व्हॅक्युम क्लीनर घ्यावा की नाही? घ्यावा तर कोणता?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 September, 2020 - 15:03

अखंड बालपण झाडू मारण्यात गेले आहे. ती सुद्धा खास आमची कोकणातली झाडू. दर गणपतीला न चुकता खाजे आणि लाडूंसोबत झाडूही गावातून घेऊन यायचो. व्हॅकुम क्लीनर वगैरे हे आमच्याकडे मोठ्या लोकांचे फॅड (चोचले) समजले जायचे. गेले चार वर्षे मोठ्या घरात राहूनही ते केवळ भाड्याचे आहे म्हणून व्हॅक्युम क्लीनर घ्यायचा कधी विचारही केला नाही. जो आता नवीन घरात करत आहोत.

तर नवीन गाडी घेताना जसे सेकंडहॅण्ड वा साध्या गाडीवर हात साफ करावा तसे आधी साधाच घेऊ म्हटले. त्या हिशोबाने युरेका फोर्ब्सच्या वेबसाईटवर एक साडेचार (कि साडेपाच?) हजाराचा चेक केला. Forbes quick clean DX vacuum cleaner (वरचा फोटो याचाच)

जमलं तर जमलं नाहीतर गेले पैसे निर्वातात असे समजून घ्यायचा ठरवले. तोच बायकोचे कोणीतरी कान भरले, भाई लेना है तो अच्छाही लेना है... वरना अच्छाही लेना है

झालं ! आज एक माणूस आमच्या घरात १५ हजार २९० रुपयांच्या व्हॅक्युम क्लीनरचा डेमो देऊन गेला. Euro clean WD X2 Vacuum Cleaner
सोफ्यातील कचरा, कीबोर्डमधील धूळ, घरात सांडलेले (त्यानेच सांडवलेले) पाणी, भिंतीवरची जळमटे, छतावरचा पंखा, अगदी मच्छरजाळीही छान साफ करून दाखवली.

भाई लेना है तो अच्छाही लेना है मधील "अच्छा" हाच यावर आमच्या घरात एक मताने शिक्कामोर्तब झाले. (ते एक मत अर्थात माझ्या बायकोचेच)

पण हा वॅक्युम क्लीनर सर्वात पहिले माझा खिसा साफ करणार असल्याने म्हटले चार जाणकार लोकांकडे चौकशी करूया. म्हणून हा धागाप्रपंच !

धन्यवाद ईन ॲडव्हान्स Happy

१) व्हॅक्युम क्लीनरबाबत सर्वात पहिला जो बदनामीकारक मजकूर वाचनात येतो तो म्हणजे नव्याचे नऊ दिवस. त्यानंतर तो घरात पडून राहतो.
हे खरे आहे का? असल्यास तो घरात पडून राहणारा व्हॅक्युम क्लीनर वरीलपैकी पाचसहा हजारावाला असतो की पंधरा हजारावाला? की दोन्ही?
आधीच वर्षानुवर्षे काही फूड प्रोसेसर, टोस्टर, ज्युसर वगैरे मशीनी घरात पडून आहेत. त्यात भर नकोय.

२) घरगुती वापरासाठी खरेच महागडा व्हॅक्युम क्लीनर घेणे गरजेचा असतो का साधाही चालतो? कि तो पंधरा हजारावाला जो मला महागडा वाटतोय तोच साधा वा नॉर्मल आहे?

३) वॅक्युम क्लीनर २०-२५ वर्षे चालेल असे मोठ्या उत्साहात तो डेमोमॅन म्हणाला खरे. पण खरेच ईतका काळ टिकतो का? की न वापरल्याने अडगळीत जातो आणि म्हणून टिकतो?

४) वॅक्युम क्लीनर घरकामाला येणारया आंटीला वापरायला द्यावा का? की त्यांचे झाडू पोछा त्यांना करू द्यावे आणि आपण अध्येमध्ये सुट्टीच्या दिवशी तो बाहेर काढून घर साफ करून घ्यावे?

५) घराचा स्वच्छ्ता ईंडेक्स उत्तम राखायला वॅक्युम क्लीनर वापराची साधारण वारंवारता काय असते? काय असावी? दर आठवड्याला, दोन आठवड्यांनी, महिन्याला, सणासुदीला वगैरे...

६) वॅक्युम क्लीनर वापराचे काही साईड ईफेक्ट आहेत का? जसे की घरात कचरा करायची टेंडेंन्सी वाढते वगैरे. लाईक, होऊ दे कचरा. वॅक्युम क्लीनर आहे घरचा.

तुर्तास ईतकेच. ईतर शंका प्रतिसादात (कोणी सिरीअस्स्ली दिल्यास (आणि ते प्लीज द्या)) मिटवतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्र १ च्या शंकेचे उत्तर माझं तरी 'हो' आहे. पडून राहतो.
माहेरी एक आणि इथे एक पडलेला आहे.
ज्यांचं उत्तर 'नाही' आहे ते बाकी प्रश्नांची उत्तरं देतीलच. Happy

व्हॅक्युम क्लिनर ही पडीक वस्तूच होते, असा अनुभव आहे. माहेरी आणि सासरी हाच प्रकार झालाय. नव्याचे नऊ दिवस संपल्यावर, झाडूनेच पटकन काम होईल ते मशीन काढण्यापेक्षा असा विचार मनात येऊन, हातात झाडू पण येतो लगेच. नवरा कधीतरी ६ महिन्यातून एकदा गाडी स्वच्छ करण्यासाठी वापरतो. ( तेही अर्थात त्याच्या मूडवर असतं).
पण स्लाईडिंग विंडोच्या फ्रेम्स व्हॅक्युम क्लिनरने छान साफ करता येतात. पण पुढाकार कोण घेणार हा मोठा प्रश्न असतो.

त्यामुळे कायमस्वरूपी पुढाकार घेणारा सदस्य घरी असल्यास नक्की घ्या आणि घर एकदम चकाचक ठेवा.

आमचा व्हॅक्युम क्लिनर (2006 मधला) आम्ही बराच वापरला.व्हॅक्युम क्लिनर 'फार लहान नको आणि फार अवजड नको' असा घेतला तर व्यवस्थित उपयोग होतो.म्हणजे कार क्लिनिंग चे लहान व्हॅक्युम क्लिनर येतात ते घायचे नाहीत.माळे सारखे गळ्यात घालून साफ करत फिरावं लागतं त्याचा स्ट्रेस येतो.खूप मोठा घेतल्यास अवजड असल्याने घरभर ओढायला लागून हात दुखतात(वायरीला किंवा धूळ शोषक नळीला धरून ओढल्यास त्याचे कनेक्शन सैल होऊन ती निघायला लागते.)
आमच्याकडे माझ्या लहानपणी युरेका फॉर्ब्स चा भारतातला पहिला व्हॅक्युम क्लिनर होता.कौतुकाने घेतलेला.पण त्याचा वापर एक दोन वेळाच झाला असेल.म्हणून तो घेऊन जाऊन 500 ला देऊन 2017 मध्ये विजय सेल्स मधून वेट ड्राय व्हॅक्युम क्लिनर आणला.ऑफिस मध्ये असतात तसे हेवी ड्युटी.त्याचा बराच उपयोग झाला.जमीन धुतल्या सारखे एका खोलीला तीन चार मग पाणी टाकायचे आणि मग पंखा लावून व्हॅक्युम क्लिनर ने हळूहळू साफ करायचे.वेळ लागतो पण जमीन सुंदर दिसते(आठवडा किंवा 2 आठवडा एकदा)

2006 चा एलजी क्लिनर लॉक डाऊन मध्ये वारला.मग तो देऊन(फुकट देऊन) युरेका फॉर्ब्स चं मिडीयम मॉडेल घेतलं.तेही बरंच वापरात आलं.
केस विंचरताना जमिनीवर पडलेले केस हा व्हॅक्युम क्लिनर चा अति उत्तम फायदा आहे.(ते करायचे नसल्यास तपकिरी रुंद सेलो टेप ने पण हे काम नीट होते.)डास वाल्या जाळ्या असल्यास त्या स्वच्छ करता येतात.
वापरणाऱ्या चा कम्फर्ट कसा आहे त्यावर व्हॅक्युम क्लिनर चा उपयोग अवलंबून.'यापेक्षा पटकन झाडून घेते/तो' हे विचार असतील तर व्हॅक्युम क्लिनर पडून राहील.घरच्यांचा पूर्ण कंसेंट घेऊन मगच खरेदी करा.मला झाडू मारणे,धूळ या कामाचा मनस्वी कंटाळा आहे(पुसताना पाण्याशी संबंध असल्याने पुसणे आवडते).त्यामुळे व्हॅक्युम क्लिनर चे घरात कायम स्वागत असते.
तसेच लिंगीझम नाही, पण व्हॅक्युम क्लिनिंग चे काम नैसर्गिक रित्या पुरुष अतिशय उत्तम करतात. Happy (एकंदर मशिन्स बद्दल आकर्षण)

किमतीबद्दल: वेट अँड ड्राय 13500 ला होता तोच आता तुम्हाला 15000 ला डेमो दाखवला असेल 2 वर्षात किमती वाढून.
मिडीयम साईझ चा फक्त झाडू करणारा(ड्राय) व्हॅक्युम क्लिनर 7000-9000 या रेंज यामध्ये मिळू शकेल. सण वार खरेदी चालू होण्यापूर्वी घ्या.त्यावेळी किमती वाढवून मग वाढीव किमतीवर डिस्काउंट देतात.)
चांगले डील, बरगेन किंवा कोणत्या क्रेडिट कार्ड ऑफर्स ने 8500 पर्यंत एल जी किंवा युरेका फॉर्ब्स मिडीयम साईझ,वजनाने 3.5 ते 5 किलो, घरासाठी रोज/वीकेंड ला उपयोगी क्लिनर मिळू शकेल.

वावे आणि माऊमैय्या, तुम्ही घेतल्यावर किती दिवस हौसेने वापरला, त्याला बाजूला ठेऊन देण्यापूर्वी?

यांनी जितके दिवस वापरला, दोघींचे ऍव्हरेज घेऊन त्याचे दुप्पट कर. तितक्या दिवसा़ं करता तू व्हॅक्युम क्लिनर भाड्याने / उधारीने घेऊन ये आणि वापर. तेवढ्या वेळात कळेल की तुझ्याकडे वापरात राहील की पडून राहील, वापरात राहिला तरच विकत घे.

हलका फुलका कॉर्डलेस अडगळीच्या जागा, बिस्तर, विंडो सील , जळमटं काढायला बरां.
बाकी, अवजड व्याक्युम कुठेतरी पडीकच रहातो. फुकटचा खार्च.

माझ्या मते जी गोष्ट आपोआप / रिमोट कमांडर इ. च्या साहाय्याने काम करते ती तमाम घरात नियमीत वापरल्या जाते. उदा. एसी/ मावे/ टीव्ही इ.
जिथे जरा अटॅचमेंट्स, सुटे भाग जुळवणं इ. करायचं असेल तर त्या वस्तू मागे पडतात. फूड प्रोसेसर/ ज्यूसर्स/ टोस्टर्स इ.

वरच्या ला अपवाद - वॉम.

आता ही गोष्ट लक्षात घेतली तर ते पोळ्यांच्या डब्यांसारखे दिसणारे ऑटोमॅटीक व्हॅक्स जास्त चांगले हे माझं मत. यात आयरूंबा वगैरे चांगले ब्रँडस आहेत. आता यात वेट वाईप करणारे सुद्धा आलेत.

घरात जमीनीवर कचरा वगळता बाकी पसारा उदा. खेळणी, कपडे इ. आणि लहान मुलं जसा पसारा घालतात तो नसेल तरच हे मशीन वेवस्थित काम करतात.
मुख्य म्हणजे आपण सेट केलेल्या शेड्यूल (ज्यावेळी घर रिकामं आहे इ.) ला आपोआप डॉक वरून निघतात घर साफ करतात (काम चालू असतांना बॅटरी लो झाली तर पुन्हा डॉक वर येऊन चार्ज होतात आणि उरलेलं काम पूर्ण करतात). मोबाईल अ‍ॅप असतं त्यावरून बराच कंट्रोल असतो. इ. इ.
घरात पायर्‍या/ जिना असेल तर खाली नाही पडत. कार्पेट्स इ. वर जरा जास्त इंटेंसिटिनं काम इ. सगळं होतं.

माझ्याकडे Nova चा handheld vaccum आहे, आणी तो मला फॅन, जाळे आणी पेस्ट्स साठी खूप वापर होतो. आता नवीन घायचा विचार आहे कारण Nova मध्ये attachments कमी आहेत आणी रॉड्स उंचावर क्लीन करण्यासाठी नाहीत. तुम्ही नवीन vaccum घेताना bagless मॉडेल घ्या ते साफ करण्यासाठी खूप easy असतात, मी LG ऑर Philips मध्ये confuse आहे, पण youtube review पाहिल्यावर Philips घ्यावासा वाटतोय
https://www.youtube.com/watch?v=Exm8szq5di4
https://www.youtube.com/watch?v=yKi0x4_OGwo

https://www.flipkart.com/philips-fc9352-01-883935201280-bagless-dry-vacu...
https://www.lg.com/in/bagless-vacuum-cleaners

Vaccum cleaner मी weekend ला वापरते कार्पेट, सलिडिंग विंडो, kitchen चे bottom आणि जर झुरळ झाली असतील तर सगळी vaccum क्लीन केल्याने खूप कमी होतात, vaccum eggs sakat झुरळ साफ करते आणी नंतर every weekend सफाई केल्याने पेस्ट्स कंट्रोल होतात, मी माझ्या मुलाला vaccum on करून टास्क देते आणी तो खुशीने सफाई करतो, मुलांना सवय हि लागते आणी त्यानां सफाई करताना मज्जा हि येते, आपला हि वेळ वाचतो, आणि घरात dust mites mule होणारी allergy येत नाही

मुंबईत राहात असाल तर व्हॅक्युम क्लिनर असणे खूपच सोयीचे पडते. घरात भयंकर धूळ येते आणि ती साफ करायच्या प्रयत्नात एका जागेवरून उडून दुसरीकडे बसते.

माझा वेट अँड ड्राय युरेका फॉर्ब्स साधारण 10 की 11,000 ला घेतला होता. भरपूर वापरला जातो. मी गाद्या, सोफे, एसी, कपाटे, ड्रेसिंग टेबल वगैरे सगळीकडे व्हॅक्युम वापरते. आठवड्यातून एकदा जमीन. घरभर केस असतात ते व्हॅक्युमने व्यवस्थित खेचले जातात. झाडून जी धूळ जात नाही ती व्हॅक्युमने जाते. डस्ट माईट्स आपल्याला दिसत नाही पण त्यांचा त्रास होतो. गाद्यावरून व्हॅक्युम फिरवल्यामुळे हा त्रास खूप कमी होतो.

वेट ऑप्शनपण वापरलाय. त्याचेही रिझल्ट्स उत्तम आहेत. पण मी नंतर कंटाळा केला वेट ऑप्शन वापरायचा.

दाराचे ग्रील, मच्छरची जाळी वगैरेसाठी जो ऑप्शन आहे तो पाण्याचा एकही थेंब जमिनीवर न पाडता पाण्याच्या तुषारांनी हे सगळे साफ करून देतो. मी झुंबरे पण साफ करते ह्या ऑप्शन ने. डेमो देणार्याने जेव्हा हा डेमो दिला तेव्हा मी त्याला करायला देत नव्हते, पाणी उडणार सगळीकडे म्हणून. पण तो म्हणाला, मॅडम शांत राहा आणि फक्त बघा. Happy Happy

अर्थात मी बाईकडून हे सगळे करून घेते. जमीन व गाद्या आता तिला जमतात, बाकी सगळ्यात मी तिला मदत करते.

वावे आणि माऊमैय्या, तुम्ही घेतल्यावर किती दिवस हौसेने वापरला, त्याला बाजूला ठेऊन देण्यापूर्वी?>>>>

माझा घेतल्यापासून वापरात आहे. अर्थात मला सफसफाईचे झटके येतात अधून मधून, महिन्यातून एकदा वगैरे. आणि ह्या झटक्यादरम्यान मी पूर्ण जमीन साबण टाकून घासुन घेणे वगैरे उद्योग केलेले आहेत. (घरात शहाबादी फरशी आहे जी अशी घासली की प्रेमात पडावे इतकी देखणी होते) ड्रेसिंग टेबलवर केस दिसले की मला व्हॅक्युम काढायचा झटका येतो. Happy Happy

नव्या मुंबईत इतकी धूळ आहे की बाईने लादी पुसली तरी तासाभरात पायाला धूळ जाणवायला लागते आणि मला खूप अनइझी वाटायला लागते. व्हॅक्युम केले की जमीन पायाला इतकी गुळगुळीत लागते की त्या फिलिंगसाठी मी व्हॅक्युम करते. Lol

माझ्या कडे हँडहेल्ड आहे. हौसेने काही रविवारी कधी सोफा, सोफ्याखाली, कधी पडदे, टीव्हीची मागची बाजू, कधी कपटांची वरची बाजू, कधी पंखे वगैरे साफ केले, मग तो तसाच पडून राहिला काही वर्षे.
मग नवीन घरात शिफ्ट होण्यापूर्वी अर्बन क्लँप कडून डीप होम क्लीनिंग करून घेतले. ते सकाळ पासून रात्री आठ पर्यन्त चालले. घरी शिफ्ट झाल्यावर एकेका खोलीत सामान लावताना लक्षात आले की एक माळा त्यांनी साफ केलाच नाही, खूप धूळ होती. मग तो हँड हेल्ड व्हॅक्युम क्लिनर काढला ते साफ करायला. आणि दोन मिनिटातच ते बाळ बंद पडले ते पडलेच.
मग एकदा वेळ मिळाल्यावर ते दुरुस्त करायला उघडले तेव्हा लक्षात आले की त्याच्या मोटरची वाईंडिंग जळालीय.
आणि होत नाही वापर, पडून रहातो म्हणून दुरुस्तीला टाकणंही होत नाही.

साधना आणि अनू, आपल्या सकारात्मक पोस्ट बघून हायसे वाटले Happy नाहीतर कालची सुरुवात बघून मी टेंशन मध्ये येऊन झोपायला गेलो होतो. असे वाटलेले की डुबणार आता पैसे....

आम्ही मुंबई आणि नवी मुंबईतच राहतो. नवीन घरासमोर शाळेचे भलेमोठे मैदान आहे. आता गवत वाढलेले बघायला छान वाटतेय. नंतर मात्र तिथूनच धूळ येणार आहे. आणि ती यावी म्हणून चारही रूम्सना त्या दिशेला भिंतभर आकाराच्या खिडक्या आहेत. त्यामुळे एक्स्ट्रा साफसफाईची नक्कीच गरज आहे.

त्यात मला धुळीची प्रचंड ॲलर्जी आहे. रोजच्या शिंका असतात. सतत खिश्यात एक्स्ट्रा रुमाल असतो. त्यामुळे हा मुद्दा त्या डेमोमॅनने उचलताच आता हा वॅक्युम क्लीनर माझ्याच भल्यासाठी घरात येणार आहे अश्या अर्थाचा कटाक्ष बायकोने माझ्याकडे टाकला.

वॅक्युम क्लीनर वापरात आणायला घरात साफसफाईची हौस असणारी व्यक्ती असणे गरजेचे हा मुद्दा पटला. बायकोने ती जबाबदारी स्वखुशीने स्वत:वर घेतली आहे. आई यातले काही करणार नाही हे डिक्लेअर करून संभाव्य सासूसुनेचे वाद टाळले आहेत. तसेच माझ्या धूळ ॲलर्जीमुळे मी कमीच मदतीला येईन हे सुद्धा मान्य केले आहे. आणि तसेही मुळातच तिला स्वच्छताकामांची आवड आहे. फावल्या वेळेतही पसारा आवरत बसणे, वह्या पुस्तके खेळणीच नाही तर सगळ्यांचे वीर्डरोब लावत बसणे हा तिचा छंद आहे. त्या भरवश्यावर वॅक्युम क्लीनर घ्यायला हरकत नाही अश्या निश्कर्शाप्रत आता हळूहळू यायला लागलोय.

उद्या बायकोच्या माहेरी सुद्धा त्या डेमोमॅनला बोलावले आहे. त्यानंतरच दोन्ही घरात फायनल निर्णय घेतला जाईल.

मग एकदा वेळ मिळाल्यावर ते दुरुस्त करायला उघडले
>>>>>
हे भारी आहे. मी कधी असा विचारही करू शकत नाही. बाहेरून टेहाळणी करतो पण कधी कुठले मशीन उघडायला हात घालत नाही Happy
आणि मग नंतर रिपेअरींगचे बरेच पैसे जातात म्हणून चरफडत बसतो Sad
आशा करतो वॅक्ली कमीत कमी बिघडावा....

असे वाटलेले की डुबणार आता पैसे....>>
पैसे भरून खरेदी झाली असेल किंवा पैसे अजून दिले नाहीत पण भरावेच लागणार असतील तर शीर्षक चुकीचे आहे.

असो, जर घरचे लोक पण ऐकणार असतील तर पैसे वाचवायला एक आयडिया.
कुठले मॉडेल घ्यायचे, त्याचा डेमो वगैरे बघून झाला की त्या सेल्समनला मॉडेल वर जरा अविश्वास दाखवल्या सारखे करून हे मॉडेल कोणी कोणी घेतलंय याची माहिती काढायची. तसेच आपल्या मित्रमंडळात, ऑफिसात कुणा कडे ते मॉडेल आहे का याची चौकशी करायची.
वरचे प्रतिसाद बघता (माझ्या प्रतिसादासकट) लक्षात येईल की बरेच लोक व्हॅक्युम क्लिनर हौसेने काही दिवस वापरून तसाच ठेवून देतात. त्यांच्याकडून आपण तो विकत घ्यायचा. पडून असलेली वस्तू अशी सहजपणे विकली जातेय म्हणुन त्यांनाही आनंद होईल. अर्ध्या किमतीत फारसा न वापर झालेला व्हॅक्युम क्लिनर मिळेल.

मोठ्या ऐसपैस खोल्या आणि तूलनेने कमी फर्निचर असेल तर व्हॅक्यूम क्लीनरची गरजच नाही.

लहान खोल्या आणि दाटीवाटीने फर्निचर व इतर वस्तू घरात असतील व्हॅक्यूम क्लीनरचा उपयोग नाही.

पैसे अजून दिले नाहीत पण भरावेच लागणार असतील तर
>>>>
अजून फायनल नाही केला. पण कुठला ना कुठला घ्यावाच लागणार अशी चिन्हे आहेत.
तरी ईथल्या प्रतिसादांचा फायदा कुठला घ्यावा हे ठरवायला होईल.
जसे जर पाच हजाराचाही पडून राहणार असेल आणि पंधरा हजारांचाही पडून राहणार असेल तर पाच हजारांचाच घेईन. जर वापरला जाणार असेल तर तो वापरायची मेहनत करायला तयार असणारया बायकोला जास्तीचे पैसे खर्च करून एक्स्ट्रा फॅसिलिटी द्यायला काही हरकत नाही.

सेकंड हॅण्ड घ्यायची आयड्या छान आहे.
पण सायकोलॉजिकली दुसरयांनी ज्यात कचरा भरलाय अशी वस्तू आपल्या घरात आणायची हे बायकोला पटवणे अवघड आहे Happy

मोठ्या ऐसपैस खोल्या आणि तूलनेने कमी फर्निचर असेल तर व्हॅक्यूम क्लीनरची गरजच नाही.
लहान खोल्या आणि दाटीवाटीने फर्निचर व इतर वस्तू घरात असतील व्हॅक्यूम क्लीनरचा उपयोग नाही.
>>>>

ओके म्हणजे लहान खोल्या आणि कमी फर्निचर किंवा मोठ्या खोल्या आणि दाटीवाटीने फर्निचर या कॉम्बिनेशनला तो अनुक्रमे गरजेचा आणि उपयोगाचा आहे.

पण सायकोलॉजिकली दुसरयांनी ज्यात कचरा भरलाय अशी वस्तू आपल्या घरात आणायची हे बायकोला पटवणे अवघड आहे Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 19 September, 2020 - 13:04

वस्तूत कचरा नसतो. एका पोकळ नळीतून तो कागदी पिशवीत भरला जातो. कागदी पिशवी फेकून दुसरी लावायची. पोकळ नळी देखील उलट दिशेने जोरदार हवा मारून साफ करुन घ्यायची. हवे तर सर्विस सेंटर ला नेवून / मॅकेनिक ला बोलावून त्याची सर्विसिंग करुन घ्यावी. दुसर्‍यांच्या घरचा कचरा त्या मशिनमध्ये नक्कीच राहणार नाही.

ओके म्हणजे लहान खोल्या आणि कमी फर्निचर किंवा मोठ्या खोल्या आणि दाटीवाटीने फर्निचर या कॉम्बिनेशनला तो अनुक्रमे गरजेचा आणि उपयोगाचा आहे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 19 September, 2020 - 13:06

घ्यायचाच ठरविला असेल तर सोयीचा अर्थ काढू शकता. निदान बॉशचा तरी घ्या. युरेका फोर्ब्स चांगला नाही. बाकी पैसे तुमचे, मर्जी तुमचे - उडवा / सत्कारणी लावा नाहीतर वाचवा.

मी iRobot Braava M6 Mopping Robot, Roomba 971 Vacuum Cleaning Robot घ्यायच्या विचारात आहे.

याचा आपल्याकडे व्यवस्थित फायदा होतो का? ईथे कोणी आहे का ज्यांनी भारतात वापरला आहे?

निदान बॉशचा तरी घ्या.
>>
जरा डिटेल्स द्या ना प्लीज. मॉडेल सुचवले तर आणखी सोयीचे पडेल. युरेका फोर्बशी कम्पेअर केले तर उत्तमच ..

आम्ही गेले सहा सात महिने ऍमेझॉन बेसिक्स चा वापरतोय
त्याला पेपरबॅग ची भानगड नाही
हलका आहे आणि सुटसुटीत
अर्थात आमचे कारण म्हणजे आमचे भुभु
लाब्राडोर असल्याने त्याचे केस छानपैकी गळतात आणि ते झाडून काढायचे म्हणले तर इकडे तिकडे उडतात आणि गादी सोफ्यावर पडतात
त्यापेक्षा एकदा व्हॅक्युम लावून साफ केलं की नीट साफ होतं
त्याचं शेडिंग जेव्हा होत नसत तेव्हा काही वापरत नाही
त्यामुळे अगदी स्पेसिफिक कारण असेल तरच घ्या, नैतर वरती ज्यांनी लिहलं।आहे की पडून राहतो त्या सगळ्यांशी सहमत
https://www.amazon.in/dp/B07H3N8RJH/ref=cm_sw_r_cp_apa_i_ZDDzFbWGHBBM6

तुमच्या बजेटनुसार निवडा. सगळीच मॉडेल्स चांगली आहेत.

https://www.amazon.in/Bosch-Vaccum-Cleaner-15-1100-Watt/dp/B00WE1I6WM/re...

https://www.amazon.in/Bosch-Plastic-Vaccum-Cleaner-Blue/dp/B07HMYS331/re...

https://www.amazon.in/Bosch-Professional-06019C6200-Extraction-Vacuum/dp...

https://www.bosch-home.com/ne/products/vacuum-cleaners

वर आशूचॅम्प यांनी सुचविलेला अ‍ॅमेझॉन बेसिक देखील उत्तम आहे.

पण युरेका फोर्ब्जचा अजिबात घेऊ नका आम्ही टोरेनॅडॉ घेऊन पस्तावलो होतो तीसेक वर्षांपूर्वी..

प्रश्न क्र १ चे उत्तर हो असेच आहे. पण अगदिच उपयोगी नाही असेही नाही. खास करुन जर भसा भसा पाणि ओतुन फरशी साफ करायची असेल तर ह्याचा नक्कीच उपयोग होतो. ( आमच्या कडे जेव्हा बाहेर जाताना चुकुन नळ चालु राहिला आणि सगळ्या घरात पाणि झाले होते तेव्हा फार मदत झाली होती याची. नाहितर सुपलिने पाणि काढण्यात जीव गेला असता.)
२ आनि ३ चे उत्तर हे प्रत्येकाच्या बजेट आणि वापरा नुसार आहे.
४ चे उत्तर , जर प्रश्न ३ मधे सांगितल्यानुसार हा अडगळीत न टाकता वापरात ठेवायचा असेल तर हा ईतर कोणाला देऊ नये वापरायला. खरे तर गाडी सारखेच एक हाती ठेवावा.
नव्याचे नऊ दिवस झाल्यावर त्याचा कुम्भकर्ण होतो. पण आपण त्याच्या समोर आपल्या कचर्‍याचा नगाडा वाजवत किमात ८, १५ अथवा १ महिन्याने का होइना त्याला उठवण्याचे कष्ट घ्यावेत. याची एक चांगली बाजु म्हणजे, जो कचरा झाडूने नीट निघत नाही तो ह्याच्यामुळे छान साफ होतो.(डेमो वाल्याने रुमाल लावुन कशी धुळ निघते हे दाखवलेच असेल. पण ते अगदी खरे आहे.)
ह्याच्या वापराचे तसे साईड ईफेक्ट काही नाहित. उलट जर तुम्ही रोज तो वापरत नसाल आणि झाडू मारायचा कंटाळा असेल तर आपोआप कचरा कमी होतो.
आमचा व्ह्याकुम क्लिनर रंग मारयचे काम पण करतो. कधी त्याचा वापर केला नाही. पण लॅपटॉप छान क्लिन होतो. छता वरच्या जाळ्या काढ्ण्यासाठी नक्किच ऊपयोग होतो.
माझे मत तरी असे आहे की नव्याचे नऊ दिवस झाल्यावर अडगळीत का होइना हा आपल्या घरात असावा.

युरेका फोर्ब्जचा अजिबात घेऊ नका आम्ही टोरेनॅडॉ घेऊन पस्तावलो होतो तीसेक वर्षांपूर्वी..>>>

मला युरेकाची जाहिरात करायची नाहीय पण तीस वर्षांपूर्वी कंपनी ज्या प्रकारची उत्पादने विकत होती त्याच प्रकारची आजही विकत असेल तर तीस वर्षे कंपनी टिकली असती का?

इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये कित्येकदा फॉलटी वस्तू मिळाली तर ती कधीच दुरुस्त होत नाही. मी 25 वर्षांपूर्वी व्हिडिओकोनचा फ्रिज व वॉशिंग मशीन एकत्रित घेतली होती. फ्रिज घरात आल्यापासून काही महिन्यात त्रास द्यायला लागला. कंपनीने स्वखर्चाने दोनदा रिपेर करून दिला. पण त्रास तसाच राहिला. शेवटी कंटाळून 5 वर्षात बदलला. वॉशिंग मशीन 20 वर्षे काहीही त्रास न होता वापरली. शेवटी तीच ती वापरून कंटाळून गरजुना देऊन टाकली आणि नवी घेतली. ते आजही वापरताहेत.

हो मलाही तेच वाटले तीस वर्षांपूर्वी वाचून. म्हणजे १९९०… तेव्हा आमच्याकडे फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, ओव्हन, कलर टीव्ही, सीडी प्लेअर, कॉम्प्युटर, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा यापैकी काहीही नव्हते. साधा मोबाईलही नव्हता. तेव्हाच्या काळातील टेक्नॉलॉजीनुसार आणि आपल्या एका पीसच्या अनुभवावरून हे मत बनवले असेल तर ते काऊण्ट करणे माझ्यासाठी अवघड आहे. पण आपल्या सल्याबद्दल धन्यवाद.

घेतला वॅक्युम क्लीनर
वर उल्लेख केलेला १५ हजारांचा युरेका युरेका फोर्ब्सचा. आजच डिलीव्हरीही झाली लगेच.
आता ट्रेनिंग द्यायला पुन्हा त्यांचा माणूस येणार आहे. काही नव्या गोष्टी समजल्या तर सागतो ईथे

आता ट्रेनिंग द्यायला पुन्हा त्यांचा माणूस येणार आहे. काही नव्या गोष्टी समजल्या तर सागतो ईथे
इथे मधला एक शब्द बदलला आहे कां? Light 1
असो व्यवस्थित वापरा. स्वच्छ रहा स्वच्छ ठेवा......स्वच्छ भारत मिशन.

Pages