडल्यासारखा आणि उंदराने केस कुरतडल्यासारखा अवतार करतात.

अरूने गणपती बसवला आहे. आता त्या निमित्ताने अनीश आणि इशाला भेटता येईल. अन्या आधीपासूनच ओरडतोय कि इशा- अनीश मैत्री नको. पण या माय-लेकी लग्न करून एकाच घरी जाणार वाटते.

अरुने बनविलेला रन्गविलेला गणपती साच्यातला होता , आता अनेक लोक हौसेन हाताने सफाइदार गणपती बनवितात तरी साच्यातला गणपती आणी हाताने बनविलेला ह्यातला फरक लगेच कळतो,रन्गाचही तेच.
अरु सर्वगुणसपन्न दाखवा पण जरा तरी रीअ‍ॅलीटी मॅच असु देत की.

शुभ प्रभातः तारीख नौ चा कालचा भागः

आजी चोर ओटी भर णार आहे. अरु येणार मग अनघाची चोर ओटी. आजी सर्व जुन्या समजुती गोड घोळुन सांगत आहे. १९२० स्टाइल. अरु आलेली आहे अनघासाठे खीर बनवून आणली आहे धावपळीत. संजना राणी वारल्या प्रीत्यर्थ वेस्टर्न ड्रेस मध्ये नर्स वाणी दिसत आहे. अनघाची साडी छान आहे व अभी पन आतुन सुखावलेला आहे. ह्याचे काही कळतच नाही. अरु ने खीर पण चाटवली आहे. संजना ला पण ओटी भरायला बोलवते आजी. मजा आये बाई दोन दोन सासवा.

इशा काही लाडिक कुड कुड करत आहे व यश लगेच ती कुड कुड परतवत आहे. सर्व लाडिक बडबड व अपेक्षित प्रतिक्रिया. आजोबांचे पण चिल्लर १९६० चे विनोद.

आता अरु डोजे जोरात करायचे म्हणून निघायचे बोलते. अभीला उडत उडत अनघाकडे लक्षदे असे बोलत आहे. संजना उशीरा येत आहे कारण एक प्रॉडक्ट लाँच पार्टी आहे. दोन्ही सुना कामाचे नाव घेउन पळून जातात मग आजी मागे तक्रार पिपाणी वाजवत आहे. संजना पार्ट्यांना जाउन उशीरा येणार आजी तक्रार करत आहे. अन्या इशाला अरु कडे जाउ नका म्हणतो पण यश घेउन जात आहे. ऐकायचे नाही.

अरु: अनुपमासारखेच सॉरी सॉरी म्हणत हपिसात पदर पुसत आलेली आहे. आशू तिला गोड बात मी देतो सर्व बॅचेस फुल म्युझिक स्कूल लाँच
सक्सेसफुल झाला आहे. अरु पण मराठी नाटकातल्यासारखे बोलत आहे. तुम्ही आजू बाजूला असल्यावर मला निर्धास्त वाट्ते म्हणते मग आशू लगेच कोफी प्यायला बोलवतो. गणेशाचा आगमनापूर्वी ह्यांची कॉफी डेट. प्यार का इजहार करायचा आहे. मग टाउन मध्येच जायचे की.
गुगल मॅप का नाही करत. नित्या लगेच फुकट खायला रेडी मी पण येतो म्हणतो. हा लगेच ओरडा आरडा करत हसत आहे. आशू चे दोन पावले पुढे तीन पावले मागे चालले आहे अजुन. अनीश पण मुंबईत भले जाड जॅकेट घालून आहे. अरु येउन परत भाबडे पणा करत आहे.

अनेश कपडे घ्यायला मोल मध्ये घेउन जात आहे आरुला.

कट टु डेट हा जीन्स व शर्ट तो ही गुलाबी घालुन बसला आहे. पाच ग्लास पाणी प्यायला आहे. अरु शोपिन्ग करुन आली आहे. अरु बिचारी घरगुती गाय पणा करत आहे. व function at() { [native code] }इशय मध्यम वर्गीय पणा करत आहे. तिला एस्प्रेसो मोका माहीत नाही.
हा तिच्या वती नी ऑर्डर देत आहे. ही लगेच मी घरी स्वस्तात केली असते हे जुनेच वाक्य टाकते.

आशू फारच दुरून बोलणॅ चालू करतो. ती पण त्याचे कौतूक करते अ‍ॅक्नोलेज करतो. आपण म्हणतो पण हिच्या डोस्क्यात काही ही येत नाही आहे. हिच्या डोळ्यासमोर लॉटरीचे तिकीट नाचले तरी ही त्याला कचर्‍यात टाकणार. दोघे एकदम काहीतरी डोक्यात क्लिक होईल काहीतरी बोलेल त्यात यश चा फोन येतो. ह्याचे ऐकायला तिला काही वेळ नाही. तो यश पण खरे तर आईला प्रायवसी काही देत नाही.
ती गपा गपा कॉफी संपवते व लहान मुलाला कसे संपव आत्ता दूध म्हणतो तसे आशू समोर ठेवते कोफी चा कप. तो अवाक झाला आहे व हिचे फुले महाग आहेत ह्याव अन त्याव चालू आहे.

प्रोमो मध्ये गणपती बसवल्यवार सर्व देशमू ख आले आहेत दर्शनाला व अन्या पण व टोमणे बाजी चालू आहे.

आता कुत्रा फिरवून येते मग बाकीचे.

शुभ प्रभातः आजचा भाग १० तारखेचा. इशा गौरी ह्यांचे यश अभी बरोबर संभाषण चालू आहे. त्यात यश व अनीश येतात अव्या पण आहे. अनीश चे जाकेट नक्की बघा. मुंबईत हे कोण घालते ह्या दिवसात. दिग्दर्शकाला पोकल बांबू. यु नो व्हेअर. अनीश लगेच गोड गोड कौतुकाचे शब्द बोलत आहे. यश कडे किल्ली होती खरेतर पण तो घरी विसरला. त्यात आईचे लग्न दूर गेले ना. अरु आशू पण आलेले आहेत. केळीची पाने गाडीत ठेवलेली आहेत म्हणे. अश्याच ह्या प्लॅटोनिक मैत्रीणी बाप्यांना वापरून घेतात.

इकडे आजी देवासमोर बसलेली आहे व निखिल काही तरी चित्र घेउन येतो. ह्याचे पोट अनघा पेक्षा सुटलेले आहे!! ज्स्ट सेइन्ग. संजना सँड्रा
फ्रोम बँड्रा लुक पण बारीक दिसत आहे. निखिल अन्याला टेक्निकल प्रश्न विचारत आहेत हे श्रद्धेच्या आड येत आहेत. अन्या बीइन्ग खडुस अ‍ॅज एव्हर. ह्याला काही येत नाही.

आता आजी एकदम फुटेज खात आहे. निखिल ला गणेशाची माहिती देत आहे. बॅक टू १९२२ टोन . आजी शो ऑफ करत आहे.
अनघा सुरक्षित अंतरावर उभी आहे. तिची हेअर स्टाइल बघुन घ्या. घर्चे काम व आराम करताना इतका बरा वेळ मिळतो.

इकडे डेकोरेशन चालू आहे. गौरी एन आर आय पर्स्पेक्टिव्ह मांडत आहे. इशा किट किट चालू आहे. अरु सर्वांना दामटवत आहे. तिची साडी छान आहे. नित्या व आशू ऐकत आहे. अवि मुले नाहीत ते दु:ख मांडत आहे. आपली मुले आशूलाही तेच वाटत असावे. पण नाइलाज को क्या इलाज.

परत फॅमिलीचे कौतूक. गौरी व नित्या तोंड मिटुन दुजोरा देत आहेत. नित्या मोदक मागणी करत आहे. अनीश ने सर्वांसाठी समोसे आणले आहेत. कॉफी बिस्किटे मोड आहे. आशू बीइन्ग स्कूल बॉय. कठीणच दिसत आहे. नेक्स्ट डे परत बेल घालायला सकाळी सहालाच आले असावेत. नित्याला घर नाही वाटते. सुलेखा शांतपणे घरी थांबली आहे. पण हार पाठवला आहे.

तर घरची मंडळी अभी सकट आलेली आहे. आजी सजावट बद्दल टोमणे. आमच्या वेळी कसे सर्व साग्रसंगीत. ह्याव अन त्याव. निखिल पण बावळट पणा करत पुढे आहे. गौरी व इशाने मोठ्या फलकारे ओढण्या घेतल्या आहेत. आजी लगेच रडुन इमो ब्लॅक मेलिन्ग. अरु हवाला देते.
नाते आहे तसेच राहिले आहे व राहील. ही अरु अशूच्या हनीमुनला पण बरोबर जाइल क्या बोलते.

आता खंग्री मॅन दहा मोदक तुपाबरोबर खाउन डब्बे बडवत आहे!!! ओळखा पाउ कोण आले!!! अन्या भावोजी!!! कळकट महाशय टोम्णे बाँब मारत आहेत. ( शिल्लक सेना विधान सभेत आल्यावाणी.) मु म उप मु म एकदम करारे जबाव देत आहेत. शिंदे सेनेचा विजय असो. अरु आशूचा विजय ( कधीतरी होणारअ) असो.

एवढ्या त मुर्ती फिनिशिंगला गेलेली म्हणे ती आलेली आहे. समोरुन आईला बघून घेतले तर खळी पडलेली आहे.

प्रोमोत जेवण झाले काही तरी टीम बांधून कल्ला करायचा आहे तर शिल्लक सेनेचे प्रमुख टोमणे मारत आहेत.

<क्लिक होईल काहीतरी बोलेल त्यात यश चा फोन येतो. ह्याचे ऐकायला तिला काही वेळ नाही. तो यश पण खरे तर आईला प्रायवसी काही देत नाही.
ती गपा गपा कॉफी संपवते व लहान मुलाला कसे संपव आत्ता दूध म्हणतो तसे आशू समोर ठेवते कोफी चा कप. तो अवाक झाला आहे व हिचे फुले महाग आहेत ह्याव अन त्याव चालू आहे.>
हे टीव्हीवर दाखवलं नाही की माझं हुकलं?

शाळे च्या बॅचेस फुल झाल्या. अ‍ॅडमिशन्स कोणी कशा केल्या? ऑनलाइनच का? आणि मुख्याध्यापिका बाईंना याचा पत्ता नाही. त्यांनी शाळामालकाला सांगायचं की शाळा मालकाने तिला?
यानंतर आशुतोषच्या तोंडी एक वाक्य होतं ते ऐकून मी खुर्चीतून खाली पडलो. कन्स्ट्रक्शनचं सगळं काम नितीनवर सोपवून मी म्युझिक स्कूलमध्येच लक्ष घालणार आहे.
बाळा, तू काम कधी करतोस आणि नितीन तरी तुला कडेवर घेऊन फिरताना ही सगळी कामं कधी करतो?

भरत.. Lol
मलाहीतो यशचा फोन आलेला वगैरे दिसलं नाही...
तरीच मी विचार करीत होते...की या संभाषणाचा एंड ( निरर्थक!) कसा करणार लेखिका बै..!!

मलाहीतो यशचा फोन आलेला वगैरे दिसलं नाही...
तरीच मी विचार करीत होते...की या संभाषणाचा एंड ( निरर्थक!) कसा करणार लेखिका बै..!!>> अरे नौ तारखेच्या भागात नाही हे दहा तारखेच्चा भाग सुरु होतो तेव्हाच आहे. ०.०१ ला आहे. ही लगेच शेपटीवर पाय पडल्यावाणी निघते. पण आशू कॉफी पिउन जाउया म्हणते. व बसुन शिक्षा असल्या सारखी कॉफी गट गट संपवत आहे.

हो हो .आज पाहिलं. तुम्ही अमा, ते नऊ ता च्या भागात लिहिलेलं ना..म्हणून घोळ झाला.
आशू ने मुळात इतक्या घाईत तिला न्यायचेच नाही कॉफी प्यायला..माहीत होते ना की ही गणपतीच्या गडबडीत आहे ते..?

अरु कधी घाईत नसते ?
भाऊ आणि आई ह्यांना बोलवावं असं अरुला कधीही वाटत नाही. देशमुख जिथे तिथे हवेत.

ही लगेच शेपटीवर पाय पडल्यावाणी निघते. >> अगदीच.
काहीच अपेक्षा नाही म्हणत अशुने सुरूवात केली होती पण आता खरा रंग दाखवतो आहे. नित्या आणि अनिष सतत अशुला अरू वरून चिडवत असतात. त्यातले एखादे वाक्य अरूच्या कानावर पडले कि ती मंदासारखा चेहरा करून काहीच कळले नसल्यासारखे दाखवते.

Lol
हो ना..हिला काय समजत नसेल का?

<ती गपा गपा कॉफी संपवते व लहान मुलाला कसे संपव आत्ता दूध म्हणतो तसे आशू समोर ठेवते कोफी चा कप.> अमांनी हे चपखल लिहिले आहे.
अवाक आणि हताश. ओंकार गोवर्धनचा अभिनय पहिल्यांदाच प्रसंगाला आणि कॅरॅक्टरला साजेसा वाटला.

मागे ही कधीतरी त्याने प्रपोज करायचा प्रय त्न केला आणि अरुंधतीला फोन येऊन देशमुखांकाडे काहीतरी गडबड झाल्याचे कळले होते का?

हे सगळं बोलायची अक्कल यावी म्हणून आशुतोषच्या जिवावर बेतवणारा अपघात घडवला आणि नितीनच्या बायकोला आयसीयूत पाठवलं होतं तरी यांचे पहिले पाढे पढ पंचावन.

शुभ प्रभात. आयडी शाबुत तो हम लिहेंगा पचास. यश व अरु मिळून पूजा आरती बाप्पा बसवणे होते. मग आरती. सव्र मांगल्य म्युझिक दिले आहे.
पण आतले खडूस कलाकार तेच नेहमीचेच आहेत. आजी मस्त नवी साडी नेसून् आलेली आहे. व ज्ञान सोडत आहे. वॉट्सॅप फॉर वर्ड आज्जी आहे ही.
हिचे संवाद तेच्च असतात. मग अन्या काही एक खवट शेंगदाणा युक्त बोलत आहे. हल्लीची मुले वगैरे अशी वक्रोक्ति. य श लगेच चालू होतो. बापावर वरडू लागतो.

आता आज इथे पण डंब शरड खेळ!!! टीम पडणार. आज्जुडी पीटर. लाडीक पणा चालू आहे. संजना लाडिक बोलते कारण आजीला सारखी अप्पाची आठवण येत आहेत. अवि परत खेळ समजावुन सांगत आहे. इन केस वी डों<ट नो नैवेद्याचे जेवण रेडी आहे अरु पाने आधी घ्या म्हणते. नित्या लगेच उकडीचे मोदक. हावर्ट पणा चालू आहे. सतरंजीवर लोक्स बसतात पण अन्या इशाच्या शेजारी बसतो. व अनीश मुकाट्याने लांब बसतो इशा पासून.

जेवणे झाल्यावर संजना अन्याचा क्लास घेत आहे. संजना आकाशी रंगाची पैठणी नेसली आहे. पण ऑलमोस्ट बॅकलेस ब्लाउज.
अरु च्या स्वयंपाकाचे कौतूक चालू आहे. सर्व मोदक खाउन आडवारले आहेत. अन्या( उरलेली सेना) लगेच टोमणे बाँब. मग फड न वीस लगेच सहकार्याने धावुन येतो व आरु चे कौतूक चालतो आता हाटेलाचा प्लान आहे असे नित्या उचकावतो. यश आशू सपोर्ट करतात. लोकांचा झोपायचा प्लान आहे. पण इशा किचकिच करून खेळायचेच ठरवते.

देशमूख टीम व केळकर टीम असे होउन विधानसभा अधिवेशन चालू झाले. आजी लगेच अरु आपल्याच टीम मध्ये व अनंत काळची माता सुभाषित वटव टते. इशा परत रुल समजावुन सांगते. पहिले नाव गौरी. ओढणीचे फलकारे जमिनीवर किती. डिझाइनर ग बाई.
ऐरणीच्या देवा गाणे पहिले जे अरु गात आहे.

अविनाश सेकंडः दुनिया दारी. यश व अवि गाणे म्हण तात.

आता ऑफ कोर्स अनीश वर डाव आलेला आहे. हा अंमळ जाड आहे नाही का. तुझी माझी जोडी जमली नाच होतो.

इथे भाग संपला.

आता प्रोमो मध्ये हे म्हातारे आपल्याला जीवनात काय मिळाले काय नाही तो हिशेब मांडत आहेत.

तीन दिवसांच्या सुट्टी नंतर हपीस!!! आजही पावसाचा इशारा आहेच.

अनीशला तुझी माझी जोडी जमली, पोरगी पटली म्हणता यावं म्हणून खेळाचा घाट. केळकर काकापुतण्या देशमुखांच्या मायलेकीला पटवायच्या मिशनवर.
अमेरिकेत वाढलेल्या मुलीला साधी माणसं चित्रपट , त्यातलं गाणं माहीत आहे हे पाहून टडोपा अगदी.
अनीशला मराठी भावगीतं . चित्रपट गीतं माहीत असणं हेही थोडं ओढून ताणूनच आहे.

एकदाचे यांच्या घरावर एखादे मिसाईल का बरे पडत नाही....कहर अंत मालिका आहे. अमा तुमच्या चिकाटीबद्दल तुमचे अभिनंदन

Dear all no net at home today. Will try in the evening.

There is a purpose to it. I am not sharing.

हाय कालचा भाग बघत आहे. राहिलेला. अर्धा वेळ गाणी, हे ओरडाआरडा चालू आहे. अन्या घरी येउन अरु खूप च पुढे गेली मी तिथेच आहे नव्हे अरे तू मागे गेला आहेस जॉब गेला वय झाले . ह्याची वेळ वाइट आहे म्हणे. आजी पण रडारड करते अरु चे तुझ्यावर प्रेम आहे म्हणे. एकदम अश्रुपात चालू आहे. आई मुलांचा. संजना मैत्रीणी कडे गेलेली तर कांचन कट कट करत आहे. यश आवरा आवरी करायला मदत करत आहे. अरु ला मोठा स्वयंपाक करायचा सोस आहे. अरु एकदम साठीच्या दशकातले वाक्य टाकते माझे हातपाय चालत आहेत तोपेर्न्त मी प्रत्येक सणाचे पदार्थ करणार. तुला माणसांची आवड आहे म्हणून एकटी राहु नकोस. असे यश म्हण तो तेव्हा शंखनाद व गणपतीचा क्लोज अप. अब इनको ही आना पडेंगा.

नित्या परत परत आशूला तू प्रेम व्यक्त कर सांगतो.

प्रोमो मध्ये अभि घरी अनघा ताई कडे. अभी उखडतो. अन्या बरे केलेस म्हणतो. तेच तेच परत परत. आता कुत्रा फिरवून येते मग पुढील भाग बघते निवांत.

आता नित्या परत संत्रे सोलुन दाखवत आहे. लवकर बोल लवकर बोल. पण इथे काय लफडॅ आहे ते ह्याला माहीत नाही. अरु तर बाजार हाट करण्यात मग्न आहे. तिला रोज २१ मोदकच करायचे आहेत. नित्या इतका का मागे लागतो. खरे तर हा अरु च्या घरुन आपल्या घरी जाउ शकला सता चोंबडा मेला.

अनघा अभीचा नंबर ट्राय करत आहे. फोन घेत नाही. इशाला पण झोप येत नाही. ह्याला रात्री कुठली आपर्शंनं लागलीत!! कैप्पण. अनघा लगेच नवरा आहे समजून घ्यायला हवे ना. प्रेम आहे. इशा लगेच सेकंड चान्स देता येतो का वगैरे सांत्रे सोलत आहे. ही म्हणते मी स्वतःलाच सेकंड चन्स दिला म्हणे. ( ट्रस्ट केले ते पण कोणाला. दुतोंडी सापा ला!!) विश्वास एकतर्फी नसतो ह्याव अन त्याव पुस्तकी. विश्लेषण. इशा लगेच रड कुंडी. आई जर घर सोडून गेली नसती तर सग ळे नॉर्मल राहिले असते. ही इशाची अंतर्गत इच्छा आहे. अनघा लगेच ताई ताई जस्टिफिकेशन देत आहे.

मेजर काउन्सेलिन्ग चालु आहे. काउज सेलिन्ग ओल्ड हॅट आयडियाज. हलके घ्या.
आता आपण फारच कावकाव केल्याने नित्या आशू बांधकामातील काही काम करत आहेत. वकीलीण बंगलोर ला गेलेली आहे. अनीश ढोम्या
कॉफी व सँड विच घेउन आला आहे. व प्रसादाचा शिरा बनव ला आहे. म्हण जे हे घरीच चालू आहे. आज अरु च्या गणपतीचे विसर्जन आहे.

अनीश सोशल मीडिआ मॅनेंजर झाला आहे. आशू म्हणतो तू काम केलेस की अरु चे वर्क लोड कमी होईल. अनीश इशाच्याच कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेणार आहे एम ए साठी. एम ए इन म्युझिक!!

आता सर्व अरु च्या घरी- बेल घालिन्ग. डेली.
आपले इथले वाचून आशूचे जाकेटे गेली आहेत. व जीन्स हाफ स्लीव शर्ट वर आला आहे. पण तीच पँट जी फेल्ड प्रपोज ला घातली होती.
सर्व अरु च्या घरी आहेत. अनघाने आपण इथे आहोत हे अभीला कळवलेले नाही. इशाला भूक लागली आहे. नित्या पोहोच्ला आहे. वर्शा नाहीच फेक बायको . आशू आरती करणार म्हणे. परत आरती.
यश स्टिरॉइड्स वरच आहे असे वाट्टॅ ओरडा चालू आहे. इशा टोकत आहे अनीशला. हा परत सोरी म्हणतो. हे केळकर बायकांच्या पायाखालची पाय पुसणी होउन जगण्यात धन्यता मानत आहे. इशाचा पोरकट पणा चालूच आहे. अरु कांचन मोड मध्ये समजावत आहे.
रोजचे झाले तर कशाचीच किंमत नाही असे कोण बोलते तर नित्या!!!

विसर्जन अरु च्या हस्ते आहे. गाणे चालू आहे.

अभी परत आल्या आल्या चहा मागत आहे. पण बायको घरी नाही. ती का आई कडे गेली म्हणून तो उखडत आहे. आजी चहा करत आहे. पण पाय दुखत आहे. ड्रामा. मग परत तिला बसव तात. काम करायला नको ड्रामाटिक म्हातारीला. आजी कायम स्वतःचे लाड व तिला बरोब्बर पुरु षांना कसे हँडल कराअयचे ते कळते. एक कप चहा साठी इतकी नाटके. अनघा अभीला फोन कर ते. ह्यांचे फोन वर भांडन चालू आहे.
अभी ला चहा खाणे केले नाही म्हणून तो उखडला आहे. तिथेच राहा. किती टोमणे मारत आहे. आता डिवोर्स होईल का.

अन्या नवर्‍याने बायकोला टाचे खालीच ठेवले पाहिजे अरुचे दुसरे घर म्हण जे तापच आहे म्हणतो.

प्र्मो मध्ये आशू एकदाचे काय ते बोलणार म्हणे. दार उघडॅ असेल नक्की. अरु च्या गालावरचा फोड बसला आहे. आता प्रपोजल ऐकून खळी होईल बहुतेक.

आता प्रपोजल ऐकून खळी होईल बहुतेक.>>पण त्याआधी ती भेदरल्यासारखे तोंड करते.
बरेच उपकार आणि चमचेगिरी केल्यावर अशू पुन्हा नकार असला तरी मैत्री तोडू नको म्हणत प्रपोज करणार आहे.
नित्याला फक्त एकच काम आहे सद्ध्या, अशूला अरूवरून आणि अनिषला इशावरून चिडवायचे.
इशा तशी चालू आहे. अन्या जवळपास असला कि गप्प असते अन तो नसेल तर अनिषशी वाकड्यात बोलते.

शुभ प्रभातः अरुंधति मित्रमंडळ गणेशोत्सवाची सांगता झालेली आहे. गौरी रात्री परत येणार आहे. अनीश यशला कपडे घ्यायला बरोबर बोलवतो. इशा पण मी येते म्हणतो पण अनीश नाही म्हणतो. अनीश व नित्या कल्टी मारतात. अरु आनंदात आहे. माझ्या मनातले सर्व पुरे झाले कारण तुम्ही सुट्टी देत आहात. इस शी फॉर रिअल. किती काम अस्ते सणांचे म्हणे. मग ऑफिसातले काम असते त्याचे काय? ते तर अनेक पटींनी जास्त आहे.

आता तिच्या बडबडीला छेद देउन आशू प्रियाराधन मोड मध्ये. कधीचे राहिलेले ते बोलायचा प्रयत्न करत. ही लहान मुलांचे ऐकतात टीचर तसे ऐकत आहे. दार उघडे उघडे उघडे आहे.दार उघडेच आहे बहुतेक. व आशुतोष चे डिस्क्लेमर फार वेळ चालत आहेत. हीच बोलुन त्याला वाक्य पण फॉर्म करु देत नाही आहे. मागे घड्याळात सहा पस्ती स झाले आहेत. हा योगय शब्द शोधत आहे म्हणे. मग परत अरु च्या सुखात माझे सूख. हे व असे निरर्थक संवाद बराच वेळ बोलुन मागे हे हे मॅन पण हे हे करु लागला आहे. पण कसले काय मैत्री काळजी सर्व भोवरे फिरवुन शेवटी प्रेम आहे असे बोलतो एकदाचे. मग फार विनोदी असे कसलेला म्यान असता तर ते दार बंद करुन आधी तिला मिठीत घेउन चुंबन घेतले असते पण हे बाळ तोतरे होउन पाणी प्यायला टेबला कडे जाते.

ह्याला एकटे वाट्ते लैच पारोसा दिसतोय हा. तुझा कंफर्ट महत्वाचा. मित्र म्हणून राहु व्गैरे परत कट कट परत चालू आहे. अरे हिरवीणीला साधे नॉर्‍मल प्रेमजीवन सेक्स लाइफ आहे हे सांगायला इतके का आढे वेढे. लगेच लग्नाचे पण विचारतो. आता अरुंधतीला चक्कर येइल असे दिसत आहे. मी तुझ्या कडे आधार मागत आहे म्हणे. मागे खंग्री मॅन वादळ वारे व्हायोलिन डब्बे सर्व वाजवतो व मग हा अरु ला बोलायला सांगतो तर ही पण त्याच्या जवळ जायच्या आधी टेबलाशी जाते. टेबलावर नक्की प्रेम आहे सर्वां चे. एकुण आंबिअन्स एखाद्याला दुर्धर आजार झालेले ब्रेक करतात तसा आहे.

अरु ला हे अगदीच अनपेक्षित नाही असा विचार तिच्या मनातही येतो व येउन गेला आहे. तरीही दार उघडे!!! हिला विचार करायची भीतीच वाटत आहे. तळ्यातील पाणी त्यात दगड असे काय काय तारे तोडले आहेत लेखिकेने. आहे ते सुद्धा जाइल असे अरुला भीती वाटत आहे. मैत्रीच तिला जास्त लाख मोलाची आहे.

आशूच्या चेहर्‍यावर अल्जिब्राच्या पेपरमध्ये फेल गेल्यावर टीचर पेपर घेउन समजावुन सांगते असे भाव आहेत.

आत्ता सगळे छान आहे. बरोबर पगार येतो सण असले की लगेच सुट्टी. एक दिवस काम दहा दिवस सुट्टी. हिला फक्त स्वतःचा विचार करुन जगयची सवय नाही आहे. सर्वांचे चेहरे तिला दिसतात. १०० टक्के स्वतः पुरते काही करायला जमत नाही. विचार करायला वेळ हवा तो वेळ द्या.
तू रडतीस का असे आशू विचारतो. गंगेत घोडे नाहले एकदाचे. ( ह्यांना असेच सावळे तेलकट मुल होईल काय? - होआवे तिथपरेन्त हे पोहचावेत ही च सदिच्छा.)

आशू बाळ परत तु म्हणशील ते मला मान्य असेल अरे असा मिलिऑनेअर माणूस काहीही न कराता गळाला लागला आता अरू पारटी फेकणार्.
डालरां डालरां डा लरां आशू लिटरली सतरंजी उचलताना दाखविला आहे. चलो हो गया पेट सफा तो सब दर्द दफा.

कट टू होम ओफ भांडण. अभी उखडलेला आहे. जेवायची वेळ आहे. उगीचच चिडत आहे. घरी कायतरी नेहमीचा वाद चालत आहे.

प्रोमो मध्ये आशू घरी झबले घालून आय होप मी सर्व तिला बरोबर सांगितले असा विचार करत आहे. व घरी असेच काही नेहमीचे अनघा अभी वाद चालले आहेत. ह्याच्या जीवनात पण संजना आहे का असे संजना विचार करत आहे.

आशूच्या चेहर्‍यावर अल्जिब्राच्या पेपरमध्ये फेल गेल्यावर टीचर पेपर घेउन समजावुन सांगते असे भाव आहेत.>>> अमा तुफानी कॉमेन्ट

फिजिकली अब्युजिव हजबन्ड नतर हा कटकट्या कन्ट्रोलीन्ग टिपिकल मेल पदरात पाडून अनघाने काय मिळवल? प्रेग्नसित मुड स्विन्ग अनघाचे व्हायला हवेत तर अभ्याचे होतायत.

{आत्ता सगळे छान आहे. बरोबर पगार येतो सण असले की लगेच सुट्टी. एक दिवस काम दहा दिवस सुट्टी}
Lol
सणासुदीच्या कामाला बिनपगारी हेल्पसुद्धा मिळते

हेल्पसुद्धा मिळते>>> मिळणारच ना, आता ती टूबी मालकिण आहे.

पदरात पाडून अनघाने काय मिळवल? >> अरू अजून कोण! Happy

वादळ वारे व्हायोलिन डब्बे >> Lol
पण हे बाळ तोतरे होउन पाणी…>> हेही खूप झाले. ह्याला आयुष्यात प्रेमच मिळालेले नाही(असे नित्या बोलत होता), गेली २७ वर्ष हा फक्त अरूवरच मनोमन प्रेम करत होता म्हणजे दुसऱ्या कुणा मुलीला प्रपोज करायचा सुद्धा अनुभव नाही हे पाहता त्याने फक्त ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का?’ असे विचारून उत्तराची वाट न बघता लगेच ‘तुझा होकार असेल तर उद्या ॲाफिसला ये आणि नकार असेल तर परवा ये आणि मी आत्ता जे काही बोललो ते विसरून जा’ असे सांगून त्या उघड्या दारातून पळून जायला हवे होते.

Pages