क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, नक्कीच.
आपल्याला या मालिकेत शर्माची कमी जाणवली. सलामीवीर म्हणूनही, स्लीप फिल्डर म्हणूनही आणि स्लीपमध्ये उभे राहून कप्तान कोहलीसोबत चर्चा करायलाही..

सलग दोन सामन्यांमधे आपल्या बोलिंग युनिटला चौथ्या डावात चांगली बोलिंग टाकूनही विकेट्स मिळल्या नाहीत आणि आपण मॅच हरलो. > हे खरय, डावपेच वेगळे असते तर निकाल वेगळा लागू शकला असता का हा प्रश्न आहे. मूळात शेवटच्या दोन्ही मॅचेस मदहे पिचेस थोडि अधिक बाउन्सी होती. तिथे बॉल गूद लेंग्थ वरून थोडा अधिक उसळत होता. त्याचा फायदा उठवण्यासाठी लागणारे टॉल बॉलर्स आफ्रिकेकडे होते, आपल्याकडे नाही. इशांत आता तशी बॉलिंग हल्ली क्वचितच टाकतो. दुसर्‍या टेस्ट मधे ल्क पूर्णपणे आफ्रिकेच्या बाजूने होते असे म्हणू शकतो. इतक्या वेळेला बॉल मिस केले गेले होते, एजेस लागल्या होत्या पण विकेट्स गेल्या नाहीत. अ‍ॅनामोली म्हणू शकतो.

सालीच्या जोडिचे अपयश हा एक भाग आहे. पहिल्या टेस्टमधलली पहिलि इनिंग वगळता एकंदर फारशी चांगली ओप्निंग मिळालीच नाही असे म्हणू शकतो. राहुल ने इंग्लंड नंतर परत एकदा दौर्‍याच्या सुरूवातीला खेळण्याची इंटेंसिटी नि पेशन्स कमी होत जातो हे दाखवलय. खरच दुसरा ओपनर शोधायची वेळ आली आहे. राहुल ला मधल्या फळीत राहाणे च्या जागी आणता येईल.

इंग्लंडमध्ये अश्विन ला खेळवले नाही म्हणून इथे प्रत्येक सामन्यात खेळण्याची काहीच आवश्यकता नव्हती. एक अतिरिक्त फलंदाज खेळवणे गरजेचे होते. फ्लेक्सिबल रहायला हवे

*कोहलीचा राजीनामा* - कदाचित संघासाठी व विराटसाठी ही इष्टापत्ती ठरेलही. पण यातून कडवटपणा निर्माण न होतां संघभावना दुय्यम न ठरो, एवढीच अपेक्षा व प्रार्थना !

कदाचित संघासाठी व विराटसाठी ही इष्टापत्ती ठरेलही. पण यातून कडवटपणा निर्माण न होतां संघभावना दुय्यम न ठरो, एवढीच अपेक्षा व प्रार्थना ! >> भाऊ, तुम्हाला काय वाटते काय होईल ?

कोहली चे एकंदर स्टेटमेंट वाचून मला वाटतय की त्याला बॅटींग वर लक्ष द्यायचे आहे. नि शेवटच्या इनिंग कडे बघता तो ते यशस्वीपणे करेल नि शिखरावर असतानाच रीटायर होईल , ही इज किल्यरली हर्ट ( and it is not hard to understand why it is ) He will want to make statement. Say what you may be, it will be big setback for Indian cricket. Some of India's best victories have come with him being at helm. One can always argue about his temperament or him being less tactical but it will be hard to find one for his intensity and drive to win. I believe Indian team will struggle reach same crescendo in next few years.

नवीन कसोटी कर्णधार कोण यासाठी जनतेचा कौल असा येतोय
१. रोहीत शर्मा
२. ऋषभ पंत
३. अजिंक्य रहाणे

रहाणेची जागा पक्की नसूनही तो स्पर्धेत आहे हे विशेष.
बाकी लोकं आश्विन बुमराह जडेजाला सुद्धा पसंती देत आहेत. पण के एल राहुल लोकांना नकोय.
बीसीसीआय लोकभावना लक्षात घेणार का?

*भाऊ, तुम्हाला काय वाटते काय होईल ?*- काय व्हावं असं मला वाटतं, तें असं - विराट 'ऑल टाईम ग्रेट ' फलंदाजांच्या पंक्तित आपलं हककाचं स्थान मिळवून संघाची ताकदही वाढवेल. तो कर्णधार नसल्याने त्याचा व संघाचा खेळ बहरण्याची शक्यता खूप वाढेल.

जनरली मी रिचर्ड्स ला भारतीय क्रिकेट बद्दल प्रतिक्रिया देताना वाचले नाहिये त्यामूळे त्याचा ट्वीट वाचून आश्चर्य वाटले. कदाचित लॉईडसारखाच पेस बॅटरी बनवण्याचा कोहलीचा ध्यास नि स्वतःसारखाच स्वतःवर भयंकर विश्वास असणारा ल्हेळाडू बघून कुठे तरी आत्मियता वाटली असेल ?

Congratulations @imVkohli on a stunning run as the Indian captain. You can be very proud of what you have achieved so far, and for sure, your name will be up there among the best leaders in world cricket

बीसीसीआय च्या मिजासीमूळे येत्या कप्तानाचा कस लागणार आहे. आयुष्यात काँट्रोव्हर्सी पासून दूर राहिलेल्या द्रविडच्या कोचिंग ची सुरूवात कॅप्टन्सी सारखीच काँट्रोव्हर्सी नेच व्हावी हा विचित्र योगायोग आहे.

तो कर्णधार नसल्याने त्याचा व संघाचा खेळ बहरण्याची शक्यता खूप वाढेल. >> शतके बाजूला ठेवली तर प्रत्येक सिरीजमधे त्याच्या १-२ मह्त्वाच्या इनिंग्स आहेत. पण नुसत्या शतकांबाबत आसुसलेल्या जनते ला कोण समजावणार.

कोहली मागे जेव्हा पुर्ण भरात होता तेव्हाही विव्ह रिचर्डस त्याच्याबद्दल म्हणालेला की मी जेव्हा माझ्या पुर्ण भरात होतो तेव्हाही आताच्या कोहली ईतका जबरदस्त खेळत नव्हतो.

बाकी सचिन निराश होऊन निवृत्तीचा विचार करत होता तेव्हाही रिचर्ड्सचा आलेला कॉल फेमस आहे. कोहलीबाबतही त्याला तशीच आत्मीयता वाटत असेलच.

शतके बाजूला ठेवली तर प्रत्येक सिरीजमधे त्याच्या १-२ मह्त्वाच्या इनिंग्स आहेत
>>>>

प्रश्न शतकाचा नाही. पण जेव्हा तुम्ही सेट असता तेव्हा मोठी धावसंख्या न उभारणे हा गुन्हा समजला जातो. कोहली तो सातत्याने करतोय.

विराटच्या राजीनाम्यावरच्या प्रतिक्रियांमधली वासिम जाफरची प्रतिक्रिया मला फार आवडली:
“When Virat took over as Test captain, India winning a Test overseas was an achievement, now if India lose an overseas Test series it is an upset. And that's how far he has taken Indian cricket forward, and that will be his legacy. Congratulations on successful reign," wrote former India opener Wasim Jaffer.

विराटच्या राजीनाम्यावरच्या प्रतिक्रियांमधली वासिम जाफरची प्रतिक्रिया मला फार आवडली >> हो मी पण वाचलेली ती. मला ही योग्य वाटलेली .

Bcci ने कोहलीला कॅप्टन बनवून आणि त्याचे लाड पुरवून भारतीय क्रिकेटचे खूप मोठे नुकसान केलं आहे. येत्या काही वर्षात त्याचा फटका भारताला बसणार. यातून धडा घेऊन bcci ने पुन्हा अशी घोडचूक करू नये. युक्ती आणि शक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोहलीकडे फक्त धावा काढण्याची शक्ती होती (ती पण आता संपल्यात जमा आहे) कॅप्टनशीप कशी करावी ही युक्ती न्हवती. शर्माकडे शक्ती आणि युक्ती दोन्ही आहेत. खरं तर कोहलीने सगळ्या भारतीय क्रिकेट रसिकांची माफी मागून राजीनामा द्यायला पाहिजे होता.

फलंदाज, गोलंदाज म्हणून एखाद्या खेळाडूचं मुल्यमापन करणं जितकं सोपं तितकंच कर्णधार म्हणून एखाद्याचं मुल्यमापन करणं कठीण. कारण, निश्चित निकषांचा अभाव. बहुतांशी, ' the captain is as good as the team he leads' हेंच खरं असतं. त्यामुळे, या बाबतीत मतभेद असणं व व्यक्तिगत आवडीला महत्व मिळणं स्वाभाविक आहे. विराट कर्णधार म्हणून आवडो वा न आवडो, फलंदाज म्हणून त्याची उपयुक्तता वादातीत नाहीं तर अभिमानास्पदही आहे व ती अधिकच तशी तळपेल अशी आतां आशा आहे.

कोहलीचा कॅप्टन्सी रेकॉर्ड चांगला दिसत असला तरी त्यातले त्याचे कॅप्टन म्ह्नणून योगदान खरेच किती हा वादाचा विषय आहे!!
ती चुणूक त्याच्यात कधीच दिसली नाही..... संघ चांगला खेळत गेला आणि आपण जिंकत गेलो!!
त्याची कॅप्टन्सी आठवताना ना एखादा धाडसी निर्णय आठवतो, ना कधी केलेली कल्पक व्यूव्हरचना आठवते, ना सगळ्यांच्या विरोधात जाउन एखाद्या खेळाडूला किंवा स्ट्रॅटेजीला बॅक केलेले आठवते, गांगुली आणि धोनी वगैरे लोकांनी जसे नवे खेळाडू ग्रूम केले तसेही एक चहल वगळता कोणी नाही.... तो आठवतो ते फक्त त्रागा करताना, आपल्याच खेळाडूंवर भर मैदानात आरडाओरडा करताना आणि उगाच सगळ्यांशी पंगे घेताना!!
कर्णधारपदासाठी लागणारा ठेहराव आणि संयम त्याच्या ठिकाणी नाही हे कळायला इतकी वर्षे का लागावी??
एक फलंदाज म्हणून त्याचे कौशल्य वादातीत आहे, त्याच्या कमिटमेंटला आणि विजिगिषू वृत्तीला सलाम आहे पण त्याचे पीपल स्कील्स मार खातात हे वरवर क्रिकेट फॉलो करणाऱ्या माणसालाही सहज कळण्यासारखे आहे.
दुसरा एखादा सक्षम पर्याय आधीच उभा राहिला असता तर त्याची कधीच कर्णधारपदावरुन उचलबांगडी झाली असती..... आता रोहित शर्माकडे काही काळासाठी सगळ्या फॉर्मेटसाठी कॅप्टन्सी द्यावी आणि पंतला उपकर्णधार बनवून ग्रूम करावे!!
कोहली बॅट्समन म्हणून अफाट आहे आणि त्याला त्याच्या आगामी कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा!!

स्वरूप, खरंच ही पोस्ट तूच लिहिलियंस की तुझा अकाऊंट हॅक झालाय? कोहलीने टीममधे आणलेलं फिटनेस कल्चर, भारतीय संस्कृतीला सहसा न मानवणारं, पण अत्यंत प्रभावी ठरलेली ‘इन युअर फेस‘ वृत्ती, क्लाईव्ह लॉइड च्या संघासारखी विजिगीषु वृत्ती, टेस्ट मॅचेस जिंकण्याची प्रवृत्ती हे सगळं नजरेआड नाही करता येत. ही पोस्ट तू लिहिलीस म्हणून हा इतका लेखनप्रपंच. नाहीतर काहीच नसतं लिहीलं. Happy

मीच लिहलीय ती पोस्ट आणि त्याच्यावर ठाम पण आहे Happy

मी आधीच लिहलय की कोहलीचे टेस्ट कॅप्टन्सीचे रेकॉर्ड चांगले आहे पण म्हणून तो खुप उत्तम कर्णधार वगैरे होता हे मला पटत नाही.
कोहलीकडे कॅप्टन्सीसाठी लागणारा स्ट्रीटस्मार्टनेस नाहीये..... गोष्टी त्याच्या बाजुने घडत असताना तो अगदी आक्रमक वगैरे असतो पण वारे उलट्या दिशेने वाहू लागल्यावर तो गडबडतो किंवा एकदम पॅसिव्ह मोडमध्ये जातो हे वारंवार दिसून आलेय!!
तो टॅक्टिकल मिस्टेक करतोच करतो
प्लेयिंग इलेव्हन सिलेक्शनमध्ये त्याने अनेकवेळा माती खाल्लेली आहे.
कोहली उघडपणे म्हणतो की इंग्लंडमधल्या खराब कामगिरीनंतरही त्याला धोनीने बॅक केले म्हणूनच तो जोरदार कमबॅक करु शकला आता त्याच्या कप्तानीखाली खेळेलेले कोणी असे म्हणू शकेल का? किंवा असे कुणी म्हणाल्याचे ऐकिवात आहे का?
आपली बेंचस्ट्रेंथ स्ट्रॉंग आहे म्हणून आत येईल तो खेळाडू चांगला खेळतोय आणि जिंकायला हातभार लावतोय पण एक कॅप्टन म्हणून त्याने संघ उभारलाय का? सलामीच्या जोडीचा प्रश्न सुटलाय का? मधली फळी स्थिरावलीय का? नाही म्हणायला पेस ॲटेक सुधारलाय पण त्याचेही किती क्रेडिट कोहलीला द्यावे आणि किती NCA, MRF पेस फाउंडेशन वगैरेला द्यावे हेही विचारात घ्यावे लागेल.
स्पिनमध्ये कसोटीसाठी अश्विन आणि जडेजानंतर कोण Tried and tested आहे?
आणि फिटनेसचे म्हणशील तर क्रिकेटमधली पिढी बदललीय, धोनी असतानाच फिटनेसवर जोर द्यायला जास्त सुरुवात झालेली आणि कोहलीने ते next level ला नेले जे modern sports मध्ये अपेक्षितच आहे.

कोहलीच्या कमिटमेंटबद्दल मला कधीच शंका नव्हती आणि नाहिये पण टीम स्पोर्ट्स मध्ये जे मॅन मॅनेजमेन्ट कसब लागते, आपल्याच संघावर दबाव टाकण्यापेक्षा संघाला बरोबर घेऊन पुढे जाण्याची जी एक मानसिकता लागते ती कोहलीकडे दिसत नाही.
धोनीबरोबर तुलना करता हे अधिकच जाणवते Happy

नवीन कसोटी कर्णधार कोण यासाठी जनतेचा कौल असा येतोय
१. रोहीत शर्मा
२. ऋषभ पंत
३. अजिंक्य रहाणे

>>> जनतेचा कि ऋन्मेशचा ? Happy

शर्मा कोणालाच नकोय... आणि त्याचे वय बघता त्याला कप्तान करूही नये....

अजिंक्य रहाणे?? टीम मध्ये न राहता पण कप्तान बनता येतं का? या पुढे देखील रहाणे ला संधी मिळाली तर त्याच्याकडे सिलेक्टर पैकी कोणाला तरी blackmail करायची काहितरी माहिती आहे असं समजावं Happy

संघातली जागा पक्की सद्ध्या फक्त रोहितची. त्यामुळे कसोटीत तोच कर्णधार होणार / व्हावा.
भारताला नंबर १ करण्यात कोहलीबरोबर शास्त्रीबुवांचे पण नाव घ्यायला हवे. शास्त्री असता तर आपण दोन पैकी एक तरी टेस्ट जिंकलो असतो असे मला वाटते. २४० आणि २०० धावांचा बचाव करताना खडूस गोलंदाजीचा पूर्ण अभाव होता

*संघातली जागा पक्की सद्ध्या फक्त रोहितची. त्यामुळे कसोटीत तोच कर्णधार होणार / व्हावा.* - खरंच हा एकच निकष कर्णधार होण्यासाठी पुरेसा समजणं योग्य आहे का ? तशी तर विराटची संघातील जागाही रोहितएवढीच पक्की असावी .

खरंच हा एकच निकष कर्णधार होण्यासाठी पुरेसा समजणं योग्य आहे का ?
>>>>>

हा एकच निकष नाही पण हा महत्वाचा निकष आहे ना. अन्यथा पुन्हा दोन चार मालिकानंतर नवा कर्णधार शोधत फिरा..
दुखापतीमुळे वा वर्कलोड मॅनेज करायला शर्मा एखादी मालिका विश्रांती घेत असेल तर तेव्हा बदली कर्णधार म्हणून उपकर्णधार असेलच. पण रहाणेची जागाच संघातून जात असेल तर पुन्हा कायमस्वरुपी नवा कर्णधार शोधावा लागणार..
अन्यथा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक विजयानंतर रहाणेला कर्णधार म्हणून बरेच जणांची पसंती आहे.

आज द्वारकानाथ संझगिरींचा लेख वाचला. त्यानुसार वाडेकर, गावस्कर, कपिल देव यांच्या काळापासून कप्तानीचे राजकारण होत आहे.
बीसीसीआयला कधीच आपल्याला वरचढ होणारा आणि मनमानी करणारा कर्णधार नको असतो. हि त्यांची पॉलिसीच असावी.

"संघ चांगला खेळत गेला आणि आपण जिंकत गेलो!!" नि " बहुतांशी, ' the captain is as good as the team he leads' हेंच खरं असतं. " ह्या दोन वाक्यांनंतर खर तर र्‍हुण्म्याचा एखादा डु आय्डी पण नॉन प्लेयिंग कर्णाधार म्हणून असायला हरकत नसावी. Lol

विनोदाचा भाग बाजूला ठेवून, हि दोन्ही विधाने मलाही अंशतः मान्य आहेत पण कर्ण्धार म्हणून मूल्यमापन करण्याचा निकष आज पर्यंत तरी किती सामने जिंकले आहेत हाच बघत आलो आहोत. खेळाडूंना बॅक करणे, ग्रूम करणे (सिरीयसली हे कप्तानाचे काम असते ? ) , डावपेच इत्यादी हे निव्वळ दुय्यम घटक आहेत. कोहली ला एकवेळ विसरा पण प्रामाणिकपणे स्वतःला हा प्रश्न विचारा. "तुम्हाला स्वतःला असा कप्तान आवडेल जो हे सर्व करत असेल पण सामना हरत असेल ? " हे फक्त क्रिकेटसाठीच नाही तर कुठल्याही खेळासाठी लागू होते. अ‍ॅट लाँग टर्म यू नीड अ विनिंग कॅप्टन.

*संघातली जागा पक्की सद्ध्या फक्त रोहितची. त्यामुळे कसोटीत तोच कर्णधार होणार / व्हावा.* - खरंच हा एकच निकष कर्णधार होण्यासाठी पुरेसा समजणं योग्य आहे का ? तशी तर विराटची संघातील जागाही रोहितएवढीच पक्की असावी . >> +१ खर तर रोहित च्या फिट्नेस बद्दल जबरदस्त शंका आहे. टेस्ट सोडा, आयपील सुद्धा तो पूर्ण खेळू शकत नाहिये. ३४ म्हणजे पुढे पटकन सुधारण्याचे चान्सेस पण कमी च आहेत. एकच कप्तान असणे सिलेक्शन साठी सोपे पडते हे मान्य असले तरी सिलेक्शन कमिटी ने ती स्वतःची जबाबदारी दुसर्‍यांच्या खांद्यावर टाकण्यासाठी घेतलेली ती एक पळवाट आहे असे मला वाटते . टेस्ट मह्त्वाच्या की व्हाईट बॉल क्रिकॅट मह्त्वाचे हा निर्णय घेऊन त्याप्रमाणे कॅप्टन ठरवले जावेत अशी माफक अपेक्षा. जे मह्त्वाचे असेल तिथे रोहित नि इतरत्र प्रायोगिक कर्णधार असावा.

*तुम्हाला स्वतःला असा कप्तान आवडेल जो हे सर्व करत असेल पण सामना हरत असेल * - पण कर्णधार निवडताना तो सामने जिंकणारा आहे कीं हरणारा हें कसं ठरवायचं ?
( शिवाय, अगदीं दुर्मिळ अपवाद वगळता, सामना संघ हरत / जिंकत असतो, कर्णधार नाहीं, असंही माझं मत आहेच )

Pages