Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसल्या तरी गंभीर आजारीची
कसल्या तरी गंभीर आजारीची नांदी दिसते आहे.>>> मलाही तसेच वाटले. पुढे काय वाढून ठेवले आहे आपल्यासाठी .. देव जाणे!
संजनाचा मुलगा निखिल हरवला.
संजनाचा मुलगा निखिल हरवला. घरातून निघून गेला. त्याला अरुंधती, आशुतोष आणि नितीन शोधून काढतील.
संजनाचं अनिरुद्धच्या कुटुंबियांशी चांगलं जमायला लागलंय. आणि अनिरुद्धचं डोकं दिवसेंदिवस आणखी फिरायला लागलंय. उद्या तो संजनाला डिव्होर्स देईल आणि संजना कांचन, अप्पुडी , अविनाश, यश, अनघा यांना भेटायला इथे येत राहील किंवा इथेच राहील.
भरत...किती ते प्रेम आप्पांवर
भरत...किती ते प्रेम आप्पांवर...!! अप्पुडी म्हणे!
आणि कुठल्याही इमरजंसी ला आशुतोष, नितीन, अरु हेच त्रिकुट कसे काय उपयोगी पडते? त्यांना बाकी काही कामं नाहीत? इतका (?) मोठा बिझीनेस सांभाळून?
संजना तर सेम अरुंधतीच्या वळणावर जातेय. ..फॅशनेबल अरुंधती!
पुअर अन्या!
हे सगळे लोक राखी पौर्णिमेला
हे सगळे लोक राखी पौर्णिमेला अरुंधतीकडे गेले तेव्हा तिने दार उघडताच त्यांनी कल्ला केला. तेव्हा अप्पांनी उड्या मारल्या. म्हणून ते आता अप्पुडी
दिवसेंदिवस हास्यास्पद होत
दिवसेंदिवस हास्यास्पद होत चालली आहे ही मालिका..
लेखिकेची आणि आशुतोषच्या
लेखिकेची आणि आशुतोषच्या ड्रायव्हरची स्मरणशक्ती दांडगी आहे.
मागे आशुतोष आणि अरुंधती कुठेतरी उभे राहून गप्पा मारत होते तिथे निखिलने येऊन इमोशनल ड्रामा केला होता. हे ड्रायव्हरने बघितलं आणि तो मुलगा त्याच्या लक्षात राहिला.
स्वतःची खोली असताना अनिरुद्ध आणि संजना हॉलमध्ये लॅपटॉप घेऊन कशाला बसतात?
निखिलने कांचनची खोडी काढायचा प्रसंग पुढचा ड्रामा घडवायला बळेच रचला होता.
हापिसात अरुंधतीला स्वतःची केबिन नाही, टेबलही नाही. आशुतोषच्याच टेबलशी समोर बसून काम करते.
भरत..
भरत..


पण हॉल मधे लॅपटॉप घेऊन बसणे...हे कॉमन असावे. म्हणजे मीही बसते... त्याने घरात ही लक्ष राहते...आणि काम ही होते!!
तो प्रकाश पहिल्यांदाच इतका पूर्ण प्रकाशात बघितला !!
हापिसात अरुंधतीला स्वतःची केबिन नाही, टेबलही नाही. आशुतोषच्याच टेबलशी समोर बसून काम करते.
हो ना..!!
हापिसात अरुंधतीला स्वतःची
हापिसात अरुंधतीला स्वतःची केबिन नाही, टेबलही नाही. आशुतोषच्याच टेबलशी समोर बसून काम करते.>> लफड्याचं आहे हो ते. ती कायम नजरेसमोर लागते बॉसला.
नितीनलाही नाही स्वत:ची केबिन.
नितीनलाही नाही स्वत:ची केबिन. अशूने स्वत:च्या खुर्चीजवळ त्याच्यासाठी खुर्ची ठेवली आहे.
काल निखिल विचारतो तुम्ही दोघे लग्न करणार आहात ना तर त्यावर तसे काही नाही एव्हढेही बोलले नाहीत दोघे.
आज बरेच दिवसांनी बघितली.
आज बरेच दिवसांनी बघितली. अरुच्या गालाला काहीतरी झालंय का , जे मेकअप ने ही लपत नाहीये.
इतके दिवसांनी बघून ही काही मिस झालं फार आपलं असं अजिबात वाटलं नाही.
मिसमॅच सेटींग वाटत होती
मिसमॅच सेटींग वाटत होती डायनिंग टेबल ची. काय ते केस संजना चे बॅक कोंम्बिग आणि स्प्रे करून हलता हलत नव्हते.
दूसरी झी ची नवीन सीरीयल बघावी म्हटलं तर अजूनच बोअरिंग निघाली.
अरुच्या गालाला काहीतरी झालंय
अरुच्या गालाला काहीतरी झालंय का , जे मेकअप ने ही लपत नाहीये.<< गालाला खळी पडण्यासाठी सर्जरी केली असं ऐकिवात आहे, खरं खोटं देव जाणे!!
खळी दिसत होती काही दिवस पण
खळी दिसत होती काही दिवस पण आता खळीचा खड्डा झाला.
पण खळी का हवी? आशु ला मॅच
पण खळी का हवी? आशु ला मॅच म्हणून का?
छान दिसते अरु खळीने....
आशु च फार तेलकट दिसतो....त्याला बदला म्हणा....!! सुबोध भावे कसला क्यूट दिसला असता....!!
छान दिसते अरु खळीने.... >>>>
छान दिसते अरु खळीने.... >>>> बिलकुल चांगली नाही वाटत।
खळी नसावी. काहीतरी
खळी नसावी. काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा. मी आधीही लिहिलं होतं. हे लोक गावाला जाऊन राहिले होते तेव्हा तिच्या गालावर अचानक चिकटपट्टी आली. गरम तेल उडलं असा संवाद टाकला होता. तेव्हाच काहीतरी इश्यु झाला असावा.
सुबोध भावे कसला क्यूट दिसला
सुबोध भावे कसला क्यूट दिसला असता....!! >>>>>>> प्रचंड अनुमोदन. : डोळ्यात बदाम आलेली बाहुली:
आपला तो हा पण चालला असता लोकेश गुप्ते. खरं तर अरूंधतीचा कॉलेज फ्रेण्ड किंवा बॉयफ्रेंड म्हणून कोणीतरी ओळखीचा चेहरा हवा होता. हा नाही बरोबर वाटत, किमान ईला भाटेचा मुलगा शोभेल असा तरी कोणीतरी हवा होता.
सुबोध भावे नेमका ४६ वर्षांचाच
सुबोध भावे नेमका ४६ वर्षांचाच आहे. हो तो शोभला असता. पण कॅरॅक्टर सुद्धा नीट रंगवलेलं नाही. आई च्या पदरातलं कुकुलं बाळ वाटतं ते. अमेरिकेत एकटा राहून उलाढाली करणारा , बडा बिल्डर अजिबात वाटत नाही. किंवा मग हे सगळं नितीनच्या जिवावर आणि नाव मात्र याचं.
खळी नसावी. काहीतरी प्रॉब्लेम
खळी नसावी. काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा. <<< हो, प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणून त्याची खळी झाली असावी!
इकडे अरु आजारी पड्णार आहे.
इकडे अरु आजारी पड्णार आहे. तिकडे अनुजला गम्भीर आजार झालेला दाखवलाय. प्रोमो बघितला एक. नक्की काय झालय त्याला?
Accident झालाय. अनुपमाचा माजी
Accident झालाय. अनुपमाचा माजी आणि सद्ध्याचा नवरा दरीत कोसळले/ एकमेकाला ढकलून पडले. आता तो कोमात जाणार मग हर दिल जो प्यार करेगा मधल्या राणी मुखर्जीसारखा कोमातून सगळं बघणार.
Accident झालाय. अनुपमाचा माजी
Accident झालाय. अनुपमाचा माजी आणि सद्ध्याचा नवरा दरीत कोसळले/ एकमेकाला ढकलून पडले. आता तो कोमात जाणार मग हर दिल जो प्यार करेगा मधल्या राणी मुखर्जीसारखा कोमातून सगळं बघणार. >>>>>> ओहो. मालिकेची पार केकता कपूर झालीये तिकडे.
मालिकेत मीरा जगन्नाथची
मालिकेत मीरा जगन्नाथची एन्ट्री होत आहे(येऊ कशी नांदायलामधली मोमो)
आशुतोशकाकांची बहीण असावी बहुधा.
विणा का? भाटेकाकु तिची आठवण
विणा का? भाटेकाकु तिची आठवण काढुन रडत होत्या, विद्द्यालयाला पण तेच नाव दिल ना.
हिन्दीमध्ये मालविका होती
हिन्दीमध्ये मालविका होती अनुजची बहीण म्हणून. तो दत्तक मुलगा होता कपाडिया फॅमिलीचा. इथे कदाचित विणाला दत्तक मुलगी दाखवतील.
वनराज तिच्यावर डोरे घालायचा. आता इथे अनिरुद्द काय करतोय ते बघू.
आज अनिशची एंट्री झाली (
आज अनिशची एंट्री झाली ( इंदूरचे गायनाचार्य). अभिनेता कोण आहे?
तो अनिश बाहेरुन आला आणि इशा
तो अनिश बाहेरुन आला आणि इशा डायरेक्ट त्याच्या मिठीत, अ आणि अ प्रसंग.
अनिश म्हणून वयाने किती मोठा माणूस आणलाय.
इशा आणि अरुन्धती दोन्ही
इशा आणि अरुन्धती दोन्ही मायलेकीन्नी एकच दुर्गुण घेतलाय. जे पुरुष आपल्याला सपोर्ट करतात त्यान्च्याशी उद्धटपणे वागायच. अनिशने तिला पडण्यापासून वाचवल तर साध थॅन्कस म्हणण सोडा, वरती त्याच्याशीच भाण्डायला लागली. एक कानफटात लावून दयायला हवी होती तिकडेच हिला अरुने. पाहुण्यान्शी कस बोलाव हे अरुने शिकवल नाही वाटत हिला.
ते ती अनिरुद्धकडून शिकली असेल
ते ती अनिरुद्धकडून शिकली असेल.
ते ती अनिरुद्धकडून शिकली असेल
ते ती अनिरुद्धकडून शिकली असेल. >>>>> सहमत. सध्या सन्जना दुसरी अरु झालीये.
Pages