क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इनर सर्कल मधे फील्डर्स कमी झाल्यानी नो-बॉल काल किती वेळा मिळाला? (मी दोनदा पाहिला)
या आधी हे तितकं पाहिलं नाहिये... >> फिल्डर्स बाहेर उभे राहून चालत आत येत असत त्यामूळे कठीण होते लक्ष ठेवणे. म्हणजे अंपायरला दहा मुंडकी असल्याशिवाय कठीण आहे ना.

राहणे शास्त्रीवर वैतागला आहे एकंदर असे दिसते त्याची मुलाखत वाचून .

एकेकाळी आत किमान ४ प्लेअर हवेत असा नियम होता.
आता पॉवरप्ले २ ला किमान ५ आत चा नियम आहे
मग ४० ओवरनंतर पुन्हा ४ च आत चालतात.
बहुधा २०-२० ला पहिल्या पॉवरप्ले नंतर ४ चाच नियम आहे.
खूप दिवसांनी शर्मा वन डे खेळला. त्यातही कप्तान म्हणून .. विसर पडत असेल त्याला.. पंतला मोजायचे काम द्यावे.

कर्णधार रोहितचा विजयरथ सुस्साट; कमी वेळातच कोहली, कपिल देव यांना मागे सोडत बनला ‘एक नंबर’

रोहित सर्वात कमी सामन्यांमध्ये संघांला १० विजय मिळवून देणारा भारतीय कर्णधार बनला आहे. रोहितने आतापर्यंत फक्त १२ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यापैकी केवळ २ सामने गमावत त्याने १० सामना विजयांचा आकडा पूर्ण केला आहे. याबरोबरच त्याची वनडेतील विजयी सरासरी ८३.३३ इतकी राहिली आहे.

यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० विजय मिळवण्याचा विक्रम विराटच्या नावे होता. त्याने कारकिर्दीतील अवघ्या १३ व्या वनडेत दहावा विजय मिळवला होता. त्याच्यानंतर कपिल देव यांनी १५ सामन्यांमध्ये हा किर्तीमान केला होता. तर मोहम्मद अझरुद्दीन (१७ सामने), सौरव गांगुली (१९ सामने) यांनीही २० पेक्षा कमी डावांमध्ये १० विजय मिळवले होते. तसेच राहुल द्रविड (२० सामने), एमएस धोनी (२२ सामने), सचिन तेंडूलकर (२९ सामने) आणि सुनिल गावसकर (३३ सामने) हेदेखील या यादीमध्ये आहेत.

भारत - 265 पहिल्या 3 फलंदाजांचा हातभार- 23 धांवा. हें असं नियमितपणे होणं ही धोक्याची घंटा आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये पहिली वनडे मालिका १९८३ मध्ये पार पडली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये २१ वनडे मालिका झाल्या आहेत. या २१ वनडे मालिकांमध्ये भारतीय संघ एकही वेळेस वेस्ट इंडिज संघाला क्लीन स्वीप करू शकला नाहीये. तर वेस्ट इंडिज संघाने भारतीय संघाला ३ वेळेस क्लीन स्वीप केले आहे. त्यामुळे हा सामना भारतीय संघांच्या दृष्टीने मोठा सामना असणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ नवा विक्रम रचू शकतो

*यांच्याव्यतिरिक्त कोणालाही वेस्ट इंडिजविरुद्ध तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक करता आलेले नाही.*, *कमी वेळातच कोहली, कपिल देव यांना मागे सोडत बनला ‘एक नंबर* ,* सामना जिंकून भारतीय संघ नवा विक्रम रचू शकतो* - एक प्रामाणिक शंका - असले विक्रम खरंच अर्थपूर्ण किंवा मह्त्वाचे आहेत का ? उपलब्ध आंकडेवारी चाळत बसलं तर असे अनेक 'विक्रम' शोधून काढणं शक्य असावं.

१) पहिल्यांदा विंडीजला व्हाईटवॉश देतोय हे अर्थपुर्ण नसेल तर द्विपक्षीय मालिकांना अर्थच काय उरला Happy

२) तीन फॉर्मेटमध्ये शतक मारणारा प्लेअर त्याचा विविध फॉर्मेटशी जुळवून घ्यायचा क्लास दाखवतो. सर्व प्लेअरना नाही जमत हे. जर जगभरातल्या कंडीशनमध्ये खेळणार्‍या सचिन राहुलचे कौतुक करू शकतो. तर तिन्ही फॉर्मेट गाजवणार्‍याचेही कौतुक करू शकतोच.

३) पहिल्या दहा बारा सामन्यात कप्तानीत शर्मा सर्वप्रथम हे हाऊजी मधील जल्दीफाईव्ह सारखे आहे. फुल हाऊस ५०० रुपये असेल तर जल्दी फाईव्ह जिंकणार्‍याला देखील पन्नास शंभर रुपये द्यायला हरकत नाही Happy

ते हारजीत वगैरे होतच राहिल पण कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघापेक्षा हा संघ अधिक मोकळाढाकळा आणि उत्साही वाटला!!

1) *पहिल्यांदा विंडीजला व्हाईटवॉश देतोय हे अर्थपुर्ण नसेल तर द्विपक्षीय मालिकांना अर्थच काय उरला* - 21 मालिकांत 3वेळ वे.इंडीजने व प्रथमच आपण व्हाईटवॉश देतोय यात अर्थपूर्ण काय आहे ? 19-20 वेळ त्यानी व्हाईटवॉश देवून आतां आपण दिला तरच तें वैशिष्ट्यपूर्ण होईल, असं मला वाटतं.
2) *यांच्याव्यतिरिक्त कोणालाही वेस्ट इंडिजविरुद्ध तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक करता आलेले नाही.*, *इतर
किती जणांना असं करण्याची किती संधी मिळाली, कोणत्या गोलंदाजी विरूद्ध, कोणत्या विकेटसवर हे लक्षात न घेतां त्याना '.... शतक करतां आलेलं नाहीं ' असं कसं म्हणता येईल.
3) केवळ सामने जिंकले हे कर्णधार चांगला असण्याचा पुरावा नाहीं, हें माझं इथे मांडलेलं ठाम मत आहे.

3) केवळ सामने जिंकले हे कर्णधार चांगला असण्याचा पुरावा नाहीं, हें माझं इथे मांडलेलं ठाम मत आहे.
>>>>>
अरे वाह, हे तर माझेही मत आहे. किंबहुना ज्या कोणालाही क्रिकेटचा गंध आहे त्याचे प्रत्येकाचे हे मत असेल. कारण आपला संघ काय आहे आणि समोरचा संघ कसा आहे हे दोन महत्वाचे फॅक्टर आहेत जे दोन कर्णधारांच्या तुलनेत कधीच कॉन्स्टंट नसतात.

त्यामुळे धोनी आणि शर्मा हे केव्हाही कोहलीपेक्षा चांगलेच कर्णधार आहेत हे सांगायला मलाही कुठलेही आकडे शोधावे लागत नाहीत. ते मत मी माझ्या क्रिकेटच्या समजेवरूनच बनवले आहे.

पण त्याचवेळी कर्णधाराचे काम संघाला जिंकवून देणे हेच असते हे देखील विसरून चालणार नाही. त्यामुळे दोन कर्णधारांच्या तुलनेला हा एकच निकष योग्य नसला तरी त्या त्या कर्णधाराच्या कामगिरीचे मूल्यमापन करायचा हाच पहिला निकष झाला.

2) *यांच्याव्यतिरिक्त कोणालाही वेस्ट इंडिजविरुद्ध तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक करता आलेले नाही.*, *इतर
किती जणांना असं करण्याची किती संधी मिळाली, कोणत्या गोलंदाजी विरूद्ध, कोणत्या विकेटसवर हे लक्षात न घेतां त्याना '.... शतक करतां आलेलं नाहीं ' असं कसं म्हणता येईल.
>>>>>>>
हे असले स्टॅटस आणि रेकॉर्ड त्या त्या खेळाडूचे कौतुक करायला लोकं शेअर करतात. याचा अर्थ ज्यांना हे जमले नाही वा संधीच मिळाली नाही त्यांना हलके दाखवायला नसते ते.

त्यामुळे दोन कर्णधारांच्या तुलनेला हा एकच निकष योग्य नसला तरी त्या त्या कर्णधाराच्या कामगिरीचे मूल्यमापन करायचा हाच पहिला निकष झाला. >> Lol

अय्यर ने आज मस्त खेळून पंचाईत करून ठेवली आहे. मधल्या फळीत राहुल, अय्यर, यादव पक्के धरले तर पंत सहाव्या क्रमांकावर येणार - म्हणजे सहावा बॉलर उडाला. राहुल वन डे मधे कीपिंग करू शकला तर सहावा बॅटींग-ऑल राऊंडर (पांड्या/अय्यर्/हूडा) हि चैन परवडू शकते. जाडेजा परत आला कि सात-आठ क्रमांकासाठी जाडेजा/सुंदर्/ठाकूर्/चहर अशी चुरस असणार आहे. वर्ल्ड कप मात्र डाउन अंडर असल्यामूळे लेगी हवा हे धरले तर अजून गम्मत होणार. दुसरा ओपनर धवन हे नक्की वाटतेय का ? वे. अय्यर परत आयपील मधे ओपन करून खेळून गेला तर खरच त्याला दुसरा ओपनर म्हणून वापरून बघायला हवे. एक एक्स्ट्रा बोलर पण मिळतो नि एक रिकामी जागा खाली तयार होते जि सामन्यागणीक वापरता येईल.

वेस्ट इंडीज संघाविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय सलामीवीर फलंदाज :
१०२४ धावा – सचिन तेंडुलकर
१०२४ धावा – रोहित शर्मा
१०१५ धावा – सौरव गांगुली

हा लवकर फॉर्मात यायला हवे.

With the dismissal, Kohli ended the West Indies ODI series scoring just 26 runs which includes scores of 8 off 4 and 18 off 30 respectively in the first two games. It is the second-lowest he has ever scored in a three-match bilateral ODI series and the first since the home series against Pakistan in 2012/13, where he had managed only 13 runs in three innings averaging 4.33.

रहाणेने गेमवर फोकस करावा आणि बॅटने उत्तर द्यावे. हे असे वाद ऊकरून का काढतोय?
...

‘बॅकस्टेज विथ बोरीया’ कार्यक्रमात अजिंक्य रहाणेने मौन सोडलं व करीयर संबंधीच्या तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल भाष्य केलं. बॉर्डर-गावस्कर मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने संघाचं नेतृत्व केलं. रहाणेने प्रथमच एक मोठं विधान केलं आहे. “मैदानात तसंच ड्रेसिंग रुममध्ये मी काही निर्णय घेतले पण कोणी दुसऱ्यानेच त्याचं श्रेय घेतलं” असं रहाणे म्हणाला. अजिंक्य रहाणेचा रोख नेमका कोणाकडे आहे, ते स्पष्ट झालेलं नाही.

अजिंक्य रहाणेचा रोख नेमका कोणाकडे आहे, ते स्पष्ट झालेलं नाही. >>
सर, माझे कालचे पोस्ट बघा "राहणे शास्त्रीवर वैतागला आहे एकंदर असे दिसते त्याची मुलाखत वाचून ." अर्थात बाण शास्त्री वरच नाही तर अश्विन वर पण आहे. सोशल मिडियावर लोक शेअर करताहेत.

असामी ओके. मी ती बातमी कॉपीपेस्ट केली आहे. त्याचा रोख कोणावर का असेना. मला हे अनावश्यक वाटले. पब्लिक सब जानती है. त्या काळात सोशल मिडियावर त्याच्या नावाचा जयघोष चालू होता. पब्लिक त्याला क्रेडीट देत होतीच. पण नंतर त्यानेच आपल्या मैदानावरील खेळाने माती केली. आणि या काळात त्याला एक फलंदाज म्हणून पुरेपूर संधी मिळाली आहे. त्याबाबत त्याच्याशी कसलेही राजकारण झाले नाहीये. उलट तो ईतका लाडका का आहे असा पब्लिकमध्ये ओरडा व्हावा ईतकी संधी सातत्याने अपयशी ठरूनही मिळाली आहे. आणि अजूनही मिळेल कारण कसोटीत स्पर्धा कमी आहे. ईथे टिकायचे असल्यास तंत्राला पर्याय नाही. नवोदीतांमध्ये शॉर्ट बॉलवर उड्या मारणारा श्रेयस अय्यरसारखा एखादा भारतात चमकेल. पण बाहेर जाताच पुन्हा संगीत खुर्ची चालू होईल हे निवडसमितीलाही ठाऊक आहे. त्यामुळे ज्यांनी तंत्राच्या कसोटीवर स्वत:ला सिद्ध केले आहे त्या पुजारा रहाणे जोडीवर कायमस्वरुपी फुल्ली कधीच मारली जाणार नाही.

मला हे अनावश्यक वाटले. >> असा बघा सर. राहाणे एक सामान्य खेळाडू आहे. (म्हणजे प्लेयर म्हणून सामान्य नाही तर 'सामान्य खेळाडू' आहे - साधू नाही) जीवनाकडे तटस्थ रित्या बघायची स्थितप्रज्ञता त्याला आलेली नाही. षड.रिपूंवर विजय मिळवण्याची तपस्या अजून सुरूही नाही झालीये त्याची. इतकी वर्षे तो त्याच्या स्थानाबद्दल किवा त्याला मिळणार्‍या ट्रीटमेंट बद्दल कधीच काही बोलला नाहीये. त्याच्या मतेतो अजूनही चांगला खेळतोय. मॅच प्रॅक्टीस नाही हे बघता जमेल तेव्हढे करतोय - त्याने रणजीचा उल्लेख केला मूळ मुलाखतीमधे. पण निवड समिती त्याच्या पाठी लागली आहे. उपकर्णधारपण गेलय. कोहली गेल्यामूळे कसोटी संघात स्थान असेल कि नाही हे माहित नाही. त्याने केलेल्या कामगिरीचे पुर्से क्रेडीट त्याला मिळत नाही हे जाणवतेय. अशा वेळी त्याने आपले फ्रस्ट्रेशन व्यक्त केले फारसे चुकीचे नसावे नाही का ?

शर्माचा विजयरथ आता रोखणे अशक्य आहे. सगळ्यांना चिरडत जाणार आता तो. आता अजून एक गोष्ट व्हायला हवी ती म्हणजे कोहलीला शाल नारळ देऊन त्याचा सेंड ऑफ करावा. म्हणजे चांगल्या नवोदित खेळाडूंना संधी मिळेल आणि दुसरं म्हणजे आपल्याला पण सोशल मीडियावर कोहली फॅन्सच्या पोस्टी वाचायला नाही मिळणार. त्यांचं दुःख बघून वाईट वाटतं मला पण काय करणार.

अशा वेळी त्याने आपले फ्रस्ट्रेशन व्यक्त केले फारसे चुकीचे नसावे नाही का ?
>>>>

फ्रस्ट्रेशनमध्ये काही बोलून त्याला फायदा शून्य आणि नुकसानच जास्त होणार आहे. मी त्याच्या भल्यासाठीच सांगतोय की हे अनावश्यक आहे. त्याला काही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाहीये.
असो, मी भारतीय क्रिकेटचा हितचिंतक आहे आणि टेस्ट मॅच लव्हर. फॅब फोर काळाचा वारसा चालवणारे रहाणे-पुजारा एकत्रितपणे संघातली जागा गमावण्याच्या स्थितीत आले आहेत हे दुर्दैवी आहे.

काल श्रेयस अय्यरने ८० मारले आणि सामनावीरही पटकावला. पण ज्यांनी मॅच पाहिली त्यांना लक्षात येईल की त्याचा शॉर्ट बॉल प्रॉब्लेम कायम होता. तो त्याला सोडवावाच लागणार अन्यथा बाहेर खेळताना तो माझ्या कसोटी संघात कधीच नसेल. किंबहुना येता २०-२० वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात आहे. तिथेही तो सध्या तरी माझ्या अकरात नाहीये. मिडलला सुर्या आणि पंतच हवेत.

पाॅटींगने शाॅची अगदीं खास स्तुति केलेली आज वाचनात आली. ( ' .. Everyone's known a bit about him for the last couple of years. I still think he is learning a lot about himself as a person and learning a lot about himself as a player. I am not sure I have seen many better to be totally honest," ) आपल्या संबंधित निवड तज्ञानी तर शाॅवर काटच मारलेली दिसते ! Sad

मुंबईच्या रणजी टीमचा कॅप्टन यंदा पृथ्वी शॉ आहे आणि रहाणे त्याच्या नेतृत्वाखाली रणजी खेळणार आहे. दोघेही फॉर्म मधे येवोत.

“ अशा वेळी त्याने आपले फ्रस्ट्रेशन व्यक्त केले फारसे चुकीचे नसावे नाही का ?” I agree. People should cut him some slack. इतकी मोठी गोष्ट नाहीये क्वचितप्रसंगी मनातलं फ्रस्ट्रेशन बोलून दाखवणं.

सीएसकेचा लूक फारसा बदलला नाहीये आजच्या ऑक्शन नंतर. फक्त आता ओपनिंगला ऋतुराजबरोबर कोण येणार (फाफ नसल्यामुळे)? उथप्पा का मोईन?

मुंबईने बेबी-एबी ला घेतलंय. मस्त शॉट्स आहेत त्याचे.

दिल्ली आणि राजस्थानने बरेचसे बेसेस कव्हर केले आहेत!!
मुख्यतः अश्विन आणि चहलला घेऊन राजस्थानने बरेच वर्षांनी स्पिनवर फोकस केला आहे!!
बंगलोर परत एकदा माती खायच्या वाटेवर दिसतायत!!
मुंबईचे काल काय चालले होते? हार्दिक, कृणाल, बोल्ट, चहर, डीकॉक ची रिप्लेसमेंट कुठाय??

हो!! काल कुठेतरी ऐकले की चेन्नईने नवीन जर्सीचे पैसे वाचवले >> Happy

एकून सगळ्या संघांमधले हायेस्ट पेयर्स बघितले तर राहुल सोडून बाकीचे त्या प्राईस रेंज मधले वाटत नाहीत. मुंबई ने एकाही अंडर १९ वाल्या ला घेतले नाही हे गमतीचे होते. फारसे माहितीचे बॅकप दिसत नाहित मुंबई कडे जर पहिली फळी गडबडली तर. बहुधा अन सोल्ड प्लेयर्स मधे उचलणार असावेत. यंदा वानखेडे असूनही स्पिन वर फारसा लक्ष दिलेले दिसत नाहिये. बुमरा , आर्चर नि मिल्स जर एकत्र बॉलिंग करू शकले तर मजा येईल पुढच्या वर्षी. फॅन फेव्हरिट " जयदेव " मुंबई मधे आला.

डेव्हॉन कॉनवे नि लिव्हिंगस्टोने बरेच स्वस्त गेले.

Pages