Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्या शर्मा नाहीये तेंव्हा
सध्या शर्मा नाहीये तेंव्हा ब्रेक घे ह्याच धोरणानुसार
मी नाहीच बघितली आजची मॅच. सहज
मी नाहीच बघितली आजची मॅच. सहज स्कोर बघायला क्रीकइन्फो ओपन केलं तर तिथे हारलेलो. शर्मा असल्यावर पण मी फक्त त्याची बॅटिंग(शर्मा आऊट झाला की चॅनेल बदलतो), त्याची कॅप्टनशीप, आणि शेवटी सामना रंगात आला तर बघतो.
असामी, धवन विषयी आणि राहूल
असामी, धवन विषयी आणि राहूल च्या कॅप्टन्सीबद्दल तू जे लिहीलयंस त्याच्याशी सहमत आहे. कॅप्टन ने मॅचमधे अॅक्टीव्हली गोष्टी घडवून आणाव्या अशी अपेक्षा आहे. त्यातून मॅच हातातून निसटताना काहीतरी कल्पकता दाखवून मॅच ची दिशा बदलण्याचा प्रयत्न करावा हे अपेक्षित आहे. तिथे राहूल अगदीच पॅसीव्ह वाटतो.
भुवनेश looks like a pale shadow of old Bhuvanesh. ठाकूर रन्स काढतो हे अॅडिशनल क्वालिफिकेशन चांगलं आहे. पण त्याने त्याचा प्रायमरी जॉब - बॉलर म्हणून - व्यवस्थित करणं ही प्रायोरिटी असावी. आजचा दिवस अपवाद ठरो आणि पुढच्या मॅच मधे पार्टनरशिप तोडणारा, रन्स रोखणारा बॉलर म्हणून तो दिसो.
@ बोकलत शर्माबाबत सहमत. आज
@ बोकलत शर्माबाबत सहमत. आज मिस केले त्याला. ३०० चेस करताना बॅटींग डेप्थ नसताना टॉप ऑर्डरला शतक गरजेचे होते. आजच्या तारखेला जागतिक क्रिकेटमध्ये शर्मासारखा इनिंग बिल्ड करणारा खेळाडू एकदिवसीयमध्ये दुसरा नसावा.
कोहलीबाबत पुन्हा पुन्हा तेच लिहायचा वैताग आलाय. त्याच्या डोक्यात त्याचे ७१ वे शतक खेळतेय. सेट झाला आणि ते दिसू लागले की तो गडबडतो. किती आचरट पद्धतीने बाद झाला पुन्हा.. माईंड गेम आहे क्रिकेट हा. तिथे गडबडतोय कोहली सध्या. पुन्हा तेच म्हणावे लागणार. एकदा ७१ वे शतक आले, माईंड ब्लॉक उठला की मग टपाटप शतके येणार..
फलंदाजीत शार्दुलच्या आधी आश्विनला पाठवायचा निर्णय नक्की कुठल्या राहुलचा होता माहीत नाही पण अचाट होता.
असो, आश्विन आणि चहल दोघे एकत्र खेळवणे अन्याय आहे भारतीय क्रिकेटप्रेमींवर. एखादा फलंदाजी जमणारा जडेजा वा गेला बाजार कृणाल पांड्या वा त्याहून गेला बाजार अक्षर पटेल तरी हवाच.
अय्यर आणि शॉर्ट बॉल हे समीकरण झालेय. त्यात दुसरा अय्यरही अडकला ही आणखी एक गंमत.
जाता जाता, पंतने बाद व्हायचा अजून एक प्रकार आपल्या पोतडीत जोडला. पण तो निर्णायक सामन्यांचा खेळाडू आहे. त्यामुळे मी त्याला थेट तिसर्या सामन्यात बघणेच पसंद करेन.
*भुवनेश looks like a pale
*भुवनेश looks like a pale shadow of old Bhuvanesh. * +1. काय आशा निर्माण करून ठेवल्या होत्या या गुणी खेळाडूने ! पण इंग्लंडच्या पोषक वातावरणात दोन्ही स्विंग सफाईने करणारा असूनही तो प्रभावी ठरला नाहीं व दुखापतीमुळे कारकीर्दीत खंड पडत राहिला. नंतर त्याचा आलेख वरच्या दिशेने सरकलाच नाहीं!
ईरफान पठाण झाला त्याचा
ईरफान पठाण झाला त्याचा
भुवनेश्वर ने डेब्यु सामन्यात
भुवनेश्वर ने डेब्यु सामन्यात पहिल्याच बॉलला कसलाच बोल्ड काढला होता. संधूने 83 च्या वर्ल्ड कप फायनलला विकेट काढली त्याचा ऍक्शन रिप्ले होता ती विकेट. नंतर नजर लागल्यासारखी झाली त्याला.
राहुल संघात ४,५,६ नंबर वरती
राहुल संघात ४,५,६ नंबर वरती पाहिजे किंवा बाहेर
आणि फक्त १च खेळाडू खेळणार असेल तर कर्णधार
भारतीय क्रिकेट मधे सध्या काय
भारतीय क्रिकेट मधे सध्या काय चालू आहे? मला काळजी वाटते.
गांगुलीने राजिनामा दिला म्हणे! बुमराह म्हणतो द्रवीड कोच असणे बरे नव्हे. कोहली कर्णधार नाही.
आणि आपण सामने हरतो आहेत!!
"दुखापतीमुळे कारकीर्दीत खंड
"दुखापतीमुळे कारकीर्दीत खंड पडत राहिला." - खरंय. इंज्युरीनंतर कमबॅक करणं हे कुठल्याही अॅथलिटसाठी खूप कठीण असतं. लहानपणापासून डेव्हलप होत गेलेली वर्षानुवर्षांची मसल-मेमरी आणि इंज्युरीनंतर, मोठ्या वयात त्यात करावा लागणारा बदल ह्या संघर्षातून परफॉर्मन्स ची कमाल पातळी परत गाठणं अवघड होत जातं आणि ह्यातून मानसिक संघर्ष / फ्रस्ट्रेशन सुद्धा येतं. खेळाडूंइतकं 'झालं गेलं गंगेला मिळालं' असं म्हणून लगेच पुढच्या क्षणावर फोकस करणं इतर कुठल्या क्षेत्रात नसावं. अशा वेळी मोठ्या इंज्युरीतून कमबॅक करून परत कमाल दर्जाचा परफॉर्मन्स देणार्या खेळाडूंविषयीचा आदर वाढतो. उदा. सचिन तेंडुलकर (टेनिस एल्बो), किंवा नुकताच इंज्युरीतून परत आलेला बुमराह.
गांगुलीने राजिनामा दिला म्हणे
गांगुलीने राजिनामा दिला म्हणे!
>>>>
हे कधी घडले? आता कुठे दादाने आपला माणूस द्रविड कोच म्हणून आणलाय. सचिनलाही कुठल्यातरी भुमिकेत आणायचे प्रयत्न चालूय असे ऐकलेय. लक्ष्मणही आसपास आहेच. त्यालाही बहुधा एनसीए सांभाळायची ऑफर होती असे ऐकलेले.. अश्यात दादाच कश्याला जाईल..
बाकी कोहली आफ्रिका मालिकेनंतर कसोटीतूनही जातो आणि त्या आधी एकदिवसीयमधूनही जातो हे मी आधीच म्हटलेले.
बातम्या नियमित वाचल्या तर राजकारण काय चालू आहे हे समजायला वेळ लागत नाही. त्यामुळे विशेष धक्का बसला नाही. मात्र कसोटीत कोहलीच कर्णधार राहावा हि ईच्छा होती. पण कॉम्प्रोमाईज झालेच नाही.
गांगुली आणि शाहची टर्म
गांगुली आणि शाहची टर्म सप्टेंबर २०२२ला अशीही संपणार आहे. त्याचीच बातमी असेल.
अरे नाही रे, झक्कींचे
अरे नाही रे, झक्कींचे शेंडेनक्षत्र, बायडन, ट्रंप अशा रणधुमाळीत कोहलीचे गांगूली झाले असेल.
"रणधुमाळी" -
"रणधुमाळी" -
कोहली कर्णधार म्हणून धोनी
कोहली कर्णधार म्हणून धोनी किंवा गांगुली इतका श्रेष्ठ नक्कीच वाटला नाही.
पण कर्णधार म्हणून त्याचं कर्तृत्व नक्कीच नाकारता येणार नाही.
१. धोनीची संघातली जागा भरून काढणे.
२. उत्तम वेगवान गोलंदाजांचा ताफा बनवणे आणि जोपासणे.
३. अति आक्रमक मानसिकता ठेऊन तसा संघ तयार करणे.
४. कुठल्याही परिस्थितीतून जिंकण्याची जिद्द संघात निर्माण करणे.
(कोहली ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतला त्यानंतरचे विजय.) कोहली संघात नसला तरी संघ त्यानेच बनवलेला होता.
५. रहाणे आणि पुजाराला खूप संधी देणे. (आपल्या खेळाडूवर विश्वास ठेवणे.)
(त्या दोघांना धावांची भूक लागण्या ऐवजी माती खाण्याची भूक लागली हा भाग वेगळा)
६. त्याचे आकडे.
७. तंदुरुस्तीला भारतीय संघाची संस्कृती बनवणे.
त्याच बरोबर त्याच्या काही गोष्टी बोचल्या:
१. अति आक्रमकतेच्या नादात मैदानावर तोल सोडणे.
२. संघ वाईट हरलेला असताना ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून आपली वैयक्तिक सुटी पुढे न ढकलणे.
(सचिनचे वडील वारले तेव्हा सुद्धा त्याने दौरा अर्धवट सोडला नव्हता. पुन्हा इंग्लंडला जाऊन शतक काढले होते.)
जेव्हा कर्णधार असं वागतो तेव्हा संपूर्ण संघाचीमानसिकता बदलते.
२. अश्विन सारख्या खेळाडूला संपूर्ण इंग्लंड दौरा बाहेर बसवणे.
३. सूर्यकुमार यादव सारख्या नियमितपणे छान फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना संधी न देणे. (गुण क्र ५)
४. कल्पकपणाचा अभाव. (माझ्या मते हे एकही ICC मालिका न जिंकण्याचं कारण आहे).
२. संघ वाईट हरलेला असताना
२. संघ वाईट हरलेला असताना ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून आपली वैयक्तिक सुटी पुढे न ढकलणे. >>>> उलट त्याने संघ इतका स्ट्राँग बनवला होता आणि आपला सक्सेसर ग्रुम केलेला होता, त्यामुळे फक्त त्याच्यावर अवलंबून न रहाता टीम जिंकू शकली. त्यावेळेला वैयक्तिक सुट्टी मुलीच्या जन्माच्यावेळी उपस्थित रहाण्यासाठी घेतली होती तर पुढे कशी ढकलणार ?
*..फक्त त्याच्यावर अवलंबून न
*..फक्त त्याच्यावर अवलंबून न रहाता टीम जिंकू शकली.* - तो नसल्यामुळेच टीम जिंकू शकली, असाही अर्थ निघूं शकतो ( जरी मला तसं वाटत नसलं तरीहि) !
तो नसल्यामुळेच टीम जिंकू शकली
तो नसल्यामुळेच टीम जिंकू शकली, असाही अर्थ निघूं शकतो >>> निघू शकतो काय बोलताय भाऊ, तो नसल्यामुळेच टीम जिंकली हे ढळढळीत सत्य आहे. तो असता तर 100% हारलो असतो ती सिरीज.
भारत 300+ च्या वाटेवर आहे असं
भारत 300+ च्या वाटेवर आहे असं वाटतं. पंत धमाल खेळतोय !
चुम्मा अगदी चुम्मा खेळला आज..
चुम्मा अगदी चुम्मा खेळला आज... बाकीचे फलंदाज पिचच्या पेसला कम्फर्टेबल वाटत नव्हते. हा मात्र फिल्डशी खेळत होता नुसता.
बाद चुकीच्या टाईमाला झाला ३००-३२५ च्या दरम्यान होता स्कोअर आज. आणि तो सहज मॅचविनिंग ठरला असता.
ता.क. - आज कोहलीचे शतक १०० धावांनी हुकले. शून्यावर बाद व्हायला हरकत नाही पण जसा कॅज्युअली बाद झाला त्याचे वाईट वाटले. तो अॅग्रेशनवाला, गेम कंट्रोल करणारा, बॉलर्सना डोमिनेट करणारा कोहली कुठे हरवलाय समजत नाही.
*तो अॅग्रेशनवाला, गेम
*तो अॅग्रेशनवाला, गेम कंट्रोल करणारा, बॉलर्सना डोमिनेट करणारा कोहली कुठे हरवलाय समजत नाही.* - मला तर वाटतं तो हरवलेला कोहली आतां खेळाचा मनसोक्त आनंद घेणारा व देणारा कोहली म्हणूनच बहरात येईल. सध्या तो या मानसिक संक्रमणावस्थेत असावा.
हा शार्दुल ठाकूर बर्यापैकी
हा शार्दुल ठाकूर बर्यापैकी धावा करतो. तसा तो गोलंदाजीहि चांगली करतो. त्याला जरा जास्त संधि द्यायला पाहिजे.
नी काही कोहली रहाणे यांचा फॅन नाही, ते गेले संघातून तर मला काही वाईट वाटणार नाही.
आजच्या सामन्यापूर्वीचे आकडे
आजच्या सामन्यापूर्वीचे आकडे
चेक करा.. मला व्हॉटसपवर आलेय. पण कर्रेक्ट असतील..
288/3 द आफ्रिका 7 विकेटसनी
288/3 द आफ्रिका 7 विकेटसनी विजयी ! आपली गोलंदाजी अधिकाधिक निष्प्रभ कां होतेय ?
आपली गोलंदाजी अधिकाधिक
आपली गोलंदाजी अधिकाधिक निष्प्रभ कां होतेय ? >> हा प्रश्न आहे का खरच ? मला वाटले भारतीय क्रिकेटच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 'रोहित संघात नसणे' नि 'कोहली संघात असणे' हे नि हेच आहे ह्या बाफांवर, एव्हढे प्रेम तर त्यावर रितिका चे पण नसावे
क्रिकेट सांघिक खेळ आहे वगैरे गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे नि आपला एकच एक ढोल बडवत बसायचा. रोहित असताना सामने हरलोच नाहित आपण कधी. रोहित कधी फेल गेलाच नाही. रोहित खेळला असताना आपण कधी हरलोच नाहि आहोत. रोहित नसताना आपण कधी हरलोच नाहित. उद्या ८३ चा वर्ल्ड कप सुद्धा रोहित सूक्षरूपात असल्यामूळेच आपण जिंकलो आहोत असे वाचले तरी मला आश्चर्य वाटणार नाही .
असामी
असामी
असामीजी, मी सगळ्याच्या
असामीजी, मी सगळ्याच्या मुळाशी रोहित व विराटचं असणं / नसणंच आहे असं मानत नाहीं व तसं कधीं सुचवलेलं पण नाहीं. आपली गोलंदाजी इतकी निष्प्रभ कां वाटतेय , ही माझी खरीखुरी शंका आहे.
क्रिकेट हा सांघिकच खेळ आहे
क्रिकेट हा सांघिकच खेळ आहे
फक्त ते आपल्याला आवडत्या खेळाडूचे कौतुक होताना विसर पडतो आणि नावडत्या खेळाडूचे कौतुक होतानाच जास्त प्रकर्षाने आठवते
बाकी खेळ सांघिकच असेल तर कोणालाही करा कप्तान काय फरक पडतोय..
पण तसे नसते ना..
या मालिकेत आपल्याला शर्माची कमतरता एक सलामीवीर म्हणून आणि कप्तान म्हणून प्रकर्षाने जाणवली हे फॅक्ट आहे .. तर ते कबूल करण्यात कसला कमीपणा.. यात खेळणाऱ्या अकरा खेळाडूंना बिलकुल कमी लेखयचा हेतू नाही.. जसे धोनी युवराजनंतर आपल्याला चांगले फिनिशर मिळाले नाहीत हे जसे विधान आहे तसेच हे सुद्धा आहे..
बाकी वरच्या चित्रातले शर्मा
बाकी वरच्या चित्रातले शर्मा असतानाचे आणि शर्मा नसतानाचे आकडे बोलके आहेत. ते नजरे आड करू शकत नाही. विश्वचषकात शर्माचे पाच शतक ही एक उल्लेखनीय कामगिरी होती. सांघिक कामगिरीचा मुद्दा पुढे करून त्याचे कौतुक टाळण्यात काय हशील... आपल्याला या दोन सामन्यात टॉप ऑर्डरला अशीच एखादी मोठी शतकी खेळी हवी होती जी दोन्ही सामन्यात न आल्याने अननुभवी मिडल ऑर्डर कोसळली.
आणि राहुलची कप्तानी तर अगदीच सुमार झाली. कोहली त्याच्याशी काही फारसा बोललाही नसावा.. कल्पना नाही.
"उद्या ८३ चा वर्ल्ड कप सुद्धा
"उद्या ८३ चा वर्ल्ड कप सुद्धा रोहित सूक्षरूपात असल्यामूळेच आपण जिंकलो आहोत असे वाचले तरी मला आश्चर्य वाटणार नाही ." -
अरे असेल असंच खरंच. तसं स्टॅट्स आणि मीम्स बनवायला सांगू आपण कुणाला तरी. तसंही आपण बघायला लागल्यापासूनचंच क्रिकेट खरं मानायची एक पद्धत आहेच की. 
मला वाटतं कि शॉर्ट टर्म - स्टॉप लॉस अरेंजमेंट म्हणून पुढच्या मॅच ला भुवनेश आणि श्रेयस ला बाहेर ठेवून ऋतुराज आणि दीपक चहर ला खेळवावं. ऋतुराज ने ओपनिंग ला यावं आणि राहूल ने ४/५ व्या नंबरवर येऊन मिडल ऑर्डरला मजबूत करावं. ऋतुराज चा खेळ वन-डे साठी जास्त पोषक आहे (इशान किशन ओपनिंग ला का नको ह्या भावी प्रश्नाचं उत्तर).
Pages