क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपली गोलंदाजी इतकी निष्प्रभ कां वाटतेय , ही माझी खरीखुरी शंका आहे. >> कमाल करता भाउ ! परत तोच प्रश्न ? गेले सहा महिने रोहित एके रोहित, रोहित दुणे रोहित, रोहित त्रिक रोहित ऐकल्यानंतरही असे प्रश्न पडावेतच कसे तुम्हाला ? हेच उत्तर तुमच्या प्रश्नाचे. रोहित कप्तान असता तरच नि निव्वळ तरच भारतीय गोलंदाजी अजून प्रभावी ठरली असती. बुमरा कडे बघा, निव्वळ रोहित कप्तान असल्यामूळेच मलिंगा ने त्याला आपल्या हाताखाली घेतले नि युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. आज चांगली बॉलिग तो करू शकला कारण त्याने सामन्याच्या सुरूवातीला रोहित च्या फोटो समोर उभे राहून मनोभावे रोहित स्त्रोत्राचा जाप केला होता.
भुवी ने केला नाही, नि चहल ने तर कोहली स्त्रोत्राचा जाप केला. भोगतोय आपल्या कर्माची फळे.
अश्व्नि बुमराच्या बाजूच्याच रुममधे राहतो त्याच्या कानावर एक शब्द पडला ह्या स्तोत्राचा - बघा एक मेडन ओव्हर टाकून एक विकेट घेऊन गेला. ठाकूर ने आपल्या दारावर रोहितचा फोटो लावला इथे येण्यागोदर. आफ्रिकेच्या दौर्‍यावर निघण्याआधी त्याने मोबाईल मधे त्याचा फोटो काढलाय. बघाताय ना कमाल ? बिचारा वेंकटेश अय्यर शी शेअर करेल तर बरे होईल. एक चांगला ऑलरांडर मिळेल आपल्याला.

सर तुमची एव्हढी तुमची अंबानी वगैरेंशी ओळख आहे - (अहो तोच हो तो जो तुम्हाला विचारून आयपील च्या मॅचेस फिक्स करतो ) . जरा बघा त्यांच्यामार्फत रोहित चे अकरा कट आऊट आफ्रिकेमधे पाठवता येतात का ? तिसर्‍या सामन्यामधे रोहितचे अकरा कट आऊट मैदानामधे पाठवूया. तिसरा सामना जिंकून जाऊ. कशी वाटते आयडीया ? बघा , जरा घ्या मनावर !

मला वाटतं कि शॉर्ट टर्म - स्टॉप लॉस अरेंजमेंट म्हणून पुढच्या मॅच ला भुवनेश आणि श्रेयस ला बाहेर ठेवून ऋतुराज आणि दीपक चहर ला खेळवावं. ऋतुराज ने ओपनिंग ला यावं आणि राहूल ने ४/५ व्या नंबरवर येऊन मिडल ऑर्डरला मजबूत करावं. ऋतुराज चा खेळ वन-डे साठी जास्त पोषक आहे (इशान किशन ओपनिंग ला का नको ह्या भावी प्रश्नाचं उत्तर). >> काही गरज नाही रे फे.फ. हे सगळे निमित्तमात्र आहेत. माझे वरचे पोस्ट वाच, मी भारतीय सामना ह्यापुढचा प्रत्येक सामना कसा जिंकू शकेल ह्याचा जालीम उपाय सुचवला आहे. आता ह्यापुढे सरांची मर्जी !

विश्वचषकात शर्माचे पाच शतक ही एक उल्लेखनीय कामगिरी होती. सांघिक कामगिरीचा मुद्दा पुढे करून त्याचे कौतुक टाळण्यात काय हशील.. > > कोण कौतुक टाळतेय सर. मी तर त्याने तो खेळला नसतानाचाही कप आपण त्याच्यामूळेच जिंकला म्हणतोय. पाच शतके मारली - आपण कप जिंकला. टी-२० मधे दोन महत्वाच्या सामन्यांमधे चटकन बाद आला नि आपण तो चषक पण जिंकला. ते अकरा कटाऊअट्स चे मनावर घेतले जरा सर तर बघा ..... रोहित साठी तरी. .. एका रोहित चे एव्हढे मीम्स अकरा चे किती होतील बघा.

>>मला वाटतं कि शॉर्ट टर्म - "स्टॉप लॉस" अरेंजमेंट
सध्या शेअर मार्केटच्या जरा जास्तच प्रेमात पडलेला दिसतोयस Wink

आज असामी वेगेळ्याच लीगमधे खेळतोय. आपण नॉन-स्ट्रायकरला उभं राहून फक्त स्टँड द्यावा हे उत्तम. Happy

"मी भारतीय सामना ह्यापुढचा प्रत्येक सामना कसा जिंकू शकेल ह्याचा जालीम उपाय सुचवला आहे. आता ह्यापुढे सरांची मर्जी !" "ह्या बाफावर रोहित शब्द नसलेले पोस्ट्स लिहिणे फाऊल आहे" - आऊट ऑफ द पार्क!! मागे एकदा सी. के. नायडूंनी मारलेली सिक्स एका काऊंटीतून दुसर्या काऊंटीत पडली होती (ग्राऊंड दोन काऊंटीज च्या बॉर्डर वर होतं Wink ) असं वाचलं / ऐकलं होतं. आज असामी च्या सिक्सर्स अशाच बाऊंड्रीज ओलांडून जातायत. Happy Happy

आशुचँप, शांमा सारखंच सरांच्या भक्तीत लीन व्हावं असं वाटायला लागलंय. काय हा चमत्कार!!! सर रूप बदलून कानपिचक्या द्यायला हजर! जय हो. सर.. तुस्सी ग्रेट हो!! असो.. इथे क्रिकेटवरच बोलू.

आत्ताच एक वाईट बातमी वाचली. संजीव गोअंका ने म्हणे राहुलला जॉईंट हायेस्ट पेड प्लेयर बनवले आयपील मधला सतरा कोटीवर. त्याच्याबरोबर कोण असावा तर तो ढम्या नतद्रष्ट कोहली ? रोहित नाही. अंबानीने इथे लक्ष द्यावे . नाहितर बीसीसीआय ने कोहली नि राहुलचा अर्धा अर्धा वाटा घेऊन रोहित ला देऊन टाकावा. न खेळता ८३ चा वर्ल्ड कप जिंकून दिल्याबद्दल फूलाची पाकळी म्हणून एव्हढे तरी करायला हरकत नसावी.

गोअंका म्हणतो राहुल उत्कृष्ट कीपर, बॅट्समन नि कप्तान (his words not mine) आहे. कुठे फेडणार ही पापे देव जाणे ! पंजाब नि रॉयल्स नी खूश व्हावे, यंदा त्यांच्या खाली कुठला संघ असणार हे दिसतेय Wink

@ फेरफटका,
अहो कोणावर माझ्या डुआयडीचा आरोप करायच्या आधी त्यांचा सदस्य कालावधी तरी बघा
11 वर्ष 9 months
माझ्या कैक वर्षे आधीच्या आहेत त्या Happy

ईथे बरेच डुआयडी माझेच आहेत हे दाखवायच्या धडपडीत बरीच जनता असते. मी कधी लोकांना खरे खोटे पटवून द्यायला जात नाही. ईमेजची फालतू पर्वा करून कधी माझा वेळ यात घालवत नाही. पण निदान जे सदस्य ओरिजिनल आहेत त्यांच्यावर तरी आरोप करू नका _/\_

असो, क्रिकेटवरच चर्चा म्हणजे शर्मावर चर्चा नाही असे असेल तर माझा फुल्लस्टॉप
कारण सध्याच्या स्थितीत एक चुम्मा वगळला तर सारेच दयनीय खेळ करून निराश करत आहेत आणि शर्माचीच आठवण करून देत आहेत.

तरी माझी सर्व क्रिकेटप्रेमींना एकच विनंती आहे की सध्याच्या पराभवांमुळे खचून जाऊ नका. वा फार टेंशन घेऊ नका. शर्मा येताच झपझप चित्र पलटेल. एकतर तो खंबीर नेतृत्व आणि आपला सर्वोत्तम सलामीचा फलंदाज आहे. पण टीम कॉम्बिनेशन मध्ये देखील सलामीला शर्मा आणि मागे तो बिटस अँड पिसेस जडेजा येताच संतुलन साधले जाईल.

चौथ्या क्रमांकाचा प्रश्न पंत सोडवत आहे. त्याच्या गेल्या काही वन डे इनिंगवर लक्ष टाकल्यास हे लक्षात येईल.
थांबा आकडे आहेत हे सुद्धा माझ्याकडे..

Pant's last 8 innings scores in ODI :-

71(69)
39(16)
7(6)
28(33)
77(40)
78(62)
16(22)
85(71)

IND vs SA: संकट काळात खेळला पंत, द्रविडचा 21 वर्ष जुना रेकॉर्डही मोडला

पंतनं यावेळी दक्षिण आफ्रिकेत कोणत्याही भारतीय विकेटकिपरकडून वन-डे क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर केला. त्याने सध्याचे हेड कोच राहुल द्रविड यांचा 21 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. द्रविडने 2001 साली डरबनमध्ये 77 रनची खेळी केली होती. पंतने द्रविडला मागे (Pant Broke Dravid Record) टाकले.

IND vs SA: संकट काळात खेळला पंत, द्रविडचा 21 वर्ष जुना रेकॉर्डही मोडला >> माझी पूर्ण खात्री आहे की पुढच्या आफ्रिकेच्या सिरीजमधे रोहित किपिंग पण करेल. म्हणजे स्वतः बॉलिंग करेल नि मग ह्या एंड ने गायब होऊन त्या एंडला किपर म्हणून येईल (मर्त्य मानवाच्या व्हिजिबल आय रेंजमधे इथून तिथे कसा फोचल ते कसे दिसणार ? - फ्लिकर सारखे एका क्षणी इथे तर दुसर्‍या क्षणी तिकडे) नि एक गजबशी उडी मारून बॉल पकडेल नि आफ्रिकेच्या खेळाडूंना बाद करेल. (खर तर फलंदाजी पण तोच करेल आफ्रिकेकडून - अँटि रोहित म्हणून - मॅटर - अँटी मॅटर असते तसे ). फलंदाजी तर अर्थातच तोच करणार. तो पर्यंत अकरा कट आऊट आफ्रिकेमधे पोहोचले असतील (सर जरा बघा कि इथे - सर्व क्रिकेटप्रेमीं कडून एक विनंती ) तर काय प्रश्नच नाही. हजार वगैरे रन्स तर बसल्या बसल्या होतील आपले पन्नास ओव्हर्स मधे. कोण कुठला टीनपाट पंत त्याचा कसला कुठला खप्पड रेकॉर्ड ? सगळे क्रिकेटच्या इतिहासातून पार पुसले जाईल बघा.

कदाचित असे तर नसेल कि पंतच्या अंगात रोहित ने सूक्ष रुप धारण करून प्रवेश केला नि आजची इनिंग खेळला ? म्हणजे सिरीजमधली शेवटची मॅच नसून ही पंत खेळला. एव्हढ्या स्लगिश पिचवर इतर लोक झगडत असताना वेगळ्या विकेट वर खेळावे तसे खेळला. तीस - एकतीस ओव्हर मधे पंत असेतो आपण १८० वगैरे होते - पुढच्या वीसेक ओव्हर मधे फक्त शंभर निघाले बघा. नक्कीच रोहित खेळला पंत च्या अंगात येऊन. तेंव्हा माझी आय सी सी ला नम्र विनंती कि रेकॉर्‍ड बुक अपडेट करून पंतच्या धावा रोहित च्या नावावर जमा कराव्यात (जमले तर त्याने खेळलेले सगळे बॉल्स कोहलीच्या नावावर टाकून कोहलीचा अजून फजितवाडा करावा)

बिटस अँड पिसेस जडेजा येताच संतुलन साधले जाईल. >> संजय मांजरेकर इथे लक्ष देईल काय ? वरून शिक्कामोर्तब आलय.

ईमेजची फालतू पर्वा करून कधी माझा वेळ यात घालवत नाही. >> सर तुम्ही आम्हाला लाजवताय हो. आम्हाला पूर्ण कल्पना आहे. जसा आम्हा मनुष्यांचा काही कोट दिवसांचा वेळ ब्रह्मदेवाचा एक श्वास असतो तसेच हे हो. आणी आकडे वगैरे कुठे देऊन शरमिंदा करताय. तुम्ही म्हणालात , आता हेच ब्र्ह्मवाक्य !!! भले राहुल किती ही चांगला खेळलला असूदे मिडल ऑर्डरमधे. तुम्ही पंत म्हणालात मग आता फक्त पंत (च) - मग शेंडी तुटो वा पारंबी !

आपलेच खेळाडू कसे कोणाचे नावडते असू शकतात. ते देखील खेळणारे, जिंकवून देणारे, लाज राखणारे... मला आजवर हे समजले नाही.
म्हणजे वैयक्तिक आवडीचा प्लेअर असावा, पण वैयक्तिक नावडीचा नसावा असे मला वाटते.
असो, शुभरात्री Happy
जे घडते ते भल्यासाठी, राहुलच्या कप्तानीतील मर्यादा उघड्या पडून पंत भविष्यात भारताचा कर्णधार झालेला बघायला आवडेल. राहुलच्या फलंदाजीचा क्लास पाहता तो संघात राहीलच. फक्त पुढेमागे भविष्यात शर्मा कोहलीसारखे पंत राहुल ईगो क्लॅश होऊ नये. आधीच दिल्लीबाबत ते होऊन अय्यर पंतवर नाराज होऊन जगतोय..

भले राहुल किती ही चांगला खेळलला असूदे मिडल ऑर्डरमधे. तुम्ही पंत म्हणालात मग आता फक्त पंत (च) - मग शेंडी तुटो वा पारंबी !
>>>>

हाहा.. मिडल ऑर्डरला पंत की राहुल हे मी कश्याला करतोय. उलट २०-२० मध्ये त्याच्याकडे कोहलीपेक्षाही जास्त शॉट्स आहेत असे मागे माझेच एक वाक्य ईथे सापडेल. बाकी राहुलचे मिडल ऑर्डरचे आकडे चांगले आहेत ते पहिल्या डावातील. चेस करताना राहुल कधी टेस्ट झाला नाही वा त्याने धोनी युवराजसारखे कधी प्रेशर सिच्युएशनमधून अजून जिंकवून दिले नाही. आकडे फसवे असतात. खेळ्या बघाव्यात.. त्याला तश्या सिच्युएशन्समध्ये टेस्ट व्हायचे आहे.. खेळला तर छानच. पंत चौथा राहुल पाचवा.. वा उलटसुलट..

आकडे फसवे असतात. खेळ्या बघाव्यात > >अगाध लीला आपली सर, आपल्या शेवटून तिसर्‍या नि चौथ्या पोस्ट मधे "थांबा आकडे आहेत हे सुद्धा माझ्याकडे.." हे म्हटल्यावर त्यानंतर लगेच "आकडे फसवे असतात. खेळ्या बघाव्यात" अशी जंतरमंतर आपण करू जाणे !

"बाकी राहुलचे मिडल ऑर्डरचे आकडे चांगले आहेत ते पहिल्या डावातील. " हे म्हणताना "पंतने चेस करताना दहा मॅचेस मधे एकशे तीस धावा काढल्या आहेत नि पहिल्या डावात तेव्हढ्याच मॅचेस मधे पाचशे" हे वगळून सरांनी कसे हव्या त्याच मुद्द्यांवर कसे लक्ष केंद्रित करायचे हे ज्ञानदान किती सहजरित्या केले आहे.

" वैयक्तिक आवडीचा प्लेअर असावा, पण वैयक्तिक नावडीचा नसावा " नि "फक्त ते आपल्याला आवडत्या खेळाडूचे कौतुक होताना विसर पडतो आणि नावडत्या खेळाडूचे कौतुक होतानाच जास्त प्रकर्षाने आठवते " हे एकाच दिवशी टाकून आपल्या शाब्दिक कौशल्यांचा आनंद लुटण्याची संधी सरांनी आपल्या भक्तांना दिली ह्याबद्दल मन एकदम उचंबळून आले आहे. क्वांटम मेकॅनिक्स ते हेच का ? शॉडींजर ची मांजर ती हीच असावी.

" गेल्या आठवड्यामधे सरांनी सोशल मिडीयावर केलेल्या पोल मधून रोहित हा पहिला चॉईस कप्तान असायला हवा " पासून आज "राहुलच्या कप्तानीतील मर्यादा उघड्या पडून पंत भविष्यात भारताचा कर्णधार झालेला बघायला आवडेल" मधे सरांनी रोहित ला खड्यासारखा वगळल्यामूळे मला एकदम रोहित च्या एकंदर भवितव्याबद्दल भयंकर चिंता वाटायला लागली आहे. निव्वळ तेच नाही तर अंबानी चे काय होणार ? मुंबई इंडियन्स चे काय होणार ?

ब्र्ह्म सत्य, जगत् मित्थ्या हे किती सहजरित्या दाखवलय सरांनी ! वाह !

Haha, Runmesh, तू मला अहो जाहो करू नकोस. Folks, मी original ID ahe. Farshi active नसते पण क्रिकेट प्रेमी असल्याने हा thread वाचते. Adgich राहावले नाही आजकाल जे trolling केले जातेय ते पाहून. बाकी चालू दे.

थांबा आकडे आहेत हे सुद्धा माझ्याकडे.." हे म्हटल्यावर त्यानंतर लगेच "आकडे फसवे असतात. खेळ्या बघाव्यात"
>>>>

मी आकडे म्हणून ऋषभ पंतच्या खेळ्याच आणल्या आहेत. ओवरऑल एवरेज स्ट्राईकरेट वगैरे नाही.. जसे की आजचीच खेळी. ज्याने सामना पाहिला नाही त्याला स्कोअरबोर्ड बघून तितकेसे कळणार नाही. पंत एक चांगली खेळी खेळला ईतकेच समजेल. पण सामना बघितलेल्यांनाच समजू शकते की त्याची आजची खेळी कशी अफलातून आणि आऊटस्टॅंडींग होती. सुरुवातीच्या चांगल्या सुरुवातीनंतर स्लो झालेले धवन राहुल. मग कोहलीचे असे चाचपडत बाद होणे. राहुलचे अजून शेलमध्ये जाणे. आफ्रिकन स्पिनरसमोर भारतीय फलंदाज आणि ईनिंग फसलीच होती. तिथून मग चुम्मा स्पेशल काऊंटर अटेक.. तो देखील अंधाधुण्द नाही तर कॅल्युलेटेड.. नेमके सांगायचे तर १०० ची पार्टनरशिप त्यात पंत ७४ राहुल २५ एक्स्ट्रा १... पार्टनरशिपमध्ये राहुलचा एक फोर असताना पंतचे १० फोर २ सिक्स.. आणि ते देखील फिल्डशी खिलवाड करत मारलेले.. आणि तो बाद होताच पुन्हा बदललेला गेम.. शेवटी २८६ स्कोअरबोर्डवर लागलेले बघणाऱ्याला त्यातून कळणार नाही की आज पंतचा काय ईम्पॅक्ट होता. तो बाद झाल्यावर शम्सीलाही त्याची पाठ थोपटावीशी वाटली यातच सारे आले. विकेटमागून कॉमेंट्री करून समोरच्या संघातील खेळाडूंना ईतके पिडूनही त्याबद्दल कधी प्रतिस्पर्धी खुन्नस ठेवत नाहीत कारण तो मनात कोणाबद्दल आकस ठेवत नाही हा त्याचा खेळाईतकाच महत्वाचा आवडणारा गुण. म्हणून तो चुम्मा आहे Happy

असो, सांगायचा मुद्दा हा की मी भाष्य त्यावरच करतो जे क्रिकेट मी पाहिले आहे. आकडे तर दुसऱ्यांना द्यायला असतात पण ज्या खेळी मी पाहिल्या आहेत आणि त्या त्या सिच्युएशननुसार त्यांचे वॅल्युएशन करू शकतो, त्यावरच मी प्लेअर जोखतो. आर्टिकल वाचून वा रेकॉर्डबूक बघून नाही Happy

मनमोहन हाहा आणि हो, ईथे तुझा ११ वर्षे जुना आयडी असल्याने आदरार्थी उल्लेख केला. एकेरी उल्लेख केला तर आणखी दहा जण तुझे प्रोफाईल चेक करून जातील. कश्याला ट्राफिक वळवा Happy

मी आकडे म्हणून ऋषभ पंतच्या खेळ्याच आणल्या आहेत. ओवरऑल एवरेज स्ट्राईकरेट वगैरे नाही.. जसे की आजचीच खेळी. >> सर हे एव्हढे स्थितप्रज्ञपणे फक्त आपणच लिहू शकता. म्हणजे राहुल मिडल ऑर्डर मधे चेस करू शकला नाही आपण म्हणता , पंत ने ही दहा सामन्यामधे केलेले नाही पण एका सामन्यातल्या पहिल्या इनिंग वरून आपण पंतबद्दल छातीठोकपणे आकाशवाणी करणार. तुम्ही बघितले हे एव्हढेच लॉजिक बाकी काही नाही. म्हणूनच तर तुम्ही सर हो.

अहो तुमच्या सारख्या महापुरुषासाठी एकापाठोपाठ एक "थांबा आकडे आहेत हे सुद्धा माझ्याकडे.." नि लगेच "आकडे फसवे असतात. खेळ्या बघाव्यात" असे निर्विकारपणे म्हणणे सोपे असते पण आमच्यासारख्या फुटकळ लोकांचा एकदम कोअर डंप होतो हो.

त्यावरच मी प्लेअर जोखतो. आर्टिकल वाचून वा रेकॉर्डबूक बघून नाही >> ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत त्यात त्यातले कळणार्‍यांचे आर्टिकल वाचून वा रेकॉर्डबूक बघण्यामधे काही कमीपणा नसतो रे. आम्ही सर्वगुणसंपन्न नाही हो सर.

छे हो, तसला काही कमीपणा वाटत असता तर शाळेतच गेलो नसतो Happy
पण गावस्करने म्हटलेय म्हणजे हेच खरे, सचिन बोलला ना मग विषय संपला, तुला मला काय या सचिन-गावस्करपेक्षा जास्त कळतेय का हे जे तुम्ही बरेचदा बोलता ना ते मला पटत नाही ईतकेच. माझी मते मी ज्ञान मिळवून स्वत: बनवेन ना. त्यासाठी जाणकारांकडून ज्ञान घेईन. पण कोणा जाणकाराचे मतच प्रमाण का मानावे बरे..

बाकी पुन्हा राहुल पंत जबरदस्तीची तुलना कश्याला.. दोघेही वेगळ्या धर्तीचे प्लेअर असताना.. आणि पंतला तरी कुठे मी तो फिनिशर म्हणून तयार झालाय म्हटलेय.. छे.. धोनीने तो बेंचमार्क ईतके वर सेट करून ठेवलाय ना की येणाऱ्या पिढीतील खेळाडूंना त्याच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचायचा प्रयत्नच कारकिर्दभर करायचा आहे Happy

हर्षा भोगलेशी सहमत - रोहीतला पर्याय नाही!

While speaking to Cricbuzz, Harsha Bhogle said that “without a shadow of doubt”, he would pick Rohit Sharma to replace Virat.

IMG_20220122_150213.jpg

कोहली फॅन्स चवताळलेत सोशल मीडियावर. मला काळजी वाटते आता त्यांची. स्वतःचं काही बरं वाईट केलं नाही म्हणजे झालं. Rofl

पण कोणा जाणकाराचे मतच प्रमाण का मानावे बरे.. >> जाणकार ह्याचा अर्थ काय हे समजत नसेल तर ........

तुला मला काय या सचिन-गावस्करपेक्षा जास्त कळतेय का हे जे तुम्ही बरेचदा बोलता ना ते मला पटत नाही ईतकेच >> सर मला तरी क्रिकेटमधले त्या सचिन नि गावस्कर पेक्षा कमीच कळते. त्यांंना जेव्हढे कळते त्यातले कणभर जरी कळले तरी मी स्वतःला धन्यच समजेन.

“ पण कोणा जाणकाराचे मतच प्रमाण का मानावे बरे..” “ हर्षा भोगलेशी सहमत - रोहीतला पर्याय नाही!” Uhoh Lol सरांच्या लीला अगाध आहेत. आपका रेफरन्स, रेफरन्स, हमारा रेफरन्स, अंधभक्ती! चालायचंच. ‘चाळीच्या मालकाची मुंज आणि आमच्या शंकर्याची मुंज - फरक असायचाच. Happy (आता हा कोट कुणाचा वगैरे प्रसंगाचा कात्रज करायला फुल्ल स्कोप आहे)

हर्षा भोगलेशी सहमत टाकतानाच ही पोस्ट अपेक्षित होती. किंबहुना त्यासाठीच ती पोस्ट होती.

एक असते ते ज्ञान असते. ते ज्याकडे असते त्याला जाणकार म्हणतात. त्याकडून ते ज्ञान जरूर घ्यावे.
पण तो जाणकार क्रिकेटबद्दल आपले जे एक मत देतो त्याच्याशी त्याला क्रिकेटमधील जास्त कळते म्हणून सहमत असण्यात काही लॉजिक नाही.

जसे की आता हर्षा भोगलेच्या मताशी तुम्ही सहमत नसाल तर तुम्हाला हर्षा भोगलेपेक्षा जास्त क्रिकेट कळते असा अर्थ काढूया का Happy

उद्या गावस्कर म्हणाले कर्णधार शर्माच हवा आणि तेंडुलकर म्हणाला की कर्णधार राहुल हवा तर दोघांत कोणाला क्रिकेटची अक्कल जास्त समजावी Happy आपल्या सोयीचे आणि आवडीचे मत विधान करणाऱ्याला का Happy

Pages