क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह फोटो मी सुद्धा व्हॉटसपवर पाहिला.
फक्त त्यात रोहीत शर्माला अंडरलाईन नव्हती.
हे खरे आहे की फेक?

अच्छा...
खरं असेल तर हसायला हरकत नाही ..
ड्रेसिंग रूममध्ये लवकरच माहौल होणार आहे हे नक्की Happy

आज भारत - कांगारू १९ वर्षखालील वर्ल्डकप उपांत्य सामना आहे.

काल इंग्रज जिंकले परंतु अफगाण संघाने चांगली कामगिरी केली!

आपला नवोदित संघ उत्तम आहे! फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण उत्तम दिसतेय!

अफगाणची मॅच काटा झाली.. शेवटच्या तीन ओवर असताना फुल्ल चान्स होता. पण बघता बघता गमावली

अंडर19 सेमी- ऑसीज वि भारत -
आपलीं पोरं मस्त खेळताहेत. 290 केल्या आहेत. आतां ऑसीजना गुंडाळून फायनल गाठतीलच ! शुभेच्छा

Three talented youngsters from Maharashtra are in the starting XI.

Otswal, Tambe and Hangargekar.

I will not be surprised if Hangargekar is a hot property in IPL very soon and on the national selectors radar.
Fast bowling all rounders are a rare commodity in India.

"आपलीं पोरं मस्त खेळताहेत" - शेवटच्या (दुसर्या) २५ ओव्हर्समधे २००+ रन्स केले. शेवटची ओव्हर (२७ रन्स) तर कहर फटाकेबाजी केली. आता बॉलर्सनी सगळ्या नाड्या आवळल्या आहेत ऑस्ट्रेलियाच्या. कीप इट अप इंडीया! (त्या शॉ ला दिलेली दोन जीवदानं महाग नको पडायला.)

ह्या वन-डेज बघताना एकदम जुन्या वन-डेज बघितल्याचा फील येतो. सावध सुरूवात, भक्कम पायाभरणी आणि लेट फ्लरीश.

शेवटची ओव्हर (२७ रन्स) तर कहर फटाकेबाजी केली.
>>
अगदी...
प्लेअर्सवर कुठल्याही प्रकारचं प्रेशर बिल्कुल जाणवत नव्हतं.
या टीमचा हेड कोच ऋषिकेश कानिटकर आहे.

काल कांगारुंच्या मुलांचे क्षेत्ररक्षण अगदी पाकीस्तान स्टाईल झाले.

मिस्फिल्ड, झेल सोडणे, धावचित करायची सोप्पी संधी फलंदाजाने वाचायची आशा सोडली असताना गमावणे. त्याचा चांगला फायदा दोन्ही फलंदाजानी उचलला आणि हळू हळू धावांची गती वाढवत नेली!

*काल कांगारुंच्या मुलांचे क्षेत्ररक्षण अगदी पाकीस्तान स्टाईल झाले.* - +1.
*आणि हळू हळू धावांची गती वाढवत नेली!* -
200-2 स्कोअरच्या आसपास दोन्ही फलंदाज 90+ होते व ऑसीज गोलंदाज ऑफ स्टंपच्या खूप बाहेर गोलंदाजी करत होते. म्हणून धावांचा वेग कांहींसा मंदावला होता. नाही तर इतक्या विकेट हातीं असल्याने 300+ स्कोअर अगदीं सहज शक्य होता.

काल कांगारुंच्या मुलांचे क्षेत्ररक्षण अगदी पाकीस्तान स्टाईल झाले.>>>>ऑसीज ना आयपीएल मध्ये खेळायचं आहे. भारताविरुद्ध जिंकणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं आहे.

*भारताविरुद्ध जिंकणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं आहे.* - मोठयांच्या बाबतीत कदाचित हें म्हणता येईल पण अंडर -19 मुलांच्या बाबतीत नाहीं शक्य वाटत. Wink

भारताविरुद्ध जिंकणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं आहे.* - मोठयांच्या बाबतीत कदाचित हें म्हणता येईल पण अंडर -19 मुलांच्या बाबतीत नाहीं शक्य वाटत ----- ऋन्मेऽऽष सिध्द करु शकतो.

ऑसीज ना आयपीएल मध्ये खेळायचं आहे. भारताविरुद्ध जिंकणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं आहे.>>>

अहो बोकलत, असा वाईट क्षेत्ररक्षण वैगेरे खेळ करून कोण विचारणार त्यांना आयपीएल मध्ये? बोकलत, तुमचे म्हणणे जरा विस्कटून सांगा म्हणजे समजेल!

ऋन्मेऽऽष सिध्द करु शकतो
>>>>

सिद्ध मी काहीही करू शकतो. हा विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद Happy
पण ईथे माझे मत वेगळे आहे. लहानांच्या बाबतीत असे काही संभवत नाही. तसेच मोठ्यांच्या बाबतीतही याची शक्यता तशी नाहीच. अगदीच अपवादात्मक केसमध्ये एखादा खेळाडू आधीच कोहलीच्या आयपीएल संघात असेल आणि त्याने कोहलीचा एखादा झेल सोडला वा त्याला ईजी रन्स दिले, वा त्याच्यासमोर आपले १०० टक्के दिले नाही वगैरे शक्य आहे. पण ओवरऑल भारतीयांना खुश करायला भारताशी हरणे यात काही लॉजिक नाही. ईंटरनॅशनल क्रिकेट जवळपास साफसुधरे आहे. अपवाद पाकिस्तान. मला त्यांच्यावर भरवसा नसतो. त्यांनी कोचचाही बळी घेतलाय.

" आता अगदीच अपवादात्मक केसमध्ये एखादा खेळाडू आधीच कोहलीच्या आयपीएल संघात असेल आणि त्याने कोहलीचा एखादा झेल सोडला वा त्याला ईजी रन्स दिले, वा त्याच्यासमोर आपले १०० टक्के दिले नाही वगैरे शक्य आहे " नि " ईंटरनॅशनल क्रिकेट जवळपास साफसुधरे आहे" हे असे सफाईदारपणे दोन दगडांवर पाय ठेवणे फक्त आपल्यालाच जमू शकते सर. कळिचा प्रश्न हा की आता म्हणजे आता शर्मासाठी (किंवा राहूल साठी) होणार ना हे असे ? हे फक्त ऑसीज पुरते मर्यादीत आहे कि किवीज, ब्रिटीश, लंकन , सा. आफ्रिकन वगैरे पण करतात म्हणे.

जवळपास हा शब्द याचसाठी वापरला आहे असामी

आणि मी ऑसीज वा कुठल्याच देशाचे नाव घेतले नाही. एखादा खेळाशी प्रतारणा करणारा खेळाडू कुठल्याही देशात निपजू शकतो.

मुंबई, 3 फेब्रुवारी: भारत-वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा पाचवा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वी बुधवारी झालेल्या कोरोना टेस्टमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), शिखर धवन (Shikhar Dhawan), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) हे चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ऑल राऊंडर अक्षर पटेलला (Axar Patel) कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. 'टाईम्स नाऊ' नं याबाबतचे वृत्त दिले आहे.

मुंबई, 3 फेब्रुवारी: भारत-वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा पाचवा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वी बुधवारी झालेल्या कोरोना टेस्टमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), शिखर धवन (Shikhar Dhawan), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) हे चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ऑल राऊंडर अक्षर पटेलला (Axar Patel) कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. 'टाईम्स नाऊ' नं याबाबतचे वृत्त दिले आहे.

*मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा पाचवा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. *-
निवडसमितीचं काम सोपं करतेय कोरोना टेस्ट !! Wink

"कमीत कमी पोपच्या दरबारातला अमलदार तरी नक्कीच झाला असतास" - Lol

भारत हजारावी वन-डे खेळणार आहे रविवारी. किशन किंवा मयंक ओपन करेल शर्मा बरोबर.

Pages