क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहितच्या कॅप्टनसी स्किल्स बद्दल तिळमात्र संशय नाही.
त्याच्या व्हाईट बॉल बॅटिंग बद्दलही नाही.
टेस्ट मधे ओपन करायला लागल्यावरचा, गेल्या वर्षभरातल्या भारताबाहेर झालेल्या रेड बॉल गेम्स मधला फॉर्मही कडक.

पण तरीही त्याला टेस्ट कॅप्टन करू नये या मताचा मी आहे.

मुख्य कारण, त्याचं इंज्युरी प्रोन असणं.
येत्या काही वर्षांमध्ये त्याच्या व्हाईट बॉल कॅप्टनसी ची आपल्याला गरज आहे, त्यामुळे टेस्टचा अतिरिक्त भार त्याच्यावर नको.

त्यापेक्षा टेस्टमधे येत्या काही सिरीज सबकाँटिनेंट मधे असल्याने अश्विनला कॅप्टन करून पंत ला व्हाइस कॅप्टन म्हणून तयार करावं (२००७-०८ च्या कुंबळे - धोनी मॉडेल नुसार) आणि २०२४ नंतर पंत ला लीड करू द्यावं.

एक असते ते ज्ञान असते. ते ज्याकडे असते त्याला जाणकार म्हणतात. त्याकडून ते ज्ञान जरूर घ्यावे.
पण तो जाणकार क्रिकेटबद्दल आपले जे एक मत देतो त्याच्याशी त्याला क्रिकेटमधील जास्त कळते म्हणून सहमत असण्यात काही लॉजिक नाही.
>> खरच " सरांच्या लीला अगाध आहेत. " आम्हा सर्वसामान्य लोकांसाठी त्यांना अधिक ज्ञान आहे म्हणून ते जाणकार असतात नि त्यांच्या मताला, जे त्यांच्या ज्ञानामधून आले आहे, त्याला किम्मत आहे - त्याला प्रमाण मानता येईल असे लॉजिक असते. तिथे माझ्या मताची किम्मत 'म्युन्सिपाल्टिमधे उंदिर मारण्याच्या विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍याच्या - अणुयुद्ध टाळण्याचा एकमेव उपाय सांगणार्‍या मताइतकीच ' हो सर.

दोघांत कोणाला क्रिकेटची अक्कल जास्त समजावी >> मला तुलना करायची गरज वाटत नाही. परस्परविरोधी मते आली तरी दोघांनाही क्रिकेटमधले माझ्यापेक्षा भरपूर कळते हे नाकारायची गरज मला भासत नाही. किमान 'तेंडूलकर गांगुली ने त्यांच्या पुस्तकांमधे त्यांनी अमके का केले हे दिलेले स्पष्टीकरण खोटे असून मला टीव्ही वर दिसलेल्या प्रसंगामधून काढलेला निष्कर्षच कसा खरा आहे' हे तर नक्कीच सांगत बसणार नाही.

येत्या काही वर्षांमध्ये त्याच्या व्हाईट बॉल कॅप्टनसी ची आपल्याला गरज आहे, त्यामुळे टेस्टचा अतिरिक्त भार त्याच्यावर नको. >> +१ अँकी मी २-३ दिवसांपूर्वी असेच पोस्ट केले होते. फरक एव्हढाच होता की मला वाटते की व्हाईट किंवा रेड ह्या पैकी जे मह्त्वाचे असेल त्याचा कॅप्टन त्याला बनवणे जास्त योग्य ठरेल. तो सगळे फॉर्‍मअ‍ॅट १००% सलग २-३ वर्षे खेळणे अशक्य आहे. अर्थात ह्यासाठी कोणाला तरी लाँग टर्म व्हिजन दाखवावी लागेल.

“ पण तो जाणकार क्रिकेटबद्दल आपले जे एक मत देतो त्याच्याशी त्याला क्रिकेटमधील जास्त कळते म्हणून सहमत असण्यात काही लॉजिक नाही.” - मला संदीप खरेच्या कवितेतली एक ओळ आठवली, ‘प्रश्न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्तर.’ इथे चर्चा करताना लोक रेफरन्स देतात, त्या अनुशंगानं चर्चा करतात, त्या चर्चेच्या ओघात तज्ञांची मतं माडतात. कुणी त्याला गॉस्पेल म्हटलेलं नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळलेल्यांना, जाणकार तज्ञांना खेळाची समज जास्त आहे हे मान्य करणं वेगळं आणि बाबा वाक्यं प्रमाणं वेगळं. उगाच दोरीला साप म्हणून धोपटण्यात काय अर्थ आहे?

ह्यासाठी कोणाला तरी लाँग टर्म व्हिजन दाखवावी लागेल
>>
अगदी अगदी

आणि हीच माझी दादा - द्रविड कडून अपेक्षा आहे.

रोहित मला व्हाईट बॉल साठी चांगला कॅप्टन यासाठी वाटतो की तो ही जबाबदारी अधून मधून घेत आला आहे, शिवाय आयपीएलचा खणखणीत ट्रॅक रकॉर्ड त्याच्या बाजूनी आहे

लाल बॉल साठी म्हणशील तर तो रणजी खेळत नाही, त्यामुळे त्याचा त्या फॉरमॅट मधला परफॉर्मन्स कसा असेल माहिती नाही
हेच आश्विन बाबत म्हणता येईल, तो ही माझ्यामते तमिळनाडूचा रणजी कॅप्टन नव्हता, पण तरीही त्याच्या अनुभवामुळे टेंपररी सोल्युशन म्हणून मी त्याला पसंती देईन.
पंत बहुतेक रणजीमध्ये ही एका मोसमासाठी दिल्लीचा कॅप्टन होता, आयपीएल मधे ही आहेच, त्यामुळे त्यालाही पसंती.

के एल राहुल गेल्या सात - आठ सामन्यात टेस्ट टीममध्ये सरावतोय, त्याला (रणजी मधला अनुभव नसताना) कॅप्टन करणं मला पटत नाही. त्याची आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून कामगिरी फारच सुमार आहे (जरी त्याचवेळी कॅप्टन बॅटर म्हणून त्यानी खोऱ्याने धावा काढल्या असल्या तरीही)

खर पहिले तर रेड बॉलस्मधे कॅप्टन्सी साठी सगएच अर्धवट आहे.
१. बुमरा : वर्कलोड नि अनुभवाची कमतरता
२. अश्विन : परदेशात संघात असण्याचे चान्सेस नाही जाडेजा असताना कमी होतात
३. राहुल : अजिबात इंस्पायरींग किंवा कल्पक वाटत नाही
४. रोहित : फिटनेस मेजर फॅक्टर असेल. नि पस्तिशी नंतर पटकन बदलू शकेल अशी अपेक्षा अवास्तव वाटते
५. पंत : अनुभवाची कमतरता

राहता राहिला जाडेजा ! Happy

लोड घेऊ नका. कप्तान तर शर्माच होणार.

उद्याच्या सामन्यावर फोकस करा.

भले मालिका हरलो असती तरी लाज वाचवायची आहे. तर याऊलट आफ्रिकेकडे भारताला व्हाईटवॉश द्यायची संधी आहे.

बुमराहला विश्रांती गरजेची आहे. देतील का हा प्रश्न आहे...
दिली तर दिपक चहर त्या जागी येईल अन्यथा भुवीच्या जागी.
सुर्यकुमार यादवलाही एखाद्या अय्यरच्या जागी आणने गरजेचे. झाल्यास श्रेयस अय्यरच्या जागी.
व्यंकटेश अय्यरही मागे जरा बावचळल्यासारखा खेळतोय. त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवायला हवे जेणेकरून क्रीजवर तसेच संघात थोडा जम बसवेल. त्याआधी थेट येऊन फिनिशरची भुमिका निभावणे अवघड. मॅचचे प्रेशर प्लस स्वत:च्या जागेचे प्रेशर असे डबल प्रेशर होते. यांना पुढे पाठवून पंतला मागे पाचव्या सहाव्या क्रमांकावर ठेवता येईल या सामन्यात. शर्मा जडेजा आल्यावर पुन्हा बदलता येईल बॅटींग ऑर्डर..

रेड बॉलसाठी शॉर्ट टर्म रोहित आणि लाँग टर्म पंत हे मला योग्य पर्याय वाटतात. रहाणे फॉर्ममधे असता तर इतका प्रश्नच आला नसता, पण त्याने स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय. पंतने रणजीमधे (एखाद-दुसरा सीझन) आणि आयपीएल मधे टीम मधे सिनियर्स असतानासुद्धा चांगल्या लीडरशिप क्वालिटीज दाखवल्या आहेत. बाकीच्यांविषयी वर अँकी आणि असामीने लिहिलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे.

“ लाल बॉल साठी म्हणशील तर तो रणजी खेळत नाही, त्यामुळे त्याचा त्या फॉरमॅट मधला परफॉर्मन्स कसा असेल माहिती नाही” - मागे एकदा जेव्हा त्याला टेस्टमधे लाँच करायचा प्रयत्न चालला होता तेव्हा एक सीझन मुंबईची कॅप्टन्सी दिलेली आठवतेय (आगरकर नंतर?). फारसा प्रभावी ठरला नव्हता. अर्थात त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय.

कोहलीला शतक करायचं भरपूर टेंशन आलेलं दिसतंय. मी bcci ला पत्र लिहिणार आहे की भारताचा दौरा झिम्बाब्वे अफगाणिस्तान या संघांसोबत करा म्हणजे कोहली शतक करून त्याचा नैसर्गिक खेळ खेळू लागेल.

अफगाणचे स्पिन गोलंदाज सोपे नाहीत.

आज पंतचे पहिल्याच बॉलला वेगवान गोलंदाजाला पुढे येत मारून बाद होणे जणू काही मुद्दाम हरायचे असल्यासारखा फटका वाटला.
कोहलीसुद्धा एक रटाळ अर्धशतकी खेळी करून फारच अनकोहली पद्धतीने आऊट झाला.
काल दोनचार बातम्यांत वाचले की राहुल आणि कोहली एकत्र बसत बोलत नाहीत. दोघांमध्ये फूट पडली आहे. संघात फूट पडली आहे.

काहीतरी बेक्कार राजकारण शिजतेय आणि ड्रेसिंग टेबलमधील वातावरण आलबेल नाही हे नक्की...

चहर ने कसे खेळायला हवे होते ह्याचा परीपाठ दाखवला. किमान आत्ता तरी भुवी च्या जागी चहर हे कंफर्म होईल. वे. अय्यर ला बिचार्‍याला परत उडवले. द्रविडचा फारसा विश्वास दिसत नाही त्याच्यावर ऑल रांडर म्हणून. लंकेच्या दौर्‍यामधे पण फारसे वावपरले नव्हते त्याला. राहूल ओपनर हा अनाठायी प्रयोग बंद होईल तर बरे आहे.

पुढचे सामने भारतात विंडीज विरुद्ध नि नंतर लंका असल्यामूळे फॉर्म परत मिळवायला संधी आहे.

“ राहूल ओपनर हा अनाठायी प्रयोग बंद होईल तर बरे आहे.” - खरंय. वनडे मधे राहूल चौथ्या, श्रेयस/सुर्या/व्यंकटेश अय्यर पाचव्या, पंत सहाव्या, जडेजा सातव्या नंबरवर येणं योग्य वाटतं.

भुवीच्या जागी आणि ठाकूरच्या ऐवजी चहर हा जास्त चांगला ऑप्शन वाटतो. दोन फास्ट (बुमराह आणि शामी/सिराज), एक स्विंग (चहर) + एक स्पिनर आणि जडेजा असा वन डे चा बॉलिंग अ‍ॅटॅक असावा.

<<<<कोहलीला शतक करायचं भरपूर टेंशन आलेलं दिसतंय......... नैसर्गिक खेळ खेळू लागेल.>>>

उत्त॑म कल्पना. आता खूपसे सामने, अफगणिस्तान, झिंबाब्वे, आयर्लंड, अमेरिका, कॅनडा यांच्याशी खेळावे. सगस्ळ्या टीमचेहि टेन्शन दूर होऊन जाईल.

मला वाटतं की किमान एका सिरीज मधे ४ स्पेशालिस्ट बोलर आणि २ ऑल राऊंडर घेऊन खेळून बघायला पाहिजे

५ बोलर नीती वर्ल्डकप नंतर पासून गांडतिये.
(वर्ल्डकप नंतर लगेच झालेल्या सिरीजमध्ये केदार जाधव टीम मध्ये असतानाही त्याला एकही ओव्हर बोलिंग दिली नव्हती)

पंतला हाणमारीच करायची आहे तर त्याला वारंवार ४थ्या क्रमांकावर का पाठवितात? श्रेयस इनिंग बिल्डींग करू शकतो तो वर हवा होता काल. पंत सहाव्या किंवा सातव्या क्रमांकासाठी ठीक आहे.

पंतला हाणमारीच करायची आहे तर त्याला वारंवार ४थ्या क्रमांकावर का पाठवितात?>>>> फक्त पंत नाही तर जवळपास सगळेच हाणामारी करायला बघतात. द्रविड कोच झाल्यापासून हे प्रमाण वाढलंय. द्रविड खेळत असताना हे सगळे लहान होते आणि द्रविडचा बोरिंग टुकूटुकू खेळ बघून नवीन पोरांच्या मनात कुठेतरी सुप्त भीती लपली असावी की आपण याच्यासारखे टुकूटुकू प्लेयर तर नाही बनणार ना. म्हणून सगळे फास्ट खेळायला बघताहेत. आफ्रिका सिरीज हारलो यातलं हे एक महत्वाचं कारण आहे.

<<<काहीतरी बेक्कार राजकारण शिजतेय आणि ड्रेसिंग टेबलमधील वातावरण आलबेल नाही हे नक्की...>>>
अनुमोदन.

शिवाय एक मानसशास्त्रज्ञ बोलावून त्याला सर्व खेळाडूंशी बोलून काही सांगता येईल का ते पहावे.

मला वाटतं की किमान एका सिरीज मधे ४ स्पेशालिस्ट बोलर आणि २ ऑल राऊंडर घेऊन खेळून बघायला पाहिजे >> आजची द्रविडची मुलाखत वाचलीस का ? मला नक्की कळले नाही त्याला काय म्हणायचे होते ह्या सामन्यांबद्दल. तो पांड्या निजाडेजा हवे होते असे सुचवतोय असे वाटले. पण पांड्या वर्षभर तरी बॉलिंग करत नाहीये. अय्यर ला अजून वेळ आहे राईप व्हायला असे सुचवल्यासारखे वाटले पण मग नंतर 'अय्यर सहाव्या क्रमाकांवर बॅटींग करणार हे त्याला माहित होते नि त्याच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या" नि " सहावा बॉलर म्हणजे बॉलिंग करणे जरुरी नाही" असे म्हणाला. थोडक्यात माझ्या डोक्यावरून गेले. "राहुलने त्याचे रिसोर्सेस चांगले हँडल केले " असेही म्हटले.
https://www.rediff.com/cricket/report/coach-dravid-on-what-ails-indias-o...

एकूण हे वाचून मला आपण हरल्याचे आता नवल वाटत नाही.

राहुलने त्याचे रिसोर्सेस चांगले हँडल केले
>>
अवघड आहे.

राहुलनी स्वतः ओपन करायचा अट्टाहास सोडून जर इन फॉर्म गायकवाड अन धवन ला ओपन करू देऊन स्वतः ५ वर खेळला असता तर चित्र वेगळं दिसू शकलं असतं.
पण टिपीकल गल्ली क्रिकेट मधल्या ज्याची बॅट त्याची पहिली बॅटिंग अन तोच कॅप्टन रूल प्रमाणे गोष्टी घडल्या अन सिरीज गेली.
अर्थात यातून चांगला धडा घेतला तर तेही ठीक म्हणता येईल. पण द्रविडची मुलाखत वाचून तसं बिलकुल वाटत नाहीये.

राहुल तीन सामन्यांचा कप्तान होता. त्याच्याकडून कसली ओपनिंग स्लॉटचा त्याग करायची अपेक्षा करता.

शर्मा आत आल्यावर सरळ ओपनिंगला येणार. राहुल त्याआधी स्वत:ला वन डे मध्ये ओपनर म्हणूनच जम बसवायला बघणार. जे तो कसोटी आणि २०-२० मध्ये आधीच या भुमिकेत आहे.

बिचारा गायकवाड मात्र ईतक्या चांगल्या फॉर्मला असूनही हवी तेव्हा संधी मिळत नाहीये. सोशल मिडीयावर द्रविड यावरून शिव्या खातोय. पण तुमचे कप्तानच ओपनर असतील तर ते कश्याला स्पर्धा वाढवतील असे झालेय हे..

वन-डे टीममधे कुलदीपचं पुनरागमन, बिश्नोई ला मेडन कॉल-अप - रिस्टस्पिनर्स चं महत्व एकदम वाढलं. ह्या दोघांपैकी ज्याला संधी मिळेल त्याला यशस्वी झालेलं पहायला आवडेल. अपेक्षेप्रमाणे भुवनेश ची गच्छंती झाली. दीपक हूडाची निवड अनपेक्षित होती. कदाचित उपखंडात मॅचेस असल्यामुळे आणि जडेजा उपलब्ध नसल्यामुळे बहुदा हूडाची वर्णी लागली असावी (स्पिनर ऑलराऊंडर). अर्थात सुंदर पण टीममधे आहे, पण हूडा लोअर मिडल ऑर्डरमधे बॅट्समन म्हणून जास्त चांगला ऑप्शन होऊ शकेल.

टी-२० टीममधे सुंदर परत आला. त्या नटराजन चं काय झालं?

*अपेक्षेप्रमाणे भुवनेश ची गच्छंती झाली. * - भुवीवर अन्याय अजिबात झाला नसूनही त्याची गच्छंती खटकते हें खरं. दुर्दैव बिचारयाचं !!

पण हूडा लोअर मिडल ऑर्डरमधे बॅट्समन म्हणून जास्त चांगला ऑप्शन होऊ शकेल. >> +१. हार्ड हिटर म्हणून नक्कीच फिट होउ शकतो. त्याची बॉलिंग मात्र कामचालाऊच वाटते. बिश्नोई ट्रंप कार्ड ठरेल असे वाटते.

"त्याची बॉलिंग मात्र कामचालाऊच वाटते." - अ‍ॅब्सोल्यूटली. पण तो बॅटींग टीम प्रेशर मधे असताना (रैना / केदार जाधव सारजाधव) ३-४ ओव्हर्स जरी देऊ शकला तरी एखाद्या प्रमुख बॉलरवरचा - ऑफ डे असणार्या - भार नक्कीच कमी करता येईल. धोनी नंतरच्या काळात पार्ट-टाईमर्स वापरणं एकदमच कमी / बंद झालंय.

"बिश्नोई ट्रंप कार्ड ठरेल असे वाटते." - बिश्नोई वर तुझा बराच विश्वास आहे. होपफुली तो सार्थ ठरो (आणि तुझ्या तोंडी परमेश्वराचा प्रथमावतार पडो Happy )

तुझ्या तोंडी परमेश्वराचा प्रथमावतार पडो >> Happy

तो बिन्धास्त डेअरींग बाज बॉलर वाटतो रे आयपील मधे तरी. लेगी साठी तसे असणे म्हणजे जबरदस्त प्रकार आहे. त्याला टोन डाऊन नाही केले जसे चहल बाबत झाले तसे तर ....

"तो बिन्धास्त डेअरींग बाज बॉलर वाटतो रे आयपील मधे तरी. " - हे खरंय. वयाचा परिणाम असेलही कदाचित. पण अ‍ॅटॅकिंग लेग-स्पिनर हा मोठा अ‍ॅसेट असतो हे मात्र खरंय.

Pages