Submitted by मेधा on 14 January, 2022 - 12:05
भाग ४ मधे देखील २००० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने हा पाचवा धागा सुरु केला आहे
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
आधीचे धागे
https://www.maayboli.com/node/2549
https://www.maayboli.com/node/24273
https://www.maayboli.com/node/42617
https://www.maayboli.com/node/56005
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गाजराची पुंगी राहिलीच की !
गाजराची पुंगी राहिलीच की !
गाजराची पुंगी राहिलीच की !
गाजराची पुंगी राहिलीच की !
>>> गाजराची पुंगी इथे वाजवली आहे!
फिनिक्स, थॅंक्यू. ही सेमी
फिनिक्स, थॅंक्यू.
ही सेमी थालिपीठं/ धपाटे (मराठवाड्यात धपाटे नावाचा तत्सम पदार्थ आहे) करून पाहेन. बाकी प्रोसेस मी अशीच करते, बटर पेपर किंवा फॉईल वापरून. फ्रीज कधी केले नाही पण.
आज भाजीवाल्याने आग्रहाने
आज भाजीवाल्याने आग्रहाने पांढरट-हिरवी वांगी 'ताई, खास वाडीची वांगी आहेत.' असं सांगून दिली आहेत. वर 'खारं वांगं करा. ही वांगी हिरव्या मसाल्याची छान लागतात. लाल मसाल्यात पांचट लागतात' असा सल्लाही दिला आहे.
तर हे खारं वांगं कसं करतात?
वामनराव, आज आम्ही गाजराचा
वामनराव, आज आम्ही गाजराचा हलवा खजूर घालून केला. साखर अजीबात घातली नाही. चवही छान आली.
अनया खाऱ्या वांग्याच्या
अनया खाऱ्या वांग्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, त्यापैकी गावरान चव (मायलेकी आहेत, आजी आणि त्यांची मुलगी)चॅनेलवर दाखवलेली त्याच्या जवळ जाणारी मी करते. लसूण, भाजलेले दाणे किंवा कूट असेल घरात तर ते, ओलं खोबरे, मिरची, आलं, किंचित काही आंबट, किंचित साखर, मीठ, कोथिंबीर, कढीलिंब किंचित घालून त्याची चटणी करून वांग्यात भरते आणि मी मावेत 2, 2 मिनिटं करत पाच मिनिटं वाफवून घेते आणि नंतर कढईत तेलाची फोडणी करून, वांगी त्यात टाकून थोडा पाण्याचा हबका घालून, झाकण ठेवून, खरपूस परतून घेते. तिथे दाखवलेल्यात मी थोडा बदल करून करते त्यामुळे तू चॅनेलवरही बघ. काही रिल्सही आहेत खाऱ्या वांगीचे तेही बघ.
वरच्या पद्धतीने केलेली आवडली आमच्याकडे म्हणून लिहिली ती रेसिपी.
भाकरी लाटुन करायला मी उकड
भाकरी लाटुन करायला मी उकड काढुन करायचो.
सव्वा कपास अर्धा टी-स्पून xanthan gum वापरून (कोरड्या पिठात गम नीट मिसळून) उकड न काढता गरम पाण्यात भिजवून (पीठ दहा+ दिवस जुने आहे), लाटून करता येतात. तुलनेत जरा पातळ लाटता येतात, आणि जरा मऊ होतात.
नाचणीच्या पिठाच्याही अशा प्रकारे लाटुन केल्या एकदा.
इतर मिलेट्सवर प्रयोग बाकी आहेत.
श्रीखंड - ३० जणांसाठी
श्रीखंड - ३० जणांसाठी
अहोंच्या ऑफिसात potluck lunch होतं. त्यांनी श्रीखंड करून नेलं. सर्वांना खूप आवडलं. काहीजण पहिल्यांदाच श्रीखंड खाणारे होते.
कदाचित कुणाला उपयोगी पडेल म्हणून इथे देत आहे.
श्रीखंड - ३० जणांसाठी
इतकं ३० जणांना पुरलं. आठ दहा जणांनी / जणींनी दोन दोन वाट्या घेतलं.
Pages