Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरु घाबरून आली आहे. दोन
अरु घाबरून आली आहे. दोन लाखाचा चेक !! अजून दोन गाणी पण मुक्रर झाली आहेत. आशूकडे येउन ती घाबरत रड त एक शुन्य जास्त पडले आहे. >>> हाईट आहे, फुकट काम करुन घ्या हिच्याकडून.
पावन खिन्ड पहा बरे. >>> सॉल्लीड.
अरुंधतीला त्याच कॉलेजात जायचं
अरुंधतीला त्याच कॉलेजात जायचं आहे कारण तिन्ही मुलं त्याच कॉलेजात होती त्यामुळे तिथली सगळी माणसं तिच्या ओळखीची आहेत. कशी काय?
मुलांचे पालक असे किती वेळा कॉलेजात येतात? माझे वडील फक्त अकरावीच्या अॅडमिशन पर्यंत माझ्यासोबत आले होते. नंतर पाच वर्षांत कधीही पाऊल ठेवावं लागलं नाही.
तेच माझ्या मनात आलं.. कॉलेज
तेच माझ्या मनात आलं.. कॉलेज मध्ये ओळखीचे आहेत म्हणजे काय?
काही डायलॉग लिहितात.....
मागे अरूने इशाच्या शाळा कि
मागे अरूने इशाच्या शाळा कि विद्यालयात टाकाऊतून टिकाऊचा स्टॅाल लावला होता. तिची कला बघून त्या बाईंनी अरूला शाळेत नोकरी दिली होती. आता त्याच बाई अरूला ॲडमिशन मिळवून देणार का? आणि मुख्याध्यापिका ओळखीतल्या असून काय फायदा? त्या वर्गात शिकवायला येणार आहेत का कि गप्पा मारायला?
एका गाण्याचे जर २०,००० मिळतात तर त्यात आणखी दोन गाणी वाढवल्यावर १ लाख ८०,००० ची पगार वाढ होते. मज्जा आहे बुआ अरूची!
त्या स्टॉल मधूनच ५००० कमावले
त्या स्टॉल मधूनच ५००० कमावले होते का? आज फ्लॅशबॅक दाखवला.
अनिरुद्धला १५ दिवसांचा पगार (चेक) ५०,००० मिळाला. म्हणजे त्याचा पगार १ लाख.
सगळ्या कशा राउंड फिगर्स. दिडक्शन काही होत नाही.
Even for the song payment one
Even for the song payment one has to raise an invoice adding gst etc. She does not negotiate also.
ओळखिच्या कॉलेजाचा हट्ट काय
ओळखिच्या कॉलेजाचा हट्ट काय कळला नाही ही काय लहान मुल आहे का की घाबरुन रडायला लागली तर प्रिन्सिपल घरी आणून सोडतिल.
प्राजक्ता
प्राजक्ता
संजनाशी बोलताना फार खमकी असते मग पैशाच्या बाबतीत कुठे जातो तो खमकेपणा. घराचं भाडं किती, लाईट बिल, गॅस, येणारे जाणारे फुकटे, हा सगळा खर्च कोण आशुतोष करणार ही जर अशीच दचकत राहिली तर. ईशा आणि अभि कुत्र्याचं शेपूट आहेत, दोन दिवस सरळ होतात परत तिसऱ्या दिवशी आई वाईट.
सगळा खर्च कोण आशुतोष करणार ही
सगळा खर्च कोण आशुतोष करणार ही जर अशीच दचकत राहिली तर>>> हाहा! तो तर आनंदात करेल.
अशुतोषला तर वेगळेच टेंशन आले आहे…. ॲाफिसच्या कामामुळे अरूला जे करायचे आहे ते करायला मिळणार कि नाही याचे.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
राजाभाउ ं साठी ओरडा आरडा चालू असल्याने संजना डिस्टर्ब झालेली आहे. कंचन ची बहीण सुलुताई विचारते तू कोण!!
फनी मुझिक. हिला सुलु मावशे नमस्कार करायला सांगते व सासर्यांना करायला सांगते. राजाभाउ ही कोन विचारतात. आजी संजनाला सांगायला सांगते. राभा ही मोलकरीण आहे का विचा रतात तेच ते वैताग जोक्स चालू आहेत. कोणीच ऐकून घ्यायला तयार नाही. संजनाचे व्ह्ट व्हट चालू आहे.
सुलुमाव शी रिंगणात येते. व अरु ला भेटायला बोलवते.
कट टू अरु अॅडमिशन प्रोसेसः ती ओळखीची प्रिनिसिपाल एकदम भरलेल्या कणगी सारखी आहे.( सॉरी टु बी शेमिन्ग दिवे घ्या.) बाई मेनेज मेंट शी बोलुन कळवते रूल्स मध्ये बसते का बघते. हिला कॉलेजातच जायचे आहे. त्या पण करस्पाँ ड नस ने करा असे सुचवतात. नवे गाणे छान आहे म्हणतात बाई. नवे गाणे लागते मध्येच.
ह्या पाव्हण्यांना अरु ने तिची खोली दिली होती. आता संजना नकार देते पण सुलु मावशी तिथेच झोपनार म्हणते. ते गेल्यावर सर्व हसतात पण संजना उखडलेली आहे. अनघा पथ्यपाणी विचारते. अप्पा तिला का काम म्हणतो. आता अप्पा व यश अरु कडे जाउन राहायचे म्हणतात पण तिलाच बोलवायचे ठरते. संजना कट कट करत आहे. १५ दिवस राहतात. म्हणे तर संजना गौरी कडे राहायला जायचे ठरवते. कांचन वट पोर्णिमेचे काढते.
आजी अनघा किचन , अप्पा फिरायला अन्या पाव्हण्यांची सोय बघायला इशा अभ्यासाला.
हपिसात आई डबा घेउन आलेली आहे. नॉर्मली डायवर कर्वी पाठवतात पण हा लाडाचा मुलगा आहे. ह्याने आज विचित्र चौकडीचे व मध्ये पांढरा पट्टा वाले निळे जाकीट घातले आहे. अरु अॅडमिशनचे सांगते. अरु लवकर लग्न झाल्याने शिक्षणा पासून वंचित राहिली. इथेही अनेक पदर
डोळ्याला लागले असतील. घरकामात जवानी बीत गयी. राहुन गेलेली बस आता परत कॅच करायची उर्मी आहे हेच खूप.
बॉस फारच कोऑपरेटिव्ह आहे. सुलेखाताईने पण लग्ना नंतर लॉ केलेले आहे. ती गोड मिट्ट बेडकाची जीभ बाहेर आलेली आहे. सर्कून पडायला होते आहे त्यावरून. बेटी पढाओ प्लग.
सुलु मावशी विशाखाला बोलावुन घे म्हणते. ती फोन करत नाही तक्रार होते.
सुलुमावशी गरम गरम भजी व चहा मागवते संजना कट कट करत आहे. राजाकाका अरु ला ठेवुन घेतात. अरु वैतागते.
पावन खिंड् बघा बर.
प्रोमो वट पोर्णिमेचा खास सीन. तेच तेच किती वेळा. संजना शेखर अरु अन्या तीच तीच खरुज खाजवून परत.
राजाभाऊ बहिरे झाले ; ठीक आहे.
राजाभाऊ बहिरे झाले ; ठीक आहे. पण त्यांची स्मृतीही गेली का? मेव्हणीला दोन मुलगे आहेत, नातवंडं आहेत हे कसं माहीत नसेल. संवाद लेखिकेने मेंदू काढून ठेवलाय बहुतेक.
कैच्या कै. राजाभाउंचे
कैच्या कै. राजाभाउंचे पात्र विनोदी अजिबात वाटत नाही... वैताग येतो.
ती सुलू मावशी या आधी कुठल्या तरी सीरीयल मधे आजी झालेली...! कुठल्या बरं...?
खूपच फीलर एपिसोडस.
अन्या ने दुसरं लग्न केले वगैरे या मावशीबाईंंना कळले नसेल का? आमच्या कडे तर एकदम २ साड्या आणलया तरी बहिणीला फोन जातो ...!!!
राजा भाऊ अगदीच खुळचट दाखविले...
वीणा भारतीय संगीत विद्यालय!
प्रवेश घ्या बरं!
मागे एकदा गावाहुन आलेले राजा
मागे एकदा गावाहुन आलेले राजा भाउ म्हणजे जयन्त सावरकर दाखवले होते, आता बदलले का?
वटपोर्णिमेला करवाचौथसारखी लाल साडि नेसलिये सन्जना, दागिने सुरेख आहेत, बाकी अन्यासाठी सात जन्म टेप एकदम बोअर.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
अरु त्याच्च कॉले ज चा हट्ट घेउन बसल्याने इशा वैतागली आहे. व चिडून निघून जाते. संजना तिला शिस्त नाही म्हण ते तर सुलू मावशी चांगले लेक्चर देतात व सर्व जण मान हलवून अरु ला शिकायला प्रोत्साहन देतात.
नेक्स्ट डे अरु डब्बा बांधून निघाली आहे पण अनघाला वटपोर्णिमेची मदत करून पुढे कामाला जात आहे. तेव्ढ्यात शेखर येतो व तिला नेम प्लेट देतो. संजना वर एक डिस्कसहन होते.
अप्पा उपास करत आहे व तो झेपत नाही. कांचन सुलू देव दर्शना हून आलेली आहे. अनघाने खिचडी केलेली आहे. सुलु मावशी खाउन पिउन उपास करत आहे. आजी अरुंधतीला जास्तीची वाणे आणायला सांगत आहे. संजना अरु का येणार म्हणून भांडण चालू करते. आता अरु का बर.
तेच तेच
आज्या नटून आल्या आहेत. अप्पांच्या उपासावरुन व तो न निभवता येण्या वरून जोक्स चालू आहेत. वडाच्या फांदीच्या पूजनाची तयारी करुन ठेवली आहे. अनघाने वे गळी मस्त साडी नेसली आहे. छान दिसते आहे अभी आहे पण रिझर्वड. अरु मदतीला आलेली आहे पण विमल पार नैवेद्यापासून सर्व करून गेली म्हणे. कधी ते?! यश स्टुडिओत गेला आहे म्हणे. संजना व अन्या पण आलेले आहेत ती नटलेली आहे. अरु तिला पूजा सांगत आहे. खरे तर आज तिने डिग्निफाइड अॅबसेन्स दाख वायला हवा होता व आशू बरूबर शाळेच्या बांधकामाच्या इन्स्पेक्षन ला जायाला हवे होते.
दोघींची पुजा होते. सर्व मेन लोक कुर्ते घालून आलेले आहे.त ते राजाभाउ फारच पोटाचा नगारा झालेले आहेत.
संजना फेरे घालताना शेखर दिसतो व ती पुढे येते आणि धागा तुटतो. लगेच अन्या पण काय न हे व्यर्थच आहे म्हणतो.
पुढील भागात अरु ला इंदोरला जायचे आहे. अन्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अन्या परत आशू बरोबर असेल्च असे विधान करतो.
सर्व प्रश्न शिळे झालेले आहेत. दे हॅवंट हर्ड ऑफ अ क्लीन ब्रेक मू व्ह ऑन.
अरु तिला पूजा सांगत आहे.>>>
अरु तिला पूजा सांगत आहे.>>> हा असला उफराटा कारभार असल्यावर कसा मिळणार अरुला सन्मान ? इशा,अभ्या,अन्याला तिने परत यावस वाटत ,कान्चन वैगरे अजुनही तिला ग्रुहित धरतात यात काय चुक आहे?
खरे तर आज तिने डिग्निफाइड अॅबसेन्स दाख वायला हवा होता व आशू बरूबर शाळेच्या बांधकामाच्या इन्स्पेक्षन ला जायाला हवे होते.>>> जोडे खावुन घ्यायची हौस!
पोटाचा नगारा >>> जबरदस्त अमा
पोटाचा नगारा >>>
जबरदस्त अमा नेहमीप्रमाणे.
मागे एकदा गावाहुन आलेले राजा
मागे एकदा गावाहुन आलेले राजा भाउ म्हणजे जयन्त सावरकर दाखवले होते, आता बदलले का? >>>>>> ते राजाभाऊ नव्हे, ते कांचनचे मोठे भाऊ, अन्याचे मामा. राजाभाऊ, कांचनच्या बहिणीचा नवरा. कांचनच्या बहिणीचा रोल केलेली अँक्ट्रेस श्रीमंत दामोदरपंत नाटकात भरत जाधवची आई झाली आहे.
शुभ वीकांतः
शुभ वीकांतः
शेखर पुजेत मध्येच येउन विघ्न आणत आहे. संजना अरुला दोषी ठरवते तूच मध्ये आलीस म्हणे. अरु पण येते. राजाभाउ गैरसमज करुन घेतात.
हे सर्व नाटक व्हरांड्यातच चालले आहे. संजना पुन्हा धागा बांधू का विचारते. व अरु ला खट्टे मारत आहे - खट्टे म्हणजे हैद्राबादी भाषेत टोमणे. -
अरु सडेतो ड उत्तर देते. संजना सात जन्म अन्याच नवरा म्हणते
शेजारपाजारच्या बायका आल्या आहेत . हळदी कुंकू व वाण द्यायचा समारंभ चालू आहे. अनघा ताईला विचारुन विचारुन करत आहे. संजना
ओटी भर असे सांगत आहे. एकदम सांस्कृतिक वातावरण व संगीत चालू आहे. एक बाई अरुचे गाणे छान आहे म्हणते. संजना लगेच खट्टे मोड. तरी बायका छान बोलत आअहेत. कोणीत वाकड्यात शिरत नाही आहे. टोमणे मारत नाहीत. त्या बायका अॅक्टर वाचून दाखवत आहेत संवाद असे वाटते. अरु लगेच वीणा भारतीय संगीत विद्यालया बद्दल सांगते. अॅडमिशन घ्या म्हणते.
अप्पा पण लेकी बोले सुने लागे टोमणे बोलत आहेत. अरु निघते पण तिला हपिसला जायचे आहे. अनघा जेवायचा आग्रह करते. सुलु मावशी अरु किती जीव लावते म्हण्ते. व संजनाला टोमणे.
पुजा छान झाली. अनघा ताईला थेंक्यु म्हण्ते. निघत आहे. तर आशूचा फोन येतो अचानक इंदुरला जायचे आहे. अनीशचे वडील इंदोर संगीत विद्यालयात कोर्सेस आहेत त्याबद्दल माहिती गोळा करायची आहे. कोर्स मटेरिअल डिझाइन करायचा प्रश्न आहे. उद्याच इंदोर ला फ्लाइट ने जायचे आहे.
घरी जाउन फोन वर बोलु म्हणते. एकटीने एव्ढा लांबचा प्रवास मी कधी केला नाही. अप्पा अनघा तिला उत्तेजन देत आहे. अन्या पण विचारतो.
आशू पण येणार का विचारते. काळजी वाटते सवय नाही म्हणून गोड बोलत अन्या पंख कापायला कात्री घेउनच उभा आहे. कामानिमित्त प्रवास जमवायला पाहिजे. अनघा १००अ % बॅटरी फुल पॉझिटिव्ह मोड मध्ये आहे.
त्यात देवापुढे दिवा लावायला किल्ली देत आहे दोन तीन दिवसा साठी. परत नमस्कार. अप्पांना.
कट टु नित्या आशू अरुच्या ट्रि पची तयारी. विमानाचे तिकीट कार पिक अप ड्रॉप, हॉटेल बुकीन्ग. कौतूक फ्री. अरे वा आज जाकीट बदलुन दुसरे भाड्याने आणलेले आहे. डव्व ब्लू. कलर. नित्याला अन्याचा इंटर्व्यूचा व्हिडीओ मेसेज येतो. स्टुपिड मिडीआ इंटरव्यु मुळे दोघे वैतागले आहेत.
पावन खिंड रिमाइंड र हर हर महादेव.
यश अनघा अ भी - मेजर कन्फ्रंटेशन. युथ डब्बा अॅक्टिव्ह आहे.
परत नमस्कार. अप्पांना.>>>
परत नमस्कार. अप्पांना.>>>:हाहा:
ती सुलू आजी सेन्सिबल वाटते
ती सुलू आजी सेन्सिबल वाटते तिच्या बहिणीपेक्षा सध्यातरी.
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
एक राजाभाउ जोक. अनघा चे हिमोग्लोबिन कमी आहे. अभी नेहमी प्रमाणे तोंड वाकडे. यश काही तरी डोके फिरवून आहे. पण अप्पा नंतर बोलु म्हणतात. राजाभाउ श्रीखंड पुरी खाउन अजुनच जाडे झालेले दिसतात. हे झोपायला वर जातात. अनघा वैतागलेली आहे व दमलेली आहे. पण बसले की बरं वाटेल म्हणते अभी तिला झोपायला लावतो. आता हिने काही प्रेमाने बोलावे तर हिने नवृयाला न आव्ड णारा ताई इंदोरला जाईल हा विषय काढत आहे. अभी अन्यासारखी नकार घंटा वाजवतो. एकटीने तिला कसे जमेल. हिने पण कश्याला अप्रिय विषय काढला आहे. अन्याचा इंटरव्यू.
वर यश व अवि ह्यांचे अन्याच्या डावपेचांबद्दल चर्चा चालू आहे. अन्याचा गेम प्लान अवि क्लीअर करतो. हे गॉसिप अन्या ऐकत आहे आता काय होईल राडा!! यशचे डोके फिरलेले आहे. अन्या लगेच काहीतरी गोलमाल एक्स्प्ल्रेनेशन देत आहे. यश तोडीस तोड उत्तर देत आहे. अनिरुद्धला अरु घरी यायला हवी आहे. व तिला डांबून घालायचे आहे. पण यश धमकी देतो की असे करू नका.
परत अन्याचे काही गर्विष्ठ स्वगत आहे. ह्याला सर्वांचे लगाम आपल्या हातात हवे आहेत.
इकडे अनघा अजून नव्रा भडकायला खत पाणी घालत आहे. विकृत म्हणते. मग अभी वैतागतो. हिने थोडी झोप घ्यायला हवी होती.
हिला पण संसार कसा करावा स्वतःचा हे कळ त नाही. जरा नवर्याच्या कलाने घ्यावे एस्प आता बेबी ओन द वे आहे तर. हि इज अ नॅरो माइन्डेड जेलस मॅन असे इंगरजीत म्हणते. म्हणजे हे खरे आहे. पण उघड बोलुन मार्क का घालवा.
फादर्स डे असल्याने अभी बाबांवरील प्रेम व्यक्त करतो.
आज पावन खिंड प्रोमो नाही.
पण पुढील भागा त नित्या आशू येउन त्यांच्यावर अबृ नुकसानीचा दावा करतील अशी धमकी देतात.
काल पावनखिंडचा प्रिमियर झाला.
काल पावनखिंडचा प्रिमियर झाला. टीव्ही लावून ठेवला होता. पण पाच मिनिटांच्या वर सलग पाहवला नाही. वर झिम्माच्या प्रिमियरच्या प्रोमोंचा मारा.
तो आजपासून मालिकांत सुरू होईल.
अनघाला बाळंतपणासाठी माहेरी पाठवा.
आज पावन खिंड प्रोमो नाही. >>>
आज पावन खिंड प्रोमो नाही. >>>> आता "झिम पोरी झिम" खेळायचं, पुढच्या रविवार पर्यंत.
अमा तुम्ही एक नवीन टर्म
अमा
तुम्ही एक नवीन टर्म दिलीत.. राजाभाऊ जोक!
पण उघड बोलुन मार्क का घालवा.... ही टीप तर सगळ्यांनाच उपयोगी आहे!
आज तर काहीच विशेष घडले नाही? अरु नव्हतीच का आज?
हो आंबटगोड, आजचा पूर्ण भाग
हो आंबटगोड, आजचा पूर्ण भाग समृद्धी बंगल्यात होता.
आता "झिम पोरी झिम" खेळायचं,
आता "झिम पोरी झिम" खेळायचं, पुढच्या रविवार पर्यंत. >>> हाहाहा सहीच.
शुभ प्रभातः यश गौरी चालत
शुभ प्रभातः यश गौरी चालत चालत भांडत आहेत. यश वैता गला आहे. गौरी तू आईकडे चल असे गोड पणे सांगत आहे. पारच भडकला आहे. इतके आई आई कोणालाही वैताग च येइल. मोठेच स्वगत तेच तेच . पण गौरी त्याला आइसक्रीम खायला घालते. तरुण लोक आइ स क्रीम खाताना आइस विसरून एकमेकांस आय लव्ह यु म्हणतात. तरुण लोकांचा डबा उघडून बंद केला आहे. थोडे खोडकर पणा करतात
सुलुताई राजाभाउ निघाले आहेत. रडारड चालू आहे. नमस्कार चमत्कार राजा भाउ जोक्स, कांचनने मला आवड्ते ती साडी नेसली आहे.
सुलु कांचन ह्यांनी अविचे लग्न जमवायचा सिक्रेट प्लान केला होता तो उघड झाला आहे. अनघाच्या डोजे ची बात चालू आहे. दणक्यात होणार.
परत सर्वांचे नमस्कार संस्का री. यश गौरीला थोडे खाउचे पैसे देतात. घरी बोलवतात. इथे रिलेशनशिपचे पक्के नाही सुलु आजी लग्न करुन गोड बात मी परेन्त गेली आहे. लगेच मागे सस्पेन्स फुल संगीत पीस वगैरे.
राजा परत आला की लाफ्टर क्लब मध्ये जायचे आहे असा प्लान आहे संजना हिअरिन्ग एड गिफ्ट करणार आहे. राजा उगीचच संजनाच्या विरोधात आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
आप्पा लगेच अनघाला चहा मागतात. कांचन पण संजनाशी वादात पडले.
संजना परत अरु ला कमी लेखत आहे. पहिला विमान प्रवास म्हनून. तिला जमेल ना बस स्टँड वर असल्यासारखी वागेल.
तर आता खंग्री मॅन व्रताचे उद्यापन करुन आल्यावर धडा धडा डबे वाजवत आहे. संजना परत अरे अरु नसताना कसे काय आलात असे खोचक बोलते. हिचा प्रत्येक संवाद दुसर्याला टोचेल असाच असतो.
अन्याचा इंटरव्यु नित्या आशू त्यालाच दाखवतात हे आजीला माहीतच नसते. हिला वाट्ते मी देवदर्शनाला गेले व अन्याला सुबुद्धी झाली आहे.
आशू सर्व संत्रे सोलुन सांगत आहे. अन्याने पत्रकारांना बोलावुन घेतले होते व एक्स्लुझिव बातमी देणार म्हणून सांगितले. यलो जर्नालिझ म बद्दल चार शब्द सांगतो. हे सर्व प्रकरण उगीचच संघर्श व्हावा म्हणून उकरले आहे. नित्या मुद्द्यावर येतो. ह्यात आशू अरु बद्दल वाइट चर्चा सुरु करायचा जर्म आहे. उगीचच आशुतोष ची बद नामी झाली आहे व ते अब्रु नुकसानीचा दावा लाव्णार आहेत.
कांचन लगेच रड का पदर पसरते. लिगल अॅक्षन सध्या तरी ऑन होल्ड आहे. अन्या चवताळ ला आहे पोलिस कंप्लेंट पण करू शकतो म्हट ल्यावर एकदम अभिव्यक्ति स्वा तंत्र्य व्गैरे. हे इलोन मस्क सारखेच झाले. फ्री स्पीच अॅबसोलुटीस्ट म्हणायचे व पत्रक काढले तर कंपनीतल्या लोकांना हाकलून द्यायचे.!! तीच वृत्ती. जग भर सर्वत्र वास करून वास मारत असते.
आज कुठलेच पिक्चर बघायची सक्ती नाही केली.
प्रोमो मध्ये संजना तयार होउन न सांगता निघते. व अन्या तिचा पाठलाग करून कोणाला भेटते आहे ते शोधतो. जॉबलेस पर्सन!!
शुभ प्रभात
शुभ प्रभात
धम की नाट्य परत पुढे चालू आहे. नव्या ट्युन खंग्र्या वापरून बघत आहे. मग संजना इंग्रजीत पिसे काढते आहे अन्याने. एका तून दुसरे भांडण सुरू झाले आहे. अन्या बावळट व विकृत आहे असे नित्या व आशू ठरवतात. अरुची आशू फारच काळजी करत आहे. प्लेन लँड व्हायच्या आधी कार तिथे उभी असली पाहिजे. म्युझिक स्कूल ला जातात दोघे.
संजना पूर्वी सारखी तयार होउन व खुशीत बाहेर पडत आहे. लंच मीट आहे एका बरोबर. अन्या चांभार चौकशी करत आहे. संजना काही भाव देत नाही. ते कपडे विचित्रच आहेत कोण स्टाइल करते कोण जाणे.
अनघा लांब मोकळॅ सोडलेले केस व फुल ओढणी व्हाइट ड्रेस किचन मधून येते. अप्पाचा मूड खराब आहे यश ला आपला एक स्टुडिओ काढायचा आहे ज्यात आईची गाणी रेकॉर्ड व डिझाइन करायची आहेत. आई ऑबसेस्ड मुलगा. अरु चा फोन येतो ती पोहोचले म्हणून फोन करत आहे विमान प्रवास मस्त झाला. कानात दडे. ताईला अनघा बरी आहे असे सांगते. प्रवास सुखरूप झाला. अनघा अभीला सांगते म्हणते तर यश काड्या करत आहे. यश गौरी बरोबर व्हिसाच्या कामा साठी जाणार आहे. गौरी अमेरिकन नागरि क आहे ना मग तिला कसला व्हिसा लागतो.
तो ही परत जायला? त्यामुळे ही यश रागावलेला आहे. हा कायम मिरची खाउनच असतो वाट्टॅ.
कट टू अन्या चेसिन्ग संजना. कोणाला भेटते आहे संजना मला डिवोर्स साठी एक कारण मिळेल
गौरी तयार होउन येते निघायच्या वेळी यशचे परत रडगाणे चालू आहे. तिला मार्ग निवडायचाच आहे. नाहीतर पुढे जाउन पस्चात्ताप होउ शकतो.
हिला लग्न मुले अश्या काही ऑप्शनस नाहीत. हिला कुटुंबासाठी सुद्धा पैसे कमवाय्चे आहेत( अरु काँप्लेक्स) व्हिडिओ कॉल्स व र सगळे बोलायच्या वाद्या वर तुटते आहे. सोसायटीची एक ट्रिप आहे. त्याला जायचे गौरी प्लान करते यश ओके करतो. व्हिडो कॉल वर मिठी थोडीच मारता येते. असे यश म्हणतो. फारच रुसु बाई रुसू होत आहे.
संजना एका वी वर्क टाइप जागेत येउन एका माणसा शी बोलत आहे. प्रमोद गोविलकर म्हणे. जुन्या कंपनीतील एम डी. अन्या मीटिन्ग चे फोटो घेत आहे. प्रमोद तिच्यावर पूर्वी लाइन मारत असे असे अन्याच्या लक्षात येते. मीटिन्ग च्या शेवटी शेक हँड!! अन्या इशा कुठे आहे विचारतो.
आई मेसेज जात नाही असे कट कट करत आहे. अरु च्या मागे कशाला लागतोस आई रडत कढत विचारते. कुठे तरी थांब असे आई सांगते.
तिला तुझे वागणे कळत नाही. तिचा विचार सोड. नटमोगरी बरोबर नीट नांदा म्हण ते आई. मला तुमची सेवा करणारी बायको हवी होती पण संजना तशी नाही आहे. आता संजनाशी डिवोर्स घ्यायचाच आहे. संजना आली व वादात उडी घेत आहे. मी अनिरुद्धला मदत केलेली आहे पैसे मिळवायला. लगेच अन्या प्रमोद गोविल करचे नाव घेतो.
माझ्या भानगडीत पडू नकोस. म्हणते.
नो प्रोमो
संजना पुढील भागात तिचे फ्युचर फ्युचर प्लान्स सांगत आहे. काहीही. मुलाला शिकायला परदेशी पाठवायचे आहे म्हणे. अनघा उगीच संत्रेसोलु लीडिन्ग प्रश्न विचारत असते. एक प्र कारचा भोचक पणाच.
संजना मीडिया इंटरव्ह्यु
संजना मीडिया इंटरव्ह्यु प्रकरणी अनिरुद्धाला तू असं का केलंस असं विचारते.
हिनेही सुखाचे चांदणेच्या प्रकाशनाच्या वेळी तेच केलं होतं की!
शुभ प्रभातः अन्या संजना
शुभ प्रभातः अन्या संजना भांडण आई समोर चालू आहे. अन्या ने तिचे लपून फोटो काढलेत. पाठलाग केला आहे. बायको वर पाळ त ठेवणे हा त्याचा नवा छंद आहे. प्रमोदने संजनाला नवा बिझनेस जॉइन करायची ऑफर दिली आहे. गुड पॅकेज. लगेच अन्या त्याला नावे ठेवत आहे. ऑफिस पॉलि टिक्स - तो लफडेबाज आहे संजनावर लाइन मारत असे. ही त्याचा बिझनेस जॉइन कर्णार आहे. लगेच संजना डिवोर्स चे कारण पुढे करते प्रॅक्टिकल स्त्री आहे. अन्याचे चित्र बघून हिने पुढे जायचे ठरवले आहे. जीवनात धक्के बसल्यावर असे विचार करून मार्ग शोधून पुढे जायचे हे चांगले आहे खरेतर.
हे आई समोर झाल्याने ती ओरडा आरडा करत आहे. हिला काही गप्प बसायला येत नाही.
आता लगेच अनघा रूम मध्ये बसली आहे तिथे संजना येते. म्यांगो कलरचा टॉप छान आहे. अनघा जरा सटपटली आहे. संजना अनघाला सॉरी म्हणते. काउन्सेलिन्ग दे म्हणते. तो फार विचित्र वागत आहे. संशयी पझेसिव्ह आहे- बिझनेस साठी पैसे पण दिले. - पन आता ही नवा जॉब करणार मग ते पैसे परत करणार का? संजना म्हणजे बॉटल लेस पिट. पैसे टाकत रहा टाकत रहा. नो रिटर्न.
संजना म्हणते मुलाला शिकायला बाहेर पाठवायचे आहे. मी माझ्या मुलासाठी पैसे कम्वणार आहे. अनघा प्रश्न विचारत आहे.
अनघा काउन्सेलिन्ग जमणार नाही असे सांगते. नवी दुसरी शोधून देइन म्हणते. कारण नाते संबंध आहे. एकदम सिविलाइज्ड एक्स्चेंज.
परत लांब केस ओढणी फलकारे किचन मधून सुपारी घेउन येते अरु च्या सुपारीचे कौतूक. पण ही अनघाने केलेली आहे. व छान झालेली आहे.
रव्याचे लाडू, पातळ पोह्यांचा चिवडा सुपारी कायम घरात असे. अरु हे कायम करत असे. अनघा काउन्सेलिन्ग किती चांगले आहे त्याचे फायदे वाचून दाखवत आहे प्रत्येकाने आपापले मन मोकळे करावे हे बरे. आजी लगेच स्वतःचा उदो उदो. चालू आहे. सुपारी ओढुन घेउन खात आहे.
यश आला आहे. पाउस पडत नाही म्हणून चिंता चालू आहे. कॉलनी मित्र पावसाळी पिकनीक्ला जाणार आहेत. अनघा पण !!! ही कशी जाईल घसरली तर?! आजी नाहीच म्हणते. इशा गौरी यश व इतर मुले मुली जा णार आहेत. आजी लगेच नाही म्हणते. कॉमेडी संगीत उगीच फिलर
हिची परवानगी कश्याला लागते सारखी. अप्पा लाडी गोडी लावत आहेत. हिला पावसाच्या पिकनिकचा अर्थ समजत नाही का. अन्या मध्ये पडून परवानगी देतो. अन्याच्या ओळखीच्या रिजॉर्ट वर जा म्हणतो. दहा लोक्स जाणार आहेत.
आजी आता अरु वर घसरली आहे. अरुची ट्रिप कशी चालू आहे त्याचा रिव्ह्यू चालू आहे. अरु केळकरांच्या काकांकडे उतरली आहे. फॅमी ली ला भेटायला गेली वाट्ते.
प्रोमो मध्ये अन्या ला वा टते आशू पुण्याला नाही इंदुरलाच गेला आहे. व तो अरुच्या फ्लॅट वर जाउन बघतो. किल्ली यश कडे असते ती घेतो.
Pages