माबोवर काय बिनसलंय?

Submitted by शांत माणूस on 19 October, 2021 - 03:40

कित्येक तास झाले, धागाखईसाचा नवीन धागा नाही. काय बिनसलंय नेमके मायबोलीवर?
जबाबदार माबोकर आणि प्रशासन या समस्येवर वेळीच उपचार करतील ही वेडी आशा आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि धागाखैस भाबडेपणा करण्याची/दाखवण्याची पराकाष्ठा करतोय
>>>>

भाबडेपणा माझ्या स्वभावातच आहे. मी लपवायचा प्रयत्न करतो आणि तो नेहमी उघडा पडतो.
असो, जर धागाच माझ्यावर आहे तर मी बोलणार नाही का. रँकिनच्या नियमानुसार ईथे वन थर्ड पोस्ट तरी माझ्याच असायला हव्या.

नाही प्रत्येक नव्या पोस्ट मागे किमान तुझ्या दीड पोस्ट तरी असल्याच पाहिजेत
तुझ्या आतल्या भाबडेपणाची शपथ आहे तुला

नाही प्रत्येक नव्या पोस्ट मागे किमान तुझ्या दीड पोस्ट तरी असल्याच पाहिजेत
>>>>>

उद्या तुम्हीच म्हणाल की दर पोस्टला वेगळे उत्तर का देतो?

असो, मी माझ्या धाग्यावर धागाकर्ता म्हणून जबाबदारी घेऊन प्रत्येकाला व्यवस्थितपणे स्वतंत्र उत्तर देतो तेव्हा तुम्ही माझ्यावर हा आरोप करता.
पण आज दुसर्‍याच्या धाग्यावर मी निस्वार्थीपणे प्रतिसादांचा रतीब घालतोय ते कौतुक करायला मात्र तुम्हाला जड जातेय.

म्हणजे ते धागाखैस का काय ते तुम्हीच का? >>> आई थिंक सो... दुसरा कोण आहे का मायबोलीवर? माझ्या माहितीत तरी नाही

आई थिंक सो... दुसरा कोण आहे का मायबोलीवर?>> कदाचित धागाकर्त्यांच्या नजरेसमोर दुसरही कोणी असु शकते. तेच खुलासा करु शकतील.

आपल्या धाग्यावर संख्या वाढवायला कोण पण लिहिल
त्यात काय कौतुक

इथे तुझा विषयही नसताना तो मीच म्हणत अटेंन्शन सिकिंग या तुझ्या बळवलेल्या आजाराला अनुसरून पोस्ट टाकत आहेत
त्या बद्दल तुझं कौंतुक करावं ही पण अपेक्षा आहे

हे म्हणजे एखादा दारुडा घरीच नव्हे तर बाहेर पण किती पेग मारतो यावर त्याचे कौतुक करण्यासारखे आहे

तसे असेल तर करूच की बाबा
दोन हाणा पण पाटील म्हणा अशीच तुझी इच्छा असेल तर त्याला काय करणार

आशूचँप, ........आवरा.

ऋन्मेष, मानलं बुवा. समोरचा मुद्दाम वाकड्यात घुसतोय, कारण नसताना उचकवण्याचा प्रयत्न करतोय हे बघूनसुद्धा त्याच्या पातळीला न उतरता त्याला सभ्य भाषेत उत्तर देणे, इतका समतोलपणा कुठून आणतोस बाबा?

शांत माणूस, दहा वेळा वडापावाचा उल्लेख केला तर आपला ड्यू आयडी प्रमाणित होत नाही. Lol
जितक्या वेळा कपडे बदलाल, तितक्या वेळा उघडे पडण्याची शक्यता जास्त.......लक्षात घ्या ताई. Proud

इथे तुझा विषयही नसताना तो मीच म्हणत.....
>>>

कम ऑन आशूचॅम्प, हे तुम्हालाही माहीत आहे धागा माझ्यावरच आहे, हे मलाही माहीत आहे धागा माझ्यावरच आहे, आणि धाग्यावर आतापर्यंत प्रतिसाद दिलेल्या सर्वांनाच माहीत आहे धागा माझ्यावरच आहे. मग ताकाला जाऊन भांडे का लपवायचे? Happy

ऋन्मेष दर दुसर्‍या दिवसाला धागा काढतो म्हणून यावर चर्चा घडवायला तिसर्‍या दिवशी आपणच एक धागा काढायचा.. आयरनी आयरनी म्हणतात ते हेच का आयरनीच्या देवा...

ऋन्मेष, मानलं बुवा. समोरचा मुद्दाम वाकड्यात घुसतोय, कारण नसताना उचकवण्याचा प्रयत्न करतोय हे बघूनसुद्धा त्याच्या पातळीला न उतरता त्याला सभ्य भाषेत उत्तर देणे, इतका समतोलपणा कुठून आणतोस बाबा?>>>>

त्याच त्याच आरत्या गाऊन बोर कसे होत नाही लोकांना

त्याला राग आला की उत्तरे देणारी वेगळी लोक अचानक अवतरतात आणि मग परत साळसूदपणे समतोल धारण कर्ते मी कसा भाबडा करत मिरवतात

ही गंमत अजून कळली नसेल कोणाला यावर माझा विश्वास बसणे कठीण आहे

त्याच त्याच आरत्या गाऊन बोर कसे होत नाही लोकांना
>> ज्याप्रमाणे त्याच त्याच काड्या घालणे बोअर होत नाही लोकांना...तसेच. Lol

त्याला राग आला की उत्तरे देणारी वेगळी लोक अचानक अवतरतात आणि मग परत साळसूदपणे समतोल धारण कर्ते मी कसा भाबडा करत मिरवतात
>> आता शांत माणूस स्वतःच येऊन हा तुमचा समज खोटा पाडतील. त्यांना पक्के माहित आहे की मी ऋचा ड्यू आयडी नाही. Proud

त्यांना पक्के माहित आहे की मी ऋचा ड्यू आयडी नाही >>> नाही. माहित नाही. असूही शकता नसूही शकता. प्रोफेशनल ड्युआयडी असाल तर माझा पास तुम्हाला.

काल ही बेल नाही मिळाली. रवालाडू करू नका. फक्त वडे डब्यात घेउन जा विकायला.

तुम्ही हैद्राबादचे खिम्याचे लुखमी समोसे ट्राय केले आहेत. का? मस्त असतात.

खिमा ? बायको ठेवणार नाही जागेवर मला. एक वेळ साहस म्हणून मी बाहेर ट्राय केलं असतं, पण तिला अजिबात चालत नाही.

शांत माणूस, तेवढे धागा माझ्यावरच होता हे क्लीअर करा एकदा. तसे माहीत सर्वांनाच आहे. तरीही लोकं नियमावर बोट ठेवू लागलेत असे नको व्हायला..

शांत माणूस
यांचे चाहते व्हा
मर्यादित जागा शिल्लक
जाहिरात मुद्दामहून पेरली आहे.

नवीन टीपी धागा आला नाही. मागचा फ्लॉप होता अमिताभच्या पडत्या काळातल्या चित्रपटासारखा.

मागचा फ्लॉप होता अमिताभच्या पडत्या काळातल्या चित्रपटासारखा.
>>>>>>>
छे हो, ५७ प्रतिसाद झाले तिथे. डायरेक्ट फ्लॉप वगैरे काय.. फारसा यशस्वी झाला नाही म्हणा.
हे म्हणजे सचिनकडून अपेक्षा ठेवल्यासारखे झाले. शतक झाले तरच सचिन खेळला बोलायचे, अर्धशतक म्हणजे अपयशच

अमिताभचे पडलेले सिनेमेही शाहरूखच्या कुठल्याही सिनेमापेक्षा चाललेले असतात असे म्हणता येईल फारतर. इथे धंदा किती झाला याच्याशी घेणं देणं नाही. दिलवाले तर २० वर्षे निर्मात्यानेच लाईक्स, कमेण्ट्स करून मराठा मंदीरला चालवला होता असे म्हणतात.

त्यातले पंचवीस तर निर्मात्याचेच असतील.
>>>
असाच अंदाजे आकडा फेकलात की मोजून आलात?

Pages