कोहळ्याचे सांडगे आणि इतर वाळवणीचे पदार्थ

Submitted by BLACKCAT on 31 January, 2022 - 07:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1 कोहळा किस करून

तिखट , मीठ, ओवा

दोन प्रकारे केली एक पोहे वापरून , दुसरी उडीद डाळ वापरून

क्रमवार पाककृती: 

1. पोहे वापरून

कोहळा किसून घ्यावा, त्यात जाड पोहे मिसळून 1 तास भिजत घालावे. एक तासाने ते घट्ट मळून त्यात तिखट , मीठ, ओवा घालावा, मग बोटाने त्याचे सांडगे घालावेत व उन्हात वाळत घालावेत.

IMG_20220130_061912.jpg

2. उडीद सकाळी नऊ वाजता भिजत घालावी , रात्री पाणी काढून मिक्सर मधून फिरवून घ्यावे व झाकून ठेवावे , सकाळी त्यात कोहळा किस , तिखट मीठ ओवा मिसळून मळून सांडगे करून वाळवावेत.

IMG_20220130_080918.jpg

आमचे उडीदवाले बिघडले. पसरले. Sad

IMG_20220131_132151~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
3
अधिक टिपा: 

1. शिजवावे लागत नाहीत, हाताला चिकटत नाहीत, लगेच बनवून होतात.

2. ते वाळले की तळून किंवा भाजी करून खातात.

3. उडदाचे कसे होतील माहीत नाही.

4. तेल अजिबात घालू नये, खवट होतात.

5. अजून कोणत्या भाज्या वापरता येतील ?

माहितीचा स्रोत: 
यू ट्यूब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज केळी 1 चमचा मीठ व अर्धा लिंबू पिळलेल्या पाण्यात दहा मिनिटे ठेवली

मग हातात घेऊन चोळून गुळगुळीत केली व उन्हात वाळवत ठेवली

मग दोन दिवसांनी ती प्लॅस्टिक च्या पेपरात ठेवून दाबून चपटी करणार आहे , मग परत वाळत ठेवायची.IMG_20220208_082313.jpg

जी फळं आणि भाज्या सिझनल असतात किंवा पावसाळ्यात वगैरे भाज्या मिळत नाहीत म्हणुन साठवणुकीसाठी खारवतात आणि वाळवतात ते ठीक आहे. पण वर्षभर गलीनुक्कडवर मिळणारी केळी का बरं वाळवायची? त्यात ती लवकर वाळत नसणार. आणि वाळलेल्या केळ्याचे फोटो तर .......
असो. ते सांडगे प्रकरण आवडलं म्हणुन कोहळा आणला आहे. उन्हाळा सुरू झाल्यासारखा वाटतो आहे. उडीद डाळीपेक्षा पोह्याचे क्रिस्पी होत असावेत, म्हणुन तेच करून घेणार आहे

द्राक्षे मनुका दोन भिन्न पदार्थ आहेत
तसेच हेही , गम्मत म्हणून करायचे आहे

वाळवणात सांडगे पापड येतात , पण त्याला मोठा घाट घालावा लागतो , इथे फक्त कापून वाळवणे , डाळ मिक्सरमधून भरडून सांडगे घालणे , असे सोपे प्रकार अपेक्षित आहेत.

सांडगे पापडवर दिगग्ज लोकांचे मोठे मोठे धागे आहेत

पण वर्षभर गलीनुक्कडवर मिळणारी केळी का बरं वाळवायची?
<<
एकदा खाऊनच पहा.
मग हाच प्रतिसाद असाच टाईप करावा वाटला, तर मग तुम्ही म्हणताहात ते बरोबरे.

IMG_20220209_065330.jpg

गोल स्लाइस करून फार फायदा होत नाही , मांस फार उरत नाही.
स्टील , प्लास्टिक गरम होऊन काप काळे होतात , म्हणून बांबू टोपली किंवा कापडावर चाम्गले होते

मलापण हा केळी सुकवायचा उपद्व्याप करून पाहायचा मोह होतोय. किचनच्या खिडकीत २-३ तास ऊन येतं. तेवढं पुरेल का? मायक्रोवेव्हमध्ये शक्य आहे का?
चिवड्याच्या एका रेसिपीसाठी कांदा मायक्रोवेव्हमध्ये सुकवून कुरकुरीत केला होता.

धन्स ब्लॅककॅट..!
परवा आणलेली केळी उरलीत..बर्‍यापैकी पिकलीत. आता बायकोने घोशा लावलाय ती खावा म्हणुन. थांबा आता टोपलीत ठेऊन उन्हात सुकवतो.

कोहळ्या च्या साली, भोपळा, दुधी भोपळ्या च्या साली धुवून त्यांना मीठ लावुन उन्हात ३-४ दीवस वाळवावे. सालींना कींचीत मास/ गर असावा. नंतर तेलात तळावे.

चळवळीच्या शेंगा (वाली च्या शेंगा पोपटी कलर च्या ) १/४ साईज मधे कट करून साधारण १५-२० शेंगासाठी २ मोठे चमचे भिजविलेली उडदाची डाळ, ४-५ मीरच्या, २ चीमुट हिंग, अंदाजे मीठ. डाळ हिंग मीठ मीरची एकत्र वाटून घ्यावे. हे वाटण शेंगाना चोळावे/लावावे आणि कडकडीत उन्हात वाळवावे. तळल्यावर मस्त लागतात. शेंगा ऐवजी भेंडी ही वापरू शकतो.

बियांचा उपयोग राहिला. भोपळ्याच्या बिया सुकवून खातात. मिठाईत मगज म्हणून घालतात त्या भोपळ्याच्याच बिया ना?

मिठाईत मगज म्हणून घालतात त्या भोपळ्याच्याच बिया ना? > हो, लाल भोपळा, नुसत्या सोलून खायला पण छान लागतात. थोडी कटकटीची प्रोसेस आहे पण भोपळ्याच्या बिया सोलणे

मगज म्हणून घालतात त्या भोपळ्याच्याच बिया ना? >> त्या कलिंगडाच्या असतात ना . मी आत्ता पर्यंत कलिंगडाच्या समजत होते. लाल भोपळ्याच्या बिया नुसत्या 2 दिवस सुकवून पण छान लागतात.
ब्लॅककॅट, त्या केळ्यांच्या प्रयोगाचा एन्ड प्रॉडक्ट् फोटो टाका नन्तर इथे आणि चव ही सांगा .उत्सुकता आहे.

लाल भोपळ्याच्या बियांच्या गराची पूड दुधात उकळवून त्याचे घट्ट कस्टर्ड करता येते. साखर घालावी किंवा न घालावी.

दर हालोईनला लाल भोपळ्याच्या ढीग भर बिया सोलून खाणे प्रकार करतो. खायला सगळ्यांना आवडतात, सोलायला कुणी येत नाही.
एक वर्षं रोस्ट केल्या तर त्यात काही रेसिपी, तापमान वगैरे न बघता आपलीच अक्कल चालवली, तर बियांचा कोळसा झाला. त्या फेकवत नाहीत, आणि चवही आवडते त्यामुळे बसतो सोलत.

सोलायला कुणी येत नाही.
<<
बिया सोलायचं मशिन करून बघा तयार. व्हिडू दिलाय वरती.

अरे अगदीच सोपं आहे हे करायला. पण तो सूर्यफुलाच्या बिया सोलतोय. त्याला मधुन एक क्रॅक गेलेला असतो आणि किंचिंत दाबल्या, आपटलदाब, हातावर चोळल्या... जे वरचे दोन स्क्रू मुळे झालेलं कॉन्ट्रूप्शन करतय की लगेच साल वेगळं होतं. भोपळ्याच्या सालाला चिकटलेल्ता असतात, सो त्याला आणखी जास्त घर्षण लागेल मला वाटतं. नेव्हरदलेस, स्टेपर मोटर आहे तर करुन बघेन याच धर्तीवर काही तरी. धन्यवाद!

यूट्यूब बघा.
बाजारात कमर्शियली सोललेल्या बिया मिळतात. त्या सोलायला काही युघुर लोकं लावत अस्तील असं वाटत नाही.

IMG_20220211_124623~2.jpg

5 दिवस

एक चपटे स्लाइस कापले होते , ते आता पूर्ण वाळून तयार आहेIMG_20220211_140118~2.jpg

अमृताहूनी गोड नाम तुझे देवा

हे बरे आहे, ताजे तर ताजे पण वाळवलेले सुद्धा अगदी सुंदर कॅरमलाईज्ड दिसतायत. सब्र का फल मीठा होता है.

चपटं दिसतंय एकदम छान, हे कुडूम कुडूम लागतं की फणस पोळीसारखं लागतं. मला प्रश्नच फार पडलेत.

Pages