आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल घरचे नेट गंडले होते.

फार काही झाले नाही. मुले पिकनिकचे प्लानिन्ग करतात. मनी उर्सेकरचा नातू. अरुच्या घराची किल्ली अन्या पळवतो संजनाला संशय येतो.

आजच्या घरात तेच. अभी अनघा ला आजी पाठवत नाही. हे नव गर्भिणीचे कौतूक इतके चालू असते की पुढे काय होईल ह्याची कल्पना येते.
आजी अरुच्या बाबतीत ज्या चुका केल्या त्या तुझ्याबाबतीत करणार नाही असे अनघाला डोळ्यात पाणी आणते. अरे हे वाक्य लिहोन होईपरेन्त अनघा पाण्यावरुन घस्रायचा सीन होउनच गेलाकी. अनघा केस लांबच सोडुन आहे मला बै किचन्मह्द्ये खूप काम. सरबत बनवते. ह्याव अन त्याव. जमिनीवरचे पाणी ही व म्हातारी कोणीच पुसत नाहीत. दोघी मेडिकल केसेस.

इकडे अन्याची शोध मोहिम. अरु आशू लफडे त्याला पब्लिक मध्ये सिद्ध करायचे आहे. डोके फिरले आहे. इडीची रेड घातल्यासारखा शोध घेत आहे. काही ही सापडत नाही दार उघडतो तर समोर अप्पा संजना यश!! अप्पा थोबाड फोडतात. अगदी उठा- एशिं - शप डाय नामिक चालू आहे. पक्ष फुटला तरी मीच मुमं

अप्पा लैच डायलॉग मारून आहेत. यश पण चिडलेला आहे. मेजर अन्या व इतर डिस्कशन.

अन्याची सर्व विकृती बाहेर येत आहे.

प्रोमो मध्ये अनघा व संजना जिन्यात टक्कर होउन अनघा भिंतीवर आदळते व डोक्यास लागते. ( खरे तर असे सीन्स सातव्यात येतात!!)

पण अन्या संजनाने तुला मुद्दाम ढकलले असा थेट आरोपच करतो.( हा संजय राउ त आहे ह्यांच्यातला)

दर पंधरा दिवसांत एकदा संजना कोणालातरी धडकत असते. तिचा दोष नाही. घरात खूप माणसे आणि त्यामुळे ट्रॅफिकच तेवढं आहे.

गुगल हिंदी अनुपमाचे लिखित रिकॅप्स दाखवत असतो. दोन दिवसांपूर्वी तिथेही अनुपमाची सून पडली आणि गर्भपाताचा धोका - मग पुढे ठीक असं दाखवलं. इथे अनघा पडली म्हणजे अरुंधती अनुपमाच्या बरोबर आली की ती पुढे पुन्हा पडणार आहे?

अनिरुद्ध बिन्डोक झाला का? आशुतोष अरुंधतीला एकत्र यायला मुंबईबाहेर गेल्याचे कारण कशाला दाखवायला हवे? आणि ते इंदूर /पुण्यालाही एकत्र आले असतील तर इथल्या घरात शोधून काय उपयोग?

Honestly I am horrified at the treatment of all the Bahu. The kanchan is so emotionally manipulative and the husband's ignore basic human needs of the wives. Casual bad treatment and hidden violence. This does not a happy family make. Those with financial power or seniority are abusing other vulnerable members.

ईशा इतकी बावळट कशी? दोन वेळा धोके खाऊन तिसर्या वेळी शहाण व्हाव माणसाने. पण नाही, वडिलान्वरच गेलीये पोरगी. यश तिला मन्द म्हणतो ते बरोबरच आहे. ही वागतेच तशी!

भरत.. Lol
नाही, अनुपमा मध्ये नाही दाखविलं..बळंच पिकनिक!!
Kahi...
एकदम पहिल्याच भेटीत कुणी इतका अतिप्रसंग करेल का? विशेषतः तिचा भाऊ सोबत आहे म्हटल्यावर...?
आणि इशा...मंद आहेच! "मंदिरा" नाव पाहिजे होते हिचे!
किती बोर ते मित्र.....! किती पाणी ओतायचे?
अरुंधती चा पत्ता नाही...

आता अरुंधती डिटेक्टिव्ह बनून त्या मुलांचा शोध घेईल.
एवढा वेळ "माझ्या हातून खून झाला" असं म्हणणारा यश आईला बघून उलट बोलू लागला.

ती ईशा बॉयफ्रेंडसाठी हपापलेली आहे. पहिल्यांदा त्या मुलाने तिला बॅग उचलताना हात लावला तेव्हाच कळायला पाहिजे हा लंपट आहे. मला वाटत होतं तेव्हाच लावून देईल दोन पण ही बावळट गेली त्याच्यामागे. ह्यांच्या घरात स्वयंपाक आणि हातात आणून देणे हे करायला एक बाई चोवीस तास लागते. हे कोण करणार असे कांचन विचारते आणि सगळ्या बायकांचीच नावे घेते. घरातले पुरुष हे नाही करू शकत का. ती पिकनिक आणि आता हे यश प्रकरण फार वेळकाढू आहे.

हाय अरु ब्रेक तो मी पण ब्रेक. आज अरु चा प्रकट दिन आहे पण सकाळी भाग अपलोड झाला नव्हता.
मधल्या वेळा त, एका गर्भारशी बाईला अपघात. एक रेप अटेप्ट एक खुनाचा प्रयत्न हे सर्व झाले आहे. मला असले प्रकार घरगुती मालिकेत आव्डत नाहीत म्हणून लिहिले नाही. खोटे आरोप प्रत्यारोप.

अरु आल्या आल्या तिला अनघा पड ली हे कळल्यावर ती दोन दोन पायर्‍या चढत उडत अनघाच्या बेडरुम मध्ये धडकते. अभी औ शध देत आहे. व अनघा रडारड करुन आई - कम सासुच्या मिठीत/ ओटीत पोटात शिरुन रडते व अरु अनुभवी बाईसारखे समजावुन सांगते. अनघा तिची सर्व साटोरी सांगत आहे. बाबा बद्दल चुगल्या डोळे पुसत पुसत. पण अरु बीइन्ग समजुतदार समजुतदार

दाढीवाला अभी यशचे कार नामे सांगतो. इशा फारच मंद आहे. शी हॅस अ थिंग फॉर रिच बॉइज विथ रिझॉर्ट्स. तिचे कौ मार्य किती जपणारेत हे लोक्स!! ती पण गोड गोड बोलत लैच भानगडी करुन बसते.

यश आई खाली आल्यावर बघतो. ही मारते कि काय पण ती रड के तोंड करुन एक मिठी एक घट्ट मिठी. व सतारीचे संगीत अजून अश्रू. उसासे
डोळे पुसून नाक सा फ करणे. अरु काही झाले तरी मी तुमच्या बरोबर आहे. म्हणजे गर्भपात बलात्कार खून हे व्हावे कि काय? रिडि क्युलस
तिचा यश वर विश्वास आहे म्हणे. इशा व गौरी पण पदोपदी रडकी तोंडे करत आहेत. तिचा पूर्ण विशवास असल्याने यश व इशा पण जरा सावरतात

हिने लगेच आढावा घेतला आहे. पोलिस केस कुठ परेन्त आली आहे. चौकशी होईल म्हणे. इशाला अजून बाळा बा ळा. चालू आहे.

पोलीस दारावर आल्याने खंग्री मॅन ने नवाच पीस टोपलीतुन काढून फिरवला आहे.
सुदर्शन कामताने मुला ला मारहाण करुन अपहरण केल्याची तक्रार नोंदवली आहे. आजी लगेच आरोपी नाही चौकशी साठी नेत आहेत.
संजना असे काही झाले की विचित्र असा व्हः: आवाज काढ ते. क्या अ‍ॅक्टिन्ग वा वा.

आता हे बघून इशा जीव द्यायला निघेल बहुतेक.

इशा गौरी संजना विशाखा आजी अरु सर्व बायका ढसा ढसा रड त आहे. ( माझे सरकार पडले पडले.!!!)

यश गुणी मुलगा ( का खुनी मुलगा!!) तर त्याच्या नशीबी हे काय. - आशू नित्या आई बडबड चालू आहे. ह्यांनी एकदम टॉप क्लास लॉयर मागवला आहे. अनुभव दिसतोय. ते दोघे ही पोलिस स्टेशनला जात आहेत. आशू एकदम एक्साइअटेड झाला आहे. अरु ला फोन करयचे ठरते आहे. त्याला कसे ही यश व अरु चे टेन्शन कमी करायचे आहे. पुढील भागात शेखर आशू नित्या सर्व पोस्टे!! आरु पण संभ्रमित झाली आहे. किंवा इंदोर मध्ये छप्पान दुकानात खाउन पोट बिघडले आहे असे काहीसे भाव आहेत तिच्या चेहर्‍यावर.

सर्व बापे पुरु शार्थ सार्थ करायला उतावीळ दिसत आहेत व बायकांना गप्प बसा टेन्शान घेउ नका असे सांगत आहेत.

सगळ्यात अनुभवी तर अविनाश वाटत होता. त्याला काही कामधंदा नसतो वाटतं. अनघा स्वतःच्या संसाराचा करत नाही ईतका विचार अन्या आणि संजनाचा करते. अभिषेक कायम तोंड वाकडे. सुदर्शन कामत जर चांगला माणूस नाही तर त्याला नोकरी कशी मिळाली. नोकरी लागताना पोलीस रेकॉर्ड वगैरे बघतात ना. ईशा तर मंदच आहे. आजी बरोबर तिच्या लग्नाचे बघत होती. कांचन नातवंडांना ओळखून आहे.

अरु सुट्टिवर गेली तर बहुधा शुटिन्गची तारिख आहे हे विसरुनच गेली असावी, घाइत तशिच निघुन शुटिन्गला आली का?धुवुट निळ्या साडीवर लाल ब्लाउज घातल होत, मेकपही जेमतेम केला असावा.
आज खळीकर बरा दिसत होता, त्याला टी ज बरे दिसतात, नित्याला सदासर्वदा सुटात काय अडकवतात? कॅज्युअल घालु दे की कधितरी.शेखर दिसला प्रोमोत, एकमेव रियल अ‍ॅक्टर बाकी सगळे ओव्हरअ‍ॅक्तिन्ग करुन थकत कसे नाही कोण जाणे.

शुभ प्रभातः

आजी यश बद्दल राग व्यक्त करत आहे. मुलांनी म्हनून कुठेच जाउ नये. संजना शांत करत आहे व अरु ला पण टेन्शन घेउ नको म्हणत आहे.
सामोपचाराने घ्या म्हणत आहे. इशाला खूपच भीती वाटत आहे आता. अरु तिचे सांत्वन करुन यश ला धीर द्यायला जात आहे बॅग काखोटीला मारून.

अवि पोलिस स्टेशन मध्ये हपिसरला लाडीगोडी लावत आहे. त्यात शेकरु आले. व चमकदार संवाद बोलतो व आपलेपणा प्रस्थापित करायचा प्रयत्न करत. अरु येते व अडाणी प्रश्न विचारून मी त्याला घरी का नाही घेउ शकत विचारते पोलिस पण काही वेळा ने पदराला डोळे पुसू लागतील. ही शाळा आहे कि काय परत न्यायला.
अरु तीच तीच पट्टी परत उसासत बोलत आहे. हे धीर देणे काय.
शेकरु पोलिस शी लाडी गोडी लावत आहेत अरु कडे पैसे जास्त झाले आहेत घड्याळाच्या वर बांगड्या घातल्या आहेत. चार चार सोन्याच्या बांगड्या!!

इकडे आजी नवस बोलत रडत आहे. अनघा गौरी काहीतरी करत आहेत जेवायचे पण आजी यश येइपरेन्त उपाशी राह णार आहे.
इशा सारे फसाद की जड. उगीच वाकड तोंडे करत आता हा कुठे तो कुठे करत आहे. उधर नही जाना था फिर. गौरी आजीला धीर देत अस्ताना
अरु ला फोन लावेल म्हण्ते पण तो परेन्त मंडळी आलीच.

पोलिस कस्ट डीचे ऐकून गौरी व आजी रड त आहे. अरु सर्वांना खायचे विचारते. व वरण भात लावते. हात पाय न धुताच किचन मध्ये!!! कुठे गेले हिचे संस्कार!!( तुरुंगात!!)

शेखर परत सर्व आढावा घेत आहे. इशा परत सर्व सांगत आहे. गौरी अमेरि केला गेली तर बरे!! कोण ही वाकडतोंडी अभिनेत्री आहे बरे.
तर लगेच आशु व नित्याची एंट्री. सुदर्शन कामत बरा माणूस नाही. त्याचे चरित्र सांगतात. आशू फारच चांग्ल्या करायच्या इच्छे ने पेटलेला आहे दिसतो आहे. यश सुटेल असे आश्वासन देतो. शेखर उत्तेजन देउन सुदर्शनला अरुच्या पायावर घालणार अशा उत्साहाने निघून जातो.

आता एकदम पंढरी नाथा विट्ठला असे भजन लावुन त्यावर सर्वांना यश ची आठवण येत आहे असे भावनिक जुने फूटेज लावले आहे.
साधारण मेल्यावर असे फु टेज येते डोक्यात. वारी चालू असल्याने एक भजन टाका अशी आर्डर असावी.

प्रोमो मध्ये अभी नेहमीप्रमाणे स्वतंत्र सुभा मांडतो व अरु त्याला चमकावते.

पोलिसांनी सांगितलं यशने त्या मुलाला मारहाण केली आणि किडनॅप केलं. केळकर आणि कंपनीच्या पुढच्या संवादांत मात्र खून करून बॉडी गायब म्हटलंय.
-
एवढ्या प्रॉपर्टीज असणारा कामत नोकरी कशाला करत होता?

पोलिसांनी सांगितलं यशने त्या मुलाला मारहाण केली आणि किडनॅप केलं. केळकर आणि कंपनीच्या पुढच्या संवादांत मात्र खून करून बॉडी गायब म्हटलंय.
->> हो कि नाइ. लेखिकेला अनुभव नाही नं त्यामुळे अश्या गफलती होत असाव्यात.

शुभ प्रभातः मागे व्हायोलिन वर आई कुठे काय करते धून चालत आहे. व अरु स्वतःला मोटिव्हेट करत आहे व न रडता पुढे जायले पाहिजे. माझं मूल संकटात. आई अप्पा अनघा ह्यांच्या तब्येती संभाळायच्या आहेत.

अविनाश पोलिस कसटडीत आहे यश ते सांगितल्यावर आजी रड त आहे तर संजना फाटे फोडत आहे. व वकिलाला भेटलास का विचारत आहे. आजी जवळ जवळ भोकाड पसर त आहे. त्याला मारहाण नको कसे ही परत आणा. यश ला घरी आणा हे सर्व संपूदे. पोरे डोळ्ञा समोर राहा असे मी सांग त असते यश च्या आयुश्याचा प्रश्न आहे मुलांना कळ त नाही. इशाचा रेप झाला असता तर!! इशा कशाला गेली अनोळखी मुलाशी बोलायला. संजना एक्स्प्लेन करत आहे. इशाचे बोट चेपे बॉयफ्रेंड धोरण बदलायला हवे. अरु इथे राहायला आली आहे ते बरेच आहे असे अप्पा म्हणतात.

विशाखा लगेच यश ची पोझिशन परत समजावुन घ्यायला हवी. अन्या तुम्ही लगेच कानिघालात फिजिकली चेक का नाही केलत म्हटले.
आजी लगेच माझ्या घराला माझ्या यश ला नजर लागली असे भोकाड पसरत आहे.

अभी: यश ला पोलि स घेउन गेले तर त्याला थांबवले कसे नाही. यश मूर्ख आहे. मारामारी कशाला करायला हवी. कमी खुमखुमी नाही आहे यश ला राग आलाकी त्याचा मेंदू बंद पडतो. हे बरोबर सांगितले आहे त्याने. आईने त्याच्या अँगर इशूज ना पाठीशी घातले आहे. अनघा लगेच ता ईचा काय दोष. इंपल्सिव्ह वागणे चुकीचे आहे हा पॉइन्ट बरोबर आहे. अभी इज म्हणींग करेक्ट. सगळी कडे तटस्थ विचा र नाही करू शकत
यश कायम मारामार्‍या करत असतो. त्याला उचकावले की तो चिडतो. ह्यात काही अ‍ॅबनॉर्‍मल नाही म्हणे अनघा. अभीचे बरोबर आहे त्याला करेक्ट न करता कायम पाठीशी घालत राहा म्हणते. ह्या क्षणी अरु अनघाला काही हवे का विचारायला आली आहे.
अनघा ताई ताई तू जेवलीसका विचारत आहे.

अभी ला आई जुन्या घटना आठवन करून देत आहे. अभीला पेशंटचे नाते वाइक मारायला आले तर यश मधे पडला होता कधीतरी तू पण यश ला आधार दे असे म्हणूण निघून जाते. उसासे क्वीन अनघाला झोपायच्या आधी दूध प्यायला सांगते.

शेखर - गौरी बोलत आहे तः यश जेल मध्ये जाइल का/ सुटेल का. संजना त्यांना कॉफी करुन आणते. गौरी विटनेस आहे. कोर्टा त साक्ष देशील का विचारतो. संजना पण तिला आधार देते व टेन्शन घेउ नकोस शेखर फोटो जमवायला सांगतो. अ‍ॅड एजन्सी कुठली ते विचारायला सांगतो. नील कामतच्या मित्रांना शोधायला हवे. आता हा जेलर असल्यासारखे यश सुटेल ना असे संजना शेकरुलाच विचारते. घरातले सर्व रड त आहेत.
वाइट वाटते असे संजना म्हणते. संजना वाकडतोंडी रडकीला मिठी मारून आहे.

अरु काहीतरी बनवून टेबलावर ठेवते. चार घास खाउन घ्या म्हणते सर्वांना. अभी हॉस्पिटलात चालला आहे. व अलिप्त पणे राहत आहे. पण मी काय करणार असे म्हणून अंग काढून घेतो. इशा केविलवाणे दादा असे अपील करते माझ्या बरोबर थांब अवि पण म्हणतो. तो थांब तो.
अरु मी वकिलाशी बोलणे केले आहे म्हणते. हिला काय समजते असे अन्या संजना टोकतात
तितक्यात सुलेखाताई व आशू येतात त्या प्रॅक्टिस करत होत्या व आता यश ची केस लढणार आहेत आता हिचे फिफ्टिन मिनिट्स ऑफ फेम.
आता आजी वकीलाचा प्लग. काळजी करु नका.

प्रोमो मध्ये यश व पोलिस स्टेशन मध्ये सर्व प्रभावळ जमलेली आहे. अन्याला आजी वकील पसंत नाही. पण आजीवकील एकदम टॉप क्लास शंकाकाढत आहे.

अनघा माझं प्वार प्वार मोड मध्ये आहे.

आज मी रजा घेउन घरी झोपा काढणार आहे. रिटायर्ड मोड ऑन.

काल आशुतोषने देशमुखांना सांगितले की नितीनने कामतची माहिती काढली आहे.
पुढे कोणाशीतरी बोलताना म्हणाला की आमच्याकडे सगळ्या फील्डमधले लोक माहिती काढायला ठेवलेले असतात, असं काहीतरी.
याच्याकडे सगळी कामं करायला नितीनशिवाय दुसरं कोणीही नाही हे इन्डायरेक्टली सांगितलं

इशा कोर्टात साक्ष देताना घोळ घालेल बहुतेक.

यश आणि केदार त्या रूममध्ये परत गेले तेव्हा त्या लोकांनी तिथे कॅमेरा लावून ठेवला होता.

त्या यशला राहूदे १-२ वर्ष जेलमधे. त्याचं गिल्ट इशाला पण खाऊ दे. आणि तेवढ्यात त्या अभिला पण बुकलून काढू दे कुठला तरी पेशंट. म्हंजे तिघांच्या पण अकला ठिकाणावर येतील. अन्या-अरूची तिन्ही पोरं बेअक्कल आणि डेंजर-मॅग्नेट्स आहेत. सगळं नीट चालू असेल की काहीतरी कीडे करतातच.
आता हिचे फिफ्टिन मिनिट्स ऑफ फेम.>>>> हे बाकी खरंच. सगळ्यांना समान संधी हवी ना. घोळ घालायची.

त्या यशला राहूदे १-२ वर्ष जेलमधे. त्याचं गिल्ट इशाला पण खाऊ दे. आणि तेवढ्यात त्या अभिला पण बुकलून काढू दे कुठला तरी पेशंट. म्हंजे तिघांच्या पण अकला ठिकाणावर येतील.>>> +१
अभिचे प्रत्येकवेळी विरूद्ध मत असते. त्यामुळे अनघाला आयुष्यभर तडजोड करावी लागणार आहे. ताईच्या प्रेमापोटी ती करेलही.
याच्याकडे सगळी कामं करायला नितीनशिवाय दुसरं कोणीही नाही>>> खरंय. त्यामुळेच तर त्याला त्याच्या कुटुंबासाठी वेळ मिळत नाही. तो धंदाही संभाळतो आणि अरूला काय पाहिजे काय नको ते सगळे (जे अशू फक्त बोलतो) ते नितीन करतो.

सुलेखा ताई काही न खाता लगेच कामाला सुरुवात करु म्हणते. पोलि स स्टेशन ला निघायचे ठरते आहे अर्थात अरु बरोबर. अन्या उखडला आहे. जगात दुसरे कोणी वकील नाहेत का!! यश च्या आयु श्याचा तमा शा झाला नाही म्हणजे मिळवले. शेखर व पोलिस वादा वादी चालू आहे. अरु लगेच भावजी!! तुम्ही इथे.

सुलेखा ताई एकदम लॉयर मोड मध्ये. यश ला बोलवतात व स्टेटमेंट मागवतात. अरु एकदम लाड मोड मध्ये आहे. यश मंद आहे. मला सांगा मी किती वर्शा जेल मध्ये जाणार आहे!!! अरे केस व्हायला हवी नाह. ही फक्त कस्टडी आहे. परत सर्व रामायण ऐकते सुलेखा.

शेखर नित्या आशू सुदर्शन कामताला शोधत आहेत. आशू मोटिव्ह शोधत आहे. खरं ह्यांनी अरु च्या घरचा प्रोब्लेम हाय जॅक केला आहे. अन्याला पुरुषार्थ दाखवायची संधीच कापली. शेखरला मित्रांचा पत्ता सापडला आहे. हे लगेच जातात त्यांना शोधायला व माहीती घ्यायला. आशू नीट वागायला सांगतो.

बेल वाजते व आई आणि अरु आत येतात. वकीलीण बाई अजून एक प्राब्लेम मांडतात. यश डिप्रेस झाला आहे. सेल्फ डाऊ ट गोंधळ झाला आहे.
यश ने खंबीर राहायला हवे.( त्या साठी आईच्या पदरा खालून बाहेर यायला हवे ना. एकदम खंग्री संगीत.

भोकाड आजी अवीला फोन कर अजून का नाही आला म्हणत आहे. यश अजून तिथेच आहे कोठडीत. इशा रडत आहे आम्ही पण तुरुंगात जायला हवे. आजी तो जीवन भर जेल मध्ये राहिल काय. अन्याचा वकील आजीवर भरोसा नै ना. त्याला मोठा वकील वाटेल ते करी न हे ते चालू आहे कर्ज काढेन प्रोपर्टी विकेन घर विकेन वकिल ठेवेन फी साठी.

कट टू गौरी परत तेच स्टेट्स रिपोर्ट. गौरीचे पॅकिन्ग चालू आहे परवा फ्लाइट. इशा लगेच भावनिक गंडे दोरे उगाळून तू जातेस का पण गौरी ने सध्या कॅन्सल केले आहे. यश साठी बरं . संजना अरे तुझी संधी तुझी करीअर करते. गौरी असल्याने यश ला आधार मिळेल नक्की. काय ते वाकडे तोंड वा वा. आजी गौरीलाच मिठी मारते. देशमुख बाप्यासाठी स्वतःचे जीवन दाव्यावर लावणारी अजुन एक स्त्री म्हणून आजी बोलावुन मिठी मारते. बलिदान बलिदान.

कट टू वकील हाउस वकीलीण आशू अरु ला कॉफी बनवून आणून देते. सस्पेन्सफुल संगीत. अरु उसासत काय होईल काय वाट्ते. ओ अरुला चहा दिला आहे. यश ला चहा खाणे मिळत असेल का तो काही माग णार नाही यश ला तर तव्यावरची पोळी लागते. तो खूप घाबरला आहे. भ्या भ्या.... तो कधी सुटेल कधी घरी येइल हे रड गाणे चालूच आहे.
वकीलीण खरे बोलुन तिचे रडणे वाढवते चौदा दिवस कस्टडी आहे. अरो अजूनच धाय मोकलून रडा यला लागते. अरे लोक एका फेसबुक पोस्टी साठी वर्श वर्श आत सडले आहेत.

सर्व सुदर्शन कामता साठी खोळंबले आहेत. वकीलीण पॉझिटिव पोझिटीव्ह मंट्र जपत आहे. अरु निघते इनफ अश्रुपात करुन झालेला आहे.
आशू तिला सोडायची संधी घेतो. वकीलीण आई बाळा तुझ्या यातना अशी चिकट पट्टी सोडते.

इन्स्पेक्ट्र तर दोन दिवस कस्टर्ड म्हणाला होता ला. वकिलीणी ने चौदा केले कि काय. कायद्या अनुसार.

प्रोमो मध्ये: पत्रकार त्रास देत आहेत.

Lol
खून कुणाचा झाला?>> लॉजीक.

अमा..
Lol
तसे तर बरेच खून झालेत
प्रेक्षकांची सहनशक्ती, तुम्ही म्हणताय तसे- लॉजिक, अन्याचे पीस ऑफ माइंड, आशु चा ड्रेसिंग सेन्स.....!!

Pages