Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पोलिसांनी पत्र आयटीसेलकडून
पोलिसांनी पत्र आयटीसेलकडून लिहून घेतलं का?
Submitted by भरत. on 29 November, 2021 - 11:22
आयटीसेल कडून घेऊ देत नाही तर स्वतः लिहू दे. हिंदू देवतांची निंदानालस्ती करणाऱ्याचा कार्यक्रम रद्द केला हे प्रशंसनीय ! घुसखोर, आक्रमकांना आमच्या देवतांचा मान राखता येत नसेल तर किमान त्यांनी अनादर तरी करू नये हीच अपेक्षा!!!
गुंड लोक पीस उद्ध्वस्त करणार
गुंड लोक पीस उद्ध्वस्त करणार म्हणून कॉमेडियनचे कार्यक्रम बंद.
घुसखोर, आक्रमकांना आमच्या
घुसखोर, आक्रमकांना आमच्या देवतांचा मान राखता येत नसेल तर
घुसखोर जेंव्हा आक्रमण करत होते तेंव्हा तुम्ही काय करत होता?
नीट वाचा. पोलिस म्हणताहेत -
नीट वाचा. पोलिस म्हणताहेत - काही संघटना गोंधळ घालू शकतील , शांतता आणि सौहार्दाचं वातावरण बिघडवतील म्हणून तुम्ही कार्यक्रम रद्द करा.
शूरवीर बंगलोर पोलिस
ब्राम्हण विधवा लुक ह्या बद्दल
ब्राम्हण विधवा लुक ह्या बद्दल मला जरा वाइट वाटले होते. कार ण असा स्पेसिफिक लुक मी काही गेल्या १४ वर्शात मेंटेन केलेला नाही. पण काय हे स्टिरीओटाय्पिन्ग असे वाटलेले.
इथल्या एका स्त्री मेंबरने मला दुसर्या साइट वर एक पॉइन्ट नजरेस आणून दिल्याबद्दल " चांभाराचे लक्ष चपलेकडेच असायचे" अशी म्हण वापरलेली. ते ही मला आवडले नव्हते. पण काही अॅक्षन घेण्यात आलेली नाही.
जातीवाचक व इतर बायसेस एकदम घट्ट झालेले आहेत. त्यामुळे असे काहि दिसले की वाचन मात्र पण नोंद करून ठेवते.
Low & Order ?
Low & Order ?
(बहुतांश भाषा डावीकडून
(बहुतांश भाषा डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने लिहिल्या जात असतांना) उलटी गंगा वाहणाऱ्या उर्दू भाषेतील नाव दिले >> पण कार्यक्रमाचं नाव तर डावीकडून उजवीकडे लिहिलं होतं
बिचाऱ्या संदीप खरे सरांचं
बिचाऱ्या संदीप खरे सरांचं ट्रोलिंग काही संपेना.
आता त्यांच्या कार्यक्रमात ते, सलील कुलकर्णी आणि इतर ब्राह्मण कलाकार आहेत या मुद्द्यावरून ट्रोल होत आहेत. यावेळी पलीकडच्या साईडने ट्रोल होत असल्यामुळे इर्शादच्या वेळी कळवळा आलेले पुरोगामी गप्प आहेत किंवा ट्रोलिंगमध्ये सामील आहेत.
https://www.loksatta.com/maharashtra/sahitya-sammelan-nashik-programme-b...
उगाचच वडाची साल पिंपळाला
उगाचच वडाची साल पिंपळाला लावणे ...
वरील बातमी संदिग्ध आहे, त्यात नक्की कुणी हे ट्रोलिंग केले आहे याचाही उल्लेख नाही. आणी पुरोगामी गप्प आहेत किंवा सामील आहेत हाही बिनबुडाचा आरोप आहे. असो...
https://www.tv9marathi.com
https://www.tv9marathi.com/maharashtra/troll-on-social-media-before-the-...
टीव्ही9 ने पण घेतली आहे न्यूज. त्यात कोणी काय म्हटलं ते आहे.
सर आपण पुरोगामी आहात आणि डॉ सलिलचे आडनावबंधूपण आहात. आपली काय भूमिका आहे याबद्दल? आपण या कार्यक्रम करणाऱ्या टीमला सपोर्ट करता, विरोध करता की तटस्थ आहात?
भरपूर ट्रोलिंग सुरू आहे
भरपूर ट्रोलिंग सुरू आहे फेबुवर कालपासून. हे ईर्शाद सारखेच आहे पण वेगळ्या पब्लिककडून.
इर्शादबद्दल 16 पानी वैचारिक
इर्शादबद्दल 16 पानी वैचारिक उत्सर्जन, नाझी नाझी असा कांगावा
आताच्या प्रकाराबद्दल- मौनाची भाषांतरे
फेबु बघत नाही त्यामुळे माहीत
फेबु बघत नाही त्यामुळे माहीत न्हवते.
>>ईर्शाद सारखेच आहे पण वेगळ्या पब्लिककडून.>> +१
ब्रिगेडी आणि हिंदुत्त्ववादी एकाच माळेचे आहेत. एकास झाकावा आणि दुसर्यास काढावा. तुलनाच करायची झाल्यास ब्रिगेडी काकणभर जास्तच कडवे, डेंजरस आणि हलकट आहेत. निषेध!
हे पाहण्यात आलं नव्हतं.
हे पाहण्यात आलं नव्हतं. जातीचा काय संबंध! अवघड आहे!
>>हे पाहण्यात आलं नव्हतं.
>>हे पाहण्यात आलं नव्हतं. जातीचा काय संबंध! अवघड आहे!>> +१
खरंच अवघड आहे....
खरंच अवघड आहे....
"अवघड आहे!" - खरंय! ह्या
"अवघड आहे!" - खरंय! ह्या सगळ्या फालतूपणाची हद्द झालीय. असल्या सुरस आणि चमत्कारिक कल्पना सुचू शकणार्या निरुद्योगी डोक्यांची कमाल आहे.
"ब्रिगेडी आणि हिंदुत्त्ववादी एकाच माळेचे आहेत. " - कुठल्याही एकांगी विचारधारेचे पाईक ह्याच माळेचे मणी आहेत रे.
<<<<<हे पाहण्यात आलं नव्हतं.
<<<<<हे पाहण्यात आलं नव्हतं. जातीचा काय संबंध! अवघड आहे!>>>>>
ज्यांना काव्यातले किंवा गायन यातले काहीहि कळत नाही, पण उग्गीच कुठेतरी स्वतःचे नाव पुढे आणायचे असते, तेच लोक असे करतात.
त्यातून ब्राह्मण म्हणजे काय, कुणिहि यावे नि त्यांच्याबद्दल बोंब मारावी!
बिचारे तरी त्यांन्ना काय करायचे ते करतच रहातात, नि पुष्कळ गोष्टी इतरांपेक्षा चांगल्या करतात म्हणून हेवा!
कित्येक वर्षे महाराष्ट्रात बिन ब्राह्मणांचे राज्य होते - ब्राह्मणांनी काही तक्रार केली नाही कधी.
ब्रिगेडी आणि हिंदुत्त्ववादी
ब्रिगेडी आणि हिंदुत्त्ववादी एकाच माळेचे आहेत. +१
मीही निषेध करतो. आता समाधान व्हावे.
आता ममता कुलकर्णीचेही तुम्ही
आता ममता कुलकर्णीचेही तुम्ही आडनावबंधू म्हणून अजून प्रश्न येतील... जस्ट सेईंग
निषेध करायचा तर करा किंवा नाही करायचा तर नका करू पण आडनावबंधू म्हणून कुलकर्णी मंडळींबद्दल प्रश्न विचारायला सुरूवात केली तर अनेक क्षेत्राबद्दल उत्तर देत बसावे लागेल तुम्हाला. 
काहीही वाट्टेल ते चाललंय!
काहीही वाट्टेल ते चाललंय! सर्विस मोटरीच्या टायमाला असला तर्रास न्हवता.
<< त्यातून ब्राह्मण म्हणजे
<< त्यातून ब्राह्मण म्हणजे काय, कुणिहि यावे नि त्यांच्याबद्दल बोंब मारावी!
बिचारे तरी त्यांन्ना काय करायचे ते करतच रहातात, नि पुष्कळ गोष्टी इतरांपेक्षा चांगल्या करतात म्हणून हेवा!
कित्येक वर्षे महाराष्ट्रात बिन ब्राह्मणांचे राज्य होते - ब्राह्मणांनी काही तक्रार केली नाही कधी. >>
------ सोशल मीडिया मधे बातम्यां " पेरुन " समाजांत दुफळी माजविणारी विषारी विचारसरणी आहे. आणि असे काम " कुणी " पण करु शकतो. परकाच असायला हवा असेही नाही. आपल्याच समाजाच्या प्रार्थनास्थळा बाहेर रात्रीच्या वेळी एखाद्या प्राण्याचे ( गाय / डुक्कर ) अवशेष टाकून किंवा पवित्र पुस्तकाच्या प्रती फाडून/ जाळून - दुसर्या दिवशी दंगल घडविण्याच्या अनेक घटना देशाने बघितल्या आहेत. आपल्याच प्रार्थनास्थळासमोर हे विशेष...
पुष्कळ गोष्टी इतरांपेक्षा चांगले करतात म्हणजे नक्की कोणत्या गोष्टी अभिप्रेत आहेत? याचा देशाला आणि स्वत:च्या समाजाला काडीचा तरी उपयोग आहे का?
समाजांत निव्वळ अंधश्रद्धा पसरविणार्या (कोरोना काळांत थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, दिवे लावा, मंदिरे उघडा.... ), आणि प्रतिगामी विचारांना खतपाणी घालण्यार्या बुरसट विचारसरणीचा हेवा कुणी विचारी करणार नाही. आपल्याकडे हेवा वाटण्यासारखे काही आहे या गैरसमजातून बाहेर या.
राज्य कुणाचेही असले तरी "ब्राह्मण्यवादाचे" वर्चस्व कायम असते.... कालही होते, आणि आजही आहे. काल याच "ब्राह्मण्यवादाचे" शिकार - रणांगणावर अजिंक्य ठरलेले थोरले बाजीराव होते आणि आज नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश , कलबुर्गी, पानसरे आहेत.
समाजांत दुफळी माजविणे, जाती-धर्मांत द्वेष पसरविणे आणि अंधश्रद्धांना खतपाणी घालणे हे पुढे जाण्याचे मार्ग नाही.
काहीही विषय ताणतात.मागेही
काहीही विषय ताणतात.मागेही कुणी मराठी डायरेक्टर का प्रोड्युसरने पण, सगळ्या मराठी मालिकाच्या लिड हिरॉइन ब्राम्हण असतात अस म्हटल होत.
<< "ब्रिगेडी आणि
<< "ब्रिगेडी आणि हिंदुत्त्ववादी एकाच माळेचे आहेत. " - कुठल्याही एकांगी विचारधारेचे पाईक ह्याच माळेचे मणी आहेत रे >>
------ याच माळेत तालीबान्यांना पण गोवतो.... नावे वेग-वेगळे आहेत, पण वैचारिक पाया इतरेजनांचा द्वेष यावर आधारलेला आहे.
एकांगी विचारधारा घातक आहे, त्याहीपेक्षा विरोधी विचार नकोच हे जास्त घातक रसायन आहे. इतर विचारांना झिडकारणे हा प्रगतीच्या मार्गातला मोठा अडसर आहे.
इंटरेस्टिंग आहे हे! खूप
इंटरेस्टिंग आहे हे! खूप ब्राह्मण कलाकार आहेत म्हणून एखादा कार्यक्रम आक्षेपार्ह आणि खूप दलित/इतर वर्गीय कलाकार आहेत म्हणून एखादा कार्यक्रम आक्षेपार्ह आहे असे ठरवणे हे दोन्ही चूक वाटते. पण खूप ब्राह्मण कलाकार आहेत आणि खूप दलित/इतर वर्गीय कलाकार नाहीच आहेत अशी परिस्थिती असल्याने खूप ब्राह्मण कलाकार घेऊन कार्यक्रम होतोय असं होतंय का? असं असेल तर त्यावर ब्राह्मण कलाकारांचा कार्यक्रम बंद पाडणे हे उत्तर नाही. कदाचित जे धडपडणारे दलित, मागासवर्गीय कलाकार आहेत त्यांना मदत करणे, exposure मिळवून देणे हे करणं आवश्यक आहे. माझी खात्री आहे की असे उपक्रम जर सातत्याने सुरू ठेवले तर समाजाच्या सर्व घटकांमधून अनेक उत्तम कलाकार, साहित्यिक नक्कीच समोर येतील. हा असलेला कार्यक्रम बंद पाडल्याने काहीच constructive घडणार नाही. पण दुर्दैवाने असं काहीही होणार नाही. कारण मूळ हेतू हा द्वेष दिसतो सुधारणा नाही.
आपल्या त्या ह्या किंवा आपले
आपल्यात्या ह्या किंवाआपलेते हे मोड ऑन -ट्रोल करणारे असं म्हणताहेत का की या सगळ्यांना घेतलं म्हणून हा कार्यक्रम बंद करा, यावर बहिष्कार टाका किंवा शेफाली वैद्य सारखं - आम्ही हा कार्यक्रम पाहणार नाही?
ट्रोल करणारे ब्रिगेडी आहेत की सर्वसमावेशकतेची अपेक्षा ठेवणारे आहेत हे माहीत नाही. वर एका मराठी दिग्दर्श काचा उल्लेख आला आहे. मलाही तो मुद्दा आठवला होता. यांना अजिबात घेऊ नका असं ते म्हणताहेत की फक्त हेच का घेता असं विचारताहेत?
अमेरिकन, ऑस्ट्रेलियन टीव्ही कार्यक्रम पाहताना मला जाणवलेली एक गोष्ट लिहितो. व्हाइट कॉलर, कॅसल, बोन्स यासारख्या क्राइम बेस्ड मालिकांत पात्रे /कलाकार वर्ण, वंश, लैंगिकता यांत वि विधता साधलेली दिसते.
विल & ग्रेसमध्ये सगळे व्हाइट आहेत. दोन्ही पुरुष पात्र गे आहेत. ग्रेस ज्यू आहे आणि या सगळ्यांवर भरपूर विनोद असतात
मास्टर शेफ ऑस्ट्रेलियात मूळ ऑस्ट्रेलियन्सपेक्षा स्थलांतरित , निर्वासित जास्त दिसतात.
टीप - अमुक व्यक्ती अमुक जाती धर्मा ची आहे या कारणासाठी टारगेट करणं मला मान्य नाही. या गोष्टीचा कायम निषेध असेल.
< तुलनाच करायची झाल्यास
< तुलनाच करायची झाल्यास ब्रिगेडी काकणभर जास्तच कडवे, डेंजरस आणि हलकट आहेत>
हिंदुत्ववाद्यांनी अहिंदूंच्या व्यवसाय स्वातंत्र्यावर घाला घातला आहे म्हणजे पोटावर पाय दिला आहे. मुस्लिम चुडीवाला, मेंदी आर्टिस्ट, मुस्लिम ओन्ड हॉटेल्स , रेस्टॉरंट्स , मीट शॉप्स किंवा मीट फिश एग बेस्ड पदार्थ विक्रेते यांना वेगवेगळी निमित्ते का ढून धंदा करू न देण्याचे प्रकार होत आहेत. तसे सरकारी आदेशही निघत आहेत. त्यात मुस्लिम शब्द नसला तरी परिणाम कोणा वर होणार हे उघड असते. आता मुस्लिम, ख्रिश्चनांच्या प्रेयर मीट्स बंद पाडायचे प्रकार सुरू झाले आहेत. पोलीस ही त्याबाबत तुम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी नका करू मीट असं सांगतात.
ब्रिगेडींच्या वक्तव्य कृत्यापेक्षा ही कमी डेंजरस आणि हलकट असतीलही कदाचित.
टीप - ब्रिगेडींना माझे समर्थन कधीही नसेल. त्यांच्या जातिद्वेषाची मी सरसकट निखळ निंदा करतो.
फारेण्ड - तुमच्या एका
फारेण्ड - तुमच्या एका वाक्यावर मी अप्रत्यक्ष आक्षेप घेतला होता. तुमच्या लक्षात आला नसावा म्हणून स्पष्ट लिहितोय.
यांनी दिली आहेत त्या कारणामुळे विरोध नाही. सावरकर, नाशिक, हिंदू वगैरे काही संबंध नाही. जावेद व गुलजार (हे ही मुस्लिम वाटले की काय महासंघाला) यांच्या राजकीय मतांचाही काही संबंध नाही.
Submitted by फारएण्ड on 10 November, 2021 - 07:2
जावेद मुस्लिम आहेत म्हणून त्यांना आणि गुलजार मुस्लिम असते तर त्यांना केलेला विरोध चालला असता असा अर्थ निघतोय
>>खूप ब्राह्मण कलाकार आहेत
>>खूप ब्राह्मण कलाकार आहेत म्हणून एखादा कार्यक्रम आक्षेपार्ह आणि खूप दलित/इतर वर्गीय कलाकार आहेत म्हणून एखादा कार्यक्रम आक्षेपार्ह आहे असे ठरवणे हे दोन्ही चूक वाटते.
अरे कलाकृती बघा रे..... कलाकारांच्या जाती कसल्या बघताय? अमुक एका कलाकाराला ब्राम्हण कलाकार किंवा दलीत कलाकार म्हणणे हीच मुळात चुकीची प्रवृत्ती आहे!
भरत+१. भारतात जाती आधारित
भरत+१. भारतात जाती आधारित विषमता आहे आणि मलाही सगळीकडेच त्यात सांस्कृतिक कार्यक्रम ही आलेच... diversity दिसलेली आवडेलच. Diversity चे फक्त आणि फक्त फायदेच असतात यात काहीच वाद नाही.
इथे मुद्दाम ब्राह्मण आहेत (मला आहेत का माहीत नाही, पण बातमीत म्हटलंय) म्हणून टार्गेट ला विरोध आहे. शेफाली बाईना बहिष्कार टाका म्हणून गोंधळ घालून जो मॉब हिस्टेरिया तयार केला तसाच इथे ब्राह्मण विरोधी गोंधळ घालायला ग्राहक तयारच आहेत.
स्वरूप, भारतात जात आहे, ती दिसते तर तिकडे दुर्लक्ष करा ही सोपी पळवाट झाली. सर्वसमावेशाने उत्तम गोष्ट होते. Diversity हायर वर कितीही जोक केले तरी त्याचा फायदा कसा होतो हे जगजाहीर आहे.
Pages