कोहळ्याचे सांडगे आणि इतर वाळवणीचे पदार्थ

Submitted by BLACKCAT on 31 January, 2022 - 07:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1 कोहळा किस करून

तिखट , मीठ, ओवा

दोन प्रकारे केली एक पोहे वापरून , दुसरी उडीद डाळ वापरून

क्रमवार पाककृती: 

1. पोहे वापरून

कोहळा किसून घ्यावा, त्यात जाड पोहे मिसळून 1 तास भिजत घालावे. एक तासाने ते घट्ट मळून त्यात तिखट , मीठ, ओवा घालावा, मग बोटाने त्याचे सांडगे घालावेत व उन्हात वाळत घालावेत.

IMG_20220130_061912.jpg

2. उडीद सकाळी नऊ वाजता भिजत घालावी , रात्री पाणी काढून मिक्सर मधून फिरवून घ्यावे व झाकून ठेवावे , सकाळी त्यात कोहळा किस , तिखट मीठ ओवा मिसळून मळून सांडगे करून वाळवावेत.

IMG_20220130_080918.jpg

आमचे उडीदवाले बिघडले. पसरले. Sad

IMG_20220131_132151~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
3
अधिक टिपा: 

1. शिजवावे लागत नाहीत, हाताला चिकटत नाहीत, लगेच बनवून होतात.

2. ते वाळले की तळून किंवा भाजी करून खातात.

3. उडदाचे कसे होतील माहीत नाही.

4. तेल अजिबात घालू नये, खवट होतात.

5. अजून कोणत्या भाज्या वापरता येतील ?

माहितीचा स्रोत: 
यू ट्यूब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो पाक म्हणजे हलवाच असावा, पण आई जास्त आटवून वड्याच करायची. मी हलवा करते, पण तोंडात नाव कोहळे पाक येतं जास्त.

पेठा वेगळाच प्रकार आहेना, आपण करतो तसा हलवा नाही ना. पेठयासाठी पाक करत असतील (करतात ना) तर असू शकेल तसं नाव.

ब्लॅककॅट, फळं आणि भाज्यांच्या वाळवून चिप्स वगैरे करून ठेवतात तस म्हणताय का? अ‍ॅपल चिप्स, पोटॅटो च्प्स मिळतात तसं ?

फळांमध्ये म्हटले तर सुकवलेल्या चिकू फोडी खाल्ल्या आहेत. कच्च्या आंब्याच्या फोडी, कच्चे गरे हे सुकवून ठेवतातच. उभा पातळ चिरलेला कांदाही सुकवतात. बोरे सुकवतात, बोरकूट करतात. ठाणे जिल्ह्यात केळीसुद्धा विशिष्ट पद्धतीने सुकवून सुकेळी करतात. द्राक्षे, मनुका वगैरे तर सगळ्यांनाच माहीत असतात.

नवरा डोंबिवलीतूनच कुठल्या तरी दुकानातून वाळवलेलया फळांचे तुकडे घेऊन येतो, थोडे महाग असतात पण त्याला आवडतात, मी कमी खाते. हल्ली बरेच दिवसांत आणले नाहीयेत, आठवण करायला हवी.

भयंकर महाग असतात ते सुकवलेल्या फळांचे तुकडे. Uhoh

इथे एवढं कोहळा वडी अन् पेठ्याबद्दल भरभरून लिहितात मात्र त्याबद्दल दोन स्वतंत्र धागे काढून रेशिप्या द्याव्या असं कुणालाच वाटत नाही Uhoh

ही घ्या रेसिपी! साबा करायच्या वड्या चूलीवर. कोहळ्यात पाणी खूप आसतं दिवसभर चुलाखंडावर आटवायला ठेवतं पितळेच्या परातीत. जेवढा किस तेवढीच साखर घालून ग्यास वर आळत ठेवायचं घट्ट होत आलं की थोडे दूध घालायचं परत ते पातळ होईल Happy मिश्रण घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत थापायचं, वड्या पाडायच्या. पेठा व वड्या दोन्ही अति गोड मला आवडत नाही करत नाही चूल नाही, वेळ नाही , पेशंस नाही ( नाचू मी कशी ... चालीवर वाचावे) दोन्ही पेठे साधा व केशर पेठा चांगला असतो हल्दीरामचा.

मंजूताई Lol रेस्पि छान सगळ्याच. सांडगे प्रकार भारी आवडतो. लहानपणी कावळ्याच्या गोष्टीत ऐकल्या पासून सांडगे खाऊन बघायची इच्छा झालेली. ( गोष्टीतला कावळा मात्र दुर्दैवी, बिचारा सांडगे न खाता मरून गेला. लहान पण च्या गोष्टी कधी कधी एवढ्या क्रूर का असायच्या काय माहित? असो इथे अवांतर नको)

मंजुताई धन्स for रेसिपी..! Bw

@धनुडी, कावळा अन् सांडग्याची गोष्ट इथेच सांगाल का प्लीज.. नाही म्हणजे "कोहळ्याचा सांडगा" अन् "कावळा अन् सांडगा" या मध्ये बरीच अक्षरं सारखे आहेत म्हणून ती गोष्ट इथेच सांगितली तर ती रीलेट पण होईल अन् सांडग्याच्या धाग्यावर कायम स्वरुपी देखील राहील Bw

@ब्लॅककॅट, सुकेळी म्हणजे काय? ती कशी करतात? चव कशी असते? तुम्ही त्याबद्दल एक पाककृती मध्ये धागा काढावा अशी विनम्र विनंती Bw

सुकेळी म्हणजे केळी सुकवणे , त्याचे दोन किंवा चार तुकडे किंवा चकत्या करून सुकवण्याचे युट्युबवर भरपूर प्रकार आहेत.

गोड लागतात

तुकडे कसे आणि किती करावेत , हा अभ्यासाचा विषय होईल.

नुसते उन्हात घालता येतात, मायक्रोवेव्ह वगैरेदेखील वापरतात म्हणे

सुकेळी हा खास ठाणे पालघर जिल्ह्यातला प्रकार आहे. तिथे होणारी केळ्यांची एक विशिष्ट जातच ह्या प्रकारासाठी वापरली जात असे. खूप लांबलचक प्रक्रिया आहे. केळी मधात बुडवून ठेवून सुकवणे, मग शुद्ध तुपात बुडवून सुकवणे वगैरे पायऱ्या असतात. सुनील डिमेलो ह्यांच्या व्हिडिओ ब्लॉग (वी लॉग)वर एक पूर्ण एपिसोड सुकेळ्यावर होता.
आता ही केळी दुर्मीळ आहेत.

माझी आजी,कोकणात मिळणाऱ्या रसाबली किंवा सोनियाळी केळ्यांची सुकेळी करायची. केळी कापून वाळत घालायची.

हिरा छान माहीती, वसई पालघर भागात फेमस आहेत सुकेळी.

मंजुताई मस्त रेसिपी सांगितलीस. आम्ही चुलीवर नाही करत इथे आणि सायीसह दुध घालतो. मी वड्या न करता हलवाच करते, अर्थात दुधी आणि गाजर हलवा जास्त केला जातो, हा क्वचित. मी सरळ भाजीच्या कुकरात शिजवते आणि मग आटवत बसते, बाकी वेलची पुड, सुका मेवा असेल तर किंवा एव्हरेस्ट मिल्क मसाला घालते.

काल कबुल केल्याप्रमाणे गोष्ट इथे कॉपी पेस्ट केली,....
पण मी वरती म्हंटलय आधीच कि गोष्ट जरा क्रूर आहे., ब्लॅककॅट यांना चालणार नसेल तर काढून टाकीन

एक असतो कावळा, तो असाच उडत उडत जात असतो तर एका अंगणात त्याला दिसतात सांडगे वाळत घातलेले. त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो खाली येऊन सांडगा खाणार तेवढ्यात तिथे बसलेली मीना त्याला होते, " ए कावळ्या, काय करतोयस? "
कावळा " मी खाणार सांडगे कुडूम कुडूम"
मीना : अरे वा रे वा म्हणे खाणार सांडगे कुडूम कुडूम, चोच बघ किती घाण! अंघोळ तरी केलीस का? जा आधी अंघोळ करून ये, जा नदीवर.
मग कावळा हिरमुसला होऊन नदीवर गेला. अंघोळ करायला पाण्यात जाणार तेवढ्यात नदीने हटकलं आणि विचारलं : ए कावळ्या, काय करतोयस?
कावळा: मी अंघोळ करून छान छान होईन, मीना कडे जाईन आणि खाईन सांडगे कुडूम कुडूम!
नदी : वा रे वा, पाणी घेण्यासाठी मडकं तरी आहे का तुझ्या कडे? (अख्ख्या नदीत डुबकी का मारू देत नाही काय माहिती? पण तेव्हा आम्ही असे प्रश्न विचारायचो नाही)
मग कावळा जातो कुंभाराकडे,
कावळा: कुंभारा कुंभारा , मला एक मडकं दे ना.
कुंभार: का रे बाबा?
कावळा : मडकं घेऊन नदीवर जाईन, पाणी घेऊन अंघोळ करीन. अंघोळ करून स्वच्छ स्वच्छ होईन आणि मग खाईन साडगे कुडूम कुडूम ( मीना कडे जाऊन)
कुंभार म्हणतो पण माझ्या कडे माती नाहीये, तू लोहारा कडे जाऊन कोयता आणि त्याने मी माती उकरीन मग मडकं करून तुला देईन.
कावळा बिचारा लोहारा कडे जातो. लोहारा ला म्हणतो कि मला विळा ( कोयता) हवाय .
लोहार म्हणतो देतो मी विळा पण तू नेणार कसा?
( हा पार्ट गोष्टीचा मला कधीच आवडला नाही Sad ) लोहार म्हणतो विळा मानेवर ठेवतो. कावळा विळा मानेवर ठेऊन उडायला लागतो पण मान तुटून मरूनच जातो बिच्चारा.
म्हणून मी म्हणलं कि लहान पण च्या काही काही गोष्टी अशा क्रूर का असतात? कावळ्याचे सांडगे खायचं स्वप्न, स्वप्नच राहीलं.

वसई पालघर भागात नाव काहीतरी वेगळे आहे.>> राजेळी केळी म्हणतात त्या केळ्यांना. !!
हरतालिकेच्या आणि गणपतीच्या पूजेसाठी खास वापरली जातात ही केळी.. किंमत पण जास्त असते त्या केळ्यांची..!!

धनुडी कथा छान लिहिलंय्.. बिचारा कावळा...!! हि कथा वाचून मला बडबड्या कासवाच्या कथेची आठवण झाली.

सुकेळी आमच्याकडे सोनकेळ्यांची (वेलची केळी पण म्हणतात ) केलेली बघितली आहेत. लांब काप करून वाळवलेले फक्त. मस्त लागतात पण सुकेळी.

रुपाली वि. पा. , हो राजेळीच म्हणतात त्या केळ्यांना.
आणि सुकेळी सहज बनत नाहीत. त्यांची मोठीच उस्तवार असते.

हल्दिराम orange बर्फी मध्ये कोहळा असतो. मला Ingredients list वाचल्यावर फार आश्चर्य वाटलेले.
मीं मावा वापरुन ही बर्फी करत असतील अस समजत होते. 

केळी घातली सुकत

पूर्ण , अर्धे , गोल काप , तिरके काप सर्व प्रयोग आहेत

आठवडाभर उन्हात राहुदेतIMG_20220206_225057.jpg

अरेच्चा.. एवढंच करायचं होय सुकेळी बनवताना..?? अजुन काही सोपस्कर नसतात करायचे..?? आणि हे पिकलेलं केळ आहे की कच्चं..?? वाळाल्यावर तसंच कुडुम कुडुम करत खायचं की त्याला शिजवणे-तळणे-भाजणे असं काही करावं लागतं..?? विकत मिळणार्‍या केळ्यांचं बनेल का हे असं सुकेळ..?? सातारा-सांगली-कोल्हापूर भागात देशी केळी मिळतात... त्या केळ्याचं होतं का असं..??

Pages