आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकीकडे नवर्‍याने घटस्फोटाची नोटिस दिली आहे, तरी संजनाचं काड्या करणं काही थांबत नाही. तिला अमेरिकेत प्रॉपर कागदपत्रे असलेला जॉबच कशाला हवा? भारत व अन्य देशांतूनही अवैध रीत्या अमेरिकेत इ. जाणारे लोकही पोटापाण्यासाठी काही ना काही करतच असतील. डिपेंडंट व्हिसा वर जाणारेही काही करत असतील. तिची बहीण आणि बहिणीचा नवरा (गौरीचे आईवडील) अमेरिकेतच आहेत.

गौरीचं घर समृद्धी बंगल्याच्या समोरच आहे.

मलिकेत ओव्हर पझेसिव्ह, तापट डोक्याचा, ऊठसूट हातपाय चालवणारा, वयाचा मानबिन न ठेवणारा (यात मला काही चूक वाटत नाही. व्यक्ती केवळ वयाने - नात्याने मोठी आहे, म्हणून मान दिलाच पाहिजे असं मला वाटत नाही) , जोडीदाराच्या मनाचा विचार न करणारा यश (आभिषेक देशपांडे? ) अनुरूप विवाह संस्थेच्या जाहिरातीत चमकतो!

मलिकेत ओव्हर पझेसिव्ह, तापट डोक्याचा, ऊठसूट हातपाय चालवणारा, वयाचा मानबिन न ठेवणारा (यात मला काही चूक वाटत नाही. व्यक्ती केवळ वयाने - नात्याने मोठी आहे, म्हणून मान दिलाच पाहिजे असं मला वाटत नाही) , जोडीदाराच्या मनाचा विचार न करणारा यश (आभिषेक देशपांडे? ) अनुरूप विवाह संस्थेच्या जाहिरातीत चमकतो!> हो मी बघते ती जाहिरात नेहमी. आणि तो यश आहे समजूनच बघते. आमच्याकडे फारच यो कँडिडेट असल्याने असे कधी होईल का स्वप्न रंजन करते.

गौरी देशपांडे स्टाईल समजले नाही..अमा...>> गौरी देशपांड्यांची एक कथा आहे थांग त्यात हिरविणेस नवरा लक्ष देत नाही. शी इज जनरली बोअर्ड अ‍ॅन्ड ग्रोइन्ग अपार्ट. मग त्याचे पोस्टिन्ग येते तिथे नवर्‍याच्या एका कलीग बरोबर शारीरिक लफडे व दुसरा जो बॉस असतो सर्वांचा त्या बरोबर मानसिक लफडे पक्षी प्रेम असे करते. तर आता हा म्यारिड असतो. मग प्रेम खुलके कसे व्यक्त होणार तर तेव्हा त्याला अपघात होतो. व ती त्याला हास्पिटलात जाउन मिठी मारते, व त्याच्या बायकोस व हिच्या नवृयास बाबी क्लीअर होतात. तसेच आता होईल अरु काय प्रेमाला प्रतिसाद देत नाही पन इन्हे मरेंगा तो पहिले बोलना पडेंगा ना बोल के दोनों रोएंगे आउर प्यार में डूबेंगे. फिर शादी. कारण नुसते कसे राहणार!!! इकडे सुखाचे चांदणे तिकडे सुखाची भांडणे.

अमा, भारी लिहिता. मला 2 दिवस बघता आले नाही. आज तुमचा अपडेट वाचला आता संध्याकाळी बघेन.
भरत, फारएन्ड, आंबटगोड, sulu , अंजूताई, तुम्हा सर्वांच्या कॉमेंट्स खूप आवडतात. मग एपिसोड बघताना इथले आठवून हसू येते आणि घराचे लोक यात काय आहे एवढे हसण्यासारखे, असा लूक देतात.

ऑर्किड...:-)
थँक्यू.
सिरियल पाहायला एव्हढी मजा येत नाही जितकी इथे चिरफाड करताना येते.....

अमा..
नित्या म्हण्तो किती वर्शांनी गाणार तू!! अरे अल्बम आत्ताच रिलीज झाला ना!! ...
हो..पण अल्बम मध्ये आशु नाही गायलेला त्या...
श्रोत्यांच्या सुदैवाने!!!

चला आज स्वतंट्र स्त्रीला कामाला जायचे आहे. कोण आशू घरी चेक आणून दे णार नाही की कुत्रे फिरीवनार नाही. >>> हे वाक्य वाचून वास्तववादी जगात आलो. Biggrin Biggrin Biggrin

हॉस्पिटलमध्ये प्रेमाची कबुली देणार नाही पण तिला आशुवरच्या प्रेमाची जाणीव होईल. आणि ती जाणीव दुसर तिसर कुणी नाही तर अन्या देणार आहे तिला. अगदी ' जा अरु जा, जि ले अपनी जिन्दगी' अश्या स्टाईलमध्ये अन्या बेस्ट ऑफ ल़क करणार आहे हिला. अनुपमा मध्ये दाखवलय अस.

शुभ प्रभात.: यश एक्साइटेड आहे कारन आईला दोन गाणी मिळाली आहेत. आजी अस्वस्थ पणे फेर्‍या मारत आहे. तसेच उत्तर ध्रुव प्रदक्षिणा करून ये म्हातारे बारीक होशील. हे ऐकून संजना पण येते व खोचक पणे मस्तच आहे हे म्हणते. पण घरच्यांनी तिला नीट वागवायचे ठरवले आहे.
आजी वैता गत आहे कारण अरू आलेली नाही. ती गौरी कडे आहे म्हटल्यावर आता गौरी चा ब्रेन वॉश करेल म्हणते.

यश पण गौरी कडे जायला उत्सुक आहे. पण तिकडे गौरी एकटीच आहे!!

कट टू नित्या आशू आशू शीळ घालत आहे. नित्या नेहमी प्रमाणे बायकी चिडवत आहे. नोट इथे प्रकाश ड्रायवहर आहे. आता हे पाणी पुरी गाडी बघून तिथे खायला थांबतात. तिथे आशूला ठसका लागतो व नित्या पाणी पी वर बघ करतो. तर आशूला अरूने तसे केले होते त्याची आठवण येते. आता आशू ला पण गायकी चे टेन्शन आले आहे. कारण अरू फार्च छान गाते तुलनेत. ब्रो मला कॉन्फिडन्स नाही म्हणे. हे सर्व अरु मुळे. एक संधी सोडत नाहीत अरु पुढे दिवे ठेवायची. नित्या पुरी खाता खाता आशू अरू लग्नाचे प्लग चालू करतो. फालतूचे रीझनिन्ग चालू आहे.

जीवनात कोणी तरी लागते हे वाक्य सोप ऑपेरात साधारण रोज कोणीतरी कोणाला तरी सांगत असते. व कोणाला तरी लग्नाच्या खोड्यात अडकवत अस्तात. आशू आहे त्यात सुखी आहे. और कुच्छ होएगा बी नै इससे. तो नित्या उगी उगी उगी पण वाचल्या सारखे म्हणतो.

अरू कांचन शी गप्पा मारत आहे. अभी घर सोडून जातो म्हणे. अपडेट देते. उसासे क्वीन आता हे काय नवीन म्हणून हताश झालेली आहे.
ती कांचाप्पाला घरी राहायला बोलवते अप्पा कांचन ला काहीतरी चिडवतो. संजना आली व विचा रते तर आजी तिला गप्प बसवते.
अरु संजना एकमेकांना रशिया युक्रेन शांती परिषद असल्य सारखे विश करतात. कशी आहेस. अन्या तिला येत जा म्हण्तो. संजना लगेच पाणी चहा इचारते. व चहा करायला किचन मध्ये जाते.

आता यश गौरीचा मेक अप सीन आहे लैच बोअर. शेवट मिठी. मग घरी येतात. अरु निघते तर तिला ठेच लागते. लगेच नॅशनल इमरजंट् सी. व फोन येतो नित्याचा की अ‍ॅक्सि डेंट झालेला आहे. मग तिला भोवळ येते.

कट टू हॉस्पिटल आता नित्या म्हण्तो. मी गाडी चालवत होतो.!!!प्रकाश कुठे उलथला!! मग रडारड. हॉस्पिटल सीन्स सुलेखा आत आहे आशू एकदम सीरी अस आहे हेड इंजोरी झाली आहे. आता एकदम आतून प्रेम भाएर येणार. डोक्टर पण दुवाकी जरुरत आहे म्हणतो. कांचन उगीचच गर्भगळीत झाली आहे.

नितिनला काही झालेले नाही. एअर बॅग एकच होती का. मग काय झाले कसे झाले. रडारड . टकल्या डॉक्टर अपडेट देतो हे प्रोमो मध्ये.
पूर्ण खंग्री मॅनचेच काम आहे. ऐका.

तात्पर्य - अ‍ॅक्सिडंट झाल्याशिवाय प्रेम जाणवत नाही किंवा व्यक्त केलंच पाहिजे हे उमजत नाही.
(सिलसिलामध्येसुद्धा शेवटच्या सीनमध्ये संजीवकुमारच्या हेलिकॉप्टरला की विमानाला अपघात होतो आणि रेखाला कळतं की आपलं त्याच्यावरच किंवा त्याच्यावरसुद्धा प्रेम आहे. पडोसनमध्येसुद्धा हेच आहे.)
हे अरुंधती आणि आशुतोषला कळायला प्रत्येकी एक अ‍ॅक्सिडंट. यांचं एकदाचं काय ते होऊन जाऊ दे म्हणून आता नितीननेच घातपात केला असेल का?

अरुंधतीच्या तोंडीही आशुतोषचा अ‍ॅक्सिडंट झाला असंच दिलंय.

..रेखाला कळतं की आपलं त्याच्यावरच किंवा त्याच्यावरसुद्धा प्रेम आहे. ... Lol मस्त!

सोनाली..खरंच अशीच reaction देते ती!!
हा आशु कधी पासून गायक झाला? अमेरिकेतील बिझनेसमन ते
बिल्डींग construction, ते अल्बम प्रोड्यूसर, ते गायक..चौफेर आहे अगदी धडाडी!
चेहर्‍यावरून तर अगदीच भकास दिसतो...

>>>हे अरुंधती आणि आशुतोषला कळायला प्रत्येकी एक अ‍ॅक्सिडंट. यांचं एकदाचं काय ते होऊन जाऊ दे म्हणून आता नितीननेच घातपात केला असेल का?

Biggrin

असाच एखादा अपघात अन्या-अरु डिव्होर्सच्या आधी का करत नाहीत? किमान अन्याला साक्षात्कार झाला असता ना कि तो अरुशिवाय राहु शकत नाही. त्याला स्वतःला अपघात झाला तेव्हा अरुच्या स्वभावामुळे तो घरी रहायला गेला होता कारण संजना कडून फक्त व्हर्बल सिंपथी मिळेल हे त्याला ठाऊक होतं. बाकीच्या गोष्टी हे अरुंधतीच करेल याची खात्री होती.

अनिरुद्धला कळलं होतं की त्याला बायको म्हणून अरुंधतीच हवी आहे. त्याने अनेकदा बोलून दाखवलं होतं. पण त्याला त्याच वेळी संजना प्रेयसी म्हणूणच हवी होती. अरुंधतीला हे नको होतं.

भरत.. Happy खुद्द त्या अनिरूद्ध चे देखिल इतके फंडे क्लिअर नसतील..की आपल्याला नक्की काय हवं होतं .. .!!

कांचाप्पा…. Happy भारीच नाव. अरु नेहमी फोनवर बातमी ऐकल्यावर पलिकडचा माणूस मेल्यासारखी प्रतिक्रीया देते. >>>>> हो प्रत्येक वेळी

बाकीच्या गोष्टी हे अरुंधतीच करेल याची खात्री होती.>> जसे की बेड पॅन / युरिन पॉ ट उचलणे, बेड सोअर्स झाल्यास मलम लावणे, लाळेरे लावून अन्न भर व णे. , बँडेज करणे जखमांवर. स्पंजींग करणे, चादर बदलणे. सर्व मेडि कल टेस्ट ला उपस्थित राहणे इत्यादि.

अमा..आत्ता पहिला भाग...
इथल्या प्रतिक्रिया आठवून खूपच हसायला येत होते.
टकल्या डॉ, अरू ची नेहमी फोनवर बातमी ऐकल्यावर पलिकडचा माणूस मेल्यासारखी प्रतिक्रीया, प्रकाश कुठे उलथला!!..ही तुमची कमेंट....
खूपच मस्त! Biggrin

हे अरुंधती आणि आशुतोषला कळायला प्रत्येकी एक अ‍ॅक्सिडंट. यांचं एकदाचं काय ते होऊन जाऊ दे म्हणून आता नितीननेच घातपात केला असेल का? >>> Lol

आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला अपघात झाला तर ती व्यक्ती जखमी होउ नये, मरू बिरू नये असे वाटणे म्हणजे त्या व्यक्तीवर डायरेक्ट प्रेम असणे हे एक अफलातून लॉजिक पिक्चर्स/सिरीज मधे असते Happy

परवा त्या मलंग रेस्टॉ मधे - पुन्हा त्याच टेबलवर बसलेले असताना - सगळा सीन पूर्ण होतो व अरूंधती निघते. मग तिला व स्क्रिप्ट रायटर्सना आठवते की बराच वेळ "अहो तुमच्यामुळे हे सगळं होतंय" चे पालुपद वाजले नाही. मग ती परत येउन साश्रू नयनांनी हे सगळे सांगते. म्हणजे तोंडानेच सांगते. पण डोळ्यात पाणी वगैरे.

>>>प्रकाश कुठे उलथला!!
परत पोट बिघडलं असेल Lol सिरीयल मध्ये न दिसणार्‍या लोकांवर काहिही खपवता येते जसं वर्षा ..

शुभ प्रभातः

आज सुरुवात कारुण्य प्रधान रसाने आहे. सर्व तो रस भरभरुन पिउन वाकडी तोंडे घेउन आहेत. अरु सुलेखाला भेटायला रुमात गायब आजी घर बसल्या वर खाली.
संजना काड्या कार्यक्रम चालू . पण अन्या बीइन्ग मेचुअर. अप्पा तिथे आहेत. आजी त्यांना घेउन ये म्हण्ते थोड्या वेळाने. संजना काय हवे का विचारते तर कांचन चक्क स्वतःच किचन मध्ये जाते. कीपिट अप सासवे.

आता आशू आई बीप बीप रडका कोरस. रडकी बासरी. आई रडत आहे. अरु आधार देत आहे नेहमी प्रमाणे. उसासे देउन. अश्या वेळी खरेतर रडणे नैसर्गिक आहे. पण पॉझिटिव्ह बोलतो आहे. आईचा प्ल ग म्हणजे मुले अमेरिकेत असलेल्या अनेक काकवा पदर डोळ्याला लेव्हल गोड मिट्ट डायलॉग . माझी खूप काळजी करतो. मी अमेरिकेला हाकलला त्याला. माझ्यासाठी इथे राहायला नको आणि( तू समृद्धेत केर वारे करत होतीस व्हाय्खाविक्खी वुखु) आता थिन्गस गेट सस्पिशस. तो माझा मित्र आहे बाप आहे. कधी कधी.( हे काय!!)

म्युझिक्स्कूल!!! अर्धवट स्वप्ने. हिमालयात फिरायला जाणे!! अजून बाकी आहे.

उसासे क्वीन सुलेखाला आधार देत आहेत. आसुतोश बरे होतील भरपूर काम करतील. मग अरु प्लग. आशू कसा ग्रेट आहे. हे दहामिनिटी चालू आहे. अशी माणसे दुर्मिळ. त्यांना बरे व्हावेच लागेल. बासरीमॅन आता करूण करून धुना टाकत आहे.

अरु कळकट चेहरा करून आठव णी काढत आहे. अपघातात तो चौक्डीचा कोट फाटला असेल तर बरे .

अरु त्याच्या साठी प्रार्थना करते. पण अजून रोमांटिक प्रेमाचे नाव नाही.

आता म्हातारी नितीन वर घसरली आहे. अरु अप्पांना घरी पाठवायचे बघते. यश बरोबर जातात. पोलिस चौकशी वगैरे नाही का.
अरू सुलेखाला पण घरी जायला सांगते. नित्या व आई पण निघतात. एकमेकांना धीर देत आहेत.

दामले डॉक्ट र ते कोमात जाउ शकतात ब्रेन फंक्षन काय होते काय की वगिअरे घाबरवतात. पण अन्या एंट्री घेतो. व बायकोची गुंतव्णूक आपल्या डोळ्याने बघतो. ते हिचा मानसिक आधार आहेत म्हणे अरु. पण हे सर्व नसताना जगते ती स्वतं ट्र स्त्री!! उद्या वोइच रोना धोना आगे चालू.

Pages