कोहळ्याचे सांडगे आणि इतर वाळवणीचे पदार्थ

Submitted by BLACKCAT on 31 January, 2022 - 07:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1 कोहळा किस करून

तिखट , मीठ, ओवा

दोन प्रकारे केली एक पोहे वापरून , दुसरी उडीद डाळ वापरून

क्रमवार पाककृती: 

1. पोहे वापरून

कोहळा किसून घ्यावा, त्यात जाड पोहे मिसळून 1 तास भिजत घालावे. एक तासाने ते घट्ट मळून त्यात तिखट , मीठ, ओवा घालावा, मग बोटाने त्याचे सांडगे घालावेत व उन्हात वाळत घालावेत.

IMG_20220130_061912.jpg

2. उडीद सकाळी नऊ वाजता भिजत घालावी , रात्री पाणी काढून मिक्सर मधून फिरवून घ्यावे व झाकून ठेवावे , सकाळी त्यात कोहळा किस , तिखट मीठ ओवा मिसळून मळून सांडगे करून वाळवावेत.

IMG_20220130_080918.jpg

आमचे उडीदवाले बिघडले. पसरले. Sad

IMG_20220131_132151~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
3
अधिक टिपा: 

1. शिजवावे लागत नाहीत, हाताला चिकटत नाहीत, लगेच बनवून होतात.

2. ते वाळले की तळून किंवा भाजी करून खातात.

3. उडदाचे कसे होतील माहीत नाही.

4. तेल अजिबात घालू नये, खवट होतात.

5. अजून कोणत्या भाज्या वापरता येतील ?

माहितीचा स्रोत: 
यू ट्यूब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा शेपू बघून मला मागच्या वर्षी मी कसुरी मेथी होईल म्हणून मेथी खुडून वाळवलेली. आमटीत , पनीर टिक्का आणि तत्सम भाज्यात ऑरगॅनिक कसुरी मेथी घालायची या कल्पनेत होते पण कुठलं काय , वाळकं गवत झालं ते. थोडे दिवस मेथीसदृश वास तरी येत होता नन्तर तो पण गेला.>>>>> वर्णिता, बाहेर जी कसूरी मेथी मिळते ती वाळवण्याचे काहीतरी टेक्निक असेल. आपण सुपाची ड्राय पावडर विकत घेतो ना, तसे बनवण्याचे तंत्र असेल.

हो. काहीतरी टेक्निक असणार. कारण हिरवीगार ताजी कढीलिंबाची पाने नुसतीच वाळवली तर त्यांचा वास राहात नाही. नुसती वाळकी पाने होतात.

मला वाटते कांजीवडे म्हणून एक 3 दिवस पाणी आंबवून त्यात मग उडीद वडे सोडतात
<<
अरे काय आठवण केलिये! हिवाळा आहे अजून. करतोच.

पाण्यात असे मसाले घालतात , 3,4 दिवसात ते पाणी आंबते. त्याला कांजी म्हणतात

मग त्यात मुगाचे वडे भजी घालून खातात, काही लोक वडेसुद्धा त्या पाण्यात 1 दिवस घालून आंबवतात , वडे लहान मोठे गोल चपटे कसेही करतात

युपी बिहार राजस्थानात दिवाळी व होळीसाठी करतात

https://youtu.be/GnxFmI_tKMQ

Screenshot_20220225-113616~2.png

आज दोन दिवसांनी एक भेंडी काढून कापली

मस्त स्वाद उतरला आहे , चिकटपणा कमी होत आहे. मसाला मीठ भेंडीमध्ये मस्त उतरले आहे

नुसती लोणच्यासारखी खाता येईल , सलाडदेखील करता येईल.

भेंडी पूर्ण पांढरी पडली की चिकटपणा पूर्ण जातो

unnamed.png

दर दोन चार दिवसांनी एक कापून बघेन.

कांजीचाही अंदाज आला. कांजीवडे करून बघेन

मागच्या पानावर लिहिले आहे , फोटो सकट

भेंडी फरमेंटेशन

https://www.maayboli.com/node/80986?page=7

शेवटून दुसरा प्रतिसाद
यात यश आले तर काकडी , गाजर करणार

शिवाय एकदा कांजीवडे करीन

गेल्या आठवड्यात भेंडी वाळवली
दोन लांब तुकडे करून हळद , मीठ , तिखट , जिरे पावडर , हिंग , लिंबू रस चोळून उन्हात वाळवली

आज सगळे थोडे थोडे तळले
मस्त झालेत

अजिबात तेल धरत नाहीत.

henken ashi.png

मला भीती वाटत होती की हे पदार्थ तळल्यावर तेलाने भिजून जातील , म्हणून मी भाजी करणे हा ऑप्शन प्रेफर करत होतो

पण ह्यात अजिबात तेल शोषले जात नाही, पदार्थ मात्र अगदी कुरकुरीत होतात

वाळवलेली शेपूची पाने घेतली , ती हलकी तव्यात भाजली , मग हातानेच चिरडून मिक्सरमध्ये घेतली,

खोबरे , तीळ , लसूण , मिरच्या भाजून , भाजलेले दाणे , मीठ घालून मिक्सरमधून फिरवले

शेपूची चटणी तयार

images (1).jpegimages (15).jpeg

मूळ पाककृतीत हिरवी पाने तव्यावरच भाजली आहेत , त्यातील पाणी जाईपर्यंत भाजली आहेत .

माझ्याकडे तो वाळलेला शेपू तयारच होता, अजूनपर्यंत चांगला होता, खराब झालेला नव्हता, चटणीदेखील भरपूर टिकेल, पण संपून जाईल.

वाळलेल्या शेपूचा स्वाद मस्त लागतो, सूर्यफूल , कारळे .... इत्यादीच्या श्रेणीत बसेल , टेक्श्चरही तसेच दिसते

मस्त आहे. अशीच कडीपत्त्या ची पण करा. कडीपत्ता धुवुन सुकवुन घ्यायचा. त्यातच पंढरपूरी डाळ्या / डाळवे ( चिवड्यात घालतात ते ), सुक्या लाल मिर्च्या, मीठ घालुन मिक्सरला फिरवा. डाळ्या नको असतील तर चणा व उडीद डाळ भाजुन मिक्सरला फिरवा. दह्यात, तेलात कशी पण मस्त लागते.

आईने कुरडयांसाठी गहू भिजत घातलेत. पण गेल्या वर्षी कुरडया घालताना त्याची तार चालत नव्हती. घालताना मधेच तुटायची त्यामुळे आकार नीट जमले नाहीत. नक्की काय प्रॉब्लेम झाला ते काही कळालं नाही. या वर्षी तसं व्हायला नको म्हणुन काय काळजी घ्यावी...??

Kay उरक,त्यापेक्षा आवड आहे हो तुम्हाला! >>> हो ना, त्यांच्या पाकृ आणि फोटो पाहुन मला नेहमी हेच वाटतं. डॉक्टरचं आयुष्य एवढं बिझी असतं तरी कुकींग आणि राजकारण ( Wink ) यासाठी एवढा वेळ काढतात, हे खरंच प्रशंसनीय आहे. : thumbs up:
(या उलट मी नवरा आणि मुलगा पटापट व्हिसा मिळून कधी एकदा जाताहेत याची वाट पहाते आहे. गेले की पहिली गोष्ट किचनला लॉक लावुन टाकणार. मी नुसती फळं, sprouts आणि सॅलड खाऊन आरामात जगु शकते. )

Pages