Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खून कुणाचा झाला?>> लॉजीक.
खून कुणाचा झाला?>> लॉजीक.
>>
सांगा की कुणीतरी. की खून झालेलाच नाही?
वावे.. खून झाला की नाही
वावे.. खून झाला की नाही याबाबत संदिग्धता आहे. कारण त्या फार्म हाऊस वर नील आणि यश यांच्यात भांडण होते व यश त्याला रॉड मारतो अणि तो बेशुद्ध पडतो..पण नंतर तिथे काहीच मागमूस नसतो... त्याच्या मित्रांनी बॉडी(?) गायब केली आहे आणि वरुन यश वरच खुनाचा आणि अपहरणाचा आरोप केलाय
अजून आठवडा जाईल यात ... तो नील परत जित्ता गावे परेंत!!!!!
ओह! अजून अनेक भागांची
ओह!
अजून अनेक भागांची निश्चिंती झाली!
तसे तर बरेच खून झालेत
तसे तर बरेच खून झालेत
प्रेक्षकांची सहनशक्ती, तुम्ही म्हणताय तसे- लॉजिक, अन्याचे पीस ऑफ माइंड, आशु चा ड्रेसिंग सेन्स.....!! आंबटगोड सिक्सर
काल भयाण भाग होता आजचा.
काल भयाण भाग होता आजचा. अरूंधती आणि सुलेखा डोळे मोठ्ठे करून करून बघत-बोलत होत्या.
अशूने नेहमी प्रमाणे नित्याला शेखरबरोबर पाठवून मेन कामाला लावले व स्वत: अरूसाठी चहापाणी करत बसला.
लॅाजिकचा खून
पत्रकाराचा आवाज नीलसारखा होता
पत्रकाराचा आवाज नीलसारखा होता.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
नित्या व शेखर चे हार्ट टु हार्ट डायलॉग चालू आहेत. मध्येच चहा टपरीवर ते नील चे दोन टपोरी मित्र दिसतात. शेखर व नित्या त्यांना घेत आहेत. ते पळून जातात तर हे वीर पण मागे पावसात पळ त जातात ती गल्ली अरु च्या घराजवळचीच आहे.
कट टू अनदर कार जिथे अरु रड त आहे व आशू तिला धीर देत आहे. अरु अजून यश चा प्रॉब्लेम समजत नाही आहे. हा मैत्रीणीला सोडायचा योग आला होता तरी ड्रायवर घेउन चालला आहे चम्या च आहे. अनेकदा तिने भारावलेली इमोशनल अरू सिचुएशन वाया घालवलेली आहे.
कसलेले कलाकार अश्या वेळीच आधार द्यायचे नाटक करून लफडी सुरू करतात. अरु ला यश च्या मनावरील आघाताची काळजी आहे. त्याला आर्मीत घाला अग्निवीर करा. चट सरळ येइल. ही रडा रड चालूच ठेवते यश ला फाशीच होणार असा हिचा समज झाला आहे. आशू आपली लढाई अजू न आहे वगैरे पट्टी बोलत आहे. हिर्वा शर्ट व ब्राउन प्यांट.
अरु ला पत्रकाराचा एकदम फोन येउन खून झाला हे ते बोलतो. आशू पत्रकाराला झाडतो. पण कोणते वृत्तपत्र मालिका आहे ते मात्र विचारत नाहे. अरु चे घर आले आहे. लगेच एच डी एफ सी एटीएम संगीत . तो मी आहे काळजी करू नको वगैरे चालू आहे. उसासत थेंक्यू....
इकडे चेस पावसात चालूच आहे. लेखिका एक गांजा मारुन येत असावी तेवढ्यात. मित्र कोणाला तरी फोन करतो त्यांना वाटत आहे शेखर व नित्या पोलिसच आहेत. ते दोघे हातातून सटकतात. उद्या कर्जतला जायचे ठरत आहे.
अनघा आज्जी अप्पा चहा हवा आहे का विचारते. पण ते अरु ची वाट बघत आहेत. घरी पण पत्रकार फोन येत आहेत. अरु न हुई माधुरी दीक्षित होई. इतकी प्रसिद्ध आहे का ती दोन गाण्यांवर!! काय पण. संजनाला पण फोन येत आहेत. आजी आस्च्रय करत आहे. अनघा लगेच ताई आता सेलिबिरिटी आहे म्हणते. कधी पण ताईचे कौतूक.
अन्या वैतागतो प्रसिद्दीचे जग वाइट आहेत. केस मध्ये फाटे फुटतील. आजी यश ने लौकर घरी परत यावे असा हट्ट धरून आहे. खुर्चीवरून जग चालवते. सर्व लगेच तिच्या वर कोसळ तात. अन्या वकीलीणीची प्रोसिजर विचारतो. आजी यश चौदा दिवस पोलिस क्स्टडीत म्हणून रडू लागतो. गौरी यश कसा आहे विचारते. लगेच आ आ आ कोरस. गौरीने अमेरिका ट्रिप कॅन्सल केली आहे. अरु गौरी समजुतदार पद्धतीने यश सुटायला हवा अरु उसासत रडत फिलॉसोफी बोलत आहे. यश ला आपल्या आधाराची गरज आहे. खरे तर कस्ट डी संपल्यावर दोघां नाही अमेरिकेत घालवून द्यायचे ना? इशाला यश ला भेटायचे आहे. ही पण रडत आहे. आता का?
अन्या प्रकरण मीडीआ मध्ये येणार आहे. मी लोकांच्या प्रश्नाला उत्तरे देइन. मी यशच्या बरोबर आहे. एकदम नवर्याला ठणकावून सांगत आहे. मी त्याला जन्म दिला आहे त्याला आता जगण्याचे बळ देइन. ओ वॉव.
प्रॉमो मध्ये नवा वकील अन्याने आणला आहे. व यश परत तेच तेच. पण नील जिवंत आहे असे अन्या सांगतो. व्हाख्या विख्ही वुख्हु.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
नित्या व शेखर चे हार्ट टु हार्ट डायलॉग चालू आहेत. मध्येच चहा टपरीवर ते नील चे दोन टपोरी मित्र दिसतात. शेखर व नित्या त्यांना घेत आहेत. ते पळून जातात तर हे वीर पण मागे पावसात पळ त जातात ती गल्ली अरु च्या घराजवळचीच आहे.
कट टू अनदर कार जिथे अरु रड त आहे व आशू तिला धीर देत आहे. अरु अजून यश चा प्रॉब्लेम समजत नाही आहे. हा मैत्रीणीला सोडायचा योग आला होता तरी ड्रायवर घेउन चालला आहे चम्या च आहे. अनेकदा तिने भारावलेली इमोशनल अरू सिचुएशन वाया घालवलेली आहे.
कसलेले कलाकार अश्या वेळीच आधार द्यायचे नाटक करून लफडी सुरू करतात. अरु ला यश च्या मनावरील आघाताची काळजी आहे. त्याला आर्मीत घाला अग्निवीर करा. चट सरळ येइल. ही रडा रड चालूच ठेवते यश ला फाशीच होणार असा हिचा समज झाला आहे. आशू आपली लढाई अजू न आहे वगैरे पट्टी बोलत आहे. हिर्वा शर्ट व ब्राउन प्यांट.
अरु ला पत्रकाराचा एकदम फोन येउन खून झाला हे ते बोलतो. आशू पत्रकाराला झाडतो. पण कोणते वृत्तपत्र मालिका आहे ते मात्र विचारत नाहे. अरु चे घर आले आहे. लगेच एच डी एफ सी एटीएम संगीत . तो मी आहे काळजी करू नको वगैरे चालू आहे. उसासत थेंक्यू....
इकडे चेस पावसात चालूच आहे. लेखिका एक गांजा मारुन येत असावी तेवढ्यात. मित्र कोणाला तरी फोन करतो त्यांना वाटत आहे शेखर व नित्या पोलिसच आहेत. ते दोघे हातातून सटकतात. उद्या कर्जतला जायचे ठरत आहे.
अनघा आज्जी अप्पा चहा हवा आहे का विचारते. पण ते अरु ची वाट बघत आहेत. घरी पण पत्रकार फोन येत आहेत. अरु न हुई माधुरी दीक्षित होई. इतकी प्रसिद्ध आहे का ती दोन गाण्यांवर!! काय पण. संजनाला पण फोन येत आहेत. आजी आस्च्रय करत आहे. अनघा लगेच ताई आता सेलिबिरिटी आहे म्हणते. कधी पण ताईचे कौतूक.
अन्या वैतागतो प्रसिद्दीचे जग वाइट आहेत. केस मध्ये फाटे फुटतील. आजी यश ने लौकर घरी परत यावे असा हट्ट धरून आहे. खुर्चीवरून जग चालवते. सर्व लगेच तिच्या वर कोसळ तात. अन्या वकीलीणीची प्रोसिजर विचारतो. आजी यश चौदा दिवस पोलिस क्स्टडीत म्हणून रडू लागतो. गौरी यश कसा आहे विचारते. लगेच आ आ आ कोरस. गौरीने अमेरिका ट्रिप कॅन्सल केली आहे. अरु गौरी समजुतदार पद्धतीने यश सुटायला हवा अरु उसासत रडत फिलॉसोफी बोलत आहे. यश ला आपल्या आधाराची गरज आहे. खरे तर कस्ट डी संपल्यावर दोघां नाही अमेरिकेत घालवून द्यायचे ना? इशाला यश ला भेटायचे आहे. ही पण रडत आहे. आता का?
अन्या प्रकरण मीडीआ मध्ये येणार आहे. मी लोकांच्या प्रश्नाला उत्तरे देइन. मी यशच्या बरोबर आहे. एकदम नवर्याला ठणकावून सांगत आहे. मी त्याला जन्म दिला आहे त्याला आता जगण्याचे बळ देइन. ओ वॉव.
प्रॉमो मध्ये नवा वकील अन्याने आणला आहे. व यश परत तेच तेच. पण नील जिवंत आहे असे अन्या सांगतो. व्हाख्या विख्ही वुख्हु.
अमा आज उत्साहात आहात वाटत, आज
अमा आज उत्साहात आहात वाटत, आज दोन वेळा अपडेटस दिले तुम्ही!
अमेरिकेची ट्रिप कॅन्सल करावी लागल्यामुळे गौरी मनातून चरफडत असेल. दोन चार शिव्या हासडल्या असतील ईशाला.
अन्या वैतागतो प्रसिद्दीचे जग वाइट आहेत. >>>>>> हो का? स्वतः पत्रकारान्ना हायर करण्याआधी कुठे गेली त्याची हि अक्कल? वडापाव खायला?
सन्जना कधी नव्हे इतकी अती चान्गली वागत आहे देशमुखान्शी.
हे हे झोपेत दोनदा पोस्ट केले
हे हे झोपेत दोनदा पोस्ट केले असावे.
सन्जना कधी नव्हे इतकी अती
सन्जना कधी नव्हे इतकी अती चान्गली वागत आहे देशमुखान्शी.>> त्यांच्यावर वाईट प्रसंग आला कि ती चांगली वागते. मग सगळे मार्गी लागून चांगले घडू लागले कि तिला त्रास व्हायला लागतो. मग ती कुचकेपणे बोलणे, भांडणे, आग लावणे सुरू करते.
गांजा मारुन
>>>>त्यांच्यावर वाईट प्रसंग
>>>>त्यांच्यावर वाईट प्रसंग आला कि ती चांगली वागते. मग सगळे मार्गी लागून चांगले घडू लागले कि तिला त्रास व्हायला लागतो

ह्याच्या वरुन अरुण नलावडे आठवला वासू च्या सासू मधला
त्याला दारू चढली की तो नॉर्मल असतो आणि उतरल्यावर झिंगतो
https://youtu.be/-m3iruEQoJE?t=4963
हाय अजून भाग अपलोड झालेला
हाय अजून भाग अपलोड झालेला नाही.
अवि आशू नित्या चर्चा करत
अवि आशू नित्या चर्चा करत आहेत. आई अजून वकील मोड मध्ये आहे. काम गेलं य ते माहीत नाही वाट्ते. आजी सुदर्शन कामत च्या बायको ला शोधायला सांगते. किती हुषार. नित्या लगेच कामावर निघतो. अवि सुर्शा भावेला भेटून येतो आहे. जनरल चौकशी डाटा कलेक्षन चालू आहे. यश अड कला आहे
नील ला परदेशात सेटल करतील त्याचे बाबा. अरु घरी येते. इशा चक्क अभ्यास करत आहे. आईला पाणी हवे आहे का विचारते. अरू ला जेवायला भूक नाही. संजना बाहेर जाते मस्त तयार झालेली आहे. सोसायटीतले लोक्स आले आहेत. सपोर्ट करत आहेत. अरु स्वयंपाकाचे बघत आहे. यश चांगला मुलगा आहे. गुणी आहे.
इशाला यश ला भेटायचे आहे रडत आहे पण अरु एकटी जाउ नकोस म्हणते गौरीला घेउन जा म्हणते.
सोसायटीतील बायका पण आधार पूर्वक बोलत आहेत. कांचन परत भोकाड. आॠ ची ही मोठी कमाई आहे. पीपल्स प्रिन्सेस गेट्सा पीपल्स सपोर्ट. कॉलनी म्हणजे एक कुटुंब. पण यश च्या वागण्याचा इतका सपोर्ट चुकीचा आहे. हि डज हॅव एंगर इशूज पण ह्या सर्व पब्लिकची वाक्ये म्हणजे ज्येना डब्यातुन उचललेली आहेत. तेच तेच परत. की उसासे क्वीन रड त उसासे टाकत थेंक्यू म्हणते. कांचन ला लगेच विश्वास वाट्त आहे.
अवि व आशू अनिकेतच्या शोधात आहेत. अनिकेत कोकणात पळून गेला आहे. व तो घरी पण नाही आहे. ते क्लास चे सर काय उपयोगाचे नाहीत. शेखर व नित्या बंड मुलगे मर्डरच्या ठिकाणी शोध घेतात. पण खोलीत एक डेक्स्टॉप युनिट आहे ते तसेच ठेव तात. पण त्यांना हाउस कीपर शी बोलताना एक कार्ड मिळते.
घरी अन्या - संजना नवा लॉयर कसा बेस्ट चालू आहेत. इशा गौरी यश ला भेटायला गेल्या आहेत. पण हे चुकीचे आहे. इट इन नॉट गुड फॉर गर्ल्स सेफ्टी. मोलेस्टेशन चार्ज आहे. ती ही मुलगी असे होउ शकते ना. अरु अन्याला प्रेम आताच तर सपोर्ट द्यायला पाहिजे वगैरे आई पट्टी सुनवते. व लगेचच दात घशात गेले आहेत.
हा हा प्रोमो मध्ये इशाला पोलिसांनी थाम्बवून घेतले. स्मार्ट अरु चा स्मार्ट प्लान कोसळला आहे. चिप ची छान नी चालू आहे. एविडन्स टँपर झाला ना पण. लेखिका रिअली काहीही रिसर्च करतच नाही बघा.
संजना बाहेर जाते मस्त तयार
संजना बाहेर जाते मस्त तयार झालेली आहे. >>>>>> आली शेवटी वळणावर
अरु ने गौरी इशा ला पोस्टे ला
अरु ने गौरी इशा ला पोस्टे ला पाठवले आहे. व अन्या विरोध करतो तर संजना अरू त्याला गप्प करतात. झाशीच्या राण्या जणू. कांचन खुर्चीत बसून करवादत आहे.
अन्या म्हणतो सुदर्शन कामत जनरली फ्रॉड आहे. अन्याला दोन चार महिन्यात शंका सुद्धा आलेली नाही. वकील पण प्रोसीजर फॉलो करायला हवी असेच म्हणतो. यश निर्दोश असल्याचा पुरावा भेटला तर पुढील चार्ज शीट वगैरे टळेल.
अरु सुलेखाताईंवर विश्वास ठेवून आहे. कांचन परत भोकाड मोड.
इशा गौरी पोलिस स्टेशन मध्ये रडा रड चालू आहे. मोठे तळे झाले आहे रडुन. गौरी उगीचच सांत्वन करायला सज्ज आहे. ( अनघा मोड) यश आल्यावर गौरी त्याला मिठी मारून परत रडत आहे. गौरीचे पण रडणे चालू आहे. इशा सॉरी म्हणते व स्वतःचा मंद पणा मान्य करते. यश समजूत घालते व लाडिक पणा इशाचा चालू आहे. अजुनही तिला गांभीर्य समजत नाही आहे. गौरी बीइन्ग गुड रिलेशन शिप डिस्कशन चालू आहे. ही जागा आहे का?
इशा सोसायटी पब्लिकचा अपडेट देते. यश ला खूप सपोर्ट आहे व खूप धडपडत आहेत. यश घाबरलेला आहे. केस बद्दल उघड बोलणे बरोबर नाही पण तेच चालू आहे. इशा लगेच आय एं प्राउड टु बी युअर सिस्टर यश. हा सर्व भावनिक ड्रामा दहा मिनिटे चालू आहे. आ आ कोरस व इशा लाडू भरवत आहे.
पोलिस इशाची चौकशी सुरु करत आहेत गौरी बाहेर थांबली आहे व काकूला फोन करत आहे.
बी टीम ला चिप वर पुरावा सापडला आहे. व्हिडीओच. आशू खळ्या पाडत पाड त सत्याचा वि जय मोड मध्ये आहे. अवी पण उतावळे पणा करत आहे. खानदानी गुण दिसतो. पुरावा घेउन वकील व पोलिसाकडे जातात. ते चिप पुरावा अॅक्सेप्ट करतात की नाही वकीलीण आजी लाडीक पणा ने बरोबर पॉइंट मांडत आहे. ते पोस्टे मध्ये असताना अरु चा फोन येतो.
अरु रड त आहे. तिला जाम टेन्शन आले आहे व रडत आहे. ते तिकडे भेटत आहेत. तिच्यावर काही चार्ज लागेल . तर आशू आईला घेउन येत आहे
व अरु बरोबर पोस्टे इशाला बघायला. बी टीम गाइज एक्साइटेड आहेत पुरावा पुरावा करत आहेत अवी टेन्शन मध्ये ओव्हर अॅक्टिन्ग करत आहे.
सुरेश भावे चा फोन येतो अनिकेत मुंबईत आहे. बांद्रा टर्मिनस ला बोलवले आहे. पण अवी त्याला घरी बोलवत आहे.
बी टीम ह्या कामावर आहे. व
प्रोमो मध्ये एक सुस्वरूप बाई येते व ती नील कामत ची आई!!!!!
इला भाटेंनी वकिलाचं बेअरिंग
इला भाटेंनी वकिलाचं बेअरिंग बरं घेतलंय.
हे पोलिस नक्की काय चौकशी करताहेत्? दोन्ही तक्रारींत आय विटनेसेस आहेत. त्यांना बोलावलं नाही किंवा त्यांच्याकडे गेले नाही. एका तक्रारदात्याच्या बाजूचे तक्रारदात्यासकट सगळे गायब आहेत. तरी पोलिस ढिम्म. यशची काय चौकशी केली तेही दाखवलं नाही.
यश, गौरी, इशा नक्की कोणत्या
यश, गौरी, इशा नक्की कोणत्या पोस्टे मधे असतात? जेव्हा अशू,सुलेखा पोस्टे मधे असतात तेव्हा अरू त्यांना फोन करून सांगते कि इशाला चौकशीसाठी थांबवले. मग तिला डायरेक्ट रिक्षाकरून इकडे ये असे सांगायच्या ऐवजी हे दोघे पोस्टे मधून घरी जाणार आणि अरूला घेऊन पुन्हा पोस्टेला येणार असे म्हणतात.
ईशा आता अनायासे आलीच आहे तर
ईशा आता अनायासे आलीच आहे तर करून टाकू चौकशी असे वाटले. दोन वेगळी पोस्टे आहेत बहुतेक.
किती बारीक लक्ष आहे तुमचे!!!
किती बारीक लक्ष आहे तुमचे!!!
इतका विचार ते लोक ही करत नसतील....
ईशा आता अनायासे आलीच आहे तर
ईशा आता अनायासे आलीच आहे तर करून टाकू चौकशी असे वाटले. दोन वेगळी पोस्टे आहेत बहुतेक.>>> पण एकच केस दोन वेगवेगळ्या पोस्टेला कशी रजिस्टर असेल? काहीही दाखवतात.
अरुला यश प्रिके शाळेत गेलाय अस वाटतय का? एकदा म्हणाली मी याला घरी घेवुन जाउ का?घरच जेवण देउ का? त्यात त्याला आधार मिळावा म्हणे म्हणून या दोघिना तिथे पाठवल म्हणजे आधी सगळ करुन टाकायच मग घाबरत बसायच,
इशा मधला मन्दपणा आइकडूनच आला असावा.
शु प्रः
शु प्रः
अन्या राइटली वैतागला आहे.
अरु आशू व आजी कडे जाउन माहिती घेते.
इकडे इशाला पोलिसी बडगा मिळत आहे. ती हुंदके देत काही डोक्यात येइल ते बोलत आहे. पण अरु आजी व आशू पोहोचतात. पोलिस
पण ह्या भावनिक गुंतवळाला वैतागला आहे. अरु त्याला पण समजून घ्या इशाचे चुकले यशचे चुकले चांगल्या घरातली( ब्राम्हण मुले) आहेत्त
अशी कशी वागली असा छुपा अर्थ आहे.
अरु माझी मुले निर्दोश आहेत हे पोलिसालाच सांगते ते विनोदी आहे. नील दोषी आहे. हे पब्लिक तिथेच डबे घेउन राहायला आल्या सारखे आहे.
इकडे अन्याला आठवणी येत आहेत. यश ला आपण कसे वागवले ते आठवण येत आहेत. संतूरचे सुरेख संगीत मागे आहे. काय हिडीस फिडीस करतो आपण त्या पोराला असे वाटत आहे. संजना चा घेउन येते. तिचे कानातले व चिकन कारी ड्रेस मस्त आहे . नरमाईने बोलत आहे. व अन्याची चौकशी करत आहे. अन्या रडकुंडीला आला आहे. आपण फुल युसलेस आहोत हे त्याला कळत आहे. संजनाचे मंगळसुत्र आहे त्यात एक सॉलिटायर खडा आहे. वेगळेच डिझाइन.
आई हेच सर्वस्व यशचे असे अन्या बोलुन दाखवत आहे. अन्याला भीती वाट्ते आहे व तो रड त आहे. मुलाचे कसे होईल म्हणून तो अपसेट झाला आहे. संजना समजूत घालत आहे. तिचे टू टोन्ड केस विचित्र दिसत आहेत. एकदा फुल हेअर कलर करुन घे बाई.
अश्रुपातानंतर भाग संपला
प्रोमो मध्ये नील कमात ची आई म् मंजीरी कामत आलेली आहे. ही जुन्या मराठी सिनेमातली नटी वाटत आहे.
नील ची आई आलेली तर कालही
नील ची आई आलेली तर कालही दाखविली ना (आजचा!) प्रोमो म्हणून?
प्रोमो मधे जे दाखवितात ते दाखविणं बंधन्कारक नाही वाटतं ?
:रागः
पोलिस छान झापतो इशाला जे
पोलिस छान झापतो इशाला जे आतापर्यंत कोणीच केले नाही. पण १-२ वाक्य होतात न होतात तोच तिथे अरू आणि कंपनी येते. अन लगेच तिचे बाळा-बाळा सुरू होते.
देशमुखांनी एका पोलिस
देशमुखांनी एका पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल केली.
कामतांनी एका पोलिस स्टेशनमध्ये खुनाची तक्रार दाखल केली.
हे यांनी आपापल्या घराजवळच्या पोलिस स्टेशनांत केलं असावं.
दोन्ही प्रकरणं जिथे घडली तिथल्याच पोलिस स्टेशनात तक्रार द्यायला हवी ना?
तो नील यशला चाकूने मा रू पाहत होता म्हणून यशने दांडका घातला, हे व्हिडियोत दिसलं नाही का?
ईशा आणि अरुला छान झापलं
ईशा आणि अरुला छान झापलं पोलिसांनी. अरुला फक्त कौतुक ऐकायची सवय आहे. इतकं बोलला तो इन्स्पेक्टर तरी माझा तो बाळ्या चालूच होतं. नीलची आई फारच तरुण दिसते, दुसरी बायको असावी.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
कार मध्ये आशू व अवी बाते चालू आहेत. अरु आतुन खचली आहे. तिची तब्येत. यश लवकर घरी यायला हवा.
घरी इशाची उल टतपासणी चालू आहे. अन्या माहिती मागत आहे. घरी व्यर्थ चर्चा चालू आहे. पास्पोर्ट वर काय प्रोब्लेम येइल का म्हणे. अभी वैतागला आहे. लगेच अरू उखडते. पण यशचा पासपोर्ट आहे ना लंडनला जाउ आला की.
यश ची सुटका मेजर मिशन झालेले आहे.
अनघा चे काम आजीचे पोहे खाणे चालू आहे. केसलां ब ओढणी फलकारे चालू आहेत. अभी काय अनिकेत भावेला आणायला चालले आहे.
अरु भावोजी खाउन जा वगैरे चालू आहे. अरु रडकुंडीला आली आहे. अरु अनघाला पण बाळ बाळ करत आहे.
दारात कामतीण उभी!!
तिकडे अनिकेत भावेची वाट बघणे चालू आहे.
स्म्जना कामतिणीस पाणी आणून देते. अरु तिला तुम्ही घाबरू नका असे समजावते. अन्या भडकतो आहे. त्याचा पेशन्स आउट झाला आहे. कामतिणीस बोलुच देत नाही. अप्पा बोलतात आम्हाला प्रकरण मिटवायचे आहे. ह्याव त्याव माहिती द्या अरु एकदम अनुभवी असल्या सारखी उसासत तुमचा मुलगा माझ्हा मुलगा अडकला आहे. माझ्यामुलाचा काय् दोष नाय हो. कामतीण लगेच अरुची कौतुकाची पट्टी वाचून दाखवते.
अन्या वैतागला आहे.
पेपर मध्ये बातमी आलेली ते वाचून ही आलेली आहे. ही सुदर्शन पासून सेपरे टेड आहे. घरचे लोक्स तिला बोलुच देत नाही आहेत.
इक डे तो मुलगा आलेला नाही. पण बेल वाजते व आलेला आहे. नित्या व अवि त्याला पकडतात. उरावर बसुन खरी माहिती घेत आहेत.
ते पब्लिक अॅटेक झाल्यावर मुंबईतच आहेत. नील सुदर्शन बरोबरच आहेत. मुंबईतच आहेत. हे लोक त्या मित्रावर उगीचच ओरड त आहेत.
कामतीण त्यांना काही पत्ते देते वकीलीण म्हणते पोलि स सर्व पत्त्यांवर जातील व चौकशी करतील. आता प्रोमो त अरु आशूच्या घरी आहे व तिला एक फोन येतो व ती डोळे विस्फारुन आहे. अरु व आशू जरा जास्तच काळवंडलेले व पारोसे दिसत आहेत नेहमी पेक्षा. टेन्शन मुळे असावे बहुतेक.
कामतीण...
कामतीण...
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
कामतीणीस काहीही माहीत नाही. मुलगा वाया गेला आहे हे सांगायला ती आलेली आहे. नवरा पण बेकार व मारकुटा आहे. आता हिची स्टोरी ऐका.
अरु नक्की कामत ताई करत उसासत तिला मिठी मारणार. मंजिरीताई!! नील जिवंत आहे हा एकच अर्थ निघाला सर्व रडण्यातून. कामत तिला कायम धमकीदायक फोन करत असतो. नील ने फोन उचललेला नाही आईचा. तिला भीती वाटली. मोठी रिस्क घेउन ती इथे आलेली आहे. अजुनही नील वाइट नाही यश वाइट नाही. मुलांचे १०० अपघात माता घाली पदरात. उसासत आधार देणे चालू झाले आहे मंजिरीताई. मंजिरीताई आम्हाला मदत करा. त्यांचे लोकेशन द्या. ती काही पत्ते देते. ही तिला पोलिसांची मदत घ्या असा सलला देतो.
संजनाने फोन वर मंजीरीचा फोटो घेतला आहे. पण अन्या तो लगेच पोलिसात देउ म्हणतो. अन्या संजना पोस्टे मध्ये जात आहे. त्यातही ती तयार होते म्हणे. अरु सुलेखा कडे जात आहे अविचा फोन आला तो मुलगा सापडला व त्याला पोस्टे मध्ये नेत आहेत. हे वायले ते वायले खूपच पोस्टे आहेत.
वकिलिणीने ते पत्ते पोलिसांना द्यायला साम्गितले आहे. ते परदेशात गेले नाहीत अजून तरी. सुदर्शन वर पकड घट्ट होत आहे. कानून के हात बडे लंबे आहेत. वकीलीन तिला खाउ पिउ करते त्यात अरुचा फोन वाजतो. तो डोळे मोठे!!! ही शिंक आल्यासारखे करते व फक्त यश असे म्हणून रडायला लागते.
कट टू संजना ही कोणाशीतरी फोन वर भरपूर बोलत आहे. कांचन सेन्सॉर करत आहे. अन्या करवादत आहे. ती यश ला सोडवायचा प्रयत्न करत असेल. अप्पा अन्या वाद होत आहे. कांचनला फक्त यश समोर हवा आहे. हिने प्रमोदला पण कामाला लावले आहे. अन्या गेटिन्ग जेलस जेलस.
सुदर्शन फार पैशाचे व्यवहार करत आहे सध्या लाखो करोडोंचे पैसे परत मागत आहे. त्याचा भारत सोडून जायचा प्लान असावा. सु भारतातच आहे. पलायन मोड मध्ये आहे. अभी अनघा पण चौकशी करत अपडेट घेत आहेत.
संजना त्याला कामताला शोधून आणायचे काम चालू आहे. परत एक फोन वाजतो अभीचा. ती यशची न्युज फिरत आहे. यश बेशुद्ध झाला. सर्व भयानक प्रतिक्रिया देत आहेत. अन्या पण भयंकर रागात आहे. अन्याला डोके शांत ठेवुन पत्ते शोधायच्या कामावर गेला आहे. कांचन सार्वत्रिक काळजी करत देवासमोर बसून जप करत आहे. हे देवासमोर बसायचे आसन फार विचित्र व अन कंफर्टेबल आहे. प्रशस्त खुर्ची ठेवायची ना.
कन्सिडरिन्ग हर बूड. म्हातारीची पाठ दुखेल ना.
यश ने खाणे पिणे सोडल्याने तो बेशुद्ध झाला आहे. अभी लगेच त्याला सलाइन लावावे लागेल वगैरे सांगतो. खात पीत का नाही हा तरुण मुलगा!!! डिप्रेशन मधले नखरे. बोलत पण नाही. साधा सरळ मुल गा त्याला इथे राहणे झेपत नाही आहे. आशू लगेच पट्टी चालू करत आहे.
यश नील जिवंत आहे असे पोलिसासमोरच बोलतो. बाकी सर्व टेन्शन मध्ये येतात.
प्रोमो मध्ये नील एका पत्त्यावर येणार आहे.( नित्या अवी टीम) कामत आज देशाबाहेर जाणार आहे असे रिसे प्शन निस्ट फोन केला तर सांगत आहे म्हणे ( आशू अरु कार मध्ये व पाउस कोसळत आहे.) रोमांटिक वातावरण पण इथे वेगळीच पंचाइत चालू आहे..
लेखिका हा धागा वाचते वाटतं ,
लेखिका हा धागा वाचते वाटतं , 2 वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्सचा उल्लेख आला आजच्या भागात.
हा इन्स्पेक्टर रुद्रम मधला आहे बहुतेक. इथे नक्की तो कोणाच्या बाजूने आहे का न्यूट्रल आहे हेच कळत नाहीये.
Pages