चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरोईजम दाखवणारी एकमेव हिरोईन आहे ती..>>>

हे आक्षेपार्ह वाक्य आहे, सरांना काय म्हणायचं आहे यातून ते कळले नाही
आणि हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे, इथे त्याची माती करू नये

हो, विद्या बालनही काही चित्रपटात दाखवते ज्याला आपण स्त्रीप्रधान चित्रपट म्हणतो. पण तापसी प्रत्येक चित्रपटात ते जमवते. त्यासाठी तिला स्त्रीप्रधान वा हिरोईनवर फोकस असलेली पटकथा लागत नाही हे विशेष. म्हणून विशेष कौतुक वाटते.

कंगना टाईपकास्ट झालीय. सुरुवातीला चांगली वाटायची पण त्या चाकोरीबाहेर पडताच गडबडते असे वाटते.

सरांना काय म्हणायचं आहे यातून ते कळले नाही >>> ईटस ओके Happy

तापसीने केसांचा काय जांगडगुत्त्ता केलाय. बरं नाही दिसत ते.

काल Downton abbey पाहिला , तो royal visit वाला .
बाळबोध कथानक . पूर्ण movie च्या ऐवजी एखादा एपिसोड चालला असता .
पण एकदम feel good movie. आजी रॉक्स , बाकीचे शॉक्स
Robert : Please there is no need to argue
Dowager Countess of Grantham : I never argue , I explain

रन लोला रन नामक चित्रपटाचा रिमेक आहे लूप लपेटा. त्यात तापसईला धावायचेच आहे त्यामुळे केशरचना तशी असावी.
Run Lola Run 1998 Explain In Hindi | Looop Lapeta
https://www.youtube.com/watch?v=b5qwbLrx_dw

अररर अजून एका चांगल्या इंग्रजी क्लासिकची माती करणार म्हणजे हे

यांना ओरिजनल कंटेंट सुचणे बंद झालंच आहे तर निदान मग अ आणि आ चित्रपटाच्या कॉप्या तरी मारा च्यामारी

पांघरूण पहिला थिएटरमध्ये
काकस्पर्श चेच घर,विहीर चा सेट आणि साधारण वयातील अंतर वगैरे..
सगळी गाणी छान आहेत अर्थातच

ओटीटी किंवा टीव्ही वरच पहावा असा

नाव वाचून ते घेऊनच थेटरात जायचेय कि काय असे वाटते. पोस्टर पण महा रटाळ आहे. कसे चालणार असे सिनेमे ?

कमर्शियलला 50 % खुरच्याने प्रॉब्लेम आहे , पोट भरेना

त्यात हे असे समांतर सिनेमे लवकर अधांतर पकडणार

अ‍ॅडमिन,
आशुचॅम्पना ऋन्मेषसाठी रिस्ट्रीक्शन ऑर्डर देता येईल का? Lol
फार बोअर होते बुवा वाचणार्‍यांना, ते सर सर म्हणत गरळ ओकणे. चांगल्या चाललेल्या विषयात, जेवताना मधेच खडा आल्यासारखे वाटते. Proud

खडा बाजूला काढून ठेवावा आणि बाकी जेवणाचा आनंद घ्यावा अशा वेळी
बघा प्रयत्न करून जमेल तुम्हाला विश्वास आहे मला Happy

आम्ही शुक्रवार रात्र म्हणून फ्लाईट नावाचा पिक्चर बघायला घेतला आणि प्रचंड हसलो.
सुरुवात(कमोडवर बसून काहीतरी खाणारी पिणारी नायिका) ते शेवट फुल्ल वसूल आहे.

2021 चा बॉलिवूड पट आहे.
तसं तांत्रिक(म्हणजे मांत्रिक नाही, टेक्नॉलॉजी) चं सगळं चांगलं घेतलंय.बजेट पण बरंच वापरलं असावं.

हसायला नको होतं खरं.
पिक्चर म्हणून चांगला बनवलाय.पण एकंदर मूड शुक्रवार वीकेंडपूर्व असल्याने हसू आलं असावं बहुतेक Happy
स्पॉयलर देत नाही.

>>आम्ही शुक्रवार रात्र म्हणून फ्लाईट नावाचा पिक्चर बघायला घेतला आणि प्रचंड हसलो.

डोक्याच्या माता भगिनी एकत्र कशा येतात ते समजतं हा चित्रपट पाहिल्यावर. आणि वर २०२३ मध्ये पार्ट २ येणार आहे.

आशुचॅम्पना ऋन्मेषसाठी रिस्ट्रीक्शन ऑर्डर देता येईल का? L>> lol
Ashuchamp, प्रत्येकाकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात... त्याच्या बद्दल जी प्रतिमा असते त्यानुसार. जर त्यांच्या पोस्ट्स ओलांडून पुढे जात असू तर तुम्हालाही (कायमकरता) तशीच ट्रीटमेंट मिळावी अशी इच्छा अहe aahe का तुमची?
तस असेल तर विषयचं ख लला स!

नानबा, त्यांनी तसं आधीच सांगितलं आहे. ते ऋन्मेषच्या पोस्ट्स ओलांडून पुढे जाऊ शकत नाहीत, पण आपण त्यांच्या पोस्ट्स ओलांडून पुढे जावे असे त्यांचे म्हणणे आहे.
मी हल्ली दोघांचाही (रादर तिघांचा) अनुल्लेख करून पुढे जाते. पण प्रत्येक धाग्यात तेच तेच पाहून आता वैताग आलाय.

प्रत्येक धाग्यात तेच तेच पाहून आता वैताग आलाय>>>

प्रत्येक? ओ अतिशयोक्ती करताना ही थोडा विचार करा की
असे खरोखरच किती धागे आहेत जिथे मी बोलतो?

होऊनच जाऊ द्या, मलाही कळू देत हे प्रत्येक धागे कुठले आहेत
आता आम्ही जिथे असतो तेच धागे निवडून निवडून वाचायचे असतील आणि शी काय बाई हे म्हणायचं असेल तर चालू द्या

नानबा - होय माझी हीच इच्छा आहे आपण माझ्या पोस्ट किंवा धागे काहीही वाचू नये, आपणच नव्हे तर ज्यांना ज्यांना सरांबद्दल भक्ती आहे आणि माझ्या लिखाणाने तिळपापड, राग, वैताग येतो त्या सगळ्यांनी खुशाल माझ्यापोस्ट ओलांडून पुढे जावा
कायमस्वरूपी Happy
मी केव्हापासून हाच विचार करतोय की आधी तरी तुम्ही का वाचत होतात मी लिहिलेलं, मी निरर्थक खरडत तर असतो
ते वाचलं काय नाही वाचलं काय कोणाला काही फरक पडतो का

उगाच कशाला मग त्यावर बोलून वेळ वाया घालवताय

चँप, तुम्ही निरथक धागे काढत असाल. अटेन्शन सीकिंगचा आजार असेल. एखाद्या विषयावर वाद तर घालायचा पण त्याची माहिती घेत नसाल, तसे तुम्ही अभिमानाने सांगत असाल. मुद्दे ट्रोल करत असाल. नसलेली गफ्रे कुठेही धाग्यात आणत असाल, फिल्मस्टार्स सुद्धा आणत असाल. आम्ही हे सर्व इग्नोर केले. पण आता तुमचे हे अती झाले म्हणून तुम्हाला त्याच पद्धतीने ट्रोल करून कुणी जर विचार करायला भाग पाडले तर आम्ही का इग्नोर करावे ? आम्ही तणतणू पण नये का हो ? कमाल करता.

Happy Happy Happy

दुर्दैवाने मी जे निवडक धागे बघते, तिथे हे चालू आहे आशुचॅम्प.
दुसरे म्हणजे मी ऋन्मेशचे प्रतिसाद पण वाचत नाही. काही महिन्यांपूर्वी मला तुम्ही 'आवडत नाही तर माझे प्रतिसाद वाचू नका' असं सांगितलंत तेव्हा पासून मी शक्यतो टाळतेच. पण दरवेळी ते शक्य होत नाही.
जाऊ देत. धाग्याचा विषय हा नाही. त्यामुळे, हेमाशेपो.

तुम्ही 'आवडत नाही तर माझे प्रतिसाद वाचू नका' असं सांगितलंत>>>
अहो फक्त तुम्हालाच नाही, मी सगळ्यांना हेच सांगतो
माझा काही वैयक्तिक राग आकस नाही तुमच्यावर
Happy

नानबा - होय माझी हीच इच्छा आहे आपण माझ्या पोस्ट किंवा धागे काहीही वाचू नये, आपणच नव्हे तर ज्यांना ज्यांना सरांबद्दल भक्ती आहे
>>गैरसमज आहे तुमचा. त्याच्या पोस्ट्स मी वाचतच नाही. एखादा असाच आहे हे कळले की त्यावर शक्यतो वेळ वाया घालवत नाही मी माझा - निदान तसा प्रयत्न तरी करते.

पण तुमच्या बद्दल आदर होता म्हणून म्हटले की प्रत्येकाकडून वेगळ्या अपेक्षा असतात.

अर्थात आता तुम्हीच ओलानडा म्हणालात तर आता प्रयत्न नक्की करेन

काल लूप लपेटा पाहिला तापसीसाठी.
तापसीने निराश नाही केले. तिचा हिरोही छान वाटला. ईनफॅक्ट तोडीस तोड कलाकार होता. चित्रपटही ईंटरेस्टींग वाटला. कॅमेरा अँगल वेगळेच होते. बॅकग्राऊंड म्युजिकही कथा वेगवान आहे याची सतत आठवण करून देणारी. संवादही काही जागी चटपटीत आहे. चित्रपटाची ट्रीटमेंटच वेगळी आहे.
पण कोणाला मुद्दाम बघा म्हणून सांगायला नको. प्रत्येकाला आवडेलच असे नाही. स्पेशली चोप्रा, जोहर, शेट्टी यांच्या बॉलीवूडपटात रमलेल्या जनतेला हा वेगळा प्रयोग आवडणार नाही वाटते. आमच्या घरच्यांना रुचला नाही. त्यांना मागे लुडो चित्रपटही रुचला नव्हता पण मला वन टाईम वॉच नक्कीच वाटलेला. हा चित्रपटही लुडो रुचलेल्या जनतेला आवडू शकेल असे वाटते. त्यात यमराज होता. यात सत्यवान आणि सावित्री आहे.

Pages