Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१) पहिल्या कसोटीत आपण त्यांना
१) पहिल्या कसोटीत आपण त्यांना दुसऱ्या डावात ९१ ला गुंडाळलेले.
२) दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात ११३ ला गुंडाळताना नऊ विकेट ४८ धावात काढल्या होत्या.
३) या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या ईनिंगला शेवटच्या सहा विकेट ११ धावात काढल्या.
त्यामुळे उद्याही टॉप टू बॉटम कॉलॅप्स घडवून आणू शकतो अशी आशा ठेवा
बॅट्समन नी पेशंस दाखवायची गरज
बॅट्समन नी पेशंस दाखवायची गरज >> सगळे मधल्या वेळेमधे इंग्लंड किवी मॅच बघितल्यासारखे ह्या सामन्यामधे खेळलेत. अय्यर चे विशेष "कौतुक" वाटते. पठ्ठ्या स्पिन चांगला खेळतो म्हणून देशातल्या सिरीज मधे त्याच्या नावावर पटकन टिक येते. तोच बाहेर कसा खेळणार ह्याबद्दल प्रचंड प्रश्नचिन्ह आहे. मागे रणजीतल्या धावांचा रतिब घेऊन स्रफराज उभा आहे. ( गेला बाजार विहारी , गिल , जय्स्वाल, इस्वरन, धुल वगैरे लोक पण आहेत - आपण कोणालाही कुठल्याही क्रमांकावर खेळवू याबद्दल मला १००% खात्री आहे. पहिली मह्त्वाची मॅच इंजरी मुळॅ खेळाला नाहियेस नि दुसरी मधे नि तिसर्या च्या पहिल्या इनिंग मधे फार काही उल्लेखनीय केले नाहियेस. अशा वेळी तुम्ही कसे खेळाल ?
हा सामना हरलो तर किमान चौथ्या सामन्यामधे ग्रीन टोप हवा वगैरे फुशारक्या बंद होतील हीच ती जमेची बाब
*1)पहिल्या कसोटीत आपण त्यांना
*1)पहिल्या कसोटीत आपण त्यांना दुसऱ्या डावात ९१ ला गुंडाळलेले...... ११३ ला गुंडाळताना नऊ विकेट ४८ धावात काढल्या होत्या.....? पहिल्या ईनिंगला शेवटच्या सहा विकेट ११ धावात काढल्या...* -
हे वाचून, अर्धी चड्डी घालून खेळलेल्या गल्ली क्रिकेटच्या सामन्यांच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या हे मात्र खरं !!
तुम्ही गल्ली क्रिकेट अशा
तुम्ही गल्ली क्रिकेट अशा पिचेस वर खेळल्यामूळे तुमचा अशा पिचेस वरचा राग आता समजू शकतो भाऊ
9 विकेट्स नी जिंकले ऑसी
9 विकेट्स नी जिंकले ऑसी
*तुम्ही गल्ली क्रिकेट अशा
*तुम्ही गल्ली क्रिकेट अशा पिचेस वर खेळल्यामूळे तुमचा अशा...*. अहो, ' रम्य आठवणी ' म्हटलंय मी. म्हणून तर उलट मला प्रेम वाटलं पाहिजे ना अशा पीचेस बद्दल. !
एक जावई गेला आणि दुसरा आला...
एक जावई गेला आणि दुसरा आला....गिल ने अत्यंत सुमार फलंदाजी केली. विराट तर केवळ पूर्वापुण्याई वर खेळत आहे. आपण कसोटी केवळ एक फलंदाज आणि 2-3 ऑल राऊंडर यांच्या जीवावर खेळत आहोत. बाकी सगळे ठोंबे म्हणून उभे असतात. पराभव ना नक्कीच चांगला आह, निदान जागा अडवून बसलेल्यांना लाथ मिळेल.
हा सामना हरलो तर किमान चौथ्या
हा सामना हरलो तर किमान चौथ्या सामन्यामधे ग्रीन टोप हवा वगैरे फुशारक्या बंद होतील हीच ती जमेची बाब >>>
चौथ्या सामन्यात आता एक पाटा हायवे बनवतील असं मला वाटते.
सिरीज 2-2 बरोबरीत संपली तर आपल्याला WTC क्वालिफाय करायला न्यूझीलंड च्या भरोशा वर राहाव लागेल.
पराभव ना नक्कीच चांगला आह,
पराभव ना नक्कीच चांगला आह, निदान जागा अडवून बसलेल्यांना लाथ मिळेल. >>>
माझ्या मते तरी असं काही होणार नाही.
या वर्षीचे उरलेले सगळे कसोटी सामने घरा बाहेर आहेत - WTC फायनल (पोचलो तर), वेस्ट इंडिज दौरा आणि द आफ्रिका दौरा.
त्यामुळे बाहेरच्या कंडिशन चा अनुभव, ट्रॅक रेकॉर्ड इत्यादी कारणे देऊन परत अत्ताचीच टीम खेळवतिल.
अशी होम पिचेस बनवणं हा
अशी होम पिचेस बनवणं हा स्ट्रेटेजीचा भाग आहे. त्यात टॉप ऑर्डर बॅट्समेन चं अपयश बर्यापैकी इक्वेशनमधे घेतलंय असं रोहित शर्माच्या इंटरव्ह्यू वरून वाटतंय.
https://www.espncricinfo.com/story/india-may-not-mind-more-turning-pitch...
माझ्या मते तरी असं काही होणार
माझ्या मते तरी असं काही होणार नाही. >> +१ WTC फायनल ला तरी जवळजवळ हाच संघ जाईल. नंतर वेस्ट इंडिज मधे थोडे प्रयोग होतील असे वाटते नि परत आफ्रिकेमधे आजच्या संघातला कोअर परत येईल असे मलाही वाटते.
त्यात टॉप ऑर्डर बॅट्समेन चं अपयश बर्यापैकी इक्वेशनमधे घेतलंय असं रोहित शर्माच्या इंटरव्ह्यू वरून वाटतंय. >> हो मी ही ते वाचले . एक मह्त्वाचा फरक असा वाटतो कि आधीच्या दोन्ही टेस्ट मधे पहिल्या सहांचे कॉम्बिनेशन माफकच होते. ऑसीज चा ब्रेन फेड, आपल्या लोअर ऑर्डर नि बॉलिंग च्या जोरावर आपण मह्त्वाच्या मोमेंट्स सीझ केल्या होत्या. व्हॉटेव्हर केम टूगेदर इन लास्ट टू टेस्ट्स डिड नॉट हॅपन हीअर . (राहुल चा शाप भोवला
)
बाकी तिकडे जयस्वाल नि ईस्वरन सुटले परत. सौरभ कुमार मात्र पूर्ण फेल गेला हे नवल.
सिरीज 2-2 बरोबरीत संपली तर आपल्याला WTC क्वालिफाय करायला न्यूझीलंड च्या भरोशा वर राहाव लागेल. >> आपण चौथा सामना हरलो तरी आपला पाय जवळ जवः आत आहे. लंकेला दोन्ही सामने जिंकायला लागतील जे कठीण वाटते. नि त्यांनी जिंकले तर ते फायनल मधे असणे डीझर्व्ह करतात असे म्हणूया.
होम पीचेस वर आपलाच संघ गारद
होम पीचेस वर आपलाच संघ गारद होत असेल तर होम काय अवे काय सगळंच सारखं.
आपल्या फलंदाजांना ना फिरकी धड खेळता येत की नाही फास्ट ट्रॅक वर उभ राहता येत. फक्त पाटा पीच वर आयपीएल मध्ये रेकॉर्ड करता येतात.
रोहित, विराट आणि द्रविड यांना शेवटाची एक मॅच खेळवून कायमचा नारळ द्यावा.
रोहित, विराट आणि द्रविड यांना
रोहित, विराट आणि द्रविड यांना शेवटाची एक मॅच खेळवून कायमचा नारळ द्यावा. >> रोहित ? जे टॉप ऑर्डर मधले काँट्रिब्युशन आहे त्यातले अर्ध्याहून अधिक त्याचेच आहे की. बाकी सगळे पोस्ट ह्या मॅचच्या पराभवाचे फ्रस्ट्रेशन वाटतेय
उलट मला प्रेम वाटलं पाहिजे ना अशा पीचेस बद्दल. ! >> आता ते तुम्ही होम मधे होता कि अवे मधे त्यावर ठरेल भाऊ
आज मी एक सगेशन वाचले कि मॅच तीन दिवसांमधे संपली तर तिसरी -चौथी इनिंग अॅड करावी कि जेणेकरून मॅच पाचव्या दिवसापर्यंत गेली पाहिजे. काय म्हणता ?
खेळपट्टी तयार करण्या बद्दल
खेळपट्टी तयार करण्या बद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेत समिती काही नियम बनवू शकत नाहीत का?
निदान इथे जसे हिरवळिच्या पट्ट्या मिळतात, त्यात हवा तसा बदल करून, तश्या आणून टाकाव्या.
खेळपट्टीला दोष देतात! अहो दोन्ही संघ एकाच खेळपट्टीवर खेळतात ना?
पाच दिवसाचे कसोटी सामने अडीच दिवसात संपतात, कारण म्हणे खेळपट्टी! मग जरा खेळपट्टी बद्दल संशोधन करा ना!
“ रोहित, विराट आणि द्रविड
“ रोहित, विराट आणि द्रविड यांना शेवटाची एक मॅच खेळवून कायमचा नारळ द्यावा” - का? रोहितची एक सेन्च्युरी आहे. विराट जे खेळलाय त्यात तो सॉलिड वाटलाय (a big inning may be around the corner). द्रविडच्या कोचिंगमधे टीम चांगली डेव्हलप होतीय. पहिल्या तिनातल्या दोन मॅचेस जिंकल्या आहेत. बर्याच प्लेयर्सनी ह्या टीम मॅनेजमेंटने त्यांना सेन्स ऑफ सिक्युरिटी आणि पुरेशी संधी दिल्याचं सांगितलंय. तसंही लिमिटेड ओव्हर्समधे लीडरशिप चेंज होतीय.
I think ICC really need to
I think ICC really need to think about pitches for test and not just in India but everywhere.
I am getting nostalgic about those 'pata' pitches which provided help to side batting in first three days and then started turning and reverse swinging afterwards. Similar to the test with Laxman Dravid and Harbhajan
सौरभ कुमार मात्र पूर्ण फेल
सौरभ कुमार मात्र पूर्ण फेल गेला हे नवल. >>>>
मयांक हि.
भारतीय संघात दुसरा ओपनर हि जागा अजूनही फिक्स नसल्याने त्याला आपलं नाव परत कंटेंशन मध्ये आणायचा मोठा चान्स होता.
गिल माझ्या मते (इंदोर मध्ये फेल्यूर न गणता) टेस्ट ओपनर म्हणून अजूनही फिक्स नाहीये. डेब्यू ऑस्ट्रेलिया दौऱ्या चा अपवाद सोडला तर त्याचा गेल्या दोनेक वर्षातला परफॉर्मन्स राहुल सारखाच आहे.
भारतीय संघात दुसरा ओपनर हि
भारतीय संघात दुसरा ओपनर हि जागा अजूनही फिक्स नसल्याने त्याला आपलं नाव परत कंटेंशन मध्ये आणायचा मोठा चान्स होता. >> +१. पन तसही त्याला सवतीचे पोर असल्यासारखेच ट्रीट केले आहे. राहुल चा फॉर्म गेला कि मयांक कडे बघायचे नि राहुल ने धाव्या केल्या कि मयांक कसाही खेळला असेल तरी बाहेर हे चक्र होते.
गिल बद्दल अनुमोदन. मला तो मधल्या फळीट खेळलेला बघायला अधिक आवडेल.
पुढच्या मॅचमधे इंडियाने
पुढच्या मॅचमधे इंडियाने (टर्निंग ट्रॅकच असणार असेल तर), चारच बॉलर्स (एकच फास्ट बॉलर), सहावा बॅट्समन खेळवावा असं वाटतंय.
“ भारतीय संघात दुसरा ओपनर हि
“ भारतीय संघात दुसरा ओपनर हि जागा अजूनही फिक्स नसल्याने त्याला आपलं नाव परत कंटेंशन मध्ये आणायचा मोठा चान्स होता.” - रणजी सीझनही चांगला गेला होता त्याचा.
हे कोव्हिडमुळे जे इराणीचं टाइमटेबल एक वर्षं मागे चाललंय, ते केव्हा सुरळीत करणार आहेत कुणास ठाऊक? मागच्या वर्षी मध्य प्रदेश ज्या रेड हॉट फॉर्ममधे होते, त्या तुलनेत यंदा जरा ब्लो-हॉट-ब्लो-कोल्ड होते.
राहुल चा फॉर्म गेला कि मयांक
राहुल चा फॉर्म गेला कि मयांक कडे बघायचे नि राहुल ने धाव्या केल्या कि मयांक कसाही खेळला असेल तरी बाहेर हे चक्र होते. >>>
मयांक चा मोठा प्रॉब्लेम त्याचा घराबाहेरचा स्ट्रगल आहे.
त्याचा भारतातला कसोटी सामान्यातला ऍव्हरेज 70 आहे पण भारताबाहेर चा ऍव्हरेज 26 इतका खाली पडतो
अर्थात आपण आपल्या कसोटी गोलंदाजां सोबत सर्रास हॉर्सेस फॉर कोर्सेस लॉजिक लावतो. तीच लॉजिक फलंदाजांना लावायला काय हरकत आहे
तीच लॉजिक फलंदाजांना लावायला
तीच लॉजिक फलंदाजांना लावायला काय हरकत आहे >> इगो दुखावतो ? फलंदाजांचे इगो जास्त नाजूक असतात
*...आपल्या कसोटी गोलंदाजां
*...आपल्या कसोटी गोलंदाजां सोबत सर्रास हॉर्सेस फॉर कोर्सेस लॉजिक...?* -
घरच्या सामन्यात आपण आपल्या गोलंदाजासाठी सर्रास' कोर्सेस फॉर हॉर्सेस ' बनवतो व दुर्दैवाने कधीतरी ती पीचेस पाहुण्या संघाच्या गोलंदाजांसाठी ' कोर्सेस फॉर हॉर्सेस' ठरतात. नाईलाज आहे !
हरमन क्लास खेळली आज. मुंबई चा
हरमन क्लास खेळली आज. मुंबई चा पूर्णपणे डॉमिनंट परफॉर्मन्स.
▪️IPL 1st Match
▪️IPL 1st Match
•Batting Team Scored 200+
•Chasing Team got all out in 15.1 overs
•Batting Team Won by 140+ runs
•Top Scorer McCullum SR (216)
▪️WPL 1st Match
•Batting Team Scored 200+
•Chasing Team got all out in 15.1 overs
•Batting Team Won by 140+ runs
•Top Scorer Harmanpreet SR (216)
कम्माल योगायोग!!
कम्माल योगायोग!!
अरे वा म्हणजे अजून दहा
अरे वा म्हणजे अजून दहा वर्षांनी हरमनप्रीत कौल भारतीय महिला संघाची कोच बनून "कोल"णार
“अजून दहा वर्षांनी हरमनप्रीत
“अजून दहा वर्षांनी हरमनप्रीत कौल भारतीय महिला संघाची कोच बनून "कोल"णार” -
भारताची बनून नाही चालणार रे. द. अफ्रिकेची वगैरे बनायला हवी. 
वि वि करमरकर यांना
वि वि करमरकर यांना श्रद्धांजली !
क्रिकेट सहित देशी खेळानाही महत्व प्राप्त करून देण्यात योगदान !
वि वि करमरकर यांना भावपूर्ण
वि वि करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
बाळ ज पंडीत यांच्यासह यांचे अभ्यासपूर्ण समालोचन ऐकणे फारच रोचक आणि डोळ्यासमोर प्रसंग उभाकरणारे असे.
Pages