आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग इथे कशाला येईल तो साईड रोल करायला?>>>>> म्हणूनच कालच्या प्रोमो मध्ये इशा रडत आलीय आणि म्हणतेय की साहीलच्या आईवडिलांना डिव्होर्स झालेल्या आईवडिलांची मुलगी सून म्हणून नको आहे.

जाऊ नको दूर मध्ये पुष्कर जोगला बघितलं आणि त्याचे नाव तिथे पुष्करच आहे. साहिल कदाचित परत पण येईल आणि तो नवीन हिरोही असेलच. जसे आता अरुसाठी अन्या आणि आशुतोष आहेत तसे ईशासाठी पण दोन असतील Lol जो जाईल दुसऱ्या मालिकेत त्याचे भले होवो आणि जो परत येईल त्याला सामावून घ्यायचे असे छान सर्वसमावेशक वातावरण आहे.

जाऊ नको दूर मध्ये पुष्कर जोगला बघितलं आणि त्याचे नाव तिथे पुष्करच आहे. >>>>>>> सेलिब्रिटी म्हणून आला आहे हिरोच्या अर्थात साहिलच्या लग्नाला. तेजश्री प्रधान पण आली होती.

जो जाईल दुसऱ्या मालिकेत त्याचे भले होवो आणि जो परत येईल त्याला सामावून घ्यायचे असे छान सर्वसमावेशक वातावरण आहे. >>>>>>>> अगदी अगदी. अविनाश सुद्दा गायब आहे सध्या.

इथली विमल Sony मराठीच्या बाॅस माझी लाडाची मध्ये खतरनाक व्हिलन झालीय. >>>>> बघितलेत ह्याचे काही भाग. त्यातला हिरो अगदी सो-सो आहे.

शुभ प्रभातः

काल मोमो व्हेज मान चाउ सूप व्हेज हाका नूडल व्हेज फ्राइड राइस असा मेनू गौरी ने व इतरांनी खपून बनवला आहे पण इशा रड त येते व तिचा ब्रेक अप झाला आहे. कारण साहिल फॅमिलीला डिवोर्स ड मदर नको आहे.

संज् ना अन्या कडे पैसे मागत आहे व त्याच्या कलीग बद्दल संशय घेत आहे

हेच पुढे चालू आहे. संजना काड्या घालू मोड इशा साहिल मध्ये अजून काही झालेले नसावे. अरु इशाची ग्वाही देते कारन तिचे संस्कार.
आठवड्यात अभीने आशूची भेट घेउन तुम्ही दूर रहा. असे सांगितल्याने आशू पण भंजाळ ला आहे दोन मिनिटे.

सर्व लोक अरू ला इशाशी बोल म्हणतात . इशा धबा धबा रड त आहे. प्रेमभंगाचे दु:ख इशाला पचवा यला अव घड जात आहे. अरू मुलीला समजावून सांगत आहे. रिजेक्षन फेस इट. संवाद चालू आहेत. अभ्यासात झोकून घे. इशा म्हणते मी नापास होईन. ही पिडा काय उपटली मधेच. अरू एकदम तलवार काढून सिचुएशन फेस मोड मध्ये आहे. लेखिकेने तरुण मुलांच्या प्रॉब्लेम्स चा डबा आज उघडला आहे.
अनघा आता मदतीला आलेली आहे. इशू इशू करून समजुतीचे चार वळसे देत आहे वहिनी. ही ही घट स्फोटित दुसर्‍या लग्नाची आहे. यश तिला चँप म्हणून समजूत घालत आहे. किती ते नाजूक मन किती सपोर्ट वा वा. तुला खूप छान मुलगा भेटेल. अरु हो बाळा हो बाळा.

करीअर छान असेल तुझे. वगै रे अनघा सुखी भवि श्याचे चित्र समोर उभे करत आहे. अरु मैत्रिणींशी बोल म्हण्ते. ब्रेक अप आज काल होत असतात असे अरू म्हण्ते. हे मोमो काल बनवलेले आता गारगोट्या झाल्या असतील. हे सिरीअल लॉजिक आहे अन्न वाढले की अर्धे लोक उठून जातात उरलेले अन्नाचा अपमान म्हण्त प्रतिसाद देतात. हे मायक्रोवेव्ह वापरतात का? अन्न गरम करायला? अलौड आहे का

रस्त्या चा शॉट. अन्या संजना खोली अन्या म्हण्तो इशा रडली तर मी धावत जाईन. दार उघडेच राहुदे. ( म्हणजे सुवर्ण काळ संपला म्हणावा का) अन्या मुलीच्या दु:खाने अफेक्ट झाला आहे. संजना म्हण्ते तुम्ही ओव्हर रिअ‍ॅक्त होत आहात. अन्या अरु ची बाजू घेउन संजनाला समजावते.
उगाच नावे ठेवु नकोस संधी मिळाल्यावर. इशा ला घरी घेउन जाते म्हण्ते अरू. खंग्री मॅन फॉर्मात आहे.

हे ऐकून संजना पेटलेलीच आहे. तू तिच्या नावने भेटायला अरुच्या घरी जाणार का विचारते सं.

परत रस्त्याचा शोट. अरु घरी आलेली आहे व थकल्याचे अ‍ॅक्टिन्ग करून पदराने चेहरा पुसते. ही रोज कायम चश्मा घालत नाही का?! घरी आल्या वर परत यश ला फोन. साहील ला दमदा टी करू नकोस म्हणते आरू पण यश ला त्याला भेटायला जाऊ नकोस म म्हणते आई.
अरु इशाची परीक्षा असे परेन्त सुट्टी घेणार आहे. व जमेल तसे वर्क फ्रॉम होम करणार आहे म्हणे. बॉस खिशातच आहे

परत एक फोन वाजला आहे. ती आशूला फोन करत ऑफिसला येता येत नाही काही दिवस म्हणून पूर्ण स्टोरी सांगते.

प्रोमो मध्ये: मी घर सोडून आल्यामुळे मुले बिथरली आहेत मी घरीच राहायला हवे होते का असे अरु अशूलाच विचारते. ये लव्ह स्टोरी तो बिरबल की खिचडी लग रही है.

सुवर्णकाळ Biggrin अरुची मुले कधी मोठी होणारच नाहीत. अनघाला एक दिवस सुट्टी म्हणजे बाकी दिवस ती राबणारच आहे आणि बाकी सगळे ऑर्डरी सोडणार. बॉस खिशातच आहे हे अगदी खरे. खरोखर नोकरी करावी लागली असती तर त्या घरी जायलाही वेळ मिळाला नसता, बाकीच्या भानगडी निस्तरणे तर बाजूलाच राहिले असते. अरुची माहेरची माणसे गेली वाटते माहेरचा चहा प्यायला. अरुच्या आईची म्हणजे मेधा जम्बोटकरची मुलाखत घेतली आहे सुलेखा तळवळकरने, दिल के करीबमध्ये.

कान्चनचा एक मुद्दा पटणेबल होता साहिलच्या घरन्च्याबाबत. साहिलचे वडिलान्चे वाईन clubs आहेत, कशावरुन ते त्यान्च्या वैयक्तिक आयुष्यात नैतिकता पाळत असतील? ह्यान्ना घटस्फोटित आई वडिलान्ची मुलगी का नाही चालत?

माहेरचा चहा प्यायला >>>>>>> हा हा हा बबडयाची आई साम्भाळते ती कम्पनी.

ह्यान्ना घटस्फोटित आई वडिलान्ची मुलगी का नाही चालत?>> त्यांच्या घरी कोणेतरी अशीच म्हातारी असेल. तिला नको असेल. किंवा साहिलचा
इतका सिरीअस बेत नसेलच. मजा करा व वेगळे व्हा. प्रकरण असेल. हे दुसृया बायकांण्ना तसे ट्रीट करतात मग तुमच्या मुलीला कोणी तरी असे वागवले तर काय!!!

शुभ प्रभातः

अनघा इशू बाळाला गाई गाई करत आहे. अभी येउन तिला बोलायला बाहेर नेतो. पण खोलीतच बोलत आहेत. अभी एक ब्रेक अप झाला की सगळा इनोसन्स जातो माण्साचा इशाची घुसमट झाली. प्रेम नसेलच. अभी घट स्फोटाच्या विरुद्ध आहे आई घर सोडून जाते हे कोणाला पटत नाही.
हा अरुचे स्क्रिप्ट आखुन देत आहे. आई परत येणे तिचा इगो सोडून परत यावे. स्वाभिमान सोडून रहावे तीच जगात तिच्यासाठी महत्वची असेल तर काय बोलणार असे अभी स्वामी बोलुन गेले .

अरु इथे उसासत रडत आहे व आशूला फोन करून त्यावर बोलत आहे. आशू हो हो करत आहे तिला वेळ दे. अरु मी फक्त स्वतःचा विचार करून डिवोर्स घेतला अभी नाराज यश फार काळजी करत आहे इशा ब्रेक डाउन स्टेट्स. घर सोडले ते चुकले का तो सिचुएशन अ‍ॅनालिसिस करून बोलतो आहे. मुलांसा ठी परत जावे का. आई ने स्वत्व विसरून जायची गरज नाही.

आई स्वार्थी असू च शकत नाही. मुलं हीच तुझी प्रायोरिटी आहे. जायचे असेल तर जा. दोन दिवसांनी रेकॉर्डिन्ग आहे त्याचे काय तर ते पोस्ट पोन करायचे आहे असे आशू बोलणार आहे. कुठे मिळतो इतका सपोर्ट!! ( माझ्या मुलीस ऑल राउंड गोल्ड मेडल मिळाले हे मी फक्त बॉसला ते लिफ्ट पाशी वाट बघत होते तेव्हा सांगितले ते फक्त हसून गायब. इतका सिचुएशन टु सिचुएशन फोन करून आधार वगैरे अ‍ॅडल्ट लाइफ मध्ये नाही मिळत. बॉसेस इन्वोल्व्ह पण होउ शकत नाहीत. कारण त्यांचे चॅलेंजेस फार वेगळे असतात. ) इथला बॉस पण बाल व त्याला काही तसा उद्यो ग जबाबदारी नाही. बापाचा बिझनेस मित्र चालवतो आहे.

आजी उठताना धडपडते तर अवी तिला आधार द्यायला येतो. मग अरु कशी पुर्वी कायम किचन मध्ये असायची हाक मारली की यायची!! ( डांबलेली गायच ती) आजी साहिल वर उखड लेली आहे. हिला पण दोन बाप्ये मॅन स्प्लेनिन्ग करत समजावून देत आहेत. ही घरी बसून काय काय डोक्यात चित्रे बनवत आहे. कुठे काय बोलायचे पोच नाही कांचीला. व तिचे कौतू कच होते. इशाला आईकडे पाठवा यचे आहे.
अनघाला लवकर जायचे आहे पन ती पोहे करून गेली. आता कांचाप्पा चहा पोहे खाणार आहे.

एकदम कट टू अरु डुइन्ग रियाज. ऐकते आहे ह्याबद्दल काय लिहावे. चालू आहे रियाज............................................................................
सखी मोरी रुम झूम ही एकच चीज चालू आहे. मग इशाच्या ब्रेक अप चे विचार. व बेल वाजते. इशा इतक्या लवकर कशी काय आली.
मग देविका गाढवासार्खी खिंकाळत आत येते. चमकदार डाय्लॉग फुकटचा ब्राइट नेस. अरुला मैत्रीण आल्याने आनंद झाला आहे व सखी मेरी रुम झुम चालू झाले आहे.
देविका पकापका पका पका पका पका चालू आहे. रिटायर झाल्यावर शेजारी राहायचे रात्री बार मध्ये दोन पेग घ्यायचे, पत्ते खेळायचे व झुलत झुलत याय्चे म्हणे!! अरु रडत आहे. कारण तिला खूप गरज होती देविकेची. हे सर्व दारात उभे राहुन चालू आहे. ही काहीतरी अपर ड्रग घेतल्यासरखी उगीचच उत्साहात आहे. यश सारखी. आशू ने पत्ता दिला तुझं घर तुझं घर .
पुढील भागात आजी अनघाचे कौतीक करत आहे. ती नसती तर घर कोणी सांभाळ ले असते म्हणे. फक्त बुडावरुन उठायची गरज आहे म्हातारे.
पण डोक्यात शिरेल तर ना.
व इशा आईकडे आलेली आहे व देविकाला बघुन चक्रावते. पण आईने तिला सर्व सांगितले आहे. आता देविका सगळी कदे उत्साहाचे दिवे लावून ब्रेकप चा बुवा पळवून लावणार. इमॅजिकाला जातील सगळे.

इतका सिरीअस बेत नसेलच. मजा करा व वेगळे व्हा. प्रकरण असेल. हे दुसृया बायकांण्ना तसे ट्रीट करतात मग तुमच्या मुलीला कोणी तरी असे वागवले तर काय!!! >>>>>>> अगदी अगदी

हा अरुचे स्क्रिप्ट आखुन देत आहे. आई परत येणे तिचा इगो सोडून परत यावे. स्वाभिमान सोडून रहावे तीच जगात तिच्यासाठी महत्वची असेल तर काय बोलणार असे अभी स्वामी बोलुन गेले .>>> दरवेळेला अभि अस काही टॅजन्ट बोलायला लागली की अनघाच्या चेहर्‍यावर बाबाना सान्गुन मीही डिव्होर्स फाइल करावा का? असे छुपे भाव दिसतात, अभ्याने साउथ मुव्हिज मधे दाखवतात तस स्वतःच स्वत्;च ऑपरेशन करुन एकदा मेन्दू जागेवर आहे का हे चेक करावे.
इशुडिच्या ब्रेकप जे कौतुक चाललय ते अचाट आहे , प्रत्येक गोष्टिची जागतिक लेव्हलची समस्या करुन टाकायची,मुळात जीच्या लग्नाचि बोलणी चालली आहेत ती मुलगी लहान कशी ?

शुभ प्रभातः देविकाला चहा आणून द्यायचा आहे. सुखाचे चांदणे हिट आहे. सिंगापूर मध्ये पण लोक्स व्हिडीओ बघत आहेत. मग देविका फ्लाइट मध्ये ओर्डऊन ही माझी मैत्रीण आहे सांगते. एकूण अरूचे कौतूक मोड मध्ये देविका आहे.

कट टू घर चे सकाळः संजना आजीला वजन कमी करा म्हणते. इशा आई कडे जात आहे. संजना अरु आशुतोस काड्या करते. अन्या म्हण्तो काहीतरी प्रोग्राम करू. इशा संस्कारी ज्यु ज्यु असल्याने सर्वांना नमस्कार करत आहे. बाबांना पण मिठी मारते. आई कडे राहायला जात आहे परीक्षे पुरते. अवि तिला भेटायला जाणार आहे. पण आजी मोडता घालते.

इशा गेल्यावर मात्र कांचन रडू लागते आहे. का तर इशा सासरी जाणार आहे. लगेच लगन लावुन देउ म्हणजे हे सर्व तिच्या डोक्यतच येणार नाही. फार शिकले की मुलींच्या अपेक्षा पण वाढतत. मग लग्नाचा उशीर, मुलांना उशीर. आता आजी इशाच्या लग्नाच्या मागे लागली आहे.
अवि निलीमा होती की तुझ्या पसंतीची. पत्रिका शोधायलाच लागते. कितीही सांगितले तरी कांचनच्या डोक्यात प्रकाश पडत नाही.
ती गेल्यावर मेन्स मी कंट्रोल मध्ये आहे हा खुंटा बळकट करतात.

देविका अरु संवादः एकटी बाई म्हणजे किती अवघड. प्लग चालू आहे. पुरुष जळ्ळे वाइट. सगळे मजनूच. नितीन व आशू वेग्ळ्या कॅटेगरीतले आहेत. हो हो अग्री. मग अरु उसासत आईला मुलांमधनं जीव कसा काढता येइल. मग देविकाचा काम करत राहा प्लग. बेल वाजते व इशा यश येतात. इशा देविकाला रहा म्हणते. सर्व आईला पोहे करायला सांगतात. इशा ऑफिसचे विचारते पण आईने सुट्टी घेतली आहे.

कट टू कांचाप्पा: डिस्कशन पावसाची वाट बघत आहे. अनघा तुळशी वृंदा वनात पुजा करत आहे व अवी बागेला पाणी घालत आहे. अनघा गोड आहे व तिच्या मुळे अरु ची उणीव कमी भासते असे कांचन कबूल करते. सर्व मोठे मुले नसली की घर रिकामे वाट्ते म्हणतात. मग आजी लगेच नातवाचा प्लग मारते. अनघा लाजते किंवा वैतागते निघून जाते.

संजना ऐकत आहे. अवि मॅडम पाणी आणून देउ का विचारतो. संजनाला एका मागून एक मीटिन्ग होत्या. नवीन बिझनेसच्या कामासाठी फिरत होती. तुम्हाला नाही समजणार बँकेची कामे आहेत. इतर कामे आहेत कांचन तिच्या मागे लागत आहे. लगेच अनघाला प्लानिन्ग करू नको म्हण्ते. संजना उलट एंजॉय कर आजीचे काही ऐकू नकोस. असा दोन विरुद्ध सल्ला चालू आहे. अनघा म्हणते तिन्ही सांजेला वाद नको.
कांचनला टीव्ही बघायला पाठवते.

प्रोमो: देविका तिच्या ब्रेकप चे सांगते. इशा रिकव्हर व्हायला सर्व प्रयत्न करत आहेत.

शुभ वीकान्त.

फार शिकले की मुलींच्या अपेक्षा पण वाढतत. मग लग्नाचा उशीर, मुलांना उशीर. आता आजी इशाच्या लग्नाच्या मागे लागली आहे. >>>>>>>>>>>>>>> कान्चनला विचारा कुणीतरी की , "मग विशाखाला तरी का एवढ शिकवल? लग्नाच्या वेळी तिच वय काय होत?"

शुभ प्रभातः
देविका यश इशा जेवणे करून बसले आहेत व अरु घरी के लेली सुपारी घेउन येते. देविका अरु चा प्लग चालू आहे. ती किती अभ्यासू खेळाडू. पुढे शिकणार. मग लगेच देविकाची लव्ह स्टोरी व प्रेमभंग. ह्यावर पाच मिनि त्टे. व ब्रेक अप ग्यान. मस्त जगायचे वगैरे. इदर ब्रेकप हुवा नही के फाइअर ब्रिगेड हजर. जेनेरिक ब्रेक अप स्टोरी. आज मी खूप सक्सेसफुल आहे. तो परत भेटला होता. बस स्टॉप वर फॅमिली बरोबर उभा होता व गाडीत देविकाला बघुन चकित झाला म्हणे. ( अरे पण त्याला फॅमिली आहे तो सुखी असेलही त्याच्या लेव्हलला हिची मोजपट्टी का बरं) मग देविकाने त्याचे फोटो फा डले त्याला शिव्या दिल्या व परत कधीच रड ली नाही. ( जब वी मेट स्टाइल)

आता रड का कोरस इशा फोन वरून सर्व मेसेजेस फोटो डिलीट करत आहे साहिलचे. आज लेखिकेने तरुण मुलांच्या प्रश्नांचा डबा उघडलेला आहे. इशाची रडारड चालू आहे. मागे व्हायोलिन वर आई कुठे काय करते ट्युन वाजत आहे. आईच्या मांडीवर डोके ठेवुन इशा रडत आहे व अरु समजूत घालत आहे . यश बघत आहे. इशा झोपल्यावर अरु एकदम एक ऑर्गॅस्मिक चेहरा करते व समाधानाने डोळे मिटते.

अप्पा दूध भाजी आणली आहे. अवी बाहेर निघाला आहे आशुतोस ने अविला हपिसात बोलावले आहे. हे ह्याचे फॉर्मल कपडे बघुन घ्या.
सुधीर व अवी आशुतोष कडे काम कर णार आहे. संजना बसुन लॅप टॉप वर नव्या बिझनेस ची बांधणी करत आहे. आजी तिला जाम थोबडवते.
अवी ह्याची बॅक ग्राउंड आईबाबांना समजावुन सांगतो.

स्म्जना परत काड्या करत आहे. कांचन पगारावर काँप्रमाइज करू नकोस म्हण्ते. अवि संस्कारी असल्याने निघताना आईबाबांना नमस्कार करतो. संजन करवादत आहे. आंब्याच्या पेट्या गावी कधी जाणार पणतु घेउनच जाईन. अप्पा आजीला दूध गरम करायला सांगतो. व ती वैतागत जाते किचन मध्ये.

इकडे इशाचा अभ्यास कौतूक परीक्षा चालू आहे. देविका तयार होउन कामाला जाते. ती आल्यामुळे इशाचा मूड सुधारला आहे. अरु पण देविकाचे कौतूक करत आहे. शिक्षण महत्वाचे आहे. डिग्री पाहिजे. पण एकदा बस मिस झाली की झाली ना असे इशा म्हण्ते. एकदम ढ्यांव ट्यांव म्युझिक आहे. इशा अजून अही आईच्या कॉलेजला जायच्या विरोधात आहे. तुला का लाज वाट्ते असे अरू पॉइन्ट ब्लांक विचारते.
आनंदी संगीत. अरु देवाला नमस्कार करायला सां गते.

फारच सुचना घर सोडताना.

प्रोमोम अध्ये अशू आरु जोडीत लुटुपुटीचे भांडण झाले आहे व दोघांना एक मेकांना सॉरी म्हणायचे आहे. ते आपण प्रत्यक्षच बघू. आता पाव साबरो बर ऑफिस रोमान्स नव्या लेव्हलला पोहोचला आहे. किस अँड मेक अप हॅपी संडे. अविला नोकरी दिली हे चिडायचे कारण. खर तर पाय धरले पाहिजेत श्रीमंत मित्राचे.

म्युझिक स्कूलसाठी शिक्षक अपॉइंट करायचं काम अपूर्ण होतं हे लेखिका विसरली. उमेदवारांना अरुंधतीच्या घरी इंटरव्ह्युसाठी बोलावता आलं असतं. देविका , यश हेसुद्धा पॅनलवर.

आणि देवी काचे प्रेम होते म्हणे कुणावर तरी..
मागे तर ती आणि केदार एकमेकांवर प्रेम करत होते..पण त्याने विचारले नाही... की काहीतरी असे दाखविलेले ना?
लेखिका विसरते बुआ फार!!

लेखिका विसरते बुआ फार!! >>>>>> अगदी अगदी.गौरी ही यशची पहिली गर्लफ्रेण्ड नाहीये म्हणे. ह्याआधीही ह्याच्या आयुष्यात मुली येऊन गेल्या. अरुला बर चालत हे.

शुभ प्रभातः यशने हिला मोबाइल ब्यांकिन्ग शिकवले आहे म्हणे. तरी युजरनेम पासवर्ड मोठ्याने बोलुन सांगते. इशाचा फोन येतो ती घरी जाईल व जेउनच येइल मग तू ऑफिसला जाउन ये म्हणते. इशाच्या परवनगीने ही कामाला जाते. इमेल मध्ये दोन तीन अर्ज आले आहेत. घरी बसून काय करू म्हणून हपिसात जाते.

इथे अविचा इं टर व्यु चालू आहे. नोकरी मिळालीच ऑलमोस्ट. सेल्स टीम मध्ये जॉब मिळाला आहे. एक साइट तळेवाग एक साइट पनवेल.
कारने जायचे कॅश कॅरी करायची जोखमीचे काम आहे. अशीच लोके हवी आहेत. जॉब मिल गया जी. आशू कॉन्फरन्स रू म मध्ये बसला आहे त्यांना भेटून अवि धन्यवाद म्हणतो. एके कन्स्ट्रक्षन नाव कमी करतो. सुधीरला प्रवास शक्य नाही आहे. म्हणून जागा अवि ला मिळाली.

आता फुल्झडी देविका आलेली आहे. बरोबर अरु पण आलेली आहे. ही अविला जॉब मिळाला म्हणून अपसेट आहे. आता देविक लगेच अटेन्शन सीकर पद्धतीन बोलत आहे. पन अरु बिझन्स लाइक आहे. अविला का नोकरी दिली!! म्हणून अपसेट आहे काही ही बोलते.
लोकांना बोलायला संधी!! ह्यामुळे आता आशू वैतागला आहे. अनेक वेळा सांगूनही तिच्या डोक्यात प्रकाश पडला नाही म्हणून तो बिथरला आहे.
यश फ्रीलान्स संजना आपली आपण आली होती. अवि ला का घेतले म्हणून ती भांडत आहे. मेजर भांडण हॅपनिन्ग. लोक बोलतात.
खंग्री मॅन फॉर्मात आहे. एकत्र काम करायला नको प्रश्नच नाही म्हणजे. देविका मध्ये पडायचा प्रयत्न करत आहे. तेच तेच बोलते ही. फार उपकार आहेत आता अजून उपकार करू नका. तसे असेल तर काम करायला नको. म्हणून अरू निघून जाते.

देविका तिच्या मागे. आता हे काय? गाढवीला गुळाची काय चव? इतके पायघड्या घालुन आलेली संधी हिने लाथाड ली आहे. मध्यम वर्गीय माज निव्वळ.

इकडे आजीचे कौतूक चालू आहे. पाय दुखत असतात तर फिरत जा वजन कमी कर म्हटले तर आजी सबबी देत आहे. स्जना लगेच घर विका रिडेव्हलप मेंट होत आहे म्हण्ते. संजना ला एक कॉल करायचा आहे. म्हणून ती आजी अप्पांना गप्प बसा म्हणते. अवि कसा बिन तक्रार काम करतो . अवि इथेच राहील म्हणून संजना वैतागते. निली मा पण येइल त्यात काय हिला प्रॉब्लेम?! घरात किती गर्दी आहे. अन्या किती लोकांना पोसेल. लगेच अप्पा घर खर्चाचे बोलुन दाखवतो.

आजी तू काय करतेस विचारते. तू फक्त लुटायला बसली आहेस. अनिरुद्ध कडे पैसे मागत होतीस. लाज कशी वाटत नाही!! संजना
कटकट करत आहे. अविनाश एकदम उत्साहात येतो. जोब लागला आहे अविला त्याचे अभिनंदन सेलि ब्रेशन चालू आहे.

इकडे देविका मागे पळत येते . अरु भयंकर रागवली आहे. कारण हे सर्व उपकाराचे तिला फार ओ झे वाटू लागले आहे. देविका चार समजुतीचे शब्द बोलत आहे. पण डोके फिरलेले आहे. ओव्हरथिंकिन्ग करत आहे. इकडे नित्या आशूला समजाfunction at() { [native code] } वत आहे.

हिचा इन्फिरिअर्टी काँप्लेक्स फारच अ‍ॅक्टिव्ह आहे. नित्या समजून घे म्हणतो. आशू कूल डाउन होतो. पार्टनर शिप तुटली तर काय असा विचार आला आहे. सॉरी म्हणायचे आहे. अरु चा रागावर ताबा नाही. मी खूप बोलले त्यांना त्यांना वाइट वाटले असेत्ल त्यांनी इतके केले आहे. हिला पण त्यांना सॉरी म्हणायचे आहे. पण ते उद्या. खंग्री नेहमीचा पीस टाकतो.

दोनो तरफसे सॉरी चालू आहे लेकिन बोलना कौन और कब इसपे बात टिकी है.
प्रेमाचे भां डण हो दुसरे काय. ह्यात अविला इन्क्रिमेंट मिळेल.

प्रोमो मध्ये: संजना काड्या , देविका अरूला कॉलेजात तर लोक अजून बोलतील. पण तुला काय करायचे आहे असे विचारते. तेव्हा अरु चा चेहरा शंकित आहे. कॉय हे एकट्या बाईला त्रास आँ . पुराने आशिक को ऐसे सतानेका नै बेगम.

<ह्याचे फॉर्मल कपडे बघुन घ्या.>

जीन्स आणि शर्ट, शर्टचं वरचं बटण लावलेलं नाही. संजना त्यालाही फॉर्मल म्हणाली. कपडेपटवाल्याला कोणी सांगितलं नाही. बाकीचे पाट्या टाकतातच. आपण पण टाकू.
इशाला समजवायचा प्रसंग अगदी शाळकरी मुलं नाटुकलं बसवतात , त्या लेव्हलचा होता. जब वी मेटची कॉ पी होतीच.
तिने देवाला केलेला नमस्कारही धन्य होता. आधी मस्त आरामात बसली होती. मग अचानक पेपरच्या आधी बेल वाजते तशी बेलवाजल्यासारखी उठून धावायला लागली. अभ्यासाचं वही पुस्तकही हातातच घेऊन गेली.

अभ्यासाचं वही पुस्तकही हातातच घेऊन गेली.> हो ना. पॅड त्याला लावलेली फुट पट्टी. नंबर छापलेले कार्ड व त्याची झेरॉक्स. कंपास पेटी त्यात तीन पेने दोन पेन्सिली एक खोड रबर. पाण्याची बाटली डोक्याला टोपी उन्ह असले तर / छत्री हे काहीच नाही. पुण्यात ही परीक्षेची स्टँड र्ड तयारी
असायची. अरुचे लक्ष नसते आजकाल. लफडे मय झालेली आहे करिअरी स्त आई.

ऑफिस मध्ये बॉस सुद्धा कसलेतरी कळकट फिटिन्ग न होणारे निळे जाकीट घालून आला आहे.

इशा अजून अही आईच्या कॉलेजला जायच्या विरोधात आहे. तुला का लाज वाट्ते असे अरू पॉइन्ट ब्लांक विचारते. > म्युझिक स्कूल सारखे कॉलेज पण काढाय्चा प्रस्ताव द्यायचा केळकरांना

अमा.. Lol
ऑफिस मध्ये बॉस सुद्धा कसलेतरी कळकट फिटिन्ग न होणारे निळे जाकीट घालून आला आहे.
...अगदीच भंगार आहे....मध्ये आडवा पांढरा पट्टा

अविनाशचं बॅकग्राउंड चेक नाही केलं का या लोकांनी? पैसे उधार घेणं, फेडता न येणं , त्यासाठी दुसर्‍याचंच घर गहाण ठेवलं जाणं आणि स्वतः गायब असणं अशा माणसाला कॅश कॅरी करायचं विश्वासाचं काम देणार!
आणि कॅश का लागते यांना? ब्लॅकचा धंदा करतात वाटतं. अरुंधती नेट बँकिंग शिकलीय. यांनी पण शिकून घ्यावं.
अविनाश म्हणतो - बॅक ऑफिस सांभाळेन. नितीन सांगतो साइट आणि ऑफिसच्या मध्ये नाचायचं.
उगाच एच आर हेड वगैरे शब्द वापरलेत. असता, तर इंटरव्ह्यु त्यानेच घेतला असता.

आशुतोष जिवावरच्या संकटातून वाचलाय हे लेखक मंडळी देविकाला सांगायला विसरली.

अरुंधतीला जॉब अ‍ॅप्लिकेशम इमेलने आलीत. आणि ती ती नितीनला का दाखवणार? म्युझिक स्कूलचा त्याचा काय संबंध?

जिथे अरुने संजनाचीही भलामण केली होती तिथे अविची का नाही करणार. नशीब अन्याला तिथे जॉब करायचा नव्हता, नाहीतर अरुने त्याचीही वकिली केली असती की नवरा म्हणून कसेही असले तरी कामाच्या बाबतीत अतिशय चोख आहेत ते. नीलिमा पगार बघून परत येईल असे कांचनला वाटतेय, ती परत आली तर पैसे घेऊन पळून जाऊया म्हणून अविच्या डोक्यावर बसेल.

हो ना. पॅड त्याला लावलेली फुट पट्टी. नंबर छापलेले कार्ड व त्याची झेरॉक्स. कंपास पेटी त्यात तीन पेने दोन पेन्सिली एक खोड रबर. पाण्याची बाटली डोक्याला टोपी उन्ह असले तर / छत्री हे काहीच नाही. पुण्यात ही परीक्षेची स्टँड र्ड तयारी
असायची. >>>>>>>> पण ईशा ने परीक्षेला जाताना हे अस जायच? ह्या अवतारात?

अरुचे लक्ष नसते आजकाल. लफडे मय झालेली आहे करिअरी स्त आई. >>>>>>> अरुने स्वतःची कामे बाजूला ठेवून ईशाची काळजी घेतली तरीही तुम्हाला प्रॉब्लेम, बर नाहीच लक्ष दिले तिच्याकडे, अरु म्हणाली असती की करु दे तिच तिला तरीही तुम्हाला ते खटकतच.

इशाला समजवायचा प्रसंग अगदी शाळकरी मुलं नाटुकलं बसवतात , त्या लेव्हलचा होता. जब वी मेटची कॉ पी होतीच. >>>>>>> अगदी अगदी देविकाने सरळ अरुचच उदाहरण दयायच होत ना ईशाला. लग्नाच्या १३ वर्षानन्तर हिला नवर्याकडून फसवणूक सहन करावी लागली, तरीही तुझी आई खचली नाही, तुझ्यासारखी रडत बसली नाही वगैरे वगैरे.

शुभ प्रभातः

अरु व देविका घरी येतात. अरू द्विधा मनस्थितीत आहे. देविका तिचे विचार तिलाच मांडून दाखवत आहे. इशाला दुखवायचे नाही आहे अरु ला. इतका विचार करू नकोस म्हणते देविका.

अवि पळत आला आहे. यश ला बोलवुन सर्वांना जॉब मिळाल्याची खु श खबर देतो. संजना काड्या मोड. केळकरांचे उपकारच आहेत असे कांचन म्हणते. संजना टीका करतच आहे पण अविने उत्तर दिल्यावर मात्र बोट उगारून चालू आहे.

परत रस्त्याचा शॉट. नित्या आशू व ते विचित्र जॅकेट कार मध्ये आहेत. आशूला अरुला सॉरी म्हणायचे आहे तो नित्याला विंग मॅन म्हणून चल म्हणतो. हे काय शाळकरी प्रकरण चालू आहे.

आशू कडे बेल वाजते. देविका डार्लिन्ग म्हणून मिठी मारते. कांचन घरी आलेली आहे. इशा बरोबर. कांचन देविका टीपी चालू आहे. इशाचा पेपर बरा गेला आहे. अरु तिला धीर देते व पुढील पेपरचा अभ्यास कर असे सांगते.

आजी त्या घराची टूर घेते. अरु ची घर सजवण्याची हौस राहिलीच आहे. आजी माफी मागते. मला घर सजवायला मिळाले नाही म्हणून मी तुला पन करू दिले नाही. देवि का आजी ला घरी बोलवते.

कट टू एकदम अप्पा रागवून बसला आहे. व आजी त्यांना वडे भरवते आहे. त्यांना न सांगता ही का गेली म्हणून फुगला आहे. किती बालीश
अवि वडे खाउन कौतूक करत आहे. अनघा अप्पा का चिडले आहेत विचारते. इतके काय ते एका.......... ................?!

अप्पा वडे खात आहे. ताई रोज काहीत री चमचमीत बनवत असेल इशासा ठी म्हणते अनघा. ताई खूप पॉझिटिव्ह आहे खूप शिकण्यासारखे आहे हातात कला आहे. हा प्लग झाला नाहीतर लेखिकेला पाकीट मिळ् नार नाही.

आता नीलिमा परत येइल म्हन ते आजी. दोन्ही मुलांच्या जीवनात संसार सुख नाही म्हणून कांचन रडते.

अरु संस्कारी असल्याने रात्री शुभंकरोती म्हणते. इशा आईला रात्री रियाज कर म्हणते. नव्या गाण्याचे रेकोर्डिन्ग पण इशाच्या परीक्षे नंतर च
होईल. साहील परत येइल त्याची आठवन येते. त्याने हिला ब्लॉक केले आहे. मग अरु समजावुन सांगते. खरं प्रेम असते तर त्याने घरच्यांना समजावले असते. पालकांची मीटिन्ग घडवून आणली असती. इशाला वाटते आहे त्याचे अजून हिच्यावर प्रेम आहे. पण आशेवर राहू नकोस असे म्हणते अरू. तटस्थ पणे विचार करायला शीक. नव्या हिरोच्या एंट्रीसाठी सिचुएशान रेडी झालेली आहे.

मागे आई कुठे काय करते आहे चे संगीत वाजत आहे. मन ताब्यात ठेवायला शीक. लवकर बाहेर ये. पुढचा विचार कर. असे लेकीला मिठी मारते
इशाला गॅप आहे तेव्हा रेकॉर्डिन्ग कर म्हणते.

अन्या अरु च्या घरी आला आहे हे संजना आटोतुन जाताना बघते.

बाबा आले आहेत म्हणून अरु दचकते . अरु त्यांना चहा नेउन देते.

प्रोमो मध्ये हा छान झालेला चहा असतो. तो पिउन कप बशी घेताना अरु ला ठेच लागते व ती पडत असते तर अन्या सावरतो. दार तर ह्यांचेउघडेच
असते त्यामुळे आशू नित्या व ते जॅकेट हे सर्व बघतात. अन्या तिला आता जप आपले वय राहिले नाही असे समज वत असतो. काँपिटिशन तगडा हो रहा है.

आरु ला सॉरी म्हणायचे आहे तर आशूला नित्या बॅक अप सपोर्ट कशाला लागतो. चाळीशीचा बाप्या आहे की. त्यात बिझनेस मेन लिडर टाइ प.
घराचे दार उघडे ठेवु नये गैरसमज होतात.

आम्ही दहा एपिसोड मागे आहोत बघायला... अरु आणि आशु बेडसीन झाला का? झाला असेल तर एपिसोड नंबर नक्की कळवा म्हणजे स्किप करता येईल... ह्यांचे लव्ह मेकिंग बघने म्हणजे प्रेक्षकांना शिक्षाच...

Pages