आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा...... एकदम परफेक्ट लिहीलं आहे!
सिरीयल चे जाऊ द्या..पण अशा स्टॉक होम सिंड्रोम मधे जगताना अनेकांना पाहीलं आहे.... पर्याय नाही म्हणून ही प्रेम करताना.....!!!

अरुचा मेकप आणी साडी मागच्यावेळेस जमली होती यावेळेस गन्डलय सगळ, थोराड दिसतेय.

भरत.. Lol
पण खरंच..तो आशुतोष लैच वंगाळ दिसतो पघा.... अजाबात सोभत नाय अरुंधतीस्नि...

शुभ प्रभात, मोरया:

आज स्पेशल एपिसोड उद्घा टन. देश मुख मंड ळीच पहिले येतात व अन्या कट कट करत आहे. अरुंधती व आशू वकीलीण कामे करत आहेत तर अन्या कांचनला बघवत नाही. हॉल छान सज वला आहे. गोड गिट्ट आली. वकीलीण छान साडी नेसली आहे कांचनने दिलेली. अरु सर्वांना विद्यालय दाखवत आहे. अनघाचे पोट काही दिसत नाही आहे!!

अन्या कुठेतरी जातो व अभी एका कोपर्‍यात बसून आहे त्याला काही शाळा बघायची नाही. अरु व आशू आई अप्पांना नमस्कार करतात सो संस्कारी. अप्पा लगेच इथे सरस्वतीचा वास आहे व्गैरे. वास उदबत्तीचा आहे. अनीश यश ची सहकार्याची जोड चालू आहे.

अनीश सहजच इशा कडे चालत जात आहे. इशा छान दिसते आहे. पन ते बघून अन्या हळू हळू जास्तच गरम होत आहे.
लगेच वकिलीणीच्या हस्ते उद्घाटन झाले ( एकदाचे) अप्पा पण बोर्ड दाखवतात हात भार लावतात कापड उचलायला. मग दीप प्रज्वलन
अरुची खळी फोड उठुन दिसत आहे. बाकी साडी मेक अप. अप्पा डोळे फाडून बघत आहे.

आता अवि सर्वांचे स्वागत करत आहे. अब इन्हे ही बोलने लगा क्याकी. एकदम पुणेरी भाषेत योग जुळून आलेला आहे. फारशी गर्दी दिसत नाही.
आता नित्याचे भाष न चालू झाले आहे. तेच तेच दळ न परत पण औपचारिक भा शेत. आशुतोष भावना व्याकूळ होउन बोलत आहे. मागे ते आरु च्या प्रेमात पडले की एक माणूस हे हे हे हे ओ ओ ओरडतो तेच लावले आहे. त्याला बघून अरु परत बावनाप्रधाण होत आहे. आशू कधीच डोक्यात शांपू घालत नाही का?! अमेरिकेत शांपू मिळत नाही वाट्ते.

आता वकीलिणीचे गोड गिट ट परत चालू दोघे एकमेकांना श्रेय देत आहेत. हा कसला डोंबलाचा व्यावसायिक सर्व तर नित्याच करतो. सहीठोक व्यावसायिक आहे. तिची साडी व ब्लाउज खरेच मस्त आहे. बनारसी सिल्क आहे बहुतेक बघितले पाहिजे मिळते का ते. सर्व कोअर टीमला वर बोलवत आहे आज्जी. ओव्हर ऑल हॅपी माहुल. अन्या मान खाली घालून आहे. ह्यातही त्याला काहीतरी वाइट दिसत असावे.

तो भैताड निखिल पण नटून बसला आहे पण कंट्रोल मध्ये आहे बहुतेक. इथे पण अनघा सतरंजीत पाय अड्कून पडेल कि काय.

आता अरुचे उसासत भाषण चालू आहे. सुराचे मह्त्व ती उरी पोटी सांगत आहे. इथले विद्यार्थी युक्रेन रशिया बॉर्डर वर शांतता राग गाणार आहेत. अजून विद्यार्थ्यांसाठी आवाहन करत आहे. तिची साडी पण छान आहे जरा डिझायनर आहे. आता अनिश व अरु एक प्रार्थना गाणार आहेत. सरस्वतीचा आशिर्वाद. आता गाणे. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवं सुंदरा. छान आवा ज लागला आहे अरुचा.
अप्पा वा वा करतात तर अन्या बघतो त्याच्या कडे

पुढील भागात नेहमी प्रमाणॅ प्रेस पत्रकार यशच्या केस बद्दल विचारते. व यश उत्तर देत आहे. काउन्सेलिन्ग वर्क होत असावे. बाकी सर्व अपेक्षित शॉक्ड असे रिअ‍ॅक्षन शॉट देत आहेत.

नित्या नेहमीप्रमाणॅ प्रार्थनेचे अफाट कौतूक. आता नेहमीचाच पत्रकारांनी पाण उतारा करायचा प्रसंग चालू आहे. यश गौरी शायनिंग चालू आहे व इशा अनिश समोर आगावु पणा करत आहे. सुंदर मुलगी फारच खडूस अन्याने डोळे वटारले व हे बारके शायनिन्ग संपवले.

आता आशूचे भाबडे भाषण चालू आहे. उगीच आशावादी आहे हा . काय पण फेकत आहे. संगीत प्रत्येकातच असतं लोकांची स्वप्ने पुरी व्हायला इन्स्टि ट्युट असायला पाहिजेत, लोकांच्या लाजा कमी व्हायला हव्यात. अरु ला प्रश्न विचारले जात आहेत. रोज काय रेकोर्डिन्ग नसते करेन मी सर्वांच्या सहकार्याने. आता खंग्रीमॅन जोरात पुढे आला आहे. अन्या मागे रागाने पुटपुटत आहे. पत्रकार एकदम वर्मावर बोट प्रश्न विचारते.
पण यश काउन्सेलिन्ग घेत असल्याने बरोबर उत्तर देत आहे. माझ्यावर कुठलीच केस नाही . तुम्ही खच्ची करण करत आहात असे तो बोलतो. एक दम आत्मविश्वासाने. व टाळ्या पडतात. इशा रड कुंडीस आली आहे.

अरु उससत यश चे कौतूक करत आहे. मी ही अनुभवातूनच शिकले आहे असे अरु म्हणते. आता हा उगीच फुटेज खात आहे. पब्लिकला शाळा बघायला मोकळे सोडले आहे. ह्याचे क्रेडिट आशूचे आहे असे यश म्हणतो. लगेच आशू खळ्यापाडून मी नाही हो मी फक्त निमित्त आहे वगिअरे आशावादी पुंगळी सोडत आहे.

कांचन आता लगेच लग्नाचे बघा म्हणते.

घरी आलेली आहेत लोक्स. अनघा दमली असेल. अप्पा गाणी शिकायचे म्हण त आहेत त्या शाळेत व कांचन लगेच नाही म्हण ते. खूप खर्चीक आहे प्रकरन म्हटल्यावर अन्या लगेच हा दोन नंबरचा पैसा आहे म्हणतो. व त्यावरौन वाइट साइट बोलत आहे. त्याच लायनीत पुढे अरु ची करीअर पण आडमार्गाचीच आहे. म्हण तो. संजना गौरी कडे झोपणार आहे कारण निखिल.

अप्पा अनघाची चौकशी करत आहे . अनघा लगेच ताई ताईला बघून छान वाटले. अधि काराची पोझिशन.
आता अरुचे कौतूक वेग्ळ्या लोकेशनला चालू आहे. नित्या सुरुवात करतो. अरु एक डायलॉग हसत हसत टाकते. अरु दमलेली आहे व तिला आराम करायचा सर्व सल्ला देत आहेत.

आता आशूला वस्तुसंग्रहालय चालू करायचे आहे. नित्या लगेच कामाला लागत आहे. गोडगिट्ट बाई ह्या थोराडांची नजर उतरवत आहे. किती तो भाबडे पणा. आशूला आवडत नाही. व ती लगेच वडील कसे अचानक गेले. ह्याव त्याव टेप लावते.

पुढील भागातः आशू अरू प्रेम इतर ठिकाणी व्यक्त होत आहे.

तिची साडी व ब्लाउज खरेच मस्त आहे. बनारसी सिल्क आहे बहुतेक बघितले पाहिजे मिळते का>>> अर्र! आता साडी बघण्यासाठी एपि बघावा काय?? अमा, स्क्रीनशाॅट डालते क्या?

आजच्या भागात पण तीच साडी व वर एक गोल्ड चेन मध्ये डायमंड पेंडंट आहे. लाइट चिं तामणी कलर मध्ये बुट् टे आहेत.

शुभ प्रभातः

वकीलिणीला एकदम परत भरुन आले आहे. ह्यांचे स्वप्न पूर्ण झाले वगैरे गहिवरत गहिवरत धन्यवाद देते व एक मेकांना मिठ्या आज वीणा ची आठवण आली यश व अनीश बोटे कशी छान मोडली दृ ष्ट काढताना ते हावभाव करत आहेत इन केस तुम्ही मिस केलेत तर. नित्या माझ्यापोराला सोडू नकोस अरु माझ्या पोराला सोडू नकोस आता अरुला परत बॉस विश्रांती घ्यायला सोडत आहे. लव्हली डील. तू आजारी पडू नकोस. मग नित्या आशूला चिडवत आहे.

अनीश अरुंधतीला काकू बनवत आहे. अरु चालत जायचे म्हणत आहे. पाउस हवा छान आहे. म्हणे. रिक्षा करत नाही. अरु के वढी मोठी जबाबदाअरी. ती पहिली आश्रमाचे कामकाज बघायची कारकुनी नोकरी सोडली का? कुठे आहेत ते लोक्स. पण इथे अरु चे स्वगत चालू आहे.
परत परिस्थितीचा अनेकाव्यांदा आढावा. काय मेक प काय केस काय गालावरचा फोड एकदम ओक्के क्लोज अप. यश घुमवुन फिरवून तिला आशू शी पाट लावायची सुचना देत आहे.

हा माणूस वेगळा आहे म्हणे. बरोबर नेस्ले सिरीलॅक जॉन्सन बेबी पावडर चार दुपट्या चा हुंडा दिला तर बास होईल. आई तू विचार कर.
संजना गौरी कडे जायला निघत आहे. अन्या उखडलेला तसाच आहे. तिला हे सर्व झेपेल का व्गैरे खुसपटे अन्या काढत आहे. अरु गावंढळ आहे.
तो तिचे काम करतो ती फक्त मिरवते. संजना पण परत आढावा घेत आहे. एक कलमी अरु कार्यक्रम आशू तिला प्रोत्साहन देतो तू का नाही असं करंत. अन्याला माण सात किती पोटेन्शिअल आहे ते कळतं म्हने मीच तुला शिक वले सर्व नाहीतर तू मठ्ठ होतीस.

संजना हे सर्व हसण्यावारी नेत आहे अन्या सुक्कड बोंबील तसेच प्रतिक्रिया देत आहे. परत डिवोर्स पेपर्स साइन कर म्हणून टुमणे लावत आहे.
पण ती आशा धरुन आहे. दुसरे लगन मोडायचे नाही. ह्या घरात मला सिक्युअर वाट्ते ही काय सोडत नाही त्याला तिचे त्याचया वर प्रेम आहे म्हणे अजूनही.

हिकडं आशू साहेब स्वप्न रंजन करत आहेत चस्मा काढून. अरु च्या इमेज डोळ्यासमोर आणत. तो मागचा माणूस हे हे करत सुटला आहे. पण अनीश आला आहे. हा धगुर्डा त्याच्या शेजारी झोपतो?! बेडरुम नाही का बंगल्यात. परत अनी श परिश्तितीचा इंदुरी आढावा घेत आहे.
आशु परत चिकट गूळ चालू झाला आहे. अरुंधती कुटुंबाचे बॅक बोन आहे. खूप समजुतदार शहाणी आहे. परत ह्याची उच्च कोटीची भलामण चालू झाली. काका लकी आहे. परत अरु किती छान शिकवते ती फार अनझुमिन्ग आहे तिला तिचे पोटॅ न्शिअल माहीत नाही. ती एकून फार ग्रेट आहे. काका काका करत हा धोतरात शिरू बघत आहे. तुमची जोडी फार छान आहे म्हणे. इट इज क्वाइट ऑबव्हिलस अरुला कधी भेटलास पहिल्यांदा लव्ह अ‍ॅट फर्सत साइट का म्हणे. अबोध बालकास ते प्रेमच होते का ते माहीत नाही म्हणे. कुच्छ प्रोब्लेम है क्या. एक वेणी टिकली साधे हसणे व्गैरे. गाणे म्हण ताना ती एकदम स्टेजची राणी दिसायची म्हणे. इशक का एक तर्फी इझहार. अनीश कांचन मोड मध्ये लग्न जमवत आहे. हे सर्व झोपायच्या आधी. हे हे वाला फारच पुढे हे हे करणार नक्की.

पुढील भागात निखिल घरी आला आहे कारण गौरी यश अनीश इशा ते मुंबई दर्शनला गेले आहेत. हे ऐकून अन्या खवळत आहे. अरु ला फोन करतो तर अशू घेतो तर अन्या परत क्ष्क्ष कपाळात. आॠ त्याला मी काही मुलांना बोलणार नाही असे निक्षूण सांगते. मागे नित्या किचन परेन्त पोहोचून चहा बनवत आहे बहुतेक.

सिरीअसली मला कोणीच घरात इतके किचन परेन्त आलेले आव ड त नाही. बॉस असेल तर तो हपिसात. पर इसका कुच अलगी दिकरा

अरे ह्या नंतर एक विठोबा माउली सिरी अल आपोआप लागते तर त्यात शिवपार्वतीचे काही सीन चालू होते तर आपला नित्या तिथे शिव शंकर झालेला आहे. मेकप बदलू न तेच हाव भाव. जटा कमंडलू साप चंद्र सर्व एकदम ओके. व गोरे गोरे शंकर पार्वती. पार्वती दमलेली आहे. व तिला विश्रांती हवी आहे.

शुभ प्रभातः अनीश खरेंच काका काका मोड मध्ये आहे. ये शादी होकेही रहेगी मोड मध्ये काकाच्या मागेच लागला आहे. म्हणजे ह्याला इशाला अ‍ॅक्सेस मिळेल. आशू आरुचे गाणे ऐकत अनीशला गप्प करुन झोपी जातो व अनीश दाढीतल्या दाढीत हसत आहे. इकडे अरु व अनीश रियाज करतात. एकच चीज येरी आली पियाबिन. येरी आणि आली दोघी पिया बिन आहेत हे बरोब्बर टिपले आहे दिग्दर्शिकाने. अनीश पहाटे व संध्याकाळी रोज अरु कडे रिया जाला येइन म्हणतो. किती चिकट आहे.

बेल वाजते तर आशू इशा यश व वकीलिणीने एक मोठा डब्बा घेउन आले आहेत. इशा यश भांडत आहेत. इशाचा कर्क श आवाज. आशू आज व्हाइट जॅकेट घालुन आला आहे. रोज इकडे यायला निमित्त हवे असते. इशा अनीश शी भांडत आहे. आशू तू बरी आहेस का म्हणतो. व होईल तित्का आराम कर. मजा कर मग ये ऑफिसला म्हण तो. आता अनीशला मुंबई दाखवायची आहे ते काम गळ्यात घालत आहे. अरु मुलांना मुंबई दर्शन करायला घेउन जायचे गळ्यात टाकते. यश गौरीला फोन करतो.

इकडे अनघा भाजी निवडत फोन वर व्हिडीओ बघत आहे. जो अरु ने पाठवला आहे व अन्या आजी आजोबा एकत्र हसत आहेत तिला.
अभी त्याचे विचार मांडत आहेत. निखील पण आला आहे. व खोड्या करत आहे आजी करवादते नमस्कार केला नाही मग संजना नमस्कार करायला लावते. अप्पा नको नको म्हनून घेतो.

आता बराच वेळ मुंबई दर्शन् ट्रिप तरुण मुलांचा डबा लेखिकेने उघडला आहे. कार मध्ये जाताना भांडण, कार मध्ये गप्पा.

अन्या वैतागला आहे. उगीच चिड चिड. अभी माना वळवत हो हो करत आहे. आरु ने कशी पर वान गी दिली म्हणून उगीच भांडत आहे. इशा इशा एकदम अमरीश पुरी मोड

प्रोमो मध्ये तेच. परत इशा मुलाबरोबर एकटी व ती भांडत आहे अनी श शुड हॅव नोट कम देअर ही कोणताही आळ घेउ शकते. ती त्याच्याशी भांडत आहे. अन्याचा अरु ला फोन आशूवर वैतागणॅ मागे नित्य चहा बनवत आहे.

आशा अननीश ट्रॅक घाईघाईत आणि जबरदस्तीचा आहे.

दुसऱ्या शहरातून आलेल्या मुलाला मुंबई ई दर्शन घडवायचं तर त्यालाच काय चालवायला सांगतात?
नक्की कुठे फिरवणार? खरं तर लोकल ट्रेनने नेलं पाहिजे.
हे लोक वडापावनंतर पावभाजीची गाडी दाखवायला नेणार असतील.

अप्पा अन्या इशा का गेली म्हणून भांडत आहेत. अन्याला ती अनिश बरोबर गेली हे आजिबात पसंत नाही. संजना त्यांना परत पाठवायसाठी गौरीला फोन करेल म्हणा ते पण फोन लागत नाही आहे. आता अन्या अरु ला फोन करत आहे.

आशू नित्या आरुला त्रास नको म्हणून सर्व कामे घरी घेउन आलेली आहेत. हा सिईओ आहे का ही? का त्या निमित्ताने घरी यायचे. ते ही तिला त्रास नको शरीराला म्हणून नित्या चहा करत आहे व ही खोलीत गेलीली आहे. अन्याचा फोन शेवटी आशू घेतो. अन्या परत शिव्या घालत आहे.
अरु हात पुसत येते व फोन घेते. तू मला विचारले पाहिजेस म्हणतो अन्या. फारच करवादत आहे.

आता अरुचे परत बीपी हाय होईल. पण नित्या तिच्या समोर चहा ठेवतो.

ही मुले नॅशनल पार्क मध्ये आलेली आहेत. डेंजरस जागा. इशा अनीश टोका टोकी चालू आहे. आता हे चौघेच घन्या जंगलात आहेत. नक्की पाउस येइल बॅटरी जाइल व इशा अनीश व यश गौरी वेगळे होतील. रात्र होईल असे काही ही होउ शकते.
अनीश तिला फोटो छान येत आहेत म्हटल्यावर इशा अपसेट होते. व निघून जाते गौरी तिच्या मागे. यश अनीशला थोडक्यात सर्व सांगतो.
मागे खंग्री कोरस चालू आहे. अनीश ठोंब्या आहे. तिला लगेच सुधारायचे काम हाती घेतो. काकाने डोक्यावर हात ठेवला आहे वाट्ते.
हिला पण काउन्सेलिन्ग ला पाठवता येइल की.

इकडे नित्या किचन मध्ये अगदी मोलकरणीच्या सारखे हातचे काम असल्या सारखे वावरत आहे. हे अरु ला चालते का. अरु कपाळाला हात लावुन बसली आहे. व आशू नेहमी प्रमाणे समंजस पणे समजूत घालत आहे.

आता अविनाश भावोजी नाटकातल्या सारखी एंट्री घेउन येतात. ही हाय लेव्हल कमिटी असल्याने हा ज्युनिअर नोकर का आला आहे मध्येच.
वहिनीची चौकशी करत आहे म्हणे. ह्याला पण डेली टाइप जॉब नाही का? ही अवीला घरी पा ठवते. हा लगेच तोंडदेखली आशूची परवानगी घेतो.

इक डे इशाला पर त सर्व आठवत आहे. एका परी अन्याची काळजी बरोबर आहे. गौरी येउन पोहोचते. ही मुलगी कायम डेंजरस संकट प्रोन जागी एक टी का जात असते? अनीश तिला सॉरी म्हणायला येतो परत इशा हुंदके देत आहे इथे भाग संपला.

नेक्स्ट भागात अन्या व यश भांडत आहेत. आई आशूची मैत्री वगैरे अवघड प्रश्न यश सोडवायचा अयश स्वी प्रयत्न करत आहे.

शुभ प्रभातः इशा अनीश रडका संवाद परत चालूआहे. अगदी चिरकत आहे इशा. अनीश वर पण ती खार खाउन आहे. आता बदड ते का ती त्याला. पण एकदम साउथ बाँबे टाइप शॉट आहे. अन्या फोने लागत नाहीत म्हणून तडफडत आहे. मुले आपल्याला काही विचारत नाहीत. अरुंधतीला काय कळते ही एक थीम . सर्व इशावर अ‍ॅटेक होईल म्हणून मुलांना धाक च नाही म्हणून बोटे मोडत आहे. अनीश घरचा नाही अभी परत मध्येच बोलत आहेत. ही मुले पंचविशीची तर नक्की झाली आहेत. उग्गीच टीपी चालू आहे. नाहीतर तिचे एकदा लग्न लावुन द्या . हे आशुतोष केळकर व अनीशला सोडनार नाहीत.

इकडे इशा किंचाळून झाले की अनीश समजुतदार पट्टी सोडत आहे. मागे जाउन बसतो म्हणे. हा तिची पंचिंग बॅग व्हायला तयार आहे म्हणे.
ह्याला इशा स्मार्ट ब्रेव्ह वाटते. मला तुझ्याबद्दल खूपच रिस्पेक्ट आहे. तितकेच असा सुजाण डायलॉग बोलवतो. जातो जातो म्हणत किती बोलत आहे हा.

आता अन्याचा फोन लागला. ओरड ताहेत. हे मुले बोरिवली नॅशनल पार्क मध्ये आहेत म्हणे. यश लगेच आई ठीक आहे ना विचारतो. लगेच इथे या म्हणतो अन्या. म्हणजे काही न घडता एक एपिसोड कसा पाडायचा ते बघोन घ्या. अन्या आता अरु चा फोन आशू ने घेतला म्हणून उखडला आहे.
तेच तेच बोलत आहे. अवी समजावुन सांगत आहे. पण खंग्री मॅन लपून छपून डबे वाजवत आहे. व्हायोलिन वाले वेडे होत आहेत. संजना मध्ये येत आहे. तिला अन्या मध्ये बोलु नकोस म्हणत आहे.

लगेच आजी वडिलांना जे आव्डत नाही ते आम्ही करत नसू. नवरे गप्प करतात म्हणे. आपण ऐकायचे ह्याला काय अर्थ आहे? अन्याचे बीपी नक्की २०० च्या वर गेलेले आहे. अवी ला पण जोडे बसत आहेत. बापाची काळजी फारच वाहून चालत आहे. देशमुखांचे घर केळकर चालवू शकत नाहीत हे आतले दुखणे आहेत. अरे अर्धा तास हेच घोळून घोळुन चालले आहे. एकत्र कुटुंबाला काय अर्थ म्हणे अप्पा. आली एकदाची मुले. परत तेच पहिल्या पायरी पासून चालू आहे. तो अनीश तर तिशीचा दिसत आहे.

इशा परत रड के तोंड, गौरी वाकडे तोंड यश चांगले बोलत आहे. अन्या मुलांना कंट्रोल करायला बघत आहे असे यश म्हणतो. अन्या तालिबानी
वृत्ती दाखवत आहे. मला जास्त कळत आहे. अनीशला हाकलून द्या व त्याचा नंबर डिलीट करुन टाका अश्या सूचना देत आहे. यश आई तशी नाही आहे. असा माइक ड्रोप संवाद टाकतो.

अनीश अरुच्या घरी येतो. व परत शाळेचे काम चालू आहे. वर्शा कडुन डबा येणार आहे इशा ला अरु बोलवुन घेणार म्हणे. तीच भेटते का गौरी ला बोलवुन घ्यायचे. किंवा एकटी राहिली तर काय फरक पडतो आशू येइलच पायाशी बसायला.

प्रोमो मध्ये मुले वर डिस्कशन करत आहेत. व अप्पा अन्याची साले खाली काढत आहेत.

अनीश आणि ईशाला जबरदस्तीने एकमेकांच्या गळ्यात बांधताहेत. काल ईशा एकटी राहायला गेली असताना अनीश तिला म्हणतो की यशने मला सगळे सांगितले आहे. चुकीचं वाक्य. चुकीच्या माणसाकडून. चुकीच्या वेळी.

अरुंधतीला आलेला अनिरुद्धचा फोन आशुतोषने घेणे हे सुद्धा फार ओढून ताणून आले. ती फक्त चष्मा आणायला गेली होती. तिने कॉल बॅक केला असता.
किंचाळण्याबाबत ईशापाठोपाठ नितीनचा नंबर लागेल.
आणि ऑफिस कामाबाबत सगळ्या मराठी मालिकांप्रमाणे इथेही उजेड म्हणजे खरंतर मिट्ट काळोख. अरुंधती नक्की काय काम करते की तिच्याशिवाय एक दिवस ऑफिस चालू शकत नाही? त्यासाठी प्रोप्रायटर आणि त्याचा उजवा (आणि डावा दोन्ही )हात तिच्या घरी काम घेऊन जातत?
हे लोक बिल्डर आहेत. तर जागा बघणे , बांधकाम कसे चालले आहे ते पाहणे, घरे विक ली जाणे असले उद्योग करायला हवेत. संगीत विद्यालयाला नितीन ट्रस्टी!
आणखी कलाकार परवडत नाहीत का यांना?

अवांतर - मायबोलीवर लिहिताना गेले काही दिवस मला स्पेलचेकसारख्या सगळ्या शब्दांखाली लाल रेषा उमटताना दिसतात. हे बहुतेक फक्त डॅस्कटॉपवरून होतंय.

भरत..: हाहा:
किंचाळण्याबाबत ईशापाठोपाठ नितीनचा नंबर लागेल...
पण नितीन कुठे किंचाळतो?
मला तर तो एकदम जोवियल वाटतो...

शुभ प्रभात लाडक्या मुलांचे राग व्यक्त करणे चालू आहे. रिवोल्ट रिवोल्ट. डोक्यात राख चालू आहे. इशा रुम मध्ये बसून राहणार आहे. बाबा चुकीचे वागत आहेत. अभीचे दोन फोन वाजतात. अनघा जेवायचे निमं त्रण देउन खाली या म्हणते चार घास पोटात गेले की शांत व्हाल म्हणे. अगदी पन्नाशीच्या दशकातले वाक्य बोलतत काउन्सेलर काकु.

नित्या अनिश आशू बोलत आहेत. अनीश चा मूड सुधरवायचा हे जोकर्स प्रयत्न करत आहेत. पण हा इशासाठी दिवा घेउन च बसला हाए. आशू मुंबईच्य उकाड्यात जीन्स टीशर्ट जॅकेट का घालतो. हे काही सान होजे नाही. पण हा अमेरिकेतून आलेला आहे कधीतरी. नित्या मोठ् मोठ्याने हसत आहे. मुंबी पुणे मुम्बी चे गाणॅ लावताfunction at() { [native code] }अ त व मिसळ खायला जातात.

इथे घरी संजना पाने पुसत आहे व अन्या तेच आर्गुमेंट परत पुढे चालू करत आहे. अनघा स्वयंपाक आणून ठेवत आहे जेवायची वेळ. अप्पा त्याची पिसे काढत आहे. हे सर्व आईने बघायला पाहिजे पण ती नाही म्हणून बापाला करावे लागते आहे. म्हणे. अन्याला एकदम जबाबदारीचे बोंडु डोक्याला फुटले काय. विशीतल्या पब्लिकला काय शिकिवणार हा.?

अप्पाचा फोन वाजतो. ह्याला कुठे गावी जावे लागणार आहे. बायको आजारी असल्याने गण पती त्या काकांच्या कडे बस णार म्हणे. कांचनला प्रवास पटणार नाही म्हणे कोकणा परेन्तचा.
यश वैतागुन आईकडे येतो व तिथेही तीच किट किट घर सोडायचे म्हण तो. खरेतर हे सर्व वेगळे झाले तर सुखात राहतील. इशा अमेरिकेस शिक्षणाला, अभी अनघा त्यांच्या फ्लाट वर व यश गौरी गौरी कडे. अरु अरु क डे. पण म ग आपण कसली पिसे काढायची.

इतके करुन शेवटी अरुचे सोलुशन काय तर घरी गण पति आणायचा.

कालचा भाग भयंकर शब्दबंबाळ. अनिरुद्धची आणि अनिशची बडबड ऐकून डोकं उठलं.
मुंबई दर्शनसाठी नॅशनल पार्क आठवला हे एक बरं केलं. पण हे लोक बोरिवलीत राहतात. मग अनिरुद्ध इतक्या लांब का गेलात असं का विचारतो?
शिवाय ती संगीतशाळा महिलाश्रमाच्या जवळ कुठेतरी आहे. त्या आश्रमाचं ऑफिस मात्र बोरिवलीजवळ. कुठे होता तो आश्रम?

गणपतीचं सूत कांचनबाईंनी मागे कधीतरी सोडलं होतं. त्यानंतरच ते अरुंधतीला घेरी येण्याचं प्रकरण झालं. म्हणजे या लोकांनी एवढे दिवस कालनिर्णय थांबवून ठेवलं?

<खरेतर हे सर्व वेगळे झाले तर सुखात राहतील. इशा अमेरिकेस शिक्षणाला, अभी अनघा त्यांच्या फ्लाट वर व यश गौरी गौरी कडे. अरु अरु क डे. पण म ग आपण कसली पिसे काढायची.> बरोबर. आणि यांची पोटं कशी भरणार?

आमची पोरं मुंबई दर्शन म्हटले की पहिले छुट टाउन नरीमन पॉ इन्ट. झांगीर आर्ट गॅलरी वरळी नेहरू सेंटर. बांद्रा वर्ळी सी लिन्क. मग कुठे तरी मजबूत खादाडी. दुसरा ऑप्श न बांद्रा/ नाहीतर जवळ म्हणून पवई तिथे बोलिन्ग नाहीतर अंधेरीत स्विमिन्ग टेनिस. नाहीतर कोणाच्या तरी घरी आपाप्ल्याच काय काय गेम्स खेळतात, खाणे मागवतात कॉकटेल्स बनवतात. बोर्ड गेम्स सुद्धा खेळतात. इंपोस्टर गेम लॉक डाउन मध्ये फार पापविलर होती. माझे फक्त एकच म्ह णणे असते मी व कुत्रा साडेआठाला झोपणार. त्यामुळॅ मला ही पोरे पण तशीच जातील असे वाटलेले. पणे हे गेले एकांतात पार्कात व्हेरी डेंजरस. इशा व यश फारच लग्नाळलेले आहेत

शुभ प्रभातः काल मुंबई ठाणेकर पावसात भिजले कि नाही. आम्ही दोघी हपिसात व कुत्रे एकटे घरी. तिला विजेच्या कडकडा टाची फार भीति वाटते. मग धावत पळत गेले एक मेली रिक्षा मिळेना शॉर्ट डिस्टन्स. जाताना मुलुंडच्या राजाला ती सुखरुप असूदे म्हणून प्रार्थना केली. ठीक होती.

आजचा भाग सुरू: अप्पा गावी जायचे . त्यांनी पुजेचे सामान वगैरे आणले आहे तर आजी किटकिट करत आहे. पण तिने जावेसाठी साडी आणली आहे व तिला पण कारने जायचे आहे.

आजी ला जायचे आहे पण संजनावर घर सोपवायचे नाही. मग संजनाची वटवट चालू आहे. पाच मिनिटे. आजी उखडलेली कधीच समा धानी नसते. पण संजना उलट उत्तर देत आहे. आज संजना एकदम कडक सेकंड इअर ड्रेस मध्ये आहे. कानात काय दोन स्टीलची वेढणी घातली आहेत. लैच मॉडर्न. वेस्टर्न ड्रेस वर सिंदूर कपा ळी व मंगळसुत्र. इतके दिवस ही गप्प होती आज जरा जास्तच तोंडची वाफ दवडते आहे. प्लीज प्लीज दोन वाक्यात आले की दोन दिवस्सांनी दोन वेळा थँक्यु थँक्यु येइल नक्की बघा. आजी काही बात सोडायला तयार नाही. आजी पिढी चिकटवायच्या कामात दिरंगाई नको म्हणून घरीच राहील.

इकडे अरु कडे यश इकोफ्रेंडली मुर्ती आणणार होता तीच ही आहे का? भारतीय संगीत वाल्या ला काही काम नव्हते त्याने तेव्ढ्या वेळात एक गाणे कंपोज केले आहे. अरुच्या अल्ब मात घालायच्या लेव्हलचे आहे. कोरस पण आहे. गणेश स्तुती. ही आधीच रंगवलेल्या मुर्तीवर कलरिन्ग करत आहे. तेवढ्यात बेल वाजली. लगेच आशू नित्या आलेलेच आहे. रोज बेल घालतो घरी बॉस. त्यात खोटी नाटके. अरुला चहा बनवायला पाठिवलेआहे.

ही मुर्ती म्हणे अरु ने बनवली एका दिवसात व रंगवली पण. इको फ्रेंडली आणू असे यश म्हटला होता त्याचे काय?! अरु ने लगेच घरगुती जस्टिफिकेशन दिले अगदी घरगुती. सो प्रेशस. आशू ला लगेच फार छान मुर्ती वगैरे चालले आहे. अरु ने मोदक जेवण करयचे ठरिवले आहे
व वकिलिणीला नित्याला बोलवले आहे जेवायला.

यश व अनीश बाहेर गेले आहेत. हा लाउड नित्या दूर झाला तर आशूची प्रेम कहाणी पुढे जाइल. तितक्यात यश व अनीश आले आहेत व डेकोरेशन चे सामान आणले आहे. नित्या तिथे पण लुडबुड. ह्याचे एकदा दहा दिवस पोट बिघडावे. पब्लिकला जरा आराम. आशू ट्राइन्ग टु बी बॉस. ह्या ह्या लैच बॉसी आहे बाळ.

अनघा अभी बेडरुम ही लांब ओढणी. केस लांब फुल ड्रेस अशीच आहे. घरात राहते तर इतके कपडे का घालते. गाउन नाहीतर शॉर्ट टीशर्ट का नाही घालत. हिला काही वेगळे जड वाटत आहे. आता दोन मिनिटात ही तायी ताई चालू करेल. सर्व एकांताचा पचका. होईल. तिला वासाने कसे तरी होते म्हणे. फुकट कौतूक. चोर ओटी कार्यक्रमाचे ती वाट बघत आहे. अजून सहा महिने हे प्रकरण चालू राहील. ( तिकडे किंजलच्या नवर्‍याने तोषुने बायको प्रेगी असता ना राजकोटला जाउन लफडे केले. ते सासुने पकडले व हाणा मारी चालु आहे. ) अभी परत सवता सुभा
डिस्कशन चालू आहे. कारण हिने ताई ता ई टेप चालू केलेली आहे. अभी आईने वेगळे जीवन चालू केले आहे ते तिचे ती काही ही करूदे काही एक बेडरुम संवाद रोमांटिक चालू आहे ते कय मी बघाय नाय. इथे टायपत आहे.

लगेच आजीचे अनघाची चोर ओटी: इशा तयारी करत आहे. रांगोळी काढत आहेत. यश सांगतो आईकडे गणपती आहे. आजी लगेच मोडता.
तिची तब्येत नाजूक आहे. इशा म्हणते सर्व गावी जाउ. आजी म्हणते बाळ झाले की आपण सर्व देव दर्शनास जाउ.
इथे भाग संपला.

प्रोमो मध्ये आशू नित्यालाच विचारतो जवळ कोणते कॉफी शॉप आहे का . अरुला घेउन जायचे आहे. ह्याला गुगल मॅप नाही वाट तॅ माहीत.
व तो काहीतरी सिरीअस बोलायच्या मागे आहे. पण अरुच्या चेहर्‍यावर मठ्ठ ४० वॅ ट दिव्याचे भाव आहेत. नक्की बघा. आतातरी हिने केस कापावेत ड्रेसेस घालावेत की. पण नाही. घ र गुती. त्यातच चार्म शोधते आशू बाळ.

आज संजनाच्या तोंडी इथली वाक्ये होती - कांचन दिवसभर खुर्चीत बसून असते. खुर्चीत बसून अनघाची काळजी घेणार का?

आजच्या भागात वाजलेले गाणे
https://www.youtube.com/watch?v=DgVsg9Tkcew दोन वर्षे जुने आहे.

अजून भाग लोड झालेला नाही. काल हपिसातुन परत येताना लिटरली पाण्याच्या वेगाने वाहणार्‍या नद्या बघितल्या. ऑफिस शेजारच्या मंदिरासमोरचा रस्ता भरून वाहात होता. मग परत चालत पुढे गेले व कशी बशी रिक्षा मिळाली अर्धे अंतर गेलो मग चालून पुढे घरी. त्या रिक्षावाल्याचा मुलगा शाळेत का कुठे अडकला होता त्याला शोधायला तो गेला. मग काल रात्री कुत्रा फिरवलाच नाही पोहे बनवले व गरम खाउन झोपी गेलो. काय ही वेदर!! आज काहीच झाले नाही असा सूर्य उगवला आहे. पहिले कुत्रे फिरवून आणले व आत्ता लावुन बघते तर अजून लोड झालेला नाही. आज दिवस भर घरीच. जय मराठी कंपणी.

अनुपमा लावले आहे. बेबी घरी आले. मुलगी असल्याने तिचे कौतूक करायचे शास्त्र पार पाडत आहेत. स्टार प्लस सिरीअल मध्ये जास्त नाटकी पोषाखी पणा असतो. मुले फार लाडीक बोलतात बायका वेगळेच इंग्रजी हिंदी टाइप बोलतात. बा/ सासवा जास्त टोचुन बोलतात. अनुपमा तर दोन्ही घरी एकटीच्य खांद्यावर असल्यासारखी मैं करुंगी मैंकरुंगी करत असते. त्यांचा रोमान्स पण कायम चालू अस्तो. तो नवरा आशू
सारखा पूर्ण आकंठ प्रेमान बुडालेला आहे.

इथे अनुजचा भाउ व वहिनी काड्या करत असतात. हे अगदीच वाइट आहेत.

अनुपमाच्या घरी किंजल वगैरे लोक्स अगदी गुलाबी गुलाबी गोरे आहेत. मी अश्या गुजराती बायका बघितल्या नाहीत इथे. ही उगीच फेक गुजराती अ‍ॅक्सेंट ने बोलत असते. तोसू ची सासु एकदम कडवट बोलते कारण जावयाचे लफडे तिला माहीत आहे. ते बाळ आधीच पाळण्यात घालून फिरवत आहेत. ते कमीत कमी तीन चार महिन्याचे वाट्ते. व्हेरी विचित्र फील्स. तोषू एकदम बोकडा सारखा दिसत आहे. लगेच जॉइन्ट फेमीलीचे कौतूक. इथली अनघा ही. हिचा आय मेकप पर्फेक्ट आहे त्यात अनघाचे महिन्याचे बजेट बसेल.

राखी मॉम, दादा बडी तोसु पापा छोटी अनू अशी अनेक नावे आहेत. इकड चा अन्या निवळलेला आहे जरा. अर्धा तास दोन तास बाहेर गेले तरी एकमेकांना मिठी मारुन आय मिस्ड यू म्हणतात. फारच नकली. अनुजला पन बोलवणे आहे. लगेच कपड्यांचे डिस्कशन उद्या काय घालायचे कसे नटायचे. वगैरे चालू आहे.

दर वेळी नवे व function at() { [native code] }इशय महाग कपडे साड्या दागिने कारण हे श्रीमंत आहे.त. अनु त्याला कपडॅ घालताना मदत करते तर त्याला राग येतो. ही लगेच दर वेळी सोरी सोरी सोरी करत आहे. कोणा ला सारखी सॉरी म्हणत असते.

ह्यांच्या घरी काही ही फंक्षन असले की त्यानंतर तमाशा अस्तोच अस्तो ते उद्या होईल बहुतेक. तोषुची हजामत होणार. चार लाफे बसतील.

Pages