कोहळ्याचे सांडगे आणि इतर वाळवणीचे पदार्थ

Submitted by BLACKCAT on 31 January, 2022 - 07:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1 कोहळा किस करून

तिखट , मीठ, ओवा

दोन प्रकारे केली एक पोहे वापरून , दुसरी उडीद डाळ वापरून

क्रमवार पाककृती: 

1. पोहे वापरून

कोहळा किसून घ्यावा, त्यात जाड पोहे मिसळून 1 तास भिजत घालावे. एक तासाने ते घट्ट मळून त्यात तिखट , मीठ, ओवा घालावा, मग बोटाने त्याचे सांडगे घालावेत व उन्हात वाळत घालावेत.

IMG_20220130_061912.jpg

2. उडीद सकाळी नऊ वाजता भिजत घालावी , रात्री पाणी काढून मिक्सर मधून फिरवून घ्यावे व झाकून ठेवावे , सकाळी त्यात कोहळा किस , तिखट मीठ ओवा मिसळून मळून सांडगे करून वाळवावेत.

IMG_20220130_080918.jpg

आमचे उडीदवाले बिघडले. पसरले. Sad

IMG_20220131_132151~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
3
अधिक टिपा: 

1. शिजवावे लागत नाहीत, हाताला चिकटत नाहीत, लगेच बनवून होतात.

2. ते वाळले की तळून किंवा भाजी करून खातात.

3. उडदाचे कसे होतील माहीत नाही.

4. तेल अजिबात घालू नये, खवट होतात.

5. अजून कोणत्या भाज्या वापरता येतील ?

माहितीचा स्रोत: 
यू ट्यूब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमी तिखट गुजराती मिरची चिरून (फोडणीच्या पळीत बसतील एवढ्या साईजचे तुकडे) त्याला आंबट दही व मीठ लावून वाळवून ठेवाव्या. >>> आई करायची उपासासाठी, पण मिरच्या जरा जाड पण तिखट असायच्या. कधी कधी ताकात मुरवुन पण वाळवायची. ज्या मिरच्या सांडगी मिरच्या भरायला घ्यायची म्हणजे हळद, मीठ आणि मेथीपुड भरुन त्यातल्याच थोडया उपासाच्या करायची.

हे प्रकार मी नालासोपारा, श्रीरामपुरला करुन बघितलेत. डोंबिवलीत आल्यावर बंद.

ब्लॅककॅट भारी फोटो.

रश्मी छान संकलन.

अरे वा.. वैनींनी कितीतरी प्रकार सांगितलेत. ती भुसा वडी मी स्वतः गेल्या वर्षी केली होती अन अजुनही शिल्लक आहे. थांबा आजच करतो. Bw

कुरडया करताना चीक काढून जो गहू शिल्लक रहातो त्याची ही वडी बनवतात.. ती शिजवल्यावर वडी करण्या आधीच बराचसा हिस्सा मी गट्टम करतो. शिवाय फोडणी देऊन त्यात कांदा, लसूण परतून त्यात चटणी घालून त्यात कुरडयांसाठी चीक काढून उरलेल्या गव्हाला दणदणीत वाफवून घेतलं की एक भन्नाट चवीची भाजी तयार होते.. भाकरी किंवा चपाती सोबत यम्म लागते..!!

कुरडयाचा शिजवलेला चीक खाणे, वाळू घातलेल्या कुरडया खाणे, कुरडयांच्या चिकाचे सांडगे खाणे भयंकर आवडत असल्याने शेजरी-पाजारी अन जवळचे नातेवाईक त्या दिवशी मला आवर्जून आवताण धाडतात.. निदान चीक तरी घरी पाठवतात. Biggrin

कोहळ्याचे सांडगे आणि lokasatta असं सर्च केलं तर लोकप्रभातलं हे एक संकलन आलं.
उन्हाळ्यासाठी थंड पदार्थ आणि वाळवणाचे पदार्थ
त्यातून १) कोहळा मधोमध चिरून आतील बियांचा भाग काढून टाकावा. कोहळ्याचे एक इंचाचे तुकडे करावेत. त्याला थोडं मीठ आणि हिंग चोळावे. प्लास्टिक पेपरवर पसरवून उन्हात वाळवावेत. १ ते २ दिवसांचे ऊन दाखवावे.
२) ताकात मीठ आणि थोडे हिंग घालावे. रात्री कोहळ्याचे तुकडे ताकात बुडवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे तुकडे वाळवायला पसरवा. चांगली ३-४ ऊन्हं दाखवावीत. खडखडीत वाळले की डब्यात भरून ठेवा.
तोंडीलावणी म्हणून हे तुकडे तेलात तळून घ्या.

टीप :
यामध्ये चवीसाठी आवडत असल्यास थोडे हिरवे तिखट, जिरेपूड घालू शकतो.
ताक चांगले आंबट असावे.

ताकात मीठ आणि थोडे हिंग घालावे
<<
हिंग : तळणीच्या तेलात घालून जास्त मजा येईल बहुतेक. कारण वाळवण करताना हिंगाचा अ‍ॅरोमा सगळा उडून जाईल असे वाटते.

अशी गवारपण करता येते , भेंडीपण करता येते.

बहुतांश वेळेला असे पदार्थ तळून खायचे म्हणून दिलेले असते, पण शिजवून भाजीदेखील करता यायला हवी, किंवा तेच सांडगे कोफ्ते म्हणून वापरता यायला हवेत

यांची चव मूळ पदार्थांपेक्षा भिन्न लागते, परवा उडदाचे सांडगे शिजवले , पण ते उडदाची आमटी/ उसळ / सूप यापेक्षाही भिन्न युनिक चवीचे वाटले

भिन्न युनिक चवीचे वाटले
<<
वाळवणाचे पदार्थ जास्त ऊग्र लागतात.
त्यामुळे जरा जास्त मसालेदार केले तर जास्त मजा येते.

सांडगी मिरची पळीच्या साईझची कापून वाळवणे ही एकदम प्रॅक्टिकल टीप आहे. फारच आवडली. मला मिरची न मिळण्याचं कारण फोडणीच्या तेलात मिरची तळली की तिखटपणा उतरतो आणि मुलांना तिखट लागतं, आणि तेवढ्यासाठी परत कुठे तेल! हे असतं. त्या मिरच्या अशा वाकड्या तिकड्या असतात ती कमी तेलात बुड नीट बुडत नाही.
अर्थात ह्या वाळवुन करण्याचा उत्साह नाही, त्यामुळे सध्या काही फायदा नाही पण कधी केलीच तर लक्षात ठेवेन.

तळणीची मिर्ची सुरीने कापून लहान करता येते. मग पळीत चहाचा चमचाभर तेल घालून तळायची.
दातेरी सुरी वापरू नका.

थोड्या साजूक किंवा गाईच्या तुपावर आधी खोबरं काही सेकंद परतते. मग सोलून घेतलेलया केळ्याचे तुकडे परतते (केळे कुस्करून घातलं तरी हरकत नाही) , त्यानंतर साय जरा जास्त आणि थोडं दूध घालते, थोडं आटवते मग त्यात गूळ (पावडर वापरते) जास्त आणि थोडी साखर घालते (नुसत्या साखरेचाही छान होतो, नुसत्या गुळाचाही छान होतो, मी दोन्ही घालते ) , परत थोडं आटवते. एव्हरेस्ट मिल्क मसाला असेल तर सरळ तो घालते प्लस काजू, बदाम, बेदाणे घालते (हे नसलं तरी चालते). सुका मेवा, मिल्क मसाला ऑप्शनल. नुसती वेलची पूड घालूनही छान लागतो.>>>
अंजु रेसीपीसाठी खुप धन्यवाद. करुन बघते .
लोकसत्ता मधल्या रेसीपीज च संकलन पण छान आहे. ब्लॅक कॅट वाळवणाचे पदार्थ (भाज्या/फळे वापरून) अस नाव देता येईल का धाग्याला ?
जास्त लोकांकडून उघडला जाईल धागा आणि उपयोगी पडेल.
इथे बीट, पालक ,टारो वगैरेच्या पावडर मिळतात तयार. कलर फार सुंदर असतो आणि पदार्थाना अगदी सुरेख चव ही येते.

कुरडयाचा शिजवलेला चीक खाणे, वाळू घातलेल्या कुरडया खाणे, कुरडयांच्या चिकाचे सांडगे खाणे भयंकर आवडत >>>+१ मलाही प्रचन्ड आवडतो आइ आम्हा भावडाना आवडतो म्हणून नुसता खायलाही चिक करायची.

हो प्राजक्ता, शेजारी पाजारी अन् नातेवाईकांना माझं हे वेड समजल्यामुळे आईने दोन तीन वेळा नुसतं खाण्यासाठी चिक बनवला पण त्यात ती मज्जा येत नाही जी कुरडयांसाठी बनवलेल्या चिकात येते Biggrin

कारल्याच्या तिखट मीठ लावून तळलेल्या/ वाळवलेल्या पातळ चकत्या तयार पाकिटातून मिळतात. कोइंबतूरचे उत्पादन असते. छान कुरकुरीत लागतात. मात्र पाकीट फोडले की फार दिवस ठेवायचे नाही. मऊ पडतात. पण पाकीट कमी वजनाचेच असते. त्यामुळे फार उरतच नाहीत.

कारल्याच्या तिखट मीठ लावून तळलेल्या/ वाळवलेल्या पातळ चकत्या तयार पाकिटातून मिळतात. >>>> 'Hot Chips' च्या टेस्टी असतात आणि फ्रेश.

कुरडईचा चीक :

गहू भिजत घालून त्याचा साका काढला, की शिजवायच्या ऐवजी वाळवून ठेवायचा.
५-६ महिने आरामात टिकतो. (नंतर खवट होतो थोडा. फ्रीझमधे जास्त दिवस टिकतो.)
चीक खावासा वाटला की ती सुकवलेली पावडर पाण्यात भिजवून शिजवली की इन्स्टन्ट चीक तयार. २ बश्या खाण्यासाठी मोठा कुटाणा करायची जिवावर येते, त्यामुळे हा इलाज वापरता येतो.

येस्स ! आम्ही हेच करतो. जेव्हा पाहीजे तेव्हा काढुन शिजवता येतो.

https://www.maayboli.com/node/49082 >>>>> हे घ्या. माझ्या चुलत साबा करायच्या. चांगला होतो म्हणे. मी केलेला नाही, पण आता करुन बघावाच.

हा धागा इतका चालेल माहिती नव्हतं.
दक्षिण भारतात आणि मप्र,उप्रमध्ये कोहाळा फार वापरतात.

हंपीसाठी गेलेलो.
होस्पेटात बस डेपोजवळ नाश्ता कॉर्नर हाटेलात ( उभे राहून खायचे snacks corner)पुरी भाजी कोहाळ्याची पातळ भाजी खाल्ली अहहाहा. तिकडे कोहळातुकडे शिजवून , नारळाचे दूध , आणि वर उडीद लाल मिरचा फोडणी. मस्त लागते.

खरयं, एखाद्या कोरड्या किंवा रस्सा भाजीची भट्टी जर नीट जमली ना तर वर लाल सुक्या मिर्च्यांची फोडणी झकास लागते. बटाट्याची सुकी भाजी, सांबार, रसम, ठरावीक पातळ पालेभाज्या ( एकदा माझा हा प्रयोग फसला, पालकाच्या पातळ भाजीवर मी ही फोडणी घातली होती. फक्त उडीद डाळ नाही, पण भाजी काहीतरीच लागली, मग कधी हा उद्योग नाही केला ) सुकी तुरीची दाल / वरण वगैरे.

वाळवणाच्या पदार्थांच्या बऱ्याच नवीन आयडिया आल्यात . त्यातली भुस वडीची कुकरमध्ये शिजवण्याची करून बघेन . माझी बहिण गव्हाचा ओला चीक विकते . पाव किलो ची पाकिटे असतात पाण्यात घालून शिजवायचा नुसता . त्यामुळे गव्हाचा भुसा आयता मिळतो . भुस वडी चे update देईन केले की.

पण त्यात ती मज्जा येत नाही जी कुरडयांसाठी बनवलेल्या चिकात येते>>> हे मात्र खरय, पण चिकाची टेस्ट लहानपणापासुन डेव्हलप व्हावी लागते, माझ्या साबा फार वाळवण करत नव्हत्या त्यामुळे नवर्‍याला त्याची अजिबात आवड नाही.

IMG_20220219_122531~2.jpgIMG_20220219_130105~2.jpg

दही , मीठ , मोहरी ठेचून , गोडा मसाला, तिखट सगळे कालवून भरले

मुख्य मसाल्यामधील मेथी पावडर आणि जिरे पावडरच मिळाली नाही

जे होईल ते तसेही तळायचेच आहे , जे होईल ते होईल.

Today's colours

IMG_20220219_115942.jpg<

छान ब्लॅककट, केवढा उरक आणि उत्साह आहे तुमचा. फोटो पाहिले की करून बघायचा उत्साह नुसता ओसंडून वाहतो माझा आणि माबो बंद केली की झपाट्यात मावळतो पण .

ओसंडून वाहतो माझा आणि माबो बंद केली की झपाट्यात मावळतो पण ......... मीही तुझ्या बोटीत आहे. तसंही माझ्याकडे एवढे ऊनही येत नाही.

साधा मोबाईल, रियल मी , 10000 चा की त्याच्या आसपास

गोडा मसाला नसेल तर चालेल का? मी पण करून बघेन.ऊन बारानंतर येतं गैलरीत पाच सहापर्यंत असतं.. तेवढ्यात वाळतील का दह्याच्या मिरच्या?

पूर्ण वाळायला आठवडा लागतो ,

गोडा मसाला मी वापरला कारण माझ्याकडे मेथी पूड नव्हती

मेथी पूड , जिरे पूड , धने पूड हेच बेसिक आहे, बाकीचे तुमच्या मर्जीने काहीही घाला.

मी मसालाही फार कमी भरलाय , अगदी दाबून आतून ओसंडून बाहेर येईल इतका भरतात , मिरच्या वाळल्या की ताटातपण मसाल्याचे कण पसरलेले असतात

मी थोडी चव पाहिली , जमली आहे , पण गोडा व थोडा गरम मसाला चिमूटभर घातल्याने थोडी उग्र बनली आहे.

Pages