क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण कर्णधार निवडताना तो सामने जिंकणारा आहे कीं हरणारा हें कसं ठरवायचं ? >> Happy नाही ठरवता येत पण ठरवल्यानंतर त्याला श्रेय नाकारणे कसं श्रेयस्कर ठरेल ? अपयश नि यश दोन्हींची जबाबदारी त्याची असणारच. कोहलीच्या ऑन फिल्ड वर्तनाबद्दल कप्तान म्हणून त्याला हे शोभत नाही असे म्हणणे जर योग्य ठरत असेल तर कप्तान म्हणून संघाच्या कामगिरीचे श्रेय्/अपश्रेय त्याच्या खांद्यावर देणे कसे टाळता येईल. कप्तान म्हणून कोण किती यशस्वी ठरेल नि पेपर वर बलवान दिसणारी टीम नेमकी कशी सांघिक कामगिरी करेल इ. हे सांगता येणे अशक्य आहे त्यामूळे कॅप्टन ईज अ‍ॅस गूड अ‍ॅस टीम हे गेट्स हे मलाही अंशतः मान्य आहे पण सलग पाच सहा वर्षांच्या कालावधी मधे एखाद्याची टीम जिंकत असेल - तो कप्तान नसताना त्यात इर्षेने संघ खेळत असेल आणी वर फे. फ. म्हणतो तसे "निव्वळ जिंकत असेल असे नाही तर त्यांनी जिंकणे हे गृहित धरण्याएव्हढे जिंकत असेल" तर त्यात कप्तानाचा वाटा नसेल हे धाडसी विधान वाटत नाही ?

मूळ प्रश्न बाजूलाच राहिला मात्र Happy

" निव्वळ जिंकत असेल असे नाही तर त्यांनी जिंकणे हे गृहित धरण्याएव्हढी जिंकत असेल तर त्यात कप्तानाचा वाटा नसेल हे धाडसी विधान वाटत नाही ?" - अ‍ॅग्रीड!! कोहलीच्या 'risk the defeat in pursuit of victory' अ‍ॅटीट्यूड चा, पाच जेन्युइन बॉलर्स खेळव्ण्याच्या स्ट्रॅटेजीचा ह्यात मोठा वाटा आहे हे नाकारता येत नाही. एके काळी सुरेश रैना ला पाचवा बॉलर म्हणून खेळवणार्या (बॅटींग मजबूत करण्यासाठी) टीमसाठी हा मोठा कल्चर चेंज होता. इंडीयन टेस्ट टीम 'सेफ्टी फर्स्ट' अ‍ॅप्रोच पासून 'सिरीज विन' पर्यंत पोहोचण्यामागे कोहलीच्या माईंडसेटचा मोठा वाटा होता असं मला वाटतं.

कपिलदेवच्या बाबतीत तो ग्रेट कप्तान असण्याचे मुद्दे - (१) त्याने लीड फ्रॉम फ्रंट‌ करत वैयक्तिक खेळाच्या ताकदीने संघाला पुढे खेचले (भारत सतत हरण्याऐवजी नियमित बरोबरी साधायला लागला), (२) त्याने भारतीयांमध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण केली, (३) फास्ट बॉलर असूनही प्रचंड फिट राहिला आणि एकसंध कप्तानी केली - हे‌ मी तरी ऐकलेले आहेत. कपिलच्या रिचर्ड्स कॅचची चर्चा होते‌ किंवा‌ १७५ची चर्चा होते, किंवा जनरल ॲटिट्यूडची चर्चा होते तशी मी कपिलच्या अमुक एका टॅक्टिकल डिसीजनची चर्चा कुठे फार वाचलेली नाही. त्याच्यानंतरची ९०च्या दशकातली टीम साहेब कन्सिस्टंट आणि इतर अधूनमधून चमको हे सोडल्यास काही फार स्ट्राँग नव्हती. मात्र त्या टीमसाठी प्लेयर्स ग्रूम करायची जबाबदारी कपिल खेळत असताना त्याच्या डोक्यावर कोणी दिल्याचे ऐकिवात नाही. मग हे सगळे कोहलीसाठी का? वरील तिन्ही मुद्दे कोहलीला कमीत‌ कमी कपिलइतकेच लागू होतात, असे‌‌‌ मला‌ वाटते. त्याने तर इतरांच्या फिटनेसवरही जोर आणला.

२००७मध्ये पाँटिंग निवृत्त झाल्यावर ऑस्ट्रेलिया काही वर्षे ढेपाळली होती. तेवढे चांगले रिप्लेसमेंट प्लेयर्स नव्हते. त्याबद्दल कोणी पाँटिंगला काही म्हणाले का? टेस्ट इतिहासातल्या सर्वात यशस्वी कप्तानांपैकी एक, ह्या त्याच्या रेकॉर्डला त्यामुळे बाधा आली का? रणजी सिस्टम, कोचेस, सपोर्ट स्टाफ, सिलेक्टर्स ह्या लोकांचं काम काय आहे‌ नक्की?

भा, योगायोग म्हणशील पण पॉटींग बद्दल मी हे (नि बाकीचे अ‍ॅटिट्युड, बॅकप वगैरे ) लिहून उडवले होते. कोहली ची कॅप्टन्सी नि पाँटिंग ची ह्यात मला त्यांच्या बेदरकार अ‍ॅट्युट्युड मूळे प्रचंड साम्य वाटते. फक्त उगाच नवा फाटा नको म्हणून उडवले होते.

प्लेयर ग्रूम करण्याबाबत कपिल कशाला वाडेकर पासून गावस्कर ते गांगुली पर्यंत खेचता येईल. प्रत्येक भारतीय कप्तानाने आपापल्या आवडीप्रमाणे प्लेयर्स बॅक केले आहेत (ग्रूम नाही) नि नावडिचे बाजूला ढकलले आहेत. ह्यूमन टेंडंसी आहे.

सर्वगुणसंपन्न कप्तान कोणीच कधीही नव्हता नि नसेल. विनिंग कप्तान कोण हे मह्त्वाचे !!!

*तर त्यात कप्तानाचा वाटा नसेल हे धाडसी विधान वाटत नाही ?* - जो कर्णधार असतांना संघ जिंकतो तोच उत्तम कर्णधार, असं समीकरण मांडणं तर मला अधिक धाडसाचं वाटतं ! एकही मध्यमगती म्हणण्याइतपतही गोलंदाज किंवा दिग्गज फलंदाज संघात नसतांना वे.इंडिजच्या बलाढ्य संघाला तगडं आव्हान देणारा वाडेकर हा हरणार्या संघाचा कर्णधार असता तरीही आतांच्या यशस्वी कर्णधारांपेक्षा सरसच ठरला असता. पाॅटींग इतका यशस्वी असूनही स्वतच्या देशातही लोकप्रीय नव्हता हें चांगलया कर्णधारांचं लक्षण समजायचं कां ?

“ पाॅटींग इतका यशस्वी असूनही स्वतच्या देशातही लोकप्रीय नव्हता हें चांगलया कर्णधारांचं लक्षण समजायचं कां ?” - कॅप्टन्सी ही popularity contest नाहीये. शेवटी ‘जॉब वेल डन‘ हा महत्वाचा निकष असावा. कुठेतरी ब्रॅडमन, बॉयकॉट ही मंडळी सुद्धा लोकप्रिय नसल्याचं (अगदी त्यांच्या टीममेट्समधे सुद्धा) वाचलंय. पण फलंदाज म्हणून त्यांच्या मोठेपणाला त्याने धक्का लागत नाही.

*पण फलंदाज म्हणून त्यांच्या मोठेपणाला त्याने धक्का लागत नाही.*- फलंदान म्हणून नाहींच लागत पण कर्णधार म्हणून मोठेपणाला नक्कीच धक्का लागतो.

*कॅप्टन्सी ही popularity contest नाहीये. शेवटी ‘जॉब वेल डन* हा महत्वाचा निकष असावा * -प्रश्न कर्णधार popular असण्याचा नाहीं, क्रिकेट unpopular होण्याचा आहे. मला निव्वळ जिंकणारा नाहीं तर तसं करतांना खेळही लोकप्रिय करणारा कर्णधार भावतो. He only deserves ' जाॅब वेल डन ', असं मला वाटतं. क्रिकेटची आवड माझ्या मनात रुजली, फोफावली त्यावेळी' सामने जिंकणं ' आपल्याला माहितही नव्हतं पण क्रिकेटची आवड आतां इतकीच तीव्र होती, हें कारण असेलही.
( Perhaps, ' bodyline bowling' is the most glaring example of how blindly glorifying a winning captain can ruin spirit of any game )

खरंच हा एकच निकष कर्णधार होण्यासाठी पुरेसा समजणं योग्य आहे का ? तशी तर विराटची संघातील जागाही रोहितएवढीच पक्की असावी .>> भाउ , विराटला कर्णधार म्हणून रहायच नाहीये त्याला काय करणार ?
कर्णधाराची मुख्य जबाबदारी सामने जिंकण्याची आहे. मग त्यात टीम बिल्डिंग, विजिगिषू वृत्ती, मिडिया हँडलिंग, इमेज बिल्डिंग आणि महत्वाचे म्हणजे सगळ्या स्टेक होल्डर्स ना मॅनेज करणे या कला आल्या की लाँगेटिविटी ठरते.

काहीही म्हणा कोहली गेला ते भारतीय क्रिकेटसाठी खूप बरं झालं. आता महत्वाचे सामने आणि ट्रॉफ्या भारत जिंकायला लागणार हे नक्की.

"फलंदान म्हणून नाहींच लागत पण कर्णधार म्हणून मोठेपणाला नक्कीच धक्का लागतो." - प्रश्न पॉप्युलॅरिटीचा चालला होता, म्हणून ती उदाहरणं घेतली. ब्रॅडमन ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता. बॉयकॉट इंग्लंड चा होता की नाही ते नक्कीआठवत नव्हतं.

"मला निव्वळ जिंकणारा नाहीं तर तसं करतांना खेळही लोकप्रिय करणारा कर्णधार भावतो" - वैय्यक्तिक मताचा आदर आहेच, पण कर्णधार म्हणून निवड होत असताना - कुठल्याही खेळासाठी - असा निकष लावला जातो का? दुसरं म्हणजे, जिंकण्यासाठी नियमबाह्य वागण्याच्या घटना सोडल्या (स्टीव्ह स्मिथ - सँडपेपर), तर केवळ आपल्या वागण्याच्या मापदंडात बसत नाही असं वागणार्या किती कॅप्टन्समुळे (स्टीव्ह वॉ, पाँटींग, कोहली... अगदी कुणीही असेल) क्रिकेट अनपॉप्युलर झालंय?

कोहलीची टेस्ट क्रिकेटबद्दलची पॅशन‌ आणि भारतीय क्रिकेटमधलं त्याचं स्थान ही गोष्ट टेस्ट क्रिकेटसाठी अत्यंत हितकारक आहे, असं मत गावस्कर, चॅपेल आणि बऱ्याच लोकांनी वेळोवेळी मांडलेलं आहे. रवी शास्त्रीनेही हे त्याच्या आगामी आत्मचरित्रात म्हटलं आहे.

'पण कर्णधार म्हणून निवड होत असताना - कुठल्याही खेळासाठी - असा निकष लावला जातो का? ' -हा निकष लावला जात नाहीं कारण राष्ट्रीय संघाच्या कर्णधारांकडून ती मूलभूत अपेक्षा गृहीतच धरली जाते .

जो कर्णधार असतांना संघ जिंकतो तोच उत्तम कर्णधार, असं समीकरण मांडणं तर मला अधिक धाडसाचं वाटतं ! >> सॉरी ह्यात वाक्या तल्या "तोच" मधला "च" तुम्ही गृहित धरताय. मी कोहली ला यशाचे श्रेय न देण्याबद्दल बोलत होतो. गैरसमज नको. तुम्ही वाडेकरांचे उदाहरण दिलेत वर. (मी उदाहरण टाळत होतो कारण वेगळे फाटे फुटत जातात .) वाडेकर ७४ मधे हरल्यावर काय झाले ह्याची आठवण येता पॉप्युलॅरिटी चा बेस काय आहे हे उघड आहे. धोनी हरल्यावर हेच धोनीबाबतही झाले होते.

कारण राष्ट्रीय संघाच्या कर्णधारांकडून ती मूलभूत अपेक्षा गृहीतच धरली जाते . >> हे मान्य आहे पण कामगिऋचे मूल्यमापन खेळ किती पॉप्युलर केला, किती आतिमियतेने वागला, किती ग्रूम केले ह्यावर होताना झाल्याचे आठवत नाही. बिसीसीआय शी राडा झाल्यामूळॅ कप्तानपद गेलेले उदाहरणे वगळता, मह्त्वाच्या सिरीज हरल्यामूळे कप्तानपदे जात आली आहेत. हे भारतापुरते सिमीत नाही त्यामूळे यशा हा क्रायटेरिया कप्तान कसा आहे हे ईव्हॅल्युअएट करताना वापरला जातो हे उघड आहे. त्यामूळे यशाचे श्रेय नि अपश्रेय कप्तानाच्या गळ्यात असणे मला लॉजिकल वाटते. तिथे ते नाकरण्यात काय हशील हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो.

"कारण राष्ट्रीय संघाच्या कर्णधारांकडून ती मूलभूत अपेक्षा गृहीतच धरली जाते ." - भाऊ, राष्ट्रीय संघातून खेळणार्या प्रत्येक खेळाडूंकडून च त्याने
देशाचा आणि खेळाचा चांगला अँबेसेडर असण्याची अपेक्षा आहेच. पण मूळ विषय जिथून सुरू झाला तिथे परत जाऊ.

"पाॅटींग इतका यशस्वी असूनही स्वतच्या देशातही लोकप्रीय नव्हता हें चांगलया कर्णधारांचं लक्षण समजायचं कां "

विराट कोहलीच्या आक्रमक वागणुकीत त्याने क्रिकेटच्या कुठल्या नियमांचं उल्लंघन केलं? ना तो मॅच फिक्सिंग मधे अडकला, ना त्याने बॉल टँपरिंग सारखे प्रकार केले, ना खेळात खोटेपणा केला. त्याचं वर्तन आदर्श होतं असं त्याचे खंदे समर्थक सुद्धा म्हणणार नाहीत. पण भारतीय राष्ट्रीय संघाचं नेतृत्व करताना विराट कोहली ने भारताला किंवा क्रिकेटला शरमेनं मान खाली घालायला लावली असा आरोपही त्याच्यावर करता येणार नाही.

Seriously! Stump episode अतिशय लाजिरवाणा होता.

हो. तो स्टंप एपिसोड खरेच लाजिरवाणा होता.
आश्विन हा सुद्धा ईतका बुद्धीमान प्राणी असून या बाबतीत नेहमी घाण करतो.
पण मला वाईट वाटले ते राहुलनेही हाच कित्ता गिरवल्याने. जणू पुढचा भारतीय कर्णधार म्हणून मलाही हे जमते हे एक क्वालिफिकेशन शो करत असल्यासारखे वाटले.
याच कारणासाठी मला आधी शर्मा आणि नंतर चुम्मा उर्फ ऋषभ पंत कर्णधार झालेले बघायचे आहे. हे दोघे खेळाचे योग्य स्पिरीट नक्कीच राखू शकतात.

*विराट कोहलीच्या आक्रमक वागणुकीत त्याने क्रिकेटच्या कुठल्या नियमांचं उल्लंघन केलं? * - कुठल्याही नियमाचं उल्लंघन न करतांही खेळाचा पूर्ण विचका करतां येतो - उदा. ' बाॅडीलाईन बोलींग '. जी त्यावेळी नियमबाह्य नव्हती!

बॉडीलाईन चं उदाहरण मान्य आहे. अशी नियमातल्या लूपहोल्स चा गैरफायदा घेतलेली उदाहरणं क्रिकेटमधे घडली आहेत उदा. अंडरआर्म बॉलिंग, अ‍ॅल्युमिनियम बॅट. पण कोहलीच्या कारकिर्दीत अशा काय घटना घडल्या की ज्यामुळे नियमात बदल करून त्या प्रकाराला आळा घालावा लागला? गूडबॉय च्या व्याख्येत कोहली कधीच बसला नाही, पण एक कॅप्टन म्हणून त्याने असे गैरप्रकार केल्याचं मला तरी आठवत नाही.

*पण एक कॅप्टन म्हणून त्याने असे गैरप्रकार केल्याचं मला तरी आठवत नाही.* - कोहलीवर तसा आरोप करणं माझ्या मनातही नाहीं. मीं फक्त 'जिंकतो तोच चांगला कर्णधार ' या समीकरणाविरूद्ध आहे ( जरी वास्तवात तसं होत असलं तरीही).
कोहलीची अति आक्रमकता बालीश आहे व ती खेळाच्या आनंदाआड येते, हें माझं वैयक्तिक मत व आक्षेप , इतकंच.

जर कुठल्याही परिस्थितीत सहावा गोलंदाज वापरायचा नाहीये तर अय्यर किंवा हार्दिक अश्या अष्टपैलू खेळाडू चा हट्टहास कशासाठी

कप्तान नया है वह
फार रटाळ सामना चालू आहे. फार बोअरींग प्लेअर आहेत तो बवुमा. त्याची खेळी बघून तो विंडीजचा शाय होप आठवतो. आपलाच रटाळ खेळ खेळत बसतात. वॅन डर डुस्सेनने रंगत भरली.. अन्यथा पावणेतीनशेच्या आत थांबले असते,,
आपण आता सात आठ विकेट राखून चेस करू नये.. सामना चुरशीचा व्हायला हवा. पंत अय्यर वा त्याहीपलीकडे सामना जात जिंकायला हवे..

२००+ ची पार्टनरशिप होत असताना, आणि प्रमुख बॉलर्स ना फारसं यश मिळत नसताना, एक प्रयोग म्हणून व्यंकटेश अय्यर ला एखाद-दुसरी ओव्हर का नाही दिली, हे कळलं नाही.

* व्यंकटेश अय्यर ला एखाद-दुसरी ओव्हर का नाही दिली, हे कळलं नाही. * - असल्या सगळ्या शंकांचे उत्तर सध्या तरी एकच असावं - *कप्तान नया है वह* !! Wink

"असल्या सगळ्या शंकांचे उत्तर सध्या तरी एकच असावं - *कप्तान नया है वह* !!" - शिकेल अनुभवातून अशी आशा करू या. धवन - कोहली पार्टनरशिप बघायला मजा आली. धवन मोठी सेन्च्युरी मारेल असं वाटत होतं. असो. कोहली त्याच्या झोनमधे वाटतोय. कोहली ला असं खेळताना बघून फार बरं वाटतंय.

२००+ ची पार्टनरशिप होत असताना, आणि प्रमुख बॉलर्स ना फारसं यश मिळत नसताना, एक प्रयोग म्हणून व्यंकटेश अय्यर ला एखाद-दुसरी ओव्हर का नाही दिली, हे कळलं नाही. >> +१ ऑल राऊंडर नाही म्हणून बोंबाबोंब करायची नि आहे त्याला बॉलिंग द्यायची नाही हे माझ्या समजायच्या कुवतीपुढे आहे. द्रविडच्या कोचिंग खाली लंकेत गेलेल्या सामन्यांमधे पण असेच केले होते. काय लॉजिक आहे देव जाणे ! "धवन - कोहली पार्टनरशिप बघायला मजा आली" -- हो मस्त सुरू होती - त्यावरून धवन बद्दल नक्की काय प्लॅन आहे ? मधेच उचलून खेळवतात - तो जनरली वाईट खेळत नाही किंवा एकदम भारावून टाकले जावे असा खेळत नाही . मग तो बाहेर जातो . वर्ल्ड कप ची तयारी असेल तर धवन ३८ -३९ चा असेल - तो प्लॅन मधे असणार आहे का ? नसेल तर अशा सिरीज मधे शॉ, किशन, अय्यर वगैरे ला संधी देणे योग्य नाही का ? असेल तर कंटिन्युईटी म्हणून त्याला सलग खेळू देणे जरुरी नाही का ? रोहित आल्यावर जर रोहित - राहुल ओपन करणार असतील तर मग धवन चे काय ? राहुल ४-५ वर दृष्ट लागण्यासारखे खेळत होता त्याला वन डे मधे परत ओपनिंग ला ढकलायचे काय कारण आहे ? भुवी चहरच्या जागी का खेळला ?

*कप्तान नया है वह* >> नया ? दोन वर्षे आयपील मधे कप्तान आहे तो. तिथेही मला तरी कधी अजिबात इंस्पायरीम्ग वाटला नाही.

मीं फक्त 'जिंकतो तोच चांगला कर्णधार ' या समीकरणाविरूद्ध आहे ( जरी वास्तवात तसं होत असलं तरीही). >> It's practical भाऊ. टीम जिंकत नसेल तर लोक फॉलो कशा ला करतील ? लोकांनी फॉलो नाहि केले तर पैसा कसा येणार ? पैसा नसेल तर गेम कसा खेळणार ? मी फार सिंप्लिफिकेशन करतोय हे मान्य पण न जिंकणार्‍याला कोणि वाली नसतो हा जगाचा नियम आहे. खेळाचा आनंद वगैरे गोष्टी ह्या तेंव्हाच येतात जेंव्हा मूळात खेळ जिवंत राहू शकतो.

Pages