प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे किल्ली.
IMG_20210925_154459.JPG
हे पण जुनेच (तुळशी बाग)..बरेच दिवसांत वापरले पण नाहीत.

मस्त कानातले मृ
IMG-20210925-WA0024.jpg
ह्याची सध्या चलती आहे म्हणे शिरलीत
तन्मणी मंगळसूत्र
मला फरफार आवडलंय

हा फोटो हर्पेनतर्फे:
Screenshot_20210925-165728_Gallery.jpg

किल्ली, मी तुझ्या दागिन्यांना मस्त म्हणते तु माझ्या दागिन्यांना म्हण Lol
पण हे मंगळसूत्र पण मस्तच आहे.

वावावा काय मस्त नेकलेस आहे मानवांचे Lol

किल्ली चोकर अतिशय देखणा आहे. तन्मणी मंगळसूत्र छान आहे, असं एखादं घ्यावंच लागेल.
मानव आणि हर्पेन यांचे दागिने अगदीच सुंदर!

IMG-20210925-WA0026.jpg
स्पर्धेत पाकृ देणार आहे मी आज
Type करत आहे
मला Vote देणाऱ्याला हा कंठा इनाम देण्यात येईल Lol
ते राजे लोक देत असत तसं Proud

वाह, खुपच छान छान कलेक्शन्स आहेत सगळ्यांचे. सामो यांचेही फार आवडले. मी कानातले प्रेमी , हे माझं निवडक कलेक्शन Happy

IMG_20210925_183347618~2_0.jpg

कुयरी वाह वाह!!! सु-रे-ख
मलाही कानातलेच सर्वाधिक आवडतात. तुमचे लाल, गुलाबी व शुभ्र हे तीन फार आवडले. ती चक्रं इथे मिळतात पण बाकीचे ३ नाही पाहीली.

Pages