माबोवर काय बिनसलंय?

Submitted by शांत माणूस on 19 October, 2021 - 03:40

कित्येक तास झाले, धागाखईसाचा नवीन धागा नाही. काय बिनसलंय नेमके मायबोलीवर?
जबाबदार माबोकर आणि प्रशासन या समस्येवर वेळीच उपचार करतील ही वेडी आशा आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खानपुत्राची तुरुं गातून सुटका होइस्परेंत घरात काहीही गोड धोड बनवायचे नाही अश्या सूचना गौरी मातोश्रींनी मन्नत मधील आपल्या नोकर/ स्वयंपा क्यांना दिल्या आहेत. तिथे सध्या सामसूम आहे. इदे मिलाद द्सरा काहीच तिकडे फारसे साजरे झालेले नाही. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घ्या शामा

काल रात्री झोपण्यापूर्वी हा धागा काढलेला
क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२१
https://www.maayboli.com/node/80364

पण निरीक्षण योग्य आहे. त्या आधी ४-५-८-१२ या तारखांना धागे काढल्यावर हा कालचा धागा सहा-सात दिवसांनी आला आहे. तो देखील सर्वसमावेशक नाही तर फक्त क्रिकेटप्रेमींसाठी असलेला रूटीन धागा आहे. असो, काही विषय आहेत डोक्यात. पण किंगखानऑफबॉलीवूडशाहरूखपुत्रप्रेमामुळे जरा त्याच धाग्यांमध्ये किंचित जास्त वेळ रमलो होतो हे कबूल. येनी वेज, शो मस्ट गो ऑन. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. पुढेही असे झाल्यास वेळोवेळी हाच धागा वर काढून आठवण करून देत जा. तुमचे प्रेम हिच माझी कमाई.

बिनसलेलं नसावं.
ते दिवाळी आधीच्या साफसफाई, जाळे जळमट भांडीकुडीं धुणे वगैरे कामाला जुंपले असावे कारभारणीने.

ज्याचं जळतं त्याला कळतं >>> जलने वालोंको जलने दो, धागे पे धागे निकलने दो

जोक्स द अपार्ट, धागे काढायचे व्यसन एकदा लागले की तो मोह सुटत नाही हे खरेय. मोह मोह के धागे हे गाणे बहुधा यावरच लिहिले आणि गायले गेले असावे.

ते दिवाळी आधीच्या साफसफाई, जाळे जळमट भांडीकुडीं धुणे वगैरे कामाला जुंपले असावे कारभारणीने.
>>>>
यप्स, आमच्याकडे स्त्रीप्रधान संस्कृती आहे. घरकामे साफसफाई धुणेभांडी सारी पुरुषांचीच. स्वयंपाक सोडून, फराळ सोडून, ती चव पुरुषांच्या हाताला नाही.
आणि तसेही वॅक्युम क्लीनरचा पैसा वसूल करायची हीच तर खरी वेळ आहे
गंमत म्हणजे तो ही माबोवर धागा काढूनच तर आलाय Happy
https://www.maayboli.com/node/76732

ऋन्मेष, काल तुम्ही अजून एक धागा काढणार असा ऐलान केला होता खाऊगल्लीत..
मी सकाळपासून शोधतेय तो नवा धागा.

मानव, ते आमच्या सारख्या दरवर्षी तडीस न जाणारा संकल्प करण्यार्‍यांसाठी चरबी जाळण्याचे १० मार्ग वैगेरे असा काही तरी धागा काढा न!

ऋन्मेष, काल तुम्ही अजून एक धागा काढणार असा ऐलान केला होता खाऊगल्लीत..
>>>>>
तिथल्या अवांतर पोस्ट थांबवायला ऐलान केलेले,
आज रात्री पाहिले तर अवांतर पोस्ट थांबल्या नव्हत्या म्हणून मग काढलाच धागा

https://www.maayboli.com/node/80370

धागाखईस! ही काय भानगड आहे?? >>> खवीस चा उच्चार आमच्या गावाला खईस असा करतात. नेमका उच्चार खैस.

पुढेही असे झाल्यास वेळोवेळी हाच धागा वर काढून आठवण करून देत जा. तुमचे प्रेम हिच माझी कमाई. >> लाजवताय सर आपण. कधी कधी गल्लीतली उनाड पोरं दिसली नाहीत तर शांतता लाभते, तरी पण सवयीचा भाग म्हणून गल्लीचं काय बिनसलंय असं वाटत राहतं, त्या धर्तीवरच्या भावना आहेत या. आपण धागा काढावा अशी सूचना त्यात नाही. तुम्ही तसा अर्थ घेतला असेल तर माझे काही म्हणणे नाही. Happy

आपण धागा काढावा अशी सूचना त्यात नाही. तुम्ही तसा अर्थ घेतला असेल तर माझे काही म्हणणे नाही. >>>> खाजवुन खरूज अशी म्हण आहे, आज उदाहरणासहित अर्थ कळला

धागाखईस! ही काय भानगड आहे?? >>> खवीस चा उच्चार आमच्या गावाला खईस असा करतात. नेमका उच्चार खैस.>> आमच्या गावालापण 'खैस' असेच म्हणतात. Happy
पण सरांनी स्वत:वर का ओढुन घेतले बरे?

एक आयडी धागा काढते एक धागा का काढत नाही म्हणून व्यथित होते. मिरर इमेज.
>>>>>>

म्हणजे शांत माणूस हा माझाच अष्ट्यात्तहरावा आय डी आहे.
बस्स हेच ऐकायचे होते Happy

कधी कधी गल्लीतली उनाड पोरं दिसली नाहीत तर शांतता लाभते, तरी पण सवयीचा भाग म्हणून गल्लीचं काय बिनसलंय असं वाटत राहतं
>>>>>

धन्यवाद सर, गेले काही काळापासून वाटत होते की आपल्यातले उनाड पोरं मेलेय की काय... आपली पावती मोलाची Happy

म्हणजे शांत माणूस हा माझाच अष्ट्यात्तहरावा आय डी आहे. >> अजून कुणी म्हटलेलं नसताना व्हिक्टीम कार्ड खेळत परस्पर अशा आयड्यांना संशयाच्या भोव-यात आणायची युक्ती आहे ही. सारसबागेत वडा विकणार माणूस नवी मुंबईत बसून धागे कसा काय विणेल बरं ? की सारसबाग नवी मुंबईला हलवली ? आव्हाड करू शकतात म्हणा हे ( टपून बसलेल्या आयड्यांनी हे आमंत्रण समजू नये).

अजून कुणी म्हटलेलं नसताना
>>>>
मग हे जे म्हटले आहे त्याचा अर्थ काय?
एक आयडी धागा काढते एक धागा का काढत नाही म्हणून व्यथित होते. मिरर इमेज.

आणि तुम्ही सारसबागेचे म्हणत आहात. कटप्पा तर अमेरीकेचे होते. तरीही ते आणि मी एकच असा आरोप व्हायचा.

मग हे जे म्हटले आहे त्याचा अर्थ काय? >> ज्याने म्हटले तोच याचा अर्थ सांगण्यास सर्वोत्तम व्यक्ती आहे. माझी काही तत्त्वं आहेत. त्यानुसार राहुल गांधी, नरेंद्र मोदी, अमित शहा, अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याचा जाब मी कुणालाही देत नाही. कारण मी त्यांचा ड्युआयडी नाही. मी एक साधा वडेवाला आहे. एव्हड्या वेळात दोन ग्राहक जास्तीचे होतात.

माबोवर सायलेण्ट मोड मधे असलेले रोड टच जागा विकत घेऊन तिस-या ग्राहकाला परस्पर विकून लाखोंचा फायदा कमवून बसतात तरी इथे काही धागे तेच तेच वळण गोल गोल घेत चालू असतात.

ज्याने म्हटले तोच याचा अर्थ सांगण्यास सर्वोत्तम व्यक्ती आहे.
>>>>>
सहमत आहे. पण जर ते वाक्य माझ्याबद्दल असेल तर मी आधी त्या वाक्याचा मला काय अर्थ लागतोय हे बघणारच ना. स्वाभाविक आहे हे.

माझी काही तत्त्वं आहेत. त्यानुसार राहुल गांधी, नरेंद्र मोदी, अमित शहा, अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याचा जाब मी कुणालाही देत नाही.

>>>LOL

शांत माणूस एकावर एक सिक्सर मारत आहेत
आणि धागाखैस भाबडेपणा करण्याची/दाखवण्याची पराकाष्ठा करतोय

लैच अवडलाय हे Happy

Pages