आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभ प्रभातः

आज ओपनिन्ग ला पहिलेच मेजर प्रो लाइफ - प्रो चॉइस डिबेट आहे. घरगुती स्वरुपाची. शेवटी अन्या अभीला गप्प करतो. अभीचे काहीच नक्की नाही. आज हे तर उद्या ते. डिबेट संपवून अरु व इशा घरी जायला निघते.

इकडे हिरो आशू गरम पाणी पीत उद्याच्या रिहर्सल ची तयारीचालू आहे व आई शी गप्पा. गोड मिट ट आवाजात नातवंड म्हण जे दुधावरची साय. सबकी किस्मत मे नही रहते ऐसे सुख. आई मुलाचे नाते म्हणे. इकडे तेच सर्वात टॉक्सिक आहे. अरु ची प्लेट फुल्ल आहे म्हणून आशूची काळजी आहे. आपण तिची काळजी घेउ. आशू बाळ गाणे कसे होईल म्हणून काळजीत आहे. तू चांगला गा म्हणते आई. बरोबर येउ का विचारते.

कट टू संजना अन्या संवाद. ही उंटावरून शेळ्या हाकत आहे. अन्याला मुलांनी सेटल व्हावे असे वाट्ते. अभी नंतर रमेल. संजना आजी होईल केसकलर करत राहणार आहे. आता परत ड्रामे सुरू होतील तर अन्या म्हणतो काळजी करू नकोस तू नसशील इथे. मी तसे होउ देणार नाही म्हणते. आता ही धमक्या देत आहे. अन्या अरु साठी परिस्थिती अवघड होईल व ती अल्टिमेटली घर बाळ संभाळत बसेल. इथे येउन. म्हणून अन्या मास्टर व्हिलन गिरी स्माइल टाकतो!!

आता पावन खिं डचे प्रोमो.

पुढील भागात अन्या रेकॉर्डिन्गला येउन अरु चे लक्ष विचलित करतो. मोहरी म्हणतो एनी प्रॉब्लेम!! ह्याला तिची प्रगती बघवत नाही.
शेजारी नंदिबैल प्रेमिक उभा आहे. म्हणजे उपहासाने नाही म्हणत मी खरंच देवापुढे नंदी बैल तसा तो अरु पुढे/ शेजारी उभा आहे. असतं एखादीच नशीब.

नेहमीप्रमाणे च तुफान फटकेबाजी अमा...

आता पावन खिं डचे प्रोमो.>>> एकदा तो पिक्चर लावा आता
चॅनल सुरू व्हायच्या आधीपासून कौतुक सुरू आहे ह्या आणि झिम्मा मूव्ही च

शुभ प्रभातः इशा यश सोबत आई रेकॉर्डिन्ग ला आले आहेत. मोहरीर चहा पिउन आले आहेत व स्वागत करत आहेत. आशू ला आयत्या वेळी अवसान गेले आहे. खूपच घाबरला आहे. त्याला घोड्यावर बसवायचे काम चालू आहे. गाण्याच्य टेन्शन मध्ये पोट खराब झाले आहे म्हणे. ( काय हा रोमाम्स!!) अरु ने सांगितल्यावर हा एकदम फुलतो. रिहर्सल चालू आहे.

इकडे अनघा आजीला चहा घेउन येते तर चहा साठी कौतूक चालू आहे. ही अजून किचन मध्ये मोठी फलकारा ओढणी - लांब केस अशी फिरते. आई अप्पा सुनेचे कौतूक करत आहे. आई एकदम ओल्ड वाइफ्ज टेल मधील बाईसारखी सर्व ज जुने नुस्खे एकदम ओतत आहे. यश चा रेकॉर्डिन्ग सुरु झाले असा मेसेज येतो. आजी एकदम बग इन अ रग सारखी खुशीत आहे.

आशूचे इकडे रडारड चलूच आहे. ह्याला काही कारणाने खरंतर अ‍ॅडल्ट होता येत नाही आहे बहुतेक. इशाला फोन आला होता बाबा येत आहेत म्हटली इशा. तिनेच बोलावुन घेतले आहे. बाबा कशाला यायला हवे आहेत?! आई अपसेट होईल म्हणतो यश. त्याला परत पाठव म्हणतो. पण इशाला सुद्धा आईबाबा एकत्र येतील अशी काहीतरी बालीश कल्पना आहे. नित्या येउन त्यांना आत घेउन जाते.

आजी तिला स्वीकार कर अभी काही बोलला तरी त्याला सिरीअसली घेउन नको. अनघा फारच समजुतदार असल्याने आजीला तुमच्या मांडीवर पतवंड खेळेल म्हणते. आजी नवस बोलली होती तर तिथे जाउन येणार आहे. संजना आनंद व्यक्त करते. आजी चौकशी मोड मध्ये आहे. संजनाला काहीतरी खायला कर सांगत आहे. अ‍ॅपल खाउन घे म्हणते संजना.

अन्या गड बडीत बाहेर पडतो.

अभी तयार होतो आहे अनघा विचारते डॉ. वसुधा कडे कधी जायचे आहे म्हणून ही पण उसासे टाकत बाळ आले की सर्व छान होईल मला बाळ हवं आहे मला त्याला नाकारायचे नाही वगिअरे प्रो लाइफ बोलत आहे. खूपच सकारात्मक आहे. ( इज शी ऑन समथिन्ग) हिच्यावर आईच्या बोलण्याचा फार प्रभाव पडतो तिच्यावर असे अभी म्हणतो. हळव्या स्वरात बोलत आहे. हिला हँड मेड्स टेल दाखवली पाहिजे. पण ती प्रेशार घेत आहे. हा प्रॅक्टिकल विचार करायला शीक म्हणतो.

अरु उगीच थेंक यु म्हणते. व सुरुवात करत आहेत. टिपिकल मोहरीर मय संगीत वाजत आहे व वरच्या टिपेला सुरू होते. एक सुरेख तान सुरुवातीला आहे. छान आहे ही तान. पण मग अन्या समोर दिसतो. ती गप्प होते. मो सर एनी प्रोब्लेम विचारतात. तान परत. अवघड तान आहे ही.

सोबती स हलके सावलीस उन भोवती तशीही मोरपीस खूण
हे तीन दा.
ही गायिका वेगळी आहे कोणीतरी.
आशूचा भाग
दोन काठ अपुले ऐल आणि पैल
ऐन सांजवेळे बंंध होई सैल( आँ हे काय!!)

छान आहे गाणे मधला पार्ट चालू आहे.

बंधना विना रे ही गुंतणा री वेळ
हा प्रवास आता तुझ्यावीण कठीण
वादळात कोणत्याही हाक भेट ली ही
हात देत हाती मी तिथे असेन
सोबतीस हलके सावलीस उन
भोवती तशीही मोरपीस खूण.

छान झाले सर्व टाळ्या वाजवत आहेत. आशू घाबरला होता पण अरू त्याला धीर देत आहे. ही त्याला कडेवर घेउनच हिंडणार व त्याला ही अशीच जोडीदार हवी आहे.

आता पावन खिंडीचे प्रोमो. हर हर महादेव.
प्रोमो म ध्ये अन्या तिला घरी बोलवतो पण ती नाही म्हणते इतकेच नाही मी कधीच परत येणार नाही म्हणते. अन्या नीट वागून मुलांचे तिच्याबद्दलचे मत खराब होत आहे ह्याबद्दल प्रायवेटली खूष होतो. तो घरी आलेला मला आवड त नाही असेही ती म्हणते. मग दोघे संपूर्ण सेपरेट जगा ना कोण काय म्ह णते. हिलाच तिकडॅ सारखे जायला होते ते बंद केले की झालं. सो लाइक दॅट.

शुभ प्रभातः रेकॉर्डिन्ग मस्त झाले आहे त्यावर दहा मिनिटे. अन्या चिकटायचा प्रयत्न करत आहे मी सोडतो. यश आशू नित्या अरूऑफिसला जातात व इशाला घरी सोडा म्हणते अरू. अन्या ने एकटीचेच गाणे असते तरी चालले असते हे आशू समोरच बोलुन दाख्वले. पोच नाही. खानदानी प्रॉब्लेम.

कट टू आजी. ही नवस फेडायच्या तयारीत आहे निघाली आहे. संजना तिथेच आहे. ताईच्या प्रेमीने ताईच्या गाण्याचा व्हिडीओ पाठवला आहे. त्यामुळे अनघा एकदम एक्साइ टेड आहे. तो संजनाच्या लॅप टॉपवर सेंड करून सर्व बघत आहेत. आता हे गाणे ऐल आणि पैल.

तिथे अन्या बघून संजना शॉक्ड अँड ऑड होते.

तिथे निघताना अरु पूर्वीच्या अपमानाची उजळणी करते व तुम्ही परत घरी येउ नका असे अन्याला सुनवते. हा सीन छान आहे. इशा मागे करीना कपुर सारखी गालाच्या पुर्‍या फुग्वत डोळे इथे तिथे करत रिअ‍ॅक्षन देत आहेत. तुम्ही करत आहात तो ड्रामा मला पूर्ण समजून आहे. असे सुनावून ती परत येते. अन्या तिला मनात धन्य वाद देतो साळसूद व मानभावी पणे मी कसा छान व समजुतदार अरु कशी वाइट दुस्ठ असे दाखवून देत आहात का. असे सुनवते. किती स्वार्थी इशा अभीचे मत बिघडवत आहे स्वतः चांगले वागून सिंपथी मिळत असेल तर बरेच आहे म्हणून मनाशीच कावेबाज पणे हसत आहे. काही उपयोग नाही. इशाला पण सांगते तुझा बाप माझ्या घरी आलेला मला आवड त नाही. कामाच्या ठिकाणी पण कोणा लाही असे बोलवायचे नाही मला विचारत जा आधी म्हणते. अभ्यास कर.

पण समजा ही दुसरी गाडी वाट बघत नसती तरीही गाडीवाल्या नवर्‍या समोरुन ब्याग काखोटीस मारून चालत जाता यायला हवे ते खरे.

इशा सॉरी म्हणते. अन्या मी खूप वाइट वागलो असे तिच्या समोर बोलतो तिला ऑन द वे खायला घालतो. अरु यश घरी पोह्चले तरी हे आलेले नाहीत. कार मध्ये प्रेम चालू आहे. अरु व आशू एकमेकांना गिफ्ट देतात. विंगमेन बघत आहेत. कॅडबरीची देवाण घेवाण गालाला खळ्या पाडुन निर्व्याज कि काय ते हसणे. आहा ओ हो सहावीतले प्रेम

अनघा अप्पा संवाद आजी कार मध्ये बसली आहे यात्रेस गेली आहे. अन्या येतो व आपल्या हाताने पाणी घेतो. अनघाला ताईची काळजी. अप्पा अन्याचे भावनिक मॅनिपुलेशन संत्रे सोलून दाखिवतो.
टेरिबल फ्युडल मानसिकता सर्व अग्ली स्वरुपात दिसत आहे. अन्याच्या रुपाने.

इक डे आशूच्या रेकॉर्डिन्ग नंतर एक सर्पराइज पार्टी असते पण अरु घरीच निघून येते असे का केलेस असे यश विचारतो. अरू फार स्वार्थी होत चालली आहे असे तीच म्हणते. पण अन्या आल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडत चालल आहे. तिच्या वरचा फुल्ल कंट्रोल डिवोर्स झाला तरी अन्या काही घालवू शकत नाही.

पावन खिंड बघा चे रिमाइंडर.

प्रोमो मध्ये संजना तुला अरुनेच बरोबर ओळखले आहे म्हणते.

कम्बाइन्ड जाहिरात म्हणजे पृथ्वीराजसाठी दागिने पी एन जी दिलेत .
आणि पृथ्वीराजमधला सीन दाखवून अक्षयकुमार पिक्चर बघा सांगतो.
दागिने बघण्यासाठी तरी पिक्चर बघा?

अभिला सुनवण्याच्या सीझनमध्ये डायलॉग रायकर साफ गंडलीय. पैसा वसूल डायलॉग साठी जबरदस्त प्लॉट होता. अभी आईला विचारतो माझ्या बाळावर तु संस्कार करणार? काय तर पटत नसेल तर सोडून जायचं.... इथे फक्त अविनाश बोललेला दाखवलाय. खरंतर इथे अरूला खूप स्कोप होता. तुझ्या बाबांकडून काय शिकायला मिळणार आहे? मी नवरा, घरदार, पंचवीस वर्षांचा संसार हे सगळं सोडण्याचा निर्णय का घेतला हे पुन्हा एकदा हायलाईट करण्याचा. खरंतर नुसती अरुच नाही सगळ्यांनाच खूप स्कोप होता या सीनमध्ये पण फुकट घालवला.

सरप्राईज पार्टीचं यश आधी अरुला सांगू शकत होता. मिठी मारल्याशिवाय आणि आरडाओरड केल्याशिवाय आनंद व्यक्त करता येत नाही असे ईशाला वाटते. ईशाबरोबर अन्या खाऊन आलेला असतो ना तरी घरी आल्याबरोबर लगेच जेवायला बसुया.

अरुची खळी बेकार वाटते, काय गरज होती तिला असलं काही करून घ्यायची, एरवी छान दिसते की ती.

तो गाणं व्हिडीओ बघितला, गोड गाणं आहे.

शुभ प्रभातः आई दार उघड ते व गोड मिट्ट आवाजात आशूचे कवतिक कवतिक कवतिक चालू आहे. आशू चे मन कशात नाही. आशूच्या गाण्याचा बद्दल केक कापायचा असतो. पण आशूचा मूड गेला आहे. ते घरी फक्त टच करून हपिसात जात आहेत तेव्ढ्यात यश ने कान टोचल्याने अरु व यश घरी येतात. अरु केक कापायला आली आहे व आशूचे कवतिक कवतिक कवतिक. नित्या ह्या ह्या. किती नाटकी. मग केक आला आहे. आशू खूपच खूश होउन अरुलाच केक कापायला लाव्तो. पण अरु त्याला भरवत नाही हातात पीस देते.( असेक्क्षुअल प्रोपोगेशन.मेथड) मग जेवायचा बेत ठरतो.

आशू अरुला थेंक्यु म्हणतो आज तू बरोबर होतीस म्हणून माझा दिवस सुखाचा गेला. अरु कृतज्ञता व्यक्त करते

इकडे संजना डोके उबवत आहे. ते अन्या वर बरसणार. अन्या शीळ घालत आहे. फार खूश आहे. अन्याची उलट तपासणी चालू आहे. टोमणे टोले चालू आहे. अरु छान गायली. संजनाचे केस पूर्ण रंगवायला पैसे नाहीत का?! अर्धे काळे अर्धे सोनेरी रूट्स दाखवत आहे तेअगदी बेकार दिसते.
अन्या आम्ही अजून एकत्र भेटू. पण अन्या फारच खूष आहे स्वतःवर मुले घर करीअर मित्र ह्यात अरू कधीपण मुलं हाच ऑप्शान निवडेल असा त्याला विश्वास आहे. ती नक्की परत येइल्च.

संजनातर काय त्याच्या नजरेत डिवोर्स देउन टाकला आहे - खेळण्यातला रस संपला आहे - अरु नक्की परत येइल मुलांसाठी ती परत येइलच.
हा फारच फेक आत्माविश्वासात जगत आहे.

इकडे आरु चे घर इशा आली आहे. यश व अरु केक मस्त होता चांगले सेलिब्रेशन वगैरे बोलत आहे. तर इशा बॅग घेउन निघते. कारण तिला आई बाबांशी कशी वागली आहे ते तिला आवडले नाही आहे. ती आईला तू वडिलांना समजून घे. जुन्या बाबी विसरून जा. अरु मीकाही परत जाणार नाही म्हणते. इशाला व्यव्स्थित जोडे मिळतात आई कडून मुले आवडतात पण वडिलांचा कप्पा बंद आहे. हे संवाद छान लिहीले आहेत.
मुलांच्या प्रेमाखातर अरु वाटेल ते करणार नाही. आईचे करीअर व सक्सेस महत्वाचे वाट्ते आहे. तू खूप सेल्फिश झाली आहे म्हणून ती निघते.
तू तेव्हा तशी मधील राधा सारखीच आहे ही. एकदम कन्क्लुजन काढून आईला दोशी ठरवून मोकळी व गेली तिला सोडायला यश.

इकडे फिलर सीन अप्पा रद्दी पेपर काढत आहेत व अडगल साफ करत आहेत. फनी सीन आहे अवि बरोबर. म्हातार्‍यांना अपील होईल नक्की.
जीवनाचा पसारा कमी करून नवीन पिढी साठी जागा करून द्यायला हवे.

संजना किचन मधे पण जागा करा. अरु ने किती भांडी जमवली आहेत. पाटा वरवंटा विळी जुन्या वस्तु भंगारात विकून टाका म्हणते. व्हिच इज करेक्ट . अवि अप्पा प्रायवेट जोक करतात.

इशा वैतागून परत आली आहे. अवी अप्पांना यश नंतर सांगतो म्हणतो. संजना समोर नको म्हणतो.

आता पावनि खिंड बघा आठवण करून देतात.

प्रोमो मध्ये एक म्हणजे अनघा व अरु संभाष ण डॉक्टर च्या रूम समोर. बाबा असे का वागतात.

व इशा साहिल रि युनियन चालू होती तर अरु पोहोचते व साहिलला थोबाडते आणी इशाला घेउन परत येते. ती आईला विरोध करत साहिल साहिल करत आहे. एकदा इशा साहिल मिलन होउन गेले असते तर अरु हस्तक्षेप् ची गरज नव्हती. पण मग आई काय करेल?!

मी फुल टाइम जॉब करते व आल्यावर मला लिटरली एक प्लेट भरुन जेवण्या इतकी पण शक्ती उरत नाही. ही नोकरी संभाळून इतक्या मारामार्‍या कश्या काय जमवते. असे मला आश्चर्य वाट्ते.

हे लोक गावाला गेले होते, अभिषेकचा साखरपुडा करायला, तेव्हा अरुंधतीने गालाला पट्टी लावली होती. तेल उडलं असा डायलॉग टाकला होता. तेव्हा तिच्या गालाला काहीतरी झालं असेल. त्याची प्लास्टिक सर्जरी केली असेल.

आशुतोषचं पात्र दिवसेंदिवस आणखीनच फद्या वाटायला लागलंय. गायचं एवढं काय टेन्शन!मागच्या रेकॉर्डिंगच्या वेळी परत येताना ज्या फॅमिलीकडे थांबले त्यातल्या बाईने, टीव्हीवर म्युझिक रियलिटी शो मध्ये गेस्ट जज म्हणून पाहिल्याचं सांगितलं होतं.
अरुंधतीच्या आधाराची त्याला गरज आहे हे दाखवायला ? अरुंधती किती महान गाते, कशी सांभाळून घेते इ.इ वळसे आता अजीर्ण होऊ लागलेत. इथे हा आणि तिथे अनघा.

मालिकेसाठी दोन अख्खी गाणी बनवून घेतली का यांनी? की दुसर्‍या कुठल्या प्रोजेक्टसाठीची गाणी इथे वापरलीत?

मालिकेसाठी दोन अख्खी गाणी बनवून घेतली का यांनी>>अख्ही कुठे आहेत व्हव दोन कडवी जेम तेम. बघानं एखाद पुरुष माणु स इतकं कसं काय फट्टू असू शकतो? लहान पणी वडील जाणे ह्याचा काय ट्रोमा उरलेला आहे का? अरु चे कौतूक हाच अजेंडा.

इशा ला थोडा होईल ती रिकव्हर म्हणूण मोकळे सोडले असते तरी चालले असते. इथे २५ वर्शे राहुन डिवोर्स होउन सुद्धा घराचे धागे तोड ता येत नाहीत व तिला रिलेशन शिप मधून दोन दिवसात रिकव्हर कर अभ्यास कर म्हणून का बरे जबरदस्ती!!

मी फुल टाइम जॉब करते व आल्यावर मला लिटरली एक प्लेट भरुन जेवण्या इतकी पण शक्ती उरत नाही. ही नोकरी संभाळून इतक्या मारामार्‍या कश्या काय जमवते. असे मला आश्चर्य वाट्ते.>>>>>> ती पार्टटाईम तरी करते का जॉब, अमा? ऑफिसमध्ये जरा कुठे कामाचं डिस्कशन सुरू झालं की आलाच हिला घरून फोन कि निघाल्या मँडम घरी. आपण प्रीप्लँन्ड हाफ डे जरी मागितला तरी बॉस त्याची एक किडनी मागितल्यासारखा चेहरा करतो. पूर्ण दिवस सुट्टी मागितली की बाबा रे अख्ख्या कंपनीचा भार तुझ्याच खांद्यावर आहे आणि तुच सुट्टी मागितली तर कसं चालेल असा भाव असतो चेहर्‍यावर. कारण आपन आपन ए अरूंधती नै.

शुभ संध्याकाळः अनघाचा चेकप झाला व डॉक्ट र शी बोलणे चालू आहे. शेजारी तीन मुलांची आई आहे. डाँ तिला पण चेक अप केला का विचारते. मॅमोग्रा फी , पॅप स्मीअर वगैरे करोन घ्या म्हण ते डॉक्ट र. अभी बिझी आहे आलेलाच नाही आहे हॉस्पिटल मध्ये कुठे उंडारतो आहे कोण जाणे. ही सुद्धा चुकीचे सांदणे छान आहे म्हणते.

आशू झोपला आहे. नित्या काम करत आहे. आई मीटिन्गला जात आहे. जेवण राहिलेच . अरु व त्याच्यात काही बिनसले का विचारते आई. नित्या सर्व अनालिसिस करतो व आईला सांगतो. आई म्हण्ते हा अमेरिकेत तरी राहायला हवा होता . इथे त्याची मानसिक ओढाताण होत आहे.
खरं तर चांगली मुलगी बघून आशूला लग्न पोरे बाळे संसार करता येइल. अनुरूप विवाह संस्था कश्याला आहे.

अरु अनघाला आईपण अव घड आहे हे सांगत आहे. गोळ्या घे. बाहेरचे खाउ नकोस वगैरे. अनघा म्हण ते. तू तरी हे केलेस का. कांचन ने तिचे
चांगले केले आहे. म्हणून अनघाला अरु घरी बोलवते. अभी चिडेल म्हणते अनघा. कोंडीत सापडली आहे. अरु अभीचे स्वभाव दर्शन करून दाखवते.

अवी अप्पा ते सामान काढून टाकाअय्चा प्लान चालू आहे. पोती बांधून तयार झाली आहेत. एकदम ती विशाखा आलेली आहे. वडिल तिला राजकन्या म्हणत आहे. ही एक सिनीअर इशा पणा करत आहे. केदार बिझी आहे. पन अभीला फोन करणार आहे. ते तिला घरीच राहायला बोलवतात. माहेरी पण संजना टोचते व विशाखा यायची राहते. उखडते व टोमणा देतो.

अनघा अन्याचे बदललेले वागणे विचार करत आहे. अरू ने हा विशय बंद केला आहे अरु ने मस्त पैकी अन्याला तोडले आहे. अनघा आस्चर्य व्यक्त करते. इशा खूपच ला डावलेली आहे. अन्याने तिचे व अभीचे लाड केलेले आहेत अरु पण त्याला देव मानत असे.
ही मुले तिला समजून घेत नाहीत. वाइट वाटत आहे. अनघा काउन्सेलिन्ग चालू करत आहे.

अनघाला भूक लागली आहे पन अरू ने डब्यात आणले आहे तेच खा म्हणते. विशाखा पार्टी करू म्हणते. पण सं जना टोमणे मारत आहे.
तू कशाला तक्रार करतेस असे विशाखा म्हणते. अनघा आलेली आहे. तिला अवि पाणी आणू न देतो.

मी आले अस्ते ना विचारते संजना. अरु कशाला.

अभी कुठे गायब आहे?!
पावन खिंड बघा.

मग इशा साहिल थोबाडित

या पावन खिंड ने फार वैताग आणलाय बुआ
ते गरागरा डोळे फिरवत बोलणे......overacting!
पाण्यातून उठणारे मावळे, व्ही एफ एक्सड अ‍ॅक्शन!!!

कान्चन घरात नाही त्यामुळे सध्या तरी शान्तता आहे. हे एक बर आहे.

बघानं एखाद पुरुष माणु स इतकं कसं काय फट्टू असू शकतो? >>>>>>>>>> का? पुरुषान फट्टू असू नये? त्याने प्रत्येक वेळी स्ट्रॉन्ग असायलाच हव का? कारण तो पुरुष आहे म्हणून?

पुरुष फट्टू असतातच. लेव्हलचा फरक असतो. बिझनेस मन टाइप लोक्स जाम टाइप ए असतात. पण हा अजून अंड्यातून बाहेर यायचा आहे. नित्या सोडून गेला / आई वारली तर काय होईल ह्याचे? अरुच्या पदरास बांधलेला नोवरा?! कुच्छ तो गटस होना मंगता ना. अश्या प्रोफाइलचे लोक एक ना चार गर्ल्फेंडी ठेवुन अस्तत. पण हा पडला संस्कारी मोरु.

आशु फट्टु पेक्षा इमॅच्युअर वाटतो, त्या गाण्याच्या रेकॉडिन्गला जे काय चालल होत ते निवळ हास्यास्प्द वाटत होत, त्यात तो अमेरिकेला राहुन आलाय, सक्सेसफुल बिझनेसमन, फेमस वैगरे दाखवलाय. बर नेहमी गाण म्हणत नाही म्हणुन थोडफार नर्व्हस असण वैगरे ठिक आहे पण इथे प्रिके किड्स सारख पोट दुखतय वैगरे तक्रारी चालु होत्या.

शुभ प्रभातः

इशा साहिल ब्रेक अप होतो आहे व अरु ने थोबाडित मारली पण साहिल काही ऐकायला तयार नाही. इशाला आवरा म्हण्तो आहे साहिल , इशा साहिलची अंधभक्त झालेली आहे. अरु तिला फरपटत घरी घेउन येते व मोठा वाद होतो. अन्या गोड गोड इशू इशू करत आहे. अरु तिला रागवून खोलीत धाडते. आता जीव देते कि काय. ती त्याच्या मागे लागली आहे.

अप्पा चहा चे विचारतात. पण अरु निघते.

रात्री अभी म्हणून इथे मूल वाढवायचे नाही असे म्हणत आहे. त्यालाही कोनाशी काही बोलायचे नाही सर्वंना तमाशे करायची आवड आहे.
अभी पण काही बोलत नाही आहे. अनघा अ‍ॅनिमिक निघाला अहो आस्चर्यम. तिची तब्येत नाजूक आहे म्हणे सर्व झेपेल का म्हणतो. प्रेग्नंट बाईला आनंदी राहायला पाहिजे. म्हातारा व्यक्ती ला काही सांगू नका हे सोप ऑपेराचे मेन खांब असतात त्याला धरूनच लेखन चालते. मुद्दाम ते अपसेट होतील अश्या घटना होतात.

अभी तिला जवळ घेतो पण निघून जातो नंतर.

इशा रूम मध्ये येउन आ ठवणी काढत आहे. तर संजना येउन चॉकोलेट मिल्क शेक आणून देते. ती वैतागली आहे. पण संजना हळू हळू गोड बोलुन अरु विरुद्ध इशाला भडकावत आहे. फारच नाटकी ब्रेक अप आहे. पण संजना एक्दम अरुची लाइन घेउन तसेच बाळा बाळा बोलत आहे.
व मागे पण बासरी( !१ अरु सोबत असते ती) संजना आपले लाइफ ग्यान शेअर करत आहे. आ आ अ कोरस आहे.

इशा पण भंजाळली आहे बासरी कोरस चालू आहे. हे मागून अन्या ऐकत आहे. एकदम भारी म्युझिक व आ आ कोरस लावला आहे संजना मत परिव्रतन झाले आहे.

इशा व गौरी ह्यांना रडके चेहरे करायचे च पैसे मिळतात. .
अन्या तिला धन्यवाद देतो. बिझनेस कसा चालला आहे विचारतो. एकंदरीत सर्व स्त्रिया आत्मनिर्भर झाल्यातर आपले काय प्रयोजन असा भाव अन्याच्या चेहर्‍यावर आलेला आहे. सो मच द पिटी

पावन खिंड पहा बरं इन केस तुम्ही विसरला असाल तर.

मग प्रोमोत संजना अरुच्या घरी येउन तुम्ही परत एकत्र येताय का विचारते. ( अश्यावेळी जर आशो पण आला व जाताना तो व संजना बरोबर गेले तर काय होईल असा विचार मनात आला!!)

मर्ज ड्रॅगन गेमचा काल बर्थडे. स्पेशल गेम इवेंट चालू आहे. तुम्हा सर्वांना केक.

शुभ प्रभातः अरु लॅपटॉप वर काम / सर्फिन्ग व शेजारी फोन अशी मस्त मांडा ठोकुन बस्लेली आहे. अनघाचा फोन येतो विचारपुस तू जेवलीस का इशा जेवलीस का. हे ते मग फोन ठेवुन होईपरेन्त बेल वाजते व संजन मॅडम आल्या आहेत. त्या अन्या अरु परत एकत्र येतील म्हनून वैतागल्या आहेत. तू व अन्या परत एकत्र येणार का मला मूर्ख बनव ता आहे का. अरु सरळ उत्तर देते आहे तू मूर्ख बनलेलीच आहेस. संजना डेस्परेट आहे व अन्याला सोडवत नाही. माज्या हातात काही नाही जे आहे ते मी जपून ठेवेन म्हणते. संजना गोइन्ग थ्रू अ फेज ऑफ सेल्फ अवेअर नेस. सिट अवेअर नेस.

अरु तिला पण सांगते उगीच इथे बेल घालायला येत जाउ नका तुम्चे तुम्ही बघा. अन्या काय स्वार्थी आहे ते तुला आता कळले आहेच. दारापाशी अजुन एक टोमणॅ मॅच होते. त्याची गुलाम बनून राहु नकोस असा सल्ला देते.

कट टू सुर्याचा शॉट.

अवि अन्या गप्पा करत आहेत आशुतोष बद्दल अन्या काही काही टिप्पणी बनवत आहे. अरु आशूच्या नव्या गाण्याची हाफ पेज अ‍ॅड आलेली आहे. अण् णा सून कौतुकाने सर्व कात्रणे एकत्र करुन ठेवत आहे. हा पण सुविचार बोलत आहे. अनघा चालून आलेली आहे बरोबर संजना.
तर दारावर दोन रिपोर्टर आले आहेत घरच्यांचा इन्टरव्यु घ्यायला आले आहेत. हा फुल टू वेळ काढू सीन आहे. तुम्ही तिथेच जा म्हणतात. अन्या वीष पेरत आहे.

कट टु ऑफिस आई अरु यश वाट बघत आहे. त्यांच्याकडे अरु चा चेक आला आहे. आईची साडी ब्लाउज सुरेख आहे. वरच्या सीन मध्ये अनघा चा सुट मस्त आहे. आई एक चिक ट गोड संस्कारी वाक्य पसरवते बेडकाच्या जिभे सारखी. अरु लगेच चेक हातात आल्यावर संस्कारी असल्याने उसासत आईचे पाय पकडते व रडायला लागते.

तर आता संगीत शाळेचे नामकरण आहे. आशू अमेरिकेहून आल्या मुळे तसे कपडॅ घालतो. टी शर्ट व वर जाकेट. भारतातल्या सारखे फुल शर्ट टाय सूट घालत नाही. आता नाव सांगितल्यावर आई व आशू पण रडवेले होतात. किती त्या भावनांचे चांदणे

आता अन्या मिडीआला इंटरव्यु देत आहे. हा विचित्रच आहे. गाण्या बद्दल काहीच नाही. तो माइक पण आहे फक्त पण रेकॉर्डिन्ग नाही होत आहे.
अन्या फुल्टु वापरुन घेत आहे. असा कोणता मीडीआ असतो.

पाव न खिंड पहा बरं. एकदाचं

प्रोमो मध्ये अन्या प्रेम व्यक्त करतो पण कौतुक केले नाही. मला माफ कर म्हणतो आता हे मिडीआ मध्ये प्ले होईल

अरु रोज कार्ड पंच करुन निघत नाही तर बॉसला काम झाले आहे मी निघू का असे उसासत विचारून निघते. सो क्युट. अगदी पर्स नल टच्च आहे कंपनीत.

यशने त्याच्या मित्राच्या डॉक्युमेंटरी / शॉर्ट फिल्मसाठी अरुंधतीकडून गाणं गाऊन घेतलं होतं. त्याचा तिला लगेच चेक मिळाला होता. तोही तिच्या अपेक्षेपेक्षा बराच जास्त. दर गाण्याला पहिलंच गाणं आणि दर चेकला पहिलाच चेक असल्यासारखे ऊर का फुलवतात हे लोक.

शुभ प्रभातः अन्याचा इंटरव्यू. किती मानभावी पणा मग जाहिर माफी मागतो व अवि त्यांना हाकलून देतो. अरु प्रसिधी मिळवण्या साठी नवृयाला सोडून राहते आहे

अरु घाबरून आली आहे. दोन लाखाचा चेक !! अजून दोन गाणी पण मुक्रर झाली आहेत. आशूकडे येउन ती घाबरत रड त एक शुन्य जास्त पडले आहे. व्गैरे बालीश पणा चालू आहे. मेनेजर नेम, फिनान्शिअल अ‍ॅड्वायझर नेम असे सर्व आशू सांगतो. ही रोज माझे काम झाले आहे मी निघू का
विचारते. रोज बॉसला पर्सनल डिटेल्स का देतात. हा अ‍ॅडमिशन बद्दल विचारतो.

यश कॉलेज वर इशाला न्यायला आला आहे. हळू आवाजात भांडण चालू आहे. ती निघून जाते. हा आई कडे येउन तक्रार करत आहे.
अरु समजुतेचे चार शब्द सांगत आहे. परत दोन लाख दोन लाख चेक कौतुक झाले आता यश ला नमस्कार करते कि काय. हा चेक बॅगेत् न ठेवता देवा समोर म्हणजे निरांजनाने तो जळून जाउ शकतो. हा धोका आहे. पण संस्कारी मुलींना असे काही त्रास नसतात. अरु ला आईचे गुडघ्याचे ऑपरेशन करायचे आहे.( इथे ही तेच कारण!!)

विमलची वाट बघत आहे. विमल साठी साडी, अबोली साठी ड्रेस खाउ वगैरे गिफ्ट अरु ने घेतल्या आहेत.
अबोलीने चित्र आणले आहे. त्याचे कौतूक अबोलीचे कौतूक. यश विमल ला दोन दिवस इथे या म्हणून सांगतो.

अनघाचे डोहाळे जेवण पण करायचे आहे नातवंड येइल. मग तुमची धावपळ होईल. ही संजनाला चार नावे ठेवते इमानदारीत.
विमल अरु ला तीन महिने तिथेच राहा बाळंतपणानंतर म्हणते. अरुने सामोसे विकत आणले आहेत( !!!) अबोली सलवार कमीजात आलेली आहे
पण अरु ने फ्रॉक आणला आहे तो तिला फिट होईल का चिंता चालू आहे. हे आहेर खान पान चालू आहे.

पावन खिंड बघा नाहीतर!! हर हर महादेव

अन्याला पन्नास हजाराचा पेमेंट आले आहे पहिला पगार. देवा समोर ठेवा वगिअरे युज्वल नाटक चालू आहे. पण यश ओरड्त येउन आईला दोन लाख मिळाले म्हणतो.

मराठी चित्रपटाच्या गाण्यासाठी गायकाला दोन लाख मिळत असतील का? अरुंधतीला आता आयटी रिटर्न फाइल करायला लागतील. पॅन काढावं लागेल.

ते पत्रकार प्रकरण फारच ओढून ताणून आणलं होतं. ते कुठल्या संस्थेकडून आलेत, त्याचं नाव आधी सांगायला हवं. की फ्रीलान्स वाले किंवा युट्यूबर
होते?

संजनाच्या वेण्या उंदराने कुरतड्ल्यासारख्या वाटत होत्या.

अरुंधतीची पावनखिंडची जाहिरात काहीतरीच आहे. महाराजांमुळे प्रत्येक मराठी स्त्रीचा आदर आणि पदर वाचला म्हणून प्रत्येक मराठी स्त्रीने हा चित्रपट पाहिला पाहिजे म्हणे.

अमा, मेले मी हसुन हसुन.
<<<आता यश ला नमस्कार करते कि काय. हा चेक बॅगेत् न ठेवता देवा समोर म्हणजे निरांजनाने तो जळून जाउ शकतो.>>> इथे तर फुटलेच Rofl

यशला नमस्कार करते की काय Lol

हो ती जाहिरात पाहिली. आदर आणि पदर अगदीच काही तरी वाटलं मलापण ऐकायला. आदर वाचला असं कुठे मराठीत म्हणतात?

शुभ प्रभातः

विमल अबोली आदरातिथ्य चालू आहे. अरु अबोलीच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे देते त्यामुळे विमल रडकुंडीला येते व यश अप्रुवल मान हलवतो.
फार वर्श नोकरी झाली की बॉसबद्दल मनात तिटकारा बसतो पण सिक्युरिटी नाइतर ऑफिस बॉयशी मावशीशी छान नाते जुळते तसेच आहे हे.
अरु विमलला मैत्रीण दर्जा देत आहे.

कट टू अप्पा स्पीकिन्ग टो कांचन हे सर्व गोरेगावला ऐकू येत आहे. वटपौर्णिमा असल्याने अनघा तयरी करायची आहे व संजना पण उपास कर्णार आहे. अन्या चेक घेउन येतो कितीचा ते संजना विचारुन घेते. पन्नास हजार म्हटल्यावर संजना नाक मुरडते. यश दोन लाखाच्या चेकचे जोरात वर्णन करतो. अनगा लगेच दोन लाख म्हणून किंचाळते. ( जरा हळू !!) अन्या ला पूर्वी अरुच्या पाच हजारांना नाक मुरडल्याचे आठवते.

अप्पा अनघा चहा संवाद प्रेम चालू आहे. अवि भाजी फळे घेउन येत आहे. फळे अनघा साठी, सुकामेवा पण भिजवून खायचा आहे.
आजी सरप्राइज एंट्री, व पणतूच हवा आहे म्हणे. बरोबर राजाभाउ व मावशी पण आली आहे. राजाभाउला ऐकु येत नाही ते जोक चालू आहेत.
( लेखिका डिपिन्ग इन ज्येना डब्बा!!) सॅड जोक्स.

सुलू मावशी लगेच नीलिमाबद्दल अविला पिडत आहे. पण राजा भाउ मध्ये मध्ये बोलत असल्याने तिला काही फार खेचता येत नाही आहे.
थोडे नातसुनेचे कौतूक. मग तिने नमस्कार केलाच. ते केस बांधून कधी घेणार. आज ओढणी गाठ मारली आहे.
हे ज्येना सर्व वरच्या मजल्यावर का बरे राहात असावे.

अरु आता सुधीरला फोन करुन आईच्या ऑपरेशन ची रुजुवात करत आहे. हिला महिन्याचा पगार प्लस गाण्याचे चेक्स मिळत आहे.
भाउ बीइन्ग भाउ. आई साठी कमोड बस वायचा आहे निहारच्या गणिताच्या क्लासचे ही पैसे ही भरणार आहे का!! थोडे रणगाडे मिसाइल्स युक्रेनला पण पाठवायला घेतले आहेत. बाबा असते तर त्यांना फार अभिमान वाटला असता. हे एक ऑपरेशन झालेतर माझ्यातर्फे चहा.

कांचन आल्याने अनघा अनघा चालू आहे. हे लोक अजून एक दोन मेड्स का नाही ठेवत. अवी राजाभाउंची फिरकी घेत आहे.
इशा आल्याने चिरकत आरडा ओरडा करत प्रेम व्यक्त करत आहे पण सस्कारीअसल्याने नमस्कार चालू आहेत.

संजना येते व वैतागली आहे.

पावन खिन्ड पहा बरे.

प्रोमो मध्ये अरु परत एक्स सासरी आली आहे. व राजाका तिला तिथेच ठेवुन घेतात.

Pages