कॅरट (गाजर) सूप

Submitted by maitreyee on 3 February, 2022 - 18:38
Carrot Soup pic
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गाजरं - साधरण इन्चभर आकाराचे तुकडे करून, २ वाट्या - बेबी कॅरट्स किंवा मोठी कोणतीही चालतील. (माझ्याकडे कॉस्कोमधली पोतंभर बेबी कॅरट्स होती - ती वापरायाची म्हणून केलं हे सूप!) , एक मध्यम आकाराचा (यलो/ व्हाइट) कांदा, २-३ लसून पाकळ्या, आले किसून अर्धा चमचा, मिरी पावडर, मिठ , तिखट ऑप्शनल, बटर किंवा ऑलिव ऑइल, व्हेजिटेबल ब्रॉथ असल्यास , सुमारे अडीच तीन वाट्या, कोकोनट मिल्क साधारण पाउण वाटी.

क्रमवार पाककृती: 

एकदम सोपी रेसिपी आहे. मी पहिल्यांदाच करून पाहिलं आणि इथे रेसिपी दिसली नाही म्हणून लिहितेय. ही रेसिपी एकदम लो कार्ब , ग्लुटेन फ्री, व्हिगन वगैरे आहे, म्हणजे हेल्दी म्हणायला हरकत नसावी Happy
नॉन स्टिक किंवा जाड बुडाच्या भांड्यात २ चमचे बटर (व्हिगन हवी असेल तर ऑलिव ऑइल) गरम करून त्यात चिरलेला कांदा मध्यम आचेवर परता. लसूण पण किसून त्यात घाला. कांदा मऊ झाला की गाजर, आले, मिरपूड घाला. थोडे परतून मग ब्रॉथ घाला. नसेल तर साधे पाणी घातले तरी बिघडत नाही. आता हे मिश्रण मध्यम आचेवर मऊ शिजवायचे आहे. मी इन्स्टन्ट पॉट मधेच सॉटे करून त्यातच प्रेशर कुक केले १० मिनिटे.
सर्व शिजले की हँड मिक्सी असेल तर भांड्यातच फिरवून पेस्ट करा. नाहीतर गार करून मिक्सर मधे पेस्ट करता येईल.शेवटी त्यात मीठ, ( तिखट ऑप्शनल ), कोकोनट मिल्क घालून पुन्हा १-२ मिनिटे मंद गॅस वर ठेवा. सूप तयार! अगदी माइल्ड, प्लेझन्ट चवीचे होते हे सूप.

सूप मधे गार्निश म्हणून कोथिंबीर, पुदिन्याची पानं, किंवा बेसिल काहीही चालेल किंवा काहीच नाही घातले तरी चालेल. कार्बस हवे असतील तर क्रुट्न्स घालू शकता, किंवा आवडीच्या ब्रेड आणि सॅलड सोबत खा. फोटोत सावरडो ब्रेड (घरात होता म्हणून) आहे.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात २-३ बोल इतके होईल.
अधिक टिपा: 

-बहुधा कोकोनट मिल्क नसेल ( आणि व्हिगन नको असेल तर) त्याऐवजी क्रीम, दूध असे काही चालावे.
-माझी कॅरट्स फिक्या रंगाची होती तर रंग फिका आला आहे. मी मैत्रिणीकडे खाल्ले त्याला डार्क केशरी रंग आला होता, पण तिने मोठी लाल दिसणारी गाजरं वापरली होती.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त वाटते आहे क्रुती ,
सगळ आहेच घरात फक्त व्हेजिटेबल ब्रॉथ नाहिये पण चिकन ब्रॉथ आहे तो घालु का? की नको टेस्ट बदलेल्?

ओह छान आहे.
आहेत जिन्नस - करून बघते.

वा.. सूप मस्त दिसतंय
आता पर्यंत ती कॅास्ट्कोतली गाजरं संपवायला मी नेहमी साऊथ इंडियन स्टाईल भाजी बनवायचे.. हे पण करून बघेन

मस्त
मी मैत्रिणीकडे खाल्ले >> की पिले Happy

मैत्रिणीकडे खाल्ले >> की पिले Happy >>> मैत्रेयीने लिहिलेलं बरोबर आहे, सुप खातात.

सोपी आणि जमेलशी रेसिपी आहे. उद्या करण्यात येईल.

अ‍ॅग्रीड.
थिक सूप आहे. खाण्याची वस्तू.
प्यायचीच असेल तर सोबत वाईन घ्या. आजकाल किराणा दुकानात मिळते म्हणे मुंबैला.

वाचलात, सूप हेल्दि आहे म्हणालात, इम्युनिटी बूस्टर म्हणाला असतात तर?
बाकी रेसिपी छानच

नारळाच्या दूधाऐवजी इतर पर्याय घालून करून बघेन... काय वापरता? कारण नारळ दूध बऱ्याचदा हाताशी नसते, गाजर असले तर.
माझी काकु साधे दूध वापरते बऱ्याच सूप रेसिपीज करताना, मला ते पण नाही आवडत, सो काही ट्राइड टेस्टेड पर्याय आहे का?

दूध किंवा क्रीम. दूध असतेच घरात. ऐकायला ऑड वाटते पण पदार्थ आंबट नसेल तर मी बर्‍याचदा क्रीमी टेक्स्चर करण्यासाठी वापरते थोडे दूध. पालक पनीर मधे पण वापरले आहे पूर्वी कधीतरी. या सूप मधे ना.दु. किंवा क्रीम किंवा दूध काहीच नसेल तर नाही चांगले लागणार.

हो मी दूध घातलेलं पालक सूप मी प्यायले आहे, चांगले लागले चवीला. पण ते आयुर्वेद वाले त्याला विरुद्ध आहार म्हणतात म्हणून पर्याय असेल तर हवाय.

हे आयुर्वेदवाले माँ के हाथ का गाजराचा हलवा न खाताच बी ए पास झाले काय? हलव्यात दूध चालत तर इथे का प्रॉब्लेम आला? व्हॉट अ‍ॅम आय मिसींग??

हलव्यात दूध चालत तर इथे का प्रॉब्लेम आला? व्हॉट अ‍ॅम आय मिसींग??... अग्रीड, दूध चाललेच पाहिजे. उगाच गील्ट देतात ते आयुर्वेदिक वाले.

पण ते आयुर्वेद वाले त्याला विरुद्ध आहार म्हणतात>>>>तुम्ही नका हो लक्ष देऊ त्या आयुर्वेद वाल्यांकडे...खा बिनधास्त ... without guilt Happy

उगा विषय वाढवायचा नसेल तर सावर क्रीम वापरू शकता. दह्याबद्दल जरा त्यांचा उदार दृष्टीकोन आहे ... : D

दुधावरून आठवले, भारतात रोड साईड मिळणारा उपमा टेस्टी का लागतो ते, ते लोक पण तेल तापवताना थोडा डालडा घालतात आणि कांदा परतला की पाण्या आधी थोडे दूध पण घालतात उकळताना. मी डालड्या ऐवजी बटर घालून पाहिले होते, बऱ्यापैकी सेम टेस्ट जमली होती.

Pages