Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
मंगला गौरीची तयारी. अरु तिथे एक मीटिन्ग झाली मग बॉस ने सोडुन दिले व इथे पण पाच मिनिटात आली. कांचन यश गौरीचे लग्न लावायच्या सुपरमूड मध्ये आहे. सर्वांना नौ वारी नेसायचे आहे. उर्सेकरीण येइल म्हणून अप्पाला घराबाहेर पाठवायचे आहे. विमल पण खुदुखुदू मोड मध्ये
अरु संजनाच्या रुमात जाते नॉक करुन येउ का विचारून. तर इथे अरु तिला तो दागिना देते. संजना निळी गुलाबी साडी वेगळीच नौ वारी नेसली आहे. म्हणजे तिला नेसवली आहे. गळ्यात डोरले कानात नाकात पारंपारिक दागिने घातले आहेत. केसांचा रंग एकद्म ब्लाँड वरुन डार्क वर गेला आहे व सर्व झिगुराट एका आंबाड्यात बांधले आहे व फुले घातली आहेत त्यात. इन जनरल लाव्णी चंद्रिका दिसत आहे. उच्च शब्दात सवतींचे भांडण चालू आहे पण आवाज न उचलता. दागिना ट्रान्सफर फार सिंबॉलिक्क एक प्रकारचे बायको हक्क ट्रान्सफर केले आहेत. संजना म्हन ते आईंना नाई आवडणार . अरु म्हणते तू तुझी नवी जागा तयार कर. तू बदलती आहे सच. अशी गोड बोलुन गेम केली अरुने. पुढील वादाची तयारी.
खरंच इतके पण स्वातं त्र्य नसते का सुनांना. आय कांट इमॅजिन.
अनघा एकदम जुन्या खानदानी साडीत तयार झाली आहे व ठुशी पन आजे सासवेने दिलेली आहे. छान दिसते अनघा. पण लगेच कागदी संवाद बोलु लागत आहे. शी इज मॅरिड टु द हाउस व फॅमिली. मागे लगेच एच डी एफ सी बँक म्युझिक. अनघाची आई काही येउ नाही शकणार.
पूजा पॉलिटिक्स इन फुल स्विन्ग. कोण करेल कशी करेल. पुजेची तयारी थोडक्यात झालेली आहे. विशाखा रात्री येइल म्हणे ऑफिसात काम असते म्हणे विशाखाला. रजा मिळत नाही. आयत्या वेळी पण अरु मात्र हजर हवी. अनघाच्या चेहर्यावर तेज आले आहे म्हणून अनघा लाजत आहे.
आजी संजनाचे कौतुक टोमणे करत आहे. केसांचे झगरे बांधत जा म्हनते आजी. आज माझा मान ठेवुन तू आज मं पुजणार अरु आमची मुलगी आहे. तिच्याकडे आमचा ओढा असणार् पण सून म्हणून तुलाही थोडा मान देउ म्हणे. न भांडता संसार कर. आजीला गळ्यातले दिसते व आजी
भडकते. आजी म्हणजे घरातली शरद पवार आहे. पुजा झाली की सर्व दागिने मला द्यायचे. घालायचे तेव्हा मिळतील.
अनघा उगीच नमस्कार करते. गुरुजी आले आहेत. एक चिक ट वाक्य टाकतात. इशा गौरी पुजेची तयारी करत आहेत व आजीने रांगोळी काढायला सांगितले आहे. लगेच पूजा सुरू. गुरुजींची आगगाडी ऐकून मजा वाट्ते. अनघाच्या हातातल्या बांगड्या कंगन मस्तच आहेत.
पिठाचे दागिने केले आहेत गौरी साठी ते छान दिसत आहेत.
कट टू ऑल लेडीज सर्व नौ वारी नेसल्या आहेत अरु पाचवारीत आहे. विमल पण गोड दिसत आहे. खेळायला सतरंजी पसरली आहे.
अनघा संजना चेंज करायला गेल्या आहेत.
अप्पा अवी लपत छपत निघत आहेत. पण आजी पकडते. ह्यांचा केदार कडे बसायचा प्लान आहे वाट्ते घरुन पिशवीत चकणा घेतला असावा.
अप्पा जुनाच शॉ का चर्चि ल कोणाचा तरी जोक रिसायकल करतात लेखिका बाईंचे चौर्य!!!
प्रोमोत सर्व प्यायलेले आहेत बायका उखाणा घेत आहेत. अरुला कोणतरी खडूस बाई उखाणा घ्यायला सांगते तर नित्या इकडे आशू ला पण सांगतो पण तो उखडलेला आहे. हे दोघे इथे कशाला आले कोन जाणे.
हाय कुत्रा फिरवून आले त्यात
हाय कुत्रा फिरवून आले त्यात मला एक मस्त उखाणा सुचला अरु साठी.
बकु ळीची फुले सुकली तरी त्यांना असतो वास
माझ्या मनाला अजुनही अनिरुद्धरावांचीच आस
दुस्रा अनघाची मंगळा गौर सांगायला आले विनायक भटजी
किती हाकलले तरी आशुतोष राव घालतात भोवती रुंजी.
रुंजी म्हणजे भुंगा फुला भोवती गोल गोल आवाज करत फिरतो. भवरेने खिलाया फूल गाणे ऐका त्यात रुशीने बरोब्बर केले आहे.
काल दिवस भर पगार झाला नव्हता आता रिटायरमेंट नंतर असेच होणार म्हणून अंमळ चिंतेतच होते पण रात्रीतून झाला क्रेडिट व वर्शाचा एक बोनस पण आला आहे. अब ये सुहाने दिन खत्म हो जाईंगे.
इशाला आलेला अश्लील फोन,
इशाला आलेला अश्लील फोन, कामतने अनिरुद्धला दिलेली धमकी यांचा लेखिकेला विसर पडला का?
मंगळागौरीची माहिती कुठून तरी शोधून कांचनच्या तोंडी भरली होती. मग पुढे सुधारक फोडणी.
अभिने एवढं व्यवस्थित समजावून सांगितलं की घरातलं वातावरण चांगलं राहू द्या तरी संजनाची मंगळागौर ऐकून अनिरुद्धने खडा टाकलाच. तो दागिना अरुंधतीने अजूनपर्यंत स्वतः कडे का ठेवला होता? घर सोडतानाच कांचनला परत द्यायचा. आणि द्यायचाच होता तर अनघाला द्यायचा.
इशाची परीक्षा झाली कधी, निकाल लागला कधी आणि तिने पुढच्या कोर्सला अॅडमिशन घेतली कधी? हे कॉलेज आहे की शाळा?
अभिषेकचे कान त्या डॉक्टरीणबाईंनी टोचले तेव्हा तो म्हणाला मी वॉर्डमध्ये राउंड मारून येतो. भूलतज्ज्ञ कशाला राउंड मारेल? त्याचं काम अधिकतर ऑपरे शनपुरतंच असतं ना? आणि ऑपरेशन असेल तेव्हाच त्यांना बोलवलं जातं. एवढ्या लहान हॉस्पिटलला भूलतज्ज्ञ नोकरीवर ठेवायला परवडणार नाही आणि त्याला तेवढं कामही असणार नाही.
दुसर्या एका मालिकेच्या प्रोमोत मंगळागौरचे सामान असं म्हटलं. सामान्यरूप हद्दपार.
आणि द्यायचाच होता तर अनघाला
आणि द्यायचाच होता तर अनघाला द्यायचा.>> इथे पॅरलल ट्रान्सफर झाली ना. डाउन्व र्ड नाही झाली. कांचनला सर्व प्रॉपर्टी द्यायला हवी होती कारण ती कस्टोडिअन आहे हे बरोबर. खुर्ची का मिर्ची जाशील कैशी सासू मारिते बरं करी ते. सवत भांडते बरं करीते.
बकु ळीची फुले सुकली तरी
बकुळीची फुले सुकली तरी त्यांना असतो वास
माझ्या मनाला अजुनही अनिरुद्धरावांचीच आस
अनघाची मंगळा गौर सांगायला आले विनायक भटजी
किती हाकलले तरी आशुतोष राव घालतात भोवती रुंजी.
>>>

अमा कुठून सुचते तुम्हाला हे?
मंगळागौरी च्या सणाला,
मंगळागौरी च्या सणाला, उखाण्याची रेलचेल, अनिरुद्ध तळतात वडे आणि आशुतोष ओततात तेल!
श्रावणातल्या मंगळवारी, गवर फुलांनी सजली
अनिरुद्ध च्या जागी आता, आशुतोष आले बदली
शुभ प्रभातः आजी पुरुषांचा
शुभ प्रभातः आजी पुरुषांचा क्लास घेत आहे. एक रात्र दारु प्यायची तर इतके काय दादागिरी. बराच वेळ जुन्या मराठी मासिकातील नाट्यप्रवेश चालू आहे. पब्लिक खिदळत आहे. आजी फारच डॉमिनेट करत आहे अप्पा फद्यागिरी करत आहेत.
जाउन जाउन गौरीच्या घरी. हे असले स्वातंत्र्य!! अभी यश पण आहेत. कोक बाहेर ठेवले आहे ते गरम होईल ना!! ( मी नवर्यासाठी अनेक वेळा अश्याच पार्ट्या तयारी केलेली आहे. :फ्रिज मध्ये ग्लासं कोल ड्रिन्क सोडा बरफ, बाहेर बार सेट. टिशू पेपर्स. तीन टाइप चे स्टार्टर दोन ड्राय एक नाहीतर दोन फ्रेश बनवलेली. )
बायका जमलेल्या आहेत व अरुंधती काय कशी असे बायकी टोमणे मारून टोले देत आहेत. सर्व पारंपारिक दागिने प्रदर्शनात आहेत. सर्व बायका जे घरी जाउन बोलायचे ते इथे समोरच बोलुन टाकत आहेत. संजना अरु ला समजुन घेते आहे.
नित्या अरु आईला सोडायला आले आहेत. अप्पा वरुन त्यांना बोलवतात. भजी खायला मजा करायला बोल्वतात.
इकडे अरु खेळ चालू करते. फुल पारं पारिक जोश ऑन डिस्प्ले.
फुगडी खेळते नाजुक नार नाजुक नार काही नाजुक दिसत नाहीत. पर चलता है. फेक वाटते.
बापे खिडकीतून बघत आहेत व रमी खेळत आहेत. सो फार सो गुड. पण राडा झाला नाही तर टीआर पी कसे खेचतील.
उखाणे घ्यायचा खेळ चालू झाला आहे.
कांचन अप्पा
अनघा अभी
संजनाला पण आग्रेव होतो आहे. आग्रह मग लाजायचे हे ते संजनाची साडी छान आहे खणाचे काम केलेली आहे.
बापे अनिरुद्धला आग्रह करतात नित्या पण मग तो उखडायच्या पहिल्या लेव्हल ला आहे.
पण तो चुकून संजना ऐवजी अरुचे नाव घेतो.
खडुस बाई अरुला पण उखाण्याचा आग्रह करते. खंग्री मॅन भाजणी वडे खाउन वर पन्हे पिउन आला आहे. जोरात डबे वाजिवतो.
नित्या आशूला आग्रह करतो व आशु उखडतो.
ह्यांनी जायचे तर अभी व अन्याच निघून जातात अगदी पार गोहाटी परेन्त जायच्या निर्धाराने गेलेत बाहेर.
अरुचा उखाणा एकटीचाच आहे. व त्यात स्वतःचेच नाव आहे. चांगली कन्सेप्ट उखाणा आहे.
ते गेले वरती मी राहिले खालती सारखीच पन डिवोर्सी साठी.
प्रोमो मध्ये इशा रड त आहे व इशाला घरी बसवायचे का असे अरु म्हणत आहे. वेगळेच काहीतरे चालू झाले आहे बहुतेक तो दुसृया गुंडाचा फोन आलेला असावा.
ह्यांनी जायचे तर अभी व अन्याच
मंगळागौरी च्या सणाला, उखाण्याची रेलचेल, अनिरुद्ध तळतात वडे आणि आशुतोष ओततात तेल!
श्रावणातल्या मंगळवारी, गवर फुलांनी सजली

अनिरुद्ध च्या जागी आता, आशुतोष आले बदली
>>>अरे काय हे? आधीच उखाणे येत नाहीत. ऐनवेळी नेमके असे उखाणे आठवत राहतात.
ह्यांनी जायचे तर अभी व अन्याच निघून जातात अगदी पार गोहाटी परेन्त जायच्या निर्धाराने गेलेत बाहेर. >>>

{प्रोमो मध्ये इशा रड त आहे व
{प्रोमो मध्ये इशा रड त आहे व इशाला घरी बसवायचे का असे अरु म्हणत आहे.}
हे त्या मंगळागौरीच्या आलेल्या बायकांसमोर.
सहा ऑगस्टला दाखवणार
म्हणजे आणखी तीन एपिसोड मंगळागौर?
गौरीच घर बर्यापैकी लान्ब आहे
गौरीच घर बर्यापैकी लान्ब आहे तिथे काय चाललय की कोण उखाणे घेतय हे वॉकी टॉकी टाइप सिस्टिम असल्याशिवाय काहिही एकु येणार नाहि , अगदीच इलॉजिकल.
आशु बरा दिसत होता आज.
शुभ प्रभातः आशू उख डला आहे व
शुभ प्रभातः आशू उख डला आहे व अप्पा डॅमेज कंट्रोल करत आहे. बाकीचे मिळून पार्टी सुरू करत आहेत दूर्बिणीतून बघत आहेत. सॉरी इशाला व्हिडो कॉल करतो. परत ते लोकांना न सांगता कॉल करुन बघणे चालू आहे. वकीलीण पण फुगड्या खेळत आहे. आता एकदम कट टू आरती.
घरच्या आरतीला एकदम माइक?! ट्रूप मागवलेला का. मग आरु बाई एक लेक्चर देत आहेत. खेळ चालू झालेत आत्ता परत. खुंटण मिरची. जाशील कैसी
संजनाची साडी काठ पदराची व फारच मन लाउन चापून चोपून नेसलेली आहे. व ब्लाउज पण डिझायनर. कांचन तिला टोचून प्रशन विचारत आहे. आजी एकदम सर्व सोडून रडा यला लागते व संजनाला गळ्यात घेत आहे पदरी पडले पवित्र झाले मिठी प्रसं ग अरु च्या चेहर्यावर मेहनतीने मर्जर साध्य केल्याचे भाव आहेत.
लगेच दुसरी खडूस बाई टोमणे मारु लागली आहे( हे वाक्य खरेतर घरी गेल्यावर बोलायचे आहे पण ह्यांच्या शेजार णीसही पोच नाही) अरु लगेच उसासत आईंचे कौतूक. व बासरी करूण किती समजुतदार. हे पण पब्लिक मध्ये प्रेम का व्यक्त करत आहेत.
खडूस बाई आता इशाव्र घसरली आहे. इशा लगेच रडकुंडीस आलेली आहे. अरु डिफेंड करत आहे. तिकडे यश पण त्यामुळे अफेक्ट होतो आहे. ह्या बाईला का बोलावले!! अरु तिला कट करत आहे. अवि फोन कट करत आहे. यश रडकुंडीला आला आहे. आशू त्याला अश्या लोकांना इग्नोअर करायचा सल्ला देतो. अप्पा पण त्याला लिफ्ट देतो. पार्टी कुठेच गेलेली आहे. आशू कान्सेलरचा मुद्दा काढतो. व यश बरोबर जात आहे.
अप्पा जेवायचे बघा म्हणत आहे. नित्याचे रिअॅक्षन शॉट्स एकदम् संस्कृत नाटकातील मित्रा सारख्या आहेत. अवी व आशू स्वयंपाकाला गेले आहेत.
आशू व अवि गप्पा चालू आहेत. अवि चांगले काम करत आहे असे अॅप्रायझल आशू करतो. अवि आता मला अधिकार नाही म्हणून वहिनीचे कार्ड पुढे नेत आहे. हा लोकांच्या जोड्या का जमव्तो. तिकडॅ कढई जळत आहे. ( बाय द वे मागील आठवड्यात मी दोन दा भांडी करपवलीत इंड क्षन वर म्हणून लक्ष गेले.) आशू परत मैत्री मैत्री कार्ड टाकून फोडणी टाकत आहे.
इक डे बायका मह्द्ये मुलींच्या संरक्ष णाची चर्चा रंगली आहे. अरु व वकीलीण नवा नजरिया पुढे करत आहे. हिला इशा यश चे कौतूक आहे म्हणे. वकीलिणीस फी शी मतलब. अरू परत लेक्चर लेक्चर इशा अश्रू लपवत धीटाई दाखवत आहे.
अनघाने छान वेल घातले आहेत कानात डिझाइन बघून घ्या. इतके दागिने म्हणजे इडीची नोटिस येइल.
पुढील भागा त अजूनही खेळ च चालू आहेत.
इतके दागिने म्हणजे इडीची
इतके दागिने म्हणजे इडीची नोटिस येइल.>>
तुमची ही अशी अधलीमधली वाक्यं अनपेक्षितपणे येतात त्यामुळे एकदम हसायला येतं.
लोकांच्या घरी जाऊन मंगळा
लोकांच्या घरी जाऊन मंगळा गौरेचे खेळ खेळणारी प्रोफेशनल मंडळं निघाली आहेत का? काल मंडळाचं काहीतरी नाव सांगितलं. सृजन?
भोचक बाईने तिथे अरुंधतीला नाव घे सांगणं आणि इथे नितीनने आशुतोषला नाव घे सांगणं आणि त्या आधीचा सिक्वेन्स फारच ओढून ताणून आणला आहे.
मागे एकदा गौरीच्या घरी हे लोक डम्ब शराड्स खेळत होते तेव्हा संजनाला देशमुखांच्या घरी सगळं नीट ऐकू येत होतं आणि दिसतही होतं.
मांडूला एक दगडी सभागृह आहे, ते अशा पद्धतीने बांधले आहे की एका जागी राहून काही बोललं तरी सगळ्या सभागृहात स्पष्ट ऐकू येतं. तसं यांच्याकडे केलंय वाटतं. आणि नुसतं ऐकूच येत नाही तर दिसतंही. काल उगाच माइक सुद्धा दिला होता हातात. पण तो ऑन नव्हता. माइकमधून बोलण्याचा आवाज वेगळा येईल ना?
खेळणारी प्रोफेशनल मंडळं
खेळणारी प्रोफेशनल मंडळं निघाली आहेत का?>> अहो आहेत अगदी दहा वर्शा पासून कार्यरत आहेत. एका कुठल्या तरी चॅनेल वर वंदना गुप्ते पण असले खेळ घेउन दाख्वत असत.
सात्विक संताप रँट अलर्टः
मला हे खेळ आजिबात आजिबात अपील होत नाहीत. दुसृया कोणाव र तरी आपले जीवन पालन पोषण आपण खुद्द अॅडल्ट असताना अवलंबून ठेवायचे मग तो बराच काळ जिवंत राहावा ह्यासाठी प्रार्थना वगैरे इज व्हेरी एलिअन बिलीफ फॉर मी. त्यापेक्षा चार घरी पोळ्या करून झाडू मारुन पैसे कमवले भाकर खाल्ली तरी बरे हा माझा आउट लुक आहे.
त्यात ते खेळ एकदमच पिचकू लाडे लाडे असतात. डोक्याचा संबंध नाही. उगी बायकी काला पुणेरी अग्गोबाई कल्चर!! सासु मारिते तर तिच्यावर मिसाइल टाकले पाहिजे. किस्सा खलास टाइप व्यक्तिमत्व आहे मी. पण मला अशी बायकांची सब कल्चर दुरुन अनौभवायला फार मजा वाट्ते.
हे जसे तसे ब्युटी पार्लर पण एक सब कल्चर आहे. तिथे नियमीत येणार्या महिला व त्यांच्या फेवरिट पार्लर वाल्या ह्यांचे सं भा षण पण भारी असते. ऑल केटरिन्ग टु द मेल स्पीशीज. अरे खुदके लिये सुंदर दिखो काफी है. पण नाही.
नटलेल्या बायका सुरेख दिस तात मात्र. मला इतके दागिने घालायला सहनच होत नाही.
शुभ प्रभातः अजूनही खेळ
शुभ प्रभातः अजूनही खेळ चालू आहे. एच डी एफ सी संगीत मधीच वाजत आहे. अनघा अरु वकीलीण बसून मजा बघत आहेत. सर्व जुनी पारंपारीक गाणी आली आहेत. गृप छान आहे. बैलांची झोंबी!! असा खेळ आहे. बारा बलुतेदारांची ओळख वाला कुरकुली खेळत आहेत.
सोनार माळी अजून पुढे काय काय. पण दलित महार धेड ह्यांची ओळखच नाही. पारधी भिल्ल
जातीवाचक खेळ प्रिव्हिलेज्ड बायकांसाठी.
नाच ग घुमा वकीलीण व आरू खेळत आहे. सूप नाचवायचा खेळ.
मग रुणझुणत्या पाखरा जरे माझ्या माहेरा. घरची गायीका उपलब्ध नाही. माहेर आठवण काढून पदर डोळयाला अरु सासू बरोबर नाही तर व्कीलिणी बरोबर बाँड होत आहे हे अभी व अन्या बघत आहेत. वकीलिणीच्या चेहर्यावर पण अर्धवट प्रेमाचेच भाव आहेत.
अवीने पनीर भुर्जी बनवली आहे. अरु व कांचन व्हेज असल्याने घरी नॉनव्हेज करत नाहीत. पार्टी पनीर भुर्जी घेउन घरी जायचे प्लान करत आहेत. अप्पा अगदीच मेल व्ह्यू पोस्ट करत आहे बायका कायम घरकाम मुले बाळे ह्यात व्यसत आहेत म्हणे त्यांचे थोडे कौतूक केले पाहिजे
तरी त्यात त्या आनंद मानत असतात.
इक्डे पिंगा चालू आहे. कांचन पण पिंगा घालत आहे. अगदी ओल्ड( गीतरामायण) काकांचे व्ह्यू़ मांडत आहेत. इशा चिरकत आहे. ती पण
नवर्याला सटकावते. दोघे बरोबर पिंगा खेळत आहेत. विशाखाला बहीण येणार लवकरच. आम्ही बायका आम्ही पुरुष चालू आहे.
ते खाणे पुढे करतात. अरु लगेच खेळ म्हणजे व्यायाम व्गैरे चालू होते. आशू आईला घेउन जायला निघाला आहे. पण अजून एक खेळ
मग कांचनचे तेल लावुन पाय चेपणे अरुने वकि लिणीचे पाय चेपण मग कांचन इन्सेक्युअर!!! व रडारड!!!
शुभ प्रभातः गप्पा चालू
शुभ प्रभातः गप्पा चालू आहेत शिळो प्याच्या. वकीलि णीच्या पायात गोळा येतो तर अरु तिच्या पायाला तेल लावून देते. तिला रोज सासूचे पायाला तेल लावायची सवय आहे. ह्या तेलाचा नंतर अन्या कडे गेल्यावर वास येत असेल नक्की. शावर घ्यायची का. ते ही संत्रे सोला. घटस्फोटाचे कारण इथेच आहे.
तर जाडी कांचनला असूया वाटत आहे. ती अरुवर परत इमोशनल डोरे टाकत आहे. वकीलीण पण अरुच्य गालावरुन हात फिरीवते व हनुवटी क्लिक्करते आपण मुलांचे करतो तसे.
अरु आपली लॉय ल्टी पत्रक काढून सांगत आहे. सून म्हण् जे हिची सावली. कांचन जामच जेलस आहे. वकीलीणीवर तितके प्रेम नाही ना करत असे चक्क विचारते. व तिला उगी ऑर्डर देते. इथे अरुने तुमचे तुम्ही बघा आता म्हणा यला हवे. अरु लगेच उसासत नाही जाणार. व नवे संजना मोडेल आपण झोपायला गेले आहे. कांचन मला सांभाळ म्हणते. ही कधी खरी अॅडल्ट झालेलीच नाही घरो घरी अशी वाढलेली बाळे असावीत.
नेक्स्ट डे अरु हपिसात काम करत आहे पण तिला झोप येत आहे. आशू तिला कॉफी आणून देत आहे. पहाटे परेन्त जागून झाल्याने कामा कडे दुर्लक्ष झाले आहे. म्युझिक स्कूलचा मुहूर्त दूर जात आहे. अरु सुट्ट्या बॅन करून काम करत आहे. आशू परत कौतूक मोड मध्ये आहे. तुम्हा बायकांचे टाइप. भारतातल्या माणसाला टेस्ला गाडी लै भारी वाट्ते तसेच आहे हे. कधी वापरले नाही ना. दुरून डोंगर साजरे की.
नित्या आल्याने अंमल विनोदी संवाद चा कॅपसूल चालू आहे. नित्या फिरकी घेत आहे. आशू अंपायर गिरीकरत आहे. खुद्द बॉसलाच ओरड त आहे. मग फिदे फिदी. परत अरुच्या घरच्या सिचुएशन चा आढा वा घेत आहे. आज इशाची कोर्टाची तारीख आहे. बॉस खिशात आहे अरु च्या.
इकडे घरी कांचन फक्त जिना उतरून येते व इतका आर्डा ओरडा करत आली आहे व अप्पाला मलम लावुन द्या सांगते. हे रुम्मध्ये कराय्चे की लोकांनी. आजीला मनी उर्से करणीला दाख वायचे आहे की मी इतकी काही म्हातारी नाही. आजी ब्रावाडो मोड मध्ये आहे. अभी अनघा चेक अप ला जात आहे. अनघा लगेच दादागिरी करत आहे. आज इशाच्या केस चा निकाल आहे म्हणे. अप्पा इशाचे कौतूक मोड मध्ये. आजी लगेच देवाला मोड. सर्व नाटक चालू असल्या सारखे चालू आहे हे गेले की लगेच संजना विंगेतून आली अन्याने प्रमोदचा अपमान केल्यामुळे संजना उखडली आहे. प्रमोद प्रमोद चालू आहे. ही एकदम तार पट्टीतून चालू झाली आहे. अन्याला खालच्या लेव्हलचा जॉब घ्यायचा नाही आहे. इतके शिरा ताणू न का बोलते ही बाई. एक स्टेप डाउन जॉब अन्याला घ्यायचा नाही. हिला एक पट्टी खाली बोलायला काय झाले. आता हे पण ह्यांच्या बेडरूम मध्ये बोलता आले असते. अरे काय झाले तुला. दहा मिनिटात बोलुन संपवता आले असते. किती नवरा बायको एकमेकांना समजुन घेउन आधार देत असतात. अरे हो तुला कमी पणा वाटतो पण परिस्थिती बघून निर्णय घे. असे गोड बोलुन सांगता आले असते. अप्पा कांचन ही नौटंकी बघत आहेत.
प्रोमो मध्ये इशा रड कुं डी फेस नेहमी प्रमाणे. हिला धमक्यांचे फोन येत आहेत म्हणे. अरु च्या फोन वर इशा रडत होती. आशूला वकिलिणीचा फोन येतो केस संदर्भाने. हॅपी वीकेंड.
जास्त श्रम पडले तर अंग,
जास्त श्रम पडले तर अंग, हातपाय दुसर्या दिवशी भरून येतात, दुखतात. यांचं इन्स्टंट दिसतंय.
बाकीच्या वेळी कांचनला खुर्चीतून उठवायला क्रेन लागेल असं वाटत असतं. काल चक्क नाचत होती. तिला सगळे खेळ माहीत आहेत हे दाखवायला गाण्यात कोरसमध्ये तिचा आवाज ऐकवत होते.
व्रताच्या दिवशी पाव चालतात का? आणि पनीर भुर्जी घरी न करायला काय झालं? भुर्जी आहे म्हणून?
निखिलने घरात आल्या आल्याच
निखिलने घरात आल्या आल्याच अंघाला धक्का दिला.. आता अभी पुन्हा रडारड करणार.
काल अरुंधतीला फोन आला. ईशा
काल अरुंधतीला फोन आला. ईशा केस जिंकली !
तेव्हा तिने तोच कोणीतरी गचकल्याचं कळल्याचा सुप्रसिद्ध अभिनय केला.
बाकी ही केस सुपरफास्ट चालली. आरोपपत्र दाखल झालं कधी ; साक्षीदारांना न्यायालयात बोलावलं कधी ; त्यांची उलटतपासणी झाली का यातलं काही सांगितलं नाही. आणि विनयभंगाच्या केसमध्ये पोलिस केस दाखल करत असतील. शासन वि. आरोपी अशी केस असेल ना?
भरत... :हाहा:..
भरत...
..
इतका कोण विचार करतं...? शासन वि आरोपी?...
तेव्हा तिने तोच कोणीतरी गचकल्याचं कळल्याचा सुप्रसिद्ध अभिनय केला...
हिला डायरेक्टर सांगत नाही का ?
हे लोक क्लिपिंग पाहत नाहीत का आणि? कसं दिसतंय ते?
आपण तर साधे मोबाईल मधल फोटो चारचारदा पाहतो!
यश दिवसेंदिवस किती जाड होय चाललाय!!! फोपसा दिसतो
नमस्कारः सध्या हपिसात नौ
नमस्कारः सध्या हपिसात नौ वाजता कार्ड पंचिन्ग मस्ट आहे. त्यामुळे सकाळी आवरुन लवकर जावे लागत आहे सबब रोजचे लिहिणे जमत नाही. वीकली टाकेन जमेल तसे. तब्येत ठीक आहे. आठ चाळीस घर सोडावेच लागते. व रोज कँटिनचे खाल्ले की पावणॅ सहा ला भूक लागते. मग घरी प्रत यायला उशीर होतो. पाउस ही जास्तच पकडला आहे.
यशचं डिप्रेशन खूपच ताणताहेत.
यशचं डिप्रेशन खूपच ताणताहेत. खरं तर ईशालाही कौन्सेलिंग हवं.
कालचा अरुंधतीवर हक्क सांगण्यावरून कांचन आणि सुलेखा यांच्यात वादविवाद.
अभिषेकच्या - तिला नोकरी, गाणं करायची गरजच काय? तिने घरासाठी- माझ्या बायको (मग पोरा ) साठी राबलंच पाहिजे . त्यात तिची धावपळ होत असेल तर होवो. हाच डायलॉग काल कांचनच्या तोंडी. आणि अरुंधतीला यातलं काहीच खटकत नाही. या लोकांची जबाबदारी अजूनही आपल्यावर आहे असंच तिला वाटतं.
अरुंधतीकरवी संजनाच्या मुलाचं कौन्सेलिंग करतील.
कालच्या भागात सगळे एकमेकांना
कालच्या भागात सगळे एकमेकांना काहीना काही सुनावत होते. कांचन-सुलेखा, कांचन-अप्पा, अनिरूद्ध आणि संजना/अरू/अशू आलटूनपालतून. शेवटी कांचन-अरू. फायनली अरू सुट्टी घेऊन घरी येणार नाही म्हणाली ते बरे.
अशूला खूप टेंशन आल्याचे दिसले… कांचन बोलता बोलता अरूने अशूला राखी बांधावी असे बोलते कि काय असे मलाही वाटले होते. किती वेळा तुमच्या अशुतोषसाठी मुलगी बघा, त्याचे लग्न लावा यावर ती बोलली मग अरू करवी अशूला राखी बांधून घ्यावी असे का नाही सुचले तिला?
अरू नितीनला राखी बांधणार म्हणते तेव्हा अन्या तिला अजून कशाला हवीत नवीन नाती? सख्या भावाला राखी बांधावी असे बोलतो. त्यावर ती सांगते कि अडचणीच्या वेळेला नित्याने भावासारखी मदत केली. मी त्याला राखी बांधणार. तेव्हा अन्याने म्हणायला हवे होते ..मग अशूने कोणासारखी मदत केली? त्यालाही राखी बांध.
मलाही असच वाटत होत की कोणीतरी
मलाही असच वाटत होत की कोणीतरी म्हणेल आशूला की अरुला राखी बांध.
कांचन आशुतोषला उद्या
कांचन आशुतोषला उद्या अरुंधतीला सुटी घेऊ दे असं सांगताना जे पॉझेस घेत होती त्यावरून तसंच वाटत होतं.
यांना जेवायला बोलवेपर्यंत कांचन सौजन्य सप्ताहात होती. जेवणाच्या दिवशी तो संपला होता.
नित्या आणी कान्चन याच्यात
नित्या आणी कान्चन याच्यात भयकर साम्य आहे,
दोघाना सतत खायची पडलेली असते म्हणजे करणार काहिच नाही नुसत्या उन्टावरुन शेळया हाकायच्या आणी
कितिही सान्गितल तर कुठे काय बोलाव याचा पाच -पोच नाही.
बापरे, केवढा तो पेशन्स, रटाळ
बापरे, केवढा तो पेशन्स, रटाळ मराठी मालिका बघून पानपानभर पोस्ट लिहायचा..सलाम !!
सात्विक संताप रँट अलर्टः>>>
सात्विक संताप रँट अलर्टः>>> अफ़ाट आवडलेला आहे हा पूर्ण प्यारा
टोप्या उड्ल्या अमा जी...
बाकीच्या वेळी कांचनला
बाकीच्या वेळी कांचनला खुर्चीतून उठवायला क्रेन लागेल असं वाटत असतं. >
आज एक तासाचा भाग होता. काल
आज एक तासाचा भाग होता. काल हापिसात अरुंधतीच्या डोळ्यांसमोर अंधारी आली होती. आज (म्हणजे राखीपुनवेच्या दुसर्या दिवशी) सकाळीच तिचं डोकं दुखत होतं. त्यावरून तिच्या आईचा काळजीपूर्ण संवाद.
कसल्या तरी गंभीर आजारीची नांदी दिसते आहे.
या आठवड्यात संजनाला समजुतदार दाखवताहेत. निखिलला इशा, गौरी, अनघाने राखी बांधताना पाहून् तिचे डोळे भरून आले.
Pages