आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभ प्रभातः यश चे काउसेलिन्ग चालू करायची वेळ आहे. तो फारच हादरला आहे. अरु तिथे पण बाळा बाळा. प्रॉब्लेमच आहे लेकराचा. ही उसासत आहे. आशू इंग्रजीतून समजावत आहे. अरु लगेच उसासत थेंक्यू. तिच्या चेहर्‍यावर काळ जी दिसते. आशूने भयानक असे टॅन शूज घातलेले आहेत
व मरून जाकीट. मदत कर्त्याचे विचित्र कपडे सहन करावे लागतात नाही का.

आजी अप्पा जेवत आहेत. व अन्या रडके तोंड घेउन आला आहे भूक नाहे. अन्याला कामत ने फोन केला आहे. लगेच धमकी शिव्या गाळी चालू झाली. पोलिसांनी कामत ला सोडुन दिले आहे. आता अन्या उखडला आहे. अप्पा त्याला बसवत आहे. नील वरची केस मागे घे म्हणत आहे सुका.
अन्य पोलिस स्टेशनला जातो लगेच धमक्या रिपोर्ट करायला.

इकडे नित्या आशू वकीलिणी कडे आले आहेत व ती चिकट गूळ बोलत आहे. नित्याला सासरी जायचे आहे. वर्शाच्या बहिणीचे लग्न ठरले आहे.
लगेच नित्या आशूच्या लग्नाचे उकरून काढतो. ह्याचे काकवेचे जमवणारच. प्रेमातली अवखळ मारामारी चालू आहे. तेवढ्यात बेल वाजवून अरुंधती आलेली आहे छत्री घेउन भिजत. एकदम रोमांटिक संगीत.

इकडे आजीला स्वतःचे स्वतः उठवतही नाही आहे. ती देवासमोरची विचित्र खुर्ची!! संजना हात देउन उठवते. हिचे वजन फारच आहे. व ही वॉकर काठी घेउन उठत नाही. आजीला दुधाची कोफी हवी आहे. त्यात जायफळ पण. खरेतर कॉफी ने कॉन्स्टिपेशन होते. व जायफळ ने झोप येते.
आजीला आता अनघाची मंगळा गौरे व चोर ओटी करायची आहे. संजना अनघाला पण कॉफी विचारते. आजी लगेच संदर्भासहिते मंगला गौरीची महत्व व माहिती देत आहे.

नवर्‍या च्या जीवना साठी सर्व. संजना पण करायचे म्हणते. पण जमेल तितकेच्च नाहीत र अन्या कधीपन घराबाहेर टाकेल म्हणे.

यश ला आल्या आल्या अनघा कॉफी हवीका विचारते. आजी लगेच पदर डोळ्याला... नात वंड म्हणाजे दुधावरची साय. ह्या बद्दल लेखिकेस पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजेत.

अरु ने आज्जीवकील ला काही एक गिफ्ट आणली आहे धन्यवाद साठी. खरेतर हाताने काहीतरी बनवायचे होते. परत यश बद्दल काळ जी.
आजी चिकट काहीतरी सांट्वन पर बोलत आहे. व काउन्सेलरचे नंबर देतो. अरु नील कामत सुका बद्दल काहीतरी प्राथमि क प्रश्न विचारत आहे. आशू लगेच मी आहे ना तुझ्या बरोबर. प पोलिसांची मदत घेउन.

कोणी पण आले की अनघा खायला प्यायला देउ का विचारते. एकदम उत्साहाने. नवरा आल्या आल्या त्याचे काही विचारायचे तर हिचेच काही चालू झाले यश च्या वाढदिवसाचे कौतूक. पार्टीचे प्लानिन्ग. अभी बाहेर काय चर्चा चालू आहे ते ह्या घरकोंबड्यांना सांगत आहेत.
अभी जाम वैतागत आहे. ती फारच सकारात्मक आहे.

आता परत मला माझे मूल ह्या घरात वाढवायचे नाही टेप चालू आहे. अनघा लगेच विरुद्ध. ही ऐकूनच घेत नाही. त्या मुलाचे आधार कार्ड कुठले असेल कोण जाणे इतके तळ्यात मळ्यात चालू असते. हे आजी ऐकून फ्रेश अश्रुपात.

कोणी पण आले की अनघा खायला प्यायला देउ का विचारते. एकदम उत्साहाने.>> गुणी सून Happy संजनाही हळूहळू तेच करायला लागली आहे. आता फक्त तिने स्वयंपाक करायला सुरवात केली कि तीही गुणी होईल.
अभिला दवाखाण्यात कोणीतरी तुझा भाऊ खरेच खूनी आहे का असे विचारले. त्यालाच नेहमी असे काही विचारणारे बरे भेटतात.
अनघाने फक्त ताई-कुटुंबाकडे बघून याच्याशी लग्न केले आणि याने अंकितापासून सुटका मिळाली म्हणून. आता याला प्रश्न पडलाय आपण एकत्र का राहतोय. ताई तर घर सोडून गेली अन हा कुटुंब सोडायला लावतोय. ताई पुन्हा घरी येऊन त्याला चोप देईल.

अभिषेकवरसुद्धा खुनाचा आरोप लागला होता. त्या बातमीचं कात्रण एनलार्ज करून फ्रेम करून त्याच्या घरच्या आणि हॉस्पिटलच्या खोलीत लावलं पाहिजे.

Lol भरत तुम्हाला लेखिके पेक्षा जाती चांगलं लक्षात आहे!! ...
अभि सतत वैतागलेला असतो. यश चे डिप्रेशन जास्तीच लांबवत आहेत. त्याला म्युझिक स्कूल मध्ये नोकरी द्यायचे काय कारण? उगीच आपले...अरु वर इम्प्रेशन!!!!
तरी अजून तो अनीश का फनीश आला नाही.. ईशा साठी आहे ना तो हिरो?
ईशाचे बरेय..एक गेला की दुसरा तैयार!!!

आणि हल्ली ते सिनेमाचे प्रोमो दाखवत नाहीत ते एक बरे झाले!!!

टीव्हीवर दाखवतात. अमेय वाघचा एक सिनेमा थेटरात येणार आहे त्याचा.
आणि मन फकीरा . याचा स्टार प्रवाहवर टीव्ही प्रिमियर असेल.
हृता दुर्गुळे असलेला भाग फक्त टीव्हीवरच दाखवला का? ऑनला इन पाहणार्‍यांना दिसला नाही की काय?

यश कडे स्कूटर आहे आणि तो सगळीकडे स्कुटरनेच जातो. काल सगळ्या लोकांनी त्याच्याकडे पाहावं म्हणून मुद्दाम पायी चालायला लावलं.

काल सगळ्या लोकांनी त्याच्याकडे पाहावं म्हणून मुद्दाम पायी चालायला लावलं.>>> Happy त्याला बघणाऱ्यांचा अभिनयही भारी होता.
यश चे डिप्रेशन जास्तीच लांबवत आहेत>> होना. तुरूंगात त्याला मारले नाही. जो काही मारल्याचा सीन होता ते अरूचे स्वप्न होते. शेखरची ओळख म्हणून पोलिसांनी नरमाईने चौकशी केली. बरे.. जसे चित्रपटात दाखवतात तसे बाकीच्या कैद्यांनी रॅगिंग सुद्धा केले नाही. सकाळ-संध्याकाळ घरातले कोणीना कोणीतरी भेटत होते, खायला देत होते. ज्याचा खून केलाय असे वाटत होते तो पूर्ण धडधाकट निघाला तरी याला एव्हढा त्रास होतो आहे. याला बघतोच, त्याला मारतो बोलणारा, अभिसाठी-अनघासाठी-इशासाठी छोटी मारामारी करून झालेला यश त्याच्या आईच्या मते आधीपासून हळवा, संवेदनशील होता म्हणे. इबाळाला आपण वाचवले याचे बरे वाटण्यापेक्षा तुरूंगात ५ दिवस राहील्याचे वाईट वाटत आहे.
त्याला म्युझिक स्कूल मध्ये नोकरी द्यायचे काय कारण?>> अशूकडे अरूच्या घरातल्या सगळ्यांसाठी नोकरी तयार आहे. वेळ आली तर तो अभिला नोकरी मिळावी म्हणून मेडिकल लाईनमधेही जाऊ शकतो Wink

अभी व अनघा मेजर विसंवाद. दूर राहायचे बाळ झाले की वेगळे राहा. सर्व प्रॉब्लेम आई स्वतंत्र झाली आहे हा आहे. पण अनघा कधीच कधीच नवर्‍याचे ऐकत नाही. स्वार्थि पणा आहे. तिला काही पटत नाही. लग्न चालवायचे असेल तर नवर्‍याबरोबर एक वाक्यता हवी. अभी सरसकट सर्वांना मूर्ख म्हणेल. देअर आर मेजर डिफरन्सेस मेजर. कसं जगायचे हेच एकमत नाही तर एकत्र काय राहायचे अभी क्लीअर सांगतो आहे. दुसरा डिवोर्स होउ घातला आहे. हे सर्व प्रायवे ट बात आजी बाहेर उभे राहुन चोरुन ऐकत आहे. हे बरे चालते. अपा कांचन ला विचारतो का रड तेस म्हणूण.

अर्धा वेळ अभी अनघा वाद मग कांचन ची रडारड. हेच गावाला का जात नाहीत. बोट बुडल्याचे फीलिन्ग तिला आले आहे.

यश खोलीत येरझार्‍या घालत आहे. तेच ते च आठवत आहे. भाव असे आहेत की अजून एक खून प्लान करत आहे. तर इशा येते व गौरी खूप
रडत आहे व यश ला नेते.

कट टू अवी अन्याला चार समजुतीचे शब्द सांगत आहे. अन्या पण यश मोड मध्ये आहे.

आजी वर्स्ट केस सिनारो बद्दल बोलत आहे. पण अप्पा तिला शांत करत आहे. आजी अरु ला सांगायचे म्हणते.
उद्या यश चा वाढदिवस. आता पुढील आठवडाभर हे यश वाढ्दिवस प्रकरण चालेल. आई अप्पा झोपायला जातात.

अन्या अवीला धन्यवाद म्हणतो तुझी खूप मदत झाली . अवी लगेच तुमच्यासाठी काय पण मोडात आहे. आता इथे निघून जावे ना गोडीत पण नाही संजनाची बाजू घेउन अन्याला तू पण तिला समजून घे वगिअरे सल्ले देतो. दारात उभे राहुन संजना हे ऐकते व त्याला धन्य वाद देते. हे बघून अन्या मनातून पिसाळला असावा.

इकडे बेकरार आशीक उत्सुक पणे मैत्रीणीस फोन करत आहे कशी आहेस विचारायला " पण जेवलीस का विचारत नाही. गिफ्ट आव डल्याचे सांगतो. व जनरल गप्पा चालू आहेत. आरु चश्मा लाउन पुस्तक वाचत आहे. ही घरात एकटी असूनही पिन अप केलेली साडी नेसुन आहे. किती ते संस्कार. मुंबईचा रा श्ट्रिय ड्रेस शॉर्ट्स व टीशर्ट हिला माहीतही नसावा. व संस्काराच्या कूलतेने उकडतही नसावे. एसी नसेलच कारन मला मेलीला काय करायचे आहे एसी डीसी.
प्रोमोत यश च्या वाढ दिवसाला आई खाली घेउन जायला आली आहे. पण तो मनातून दुरावलेलाच आहे. कायतरी राडा करनार. त्याला आर्मीत घाला व अ‍ॅक्ष न ला पाठवा. बॉर्डर वर शहीद करा. मग गौरी आजन्म वटसावित्री करत कपडे शिवत राहील. बघा लेखि का बाई फुकटात एक ट्रॅक दिला आहे. मला एक संस्कारी साडी कुरीअर करा.

इशाला वेडेवाकडे फोन यायला लागतात. मग ती घाबरून घाबरून जात आहे. गॅलरी जवळच आहे.

एसी नसेलच कारन मला मेलीला काय करायचे आहे एसी डीसी.>> ती फक्त तसे बोलते. मग अशूकडे १-२ पडलेलेच असतात, जे कोणी वापरत नसतात. ते तो हिला देतो. आख्खे घरसामान असेच लावलेले होते ना.

मेडीकल कॅालेज पण उघडू शकतो…

नवीन Submitted by शामली- on 22 July, 2022 - 22:24

ऑलरेडी असेलहि वेळ लागल्यावर (अभिसाठी) म्हणेल हि अभिला, " कशाला जातो दुसरीकडे जर हॉस्पिटल आहे माझे इकडे "

Happy
संजना चा कुणी बॉस प्रमोद येणारे का आता? हा मधुराणी चा नवरा तर नाही? प्रमोद च नाव आहे ना त्याचे?

शुभ प्रभातः

यश चा वाढदिवस अजूनही चालू आहे. आधी आशू अरु चे कामाच्या बाब तीत कौतुक भरले संभा शण होते. घरी तयारी चालू आहे.
आजीला वाट्ते यश व गौरी काल रात्रभर एकत्र होते तर ती लगेच अपसेट होते आहे. व त्यांना दूर ठेवायचे प्लान करत आहे. लग्न करा मग करा कायचे माइंड सेट.

मध्येच अभी अनघा चेक प ला आलेली नाही म्हणून वैतागला आहे. पन तिने डॉक्ट्र शी बोलुन डेट पुढे ढकलली आहे अभी लगेच सडून बसतो. ही पण त्याचे फोन घेत नाही कारण कामात आहे म्हणे.

आजी नटून आलेली आहे. तयारी झालेली आहे केक आणले आहेत. तीच पिकनिक वाली गँग आलेली आहे. यश येतो व मुले त्याला सपोर्ट करत आहेत. ह्याला महागाचे यलो जॅकेट भाड्याने आणले आहे. यश ची पार्टी काल रात्रीच झाली आहे हा भाग मी अजून बघितला नाही आहे.
संजनाने बाह्याचा ब्लाउज व छान साडी नेसली आहे. केस कर्ल केले आहेत. आशू अरु नित्या येतात बुके गिफ्ट वगिअरे. दोन केक आहेत. एक अनघाने घरी बनवलेला व एक अवि ने आणलेल. केक कापाय्ची तयारी चालू आहे. पण अरु म्हणा ते अभी साठी थांबा. इशाने छान मेक अप
केला आहे. अन्याला पण केक भरवला जातो. अरे देवा आता आईचे सुंदर गाणे आहे. हे गाणॅ एकदम ट ला ट जुळवून नित्याने कार मध्ये बनवल्या सारखे आहे. पण परिस्थितीस अनुकूल आहे.

प्रोमो मध्ये मेजर अभी भांडण व तो घर सोडून निघाला आहे. तर अनघा इथेच राहायचे म्हणत आहे.

शुभ प्रभातः आज पहिली चार पाच मिनिटे यश च्या वाढदिवसासाठी इशा गौरी व इतर पंटरस चा नाच आहे.

पण मग अभी येतो व मेजर पैसा वसूल दुसृया पिढीचे भांडान आहे.

अनघाचे चु कले ना. तो वाट बघत बसला व ती गेली नाही फोन पण घेतला नाही व मेसेज पण केला नाही. त्याचे वैतागणे आहे. अशू नित्या व ते मित्र मैत्रीणॅ निघोन जातात. त्यात आशू अरु आपण उद्या ऑफिस मध्ये भेटू असे स्फोटक वाक्य टाकतो. उगीच जाताजाता हात टाकायचा.
अनघा सामोपचाराने बोलत आहे. आजचा दिवस यश साठी महत्वाचा होता . म्हणून घरी थांबले.

अभी फारच उख डलेला आहे. पण हिचा फोकस आपल्या संसारावर नाही हे ही खरे. व तिच्यावर घर कामाचा व इतर स्ट्रेस येत असेल हे नक्की.
अन्या ओरडतो व गप्पबस म्हणतो. अभी यश ला पण कोणी बोलत नाही म्हणतो. गुंड गिरी चालणार नाही असे कोणी बोलत नाही. अभीचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. अन्या ओरड त आहे. अरू अभीला स्वार्थी म्हणते. व मोठे स्वगत आहे. तू वागतोस ते आमचे संस्कार नाहीत. खंग्री मॅन पेटला आहे. अनघा मुली सारखी आहे. ह्याचा आईवरचा रागही व्यक्त होत आहे. तू पण आम्हाला सोडून गेलीसच की.
अप्पा पाणी घालत आहे.

अभीला असह्य झाले आहे. व तो अनघाचा हात धरून निघू या म्हणतो. इतका का पेटला हा!! सासर्‍याने फुकट फ्लॅट दिला आहे म्हणून मस्ती.
पण अनघा नाही म्हणते इथेच बाळ जन्माला येइल लगेच इमोशनल पंती चालू झाली गळा भरून. सर्वांचे कौतूक होते. माझे बाळ इथेच वाढेल म्हणे. दुस रा घटस्फोट का बरे.

अप्पा अनघाला बसवतात. हिचे पोट दिसत नाही अजून. अन्या पण समजूत घालत आहे व यश परत कोषात गेला आहे. अभी बॅग भरून निघालाच घरातून. यश पण मी जातो म्ह णतो. अनघा त्याला जायचे तर जाउदे म्हण्ते. काय हा अघोचर पणा!! जेथे राघव तेथे सीता ऐकले नाही का हिने.

खंग्र्या ढुमढुमाट करत आहे.

पोस्ट सिचुएशन अ‍ॅनालिसिस चालू आहे. अवी त्याला परत आणायला जातो. आजी कोकलत आहे व वैतागत आहे.
नोब्डी रेडी टु बॅक डाउन. मेजर छान वाक्य आहे प्रत्येकास गोतावळा नाही आव्डत. संजना पण थोडे तेल घालत आहे. शी इज लुकिंग लाइक ऑरेंज कुल्फी. टुटिफ्रुटी लावलेली.

अप्पा सर्वांना आपा पल्या मार्गाने जाउदे म्हणतो.

अभी पण माझ्यासारखा कान फाट्या झाला आहे. मेजर रिव्यू चालू आहे रिलेशन शिपचा . घरातले मोठे बायस्ड आहेत.
तेल घालून संजना वर जाते.

आजी ल अनघाची मंगळा गौरे करायची होती म्हणे. पण आता काय?! ह्या घरात मंगळा गौर पण काय करु शकत नाही.

प्रोमो: आजी परत अरु ला शिव्या देत आहे. तू गेलीस व घर विस्कटले. सो फोक्स आपण आहोत तिथेच आहोत.

प्रोमोत की कालच्या भागात दाखवले की अनघाची मेडिकल चेकपची ठरलेली तारीख आणखी दोन दिवसांनंतरची असते. पण अभिषेक याच दिवशीची अपॉइंटमेंट घेतो. अनघा त्या डॉ बाईंना फोन करते तेव्हा तिला कळतं. म्हणजे यशचा वादि म्हणून मुद्दाम त्याच दिवसाची अपॉइंटमेंट.

अनघाला बहुतेक अरुंधती सासू म्हणून हवी होती म्हणून तिने अभिषेकशी लग्न केलं.

अनघाला बहुतेक अरुंधती सासू म्हणून हवी होती म्हणून तिने अभिषेकशी लग्न केलं.>>नक्कीच. साखरपुडा चालू असताना कोणाला काही न सांगता अंकिताकडे जाऊन तिच्याशी लग्न करून आलेला, आधीपासूनच तळ्यात-मळ्यात असणारा, अरूच्या विरोधात बोलणारा, बाबांची बाजू घेणारा स्वार्थी अभिषेक तिला माहीत होता पण तेव्हा तिला काही फरक पडला नाही.

शुभ प्रभातः अन्घा व ताई प्रेमळ सुसंवाद. ताई म्हणते तू जरा ताणून धरू नकोस. तो सारखा चुकला चुकला असे म्हणू नकोस. ती पण त्यांना वेगळॅ राहायचा सल्ला देत आहे. हिलाच माणसाfunction at() { [native code] त राहायचे आहे. नवरा व लग्न वार्‍यावर उडल तरी चालेल.

खाली यश ची जेवायची मन धरणी चालू आहे. गौरी व यश तोंडे वाकडी करत आर्गुमेंट कर्त आहेत. यश सारी सारियां मेरी वजहसे है मोड मध्ये आहे. मीच जबाबदार आहे एकदम वर्स्ट केस सिनारिओ बाय फार स्क्वेअर्ड. दोघांचे भांडण. सर्वच उपाशी आहेत व स्वयंपाक गार झाला आहे. यश जेवायला येतो. देवाची कृपा

अनघा परत ताई ताई मला काम करायचे आहे. मी इथे राहून मला ते मॅनेज करता येइल. अभीची इगो राइड चालू आहे. मी तो म्हणेल तसे वागेल हे त्याला आव्डते. तो मला काम करु नकोस म्हणेल. आई सर्व अनालिसिस करत आहे. पण झुकते माप यश ला आहे. तो उगाच ताणत आहे असे अनघा म्हणते आहे. अरु विनंती करत आहे की तू समजुतदार पणे घे. तोडगा कधीच निघणार नाही. गैरसमज वाढत जातील. अनघाला काही पटत नाही. अधिकार गाजवायचा आहे अभीला. अभी बाबांसारखा वागत आहे. ही काही त्याला बोलावणार नाही. इसको अकेलेइच रहिना बोलके दिकरा

कट टू अभी व सर्व घटनांचा परत एकदा फ्लॅश बॅक. तो गहन विचारात आहे असे दाखवले आहे. तर डोक्ट्र बाई कॉफी घेउनच येते म्हणते. तू इथे का काही प्रोब्लेम आहे अशी तिला शंका आलेली आहे.

आजी अनघाच्या पोटात माझा पणतू आहे!! ही अजून एक पीडा. मुले मूर्ख आहेत काही कळत नाही. आजी लगेच अरू ला नावे ठेवायला लागलेली आहे. तू गेलीस व घर विस्कळीत झाले. ही एकदम बालीश. अरु सासूला एकदम सर्व विषद करू सांगत आहे. आजी अनघाला कूठेही जाउ देणार नाही. म्हणे. अवी पण बोलत आहे.

आता डॉक्ट्रीन बाई अभीवर डोरे डालत आहे. तो घडा घडा बोलत आहे. फॅमिली इशू असले तर आमच्यावर जबाबदारी पड्ते म्हणे. ह्याने घरात
कोथिंबीर पण आणलेली दिसली नाही. कोणी नाही म्हणून तिला दूध आणावे लागले. ( प्रेग्नंट असल्यावरही पार कन्स्ट्रक्षन साइट वर काम करणा र्‍या महिला ह्याने कार मधून बघितल्या नाहीत का. )

बॉस अभीचे कान टोचत आहे. अभी मान खाली घालून ऐकत आहे. हेच आई सांगत होती पण पटत नव्हते.

अन्या ला पन अभीची काळजी वाट्त आहे.

अरुंधतीला अनघा दुसरी अरुंधती व्हायला हवी आहे, ती सुद्धा बिफोर डायव्होर्सवाली. मी ज्यातून गेले त्या सगळ्यातून तूही जा.

ती अनघा किती विचित्र मेक अप आणि केश रचना करते! अगदी कृत्रिम आणि क्लिष्ट! ज्यात घरात सहज पणे वावरणे शक्य नाही!
गवरी मधे मधे यश वर नाखुश होती. ..लेखिकेने तिची मानसिकता बदलली वाटते?!
अरुंधती च्या गालावरचा पॅच हल्ली अगदी दिसतो क्लिअर!

बास आता! आवरा म्हणा...!! Happy

अनुपमा इतकं ताणणार असतील तर अजून खूप पेशन्स ठेवावे लागतील
तिथे लग्न झाल्यावर छोटी मुलगी दत्तक घेतली आहे,त्यावरून अनुपमा च्या तीनही घोड्या मुलांना इनसेक्युअर वाटतं आहेच पण तिकडच्या अनघा ला पण आपल्या बाळा चे जन्मल्यावर काय होईल ह्याची काळजी पडली आहे

अभीची वागणूक चुकतेच आहे पण काही मुद्दे बरोबरच आहेत. यशला पॅम्पर करून थकतच नसणारे लोक्स त्याला त्याची चूक कधी समजावून सांगणार? रागाच्या भरात काहीही केलेलं चालतं? कारण किंवा परिणाम काहीही असले तरी? तो नील मेलाच असता तर?
अविनाश चं वाक्य खरंच आवडलं 'सगळ्यांनाच गोतावळा नाही आवडत'. संजना ला उगीच निगेटिव्ह च ठेवायचं म्हणून तिला पुन्हा ट्रॅकवर नेऊन ठेवतो लेखक.
टिपिकल एकता कपूर च्या हिंदी सिरियल सारखं चालू आहे सगळं. कुठलाच कार्यक्रम तमाशा झाल्याशिवाय पार पडत नाही.
तिकडे अनुपमाचं तर अतीच चाललंय. तिचे ते सुविचारवाले डायलॉग्ज ऐकवत नाहीत अगदी.
मूल दत्तक घेण्याला पालकांच्या वयाची मर्यादा नसते का?

कालचे अनघाचे संवाद चांगले होते. विचारांत स्पष्टता होती. विशेषतः अभि आजकाल बाबांसारखा वागतोय इथले आणि पुढचे.
अरुंधती मात्र द्विधा मनःस्थितीत आहे. स्वतःचं आयुष्य जगायचं पण आधी कुटुंबाच्या गरजा भागवायच्या असं तिचंच अजूनही चाललं आहे आणि अनघाकडूनही तीच अपेक्षा आहे.
अनघाला अभिसोबत राहण्यात त्रास आहे. तिला आता मूल होईल, तेव्हा त्यासाठीही नवर्‍याची गरज संपली Wink .

शुभ प्रभातः शनिवार रविवार डिस्नेच आले नाही. आज आले
तर शनिवारी: अभी घरी येतो त्या आधी आशू आधी मेसेज करून मग अरुला सर्व ठीक आहे ना गरज पडल्यास उद्या सुट्टी घे तर तीच नको म्हणते. नशीब. आमच्या कडे पंधरामिनिटे उशीर झाला तर अर्ध्या दिवसाचा पगार कापतातन. अन्या रात्री उठून काळजी व्यक्त करतो व संजना करवादते.
अनघा पण काळजी करतच आहे. पण तो येउन सर्वांची माफी मागतो. व जनरल मेल मिलाप दिलजमाई भाग आहे. सगळेच समजुतदार पणे बोलत आहेत म्हणजे बिगर पनवती अहेड!!

आजी लगेच अविला चहाची ऑर्डर सोडते. खुर्चीतनच कारभार. अभी अवी पर्टी करणार आहेत. यश इशा पण जॉइन होतात गौरी अनघा पण जॉइन होतात. सो क्युट क्युट. बायका बायकांची पार्टी आजी बोलवते प्रॉजेक्ट पहिली मंगळा गौरी. अनघा व संजनाची तर अन्या कुचके पणे हसतो.

प्र्मो मध्ये संजना मंगळागौरे म्हणून साडी नेसली आहे नौवारी. अरु तिला एक घरगुती दागिना देते. कोल्हापुरी साज बहुतेक तर आजी वैतागते.

आजच्या भागातः अन्या हिला कसली मं गौ म्हणून पिडत आहे. अवी तिला अनुमोदन देतो. त्याचा सपोर्ट बघुन अन्या दचकतो.

आता ह्या प्रसंगात राडा होणार हे गृहितच आहे. बापे सर्व करुन केदार कडे जायचा प्लान करतात. व्हिच इज गुड अ‍ॅक्चुअली. आजी लगेचच मंगौ आजच सुरू करते प्लान. अरे पहाटे अंघोळ नैवेद्य्याचा स्वयंपाक वगैरे असतो. सजावट असते थोडी प्लानिन्ग ला वेळ द्यायला नको का. इशा क्लासला जायचे म्हणते. अभी हॉस्पिटल. अन्या घरीच. आईला मदत कर.

पण आठवल्यांचेकडून मागवा यचे ठरते.

अरु कामाचे बोलत आहे स्कूल चे प्लानिन्ग करत आहे. मीटिन्ग चालू आहे. काम बाजूला ठेवुन अरु मुलांबद्दल घराबद्दलच बोलत आहे. कोण बॉस इतके इन्वॉल्व्ह होतात हो. सेपरेशन प्लान बद्दल बोलणे होते. आजी फोन करुन मं गौ बद्दल सांगते व लवकर बोलवते.
घरी आजी इज इन फुल मं गौ मोड मध्येआहे. अनघाचे लाडीक तक्रार चालू आहे मला फुगडी घाल्ता येणार नाही. प्रेक्षकातील काकवांना आव्डेल असा भाग आहे.

अनघा फुल समाज सुधारक मोड मध्ये आहे. विधवा घट स्फोटिताम्ना बोलवत आहे. सुलेखाताईंना बोलवणार त्यांचा सोसायटीतील बायका नक्की अपमान करतील. त्यांना दूर ठेवतील. विमल पण पाच मिनिटापुरती आहे.

यश आशु नित्याची माफी मागत आहे. परत शंका काढून कुचकुचत आहे. हा इथेच कामाला लागला आहे. आशू एकदम शांतपणे बोलत आहे यश शी. त्याला काउन्सेलिन्ग ची ऑप्शन दिलेली आहे. बरोबर पण जायला तयार आहे. नित्या लगेच बिचारा म्हणतो.

प्रमो परत तेच अरु ने दागिना दिला तेच.

Pages