कोहळ्याचे सांडगे आणि इतर वाळवणीचे पदार्थ

Submitted by BLACKCAT on 31 January, 2022 - 07:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1 कोहळा किस करून

तिखट , मीठ, ओवा

दोन प्रकारे केली एक पोहे वापरून , दुसरी उडीद डाळ वापरून

क्रमवार पाककृती: 

1. पोहे वापरून

कोहळा किसून घ्यावा, त्यात जाड पोहे मिसळून 1 तास भिजत घालावे. एक तासाने ते घट्ट मळून त्यात तिखट , मीठ, ओवा घालावा, मग बोटाने त्याचे सांडगे घालावेत व उन्हात वाळत घालावेत.

IMG_20220130_061912.jpg

2. उडीद सकाळी नऊ वाजता भिजत घालावी , रात्री पाणी काढून मिक्सर मधून फिरवून घ्यावे व झाकून ठेवावे , सकाळी त्यात कोहळा किस , तिखट मीठ ओवा मिसळून मळून सांडगे करून वाळवावेत.

IMG_20220130_080918.jpg

आमचे उडीदवाले बिघडले. पसरले. Sad

IMG_20220131_132151~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
3
अधिक टिपा: 

1. शिजवावे लागत नाहीत, हाताला चिकटत नाहीत, लगेच बनवून होतात.

2. ते वाळले की तळून किंवा भाजी करून खातात.

3. उडदाचे कसे होतील माहीत नाही.

4. तेल अजिबात घालू नये, खवट होतात.

5. अजून कोणत्या भाज्या वापरता येतील ?

माहितीचा स्रोत: 
यू ट्यूब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिरची ला लाँजिट्युडिनल स्लिट दिल्या तश्या हॉरिझाँटल कट करुन मग भरल्या तर एकावेळी नीट कमीत कमी तेलात तळता येईल असे होते. अख्खी मिरची एकावेळी खाववतही नाही.

xmirchi.jpg
या 'ताकातल्या मिरच्या'. नो स्टफिंग. फक्त दही, मीठ. मिरची.

मी पावडरी थोड्या दह्यात कालवल्या होत्या , पाणी घेतले नव्हते.

--------------

हरबरा डाळ भिजवली , मिक्सर जवळ नसल्याने ग्लासच्या बुडाने चेचून बारीक केली , त्यात गाजर , काकडी किस घातला , मीठ , मिरच्या वाटून , जिरे वाटून घातले , तरी तिखट कमी वाटले म्हणून लाल तिखट घातले

कालवून गोळे घातले
पण बैंडिंग वाटेना , म्हणून एक रताळे किसून घातले.

मग थोडे बैंडिंग आले , गोळे घातले

पण हे मिक्सर मधून केले तरच चांगले होईल

मूळ पाक कृतीत पालकदेखील घातला आहे. आणि सगळे मिक्सरमधून काढले आहे. त्यांचे वडे सांडगे अगदी बारीक झाले आहेत

चव , आकार फिकीर करायचे कारण नाही , नंतर कांदा टोमॅटो ग्रेव्हीत शिजवूनच खायचे आहेत.
IMG_20220219_232440.jpg

अजून अर्धी डाळ उरली आहे, मिक्सरशिवाय आता इथे करणार नाही.

सरळ गूळ घालून पुरण घालीन आणि तसेच चमच्याने नाश्त्याला खाईन
देवेंद्राय नमः

Proud

माझी मावशी करायची भरल्या मिरच्या दोन पद्धतिने
१) एक वाटी धने,त्याच्या निम्मे जिरे,जिर्‍याच्या निम्मे मेथ्या अस सगळ भाजुन घ्यायच त्यात लिबाचा रस
चविप्रमाणे मिठ घालुन कालवायच आणी मिरच्यात भरायच,कडकडित उन्हात वाळवायच्या.
२)साबुदाणा साखिसाठि करतो तसा भिजवुन मोकळा करायचा,किचित मिक्सर मधे भरडुन घ्यायचा त्यात ताजी जिरपुड्, मिठ घालुन आन्बट दह्यात किवा ताकात कालवुन मिरच्यात भरायच,कडकडित उन्हात वाळवायच्या.

दोन्ही डॉक चा उत्साह भारीये आणी स्वत: करुन बघण्याची आवड नक्कीच कॉम्प्लेक्स देते. Proud मिर्च्या बरोबर भरल्यात.

देवकी, दही वापरल्याने ह्या कडकडीत वाळवाव्या लागतात. नाहीतर थोडा वास येतो. डाँ नी ज्या ताकातल्या मिर्च्या वर दाखवल्यात, त्या सुद्धा ताकात मीठ व चिमुटभर हिंग घालुन वाळवायच्या. कोशिंबीर, दही भात, दही बुत्ती वगैरे साठी झकास. मी कधी कधी मिर्च्या आधी तळुन त्या डावात फोडणी करत होते आणी वरणाला घालत होते. फोडणी थोडी करपलेली असायची तरी छान लागायची.

IMG_20220220_220229~2.jpg

2 दिवसात इतके वाळले

काश मैं आयटी मे होता और फाईव्ह डेज विक होता !

मोदीजी फोर डेज विक करणार होते ना ?

अशा मिरच्या तळून मग दह्यात कुचकरून मस्त लागतात

तळणीच्या मिरच्या :

तळणीच्या मिरच्यांचा भयंकर अनुभव असल्याने आमच्या घरात त्याचे नावही काढू शकत नाही. साधारण मी कॉलेजला असतानाची गोष्ट. अशाच कोणीतरी शेजारी-पाजारणीने तिने बनवलेल्या तळणीच्या थोड्या मिरच्या टेस्टला दिलेल्या. त्या तळून खाल्ल्यावर मी वेडापिसा होऊन तळलेल्या मिरच्यांच्या प्रेमातच पडलो. आईकडे आर्जवे कर करून अर्धा किलो मिरच्यांना हे असे मसाला लाऊन वाळवण घातले अन कडक उन्हात वाळावून त्याकाळी घराघरांत असणार्‍या बोर्नव्हिटाच्या मोठ्ठ्या काचेच्या बरणीत व्यवस्थित रचून ठेवले. रोज रात्री जेवताना पुन्हा एकदा आईकडे मिरच्या तळून द्यायची आर्जवे करायची अन त्या मिरच्यांचा अस्वाद घेत जेवण करायचं असं सुरू झालं. आई रोज सकाळी स्वयपाक बनवून जॉबला जायची मग बहीण शाळॅत जायची अन वडील देखील ऑफिसला जायचे. माझं कॉलेज दुपारी असायचं. सगळे जण घराबाहेर पडले की मी किचन कडे वळायचो. फोडाणीच्या पळीत दोन पळ्या तेल घेऊन गॅसवर ठेवायचो अन ४-५ मिरच्या तळून काढायचो. कुणाला शंका येऊन नये म्हणुन ते तळणीचं तेल पुन्हा तेलाच्या किटलीत ओतून पळी घासून ठेवायचो अन जेवणासोबत त्या ४-५ मिरच्या खाऊन कॉलेजला जायचो.

असं करता करता बोर्नव्हीटाची बरणी रिकामी होऊ लागली. आईने त्याबाबत शंका पण बोलून दाखवली परंतू पुरावा काहीच नव्हता. असं करता करता महिनाभरात मिरच्या संपल्या. अन मला पोटात भयंकर त्रास होऊ लागला. नंतर औषोधोपचार करून कित्येक दिवसांनी माझा त्रास संपला.... अशा तर्‍हेने आमच्या घरात पहिल्यांदाच बनवलेल्या तळणीच्या मिरच्या संपल्या ते पुन्हा न बनण्यासाठीच..!! Uhoh

बापरे !! डिजे, भयानकच अनूभव आहे तुमचा. माझा पण सेम, पण हिरव्या मिर्च्यांचा बाबतीत. पोटात अल्सर होता होता राहीलाय. म्हणूनच या मिर्च्या दही किंवा ताक भाताबरोबर खातात. आमचे पूर्वीचे खानदेशी शेजारी जाम हिरव्या मिर्च्या खायचे. पण खानदेशच्या वणव्यात ते शरीराला झेपायचे. आता पुण्या सारख्या सम हवेच्या ठिकाणी येऊन त्यांना अ‍ॅसिडीटीचा खूप त्रास झाला होता. डाँ. नी मिर्च्या आणी मसालेदार पदार्थ कमी करा म्हणून सांगीतले शेवटी.

डीजे, रश्मी बापरे अनुभव. अति नाही खायच्या.

तळणीच्या मिरच्या दही बुत्ती, फणसाची भाजी, केळफुल भाजी यात वरुन फोडणी देताना घालायच्या, अफलातून लागतात. मेथीपुड आणि मीठ भरुन करतात आमच्याकडे. फणस आणि केळफुल भाजीला आम्ही दोनदा फोडणी करतो त्यातली वरून फोडणी सांडगी मिरच्या किंवा लाल सुक्या मिरच्यांची करतो. मला सांडगी मिरच्यांची आवडते.

वर प्राजक्ताने उल्लेख केलाय साबुदाणे पीठ भरुन उपासाच्या मिरच्या, तश्या आईही करायची पण मला फार आवडत नाहीत त्या, मला उपासाच्या दहया ताकातल्या किंवा एरवीच्या मेथीपूड मीठ घातलेल्या आवडतात.

पण आता करून बघेन. ब्लॅककॅट यांनी त्यावेळी शेजार्‍यांनी दिलेल्या मिरच्यांची आठवण करून दिली आहे Proud
थोडी काळजी घेऊन सपक मिरच्यांना वाळवून तळणीच्या मिरच्या नक्की करेन... वैनींना पण असा त्रास झाला हे वाचून वाईट वाटलं. पण जिभे पुढे कोणाचे काही चालत नाही हे या निमित्ताने अधोरेखित झाले Biggrin

वैनी, तुम्ही मूळच्या सातारच्या ना हो..?

डीजे,
हिरवी भावनगरी/ब्याडगी/काश्मिरी मिरची मिळते.
या सगळ्या कमी तिखट असतात.

मिरचीवडे बनवायला वापरतात त्या पोपटी रंगाच्या मोठ्ठ्या मिरच्याही कमी तिखट असतात.

या सगळ्या वाळवणीच्या अन तळणीच्या मिरच्या असतात.

दुसरी टीप म्हणजे आतील बी पेक्षा बी ज्यावर उगवते ते आतले पांढरे दांडे ज्याला 'पिथ' व रिब्ज म्हणतात, ते सर्वाधिक तिखट असते. हे आतील सगळे काढून टाकून मग स्टफ केलेली मिरची तुलनेने कमी तिखट लागते.

दुसरी एक आयडिया डोक्यात येतेय ती म्हणजे पिझ्झ्यावरच्या हल्यापिनो मिर्च्या ब्राईन केलेल्या असतात. त्यामुळे कच्च्या हल्यापिनोपेक्षा कमी तिखट लागतात. तशी ब्राईन करून मिरची वाळवली तर कमी तिखट होईल असे वाटते.

हा सगळा प्रपंच लिहिण्याचे कारण हे, की आमच्या खानदेशात ज्या गुजराती लाईट रंगाच्या जाड मिरच्या मिळतात त्यात आजकाल १० मधे १-२ मिरच्या इतक्या जहाल निघतात की सगळी मजा जाते. अगदी एकेक मिरचीची चव घेत घेत मग त्या ताकातल्या मिरच्या बनवाव्या लागतात.

पुरुष आयडी , तुमच्या सुचने बद्दल खूप खूप धन्यवाद..! ज्यांना तिखटाने त्रास होतो त्यांच्यासाठी हे उपाय नक्कीच उपयोगी पडतील.

छान अनुभव

Submitted by BLACKCAT on 21 February, 2022 - 07:59
>>> छान काय ब्लॅककट Uhoh
वाईट किंवा डेंजर अनुभव डीजे, रश्मी.

वैनी, तुम्ही मूळच्या सातारच्या ना हो..?>>>>> नाही, नासिक. पण लहानपणी. मोठे झाल्यावर पुणे.

दिनेशजींनी मागे लिहीले होते की ढोकळ्या बरोबर मिळणार्‍या फिक्या हिरव्या मिर्च्या आधी धुऊन उकडुन घेतात मग तळतात. त्यामुळे त्यांच्या तिखटपणा बराच कमी होतो. आज श्री गजानन महाराज ( शेगाव ) यांचा प्रकटदिन, त्या निमीत्त नैवैद्य म्हणजे झुणका भाकरी कांदा व तळलेल्या हिरव्या मिर्च्या. पोळ्या झाल्यावर मी तव्यावर तेल टाकुन चीर दिलेल्या हिरव्या मिर्च्या मीठ टाकुन परतुन घेते. मस्त लागतात. झुणका ( सुके पिठले ) किंवा साध्या पिठल्या बरोबर हे मस्ट.

आम्ही आज अशाच म्हणुन पिठल्याच्या वड्या केल्या होत्या.. छानच झालेल्या. (धागा पिठल्याकडे वळण्या आधी सावध होऊन थांबतो..!))

वैनी, पुण्यात हे असं सांडगे घालणं म्हणजे भयंकर मुश्किल काम.. एवढं प्रदुषण अन धूळ असते अन त्यात भरीस भर म्हणजे कबुतर्डे. त्यांची घाण अन उडणारी पिसे त्या वाळवणाला चिकटलेली बघितली तर एखाद्याची कायमची वासना उडू शकते. म्हणुन मी हे वाळवणाचे सोपस्कर गावच्या घरीच करवून घेतो.. तिथे आज्ज्या, काकवा, बहिणी, वैन्या यांचा हातभार आई अन बायकोला मिळातो अन त्यामुळे एक वेगळीच मज्जा त्या वाळवणांत उतरते.

ते हरबरा डाळीचे सांडगे किंचित पाणी घालून वाफवले तर ते सगळे मोडून चिखल झाले.
मग लगेच हाताने मोठे गोळे करून भेंडीच्या भाजीत ढकलले.

मिक्सरमधून डाळ बारीक करून मग वड्या केल्या तर असे होत नाही. ते आकार मेंटेन ठेवतात , वाळल्यावर खुटकुटीत होतात व तळले , शिजवले तरी पसरत नाहीत

IMG_20220224_083659.jpgIMG_20220224_085617~2.jpg

मोकळं तिखट टाईप लागले.

ते भेंडी , भाजी वगैरे फरमेन्ट करतात ते कुणी केले आहे का ?

Screenshot_20220225-164803~2.png

शेपू वाळवले

यात असाच कांदा लसूण व लिंबाची साल किसून वाळवून मिसळली तर चांगले शिजलींग होते म्हणे

दही , कोशिंबीर , सॅलड , सँडविच यात घालतात म्हणे.

भेंडी , भाजी फरमेन्ट करताना त्यातही घालतात.

आपण नुसते भाजीतही घालू शकतो.
-----

भेंडी फरमेन्ट करायला ठेवली आहे. भेंडीचे टोक थोडेसे कापले , बुडाकडेही देठ फक्त थोडा कापला. पण बुड अखंड ठेवले. सोबत कांद्याच्या दोन स्लाइस , 8,10 लसूण दोन भाग करून घेतले. शेपूची थोडी पाने घेतली. दोन मिरच्या त्यांना उभे चिरून घेतले.

IMG_20220224_221318~2.jpg

मसाला आपला गावठीच घेतला , मोहरी , जिरे , काळीमिरी , मेथी थोडी ठेचून घेतली.IMG_20220224_221651.jpg

एका बरणीत भेंडी भरली , बाकी जिन्नस टाकले , मसाला टाकला.

मग त्यात बसेल इतके पाच कप अंदाजे पाणी उकळले , त्यात दहा चमचे मीठ टाकले होते, ते मिठाचे गोल मोठे प्लास्टिक चमचे असतात तसा घेऊन , 2 ते 5 % संहतीचे व्हावे ( गुगल) . मी गणित नाही केले.

हे ओतल्यावर त्यावर घट्ट दाबून बसवायला नेमकी एक वाटी बसली ती बसवली . यात प्रेशर महत्वाचे असते . प्रेशर असेल तर बाहेरचा ऑक्सिजन आत जात नाही आणि आतला कारबन डाय ओकसाईड बाहेर यायला मदत होते .

दुसर्या दिवशी वाटी काढली आणि सरळ एक प्लॅस्टिक पिशवी दाबून एअर काढला , त्यावर अजून थोडे तेच पाणी ओतले. अधून मधून काही लोक एअर काढतात , काही तसेच ठेवतात.
हे जारकर्म Proud करायला फरमेन्टेशन जार म्हणून स्पेशल जारदेखील मिळतात.

सकाळी उघडल्यावर मसाल्याचा मस्त घमघमाट उठला आहे.
मला वाटते कांजीवडे म्हणून एक 3 दिवस पाणी आंबवून त्यात मग उडीद वडे सोडतात , ते साधारणपणे हेच पाणी असावे असे वाटते, पण त्यात मीठ कमी असते.

IMG_20220224_222935.jpg

हे घट्ट टोपण लावून अंधारात , थंड जागेत ठेवतात

पदार्थ पाण्यात पूर्णपणे बुडवतात , त्यासाठी फरमेन्टेशन वेट म्हणून काचेचे , पोरसेलिनचे दगड मिळतात , त्याची किंमत तीन चार हजार रु असते !!! Proud पदार्थ पाण्यावर तरंगत राहिला तर इतर जंतू वाढू शकतात , म्हणून ही खबरदारी.

हळूहळू पदार्थ पांढरट होतो.

साधारण 7 , 10 दिवसात तयार होतो, अगदी कुरकुरीत मसालेदार लागतो म्हणे. युट्युबवर लोकांनी खाताना आवाज येतो , त्याचेही व्हिडीओ टाकलेत.

फरमेन्टेशनमुळे त्यात प्रोबायोटिक , व्हिटॅमिन्स व डायजेस्टिव्ह एंझाईम्स तयार होतात.

ओलिव्हसाठी मीठ सोल्युशन 10 % करतात , इतर गोष्टींना थोडे कमी मीठ पुरते.

मिठाच्या द्रावणाऐवजी व्हिनेगरचे गरम मिश्रणही वापरतात. पण त्याबद्दल मला अंदाज नाही. मिश्रणात एखादी चिमूटभर साखर घालायला हवी होती असे वाटते. म्हणजे फरमेन्टेशनच्या जंतूना एक खाद्य लाभले असते.

बघू.

वा! ब्लॅककट, जोरात चालू आहेत वाळवणं.
हा शेपू बघून मला मागच्या वर्षी मी कसुरी मेथी होईल म्हणून मेथी खुडून वाळवलेली. आमटीत , पनीर टिक्का आणि तत्सम भाज्यात ऑरगॅनिक कसुरी मेथी घालायची या कल्पनेत होते पण कुठलं काय , वाळकं गवत झालं ते. थोडे दिवस मेथीसदृश वास तरी येत होता नन्तर तो पण गेला.

Pages