कोहळ्याचे सांडगे आणि इतर वाळवणीचे पदार्थ

Submitted by BLACKCAT on 31 January, 2022 - 07:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1 कोहळा किस करून

तिखट , मीठ, ओवा

दोन प्रकारे केली एक पोहे वापरून , दुसरी उडीद डाळ वापरून

क्रमवार पाककृती: 

1. पोहे वापरून

कोहळा किसून घ्यावा, त्यात जाड पोहे मिसळून 1 तास भिजत घालावे. एक तासाने ते घट्ट मळून त्यात तिखट , मीठ, ओवा घालावा, मग बोटाने त्याचे सांडगे घालावेत व उन्हात वाळत घालावेत.

IMG_20220130_061912.jpg

2. उडीद सकाळी नऊ वाजता भिजत घालावी , रात्री पाणी काढून मिक्सर मधून फिरवून घ्यावे व झाकून ठेवावे , सकाळी त्यात कोहळा किस , तिखट मीठ ओवा मिसळून मळून सांडगे करून वाळवावेत.

IMG_20220130_080918.jpg

आमचे उडीदवाले बिघडले. पसरले. Sad

IMG_20220131_132151~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
3
अधिक टिपा: 

1. शिजवावे लागत नाहीत, हाताला चिकटत नाहीत, लगेच बनवून होतात.

2. ते वाळले की तळून किंवा भाजी करून खातात.

3. उडदाचे कसे होतील माहीत नाही.

4. तेल अजिबात घालू नये, खवट होतात.

5. अजून कोणत्या भाज्या वापरता येतील ?

माहितीचा स्रोत: 
यू ट्यूब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीरा Lol
मला तर नेहमी वाटत कि सॅलड (कॉस्ट्को मेडिटेरिअन पॅक, ), ट्रेडर जो मधले ठरावीक ब्लेंड ,फळांचा ज्युस, वांग्याची तडतडीत भाजी, लोणच, गरम भात एवढ्यावर आयुष्य चांगल चालेल. पण कुठल काय. चार दिवस झाले कि नविन काही तरी खायची हमखास इच्छा होते. मग ठरवते आता सरळ रेस्टॉरंट फुड मागवुया. त्यावर परत चार दिवस जातात. मग ठरवते नवर्‍याने काय केलेले असते ते मुकाट खावे. पण त्याचाही चार दिवसानी कंटाळा येतो. मग परत किचन मध्ये जाते. माझ्याच हातची साखी किंवा पनीरची भाजी किंवा पराठा खायचा असतो. करते आणि खाते मग. एकुणच स्वतःच्या हातचे काही स्पेसिफिक पदार्थ खायची सवय झाली आहे. वाईट सवय आहे एकदम. मग परत आता चार दिवस सॅलड मोड वर. कारण ते आवडतेच. फक्त ते मधुन मधुन स्वतःच्या हातचेच/चवीचे खायचे असते . स्वयंपाक करण्यात एक्स्पर्ट आहे /खुप आवड आहे अस पण नाही. चवीचा काही तरी सिंड्रोम/सायकॉलॉजिकल फॅक्टर असेल कदाचीत.

ब्लॅककॅट भारी आहात तुम्ही. आणि कित्ती चिकाटी प्रयोग करण्याची. फक्त एकच सजेशन कॅमेरा चांगला असलेला फोन घ्या . फोटो आणखी मस्त आणि क्लीअर येतील.
मी बीट पावडर आणि टारो पावडर घेवून (तयार)आली आहे. ते वापरून ब्रेड/पराठा करायचा प्लॅन आहे.

मीरगुंड(ते असे केशरी, , थोडे तिखट असतात ते) आमच्या घरी करत नाहीत. पण अस ऐकलय कि सोपे असतात करायला. कुणी रेसीपी टाकेल का ?

मला माझे कम्फर्ट फूड अजून सापडले नाही

पोळी भाजी
पोळी घट्ट डाळ , उसळ
पोळी भरीत
वरण भात
खिचडी
दही भात

सगळे प्रयोग झाले आहेत
पण चार दिवसांनी पुन्हा काहीतरी नवीन करावेसे वाटते.

मला वाटते गव्हाची खीर मला कम्फर्ट फूड होईल
पण अजून केले नाही

Pages