इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी हा जोक फसल्याने बाकी सगळ्यांनी काढून टाकला आणि बरा वैद्य बाईंनीच जपुन ठेवलाय! मजा येते का त्यांना हे बघुन?//

नाही. जॉर्ज फ्लॉईडच्या खुनाचा व्हिडियो बघायला अत्यंत त्रासदायक असूनही ट्विटरवर अमेरिकनच नव्हे जगभरातील सर्वसामान्य लोकांनी शेअर केला तो त्यांना मजा येत होती म्हणून नाही. पण चुकीच्या गोष्टीही जगासमोर आल्या पाहिजेत, लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. Awareness साठी. डिलीट करून, कार्पेटखाली सारून चालणार नाही.
मला स्वतःलाही आधी 'नक्की कशामुळे मुनव्वरला इतका विरोध होत आहे?' असा प्रश्न पडला होता. मुनव्वरचे समर्थक पुरोगामी तर गोध्राबद्दल गुप्तता ठेवून 'फक्त राम सीतेवर एक जोक केला तर इतका त्रास देतायत बिचाऱ्याला, माजी गो चंदी' टाइप कांगावा करत होते.
पण गोध्रा क्लिप बघितल्यावर किळस आली. त्यानंतरही तो मी सॉरी म्हणणार नाही, गलती कियाही नही है असं म्हणतो आहे.

मुनव्वरनी नेहरू, काॅन्ग्रेस, त्याचा धर्म यावरही जोक केले आहेत. यातले कोणीही ट्रोलधाड बनवून त्याच्या मागे लागले नाहीत.
Whitehat ला ब्लॅक काॅमेडी माहीत नाही वाटतं.
https://en.m.wikipedia.org/wiki/Black_comedy

व्हाइटहॅट-

जोक मलापण नाही आवडला . पण त्यात हिंसा किंवा एखाद्या समाजाबद्दल द्वेष तयार करणे असा उद्देश दिसला नाही. जिंवा यांना जाळले ते ठीक झाले असेही काही नाही. असंवेदनशीलता नक्कीच दिसली. माझ्या मते, एक्च्युअल जोकपेक्षा पुढचे विधान- डायरेक्टेड बाय अमित शहा आणि प्रोड्यूस्ड बाय आरएसएस हे कितीतरी जास्त खळबळजनक असायला हवं होतं. मी मुनव्वरच्या कार्यक्रमाचे तिकीट हा जोक पाहून घेणार नाही हे नक्की*.

मात्र- त्याला त्याचे कार्यक्रम गुंडागर्दीशिवाय करता यावेत याला तुम्ही सहमत असाल अशी आशा आहे.

*-Not that I buy a lot of tickets for stand up Proud

शिवाय गोध्रा हे नंतर काढलेली सबब आहे. मुळात त्याला मध्य प्रदेश मध्ये झाली अटक "भावना दुखवले" याबद्दलच होती.

वर ज्यांना हा जोक ऑफेन्सिव्ह वाटला त्यांच्यासाठी, भगवे उपरणे घातलेल्या तरुणांनी काय ओफेन्सिव्ह व काय नाही ते ठरवावे व पोलिसांनी त्यांचे आदेश पाळावेत, हे तुम्हाला पटते का? या पुढचे म्हणजे कोणतेही सिनेमा/नाटकाचे संहिता या उपरणे धारक मंडळींकडून आधीच तपासून घेणे.

मुनव्वर चे विनोद असंवेदनशील असतीलही, पण vigilante पद्धतीने झुंडशाहीने त्याचे कार्यक्रम बंद पाडणे योग्य आहे का? हा कळीचा प्रश्न आहे.

Submitted by vijaykulkarni on 1 December,

अगदी बरोबर आहे कुलकर्णी.
बंगलोरमध्ये तर भाजप सरकार आहे. त्यांना सोडून द्या. मुंबई महाराष्ट्रात त्याचे शोज करा. मुंबईचा शो का रद्द केला? वर्ल्ड बेस्ट मविआ सरकारचा तितका दरारा , धाक आहेच ना की हिंदुत्ववाद्यांची काही गडबड करायची हिंमतच होणार नाही. नवरात्रित राज्यव्यापी बंद शिस्तीत करून घेता येतो तर एक शो ठेवणं अवघड नाही.
आता साहित्य संमेलनातला तो ब्राह्मणांचा मराठी कार्यक्रम रद्द करून त्याच्या जागी लाडक्या मुनव्वरचा शो ठेवायचा का? पुरोगामी त्याचे चाहते आहेतच.
आगीत जळून मृत्युमुखी पडलेल्या लोकांवर असंवेदनशील जोक्स करून हसायचा हक्क हवाय इतकंच ना. आपल्या महाराष्ट्रात गेल्या अकरा महिन्यात विविध हॉस्पिटल्सना आगी लागून त्यात 50 हून अधिक रुग्ण जळून मरण पावले. जानेवारी 2021 मध्ये भंडाऱ्यातील हॉस्पिटलमध्ये 10 बाळं ते परवा नोव्हेंबर 2021 अहमदगर कोविड रुग्णालयात 11 रुग्ण असं मृत्यूचं तांडव चालू आहे.

"आता साहित्य संमेलनातला तो ब्राह्मणांचा मराठी कार्यक्रम रद्द करून त्याच्या जागी लाडक्या मुनव्वरचा शो ठेवायचा का? पुरोगामी त्याचे चाहते आहेतच." असं इथं कुणीतरी सुचवले आहे का ? काहीही ? कुणाचेही बिल कुणावरही फाडणे?

व्हॉटअबौट्री नाही. हात टेकले आहेत.
गोध्रा जोक ही 'नंतर काढलेली सबब' असं कुलकर्णी म्हणतात. आणि त्यांना असंवेदनशील जोक्स करण्याचा फ्रीडम हवा आहे. मग तो मविआ प्रोटेक्शनमध्ये मुंबई-महाराष्ट्रात मिळेल. साहित्य संमेलनात शो करता येईल. ब्लॅक कॉमेडीसाठी गुजरातमधील गोध्रा दुर्घटनेखेरीज यावर्षभरातले महाराष्ट्रातील हॉस्पिटल फायर्स हेही 'मटेरियल' वापरता येईल.
(कोपरापासून हात जोडून नमस्कार.)

व्हॉट अबौट्रीच ती. बेंगलोर मध्ये का करता येऊ नये ?

गडकऱ्यांचा पुतळा हवा तर अमुक्तमुक ठिकाणी लावा असे जर पुतळा पडल्यावर म्हणले तर काय म्हणाल ?

(आता मी पुतळा पाडायचे समर्थम करतो असा अर्थ नका काढू.)

Law and order चं कारण बंगलोर पोलिसांनी सांगितलं आहे. तसं कारण ते देऊ शकतात. उजव्या लोकांच्याही अनेक कार्यक्रमांना वेगवेगळ्या ठिकाणी परवानगी नाकारली जात असते. सांगलीत अफझलखान वधाचं पोस्टर लावायला परवानगी नव्हती. पोलिसाना discretion असतं ज्याचा ते वापर करतात. त्यांच्याकडे असलेली सर्व sensitive माहिती त्यांना शेअर करता येत नाही.
पण जिथे मविआ सरकार आहे त्या महाराष्ट्रात पोलीस सर्व सुरक्षा पुरवतील ना? तर मुंबईतला शो रद्द का केला? आता साहित्य समेलनात शो होऊन जाऊ द्या. मविआ समर्थकांच्या रूपाने हक्काचा फॅनबेस पण आहेच. आपल्या महाराष्ट्र सरकारने कार्यक्रम ठेवायचा नाही आणि कर्नाटक,एमपीकडे बोट दाखवायचं असं कशाला?

फारेण्ड - तुमच्या एका वाक्यावर मी अप्रत्यक्ष आक्षेप घेतला होता. तुमच्या लक्षात आला नसावा म्हणून स्पष्ट लिहितोय.
...
जावेद मुस्लिम आहेत म्हणून त्यांना आणि गुलजार मुस्लिम असते तर त्यांना केलेला विरोध चालला असता असा अर्थ निघतोय

>>> हा अर्थ कसा निघतो मला समजले नाही. तेथेच हे ही लिहीले आहे की ->
"मला प्रश्न आहे तो या दोघांचा मराठी साहित्याशी काय संबंध आहे? तसा काही प्रिसिडन्स असेल तर बोलावू दे."

इव्हन त्यानंतर तुम्ही प्रिसिडन्स दाखवल्यावर "मग तर काहीच प्रॉब्लेम नाही" हे ही लिहीले होते.

मात्र- त्याला त्याचे कार्यक्रम गुंडागर्दीशिवाय करता यावेत याला तुम्ही सहमत असाल अशी आशा आहे.

हो. कुणालाही कार्यक्रम गुंडागर्दीशिवाय करता यायला हवेत. तुम्हाला त्यांचा आक्षेपार्ह वाटला तर कायदेशीर कारवाई करा. गुंडागर्दी करणे चुकीचेच आहे.

खऱ्यांच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं तर इथे आक्षेप हा कार्यक्रमावर नाही, कंटेंट वरही नाही, आणि आता तर कार्यक्रमाच्या नावावर नाही, केवळ कलाकारांच्या नावावर आहे. ह्याला काहीच करू शकत नाही. तुम्हाला ते लोक आवडत नसतील, किंवा इर्शाद नाव आवडत नसेल, तरी दोन्हीवर उत्तर म्हणजे तुम्ही कार्यक्रमाला जाऊ नका. जर अनेकांना तसे वाटले तर तो कार्यक्रम तोट्यात जाऊन आपोआपच बंद पडेल. गुंडगिरी करून बंद पाडणे अजिबात समर्थनीय नाही.

मला स्वतःला त्यांच्या कविता फार बोअर होतात. एवढं गुंडगिरी वगैरे करून कुणी कार्यक्रम बंद पाडत असेल असा विचारही कधी डोक्यात नव्हता आला. (त्या बातमीच्या निमित्ताने तो कार्यक्रम अजूनही चालतो हे कळलं Wink )

The Ashoknagar Police wrote to Vishesh Dhuria, the head of Curtain Call events, referring to Faruqui as a “controversial figure as he was been in controversial statements and on other religion Gods (sic)”. The letter also claimed that “many states have banned his comedy shows” – which is false; while Faruqui’s shows have been cancelled after threats of protest and even violence from right-wing Hindu groups, no state has “banned” him. The police letter appears to have been drafted in a hurry, with several incomplete sentences and grammatical errors.

फारेण्ड, ( हे ही मुस्लिम वाटले की काय महासंघाला) यावरून तसा अर्थ निघतो. म्हणजे ब्राह्मण महासंघाने गुलजारना मुस्लिम म्हणून आक्षेप घेतला की काय . तसं त्यांनी करायला नको कारण ते मुस्लिम नाहीत. असा अर्थ लागला.

तुम्हांला तसं म्हणायचं नसेल असंच वाटतंय.

गोध्रावाला व्हिडियो पाहिला. insensitive वाटला.
मुनव्वर + गोध्रा असं शोधलं तर पहिली लिंक ओप इंडियाची आली. इतर अनेक लिंका नावाजलेल्या राइट विंगर्सच्या आहेत. यातल्या
बर्‍याचशा त्याने आपण स्टँड अप कॉमेडी सोडतोय अशी घोषणा केल्यानंतरच्या आहेत.

बरखा दत्तने घेतलेल्या त्याच्या मुलाखतीत तो म्हणतोय की तो भाग लोकांना आक्षेपार्ह वाटल्याने मी माझ्या चॅबेलवरून डिलीट केला पण काही लोकांनी त्याचा प्रसार केला.

ओप इंडियाच्या लेखात म्हटलंय "I thought it is a movie directed by Amit Shah, produced by RSS त्याच लेखात अपलोड केलेल्या व्हिडियोत हे वाक्य कुठे दिसलं नाही.
गोध्रा जळितात मेलेल्या हिंदूंवर केलेल्या विनोदाला हिंदुत्ववाद्यांचा आक्षेप आहे.

त्याच्या चॅनेलवर नवाब, नेहरू & गुजरात २००२ असा एक व्हिडियो आहे. हा विनोद त्या शो मधला असावा असं वाटतं. यात त्याने गोध्रा पश्चात दंग्यांत मारल्या गेलेल्या मुस्लिमांवरही जोक केले आहेत.

मला हे दोन्ही विनोद पचले नाहीत. डार्क ह्युमर, ब्लॅक कॉमेडी हे मला विनोद म्हणून घेता येत नाहीत.

मुनव्वर बद्दल सगळा आरडा ओरडा करताहेत हिंदुत्ववादी. पण पुरोगाम्यांनी त्याचा अमका विनोद लपवून ठेवला हे वाक्य मात्र विनोदी वाटलं.

डार्क ह्युमर हे फार जपून वापरावं लागणारं हत्यार आहे.
याच पार्श्वभूमीवर राहुल सुब्रमण्यम 'वर्ल्ड वॉर 2' व्हिडीओ पाहिला,आपल्याला तो खटकतो का म्हणून.मला तो त्याच्या इतर विनोदाच्या मानाने(आयटी,ओनेस्ट इंजिनिअरिंग, किंवा आय ट्रस्ट ओन्ली केंट वगैरे) फार आवडला नाही.हिटलर, ज्यूज, मारले गेलेले लोक यावर क्रिकेट कमेंटरी च्या शैलीत विनोद.
एकंदर जिनोसाईड हा विषय डार्क ह्युमर म्हणून मानला तरी पण फार जोखमीचा आहे.

डार्क ह्युमर सरसकट सगळ्यांनाच आवडू शकत नाही हे बरोबरे. विशेषतः ज्यांना फटका बसलाय त्यांना. वाॅटसपवर करोनावरही तसे जोक येतात. काही हसतात, काही दुर्लक्ष करतात.

जेनोसाईड वरचे डार्क ह्युमर आवडले नसले तरी बऱ्याचदा डार्क ह्युमर आवडीने बघतो. रिक अँड मॉर्टी, बोजॅक होर्समन वैगेरे.

बोजॅक मधले self depreciating humour खूपच डार्क आहे.

मुनवर च्या अनेक जोक पैकी हा एक डार्क ह्युमर चा आहे. तो मला आवडला नाही. तो सर्वंना आवडेल असे नाही, तशी अपेक्षाही नाही. तिकिट लावून केलेल्या या कार्यक्रमाला न जाण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहेच. मुद्दा तो नाही, मुद्दा हा आहे की कुणाचा कार्यक्रम होऊ द्यायचा वा कुणाचा नाही हे भगवे उपरणे धारक मॉब ठरवणार का?

मागे ऐन कोरोनाच्या लाटेत बंगलुरुचेच खासदार तेजसवी यांनी लोकांचा जीव वाचवण्या ऐवजी एक स्टंट बाजी केली होती, ते एखाद्या सिकंदराच्या आवेशात कोव्हिड सेंटर मध्ये गेले , पंधरा वीस मुस्लीम टेंपररी लोकांची नावे घडा घडा वाचून दाखवली व त्यांन कामावरून काढले. या दोन्ही घटनांची मूळ हेतू तेच आहेत, economic blockade ! अमित शह यांचा अपमान, देवांचा अपमान, गोध्रा या सार्‍या सबबी अहेत.

सहमत. मुनव्वरने त्यात कोणतीही हिंसा भडकावली नाहिये, का या काही प्रक्षोभक बोलला नाहिये. भडक भगव्यांच्या अ‍ॅप्रुव्हलची आजिबात गरज नाही.

(शार्ली हेब्दोच्या वेळेस सुद्धा हेच मत होते. आणि ते कार्टून या जोक्सपेक्षा फार फार फा..........र जास्त चिथावणीखोर होते. )

>>>>मागे ऐन कोरोनाच्या लाटेत बंगलुरुचेच खासदार तेजसवी यांनी लोकांचा जीव वाचवण्या ऐवजी एक स्टंट बाजी केली होती, ते एखाद्या सिकंदराच्या आवेशात कोव्हिड सेंटर मध्ये गेले , पंधरा वीस मुस्लीम टेंपररी लोकांची नावे घडा घडा वाचून दाखवली व त्यांन कामावरून काढले. या दोन्ही घटनांची मूळ हेतू तेच आहेत, economic blockade ! अमित शह यांचा अपमान, देवांचा अपमान, गोध्रा या सार्‍या सबबी अहेत.

+१११११
मागे म्हणलेलो तस- जोकपेक्षा जोकसांगणार्‍याचे नाव जास्त ओफेनसिव्ह आहे.

नाव जास्त ओफेनसिव्ह आहे. >> तितकंच असेल असंही वाटत नाही. ज्या गोष्टीला भगवं अप्रुवल नाही, आणि तसं नसेल तर नेत्याच्या मुखातुन सांडलेले भडक शब्द झेलायला, एका हाकेला ओ देणारी कामंधामं नसलेली वानरसेना उपलब्ध आहे. त्यामुळे आलेला माज आहे.
वीर दास, खरे, जोशी, गुलजार .. उदय लिहितात ती कलबुर्गी, लंकेश, दाभोळकर कोणतीही वरच्या व्याख्येत बसणारी ऑफेन्सिव्ह नावं नाहीत.

फारेण्ड, ( हे ही मुस्लिम वाटले की काय महासंघाला) यावरून तसा अर्थ निघतो.
...
तुम्हांला तसं म्हणायचं नसेल असंच वाटतंय. >>> यस. तो जोक होता. सोशल नेटवर्क वर फारशी माहिती न काढता लोक धडाधड विधाने करतात, इतरांना जज करतात त्यावर. ईर्शाद बद्द्ल तसेच झाले होते.

पुन्हा whataboutism
WHITEHAT एखादे पंचतारांकित हॉटेल चालवत नसावेत अशी आशा करतो. अन्यथा कोणाचेही बिल कोणावरही फाडण्याच्या सवयीला अनुसरून केवळ चहा घेतलेल्या माणसा कडून बिर्यानी व गुलाबजाम चे बिल वसूल करतील. ( हा जोक आहे !)

वरील जाहिरात खोडसाळ व राजकिय आहे, ती आय टी सेल कडून आलेल्या खोट्या मटेरिअल वर आधारित आहे. तरीही त्या तोडफोडीचे इथे कुणीही समर्थन केलेले नाही. तीही निषेधार्हच आहे. आर के लक्ष्मण यांचेच इंदिरा गांधींबद्दलचे वाक्य कोट करतो

"I made fun of her with my cartoons & she conferred on me a Padma Vibhushan"

Pages